उपकार इंग्रजांचे

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
18 Apr 2018 - 10:11 am

इंग्रजांनी या देशाला गुलाम केले. ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा इंग्रजांनी काही चांगल्या, वरदान म्हणाव्यात अशा गोष्टी भारताला दिल्या. त्यातली एक म्हणजे इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषेमुळे आपल्याला जगाचे दरवाजे खुले झाले.

इंग्रज या देशातून जाऊन आता 70 वर्षे झाली पण त्यांची इंग्रजी भाषा आणि तिची उपयुक्तता मात्र आम्ही विसरलेलो नाही. त्यामुळे आजही अनेक मराठी पालक आपल्या मुलांना आवर्जून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच घालतात.
ashutoshjog@yahoo.com
घरात बोलायला, गप्पा मारायला वगैरे मराठी ठीक आहे पण शिक्षणासाठी माध्यम म्हणून इंग्रजीच ! अनेक पालक मुलांना मराठी साहित्याची घरच्या घरीच ओळख करून देतात पण माध्यमाचा दर्जा मात्र इंग्रजीलाच देतात.

इंग्रजांनी बाकी कुठलेही अन्याय केलेले असले तरीसुद्धा इंग्रजी भाषेचे माध्यम भारतीयांना देऊन आपल्यावर अनंत उपकार करुन ठेवलेले आहेत !

निदान या बाबतीतले इंग्रजांचे उपकार तरी आपण विसरता कामा नये.

ashutoshjog@yahoo.com

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

18 Apr 2018 - 10:48 am | नेत्रेश

एखादे इन्जेक्शन अथवा मेंदूत बसवण्याची चीप मिळू शकेल का ? सात अब्ज लोकांना व्यवहार्य इंग्रजी येण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी ! चांगला व्यवसाय उभारण्याच्ची नामी संधी आहे !

टवाळ कार्टा's picture

18 Apr 2018 - 1:49 pm | टवाळ कार्टा

इंग्रज नसते तरीही इंग्रजी भारतीयांनी शिकलीच असती....त्यात इंग्रजांचे उपकार वगैरे नाहीये....त्यांनी त्यांचे काम सोपे व्हावे म्हणून आपल्याकडे फेकलेला शिळ्या भाकरीचा तुकडा होता तो

जेम्स वांड's picture

18 Apr 2018 - 3:54 pm | जेम्स वांड

असतानाही किती भारत अन चीन मध्ये इंग्लिश बोलणाऱ्यांची संख्या ह्यावर एकदा काही मिळाले तर वाचा. आज आपला सर्विस सेक्टर फोफावला आहे तो जगातील सर्वात मोठ्या इंग्रजी बोलणाऱ्या लोकसंख्येमुळे. अर्थात इंग्रजांनी त्यांची सोय म्हणून भाषा इथे रुजवली हे सोळाआणे सच असलं तरी ते आपल्या चांगलंच पथ्यावर पडलं आहे इतकं मानायची दिलदारी असायला हरकत नाही. बहुभाषिक देशात जिथे हिंदी चालत नाही (थापून चालुही नये) तिथे इंग्लिशने राष्ट्रीय एकात्मता साधायलाही मदत केली आहे (आपल्यासारख्या मोठ्या राज्यात जाणवत नसलं तरी) पूर्वोत्तर भारतात जिथे प्रसंगी ३० ३० किलोमीटरला राज्य, भाषा, संस्कृती बदलून जाते तिथे इंग्रजीने बरीच मदत केलीये.

ते सगळं सोडा वाटल्यास, आजही रोजची ताजी लुसलुशीत भाकरी कमवायला आपण सगळेच हापिसात जाऊन तोच इंग्रजांचा फेकलेला शिळा तुकडा चघळतोय का नाही?

टीप :- धाग्यात असलेल्या 'व्हाईट मॅन बर्डन थेअरीशी' मी अजिबात सहमत नाहीये, किंबहुना प्राथमिक शिक्षण मातृभाषेत असलेच पाहिजे हे माझं आग्रही मत आहे पण म्हणून इंग्रजी जशी बोडक्यावर बसवून घेऊ नये तशी तिची अवहेलना सुद्धा करू नये, भारत 'melting pot of cultures' आहे इतकं आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं तरी पुरे!.

अनिंद्य's picture

18 Apr 2018 - 4:27 pm | अनिंद्य

@जेम्स वांड,

.... इंग्लिशने राष्ट्रीय एकात्मता साधायलाही मदत केली आहे.....

इंग्रजी भाषेअभावी ओरिसाच्या लोकांनी केरळी बांधवांशी किंचा महाराष्ट्रीय जनतेने तामिळ लोकांशी कसा आणि किती सहजतेने संवाद साधला असता असा एक विचार करून पाहतोय :-)

टवाळ कार्टा's picture

18 Apr 2018 - 4:36 pm | टवाळ कार्टा

मी स्वतः चीन्यांबरोबर काम केले आहे त्यामुळे मला माहिती आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे :)
इंग्रजीमुळे झालेले आणि होणारे दोन्ही प्रकारचे फायदेही माहीत आहेत आणि त्या बाबतीत सहमती आहेच्च :)

माझा मुद्दा असा होता कि

इंग्रजांनी भारतीयांच्या भल्यासाठी आपल्याला इंग्रजी शिकवली असा समज धागा वाचल्यावर होउ शकतो....त्यामुळे धागा जरा चुकीच्या वळणाने गेलाय...इंग्रजांनी जे केले ते फक्त आणि फक्त त्यांच्या भल्यासाठी.....भारतीयांचा इंग्रजीमुळे झालेला फायदा हा फक्त आपल्या प्रयत्नांमुळे झालाय

आणि जरी इंग्रजांनी इंग्रजी नसती शिकवली तर कदाचित आज जितका प्रसार झालाय तितका नसता झाला पण त्या दिशेने नक्कीच गेलो असतो कारण "ज्याला इंग्रजी येते तो जगात कुठेही (पक्षी अमेरिकेत्/पाश्चात्य देशांत) पैसे छापायला / सेटल व्हायला जाउ शकतो" हे ताडले असते....उदाहरणच द्यायचे झाले तर पंजाबी लोक अगदी "शेती" करायला सुद्धा कॅनडात गेलेत (इथे करु शकत नव्हते? पंजाबात पाणी सगळ्यात जास्त आहे अख्ख्या भारतात)

