दारू पिणार्‍यांची संस्कॄती

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
24 Sep 2011 - 2:02 am

काही अनुभवातून आम्ही ही निरीक्षणे माडली आहेत
जरा नजर टाकावी
खालील लेखावर,

http://tinyurl.com/Sujay-Darushare

नृत्यधोरणसंस्कृतीसमाजअर्थकारणरेखाटनप्रतिभा

प्रतिक्रिया

शुचि's picture

24 Sep 2011 - 5:28 am | शुचि

मजेशीर वाटली.

तीन बारीक
ओळींच्यापुढं तुमचे लेख
सरकायला तयार नैत...
तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर गाढव पुढं सरकत नै...
आणि सरकेल अस वाटतही नै...

>> तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर गाढव पुढं सरकत नै...

काक्कू
एक अतिशय स्पष्टपणे सांगतो

माझी भाषा वापरायची तर रॉयल्टी द्यावी लागेल

कधीतरी काहीतरि वेगळं म्हणुन सुजयचं पात्र आवडलं, आपल्या ब-याच जणात सुजय असतो कधी जागा कधी झोपलेला.

असो, लेख इथं टाकयाला सुजयनं नको म्हणलं होतं का, का सुजय इथंलाच आहे, फोटोवरुन तरी तसंच वाटतंय.

नगरीनिरंजन's picture

24 Sep 2011 - 9:37 am | नगरीनिरंजन

स्पार्क्लिंग वाईन सारखा चुरचुरीत आहे. मिपाच्या पानावर मावणार नाही इतका मोठा वाटला नाही.
जगनदादा आणि सुजय यांची पानसंस्कृती आकर्षक शब्दांच्या पेल्यांत अचूक ओतली आहे. अंकलचा शॉट मात्र फारच छोटा वाटला.

मृत्युन्जय's picture

24 Sep 2011 - 10:05 am | मृत्युन्जय

लेख चांगला आहे आजो. मस्त चुरचुरीत. आवडला एकदम. पण परत तेच सांगतो. अश्या लिंका देण्यापेक्षा सरळ लेख का इथे चोप्य पस्ते करत नाही?

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Sep 2011 - 11:16 am | चेतन सुभाष गुगळे

लेख छान आहे. लेखकाच्या निरीक्षणशक्तीचा यातून प्रत्यय येतो. वरवर हा लेख व्यसन करणार्‍या तीन वेगवेगळ्या लोकांचे वर्णन करणारा वाटला तरी प्रत्यक्षात त्या द्वारे उघड आणि छुप्या अशा दुष्प्रवृत्तींमधला फरक अधोरेखीत केला आहे. चित्रलेखा चित्रपटात प्रदीपकुमार हा एक राजा असतो. त्याला मदिरा आणि मदिराक्षीचे व्यसन असते. त्यास सुधरविण्याकरिता साधुमहाराज अशोककुमार आपला शिष्योत्तम मेहमुद ला पाठवितात, पण घडते उलटेच. राजा सुधारण्याऐवजी शिष्यच मदिरा आणि मदिराक्षीच्या जाळ्यात अडकतो. तो पुन्हा राजाला विचारतो, "मी चुकलो का? पाप केलं का?" राजा म्हणतो, "नक्कीच. तू चूकला. आम्ही हे सगळं करतो पण ते करताना आम्हाला मनात अपराधी भावना वाटत नाही. मनापासून करतो. याउलट तुझे संस्कार तुला सांगत असतात की हे पाप आहे तरी तू त्याविरुद्ध जाऊन हे करतोस म्हणजे हे पापच आहे."

असेच रूपक साहित्य अजून येऊ द्यात.

हल्ली मिसळपाव वरच्या साहित्याच्या चोर्‍या होऊन ते साहित्य जसंच्या तसं दुसर्‍या संकेतस्थळावर डकवलं जाऊ लागलंय. या पार्श्वभूमीवर लेखकाने लेख थेट इथे न मांडता त्याची पीडीएफ गुगल डॉक्स मध्ये लोड करुन त्याची लिंक इथे दिलीय त्याचं मी स्वागतच करेन. आता हा लेख निदान copy + paste पद्धतीने तरी चोरी होणार नाही. चोराला निदान टंकलेखनाची तरी किमान मेहनत घ्यावीच लागेल.

शैलेन्द्र's picture

24 Sep 2011 - 11:27 am | शैलेन्द्र

छान अभ्यासु प्रतिक्रीया..

