दीन दयालु रामा : येशुदास व गायत्री

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
14 Apr 2010 - 10:31 pm

रामाच्या नावासरशी त्याच्याविषयीची अनेक गाणी, अनेक कथा, त्याची अनेक रूपे नजरेसमोर येतात. प्रभू रामचंद्राच्या स्तुतीचे निमित्त करून अनेक चित्रपटकारांनी आपल्या चित्रपटाच्या कथानकात अप्रत्यक्षपणे रामाचा आदर्श ठेवून, किंवा त्याला पूजनीय मानून त्याप्रमाणे आयुष्य जगायचा प्रयत्न करणारे नायक दाखवले.

त्या प्रभू रामचंद्राच्या स्तुतीचं, कौटुंबिक सौहार्दाचं, केरळच्या नयनरम्य हिरव्यागार निसर्गाचं दर्शन घडवणारं हे अजून एक गाणं..... येशूदास व गायत्री अशोकन् यांनी गायलेलं....रवींद्रन् यांनी स्वरबध्द केलेलं.... मामुट्टी ह्या समर्थ अभिनेत्यावर चित्रित केलेलं...... माझं अतिशय आवडतं गाणं.....

येशूदासांचा मनात खोलवर घुसणारा आवाज, गायत्रीच्या गळ्यातील गोडवा, केरळच्या पारंपारिक लाकडी बांधणीच्या घरांचे, शेतांचे, दिनक्रमाचे सुरेख चित्रण आणि छोट्या छोट्या वात्सल्यपूर्ण, स्नेहमयी क्षणांचे मोती.... पेटीचे पीसेसही अप्रतिम! :) चित्रपटाचे नाव : अरण्यगलुडे वीडु. ह्याच गाण्याने गायत्रीने आपल्या चित्रपट पार्श्वगायनाची सुरुवात केली.

गाण्याचे बोलही अतिशय लाघवी, सोपे, रसाळ व भक्तिमय आहेत...

दीनदयालु रामा जय सीतावल्लभ रामा
श्रुतजनपालक रघुपतीराघव पीतांबरधर पावन रामा.....

पहा आणि आनंद घ्या! :-)

-- अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

कलासंगीतसंस्कृतीजीवनमानचित्रपटछायाचित्रणप्रकटनमाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

14 Apr 2010 - 11:04 pm | प्रमोद देव

गाण्याचे शब्द,चाल,वाद्यवृंद,गायन आणि दृष्यचित्रण. सगळंच मस्त आहे.
तुमच्या मैत्रिणीचा,गायत्रीचा आवाजही गोड आहे.

अरुंधती's picture

14 Apr 2010 - 11:05 pm | अरुंधती

गायत्रीवर चित्रित झालेली ही ह्याच गाण्याची यूट्यूबवरची अजून एक लिंक सापडली!
:-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मीनल's picture

15 Apr 2010 - 1:09 am | मीनल

मला हे दुसरं स्त्री च्या आवाजातलं अधिक आवडलं.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/