आज सकाळी सकाळी 'सकाळ ' मधिल एका बातमी णे लक्ष वेधले !
अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आमीर खान एका मराठी चित्रपटामध्ये काम करणार आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले तरी साधारण दिवाळीच्या आसपास हा चित्रपट सेटवर जाणार आहे. त्याची निर्मिती ए. पी. कॉर्प या बॅनरखाली केली जाणार आहे.
खरे तर बच्चन कुटुंबीय आणि त्यांचे मराठी प्रेम तसे काही नवीन राहिलेले नाही. अमिताभ बच्चन-जया बच्चन यांनी "अक्का' या चित्रपटामध्ये पाहुणे कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर ए. बी. कॉर्प या बॅनरखाली अमिताभ बच्चन यांनी "विहीर' या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट अनेक जागतिक महोत्सवामध्ये गाजला होता आणि आजही तो राष्ट्रीय; तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट महोत्सवामध्ये जात आहे. मध्यंतरी मराठी नाटक आणि चित्रपटांच्या दुबईत झालेल्या "मिफ्टा' या ऍवॉर्ड सोहळ्याला अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली होती आणि मराठीबद्दल कौतुकोद्गार काढले होते. डोंबिवलीतील नाट्यसंमेलन; तसेच पुण्यात गेल्या वर्षी झालेल्या साहित्य संमेलनामध्येही अमिताभ बच्चन उपस्थित राहिले होते आणि त्यांनी मराठी अभिमान गीताविषयी मराठीमध्ये बोलून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे आपल्या मराठीच्या प्रेमाखातर त्यांनी दुसरा मराठी चित्रपट काढण्याचे ठरविले आहे.
या चित्रपटात अभिषेक-ऐश्वर्या काम करणार आहेतच; शिवाय त्यांनी आमीरलाही या चित्रपटामध्ये एका खास भूमिकेसाठी घेण्याचे निश्चित केले आहे. मुळात आमीर लहानाचा मोठा मुंबईत झाला आहे. त्यामुळे मराठी संस्कृती आणि भाषेचे त्याला ज्ञान आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात त्याने मराठी चित्रपटाची निर्मिती करायला आपणास आवडेल असेही सांगितले होते. सुहास लिमयेकडून त्याने मराठीचे धडेही गिरविले आहेत. त्यामुळे तो देखील या चित्रपटात काम करण्याबाबत अत्यंत "एक्साईट' असल्याचे सांगण्यात येते. चित्रपटातील अन्य कलाकार ठरलेले नसले तरी या सिनेमाच्या निर्मितीमूल्यांबाबत तडजोड केली जाणार नसून त्याचे चित्रीकरण लंडन, मॉरिशस, न्यूझीलंड, स्वीत्झर्लंड येथे होईल असे सांगण्यात आले.
मात्र अमिताभ यांच्या निर्मिती संस्थेचे नाव ए. बी. कॉर्प असताना या सिनेमाची निर्मिती ए.पी. कॉर्प या वेगळ्या नावाने का केली जाते आहे असे विचारले असता ए. पी. हा "एप्रिल फुल'चा शॉर्टफॉर्म असल्याचे सांगण्यात आले :D
प्रतिक्रिया
1 Apr 2011 - 7:41 am | रेवती
आता बरं सगळ्यांना मराठी प्रेमाचं भरतं आलं?;)
जया बच्चननं द्रोणाच्यावेळी केलेल्या भाषणबाजीमुळं कोण्या पक्षाचे दंडूके बसलेले दिसतात.
मला सूनबाई त्या मानानं बर्या वाटतात्........मनातल्या सगळ्या गोष्टी निदान बोलून तरी दाखवत नाहीत.;)
1 Apr 2011 - 8:10 am | यशोधरा
LOL! अगदी रेवती!
1 Apr 2011 - 8:27 am | नरेशकुमार
हा हा हा ! ! !
लय भारी
1 Apr 2011 - 9:07 am | नितिन थत्ते
कूल ड्यूड....
