मनुस्मृति (भाग १)

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
23 Jul 2017 - 6:11 am

मनुस्मृति (भाग १)

आपण जेव्हा कोणत्याही धर्मकृत्याच्या संकल्पात " श्रुतीस्मृतीपुराणोक्त फलप्राप्यर्थम् " असे म्हणतो तेव्हा आपणाला फारफार तर पुराण माहीत असते, अगदी बरीच नावे माहीत नसली तरी त्यात जुन्या देवादिकांच्या गोष्टी असतात, त्यात भक्तीचा पुरस्कार केला आहे इतके जुजबी ज्ञान नक्की असते. श्रुती-स्मृती ही काय भानगड आहे ? आज थोडी माहिती मिळवू.

वेदसंहिता-ब्राह्मणे-आरण्यके-उपनिषदे या सर्व साहित्याला श्रुती म्हणतात. आपल्या, विशेषत: पंडितांच्या, धार्मिक व्यवहारात, हा अतिम शब्द. हा सगळा प्रकार कितीही श्रेष्ठ असला तरी सामान्य माणसांच्या रोजच्या व्यवहारात त्याला लागते साध्या साध्या नियमांची जंत्री

माणसांनी एकमेकांशी, राजाने प्रजेशी आणि प्रजेने राजाशी, व्यापार्‍याने ग्राहकाशी, आई-वडिलांनी मुलांशी आणि त्यांनी आई-वडिलांशी, एका वर्णाने दुसर्‍या वर्णाशी, इत्यदि इत्यादि कसे वागावे याचे नियम असणे समाजाला अत्यंत गरजेचे असते; नव्हे. समाज त्या शिवाय राहूच शकत नाही. हे नियम किंवा कायदे ज्या साहित्यात लिहले आहे ते साहित्य म्हणजे स्मृती. अध्यात्मदर्शनाचा पाया शुद्ध आचार आहे. तो आचार आणि त्याच्या नीतीरुपी, सदाचाररुपी सीमारेषा नियमबद्ध करणे हे स्मृतींचे कार्य. आचार शुद्ध रहावा, कायदे नीट पाळले जावेत म्हणून " प्रायश्र्चित्त " (दंड) आलेच. तर अशा या स्मृती. किती आहेत ? प्रमुख वीस. उदा. अत्री, आपस्तम्ब, पाराशर वगैरे. त्यातील सर्वात प्रमुख व ब्रिटिश शासन कालातही न्यायालयात वापरली जाणारी म्हणजे " मनुस्मृती ". एक अतिशय प्रज्वलनशील ग्रंथ. भाजपाला मनुवादी म्हणून हिणवावयास व केव्हाही रस्त्यावर जाळावयास उपयोगी म्हणून "बहेनजीं"ना फारच आवडणारा. आज आपण.मनुस्मृतीची माहिती घऊं..

मी अशा विषयावर लिहतो तेव्हा सहसा संक्षिप्त स्वरूपात लिहतो. वाचणार्‍याला किती त्रास द्यावयाचा हा साधा हिशेब. पण आज जरा विस्ताराने लिहिन म्हणतो. लेख तीन भागात आहे. पहिल्या दोन भागात ग्रंथाची माहिती व तिसर्‍या भागात याच स्मृतीला प्रखर विरोध कां ? ते पाहू.

तर आता सुरवात करू मनुस्मृती लिहणार्‍या मनुपासून. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र्र ही ओळख सोडली तर त्याचा ऐतिहासिक.काळ काही सापडत नाही. तेव्हा जरा वळसा घेवून मनुस्मृतीचा काळ कोणता ते पहिल्यांदी ठरवून मग तो काळ मनूचा असे म्हणावे लागते. इथेही अडचण अशी की आज आपल्यासमोर जी मनुस्मृती आहे ती मनूने लिहलेली नव्हेच. ती आहे एकामागून एक अशी संस्करणे झालेली. पण महाभारतात जर मनूची वचने दिली असतील तर ती त्यावेळी सर्वांना माहीत होती असे म्हणावयाचे. ती बुद्धपूर्व कालातील असणार. द्या सोडून.

