तो... भाग (१)

भारतीय's picture
भारतीय in जनातलं, मनातलं
5 Oct 2010 - 2:24 pm

तो.. साधारण पंचविशीचा तरूण.. मला प्रथम भेटला तेंव्हा काही विशेष वाटलं नाही त्याच्यात.. म्हणजे पर्सनॅलिटी छान, पण चेहर्‍यावर शांत भाव. त्याचे कपडे नीटनेटके होतेच पण ईतरांपेक्षा काहीसे हटके.. "वेलकम सर..." मला पाहून त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. "थँक्यु" म्हणत मी मंदस्मित केले व त्याच्या पुढे आलेल्या हातात हात मिळवला. ईथेच हा माणूस वेगळाच असणार याची कुणकूण लागली थोडीशी.. हस्तांदोलनातच कळते कि समोरच्याचा आत्मविश्वास किती आहे अन मला त्याच्या हस्तांदोलनात ते कळालेच.. त्याने मला साईट ऑफीसमधल्या त्याच्या टेबलाजवळ नेले. "प्लीज सर", त्याने मला कुठे बसायचे हे खुणेनेच सांगितले. मी बसलो. प्राथमिक ओळख करून घेतल्यावर मी त्याला विचारले, "अगोदर कुठल्या प्रोजेक्टवर होतास ?" "ट्रँटर ईंडीया, सणसवाडी.. सिंपल होता प्रोजेक्ट. ईंटर्नल रोड, लोडींग-अनलोडींग प्लॅटफॉर्म अन जुन्या रूफ शीट्स बदलायच्या होत्या फक्त.. बाकी काही विशेष नव्हते." "हम्म.." मी जरावेळ पॉज घेतला, "काय तुमची कंपनी, ईतका अवघड जॉब आहे तर तुझ्या जोडीला कुणीतरी सिनीयर असायला हवा होता." "सर मी सगळी ड्रॉईंग्ज पाहीली आहेत. जॉब अवघड आहे खरा, पण थोडे काळजीपूर्वक केले तर जमून जाईल सर.. अन तुम्ही आहातच ना मार्गदर्शन करायला. अक्चुअली मी साईटवर लाईन आउटही केलयं, पाहायचं का?" त्याच्या शेवटच्या वाक्याने मी चमकलोच. हा पोरगा काल ईथे आला अन ईतक्यात लाईन आउटही तयार ? "काय केलस तू? मला अगोदर रीपोर्ट करता नाही आला ? पुढे काही केलं नाही ना ?" काहीतरी गडबड झालीच असणार असे वाटल्यामुळे मी त्याच्यावर जवळ्-जवळ ओरडलोच. "हॅलो सर.. एक मिनीट, यू कॅन नॉट टॉक विथ मी लाईक धिस.. मी फक्त लाईन आउट केलय अन तुमचे क्लॅरीफिकेशन मिळावं म्हणूनच पुढे काही केले नाहीये.. आपण प्लीज साईटवर जाऊन बघू, चला.." माझी वाटही न बघता तो साईटवर गेलासुद्धा...
हायटेम्प फर्नेसेस, चाकण..प्रेस मशिन फाऊंडेशन करायचं होतं साईटवर.. हे काही साधंसुध फाऊंडेशन नव्हते.. २३ मी. बाय १४ मी.. ८ मी खोल..त्यातही 'अतिलिष्ट' असे छोटे छोटे स्ट्रक्चर्स.. डिझाईन बेल्जियमवरून आलेले.. मशिनही तिकडूनच येणार होती.. एरर मार्जिन २ मिमी फक्त ! या फाऊंडेशनवर बसणारं प्रेस मशिन आशियातील सर्वात मोठं व जगातील २ रे मोठे असणार होते (त्यावेळचे).. त्या फाऊंडेशनचं नुसतं ड्रॉईंग जरी पाहिलं तरी माझ्या डोक्यात मुंग्या यायच्या अन या पोरानं चक्क एक दिवसात लाईन आउट केलसुद्धा ! मी साईटकडे चालता चालता विचार करीत होतो.. मग त्याचवेळेस आमच्या सरांचा फोन आला, "समीर, काय हालहवाल साईटवर ? कॉन्ट्रॅक्टरचा ईंजिनीयर आलाय म्हणे, त्याला भेटलास? " "होय सर, भेटलो त्याला... काल आलाय अन पठ्ठ्याने लाईन आउट केलं सुद्धा.. मला तरी काहीतरी गडबड वाटतेय. आता तेच बघायला चाललोय." "हम्म.. बघ जाऊन अन मला सांग काय ते." नेहमीच्या थंडपणे सर बोलले अन फोन कट झाला.. मी साईटवर आलो. तिथे तो व त्याचे ज्युनियर टेप, थिओडोलाईट, ऑटो लेव्हल ई साहित्य घेऊन तयारच होते....
(क्रमशः.. )