आणि चीनमध्ये लोकशाही नाही त्यामुळे तिथे सरकारने इंग्रजी शाळांचा प्रसारच होउ दिला नव्हता...कारण लोक इंग्रजी शिकले तर बाहेरच्या जगात काय चालते ते लोकांना इंटरनेटमुळे समजेल आणि कदाचित सरकारी एकाधिकारशाही संपेल अशी सरकारी धारणा आहे...जर चीनमध्येसुद्धा इंग्रजी शिकवायला अगदी ३०-४० वर्षांपूर्वी सुरुवात झाली असती तर आज चीन जगाचा आयटी हब असता (आणि हे एक दिवस होणार आहे....चीनी लोक दिड-दमड्यांत कामे करतील कारण सरकार जे सांगेल ते निमूटपणे करावेच लागते)

अनिंद्य's picture

18 Apr 2018 - 5:10 pm | अनिंद्य

@ ट का,

....मला माहिती आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे :) ...

मनकवडे आहात :-)

टवाळ कार्टा's picture

18 Apr 2018 - 5:14 pm | टवाळ कार्टा

इतक्या लवकर सहमती?? हे मिपा आहे....शे-दोनशेचा काथ्या कुटल्याशिवाय गेम संपवायचा नसतो =))

जेम्स वांड's picture

18 Apr 2018 - 5:37 pm | जेम्स वांड

ह्या भोळसट समीकरणाला असलेल्या तुमच्या विरोधाला आमचीही कचकून सहमती आहेच्च :)

इंग्लिशने राष्ट्रीय एकात्मता साधायलाही मदत केली आहे (आपल्यासारख्या मोठ्या राज्यात जाणवत नसलं तरी) पूर्वोत्तर भारतात जिथे प्रसंगी ३० ३० किलोमीटरला राज्य, भाषा, संस्कृती बदलून जाते तिथे इंग्रजीने बरीच मदत केलीये.

टोटल असत्य.

आजही रोजची ताजी लुसलुशीत भाकरी कमवायला आपण सगळेच हापिसात जाऊन तोच इंग्रजांचा फेकलेला शिळा तुकडा चघळतोय का नाही?

जपान आपल्यापेक्षाही साजूक तूप लावलेल्या पोळीचा आहार घेतो. त्याला बरं नाही लागत इंग्रजीचा तुकडा?
------------------------
भारत (आणि बहुतेक पाकिस्तान) सोडून अन्य एकही देश संबंध नसलेल्या भाषेतून चालत नाही. (अपवाद - अफ्रिकेतले फ्रेंचमधून चालणारे देश).

arunjoshi123's picture

23 Apr 2018 - 4:39 pm | arunjoshi123

पूर्वोत्तर भारतात

महाराष्ट्रातले (मद्रासी प्रांत तर सोडाच) लोक जितकी उत्तम हिंदी बोलू शकत नाहीत वा बोलत नाहीत त्यापेक्षा अधिक उत्तम हिंदी अरुणाचल प्रदेशचे लोक बोलतात. प्रत्येक डोंगराआड वेगळी भाषा असते. पण समाईक भाषा हिंदी आहे. हेच सर्वत्र आहे.
इंग्रजी (मिशनर्‍यांनी बायबल वाचायला शिकवलेल्या पोराडगी सोडून) आणि उच्चशिक्षितांना सोडून कोण्णाला येत नाही. येत असली तरी ती कोणी वापरत नाही.
=====================
तामिळ नाडू या एकाच राज्यात इंग्रजी हिंदीपेक्षा उपयोगाची आहे. अर्थात हे ही असं ७० वर्षांपूर्वी नव्हतं. सातत्याचा "उत्तर भारतीय ब्राह्मणांचा द्वेष" (हिंदी ही त्यांची भाषा म्हणे), त्याला राजाश्रय, म्हणून इथे हिंदी एक पादान खाली आहे.
============================
भारतातून इंग्रजीला उद्या विसर्जित करता येईल. अर्थात न्यूनगंड प्रचंड असल्यामुळे हे "मानसिक रित्या" असंभव आहे.

मराठी_माणूस's picture

18 Apr 2018 - 2:12 pm | मराठी_माणूस

"वरदान" ? जोखड म्हणा, जे आपण अजुन ही अभिमानाने मिरवतो .

टवाळ कार्टा's picture

18 Apr 2018 - 4:22 pm | टवाळ कार्टा

असे केले तर आपल्यासारखे करंटे आपणच असू

मराठी_माणूस's picture

18 Apr 2018 - 5:55 pm | मराठी_माणूस

कसे केले तर ?

टवाळ कार्टा's picture

19 Apr 2018 - 1:02 am | टवाळ कार्टा

इंग्रजीचा दुस्वास समजू शकतो पण मराठीसुद्धा येत नाही?

मराठी_माणूस's picture

19 Apr 2018 - 10:03 am | मराठी_माणूस

कोणाला ?

दीपक११७७'s picture

18 Apr 2018 - 4:25 pm | दीपक११७७

विंग्रज लोकं त्यांच्या देशातल्या इतिहासाच्या अभ्यास क्रमात, विंग्रजांनी इतर देशावर किती अत्याचार केलेतं त्यांच कस शोषन केल हे का शिकवतं नाहीत
------श्री शशी थरुर.

टवाळ कार्टा's picture

18 Apr 2018 - 4:39 pm | टवाळ कार्टा

आपन फ्यान हावोत शशीचा...सायबाच्या देशात जाउन त्याच्याच डोस्क्यावर मिर्या वाटतो तो....आणि गुलछबु आहे ते वेगळेच =))

अनिंद्य's picture

18 Apr 2018 - 5:13 pm | अनिंद्य

आपन फ्यान हावोत शशीचा...