तेव्हा आज आपल्या समोर असलेल्या मनुस्मृतीकडे वळू. ग्रंथात १२ अध्याय व २६८४ श्लोक आहेत..प्रत्येक अध्यायातील महत्वाचे विचार बघू...
आज ज्यांना मोठा विरोध आहे ते दोन मुदे (१) "न स्त्री स्वातंत्र्यमर्हति" आणि (२) शूद्र. पहिल्याचा आपण याच भागात योग्य ठिकाणी विचार करू व दुसर्‍याकरिता भाग ३ आहेच.

(१) अद्याय १ (श्लोक ११९)
परमात्म्याने सर्व सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवाने धर्मशास्त्र मनूला शिकवले. त्याने ते ऋषींना दिले.
निमिषापासून युगापर्यंत कालगणना;
कृतयुगात धर्म, त्रेतायुगात ज्ञान; द्वापारयुगत यज्ञ व कलीयुगात दान प्रधान आहेत;
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण; अध्ययन,अध्यापन,यझ‘करणे-कराविणे दान देणे व घेणे ही ब्राह्मणाची सहा कर्मे; प्रजेचे रक्षण दान देणे, यज्ञ करणे, अध्ययन व इंदियजय ही क्षत्रियाची प्रधानकर्मे, गोपालन, दान देणे, यज्ञ करणे, अध्ययन, व्यापार, शेती ही वैश्याची प्रधानकर्मे तर शिल्पकर्मे (कलानिर्मिती व त्रिवर्णाची सेवा ) ही शूद्रांची कर्मे आहेत.
सर्वांनी सदाचारीच असावे.

(२) अध्याय २ (श्लोक २४९)
ब्रह्मावर्त, ब्रह्मर्षी, मध्य देश यांच्या सीमा; पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यंत आणि हिमालय-विन्ध्यामधील प्रदेशास आर्यावर्त म्हणतात.
ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य याचे उपनयन क्रमश: ८ व्या, ११ व्या; १२ व्या वर्षी करावेत.
भोजन एकाग्रचित्ताने अन्नाचा सन्मान करून करावे. अतिभोजन करू नये.
पतिसेवा हाच स्त्रीसाठी गुरूकुलवास असून उत्तम रीतीने गृहकृत्ये करणे हाच साय़ंप्रातर्होम होय.
प्रतिदिनी जो वृद्धांची सेवा करतो विनम्रभावाने नमस्कार करतो त्याचे आयुष्य, विद्या, यश व बल सर्वच वर्धिष्णु होते.
मावशी, मामी, आत्या, काकू, सासू या सर्व मातेसमान आहेत.
दहा उपाध्यायासमान आचार्य असतो, शंभर आचार्यासमान पिता असतो आणि पित्यापेक्षा मातेची थोरवी सहस्रगुणित असते.
ब्राह्मणाने मानसन्मान विषवत् टाळावे व अपमानची अमृतवत् इच्छा करावी, तात्पर्य त्याने निर्द्वंद्व व्हावे.
माता-पिता-आचार्य यांचा कधीही अनादर करू नये. हे तीन लोक, तीन आश्रम, तीन वेद आणि तीन अग्नी आहेत. (त्यांच्याप्रमाणे पवित्र आहेत.
उत्तम विद्या शूद्राकडूनही ग्रहण करावी, परमधर्म चांडाळाकडूनही ग्रहण करावा. स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा. विद्या, धर्म, सुचिता, उत्तम वचन इ.अनेक प्रकारच्या चिद्या ज्यांच्याकडून मिळतील त्यांच्याकडून घ्याव्यात.

