राम राम मंडळी,
सकाळचे साडे सात वाजलेत. सकाळची पाळी असल्यामुळे हापिसात येउन अर्धा तास झाला आहे. क्लायंटचं घडयाळ भारताच्या घडयाळाच्या साडेचार तासांनी मागे असल्यामुळे क्लायंट लोकं साखरझोपेत असतील. त्यामुळे आमच्या साखरझोपेचं जरी खोबरं झालं असलं तरी त्याचा नारळीपाक झालेला नाही.
सारं कसं शांत शांत आहे. त्यामुळे काय करावं असा प्रश्न पडला असतानाच आम्हाला बैलाचे सोनार ऑफ थॉट्स आठवले. पब्लिकने भरभरुन प्रतिसाद देउनही परीक्षक मिळत नव्हते. त्याच धाग्यावर आवाहन करुनही परीक्षक मिळेनात. अगदी स्पर्धकांना तुम्हीच परीक्षक शोधा अशी गळ घालून झाली. परंतू त्याचाही काही उपयोग झाला नाही.
आणि अचानक नाशिकनिवासी प. पू. पाभेमहाराज सातपूर यमायडीशीकर यांनी गैरसमजातून आम्हाला आम्ही न केलेल्या पापास दोषी धरले. आम्हास अत्यंत क्लेष झाले. परंतू या क्लेषातून आम्ही सावरलो आणि त्यांच्या तंगडया त्यांच्याच गळ्यात टाकण्याचा निर्णय घेतला. तांत्रिकदृष्ट्या त्यांची कविता स्पर्धेत नसल्यामुळे आम्ही त्यांनाच परीक्षक होण्याचे आवाहन केले. आणि काय आश्चर्य... महाराजांनी एक नितांत सुंदर प्रतिसाद त्या धाग्यावर दिला. सार्याच कविता छान असल्यामुळे त्यांनी दहा कविता एक ते दहा या क्रमाने चिकटवून त्यातली कुठली तरी एक कविता रँडमली निवडावी असे सुचवले. आणि हे जालावर करण्यासाठीचा पर्यायही सुचवला.
... आणि ते सत्कार्य आम्ही आज करुन टाकले. खाली चित्र चिकटवले आहे."सिक्रेट", "यु कॅन विन" वगैरे पुस्तके आम्ही वाचली होती खरी. पण त्यामध्ये मांडलेल्या विचारांवर आमचा कधीच विश्वास बसला नाही. म्हणे तुमची ईच्छाशक्ती असेल तर काहीही अप्राप्य नाही. आम्ही तर "च्यायला आम्ही उदया म्हणू की आमची विल पॉवर स्ट्राँग आहे आणि रंभा, उर्वशी, मेनका यापैकी ज्या कुठल्या अप्सरेकडे फ्री बँडविड्थ आहे ती अप्सरा आता या क्षणी आमच्या समोर यायला हवी. असं होईल का बोला." अशा शब्दांत खिल्ली उडवत असु.
पण या निकालाने आमचे डोळे खाडकन उघडले आहेत. चक्क रेवती आज्जींचीच कविता पहिल्या क्रमांकावर आहे. येस, यू कॅन विन... इफ यू थिंक सो !!!
रेवती आज्जींचे अभिनंदन !!!!
तर मंडळी, आम्ही स्पर्धा सुरु करताना "बाकी शुन्य" हे पुस्तक उपलब्ध असल्यास बक्षिस म्हणून देण्यात येईल असे म्हटले होते. परंतू हे पुस्तक आउट ऑफ प्रिंट असल्यामुळे आम्ही याच धाग्यावर दिलेल्या प्रतिसादानुसार विजेत्याला हवे असलेले पुस्तक देण्यात येईल. ते पुस्तक रेवती आज्जींपर्यंत कसे पाठवायचे हा पुढचा प्रश्न आहे. तुर्तास रेवती आज्जींनी कुठले पुस्तक हवे ते प्रतिसादात सांगावे.
असो. पुन्हा एकदा रेवती आज्जींचे अभिनंदन करुन मी माझे दोन शब्द संपवतो.
जय आळंदी जय ज्ञानेश्वरी !!!
प्रतिक्रिया
28 Nov 2011 - 8:28 am | प्रचेतस
रेवती आज्जेचे हार्दिक अभिनंदन.
आता धनाजीरावांस चटण्या-कोशिंबिरींची पुस्तके शोधणे क्रमप्राप्त आहे. ;)
28 Nov 2011 - 8:55 am | सोत्रि
आज्जे,
अभिनंदन गं!
- (चटण्या-कोशिंबिरींची पुस्तकं हवा असलेला) सोकाजी
28 Nov 2011 - 9:27 am | रेवती
काय म्हणता धनाजीराव!
माझा पयला लंबर?
शाळेच्या दहा वर्षात एकदाही न मिळालेला नंबर मिळाला कि हो!
तुमचे आभार!
रंभा, मेनका, उर्वशी यांच्याकडे तुमच्यासाठी ब्यांडविड्थ असो हा आशिर्वाद!
आता ते पुस्तकाचं विचारू नका बुवा!
