स्त्रीची आजची प्रतिमा - ३

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
6 May 2010 - 9:28 am

लहानपणी, म्हणजे शाळकरी वयात, एके दिवशी एक हिरव्या मुखपृष्ठाचे पुस्तक हातात पडले. वाचायला सुरूवात केली... झपाटल्यासारखे पूर्ण वाचूनच खाली ठेवले. पुस्तक होते, 'अफगाण डायरी'... लेखिका प्रतिभा रानडे. वर्तमानपत्र वाचायची सवय असल्यामुळे त्याआधीही अफगाणिस्तान आणि तिथे चाललेली गडबड वगैरे नियमाने वाचत होतोच. एकंदरीतच या प्रामुख्याने पठाणांच्या देशाबद्दल कुतूहल होतेच.

'अफगाण डायरी' मधून तिथल्या समाजजीवनाचे आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे समाजमनाचे अगदी उत्तम दर्शन घडले होतेच. खासकरून तिथल्या स्त्रियांच्या जीवनाबद्दलवगैरे बरेचसे संदर्भ त्या पुस्तकात होते. समाजाच्या जवळजवळ अर्ध्या भागाची जी काही अवस्था किंवा दुरवस्था आहे ती खरंच विषण्ण करणारी होती.

पुढे आंतरजाल सहज उपलब्ध झाले आणि एकदा असाच वेळ घालवायचा म्हणून काही तरी चाळा करत बसलो होतो. तेव्हा अफगाणिस्तानातले गृहयुद्ध अगदी भरात होते. तालिबानींचा नंगानाच चालू होता. त्या काळात तर स्त्रियांवरच्या जुलुमांचा अगदी कळसच झाला होता. तिथे स्त्रीजन्माला येणे म्हणजे जिवंत नरक.

म्हणून, त्याविषयावर काही काही वाचत होतो.

वाचता वाचता... अफगाण स्त्रियांच्या एका संघटनेची माहिती कळली. अगदी खूप आधी पासून तिथल्या स्त्रियांसाठी मदतकार्य करणारी ही संघटना... कधी उघडपणे, सत्ताचक्र फिरले की गुप्तपणे... पण चिकाटी आणि जिद्द मात्र खरंच चकित करणारी. अफगाण निर्वासित शेजारच्या पाकिस्तानातही बरेच आहेत. तिथेही पोचलेली ही संघटना... रावा तिचे नाव.... Revolutionary Association of the Women of Afghanistan (RAWA) असे तिचे पूर्ण नाव. अफगाणिस्तानातही असे काही कार्य चालत असेल / चालू शकेल याचेच अप्रूप वाटले. मग अजून वाचत गेलो. आणि त्यातून कळली 'मीना' नावाच्या एका धाडसी आणि जिद्दी स्त्रीची कहाणी.

मीनाचे पूर्ण नाव मीना किश्वर कमाल. तिचा नवरा फैझ कमाल हा पण एका संघटनेचा प्रमुख होता. त्यामुळे घरून पाठींबा असावा. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, १९७७ मधे तिने 'रावा'ची स्थापना केली. तत्कालिन अफगाणिस्तानात रशियनांची सत्ता होती. स्त्रियांच्या दृष्टीने ते तसे बरे दिवस म्हणायचे. म्हणजे कमीतकमी सरकारी पातळीवर तरी स्त्रिया अगदी मुक्त वगैरे होत्या. पण समाज मात्र अगदी विरूद्ध होताच. तसल्या परिस्थितीत स्त्रीमुक्ती / स्त्रीपुरूषसमानता वगैरे विचार नुसते न बाळगता त्यासाठी चक्क एक संघटना काढणे यातूनच मीनाची धडाडी दिसून येते.

'रावा'च्या माध्यमातून बरेच उपक्रम हाती घेण्यात आले. सततच्या लढायांमुळे विस्थापित अथवा प्रभावित झालेल्या स्त्रियांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी 'रावा' ने खूपच काम केले. अगदी शेजारच्या पाकिस्तानात जाऊनही.

