भारतीय टपाल खात्यातर्फे आता नागरिकांसाठी पोस्टल ओळखपत्र

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
27 Jun 2010 - 6:39 pm

भारतीय टपाल ऑफिस गाईडच्या ६३ व्या कलमान्वये आता पोस्टल ओळखपत्र देण्यात येणार आहे.

अनेकदा लोक आपापले निवासस्थान बदलतात. त्यांना आपल्या नव्या पत्त्याचा सरकारी पुरावा सादर करणे बर्‍याचदा अवघड होऊन बसते. भारतीय टपाल खात्याने त्यावर एक उपाय शोधला आहे. टपाल खात्याकडून तुम्हाला आता तुमच्या निवासाचा पुरावा तुमच्या फोटोसहित मिळवता येतो. टपाल खाते हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांच्याकडून मिळणारे ओळखपत्र हे ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र इत्यादींप्रमाणेच प्रमाणित ठरते. बँकेत खाते खोलण्यासाठी, टेलिफोन व गॅस कनेक्शनसाठी इत्यादी या ओळखपत्राचा उपयोग होतो.

ओळखपत्रात त्या त्या व्यक्तीचे इतर तपशील, त्याची स्वाक्षरी व त्याचा फोटो यांचा समावेश असेल. ते ओळखपत्र जारी केल्याच्या तारखेपासून पुढील तीन वर्षे कार्यान्वित राहील. त्यानंतर फ्रेश ओळखपत्रासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल.

अर्जात भाडेकरु असल्यास घरमालकाविषयीची माहिती, नोकरदार असल्यास एम्प्लॉयरची माहिती - तपशील, नोकरदार असल्यास नोकरीच्या ठिकाणचे ओळखपत्राची कॉपी इ. हे द्यावे लागणार आहे. बाकी हे ओळखपत्र टूरिस्ट, वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रवासी प्रतिनिधी आणि अन्य भारतीय जनतेसाठी असेल.

हे ओळखपत्र मिळवण्यासाठी त्यासाठीचा टपाल खात्याचा अर्ज भरुन द्यायला लागतो. एकूण खर्च रुपये २५०/ फक्त येतो. ( १० रुपये अर्जाची किंमत व २४० रुपये प्रोसेसिंग फी). अधिक माहितीसाठी आपण आपल्या नजीकच्या टपाल कार्यालयात संपर्क साधू शकता. ही माहिती व ओळखपत्रासाठीचा अर्ज ऑनलाईन उपलब्ध आहेत!

खालील लिंकवर अन्य माहिती व डाऊनलोड होऊ शकणारा फॉर्म मिळेल.

http://www.taxguru.in/general-info/address-proof-card-issued-by-india-po...

भारताच्या पोस्ट सर्व्हिसेस गाईडमधील ६३ क्रमांकाचे कलम तुम्ही येथे वाचू शकता : http://www.indiapost.gov.in/PO_Guide_Part-1.pdf

-- अरुंधती

धोरणराहती जागासमाजजीवनमानबातमीमाहिती

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

27 Jun 2010 - 6:43 pm | शानबा५१२

पैसे खायचे धंदे अजुन काय! ह्याची खरच तितकी गरज आहे का?

___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे

रेवती's picture

27 Jun 2010 - 7:18 pm | रेवती

उपयुक्त माहिती दिलीस अरूंधती!
शानबा यांना वाटले तसे थोडावेळ मलाही २५० रू. जास्त आहेत असे वाटले पण कार्डाची उपयुक्तता खूप आहे. एखादे कागदपत्र नसल्यास एजंट भरपूर पैसे घेउन कामे करून देतात. मग आपण त्यांना नावे ठेवतो त्यापेक्षा हे कितीतरी स्वस्त! अजूनही बरेच फायदे आहेत.

रेवती

मस्त कलंदर's picture

27 Jun 2010 - 7:37 pm | मस्त कलंदर

हे सेवा बहुधा एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ चालू आहे असे वाटते. ही माहिती ढकलपत्रातून मिळाली होती. २५० रू अधिक वाटत असतेल तरी कार्डाची उपयुक्तता आहे. मध्ये भोचक यांनी सततच्या घरे बदलण्याने त्यांच्याकडे निवडणूक ओळखपत्र किंवा तत्सम कार्डे नाहीत त्यामुळे त्याबद्दल होणार्‍या त्रासाबद्दल लिहिले होते. अशा लोकांसाठी ही कार्डे हा उत्तम पर्याय आहे.

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jun 2010 - 10:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे. कोणत्या ओळखपत्राची कुठे गरज पडेल, उपयोग होईल सांगता येत नाही. त्यातून रेशनकार्डावरतर स्पष्ट लिहीलं आहे की हे कार्ड ओळखपत्र म्हणून वापरू नये.
रू २५० ही आजकालच्या जमान्यात फार मोठी रक्कम नव्हे. मल्टीप्लेक्समधलं एक तिकीट, किंवा साध्याश्या रेस्तराँमधली दोन जेवणं म्हटलं तरी २५० रूपये सहज उडतात!

अदिती

पाषाणभेद's picture

27 Jun 2010 - 7:57 pm | पाषाणभेद

इतर ओळखपत्रांचा पर्याय असतांना आणखी एक ओळखपत्र कोण काढणार अन सांभाळणार? नेहमीप्रमाणेच टपालखात्याच्या (अन सरकारीही) बुद्धीची कुवत दाखवणारी योजना. नक्कीच तोट्यात जाईल. स्टँप पेपरवर लिहून देतो.

बाकी अरूंधतीजी तुम्ही दिलेली माहीती चांगलीच आहे. अजूनही नवी माहीती देत चला.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

पाषाणभेद's picture

29 Jun 2010 - 5:36 am | पाषाणभेद

प्रकाटाआ

रामदास's picture

28 Jun 2010 - 8:50 am | रामदास

दागीन्यांची किंवा मौल्यवान वस्तूंची ने आण करणारे अंगाडीये हे आय कार्ड नेहेमी वापरतात.(पोलीसांपासून संरक्षण होण्यासाठी.)

अरुंधती's picture

28 Jun 2010 - 7:39 pm | अरुंधती

ह्या कार्डाचे उपयोग तर निश्चित आहेत. आपली ओळख सिध्द करण्यासाठी, सरकारी कामकाजात आपल्या पत्त्याचा पुरावा म्हणून तरी चांगला उपयोग आहे!!
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2010 - 7:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीबद्दल धन्यवाद...!

कधी कोणतं ओळखपत्र लागेल काही सांगता येत नाही..!
फॉर्मचा दुवा मात्र दुसर्‍याच ठिकाणी चाल्लाय का ?

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2010 - 8:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुव्याबद्दल आभारी....!

-दिलीप बिरुटे