सगळी गंमत चालली होती.
मजा आली हेच रिवॉर्ड!;) (पाहिलेत ना मुलांनो कसे उच्च विचार आहेत ते!;))
28 Nov 2011 - 10:09 am | किसन शिंदे
असं कसं, आयोजकच एवढं आग्रहाने बक्षीस देतायेत तर तुम्हाला ते घ्यायलाच हवं.
ते काही नाही, बक्षीस वितरण समारंभ कुठे नी कसा ठरवायचा हे आमच्याकडे राहीलं, तुम्ही फक्त तेवढं हजर राह्यचं बघा म्हणजे झालं. :)
28 Nov 2011 - 10:29 am | अन्या दातार
चला, इव्हेंट मॅनेजर किसनराव कामाला लागले तर! आज्जे आता अगदी धुमधडाक्यात बक्षिस वितरण समारंभ होतोय बघ.
रेवतीआज्जीस शुभेच्छा.
28 Nov 2011 - 6:59 pm | रेवती
अरे, तुम्ही सगळे माझा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा ठरवल्यासारखं का बोलताय?
28 Nov 2011 - 7:10 pm | पाषाणभेद
म्या तर नाय बोल्लो बाबा. माझी मुठ सोडवा आधी.
28 Nov 2011 - 4:04 pm | मोहनराव
रेवती तै अभिनंदन!!
28 Nov 2011 - 3:59 pm | पाषाणभेद
(स्पर्धेचा मुळ धागा येथे आहे.)
आपल्या सोईसाठी विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
===================================
विजेता)= स्पर्धक क्रमांक)
१) = ७) किती पाहू वाट समुद्राच्या Submitted by रेवती
२)= २) (आमची प्रेरणा) आजही तू आली Submitted by वल्ली
३)= ५) रिकामा बैल Submitted by अनिल आपटे
४)= १) आणंद ! कोण आम्ही काय Submitted by रामजोशी
५)= ३) या माडबनी झडकरि ये Submitted by गवि
६)= ६) पहिला प्रयत्न Submitted by किशोरअहिरे
७)= ८) ही घ्या आठवी Submitted by पैसा
८)= १०) फक्त निकाल लागावा याकरिताच Submitted by चेतन सुभाष गुगळे
९)= ९) माझीही एक कविता!! Submitted by मोहनराव
१०)= ४) माझा प्रयत्न Submitted by ५० फक्त
===================================
सर्व सहभागी स्पर्धकांचे व त्यांचा उत्साह वाढविणार्यांचे अभिनंदन.
विजेत्या रेवती ताईचे अभिनंदन.
एकुणच एक आगळ्यारितीने साजर्या झालेल्या स्पर्धेचा आनंद काही वेगळाच होता.
बाकी धनाजीराव, तुमचा जुना धागा - कविता पुर्ण करुन हवी आहे... असल्याच चालीचा होता. फक्त त्यात बक्षीस नव्हते. आमचा गैरसमज त्यामुळे झाला. परंतु त्या धाग्यावरही मजा आली होती.
आगामी काळात असल्याच स्पर्धा आयोजीत कराव्यात.
28 Nov 2011 - 10:32 pm | धन्या
मालक, आमच्याकडूनही हा प्रकार गैरसमजातून झाला. राग नसावा.
तुमचा आमच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून दिलेला प्रतिसाद मनापासून आवडला होताच. या प्रतिसादातूनही तुमची कविता या साहीत्यप्रकाराबद्दलची आस्था दिसून येते. :)
28 Nov 2011 - 10:45 pm | पाषाणभेद
>>> मालक, आमच्याकडूनही हा प्रकार गैरसमजातून झाला. राग नसावा.
>>>तुमचा आमच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून दिलेला प्रतिसाद मनापासून आवडला होताच. या प्रतिसादातूनही >>>तुमची कविता या साहीत्यप्रकाराबद्दलची आस्था दिसून येते.
अहो कसले मालक आम्ही.. आम्ही तर चालक. अन वरील वाक्ये बोलायच्या ऐवजी 'साहेब' म्हणून शिव्या द्या पण वरील तर्हेचे बोलू नका. अहो कसला राग अन कसलं काय? जे मनातच नाही ते कसे काय माझ्या मनात येणार?
कसलाही राग नाही अन रोस नाही.
आपले स्पर्धक कसले तयारीचे होते. एकापेक्षा एक कविता केल्यात त्यांनी. सगळ्यांचे अभिनंदन.
जरा वरती पार्टीची मजा चालू आहे. तुम्ही पाहिजे होतात राव.
29 Nov 2011 - 3:32 pm | वपाडाव
पाभे, त्या धाग्यावर मी लिहिलेल्या २ कडव्यांना धनाजीरावांनी त्यांच्या कवितेत सामील केले होते....
जर आयोजकांची तयारी असेल तर मग ह्या पामरालाही उत्तेजनार्थ बक्षीस देउन उपकृत करावे ही विनंती करण्यत येत आहे.....