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Sep 2011 - 11:33 am | चेतन सुभाष गुगळे

धन्यवाद.

आत्मशून्य's picture

24 Sep 2011 - 11:43 am | आत्मशून्य

सहमत

नगरीनिरंजन's picture

24 Sep 2011 - 5:15 pm | नगरीनिरंजन

आम्ही हे सगळं करतो पण ते करताना आम्हाला मनात अपराधी भावना वाटत नाही. मनापासून करतो. याउलट तुझे संस्कार तुला सांगत असतात की हे पाप आहे तरी तू त्याविरुद्ध जाऊन हे करतोस म्हणजे हे पापच आहे.

म्हणजे काय? मनापासून केलं तर ते पाप नाही? तिकडे कर्मविपाकवाले म्हणतात चुकून वाईट केलं तरी फळ मिळणारच. तुम्ही म्हणता मनापासून केलं तर ते पाप नाही. कोणतं खरं मानायचं?

लेखकाने लेख थेट इथे न मांडता त्याची पीडीएफ गुगल डॉक्स मध्ये लोड करुन त्याची लिंक इथे दिलीय त्याचं मी स्वागतच करेन

कृपया रमताराम यांच्या प्रतिसादाचेही स्वागत करण्यास विसरू नये ही विनंती. धन्यवाद.

किसन शिंदे's picture

24 Sep 2011 - 11:28 am | किसन शिंदे

एवढे चागंले लिहिलयं तर इथे पोष्ट करायला काय झालं? कि एकोळी धाग्यांची परंपरा मोडायची नाहीये.

करा कि पोष्ट इथे.

रमताराम's picture

24 Sep 2011 - 12:30 pm | रमताराम

...

(प्रतिसाद गुगल डॉक्सवर पेस्टला आहे तिथे जाऊन वाचणे. दुवा गुगल करूनच शोधावा. इथे पूर्ण टायपला तर माझा प्रतिसाद चोरीला जाऊ शकेल.)

अर्धवट's picture

24 Sep 2011 - 6:27 pm | अर्धवट

.....

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Sep 2011 - 11:32 am | llपुण्याचे पेशवेll

म्हातारं इरसाल आहे. :)

मृत्युन्जय's picture

26 Sep 2011 - 11:57 am | मृत्युन्जय

_/\_

पुपेंशी शमत ;)

सोत्रि's picture

24 Sep 2011 - 12:41 pm | सोत्रि

लेखन खुसखुशीत.
निरीक्षण शक्ती अफाट!

फक्त लेखाचे शीर्षक गंडले आहे.
इथे फक्त 3 पात्रांविषयीचे निरीक्षण मांडले आहे त्याने 'दारू पिणार्‍यांची संस्कृती' कशी काय ठरते हे काही केल्या कळले नाही?

  • जगन दादाचे संपूर्ण खानदान दारू पिते, छान, त्यांच्या त्यांच्या पैशांनी पितात हे तर उत्तमच, पण त्याचा संस्कृतीशी काय सबंध?
  • जगन दादा रांगडा असा बेवडा आहे तसाच तो दारू पिऊन आरोळ्या ठोकत येतो पण जाहिरात करत नाही हा विरोधाभास फारच छान पण हे त्याचे वैयक्तिक वागणे झाले त्याचा संस्कृतीशी काय सबंध?
  • अंकलना उधार देणारे बहुदा टाटा - अंबानीच असावेत, उधारीवर 'सिग्नेचर' म्हणजे भारीच मामला आहे. कडकी असल्यावर त्यांना देशीही चालते हा त्यांचा वैयक्तिक मामला झाला, त्याचा संस्कृतीशी काय सबंध?
  • सुजय ह्याला जर न्यूनगंड वाटण्याएकढा लहान असेल तर त्याला 'मोठे व्हा' असे सांगावेसे वाटत होते पण पुढे तो जग फिरला आहे आणि त्याची दारूबद्दलची जाण तर वाढली आहेच त्यात परत मिक्सिंगची कलाही त्याला अवगत झाली आहे हे कळले मग त्याचा 'अभ्यास वाढून' तो नक्कीच 'मोठा झाला' आहे असे निरीक्षण नमूद करावेसे वाटते. :) पण त्याला बंड वैग्रे करायची आहे हेही वैयक्तिकच झाले त्याचा संस्कृतीशी काय सबंध?