काउंट मी इन - शशी थरूर यांच्या अनन्य गुणवैभवात त्यांना असलेली 'इंग्रजी भाषासिद्धी' हे झळाळते रत्न लपत नाही :-)

तुषार काळभोर's picture

18 Apr 2018 - 5:27 pm | तुषार काळभोर

साहेबाला इंग्लंडात त्यांच्या आमंत्रणाने जाऊन, तिथेच, त्यांच्याच भाषेत 'तुम्ही आम्हाला इतकं लुटलंय, आम्हाला 1 पौंड नुकसानभरपाई पाह्यजे' असं खडसावलंय.
आता किंडल वर ऍन एरा ऑफ डार्कनेस वाचतोय. "An Era of Darkness: The British Empire in India" by Shashi Tharoor.

जेम्स वांड's picture

18 Apr 2018 - 5:35 pm | जेम्स वांड

गोट्याने ऑक्सफर्ड युनियन सारख्या प्रतिष्ठित विवादसभेत जाऊन साहेबांस टोटल नागवं केलतं

विंग्रज लोकं त्यांच्या देशातल्या इतिहासाच्या अभ्यास क्रमात, विंग्रजांनी इतर देशावर किती अत्याचार केलेतं त्यांच कस शोषन केल हे का शिकवतं नाहीत
------श्री शशी थरुर.

ते जाऊच द्या, इंग्रज लोक आहेतच चालू. आपण नीच होतो हा इतिहास न शिकवण्याइतका नीचपणा आजही त्यांचेकडे आहे.
पण ज्या देशांवर अत्याचार झाले त्यांचं काय?
त्यांनी तरी नीट इतिहास शिकवावा.
पण ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारासमोर एकही अजून भयानक अत्याचार दाखवायचाच नाही या नितीतत्त्वानं भारतातही तो इतिहास शिकवला जात नाही.

दीपक११७७'s picture

18 Apr 2018 - 4:27 pm | दीपक११७७

सध्या विंग्रजी ही जगाची ज्ञान भाषा झालेली आहे, हे खरे आहे.

तर आपण फ्रेंच भाषेतच संवाद साधला असता आणि तीच भाषा जागतीक केली असती.

जगातली १७% जनता भारतात राहते + २.६३% पाकिस्तान आणि + २.१८% बांगलादेश + श्रीलंका ०.२७% म्हणजे जवळपास २२%

(खूद्द इंग्रजांची लोकसंख्या १%हूनही कमी आहे.फ्रान्स बाबतीत पण १%पेक्षा कमीच.)

असो,

इंग्रजांची भलामण करायचीच असेल तर खालील पण मूद्दे आहेतच.

१. रेल्वे आणली (सैन्याच्या हालचाली साठी हा स्वार्थाचा मूद्दा सोडून द्या.)

२. टपाल खाते (सैन्याच्या हालचालीसाठीच.ह्याचा खर्च पण आम जनतेच्याच माथी होता.)

असो,

जेम्स वांड's picture

18 Apr 2018 - 5:34 pm | जेम्स वांड

जोगांचं अन तुमचं मृत्यू शडाष्टक असल्याचं जाणवतं, उगाच प्रश्न विचाराल अन जोगांनी फाटा दाखवला की तुमचे ते बाबा कोहणहकहर का कोणचे ते घेऊन याल :D

(कृपया हलके घेणे)

मुक्त विहारि's picture

19 Apr 2018 - 8:17 am | मुक्त विहारि

जोगांचं अन तुमचं मृत्यू शडाष्टक असल्याचं जाणवतं...

ज्याचे त्याचे चष्मे.

मी कुठलाही लेख कुणी लिहिले आहे? हे न बघता , काय लिहिले आहे? त्याप्रमाणेच प्रतिसाद देतो.

अर्थातच, आपल्या सारख्या मान्यवरांच्या बरोबर वाद घालायची माझी इच्छा नाही. कारण, एकतर आपण माझ्या पेक्षा "मिपावर" जास्त जूने आहात, असे जाणवते आणि दुसरे म्हणजे आपल्या विचारात "पुणेरी पणा" जाणवतो.

टोकाचा व्यक्ती द्वेष आणि टोकाची व्यक्ती पूजा ह्या दोन्ही गोष्टी समाजासाठी हानिकारकच.आणि तो तुमच्या बाबतीतही नाही.पण ह्यापुढे मात्र तो तसा राहीलच ह्याची तुमच्या बाबतीत तरी खात्री नाही.एखाद्या प्रतिसादामुळे हेवनवासी होण्यापेक्षा, आपल्या सारख्या मान्यवरांशी वाद न घालणेच उत्तम.

आपण, योग्य तो बोध घ्याल, अशी आशा अजिबात नाही.त्यामुळे तुम्ही प्रतिसाद दिलात, तरी मी आपल्याला उत्तर देणार नाही.

जेम्स वांड's picture

19 Apr 2018 - 9:40 am | जेम्स वांड

मी कुठलाही लेख कुणी लिहिले आहे? हे न बघता , काय लिहिले आहे? त्याप्रमाणेच प्रतिसाद देतो.

हो, फक्त लेखक पुणेकर असला की वेगळे धागे काढकाढुन निर्लज्जपणे अपलाप करता एखाद्या क्षुल्लक मुद्द्यावर! तुमचे विवेकाचे बुरखे त्याच धाग्यावर फाटलेत!.

manguu@mail.com's picture

18 Apr 2018 - 6:24 pm | manguu@mail.com

टपाल , रेल्वे जनतेला वापरायची बंदी होती का ?

सरकारी दणकट इमारती , कवायती सैन्य , रस्ते , धरणे , वर्तमानपत्रे , लोकशाही , मेडिकल कॉलेज , हस्पिटल , शेअर मार्केट , रिजर्व ब्यान्क. इन्शुरन्स , ..... जाताना २२५ कोटी गंगाजळी ( त्यातली शेजार्याची वाटणी ७५ कोटी )

इथले आकडी मिशीवाले , वाघावर पाय ठेवून उभे राहिलेले , फूल हुंगणारे वगैरे राजेम्हाराजे नेमके काय करत होते ?

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Apr 2018 - 7:37 pm | अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली's picture

18 Apr 2018 - 7:37 pm | अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली's picture

18 Apr 2018 - 7:37 pm | अमरेंद्र बाहुबली

इथले आकडी मिशीवाले , वाघावर पाय ठेवून उभे राहिलेले , फूल हुंगणारे वगैरे राजेम्हाराजे नेमके काय करत होते ?

