(नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग)

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
8 Mar 2010 - 1:42 am

नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग

मागील लेखनात वाचकांस आधीच अवगत केल्याप्रमाणे आपल्या महान देशातल्या रस्त्यांवर रहदारी सुरळीत चालवण्याच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे. मी गाडी चालवत असताना माझ्या पुढच्या गाडीला हिरवा सिग्नल होता व तिला तसेच पुढे जाऊ देण्यात आले. मात्र मी तिथपर्यंत पोचताच दुष्ट सिग्नल लाल झाला. मी या माझ्याविरुद्धच्या कूटनीतीला न जुमानता तसाच पुढे गेलो तर पोलिसांनी मला पकडले व दंड केला. या अत्याचाराबद्दल मी रस्तोरस्ती बोंब ठोकल्याबद्दल काही नागरिकांनीही त्यांचे कान किटल्याची तक्रार केली. मी पोलिसांकडे या अन्यायाविरुद्ध तक्रार केली तर मला तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.

माझ्या मागील अर्जावर हि प्रतिक्रिया दिली ---

पण मला वाटत कि काही माणस विशेषत: आपले पोलिस अधिकाराचा गैर फायदा घेऊ पाहत आहेत.

"वाहतुकीचे नियम पाळणे हा इथला कायदा आहे"

असे बजावण्यात आले.

अगदी खरे! नेहमी असेच बजावण्यात येईल..

हि यांची भाषा !!

हीच भाषा यापुढेही राहील!

मला क्षमा असावी पण पोलिसांनी माझी माफी मागितल्या खेरीज

शहराचे पोलिस/नगरसेवक/मंत्री कुणाचीही माफी मागणे लागत नाहीत व कुणालाही कुठलेही स्पष्टीकरण देणे लागत नाहीत/ देणार नाहीत!

मी या पुढे सायकल चालवण्याशिवाय कुठचेही वाहन या शहरात चालवणार नाही.

इथे काय चालवायचे आणि काय नाही, ही पूर्णत: आपली मर्जी आहे!

व माझ्यावरचा अन्याय मोठ्ठ्याने कर्ण्यावर ओरडून जनतेला सांगेन.

पोलिस/नगरसेवक/मंत्री यांच्या विषयी आपले काहीही म्हणणे असल्यास ते कृपया योग्य मार्गाने मांडावे. जमल्यास उत्तर दिले जाईल..!

जर अजून दंगामस्ती करून लोकांना आवाज करून उपद्रव केलात तर, आवश्यक वाटल्यास तुमचे लायसन्स जप्त होईल अगर तुम्हाला तुरुंगात टाकले जाईल याची नोंद घ्यावी..
फौजदार

»

असो
अशा कुटनीती व अरेरावीच्या अशा असभ्य भाषेला मी यत्किंचित ही भीक घालीत नाही आणि घालणार ही नाही.
हा देश म्हणजे माझी आई आहे, आणि तो देश, त्यातील शहरं व रस्ते यावर जसा त्यांचा तसाच माझा हि हक्क आहे.
तुम्ही माझे लायसन्स जप्त केले तर मी काय गाडी चालवणे सोडून देईन का?................................................ मी दुस-या शहरात जाऊन बेदरकारपणे गाड्या हाकेन.
हे यांचे माझ्या बरोबरचे वर्तन मी लोकांच्या समोर आणणे हेच मी या वेळी करीत आहे. या साठी माझे लायसन रद्द करीत असतील तर करावे, खुशाल करावे.
तरीही माननीय श्री मनमोहन सिंग साहेब यांनी मला पुन्हा मायेने मार्गदर्शन करावे अशी विनंती मी त्यांचा वयाला मान देऊन करीत आहे. मी माझ्या मोठ्यान बरोबर सल्लामसलत करण्यास व यांची मर्जी संपाद्ण्यास सदैव तयार आहे. मी वाट पहात आहे ती तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियेची
........
तुम्ही उद्धट ठरवलेला
ड्रंकेश गाडीचालनकर

हे ठिकाणवावरविनोदविडंबनप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

8 Mar 2010 - 1:45 am | शुचि

:P B) =D> :P B) =D>
:P B) =D> :P B) =D>
:P B) =D> :P B) =D>
:P B) =D> :P B) =D>
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

शेखर's picture

8 Mar 2010 - 1:47 am | शेखर

:) चालु द्यात....

अक्षय पुर्णपात्रे's picture

8 Mar 2010 - 2:09 am | अक्षय पुर्णपात्रे

=))
श्री गाडीचालनकर,
मनमोहनसिंगांना लिहिले आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात/ भारतात गाडी चालवतांना पकडले गेले असाल असे गृहीत धरतो. पकडल्यावर मी गुजराथचे/ पाकिस्तानचे वाहतुकीचे नियम पाळतो आहे, या म्हणण्याला फारसे महत्त्व नाही.