स्त्रीमुक्तीच्या चळवळीबरोबरच, तीने रशियन राजवटीलाही विरोध केला. १९८६ साली रशियनविरोधी प्रतिस्पर्धी गटाचा म्होरक्या हेकमतयार याच्या माणसांनी तिच्या नवर्‍याचा खून केला. तिलाही, रशियनांना विरोध केला म्हणून, देश सोडून परागंदा व्हावे लागले. आपल्या तीन मुलांना घेऊन ती बलुचिस्तानात क्वेट्टा शहरात गेली. पण १९८७ मधे वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी तिचा खून झाला. हा खून तत्कालिन अफगाण सरकारच्या 'खाद' या केजीबीप्रणित गुप्तहेर संघटनेने केला असे म्हणले जाते. दु:खात सुख एवढेच की २००२ मधे पाकिस्तानात तिच्या खुनाचा तपास होऊन दोन जणांना तिचा खून केल्याचा आरोप सिद्ध होऊन फाशी झाली.

तिच्या मुलांचे पुढे काय झाले हे आजतागायत कळले नाहीये.

मीना आज असती तर? ती अजून जगली असती तर? ... या जर-तरच्या गोष्टी आहेत. त्यापेक्षा, तिच्या सहकार्‍यांनी 'रावा' जगवली, त्या संस्थेच्या माध्यमातून तिचे कार्य निडरपणे पुढे नेले... हे जास्त महत्वाचे आहे. एखादा लढा व्यक्तिकेंद्रित झाला तर तो अल्पकाळ टिकतो. पण मीनाचे यश हे की तिच्यानंतरही तिचे कार्य जोमाने चालू राहिले. 'रावा' इज स्टिल अलाइव्ह अँड किकिंग.

आजच्या अफगाण पार्लमेंटमधे स्त्रीसदस्य आहेत. मंत्रिमंडळात स्त्री आहे. याचे श्रेय अंशतः तरी मीना आणि तिच्या 'रावा'चे आहेच.

टीपः
०१. सगळे संदर्भ आंतरजालवरून घेतले आहेत.
०२. मीना आणि रावा बद्दल अजून माहिती http://www.rawa.org/ , http://en.wikipedia.org/wiki/Meena_Keshwar_Kamal , http://www.time.com/time/asia/2006/heroes/in_meena.html , http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/1973184.stm इत्यादी ठिकाणी मिळू शकेल.

संस्कृतीसमाजप्रकटनविचारवाद

प्रतिक्रिया

मेघना भुस्कुटे's picture

6 May 2010 - 9:45 am | मेघना भुस्कुटे

उत्तम ओळख. पण त्रोटक वाटली. अजून का नाही लिहिले?

बिपिन कार्यकर्ते's picture

6 May 2010 - 9:53 am | बिपिन कार्यकर्ते

माझ्याकडे एवढीच माहिती आहे. केवळ ओळख व्हावी म्हणून लिहिले.

बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते's picture

6 May 2010 - 9:53 am | नितिन थत्ते

ओळख आवडली.

कार्य पुढे टिकून राहणे हे कौतुकास्पद.

नितिन थत्ते

Nile's picture

6 May 2010 - 10:23 am | Nile

ओळख आवडली.
कट्टर धर्मवाद्यांच्या देशात असे कार्य करणे ते टिकवणे कौतुकास्पद!

-Nile

राजेश घासकडवी's picture

6 May 2010 - 12:49 pm | राजेश घासकडवी

भारतात स्त्रियांची परिस्थिती वाईट आहेच, पण अफगाणिस्तानात ती आणखीनच भीषण आहे. अशा परिस्थितीत लढा देणं निश्चितच कौतुकास्पद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 May 2010 - 2:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नक्कीच!
नितीन म्हणतात त्याप्रमाणे मीनाच्या पुढे कार्य सुरू राहिलं, रावा अजूनही अफगाण स्त्रियांसाठी लढत आहे हे वाचून आनंद झाला.