(३) अध्याय तीन (श्लोक २८६)
गुरूकुलात ब्रह्मचर्यव्रताने राहून मग गुरूच्या आज्ञेनेच गृहस्थाश्रमात प्रवेश करावा.
ब्राह्म, दैव, आर्य, प्राजापत्य, आसूर, गंधर्व, राक्षस आणि पैशाच्य हे विवाहाचे आठ प्रकार आहेत. यापैकी पहिले चार श्रेष्ठ आहेत.
ज्ञानवान पित्याने द्रव्याच्या मोहाने आपल्या कन्येला कधीही विकू नये. स्त्रीचा सदैव आदरच केला पाहिजे.जेथे (ज्या कुळात) स्त्रीचा सन्मान होतो तेथे देवता रमतात आणि जिथे स्त्रियांचे पूजन होत नाही, तेथे यज्ञादी सर्व क्रीया निरर्थक होतात.
ज्या कुलातील स्त्रिया दु:ख करतात, शोक करतात, त्या कुलाचा तात्काळ नाश होतो
स्त्रीला सन्मान वा शोभा असेल तरच त्या कुळाला शोभा आहे.
देवता, अतिथी, सेवक, माता, पिता, या सर्वांचा गृहस्थाश्रमीने नित्य सन्मान केला पाहिजे.
संपूर्ण जीव ज्याप्रमाणे वायूच्या आश्रयाने जगतात, त्याप्रमाणे सर्व आश्रम गृहस्थाश्रमाच्या आश्रयाने जगतात.
सर्वांना जेवण दिल्यावरच पति-पत्नीने अन्नग्रहण करावे.

(४) अध्याय ४ (श्लोक २६०)
सत्य व प्रिय बोलावे, अप्रिय बोलू नये. असत्य पण प्रिय, सत्य पण अप्रिय तेही बोलू नये हाच सनातन धर्मा होय.
निष्प्रयोजन वैर किंवा भांडण कधीही करू नये.
धर्मवर्जित व धर्माचे अधिष्ठान नसलेल्या अर्थ व काम यांचा संपूर्ण त्याग करावा.
नोकर आपली छाया असतात, त्यांच्या मुखातून काही वाईट बोलले गेले तर त्याचा राग करू नये..
कन्या विशेष कृपापात्र असते.
विद्वान पुरुषाने सदैव यम-नियमांचे सेवन करावे.
तपाचरण करणार्‍याने अहंकार वाढू देऊं नये; यज्ञ करणार्‍याने असत्य बोलू नये; दु:ख असलेल्याने विप्रांची निंदा करू नये; दान देणार्‍याने दानाची वाच्यता करू नये
अहंकाराने तपाचा, असत्याने यज्ञाचा, परनिंदेने आयुष्याचा व वाच्यतेने दानाचा नाश होतो.

परलोक प्राप्त करतांना माता-पिता, पुत्र, पत्नी कोणीही उपयोगी येत नाही. केवळ एक धर्मच सहाय्यभूत होतो. जीव एकटाच जन्माला येतो व एकटाच मरतो. एकटाच सुकृत-दुष्कृताला भोगतो.
उत्तमांचा संग धरावा आणि अधर्माचा संग टाळावा.