मी दुस-या शहरात जाऊन बेदरकारपणे गाड्या हाकेन.

दुसर्‍या शहरात नक्की जा पण शहर भारताबाहेरचे शोधा.

विसोबा खेचर's picture

8 Mar 2010 - 8:12 am | विसोबा खेचर

मस्त विडंबन.. :)

मी या पुढे सायकल चालवण्याशिवाय कुठचेही वाहन या शहरात चालवणार नाही.

हे सर्वात मस्त! :)

तात्या.

प्राजु's picture

8 Mar 2010 - 8:20 am | प्राजु

या साठी माझे लायसन रद्द करीत असतील तर करावे, खुशाल करावे.

सध्या यावर विचार चालू आहे. ;)
बाकी चालू द्या. :)

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Mar 2010 - 8:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे बघता काय, सामील व्हा!

=)) =)) =)) =)) =))

ड्रंकेश गाडीचालनकर

हे हुच्चच!

अदिती

सविता's picture

8 Mar 2010 - 2:50 pm | सविता

=))

शाहरुख's picture

8 Mar 2010 - 8:30 am | शाहरुख

माझ्या परिचयातील एकाने गल्लीतील तुंबलेल्या गटाराची महानगर पालिका दखल घेत नाहीय म्हणून चिडून राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मांना पत्र लिहिले होते त्याची आठवण झाली..

विसोबा खेचर's picture

8 Mar 2010 - 9:06 am | विसोबा खेचर

=)) =))

अरुंधती's picture

8 Mar 2010 - 9:13 am | अरुंधती

आमच्याकडे एवढा ट्रॅफिक जॅम आहे की गाडी एका जागेवरून दुसर्‍या जागेवर हलायला किमान सहा महिने लागतात. पण जरी गाडी जागच्या जागी उभी असली तरी वाहतुकीचे सर्रर्रर्रव नियम पाळले गेलेच पाहिजेत असे कायदा सांगतो!
:-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्रमोद देव's picture

8 Mar 2010 - 9:23 am | प्रमोद देव

:)

सायबा's picture

8 Mar 2010 - 9:30 am | सायबा

काय पण कळले नाही.

सुधीर काळे's picture

8 Mar 2010 - 9:51 am | सुधीर काळे

+१
------------------------
सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)

वेताळ's picture

8 Mar 2010 - 10:02 am | वेताळ

ड्रंकेशराव आता खरच तुम्ही सायकल चालवा. =))
वेताळ

प्रकाश घाटपांडे's picture

8 Mar 2010 - 10:02 am | प्रकाश घाटपांडे

तुम्ही माझे लायसन्स जप्त केले तर मी काय गाडी चालवणे सोडून देईन का?................................................ मी दुस-या शहरात जाऊन बेदरकारपणे गाड्या हाकेन.

तिथ बी हाकलुन दिल त मंग काय करनार? आमी सोता शंभर एकर जाग घेउन, थित रस्ते करु थित बेदरकारपणे गाड्या हाकु मंग काय करनार?
पन थित पघायला या बर्का !नाही त मंग यवढ सगळ केल्याचा काय उपेग?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2010 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही माझे लायसन्स जप्त केले तर मी काय गाडी चालवणे सोडून देईन का?................................................ मी दुस-या शहरात जाऊन बेदरकारपणे गाड्या हाकेन.

काय लोकांचे अहंकार असतात. जसं काही या शहरातून लायसन्स जप्त झाले किंवा गाडी हाकण्याची परवानगी नाकारली तर त्यांच्या जाण्याने जगात सामसूम होऊन जाईल. जगरहाटी थांबेल असे वाटते.

हा हा हा काय विनोद होत असतात. असो, हा सायकल हाकणारा गेला तर एवढ्या मोठ्या सृष्टीत कुठे तरी सापडतीलच ते नाही का ?

-दिलीप बिरुटे

दिपाली पाटिल's picture

8 Mar 2010 - 2:03 pm | दिपाली पाटिल

मूळ लेखपेक्षा विडंबनच भारी...मजा आली ड्रंकेश गाडीचालनकर...

दिपाली :D

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Mar 2010 - 4:54 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

अविनाशकुलकर्णी's picture

8 Mar 2010 - 6:21 pm | अविनाशकुलकर्णी

राजेश राव चालवा गाडी..तुमच्या मार्गात कोण येणार?...लई भारी.....
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

चतुरंग's picture

8 Mar 2010 - 9:17 pm | चतुरंग

ही बुर्जी चाखलीच नव्हती!!! =)) =)) =))

रंगेश विडंबनकर

मी-सौरभ's picture

9 Mar 2010 - 12:22 am | मी-सौरभ

=)) -----

आनंदेश मिपाकर....

:)