:)

श्रिपाद पणशिकर's picture

20 Apr 2018 - 9:23 pm | श्रिपाद पणशिकर

इथले आकडी मिशीवाले , वाघावर पाय ठेवून उभे राहिलेले , फूल हुंगणारे वगैरे राजेम्हाराजे नेमके काय करत होते ?

गजानना !!!! कागलकर असुन सुद्धा तुला हा प्रश्न विचारावा वाटला?

पाय बरा झाला का ? जागो जागि घसरगुंड्या हाईत जर्रा दमान ...

हे बाकीझकास विचारलंत

दीपक११७७'s picture

19 Apr 2018 - 12:08 pm | दीपक११७७

इथला कापुस विंग्लंड ला न्यायचा व तयार कपडे आणुन इथे विकायचे मोबदला सोन्यात रुपांतरीत करुन विंग्लंडला न्यायचा. या सगळ्या व्यवहारात सरकार तिजोरीत जमा झालेला टॅक्स च्या पैश्यातुन असले तंत्रज्ञान भारतात आणायचे पैसा पुन्हा विंग्लंडला शिवाय विंग्रज अधिका-यांचे गडगंज पगार. या रेल्वे रुळाचे जे जाळे विणले गेले त्यातील किती पैसा मोबदला म्हणुन मजुरांना मिळत होता, किती मजुर मेले, आहे का काही नोंद.

सिरुसेरि's picture

18 Apr 2018 - 7:57 pm | सिरुसेरि

चिनी माकांकडुन त्यांच्या कष्टाळुपणा सारखेच चिनी भाषा शिकणे फायद्याचे ठरेल .

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2018 - 8:06 pm | प्रसाद गोडबोले

ह्यॅ !

ईंग्रजांचे उपकार म्हणजे त्यांनी ह्या देशावरील इस्लामी प्रभाव नाहीसा केला ! मराठ्यांनी दिल्ली काबिज केली पार अटकेपार झेंडे लावले पण ते इस्लामी प्रभाव नाहीसा करु शकले नव्हते . अगदी १८५७ पर्यंत बहदुरशहाची लाल करत बसले होते. हैदरला टिपुला वारंवार हरवुन देखील ते डोके वर काढत होते. इस्लामी प्रभाव नष्ट झाला तो इंग्रजांच्यामुळे ! शिवाय फाळणीचे श्रेय (कि पाप ) हे भारतात कोणाला द्याय्चे ह्यावर खुषाल वाद होवोत पण फाळणी झाली ती साहेबामुळेच ! फाळणी झाली नसती तर आज भारत काय असत ह्याचा विचारही करवत नाही !

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2018 - 8:15 pm | प्रसाद गोडबोले

इंग्रजांच्यामुळे हिंदुस्तान्वरील इस्लामी प्रभाव नष्ट झाला म्हणुन हिंदुत्वव्वादी विशेषकरुन उच्चवर्णीय खुष !
इंग्रजांच्यामुळे सतीप्रथा , जरठकुमारी विवाहसार्ख्या प्रथा बंद होवुन नवीन सुधारणांस वाव मिळाला म्हणुन स्त्रीया खुष !
इंग्रजांच्यामुळे बामणी पेशवाई बुडाली आणि सुधारर्णेस वाव निर्माण झाला म्हणुन दलित खुष !
इंग्रजांच्या मुळे स्वतंत्र देश मिळाला म्हणुन मुसलमान खुष !

इंग्रजांचे फार फार उपकार आहेत ह्या देशावर !

व्हिक्टोरिया राणी सरकार की जय
पुष्यमित्र शुंग महाराज की जय

गामा पैलवान's picture

18 Apr 2018 - 11:26 pm | गामा पैलवान

काही लोकं एका मनुष्याचं अपहरण करून त्याच्या पायात सोन्याचे साखळदंड लावून त्याला डांबून ठेवतात. पोलिसांची चाहूल लागल्याने चोर लोकं दूर पळतात. ते पाहून अपहृत माणूस तिथे पडलेल्या कानशीने सोन्याची साखळी तासतो आणि ती घेऊन पळ काढतो. मग बाजारात जाऊन साखळदंड मोडून पैसे उभे करतो. त्यावर व्यापार करून सुखी होतो. मग काही दिवसांनी त्या चोर लोकांना हा माणूस दिसतो. ते त्याच्याकडे सोन्याची भरपाई मागतात. तंटा राजाकडे जातो. राज्यात प्रजासत्ताक असते.

तर प्रश्न असा आहे की, राजा काय निकाल देईल?

-गा.पै.

आशु जोग's picture

19 Apr 2018 - 12:14 am | आशु जोग

गुलामी अच्छी है

मी महाराष्ट्रातला नवपालक आहे. माझ्या मुलीला कोणत्या माध्यमाच्या शाळेत शिकवायचं यावर मी खूप अभ्यास केला आणि खालील निष्कर्षापर्यंत पोहोचलो. बघा तुम्हाला पटतंय का...

- महाराष्ट्रातली ७५% मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतात, १०% मुलं हिंदी, गुजराती, उर्दू, तेलुगू माध्यमात आणि राहिलेली १५-१८% मुलं इंग्रजी माध्यमात जातात. म्हणजे महाराष्ट्र आपल्या पुढच्या पिढ्यांना मातृभाषेतूनच आणि मराठीतूनच शिकवायला प्राधान्य देतो, त्यामुळे मराठी शाळा संपल्या, मराठी शाळा वाचवा, वगैरे खोटा प्रचार आहे. मराठी शाळा अगदी सुखरूप आहेत.

- दै. लोकमतने दिलेल्या बातमीनुसार इंग्रजी शाळांमध्ये शिकवणारे ५०% शिक्षक डी. एड. पण नाहीत - https://goo.gl/iZVGPq

- इंग्रजी शाळांना अनुदान मिळत नाही, परिणामी शिक्षकभरती नियमाने होत नाही, शिक्षकांना पूर्ण वेतन मिळत नाही, तिथल्या शिक्षकांना सरकारतर्फे कसलंही प्रशिक्षण मिळत नाही, ना या शाळांची तपासणी होते. पूर्ण भारतात सीबीएसई बोर्डाच्या २० हजार शाळा पण नाहीत. मग सीबीएसईच्या नावे माझ्या इतर नवपालकबांधवांना फसवणारे लोक कोण आहेत? त्यांच्यावर सरकार कडक आणि धडक कारवाई का करत नाही? सरकारचं आणि या लुटारू फेक इंग्रजी शाळांचं काही साटंलोटं आहे का?

