फक्त तूझ्या बछडीसाठी...

sneharani's picture
sneharani in जनातलं, मनातलं
4 Jan 2010 - 2:27 pm

प्रिय बाबा,

आज डोळ्यात अश्रू...
मुलीला वाढवताना
होणार्‍या कष्टांमूळे थकलास का?
म्हणून डोळे भरुन आले का?
खरच आजच वाटलं,
आज आई असती तर...

बाबा, मी जन्माला आले अन्
आई गेली, तुझ तर
सर्वस्वच हरपल..
मग आपल्या जगात आपण दोघचं
तू अन् मी...

बाबा तू कधी शिकवलच नाहीस
तूला 'तुम्ही' म्हणायला
आज ही ये जा करते तूला
ही तुझी बछडी, इतक प्रेम दिलयस
की आईची आठवण कधी
मनाला शिवत सुध्दा नाही...

जगायच कस हे तु शिकवलसं,
अन् आज ही शिकवत आहेस..
आठवतय का, तूला
तुझ्या वाढदिवसाची तारीख
विचारत होते
किती छान हसलास..
कशाला गं बेटा..
अस काय बाबा
सांग ना रे..
माझे हे बोबडे बोल
आज ही आठवतायेत...

पुढच्याच महिन्यात होता
वाढदिवस... रविवारी
सकाळी पळत पळतच
गाठल माळरान..
मी न सांगता गेल्यावर
सैरभैर झाला असशील..
काळजी करत असशील
अस माझ्या बालमनाला
त्यावेळी वाटलच नाही....

हवा कुंद, चिखलाचा मार्ग..
पाण्याचा ओढा...तरीही
तिथेच गेले धावत
कारण तिथेच होती रे
हर रंगाची फूले...
माझ्या हातात बसतील तेवढी
तोडून घेतली खर...
पण येताना बरीच गहाळ झाली
अन् चिखला-पाण्यातून
धडपडत येईपर्यंत
हाती देठच शिल्लक राहिलेले...

कळकटलेली, मळकटलेली तुझी
बछडी ज्यावेळी तूला दिसली तेव्हा
तुझ्या डोळ्यात जो आनंद, अश्रू
यांचा जो मिलाफ रंग पाहिला त्यापुढे
इंद्रधनुची सप्तरंगी उधळण आजही
मला फिकीच वाटते...

तुला वाढदिवसाची भेट म्हणून फुले
आणली हे बघ असं म्हणतच
हात पुढे केला अन् तुझ्या कुशीत
पडून रडरड रडले...
ए माझी बछडी, अजून छोटी आहेस..
अग हे तुझ्या हातातले देठ आहेत ना
तेच मला फार आवडतात..
यावरच तर फूल उमलत होय ना
हाच तर फूलाला आधार देतो
म्हणूनच फूल सूंदर दिसतं
अशी बराच वेळ समजूत
घालत राहिलास..
मला माहिती आहे
आजही तुझ्या डायरीत ती
वाळलेली देठं ठेवलीयेस तुझ्या
या छोट्या चिमुरडीनं दिलेली...

ज्या ज्या वेळी तुझ्या
कुशीत शिरलेय तेव्हा
ऐकलयं तुझ्या ह्रदयाच्या
स्पंदनांच संगीत...
माझ्यासाठी प्रेमाचेच स्वर होते
त्या संगीतात..

मी जरी फूल असले तर तू
देठ आहेस्...मोठा आधार आहेस
तू माझ्यासाठी....

खेळताना घोडा व्हायचास
फक्त माझ्यासाठी...
चूल पेटवताना पाहिलय तूला
फक्त माझ्यासाठी
रात्रं-दिवस काम करताना पाहिलय
फक्त माझ्यासाठी...
अशा किती गोष्टी म्हणून
तूला सांगू...फक्त तुझ्या
या बछडीसाठी केलेल्यास
तुझी घुसमट समजून घ्यायला
मी अजून छोटी आहे हे माहितीय मला
पण आज मला तुझ्या चेहर्‍यावर
हसू बघायच आहे..
मग हसशील ना
एकदा....
फक्त तुझ्या बछडीसाठी...

कथाकवितामुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

jaypal's picture

4 Jan 2010 - 4:29 pm | jaypal

सेंटी लिवतासा? आमा सारख्या मेंटलच्या टाच दिशी टचाकतय, अन मग समदी हापीसातली (फिदीफिदी) हसत्यात.


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

छोटा डॉन's picture

6 Jan 2010 - 7:07 pm | छोटा डॉन

जयपालशी सहमत.
छान आहे कविता. एकदम सेंटी का काय तशी .
( वि.सु. : "हळवा" हा शब्द आक्षेपार्ह्य आहे म्हणुन इंग्रजीकरण सेफ कंसीडिर केले आहे.
असो ( हा शब्द जर्मन आहे. असो ) )

------
छोटा डॉन
... आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता
... उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

प्रथम पियुशांना धन्यवाद धागा मिळवून दिल्याबद्दल.
कविता खूप सुंदर. साधी, सरळ पण भिडणारी!
कवितेला सलाम अन् जयपालभौच्या image collection सुद्धा! :)

राघव

पांथस्थ's picture

4 Jan 2010 - 10:47 pm | पांथस्थ

मस्त... छान आहे कविता!

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

Meghana's picture

5 Jan 2010 - 1:25 pm | Meghana

फारच छान!

विजुभाऊ's picture

6 Jan 2010 - 7:11 am | विजुभाऊ

चांगलं ल्हितेस गो बाय .
पण आस्लं सेंटी का लिहितेस. हापिसात वाचायला अवघड जात.
चारचौघात डोळे पुसता येत नाहीत्.अन मनातलं मळभ थांबवताबी येत न्हाई.

सहमत.कविता खूप आवडली.डोळे भरून आले.

प्रभो's picture

6 Jan 2010 - 8:29 am | प्रभो

आवडली कविता....

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

टोळभैरव's picture

6 Jan 2010 - 8:32 am | टोळभैरव

सहमत.

मी टोळ. :)
(मला खरडण्याचा /व्यनीचा अधिकार नाही, त्यासाठी काय करावे लागते ? )

विशाल कुलकर्णी's picture

6 Jan 2010 - 5:40 pm | विशाल कुलकर्णी

आवडली.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

टारझन's picture

6 Jan 2010 - 5:55 pm | टारझन

स्नेहाराणी ... अजुन आपल्याला ही भावणा समजलेली नाही .. पण विजुभाऊ आणि जयपाल सारखे दगडी स्वभावाची लोकं अंमळ हळवे झाले ह्यातंच आपल्या कवितेचे यश आहे. आणि आपले फॅन होण्यासाठी एवढे कारण पुरेसे आहे.

- चहापाणी

पियुशा's picture

16 Dec 2011 - 10:43 am | पियुशा

अप्रतिम :)

जाई.'s picture

16 Dec 2011 - 10:46 am | जाई.

सुंदर

मन१'s picture

16 Dec 2011 - 12:39 pm | मन१

touching.

स्वातीविशु's picture

16 Dec 2011 - 12:59 pm | स्वातीविशु

जयपाल आनि विजुभाऊ शी सहमत......गळा दाटुन आला.......

मेघवेडा's picture

16 Dec 2011 - 5:47 pm | मेघवेडा

फ्यान झालेलो आहे. :)