(५) अध्याय ५ (श्लोक १६९)
आपल्या सुखाकरिता प्राण्यांची हिंसा करणार्‍याला इहलोकात व परलोकात सुख मिळत नाही.
शंभर अश्चमेध करणार्‍याला व संपूर्ण आयुष्यात मांस न खाणारा यांना सारखेच पुण्य मिळते.
सन्मार्गाने द्रव्य मिळविणे श्रेष्ठ आहे.विद्वान क्षमेने, नदी वेगाने, शरीर जलाने, मन सत्याने, जीवात्मा विद्या व तपाने, बुद्धी ज्ञानाने व ब्राह्मण त्यागाने शुद्ध होतात.
मांस खाण्यात, दारू पिण्यात वा संभोगात पाप नाही परंतु त्यापासून दूर राहण्यात जास्त फायदा होतो.
मुलीने, तरुणीने वा वृद्धेने आपल्या घरातही काहीही स्वेच्छेने करू नये.
बाल्यावस्थेत पिता, तारुण्यात पति वार्धक्यात मुलगा असे स्त्रीचे तीन आश्रय असतात. म्हणून स्त्रीने स्वतंत्र राहू नये. पिता, भर्ता वा पुत्रापासून अलग झालेल्या स्त्रीची निंदा होते. पतिसेवेतच स्त्रीची सर्व व्रते, उपवास, यज्ञ समाविष्ट आहे. मन, वाणी व देह यांने पतीला दु:ख न देणारी स्त्री उत्तम लोकाला जाते.
(२००० वर्षांपूर्वीच्या काळात स्त्रीने जर पिता, भर्ता आणि पुत्र यांचा आश्रय सोडून स्वतंत्र रहावायाचे ठरविले तर तिला चरितार्थाचे साधन काय असणार ? संरक्षणाची व्यवस्था कोणती ? अशा स्त्रीची समाज निंदा करणार हे उघडच होते. मनूने इतर ठिकाणी स्त्रीची केलेली स्तुती पहाता त्याच्या मनात स्त्रीबद्दल आदरच होता असे दिसते.पण समाजाचा एक भाग म्हणून विचार केला तर त्या काळी स्वतंत्र स्त्री ही कल्पना अव्यवहार्य होती हे मान्य करावेच लागेल. आज काळ बदलला आहे. आज स्त्रीने स्वतंत्र रहावयाचे ठरविले तर ते शक्य आहे,सुरक्षित आहे की नाही हे अलग, तेव्हा या विधानाबद्दल मनूला किती दोष द्यावयाचा हे प्रत्येकाने वैयक्तिक ठरवावे.)

(६) अध्याय ६ (श्लोक ९७)

माणसाने गृहस्थाश्रमात नियमपूर्वक व जितेंद्रिय रहावे. वृद्धत्व आल्यावर वानप्रस्थाश्रमाचा आश्रय घ्यावा. शेवटी सन्यास घ्यावा. या अध्यायात प्रत्येक आश्रमात कसे रहावे याचे मार्गदर्शन केले आहे.
ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व यती हे चार आश्रम गृहस्थाश्रमाधिष्ठित आहेत.
धैर्य, क्षमा, दम अस्तेय, सुचिता, इंद्रियनिग्रह, शास्त्रज्ञान, आत्मज्ञान, सत्य, अक्रोध ही दहा धर्मलक्षणे आहेत. यांच्या अनुसरणानेच मोक्षलाभ होतो.

वाङ्मयमाहिती

प्रतिक्रिया

स्वधर्म's picture

24 Oct 2017 - 12:53 pm | स्वधर्म

तुमच्या चिकाटीला मनापासून दाद देतो. अार यू सिईंग एनी लाईट अॅट द एंड अाॅफ द टनेल?

स्वधर्म's picture

24 Oct 2017 - 12:52 pm | स्वधर्म

तुमच्या चिकाटीला मनापासून दाद देतो. अार यू सिईंग एनी लाईट अॅट द एंड अाॅफ द टनेल?

मारवा's picture

24 Oct 2017 - 2:40 pm | मारवा

When walking through the 'valley of shadows,' remember, a shadow is cast by a Light.
Austin O' Malley

गामा पैलवान's picture

24 Oct 2017 - 4:53 pm | गामा पैलवान

Duishen,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला.

१.

तेंव्हा १०० कोटीच्या मिथकाबाबत आपणास शुभेच्छा!

माझं १०० कोटींचं ओझं तुम्ही तुमच्या डोक्यावर घेतल्यानिमित्त आभार. असेच मला सहाय्य करत जा.

२.

आपल्या एका कमेंट मधे आपण समस्त महिलावर्गाबाबत जे उद्गार काढले ते आपल्या विचारशैलीला अनुकूल असेच आहेत...

