आमच्या कडे कधीच शिळ उरत नाही.
कारण ज्या दिवशी जेवण मला आवडतं ते अन्न तिला आवडत नाही, आणि तिला आवडलेलं मी पोटभर खाऊ शकत नाही.
आठवड्यातले तीन दिवस कोणीतरी एक पोटापेक्षा जास्त खाऊन तृप्त असतो तर उरलेले तीन दिवस दुसरा, कारण स्वयंपाक सरासरी एक दिवसाआड चांगला बनवला जातो.
अर्थात माझ्या दृष्टीने उत्तम म्हणजे तिच्या दृष्टीने बेचव ह्या व्याख्येप्रमाणे.
आठवड्याचे उरलेले तीन दिवस मी कमी जेवतो याची दोन कारणे, एक म्हणजे आमची अन्नपूर्णा इतकी देखील वाईट स्वयंपाकिण नाही की पूर्ण उपाशी राहावे लागेल. आणि दुसरं म्हणजे मला आवडलेलं तिने खाल्लं तर तिचं मन कसं भरेल?
अर्थात एक दिवसाआड आकंठ जेवणामुळे आम्हा दोघांना पोटाच्या फारश्या तक्रारी नाहीत कारण समतोल राखला जातो.
शिवाय जर आम्हाला पोटाला पूर्णच आराम द्यायचा असेल तर आम्ही बाहेर जेवायला जातो.
स.शा.
प्रतिक्रिया
21 Apr 2018 - 5:18 am | कंजूस
विरंगुळा.
21 Apr 2018 - 9:41 am | चौथा कोनाडा
<< शिवाय जर आम्हाला पोटाला पूर्णच आराम द्यायचा असेल तर आम्ही बाहेर जेवायला जातो. >>
अच्छे दिन, दुसरं काय !
21 Apr 2018 - 9:42 am | चौथा कोनाडा
शिवाय जर आम्हाला पोटाला पूर्णच आराम द्यायचा असेल तर आम्ही बाहेर जेवायला जातो.
अच्छे दिन, दुसरं काय !
:-)
21 Apr 2018 - 10:46 am | मार्मिक गोडसे
शिवाय जर आम्हाला पोटाला पूर्णच आराम द्यायचा असेल तर आम्ही बाहेर जेवायला जातो.
मी ह्याकरता आठवड्यातून एकदा 'मन की बात'ऐकतो. उँची उँची बातोसे किसिका पेट भरता नही.....
21 Apr 2018 - 11:00 am | आलमगिर
शातशब्द +२४ शब्द - :-)
21 Apr 2018 - 9:21 pm | रमेश आठवले
शिळासप्तमी म्हणजे काय ?
22 Apr 2018 - 9:09 am | पैसा
जेवण तुम्हाला आवडत नाही त्या दिवशी "तुझ्या आईला बोलावं, मग बघू किती न काय स्वयंपाक करतात" किंवा "आई पोस्टाने जेवण पाठवते का बघ" इत्यादी तोंडीलावणे बोलले नाही तर नवऱ्याला जेवण अजिबात पचणार नाही. =))
23 Apr 2018 - 11:00 am | ss_sameer
:=) :=)