29 Nov 2011 - 5:12 pm | धन्या
जरुर... फक्त कुठले पुस्तक हवे ते सांगा... इथे सांगणे शक्य नसेल तर व्यनि करा. ;)
29 Nov 2011 - 7:11 pm | मी-सौरभ
@ ध.रा. वाकडे:
आपला वप्या तुम्हाला पुस्तकाच नाव व्यनीच करणार हे निश्चीत.
तो कदाचीत पुस्तकाऐवजी CD पण मागेल ;)
28 Nov 2011 - 7:04 pm | पैसा
रेवतीचं जोरात हाबिणंदण! डिसेंबरात पुण्याला जाणार आहेस का? तेव्हा "आजीच्या विविध चटण्या" हे प्रमिला पटवर्धन यानी लिहिलेलं पुस्तक बक्षीस घेऊन ये अशी शिफारस करते.
28 Nov 2011 - 10:39 pm | धन्या
पैसातै, हे कुणाला उद्देशून आहे?
रेवती आज्जी, ही आयडीयाची कल्पना कशी वाटते? बाकी तुम्ही कुठे राहता याची आम्हाला कल्पना नाही. भारतात असाल तर हे पुस्तक मी नक्की पाठवून देईन. इंडीयात पाठवणेही शक्य आहे. पण तिकडे तेलाच्या किंवा सायबाच्या किंवा हिरव्या देशात असाल तर मात्र मला त्याची माहिती करुन घ्यावी लागेल. :)
28 Nov 2011 - 10:51 pm | पैसा
ती भारतात येणार आहे लवकरच. तुम्हाला बक्षीस समारंभ कम कट्टा करायचा असला तर विचार करा!
28 Nov 2011 - 10:52 pm | रेवती
ध. वा., ही सगळी गंमत आहे.
उगीच पुस्तक वगैरे पाठवू नका.
या धाग्याला फक्त १३ प्रतिसाद आलेत.
सगळ्यांच्या धाग्यांना प्रतिसाद देते पण मेले कुण्णीही माझं अभिनंदन करायला फिरकले नाहीत.
(ज्यांनी अभिनंदन केलय त्यांच्यासाठी नाहिये हे.) बाकी माझी कविता तरी किती चांगली होती.;)
29 Nov 2011 - 1:42 pm | मी-सौरभ
तुमच्या या उत्साही वृत्तीला आमचा सलाम...पारितोशीक मिळाल्याबद्दल हाबिणंदन....
कविता तर मस्तच होती आनी बक्षिस तुम्हालाच मिळणार हा आशावाद तर जहबर्याच...
बादवे तुम्ही बक्षीस घेतलच पाहिजे..टाळ्या वाजवायला आमी नक्की येणार बरं :)
29 Nov 2011 - 12:31 pm | जागु
रेवती अभिनंदन.
29 Nov 2011 - 1:51 pm | गवि
अभिनंदन... रेवतीताई,
परीक्षकांनी जरी अशी रँडम नंबर मेथड वापरली नसती तरी क्वालिटीवाईज तुमचाच नंबर पहिला होता.. उगाच रॅंडम नंबरचं कायतरी काढलं पाभेकाकांनी आणि धवांनी..
अशा पद्धतीने यापुढे विजेते ठरवू नयेत अशी विनंती, कारण अस्सल चांगली कविता असूनही विजेत्याला उगाच आपण कवितेमुळे नाही तर "लकी ड्रॉ" मधे सिलेक्ट झालो असं फीलिंग कशाला??
किंवा अगदी कट टू कट एकसारख्या सुंदर रचना असतील (या ठिकाणी काय वर्णावे महाराजा... ? ;) ) तर परीक्षकांनी रँडम पद्धतीने अंतर्गतरित्या नंबर काढावेत आणि जाहीररित्या मात्र विजेत्याला "विजेता" म्हणूनच घोषित करावं..
माझ्यामते रेवतीताईंची कविता ही सर्वोत्तम आहे आणि म्हणूनच विजेती आहे.. छापाकाट्याने नव्हे..
पुन्हा अभिनंदन..
29 Nov 2011 - 3:41 pm | प्यारे१
अहो गवि,
आपल्याकडं सरपंच पासून जि प अध्यक्ष पर्यंत ( सी एम चं ठरवताना हायकमांड कसं ठरवतं कुणास ठाऊक?) चिट्ठ्या टाकूनच नावं काढली जातात.
'कोळीटी' चा विचार करतंय कोण? ;)
29 Nov 2011 - 3:03 pm | ५० फक्त
लई भारी, रेवतीतै अभिनंदन.
'ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस' या न्यायाने आम्ही पायाचा दगड बनलो याचं समाधान आहे आणि रेवतीतै बक्षिस समारंभानंतर सगळ्यांना हीच कविता चालीत म्हणुन दाखवणार आहेत ह्याचा आनंद होतो आहे.
29 Nov 2011 - 5:15 pm | धन्या
अगदी महाराजा... संकल्पनेचा कापीराइट तुमचाच आहे. :)
29 Nov 2011 - 7:11 pm | रेवती
धन्यवाद मंडळी!
धमकी दिल्यावर का होईना माझं अभिनंदन केलत.;)