मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग २)
यापूर्वीचे कथानक (मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १):
https://www.misalpav.com/node/41194
पॅरिस मध्ये ‘मोनालिसा’ चे चित्र बघताना मला ती तिथून सोडवण्याची विनंती करत असल्याचा भास झाला. दुसरे दिवशी रात्री ‘क्लो ल्यूस’ या लिओनार्दोच्या प्राचीन निवासस्थानात खुद्द लिओनार्दो दा विंचीने मी त्याचा ‘लॉरेन्झो’ नामक पट्टशिष्य असल्याचे सांगून मला भूतकाळाच्या सफरीवर पाठवले…
… या भागात ‘लॉरेंझो’ या माझ्या पंधराव्या शतकातील पूर्व- जन्माची हकीगत वाचा:
लोरेंझो गेरार्दिनीची रोजनिशी : ( टोलेडो- स्पेन, ४ सप्टेंबर १४९२ )
मी लोरेंझो गेरार्दिनी .आजपासून मी रोजनिशी लिहिणे सुरु करत आहे. या रोजनिशीत मी रोज काय केले याखेरीज आमच्या कुटुंबाविषयी, आणि इतर विविध माहितीपण लिहून ठेवणार आहे.
आमचे कुटुंब: मी, माझी लहान बहीण एली आणि आमचे आई-बाबा असे आमचे कुटुंब आहे.
चित्र १. दहा वर्षांपूर्वी आम्ही फ्लोरेन्सला रहात असताना असे दिसायचो. चित्रकार : Paulo Veronese
मी अगदी लहान असताना माझी आई चित्रकला शिकायची, ते बघून मलापण ती आवड लागली. आता मी रोज चित्रकलेचा सराव करत असतो.
.
एली अगदी लहान असल्यापासून सर्वांची खूप लाडकी आहे. वडील तिला कौतुकाने ‘मोनालिसा’ म्हणतात. ग्रीक-लॅटिनच्याही पूर्वीच्या कोणत्यातरी प्राचीन मेंढपाळांच्या भाषेत मोनालिसा’ या शब्दाचा अर्थ ‘माझे लाडके कोकरू’ आहे, असे ते सांगतात. एलीला अगदी लहानपणापासूनच लिहिण्या - वाचण्याची फार गोडी आहे.
.
चित्र ४. Johann Georg Meyer von Bremen. चित्र ५. Simon Glücklich
.
चित्र ६-७ चित्रकार: Johann Georg Meyer von Bremen
आम्ही सध्या स्पेन मधील 'टोलेडो' गावात रहात आहोत. माझ्या वडिलांना इथल्या एका उमरावाने लॅटीन भाषा शिकण्यासाठी आमंत्रित केल्याने इटलीतील बॉब्ब्बिओ गावाहून आम्ही इथे आलेलो आहोत. खरेतर आम्ही मुळात फ्लॉरेन्सचे. माझे वडील लॅटीन आणि इतर प्राचीन भाषांचे तज्ञ तर आहेतच, शिवाय त्यांना जुने नकाशे, हस्तलिखिते वगैरे गोळा करण्याची, प्राचीन रोमन आणि ग्रीक संस्कृतीविषयी भाषणे द्यायची फार आवड आहे.
.
.
चित्र ८ - ११ आमच्याकडले नकाशे आणि पुस्तके.
हल्ली वेगवेगळ्या प्रांतात तिथल्या स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच, इटालियन वगैरे भाषा बोलल्या जात असल्या, तरी लिहायला-वाचायला येणारे लोक फार कमी असतात, आणि लिहिणे-वाचणे लॅटिन मधूनच चालते. लॅटिन भाषा येणाराला सर्व ठिकाणी मान असतो आणि राजे-राजवाडे, अमीर उमराव त्यांना आमंत्रित करत असतात. आम्हाला वडील नेहमी ग्रीक पुराणकथा, रोमन साम्राज्य वगैरे विषयी माहिती सांगत असतात, आणि मी चित्रकला चांगल्या प्रकारे शिकून ग्रीक-रोमन विषयांवर भव्य चित्रे रंगवावीत असे त्यांचे - आणि माझे पण - स्वप्न आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
टोलेडो, ६ सप्टेंबर १४९२
आज सकाळपासून मी एका डोंगरावर टोलेडो गावाचे दुरून दिसणारे दृश्य रंगवत बसलो होतो. रात्री घरी पहुचल्यावर बघतो, तो वडील कसल्यातरी काळजीत चूर झालेले दिसले.