- मला वाटायचं सीबीएसई म्हणजे पूर्ण देशात एकच अभ्यासक्रम असेल, पण इतर राज्यातील मित्रांकडे चौकशी केल्यावर समजलं, सीबीएसई साठी काही ठिकाणी NCERT ची पुस्तके तर काही ठिकाणी २००-२०० रुपयांची IB बोर्डाची पुस्तके वापरली जातात, म्हणजे कुणाला कशाचाही धरबंद नाही..कसलीही तपासणी होत नाही. शाळेला जे वाटेल ते शाळा करते.

~~~~~~~~~~

असो, मातृभाषेतून शिक्षण, पहिलीपासून इंग्रजी, राज्य-जिल्हा-तालुकास्तरीय अनेक कला-क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग अशा अनेक सुविधा मला मराठी माध्यमाच्या शाळेत मिळतात, ज्या इंग्रजी माध्यमात मिळत नाहीत! इतकंच काय तर साधं विद्यार्थ्यांनी मराठी बोललं तरी काही भुरटे, पालकांकडून २०-२० रु. दंड वसूल करतात.

मग अशा हास्यास्पद इंग्रजी शाळांमध्ये आणि अर्धवट शिकलेल्या शिक्षकांच्या हाताखाली मी माझ्या मुलीला अजिबात शिकवणार नाही. तुम्हीपण आजच योग्य निर्णय घ्या..

१. माझी दोन्ही मुले सेमी इंग्लीश मध्ये शिकली. पण दोन्ही मुलांचा शैक्षणिक कल वेगवेगळा असल्याने एक इंजिनियर झाला. तर दुसर्‍याने १२वी नंतर शिक्षण सोडले.दुसरा मुलगा फ्रेंच शिकत आहे.दुसरा मुलगा ह्या वर्षी पासून फ्रेंच भाषेचे क्लास घ्यायला सुरुवात करत आहे.

२. माझ्या भावाचा मुलगा सी.बी.एस.सी. माध्यमातून शिकला. पुढे B.I.T.S. (Goa), मधून इंजिनियर झाला आणि मग अमेरिकेत MS करायला गेला. तर त्याचीच मुलगी CBSC चा अभ्यास झेपत नसल्याने, ९वी नंतर, SSC बोर्डातून दहावी करत आहे.

माझ्या माहितीतली काही उदाहरणे बघीतली तर, भाषा हे माध्यम महत्वाचे नसते तर, शैक्षणिक कल बघून, ते शिक्षण देणारे उत्तम शिक्षक शोधले तर, शैक्षणिक यश आणि व्यावहारिक यश नक्कीच मिळू शकते, असा माझा मर्यादित अनुभव आहे.

सुचिकांत's picture

20 Apr 2018 - 10:35 am | सुचिकांत

सेमी इंग्रजी हे वेगळे माध्यम नसून मराठी शाळांचा भाग आहेत. तिथे ते सर्व फायदे मिळतात जे मराठी शाळांमध्ये मिळणे अपेक्षित आहे .

कोरियन जपानीस किंवा चिनी लोकांना विशेष विंग्रजी येत नाही पण आपण विंग्रजी समजून सुद्धा दळिद्री का आहोत ?

विंग्रजांना विंग्रजी साठी उपकार दाखवणे म्हणजे एखाद्या बलात्कार पीडित महिलेने लैगिक सुखासाठी बलात्कारी नराधमाचे उपकार मानण्यासारखे होय.

उदाहरण थोडे टोकाचे वाटले तरी भारतीय लोक आधीपासून जगांत व्यापारासाठी येत जात होते. भारतीय लोक ३-४ भाषा सहज अवगत करतात. समाज इंग्रजी महत्वाची ठरली असती तर ती शिकून घेण्यासाठी त्यांना गुलामगिरीची गरज नव्हती. आज सुद्धा भारतात फ्रेंच, जर्मन, जपानी, ग्रीक भाषा शिकणारे अनेक लोक आहेत. (मी स्वतः जपानी भाषा शिकले आहे)

इंग्रजी भाषेला अवाजवी महत्व अश्या साठी दिले जाते कीजे आम्ही बहुतेक भारतीय अजून सुद्धा फार खालच्या दर्जाच्या कामांत गुंतलो आहोत त्यामुळे तथाकथित विदेशी क्लायंट ची थुंकी झेलण्यासाठी "विंग्रजी पाहिजे" असा दबाव भारतातील कर्मचाऱ्यावर आणला जातो.

ह्या उलट अँड्रू ng ह्या चिनी कॉम्पुटर सायंटिस्ट चे उदाहरण पहा. त्याला जेमतेम इंग्रजीच येते. तरी सुद्धा आधी गुगल आणि नंतर बैदुने भरमसाठ पैसे देऊन त्याला नोकरी दिली आहे. सिलिकॉन व्हॅलीतील बहुतेक जपानी, चिनी, कोरियन लोकांना फक्त जुजबी इंग्रजीच येते म्हणून कधी त्यांना नोकरी मिळायला त्रास होत नाही.

इंग्रजी भाषा जरूर शिकावी आणि अगदी ब्रिटिश साहेबाला सुद्दा त्यात मागे टाकावे पण हे "उपकार केले हो" अश्या प्रकारची भाषा वापरणे म्हणजे आमच्या पूर्वजांचा अपमान करणे होय.

गामा पैलवान's picture

20 Apr 2018 - 2:17 am | गामा पैलवान

साहना,

तथाकथित विदेशी क्लायंट ची थुंकी झेलण्यासाठी "विंग्रजी पाहिजे" असा दबाव भारतातील कर्मचाऱ्यावर आणला जातो.

यू आर डेड राईट!

शेवटी इंग्रजीची महती म्हणजे पौंड : रुपया हे गुणोत्तर आहे.

आ.न.,
-गा.पै.

दीपक११७७'s picture

20 Apr 2018 - 10:08 am | दीपक११७७

सहमत,

विंग्रजांनी जे इन्फ्रस्ट्रक्चर निर्माण केले ते करतांना भारतीय मजुरांन वर खुप अत्याचार करुन काम करुन घेतले. जसे आज चिन मधील लेबर बाबत बोलले जाते.
विंग्रजांचे उपकार मानने म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात बलीदान दिले -सर्वस्व त्यागले त्यांना एक प्रकरे चुक ठरवण्या सारखे आहे.