मराठी चित्रपटात मराठी अभिनेत्रीने हिंदी आयटम साँग केल्याचे अजून चांगले आठवते आहे.
1 Apr 2011 - 10:57 am | विजुभाऊ
मराठी चित्रपटात मराठी अभिनेत्रीने हिंदी आयटम साँग केल्याचे अजून चांगले आठवते आहे.
सोनाली बेन्द्रे बाईनी अगबाई अरेच्चा चित्रपटात " चम चम करता है ये नशीला बदान"
अहो आयटम सॉन्ग इतकी मराठी पुढे गेलेली नाहिय्ये. त्या ऐवजी लावणी बरी वाटते.
आणि कल्पना कराना अलका कुबल किंवा सविता प्रभुणे आयटम सॉन्ग करताहेत.
बाय द वे रजनीकान्थ सुद्धा म्हणाला होता की त्याला मराठी चित्रपटात काम करायला आवडेल म्हणून .
पण प्रश्न असा आहे की त्याला चित्रपटात घ्यायला किती खर्च येईल. आणि त्या खर्चात कितीतरी मराठी चित्रपट होतील.
दुसरा मुद्दा हा आहे की समजा रजनीकान्थ ने मराठी चित्रपटात कम केले तेरी किती जण तो चित्रपट थेटरात जाऊन पहातील
1 Apr 2011 - 11:23 am | शिल्पा ब
<<<दुसरा मुद्दा हा आहे की समजा रजनीकान्थ ने मराठी चित्रपटात कम केले तेरी किती जण तो चित्रपट थेटरात जाऊन पहातील
अगदी हेच्च म्हणणार होते.
1 Apr 2011 - 9:09 am | llपुण्याचे पेशवेll
हॅ हॅ हॅ.
एपी डझन्ट स्टँड फोर एप्रिल फूल बट इट स्टँड्स फॉर 'ऑल्वेज फूल'. :)
-ए एफ पेशवे
1 Apr 2011 - 9:55 am | chipatakhdumdum
रामदास स्वामी जरी ब्रह्मचारी होते, तरी त्याना मनुष्यस्वभावाची चांगलीच पारख होती. आता पहा ना, रामदासानी, ' टवाळा आवडे विनोद ' अस म्हटल आहे. ' टवळी ' अस म्हटलेल नाही. बायाना त्यावेळी सुध्दा विनोद कळत नसत.
...................( चोरलेले चुटके )
1 Apr 2011 - 2:49 pm | रमताराम
ते पण संपादिकाबैंशी पंगा. लय डेरिंगबाज राव तुम्ही.
1 Apr 2011 - 10:02 am | वपाडाव
जंगल जंगल बात चली है पता चला है, चड्डी पेहेनके (एप्रिल) फुल किया है, फुल किया है....
- टार्याचा जवाब मोगलीसे
(बगीरा)
अवांतर : तसेही अभिषेक-ऐश्वर्या जोडीला पिच्चर देणे मामुली गोष्ट नाही राहिलेली..
1 Apr 2011 - 10:28 am | चिंतामणी
एप्रिल फुल
1 Apr 2011 - 10:36 am | कच्ची कैरी
दिन है सुहाना आज पहिली तारीख है खुश है जमाना आज पहिली तारीख है/बाकी ते एप्रिल फूल वैगरे जाउ द्या
1 Apr 2011 - 11:12 am | वपाडाव
मनसोक्त खाउन घ्या....
अन नंतर तोंड/हात सगळं या रुमालानं पुसुनही घ्या...
1 Apr 2011 - 10:59 am | विजुभाऊ
ए. पी. हा "एप्रिल फुल'चा शॉर्टफॉर्म असल्याचे सांगण्यात आले
फूल चे स्पेलिंग PHOOL असे असावे
1 Apr 2011 - 3:00 pm | चिंतामणी
सगळी बातमी कॉपी/पेस्ट केलीस. तर ही सुद्धा द्यायची की
http://www.esakal.com/esakal/20110401/5502656718064555712.htm