ते भाष्य काय आहे ते कळेल काय? तसेच त्यातून माझी कोणती विचारधारा प्रकाशित होते आहे तेही कळेल काय? गैरसमज झालेला असल्यास मी स्पष्टीकरण देण्याचा यथायोग्य प्रयत्न करेन.

३.

तुमची हिंदूची व्याख्या काय?

सत्य एक असून अनेक प्रकारे व्यक्त होतं. हे विधान ज्याला मान्य आहे तो हिंदू. अशी माझी हिंदुत्वाची व्याख्या आहे.

४.

मिडिया कुणाच्या हातात आहे याबाबत आपल्या विधानाने नि:शंक झालो.

देशद्रोही अफजल गुरू आणि याकूब मेमनसाठी गळा काढणारे हेच मिडियावाले ब्राह्मणांना कशासाठी एव्हढी प्रसिद्धी देताहेत? जनतेच्या मनात भयगंड उत्पन्न करायलाच ना?

५.

मग हे १०० कोटी आले कुठून?

१२५ कोटींमधले १९.५ % ( = सुमारे एक पंचमांश = २५ कोटी) कमी केल्यावर उरतात ते १०० कोटी.

१९.५ % हा तुमचा आकडा आहे. १२५ कोटी ही भारताची २०१७ ची अंदाजे लोकसंख्या आहे.

आ.न.,
-गा.पै.

आपल्या एका कमेंट मधे आपण समस्त महिलावर्गाबाबत जे उद्गार काढले ते आपल्या विचारशैलीला अनुकूल असेच आहेत.

मारवा यांना प्रतिसाद - 20 Oct 2017 - 8:59
या ठिकाणी मुद्दा क्र. ४, ५, ७, मधील आपले मत वाचावे. तसेच "...आणि ह्या दिवसात किती लोकांना ब्राह्मण्याचा हा उदोउदो - आणि तोहि मनुस्मृतीच्या आधाराने केलेला - रुचेल? याचे उत्तर आपण "मला रुचेल. माझ्यासोबत १०० कोटी हिंदूंनाही रुचेल..." असे दिले आहे. दोन्ही उत्तरातून आपण आपली प्रतिमा मनुस्मृती मानता आहात अशी समोर ठेवत आहात... माझा गैरसमज झाला असल्यास कृपया दूर करण्यास मदत करावी.

१९.५ % हा तुमचा आकडा आहे. १२५ कोटी ही भारताची २०१७ ची अंदाजे लोकसंख्या आहे.

शासनाची आकडेवारी १९.५% आहे माझी आकडेवारी ५१.७% आहे..

गामा पैलवान's picture

24 Oct 2017 - 4:56 pm | गामा पैलवान

मारवा,

वसिष्ठ व मंदपाल या वाघांनी गवत खाऊनही ?

ब्राह्मण भोगलोलुप झाल्यास त्यास वाघाने गवत खाणे म्हणता येईल. प्रस्तुत विवाहांत भोगलोलुपता नसल्याने हे तृणभक्षण नव्हे. पुण्यश्लोक माधवीने गालव ऋषींची इच्छापूर्ती व्हावी म्हणून स्वत:हून चार विविध राजांशी एकवार्षिक विवाह करून चार सुलक्षणी पुत्र उत्पन्न केले. द्रौपदीस पाच पती होते, जे मनुस्मृतीस अपेक्षित नाही.

फार काय अगदी विवाह करायचीही आवश्यकता नाही. पराशर ऋषींनी मत्स्यगंधेशी फक्त शय्यासोबत केली होती. त्यातून महर्षी व्यास जन्मास आले. सांगायचा मुद्दा काये की वसिष्ठ, मंदपाल, पराशर, मत्स्यगंधा, माधवी, द्रौपदी हे गवतखाऊ भोगलोलुप नव्हेत.

आ.न.,
-गा.पै.