"लोरेंझो, आता माझे काही खरे नाही. इन्क्वीझित्स्योने मध्ये माझाही बळी जाणारसे दिसते आहे. मला त्यांनी पकडून नेले, तर तुम्ही एक क्षणही इथे थांबू नका. पुन्हा आपल्या बॉब्ब्बिओ गावी जा. एली आणि आईची नीट काळजी घे. एलीचे लग्न लवकरच एकाद्या चांगल्या तरुणाशी लावून दे... आणि हो... ही सेरिपी आता तू सांभाळ. ही शेकडो वर्षांपासून आपल्या घराण्याची मूल्यवान ठेव आहे. हिचे पाते जर तुला लालसर दिसू लागले तर तुझ्यावर कठीण प्रसंग ओढवणार आहे असे समज, आणि जेंव्हा तुला काय करावे ते कळेनासे होईल, तेंव्हा ही सेरिपी तुला मार्गदर्शनही करेल” ... असे म्हणून सेरिपी मला देउन त्यांनी आपले सर्व लिखाणाचे कागद एकत्र करून जाळायला सुरुवात केली. मी आतल्या खोलीत येऊन रोजनिशी लिहायला घेतली आहे.
इटलीत सध्या मोठ्या प्रमाणावर प्राचीन रोमन अवशेष, कला, ग्रीक साहित्य वगैरेंचा अभ्यास केला जात आहे, त्यामुळे बायबलखेरीज अन्य विषयांचे ज्ञानही लोकांना होऊ लागले आहे. पाद्री मंडळी सांगत असलेल्या स्वर्ग-नरक याबद्दलच्या कल्पनांपेक्षा मनुष्याचे प्रत्यक्ष जीवन कसे उन्नत करता येईल, याविषयी लोक विचार करू लागलेले आहेत.
.
चित्र १२ नरकयातना Fra Angelico.. चित्र १३ आनंदी जीवन Gerrit van Honthorst
इटलीत वेगाने पसरत असलेले असे सर्व नवनवीन विचार वडिलांनी आपले लिखाण आणि भाषणे यातून टोलेडोत प्रसृत करायला सुरुवात केल्याने इथल्या चर्चची वक्रदृष्टी त्यांच्याकडे वळलेली आहे, पण त्यातून काही मोठे संकट आमच्यावर कोसळेल, असे आत्तापर्यंत तरी वाटलेले नाही.
हे 'इन्क्वीझित्स्योने' फार भयंकर प्रकार आहे. चर्चचे अधिकारी, पाद्री कुणालाही पकडून नेतात, आणि खोटेनाटे आरोप ठेऊन त्याचा अनन्वित छळ करतात. या भयंकर छळामुळे ती व्यक्ती मृत पावताच त्याची सगळी संपत्ती जप्त करतात. घरातील स्त्रियांना जबरदस्ती नन्स बनवतात, असे ऐकले आहे.
चित्र १४. 'इन्क्वीझित्स्योने'
बोबिओ, इटली, ३० डिसेंबर , १४९२
गेल्या तीन -चार महिन्यात किती प्रचंड उलथापालथ झाली आहे... सर्वत्र विनाशाचे तांडव... एकामागून एक संकटे... कसाबसा जीव वाचवून सुरक्षित जागी पहुचण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा... आता कुठे जरा थोडा निवांतपणा मिळालाय, म्हणून पुन्हा रोजनिशी हातात घेतलीय...
... मागे लिहिले, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी ते चित्र पूर्ण करायला अगदी सकाळीच डोंगरावर येउन बसलो होतो. संध्याकाळी चित्र पूर्ण करून जवळच्या एका धनगराच्या घरात ठेवले, कारण स्पेनमध्ये हल्ली चर्चच्या वर्चस्वामुळे येशू, मेरी आणि बायबलातील प्रसंगांच्या चित्रांखेरीज अन्य प्रकारची चित्रे निषिद्ध मानली जातात. मला निसर्गचित्रण फार आवडत असल्याने दूर शहराबाहेर चित्र काढायला जायचो... तर संध्याकाळी शहराजवळ जसजसा पोहोचू लागलो, तसतसे विचित्र आवाज, करुण किंकाळ्या कानावर येऊ लागल्या. आवाज त्या प्रार्थनामंदिरातून - इग्लेसियातूनच येत होते. मी धावतच जाउन खिडकीतून बघितले, तो अंगावर काटाच आला. आत नाना प्रकारची भयंकर यंत्रे लावलेली होती, आणि त्यांवर लोकांना अडकवून विविध प्रकारे छळ केला जात होता. आणि हे काय? माझे वडीलही त्यात होते? एका टेबलावर हात-पाय बांधून त्यांना ठेवले होते, आणि नाक दाबून त्यांना जबरदस्तीने पाणी पाजले जात होते.
.
चित्र १५ - १६ 'इन्क्वीझित्स्योने'
तिथून वडिलांना सोडवणे मला शक्यच नव्हते. मला एकदम घरची आठवण आली. आई आणि एली सुरक्षित आहेत ना? त्यांच्या मदतीला जायला हवे... मी धावतच घराकडे निघालो.
घरी आमचे शेजारी जमलेले होते. सर्वांच्या नजरेत भीती दाटलेली होती. हळुहळु आवाजात कुजबुज चालली होती. आई आणि एली रडत होत्या.
"बाळा, त्यांना पकडून नेले रे त्या दुष्टांनी" आई म्हणाली.
