गीतम् (संस्कृत रचना)

अशोक गोडबोले's picture
अशोक गोडबोले in जे न देखे रवी...
28 Sep 2007 - 12:51 am

नमस्कार,

अलिकडेच संस्कृतमध्ये एक रचना सुचली ती येथे लिहीत आहे.

नमामि मोदमंगलम् - विनायकं विनोदकम् II धृ II

सुदर्शनेन केवलम्
दुरितदलविलोपनम्
व्याकुलोऽपि नि:स्वनं - मनो न मे ऽ स्तु कातरम् II १ II

विषयबलविमोहिता
अविद्ययाऽपि वंचिता
धियं सधाय धीमता - पाहि तव पदाश्रितम् II २ II

कृतं मया न सुकृतम्
हितं कदा न चिन्तितम्
अतीव विकलमानसम् - शरणचरणपंकजम् II ३ II

न जातु मोक्षहेतवे
भजनपूजने कृते
तृषाहतं भवालयं - व्रतं ममाऽपि दुस्तरम् II ४ II

देहि देहि गणपते
आशिनं निरंतरम्
सुनीतिपंथगामिनम् - पुनातु मंगलार्चनम् II ५ II

--अशोक गोडबोले, पनवेल.

सदर रचनेबद्दल येथील संस्कृत पंडितांच्या प्रतिक्रिया ऐकण्यास उत्सुक आहे.

संस्कृतीकवितावाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

धनंजय's picture

28 Sep 2007 - 3:24 am | धनंजय

वा, वा. पण हा प्रकार कठीण असतो. आणि एकदा सुरू केला की पूर्ण कविता संपेपर्यंत चालू ठेवावा लागतो. मला सुरुवातीची ओळ वाचून पूर्ण गीतच प्रमाणीत असेल असे वाटले.

"तालबद्ध देत बोल, काव्यपूर्ण लेखनास,
लगे रहो अशोकराव, गोड बोलता तुम्ही."

असे कौतूक.

(खुद्द मी तालबद्ध काव्य करत नाही, पण इथे तुमच्या मात्रा मोजतो आहे! त्याचे असे आहे - मी फाटक्या विटक्या विजारी "फॅशनेबल" म्हणून घालतो, पण समोरच्या नटलेल्या सवाष्णीच्या नऊवारी निर्‍यांचा बोंगा झाला ते माझ्या नतद्रष्ट नजरेला दिसते. नऊवारी नेसणारीला, लोकांची नजर तिच्याकडे जाईल म्हणून, जास्त काळजी घ्यावी लागते, हा अन्याय आहे. पण असा अन्याय होतो जगात कधीकधी!)

चित्रा's picture

28 Sep 2007 - 4:34 pm | चित्रा

संस्कृत फारसे येत नाही, पण मोठ्याने म्हणून पाहिले - आणि कानाला चांगले वाटले.

प्रवासी's picture

30 Sep 2007 - 11:29 am | प्रवासी

वा वा अशोकराव,

संस्कृतगीत आवडले. आपल्या प्रतिभेला वंदन.

अशोक त्वां नमाम्यहम्|

आपला
(विनम्र) प्रवासी

अशोक गोडबोले's picture

30 Sep 2007 - 12:50 pm | अशोक गोडबोले

सर्व वाचकांचा मी आभारी आहे.