दिमित's picture

20 Apr 2018 - 11:46 am | दिमित

>>आज सुद्धा भारतात फ्रेंच, जर्मन, जपानी, ग्रीक भाषा शिकणारे अनेक लोक आहेत. (मी स्वतः जपानी भाषा शिकले आहे)
ह्या विषयी अधिक माहिती देउ शकाल का? (नविन भाषा शिकावी म्हणतो. जमल्यास जपानी. पण फारच अवघड आहे असे ऐकले आहे. :-( )

पुण्यात असाल तर आपल्या एक मिपाकरांच्या मिसेस खूप छान जपानी शिकवतात.
गरज असेल तर व्यनिमध्ये लिंक देउ शकेन.

दिमित's picture

20 Apr 2018 - 2:38 pm | दिमित

द्याच लि॑क!! __/\__

आपण विंग्रजी समजून सुद्धा दळिद्री का आहोत ?

जर इंग्रजी येऊनही दळिद्री तर मराठी येऊनही दळिद्रीच ना ? विनाकारण इंग्रजीवर का ढकलायचे ?

विशुमित's picture

20 Apr 2018 - 10:57 am | विशुमित

+1

लेखात आपल्या मराठीच्या निर्मात्यांचे उपकार मानण्या/न मानण्याचा विषय आहे का ? इंग्रजी आली म्हणून आम्ही अधिक उपयुक्त झालो असा मुद्दा आहे.

(बाकी तुम्हाला मराठी भाषेतून "inference" समजत नसावा असे लक्षात येते)
पुढील विषय मांडा : इंग्रजी येतेय म्हणून इथे तरी आलो, तीही न येती तर याहून वाईट गरिबीत असतो.

श्वेता२४'s picture

20 Apr 2018 - 11:15 am | श्वेता२४

घरात बोलायला, गप्पा मारायला वगैरे मराठी ठीक आहे पण शिक्षणासाठी माध्यम म्हणून इंग्रजीच ! अनेक पालक मुलांना मराठी साहित्याची घरच्या घरीच ओळख करून देतात पण माध्यमाचा दर्जा मात्र इंग्रजीलाच देतात.

इंग्रजांनी बाकी कुठलेही अन्याय केलेले असले तरीसुद्धा इंग्रजी भाषेचे माध्यम भारतीयांना देऊन आपल्यावर अनंत उपकार करुन ठेवलेले आहेत !

निदान या बाबतीतले इंग्रजांचे उपकार तरी आपण विसरता कामा नये.

यामधून निघणारा इन्फरन्स
इंग्रजी येतेय म्हणून इथे तरी आलो, तीही न येती तर याहून वाईट गरिबीत असतो.
हा आहे असं वाटत नाही

एखाद्या गोष्टीबद्दल उपकार मानायचे असतील तर ती गोष्ट न मिळती तर आताच्या परिस्थितीपेक्षा वाईट परिस्थितीत असतो असा माझा तर्क चालतो बा.

श्वेता२४'s picture

20 Apr 2018 - 12:01 pm | श्वेता२४

जर भारतीयांना स्वतला इंग्रजी शिक्षणाची गरज असती व इंग्रजांनीही उदारपणे स्वत आर्थिक झळ सोसून उदात्त हेतूने भारतीयांना शिक्षण दिले असते. तथापि ऐतिहासिक संदर्भ हेच सांगतात की इंग्रज मूळातच अत्यंत व्यावसायिक हेतूने भारतात आले आणि त्यानी राज्य केलं. त्यात कोणताही उपकाराचा भाव नव्हता निव्वळ स्वार्थीपणा होता.भारतीयांना शिक्षण देणे व तेही इंग्रजी भाषेतून ही निव्वळ इंग्रजांची सोय होती. हा उपकार एका बाबतीत इंग्रजांचे मी मानेन मात्र (हे उपरोधीक आहे) की त्यांनीच आमच्यावर राज्य केले, पोर्तूगीजांना त्यांनी देश पादाक्रांत करु दिला नाही. अन्यथा संपूर्ण भारताचा गोवा झाला असता

संपूर्ण भारताचा गोवा झाला असता

म्हणजे स्वस्त पेट्रोल :P

विशुमित's picture

20 Apr 2018 - 2:22 pm | विशुमित

स्वस्त बिअर??

manguu@mail.com's picture

23 Apr 2018 - 3:30 pm | manguu@mail.com

आंबा लावणारा / विकणारासुद्धा व्यावसायिक कारणानेच लावत असतो.

मग आंबा खाणार्याने आंब्याची स्तुती करायची की नाही ?

मोघल अन इंग्रज स्वार्थासाठी राज्य चालवायचे , मग त्याच्यापुर्वीचे राजे लोकसेवा म्हणून राज्य चालवायचे का ?

जेव्हा दोन संस्कृती एकत्र येतात तेव्हा त्याच्या छटा एकमेकात मिसळणारच. त्याचप्रमाणे भाषा, वेशभूषा. खानपानसंस्कती, सणसमारंभ हे एकमेकांकडून आत्मसात केले जाणे स्वाभाविक आहे. त्यात उपकाराचा भाग काय

manguu@mail.com's picture

23 Apr 2018 - 4:03 pm | manguu@mail.com

इंग्रजांपुर्वीचे देशी राजे स्वत: झळ सोसून अन्न वस्त्र निवारा शिक्षण औषधोपचार जनतेला द्यायचे का ?

श्वेता२४'s picture

20 Apr 2018 - 10:58 am | श्वेता२४