अदिती

Dhananjay Borgaonkar's picture

6 May 2010 - 5:40 pm | Dhananjay Borgaonkar

भारतात स्त्रियांची परिस्थिती वाईट आहेच

राजेश साहेब थोड स्पष्टीकरण द्याना या विधानाच.

ऋषिकेश's picture

6 May 2010 - 10:17 am | ऋषिकेश

छान लिहिले आहे.

हा लेखही वाचनीय.

एकूणच देशोदेशीचे राजकीय महिला सबलीकरण/आरक्षण वगैरे मुद्द्यांवर हा लेखही छान आहे

आमच्या शाळेच्या ब्लॉगवरही अफगाण मुक्तीचा आक्रोश हा छोटेखानी परिचयही वाचा.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

मस्त कलंदर's picture

6 May 2010 - 10:36 am | मस्त कलंदर

छोटेखानी पण उपयुक्त परिचय करून दिलात बिका.. रावाबद्दल ऐकले होते.. पण ती चळवळ चालू करणारी एक स्त्री होती आणि तिने कोणत्या हालअपेष्टांमधून ती उभी केली होती हे नव्हते माहित....

अवांतरः नूर इनायत खान बद्दल वाचलंत की नाही??

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

टारझन's picture

6 May 2010 - 10:36 am | टारझन

अणोळखी स्त्रीयांची ओळख आवडली :) खुपंच छाण !!

- ७_१२_उतारा

स्पंदना's picture

6 May 2010 - 12:44 pm | स्पंदना

काय धाडस असेल त्या बाईच!!. अफगाणी स्तान सारख्या कट्टर देशात राहुन, जिथे पुरुष सुद्धा कमजोर पडतात तालिबान विरुद्ध जीभ उचलायला , एका बाईन अस काही काम कराव ही अतिशय मोठी गोष्ट आहे.
या ओळखी बद्दल धन्यवाद :)

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

Dipankar's picture

6 May 2010 - 2:27 pm | Dipankar

धाडस ख्ररोखरच कौतुकस्पद आहे

मुक्तसुनीत's picture

6 May 2010 - 4:36 pm | मुक्तसुनीत

१. उत्तम लेख.
२. "मीना" बद्दलच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद मराठीमधे आलेला आहे.
http://www.rawa.org/events/meena_marathi.htm

लेखिका : Melody Ermachild Chavis
अनुवादकर्ते : दिलीप व शोभा चित्रे.

चित्रा's picture

6 May 2010 - 4:55 pm | चित्रा

छान ओळख.
मीनाच्या मुलांचे काय झाले हे कळले नाही, हे वाचूनही वाईट वाटले.
फक्त सध्याच्या "रावा"चे नक्की काय झाले आहे हे कळत नाही. संकेतस्थळ काहीसे भडक आहे. पण त्यालाही बहुदा काही पर्याय नसावा.

Dhananjay Borgaonkar's picture

6 May 2010 - 5:39 pm | Dhananjay Borgaonkar

खुप छान आहे लेख.
बिपिन धन्यवाद मीनची ओळख करुन दिल्या बद्दल.

शुचि's picture

6 May 2010 - 5:47 pm | शुचि

+१

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

प्राजु's picture

6 May 2010 - 8:27 pm | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

सोम्यागोम्या's picture

7 May 2010 - 1:37 am | सोम्यागोम्या

णुस्ते लेख वाचू नका लोकहो ! आचरणात आणा, मी स्त्रीला नेमी बरोबरीनेच वागवेन अशा शपथा घ्या !

अरुंधती's picture

7 May 2010 - 1:44 am | अरुंधती

चांगली ओळख! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/