(छोट्या लेखनाबद्दल दिलगीरी.. माझे टायपींग स्पीड व नेट स्पीड असे दोघेही 'मंद' असल्याने मोठा भाग लिहू शकलो नाही.. हा लेख लिहीण्याचा प्राथमिक ऊद्देश म्हणजे मिपावर गेल्या काही दिवसांत सिव्हील ईंजिनीअरींगबद्दल ऊलटसुलट लिहिले गेले त्याला हे छोटेसे उत्तर हाच होता.. ही सत्यघटना असून त्यात अधिक खोलात गेले असता एका (माझ्यादृष्टीने) रिअल लाईफ हिरोचाही शोध लागला..तोच या कथेतील 'तो'.. त्याची सहमती नसल्याने त्याचे नाव उघड केले नाही पण त्याची कहाणी ईथे मांडणार आहे.. जर मिपाकरांनी स्वारस्य दाखवले तरच..)

वावरमुक्तकजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

येउद्या भारतिय अजुन. पण त्याचा आक्षेप नसेल तरच.

(केवळ शिक्षणाने स्थापत्य अभियंता) -गणा

सविता००१'s picture

5 Oct 2010 - 2:31 pm | सविता००१

पु.ले.शु.

छान लिहीलंय, आणखी येऊद्या.

विलासराव's picture

5 Oct 2010 - 2:40 pm | विलासराव

बाकी लिहा ना राव.
आम्ही आहोतच वाचायला.

वाचतोय ...
मस्त लिहित आहात

स्वैर परी's picture

5 Oct 2010 - 2:53 pm | स्वैर परी

आम्ही तुम्च्या लेखाचा पुढचा भाग वाचचन्यासाठी उतसुक आहोत. येउ द्या!

दत्ता काळे's picture

5 Oct 2010 - 2:58 pm | दत्ता काळे

वाचतोय. लिहित रहा.

भाऊ पाटील's picture

5 Oct 2010 - 2:58 pm | भाऊ पाटील

>>ईंजिनीअरींगबद्दल ऊलटसुलट लिहिले गेले त्याला हे छोटेसे उत्तर
याचीच वाट बघत होतो.

विंजिनेर's picture

5 Oct 2010 - 2:59 pm | विंजिनेर

वाचतोय.
पण मोठे भाग टाका राव :( जरा सुरू होतंय तोवर संपून पण गेला हा भाग .

वेळ काढून पुढचा भाग नक्कीच मोठा टाकेल.. आज ईतकं लिहायलाच ३५ मिनीटे लागली..

व्यवसायाने स्थापत्य अभियंता असल्याने अर्थातच 'चांगले लेखन करणे'चा अर्थ कळत नाही, जमेल तसे लिहीले आहे. त्रुटी असल्यास जरूर सांगणे व लिखाण अजून वाचनीय होण्यासाठी केलेल्या सुचनांचे स्वागतच..

श्रीराजे's picture

5 Oct 2010 - 3:34 pm | श्रीराजे

सुरुवात छान झालेली आहे...
आणखीन येऊद्यात.....

ऋषिकेश's picture

5 Oct 2010 - 3:37 pm | ऋषिकेश

वाच"तो"य.. :) येऊ देत पुढचा भाग

स्वाती२'s picture

5 Oct 2010 - 3:50 pm | स्वाती२

वाचतेय.

वाचतोय. लवकर टाका पुढचा भाग.

सुरुवात चांगली झाली आहे.
'तो' म्हणजे भलताच कडक मामला वाटतोय.

छान सुरुवात..

माझ मध्यंतरी एका सिमेंट प्लान्टवर जाण झाल होत , मलाही ते जरा अवघडच वाटल

वाचतेय. येऊद्या पुढे लवकर.

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Oct 2010 - 7:52 pm | बिपिन कार्यकर्ते

वाचतोय.

शिल्पा ब's picture

5 Oct 2010 - 10:44 pm | शिल्पा ब

पहिला भाग छान लिहिलंय...कुणी स्वारस्य दाखवू वा न दाखवू ...आपण लिहित जायचे....स्वारस्य अपोआप निर्माण होईल..येऊ द्या पुढचा भाग.

वाचतेय....मस्त सुरवात ...आता येऊ दया पुढचा भाग लवकर

बेसनलाडू's picture

6 Oct 2010 - 7:40 am | बेसनलाडू

वाचतोय.
(वाचक)बेसनलाडू