शेजारचे आजोबा मला म्हणाले, तुम्ही रातोरात गाव सोडून सुरक्षित ठिकाणी पोहोचा, कारण सकाळी घरावर मदार येईल. सगळी संपत्ती तर घेउन जातीलच, एली आणि आईला भिक्षुणी बनवण्यासाठी घेऊन जातील. त्यांचे नख सुद्धा नंतर कुणाला बघता येणार नाही, आणि तुझे काय होईल, काहीच सांगता येत नाही...
वेळ अगदी कमी होता. शेजार्यांनी भीत- भीतच घोडागाडीची सोय करून दिली. पटापट जमतील तेवढ्या वस्तू घेऊन आम्ही निघालो. त्या घाई-गडबडीतही मी सेरीपी घ्यायला विसरलो नाही. तिचे पाते अगदी लालीलाल झालेले होते, हे बघून माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही.
इग्लेसियाच्या दिशेने जाणे धोक्याचे होते. तिकडून लाल-लाल ज्वाळा आणि धूर दिसत होता, आणि करूण किंकाळ्या ऐकू येत होत्या. बाबांचे काय झाले असेल? या एकाच विचाराने डोके भणाणून गेले होते…
लांबचे वळण घेऊन आम्ही गावाबाहेर पडलो. बरेच अंतर पार केल्यावर आम्ही एका पडझड झालेल्या इमारतीचा आश्रय घेऊन कशीबशी रात्र काढली.
चित्र १७. Carl Gustav Carus
पुढे अडीच-तीन महिने काहीश्या धास्तीतच आम्ही प्रवास करत होतो. वाटेत अनेक दृश्ये चित्र काढण्याजोगी दिसत होती, पण मी तश्या मनस्थितीत नव्हतो.
.
चित्र १८. Jacob van Ruisdael.... चित्र १९. Asher B. Durand
चित्र २०. : Ernest Fritz Petzholdt. चित्र २१. Oswald Achenbach
तीन महिन्यांच्या कठीण प्रवासानंतर प्राचीन रोमन साम्राज्याचे अवशेष जिथे तिथे दिसू लागले. त्यावरून आम्ही इटलीत येऊन पहुचल्याचे लक्षात आले, आणि जरा दिलासा मिळाला.
चित्र २२. Rudolf_Wiegmann
.
चित्र २३ - २४ Ferdinand Knab
शेवटी आम्ही आमच्या गावी आम्ही पोचलो. पुन्हा एकदा अगदी बालपणापासून रहात आलो ते घर, शेजारी, सुरक्षित, परिचित वातावरण बरे वाटत होते, पण वडिलांची आठवण पदोपदी यायची. लहानगी एली तर सारखे 'पाद्रे' 'पाद्रे' म्हणत रडायची. आई दु:खात चूर होती. आता मलाच काहीतरी करणे भाग होते. माझ्यावरच सर्व जबाबदारी येऊन पडली होती.
गावातल्या चर्चमध्ये मोठया प्रमाणावर चित्रे रंगवण्याचे काम चालले होते, तिथे मला काम मिळाले. नियतीची लीला, एका चर्चमुळे आमच्या कुटुंबाची वाताहात झाली, तर दुसर्यामुळे आम्हाला जगण्याचा आधार मिळाला.
हळू हळू मी कामात रमू लागलो…
चित्र २५. चर्चमधील भित्तिचित्रे
...आणि मग एक दिवस माझे नशीब अचानक फ़ळफ़ळले...
आमच्या गावी मिलानचे सुप्रसिध्द चित्रकार आणि संशोधक लिओनार्दो दा विंची यांचे आगमन झाले...
....................(क्रमशः)

वर्गीकरण
प्रतिक्रिया
कथा पकड घेतेय. पुढचा भाग लवकर
चित्रे अप्रतिम ..
वाह! काय भन्नाट चित्रे आहेत!
सत्य
वावा! पाटीवर अभ्यास करणारी
अरे वा! खूप दिवसांनी आला
एक निरिक्षण
स्टोन पाईन
जबरदस्त.
मजा येतेय वाचायला. चित्रे तर
सुंदर
सुरेख
कमालीची वास्तवदर्शी असलेली
खूप सुंदर!
@ चित्रगुप्त,
वाचतोय.
प्रेरणादायक
एवढी जबरदस्त
एवढी जबरदस्त
भान हरपले.
सुंदर कथा आणि अप्रतिम चित्रकला
चित्रांच्या दुनियेतील सिंदबाद सफर
कथा आणि चित्रांची अप्रतिम
वाह !अफलातुनच आहे ही कल्पना !
कथेने मस्त पकड घेतली आहे आणि
चित्रकारांची नावे वगैरे
सुंदर फुलते आहे कथा. सर्व
दुसर्या भागातही वेग कायम आहे
मस्त आवडली.
खूपच सुंदर चित्रे व लेखन !
पुढील भाग आहेत का?
कथा नी चित्रे मस्तच!