मारवा's picture

24 Oct 2017 - 9:47 pm | मारवा

तुम्ही म्हणता

पराशर ऋषींनी मत्स्यगंधेशी फक्त शय्यासोबत केली होती. त्यातून महर्षी व्यास जन्मास आले. सांगायचा मुद्दा काये की वसिष्ठ, मंदपाल, पराशर, मत्स्यगंधा, माधवी, द्रौपदी हे गवतखाऊ भोगलोलुप नव्हेत.

पराशर ची कथा महाभारतात आणि त्याहुन अधिक डिटेल मध्ये देवी भागवतातील द्वितिय स्कन्धातील दुसया प्रकरणात येते.

पराशरमुनी एक दिवस तिर्थयात्रा करत असतांना यमुनेच्या किनार्यावर येतो आणि तेथील कोळ्याला नदी पार करुन देण्याची विनंती करतो. तो कोळी आपल्या मुलीला मत्स्यगंधेला या पराशराला नावेतुन नदी पार करुन देण्यास सांगतो. नावेतुन जात असतांना पराशर तिच्यावर मोहित होतो. ( या अगोदर पराशराने कधीही मत्स्यगंधेला बघितलेले नाही सर्वस्वी अनोळखी स्त्री ला पहील्याच भेटीत वयात अंतर असुनही ( ओळखच नसल्याने प्रेम वगैरे असण्याचीही शक्यता नाही ) पराशराने कामुकतेत संयम सोडलेला आहे
मुळ संबंधित संस्कृत श्लोकाचे इंग्रजी भाषांतर सोबत देत आहे .

Once on an occasion, the highly energetic Muni Parāśara went out on pilgrimage and arrived on the banks of the Yamunā, and spoke to the religious fisherman who was taking his food then thus :-- “O fisherman! Take me on your boat and carry me to the other side of the river.”

Hearing this, the fisherman spoke to the beautiful girl Matsyagandhā :-- “O beautiful smiling one! This religious ascetic intends to cross the river; so take the boat and carry him to the other bank.” Thus ordered by her father, the exceedingly beautiful Vasu girl Matsyagandhā began to steer the boat whereon sat the Muni. Thus while the boat was sliding on the waters of the Yamunā; the Muni Parāśara saw the beautiful-eyed damsel Matsyagandhā and became as if under the command of the great destiny, greatly enamoured of her.

मत्स्यगंधेशी संभोग करण्यास आतुर झालेला पराशर तिचा हात धरतो. यावर मत्स्यगंधा काय पराशराला काय म्हणते बघण्यासारखे आहे. ती पराशराला म्हणते " तुझ्यासारखा धर्म जाणणारा तु हे मदनबाणाने घायाळ होऊन काय करत आहेस ? ही तुझी माझ्याप्रती निर्माण झालेली वासना तुला तुझ्या कुटुंबाला तुझ्या धर्माच्या ज्ञानाला तुझ्या तपस्येला लायक आहे का शोभा देते का ? तुझ्या सारखा वसिष्ठाच्या महान कुलात जन्मलेला ब्राह्मणाला हे योग्य वाटते का ?

He desired to enjoy Matsyagandhā, full of youth and beauty and with his right hand caught hold of her left hand; the blue coloured Matsya looking askance spoke out smilingly in the following words :-- O knower of Dharma! What are you going to do, pierced by the arrows of Cupid? What you desire now, is it worthy of your family or your study of the Śāstras or worthy of your Tapasyā; see, you are born in the line of Vaśiṣṭha and you are well known as of good character. O best of Brāhmiṇs! You are quite aware that the attaining of a man-birth in this world is very rare; and over and above this the attainment of Brāhminhood is, as far as my knowledge goes, particularly difficult.

त्यापुढे अजुन स्पष्टपणे ती स्वत:च्या शरीराला येत असलेल्या माशाच्या वासाचा ही हवाला देत त्याला रोखु पाहते. ती म्हणते
तु कुलाने द्न्यानाने सर्वश्रेष्ठ आहे तुला धर्माचे ज्ञान आहे तरीही तु असे कसे करु पाहतो आहेस जे आर्याला शोभा देत नाही. माझ्या सर्वांगाला माशाचा वास येत असुनही तुला असे करावेसे का वाटत आहे ?