सबब काही किस्से म्हणून लेख उत्तम पण दारू पिणार्‍यांची संस्कृती हे शीर्षक काही पटत नाही.

- (दारू संस्कृती रक्षक) सोकाजी

इष्टुर फाकडा's picture

24 Sep 2011 - 4:28 pm | इष्टुर फाकडा

असेच म्हणतो!!

प्रदीप's picture

24 Sep 2011 - 12:49 pm | प्रदीप

'सुजय' सारखे काही मध्यमवर्गीय, आणि नवश्रीमंत भंपक असतातच ('आहे त्यापेक्षा बोभाटा फार') पण ह्याच समाजगटात दारू बर्‍यापैकी पिऊन त्या कृत्याचीच झिंग असलेलेही अनेक असतात. 'मी पितो' ह्याचा ह्या मंडळीला प्रचंड अभिमान असतो. त्यांचेही वर्णन यावयास हवे होते.

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Sep 2011 - 11:34 am | llपुण्याचे पेशवेll

आणि नवश्रीमंत भंपक असतातच ('आहे त्यापेक्षा बोभाटा फार') पण ह्याच समाजगटात दारू बर्‍यापैकी पिऊन त्या कृत्याचीच झिंग असलेलेही अनेक असतात. 'मी पितो' ह्याचा ह्या मंडळीला प्रचंड अभिमान असतो. त्यांचेही वर्णन यावयास हवे होते.
प्रचंड सहमत आहे. मध्यंतरी मी जानवे घालून मटण खातो अशा कृत्याची झिंग असलेलेही एक महाभाग आम्ही पाहीले होते. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

26 Sep 2011 - 12:41 pm | परिकथेतील राजकुमार

प्रचंड सहमत आहे. मध्यंतरी मी जानवे घालून मटण खातो अशा कृत्याची झिंग असलेलेही एक महाभाग आम्ही पाहीले होते.

'भिकारचोट प्रतिसाद ऑफ द विक' दिला गेल्या आहे.

बाकी वरती ररा आजोबांशी सहमत आहे.

प्रदीपराव आणि पेशव्यांचा प्रतिसाद आवडला आहे. ;)
कोणाला कोणाला तर कसलाही अभिमान असतो बरं ! ;)

जाता जाता :--- उलट्या पिसांच्या कोंबडीला उलट्या पिसांचा अभिमान असेल तर त्यात नवल ते काय ! ;)

आशु जोग's picture

13 Feb 2017 - 2:14 pm | आशु जोग

व्यक्तिगत घेऊ नये

ही फक्त त्या व्यक्तींची आवड / सवय आहे. जगातील समस्त दारूड्यांच्या संस्कॄतीचा आढावा ह्यात येत नाही. सबब, शीर्षकाशी लेख मॅच होत नाही.

लेख व्यक्तीचरित्र म्हणून छानच आहे.

प्रियाली's picture

24 Sep 2011 - 4:43 pm | प्रियाली

फेसबुकावर दर तीन व्यक्तींगणिक एक सुजय बोरवणकर असतो अशी मला शंका येते.

लेख इथे न टाकण्याचे कारण?

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Sep 2011 - 5:00 pm | बिपिन कार्यकर्ते

लेख ठीक वाटला. हा सुजय बोरवणकर जो कोणी आहे तो आमच्या परा आणी धम्याचा मित्र आहे का? ;)

बादवे, असे लेख गूगल डॉक्सवर टाकून इथे लिंक देणे बरोबर नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Sep 2011 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>बादवे, असे लेख गूगल डॉक्सवर टाकून इथे लिंक देणे बरोबर नाही.

सहमत आहे.

-दिलीप बिरुटे

इरसाल's picture

25 Sep 2011 - 10:03 am | इरसाल

लेख मस्त आणि खुसखुशीत आहे.वाचताना जाणवते कि अशीच काही माणसे आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण त्यांना ओळखतोदेखील.
हवांतर: रय रय के मेर्को एसा क्यू लग र्हा कि मे इन्को ज्जान्ता हु ?

दिखावेपे मत जाव अपनी अकल लगाव .

एक सहज म्हणून विचारतो.
आपला काय अनुभव आहे ?