एक वेगळा मुद्दा इथे मांडावासा वाटतोय आधुनिक भारताच्या इतिहासाचा जेवढा काही अभ्यास केलाय त्यावरुन माझं निरीक्षण मांडत आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये इंग्रजी भाषेची गरज सुरुवातीली इंग्रजांना व नंतर भारतीयांची गरज म्हणून प्रसार पावलीय. ब्रिटीशांना दोन गोष्टींसाठी मुख्यत्वे इंग्रजी भाषा भारतीयांवर लादण्याची आवश्यकता वाटली. 1) प्रशासनात भारतीयांना कारकून म्हणून सामावून घेणे 2) इंग्रजनिष्ठ भारतीयांचा वर्ग तयार करणे. त्यामुळे त्यांनी शिक्षणाचे इंग्रजीकरण केले व सुरुवातीची भारतीय फळी इंग्रजी शिक्षण घेऊन बाहेर पडली. ही पिढी इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवून होती परंतु त्यातील काहींना देशाच्या परिस्थितीची जाणिव झाल्यामुळे त्यांनी अधीक अधीकारांसाठी चळवळ सुरु केली(मवाळ कालखंड) याच काळात त्यांनी ब्रिटीशांच्या सासन व्यवस्थेचा अभ्यास केला, कायदेमंडळ, न्यायव्यवस्था, पत्रकारीता तसेच इतर देशांविषयीचे साहित्य यांच्याकरीता इंग्रजीचे ज्ञान आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच स्वांतंत्र्यप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचा भाग म्हणून समविचारी नेते एकत्र येत असताना इंग्रजी भाषेमुळे त्यांना आपापसात संवाद साधण ेअवघड गेले नाही. आपल्या देशाच्या भाषिक वैविध्यतेमुळे सर्वमान्य अशी एकही भाषा आजतागायत स्विकारली गेली नाही. तसेच इंग्रजी भाषेला पर्यायी भाषा म्हणून देशी भाषा समृद्ध करण्यात आपण कमी पडलो. कारण ब्रिटीशांनी जी व्यवस्था उभी केली, त्याचे भाषिक देशीकरण करता आले नाही. आजही प्रशासनात काम करताना वापरण्यात येणारे शब्द मला बोजड व कृत्रिम वाटतात. त्यांचा सार्वजनिक उपयोग वाढवला पाहिजे असे वाटते. अंतीमत एवढेच नमुद करेन की ब्रिटीशांची इंग्रजी भाषा उपकार वगैरे नाही ती गरज म्हणून प्रसार पावली आणि आता अविभाज्य भाग झाली. आपण जेवढी स्वतची भाषा समृद्ध करु, नवीन येणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधून त्यांचा बोलीभाषेमध्ये जास्तीत जास्त वापर करु तेवढी बाषा समृद्ध होत जाईल. बाकी मुलांना इंग्रजी शाळेत घालावे या मताशी मीही सहमत नाही. परंतु मराठीइतकीच इंग्रजी भाषादेखील आली पाहिजे कारण ती काळाची गरज आहे. इतकेच नव्हे तर आता मी अशा मताची आहे की मुलांना मराठी, हिंदी, संंस्कृत, इंग्रजी याचबरोबर एक दक्षिणात्य भाषा त एक आंतरराष्ट्रीय भाषा (जपानी, फ्रेंच, जर्मनी इ.) आल्या तर त्यांचे जगात कुठे अडणार नाही.

शिक्षणात अधिक भाषा जोडण्याचा श्वेता यांचा मुद्दा योग्य आहे . (गुगल सीईओ एकमेकांच्या भाषेतील रिअल टाइम विश्वासार्ह संवाद आणि व्यवहार येत्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सहज शक्य होईल म्हणतो , असे तंत्रज्ञानावर युरोमेरिका संशोधन आणि नियंत्रण ठेवेल रडके भारतीय शक्य नाही म्हणून बालिश तांत्रम किंवा न्यूनगंडाच्या कोशात झोपलेले असतील )

अर्थात कोणत्याही तंत्रज्ञान शिवाय लो . टिळकांची आणि इतरही अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या भाषणाचे अनुवाद भारतातील सर्व भाषांतून वितरित केले जात ते स्मितीत करणारे होते . एका भारतीय भाषेतून दुसऱ्या भारतीय भाषेत अनुवाद करताना तिसऱ्या खासकरून परकीय भाषांचा आधार फारसा घ्यावा लागत नसे . आजच्या काळा वरून आपल्या आधीच्या पिढ्यातील स्वातंत्र्य सैनिक आपापसातील संवादासाठी सरसकट इंग्रजीवर अवलंबून असत हा निष्कर्ष अन्याय कारक आहे . हिंदीत चुक होऊ नये म्हणून टिळकांनी इंग्रजी वापरली अशी उदाहरणे आहेत पण खूपशी नाही . त्यावेळी हिंदी आणि संस्कृत द्वेष टोकाला पोहोचलेला नसावा . इसवीसनाच्या आधी अनेक शतके भारतातील अध्यात्मिक विचारांची असो देवाण घेवाण असो कि व्यापार असो अडसर आले नाही .

आपल्या देशाच्या भाषिक वैविध्यतेमुळे सर्वमान्य अशी एकही भाषा आजतागायत स्विकारली गेली नाही. तसेच इंग्रजी भाषेला पर्यायी भाषा म्हणून देशी भाषा समृद्ध करण्यात आपण कमी पडलो. कारण ब्रिटीशांनी जी व्यवस्था उभी केली, त्याचे भाषिक देशीकरण करता आले नाही.

प्रत्येक भारतीयाने दुसऱ्या भाषिक प्रदेशात स्थानांतरित होऊन गेल्यावर तीन वर्षात तेथील स्थानिक भाषा शक्यतोवर आत्मसात करावी आणि हिंदी सुद्धा आंतरराज्यीय संवाद भाषा म्हणून स्वीकारावी असे विसाव्या शतकाच्या मध्यातील हिंदी भाषेचे एक मुख्य गांधी वादी प्रचारक काका कालेलकर यांचे मत होते . सोबत त्रिभाषा सूत्रानुसार शाळेत इंग्रजी शिवाय दोन भारतीय भाषा शिकवल्या जाव्यात हे अभिप्रेत होते त्या नुसार हिंदी भाषी राज्यातील शाळांनी भारतातील विविध भाषा शिक्षणासाठी वाटून घेणे अभिप्रेत होते ते ना करताच हिंदीचा डंका पिटण्याचा प्रयत्न हिंदी विषयक धोरणा बाबत इतर राज्यात राजकीय साशंकतेस कारणी भूत झाला तर पूर्वोत्तर राज्ये आणि तामिळनाडूतील संकुचित भूमिकांचे यथोचित खंडणास हिंदी प्रेमी नेतृत्व कमी पडले .

