गणपती छानच आहेत. पण वरून दुसरा गणपती फारच आवडला. गणपतीची मूर्ती बैठी आणि छान आहे, सजावटही साधी, आणि सुंदर आहे.
मी बक्षीस दिले तर पहिला नंबर या सजावटीला.
अगं हो! आजकाल अगणित मंडळे झाली आहेत.
'बाल तरूण मंडळ' नावाची तर फारच असतात.
प्रत्येकाने 'सुखकर्ता' पासून सुरुवात करून रात्री धडाकेबाज गाण्याने सांगता करायची असते.;)
प्रतिक्रिया
12 Sep 2010 - 12:06 pm | अवलिया
काल माझ्या कॉलनीतली जितकी पण गणेश मंडळ होती
अरे होती का आहेत? आणि कॉलनीतली की कॉलनीत ??
छ्या ! धार्मिक लोकांना "नेटके" कधी लिहिता येईल त्या बाप्पालाच ठाउक :)
घे योग्य वाक्य -
काल, मी माझ्या कॉलनीत जितकी गणेश मंडळ आहेत (प्रत्येक सोसायटीत असलेले ) त्यांनी केलेल्या देखाव्यातले गणपती बाप्पा टिपले आहेत... :)
बाकी फटु मस्त !!
12 Sep 2010 - 12:22 pm | Nile
असे असावे बहुतेक. काय नाना? ;-)
12 Sep 2010 - 12:27 pm | अवलिया
या प्रश्नावर मराठीच्या प्राध्यापकांनी प्रकाश टाकावा
14 Sep 2010 - 12:14 am | प्रियाली
खरंय! उपाय म्हणून धार्मिक लोकांनी फोटो टिपावेत कारण एक चित्र हजार शब्दांच्या तोडीचे असते असे म्हटले जाते. ;)
बाकी बाप्पाचे फोटो मस्तच. :)
12 Sep 2010 - 12:13 pm | मदनबाण
नाना भावनाओं को समझो... ;)
प्रतिसादा बद्धल धन्स...
12 Sep 2010 - 12:34 pm | चिंतामणी
फोटु छान आहेत.
पण शिर्शकामुळे वाटले होते की "नेमेची येतो पावसाळा" या उक्तीप्रमाणे सार्वजनिक गणेश उत्सव या विषयावर चर्चा असावी. त्यामुळे पॉपकॉर्नची ऑर्डर दिली होती.
पण जाउ देत. रद्द करून टाकतो.
12 Sep 2010 - 2:08 pm | गणपा
आम्ही इतरांसारखे इथे तिथे न बघता केवळ बाप्पाच्या दर्शनात दंग होतो. ;)
सगळे फोटु मस्त रे बाणा धान्यवाद.
12 Sep 2010 - 2:10 pm | बिपिन कार्यकर्ते
छान. बाप्पा आमचा आवडता देव आहे.
12 Sep 2010 - 3:48 pm | सुनील
फोटो "नेटके" आले आहेत!
12 Sep 2010 - 5:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सार्वजनिक गणेशोत्सवातील सजावटीचे, श्री गणेशाचे फोटो अजून येऊ दे....!
-दिलीप बिरुटे
13 Sep 2010 - 6:13 pm | चित्रा
एका कॉलनीत इतके गणपती?!
गणपती छानच आहेत. पण वरून दुसरा गणपती फारच आवडला. गणपतीची मूर्ती बैठी आणि छान आहे, सजावटही साधी, आणि सुंदर आहे.
मी बक्षीस दिले तर पहिला नंबर या सजावटीला.
13 Sep 2010 - 7:58 pm | रेवती
अगं हो! आजकाल अगणित मंडळे झाली आहेत.
'बाल तरूण मंडळ' नावाची तर फारच असतात.
प्रत्येकाने 'सुखकर्ता' पासून सुरुवात करून रात्री धडाकेबाज गाण्याने सांगता करायची असते.;)
13 Sep 2010 - 7:59 pm | रेवती
बाणा फोटू छानच रे!
मागल्यावर्षी तू दिवाळीच्या रांगोळ्यांचेही फोटू चढवले होतेस. यावर्षी पुढचे काम म्हणजे दसरा आणि दिवाळीचे फोटू!
14 Sep 2010 - 12:33 am | प्राजु
सुरेख!! अतिशय प्रसन्न!
14 Sep 2010 - 12:58 am | जयवी
किती छान फोटो काढलेस. भारतातले बाप्पा बघून खूप छान वाटलं :)