एखाद्या हॉटेल, बार मधे बैठक रंगते की माल घरी आणून केलेली
--

आमच्याकडे हॉटेलमधे केलेल्या बैठकीनंतर
काही सदश्यांना नेण्यासाठी स्वयंसेवकांची गरज भासते

(स्वयंसेवक म्हणजे इतरांपेक्षा बर्‍या अवस्थेत असलेला सदश्य)

--

घरी मात्र स्वातंत्र्य असल्याने विविध गुणदर्शन पहायला मिळते
यातूनच आम्हाला अनेक वक्त्यांचा शोध लागला आहे

आपण हे गाणं पाहिलं नाहीत का महाशय??
आपले सगळे फण्डे क्लियर होतील.....
http://www.youtube.com/watch?v=91qEDcXYmiQ

आशु जोग's picture

27 Sep 2011 - 1:01 am | आशु जोग

नगरीनिरंजन

>> अंकलचा शॉट मात्र फारच छोटा वाटला.

खूप गोष्टी फिल्टर कराव्या लागल्या.

अंकलचे अधिक मोठे व्यक्तीचित्रही रेखाटता आले असते. पण तिथे जरा पंचाईत आहे.
दारुच्या दुकानापलिकडच्या काही पेठा आणि गल्ल्या यांचेही वाचकांना दर्शन घडवावे लागले असते.

त्या गोष्टी इथे पचणे अवघड

मॄत्युंजय,

यातल्या पात्रांची चित्रे असती तर बरे झाले असते. सांगा तुमच्या बंधुंना रेखाचित्रे काढायला.

त्रिलोकेकरशेट,
तुमच्या भावना मी सुजयपर्यंत पोचवेन. सांगेन त्याला अभ्यास वाढव नि मोठा हो.
लवक्कर हार्डकोअर ग्रुपमधे ये.

सोत्रि's picture

28 Sep 2011 - 5:52 am | सोत्रि

त्याचा 'अभ्यास वाढून' तो नक्कीच 'मोठा झाला' आहे असे निरीक्षण नमूद करावेसे वाटते.

आशु,
मी तर आधिच तसे म्हटले आहे :)

- (हार्ड कोअर) सोकाजी

आशु जोग's picture

13 Feb 2017 - 2:13 am | आशु जोग

सुजय बोरवणकर !

पंतश्री's picture

13 Feb 2017 - 5:09 pm | पंतश्री

लिन्क उघडत नाहि आहे

आशु जोग's picture

4 Mar 2017 - 9:47 am | आशु जोग

पहा बरे !

आशु जोग's picture

4 Mar 2017 - 1:17 pm | आशु जोग

Ha dhaga hide kela ahe ka

जयन्त बा शिम्पि's picture

17 Feb 2017 - 7:55 am | जयन्त बा शिम्पि

एका ओळीत प्रतिसाद " पीनेवालेको पीनेका बहाना चाहिये "
जगनदादा सारखे जे कोणी असतात , ते पितात थोडी, पण खुप चढ्ल्याचा आव आणतात, अर्धवट शुद्धीवर असतात, नाहीतर घराची वाट कशी बरोब्बर धरतात ?
नौकरीत असतांना , मित्रांना जीपगाडीत घेउन , ' खाणे-पिणे ' करण्यासाठी मीही जात असे. ड्रायव्हरला
सुट्टी देउन मीच ड्रायव्हींग करीत असे, कारण मी " पिणारा " नव्हतो, त्यामुळे सर्वजण म्हणायचे ' हा आमचा इन्शुरंस आहे,कितीही प्यालो, तरी सर्वांना त्यांच्या घरी सोडून येणार , गाडी ऑफिसला ठेवणार व मग घरी जाणार".

आशु जोग's picture

13 Mar 2017 - 2:20 pm | आशु जोग

असेल

गामा पैलवान's picture

4 Mar 2017 - 4:00 pm | गामा पैलवान

आशु जोग,

दुव्यावर टिचकी मारल्यास सहभाव निषिद्ध (अॅक्सेस डीनाईड) सूचना दिसते आहे.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

6 Mar 2017 - 3:05 am | गामा पैलवान

आशु जोग,

तुमचं एकेक पात्र सत्याकडून असत्याकडे सरकंत जातं. जगनदादा फुल्टू सत्य तर सुबो पार असत्य. काकोबा मध्ये कुठेतरी लटकताहेत. पहिले दोघं तलफ आली की पितात. तर सुबो तलफ न येताही पीत असतो. काय हा घोर अध:पात! ;-)

आ.न.,
-गा.पै.

आशु जोग's picture

6 Mar 2017 - 1:13 pm | आशु जोग

आपण बैठकीचा हिस्सा व्हा.
सत्य असत्य कळू लागेल.