श्वेता२४'s picture

21 Apr 2018 - 1:49 pm | श्वेता२४

आजच्या काळा वरून आपल्या आधीच्या पिढ्यातील स्वातंत्र्य सैनिक आपापसातील संवादासाठी सरसकट इंग्रजीवर अवलंबून असत हा निष्कर्ष अन्याय कारक आहे
कृपया मी असा काही निष्कर्ष काढला नाही.
तसेच स्वांतंत्र्यप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचा भाग म्हणून समविचारी नेते एकत्र येत असताना इंग्रजी भाषेमुळे त्यांना आपापसात संवाद साधण ेअवघड गेले नाही. हे मी असे ढोबळ विधान केले आहे कारण कुठेतरी वाचनात आलं होतं की सुरुवातील राष्ट्रीय स्तरावर इंग्रजी भाषेच्या प्रसारामुळे समविचारी नेते एकत्र येण्यास मदत झाली व इंग्रजीने अप्रत्यक्षरीत्या स्वातंत्र्यआंदोलन पसरवण्यास साहाय्यच झाले असा त्याचा काहीसा आशय होता. बाकी तुमच्या सर्व विचारांशी सहमत

इंग्रज नसते तर हिंदी (नि कदाचित मराठी) हीच जगत्भाषा राहीली असती. पण इतका अँबिशिअस विचार करणं न्यूनगंडी मनांना शक्य नाही.

प्रसाद गोडबोले's picture

20 Apr 2018 - 8:06 pm | प्रसाद गोडबोले

इंग्रज नसते तर हिंदी (नि कदाचित मराठी) हीच जगत्भाषा राहीली असती.

जगत्भाषा लोल !!
तुमचं जग इकडे कोथरुडला अन तिकडे सिंहगड रोडला पलीकडे हडपसर अन वाघोलीला संपतं का हो ?

माहितगार's picture

21 Apr 2018 - 12:27 pm | माहितगार

....तुमचं जग इकडे कोथरुडला अन तिकडे सिंहगड रोडला पलीकडे हडपसर अन वाघोलीला संपतं का हो ?

मार्कस तुम्हाला नेमका कुणाला खिजवायचे आहे , अ. जो. पुणेरी नसूनही त्यांना पुणेरी म्हणून खिजवायचे आहे , की पुणेरी लोकांना ? पुणेरी नसलेल्यांनी मराठीचा बाणा वापरु नये असे थोडेच आहे ? उलट सध्या पुणेकरच न्युनगंडाने पछाडलेले नाहीत ना अशी शंका येते कधी कधी (ह. घ्या.)

माहितगार's picture

21 Apr 2018 - 12:29 pm | माहितगार

अर्च्चा हे लक्षातच आले नाही कि पुण्याच्या पेठा सोडून बाकीचाच भाग निवडलेला दिसतोय याचे गमक काय - अज्ञानी माहितगार

जगावर राज्य भारतीयांचं राहिलं असतं. (कधी काळी होतं देखील). त्या अर्थानं.

गामा पैलवान's picture

21 Apr 2018 - 1:13 pm | गामा पैलवान

मंगूश्री,

इथले आकडी मिशीवाले , वाघावर पाय ठेवून उभे राहिलेले , फूल हुंगणारे वगैरे राजेम्हाराजे नेमके काय करत होते ?

सरळ नाव घ्या ना. उगीच आडवळणाने नको. लाजताय कशाला? ते तुमचा नवरा लागतात का?

आ.न.,
-गा.पै.

manguu@mail.com's picture

23 Apr 2018 - 3:33 pm | manguu@mail.com

नावासकट यादी करुन पिंडदान करायचे आहे का ?

मी जी वर्णनं केली ती overall general आहेत.

गामा पैलवान's picture

23 Apr 2018 - 6:00 pm | गामा पैलवान

तुमचे इतके नवरे आहेत हे नवंच कळलं.

-गा.पै.

वाघ मंजे संभाजी राजे आठवतात.

इंग्रजीने देशाचा सर्वनाश केला आहे. किमान आता तरी इंग्रजीला समुद्रात बुडविली पाहिजे.

manguu@mail.com's picture

23 Apr 2018 - 5:18 pm | manguu@mail.com

लवकर बुडवा..

बर्फ वितळून पुण्यापर्यंत समुद्र येणार आहे. त्याच्या आत बुडवा , नैतर विनाकारण ग्लोबल वॉर्मिंगला क्रेडिट जाईल आणि ग्लोबल वॉर्मिंगचे उपकार असा एखादा धागा येईल.

arunjoshi123's picture

23 Apr 2018 - 5:41 pm | arunjoshi123

अजून काय काय होईल?

इंग्रजांनी बाकी कुठलेही अन्याय केलेले असले तरीसुद्धा इंग्रजी भाषेचे माध्यम भारतीयांना देऊन आपल्यावर अनंत उपकार करुन ठेवलेले आहेत !

न्यूनगंडी लोकांसही लज्जा वाटेल इतकं न्यूनगंडी विधान आहे. एक तर इतर अन्यायांचा संदर्भ देऊ नये. त्यांची तीव्रता कमी होते.
दुसरा इंग्रजांचा हेतू तसा (मंजे चांगला) नव्हता.
--------------------
आणि सर्वात महत्त्वाचं मंजे इंग्रजीमुळे देशाची वाट लागली आहे. इथूनही पुढे लागत राहील.

उपेक्षित's picture

23 Apr 2018 - 8:12 pm | उपेक्षित

इंग्रजांनी उपकार केले असे म्हणणे म्हणजे लाचारीची हद्द झाली राव.