11-14. O Prince of Brāhmiṇs! You are the foremost and best as far as your family, goodness, and learning in the Vedas and other Śāstras are concerned; you are well versed in Dharma; how is it, then, that you are going to do this act, not worthy of an Ārya, though you see me possessed of this bad smell of fish throughout my body.

तुला माझ्यात असे काय आढळले की तु माझ्याशी संग करण्यास आतुर होउन माझा हात धरत आहेस ? इतके बोलुन ती स्वत:शी विचार करते की " अरेरे ह्या ब्राह्मणाचे डोके फ़िरलेले आहे हा मला भोगण्याच्या नादात नाव बुडवुन टाकेल हा इतका कामातुर झालेला आहे की याला थांबवणे जगात कोणालाही अशक्य आहे. "
अखेर ती थकुन म्हणते की " मुनिवर तुम्ही मला कमीत कमी मला तुम्हाला पलीकडच्या किनार्यावर तरी घेउन जाऊ द्या मग तुम्हाला काय हवे ते मजसोबत करा "

O one of unbaffled understanding! O best of twice-born! What auspicious sign do you see in my body that you are stricken with passion on my account that you have caught hold of my hand to enjoy me? Why have you gotten your own Dharma? Thus saying, Matsyagandhā thought within herself :-- “Alas! This Brāhmiṇ has certainly lost his brains in order to enjoy me; certainly he will be drowned just now in his attempt to enjoy me in this boat; his mind is so much agitated with the arrows of Cupid that no body, it seems, can act against his will.”

Thus thinking Matsyagandhā spoke again to the Muni :-- “O highly fortunate one! Hold patience! let me first take you to the other side of the river; then you may do as you please.”

हे मत्स्यगंधेचे समजुतीचे चार शब्द ऐकुन पराशर तिचा हात सोडत थोडा वेळ स्वस्थ बसतो.

पण थोडाच वेळाने पराशर पुन्हा कामविव्हल होऊन उठतो व मत्स्यगंधेचा हात पुन्हा धरतो. यावर मत्स्यगंधा त्याला विंनंती करते मुनिवर थांबा कृपया रात्रीचा काळोख होइपर्यंत तरी थांबा. सर्वजण आपल्याकडे बघत आहेत माझे वडील ही किनार्य़ावरुन आपल्याला पाहत आहेत या सर्वासमोर तरी असे रानटी कृत्य करु नका जे मला अजिबात सहन होणार नाही. वडिलधारे ज्ञानी लोकांनी दिवसा ढवळ्या संभोग करण्याला पाप म्हटलेले आहे. रात्र हीच संभोगासाठीची योग्य वेळ आहे. शिवाय इतक्या लोकांच्या नजरेसमोर संभोग करणे ? तुमच्या वासनेला आवर घाला किमान काही काळासाठी तरी आवर घाला "

20-34. Then the auspicious Satyavatī addressed Parāśara Muni, resolved to enjoy her, thus :-- “O Muni! Behold! all are looking at us; my father too, is there on the bank of the Yamunā; so, O Muni! wait till night this beastly act before all is highly unsatisfactory to me. The wise persons declare it a great sin to commit sexual intercourse during day they have ordained night time as the best time of intercourse for men not the day time; the more so that many person’s eyes are in this direction. So, O intelligent one! hold on your passion for a while; for the blame pronounced by the public is horrible.” Hearing these reasonable words, the liberal minded Parāśara created, by his influence of Tapasyā, a dense fog so that both the banks of the Yamunā became covered with darkness.

एका मुलीला जिला आयुष्यात अगोदर कधीही पाहीलेले नाही, जिच्याशी कुठल्याही प्रकारचे प्रेमसंबंध प्रस्थापित झालेले नाही, जिच्या शरीराला माशाचा वास येत असुनही , ज्या मुलीने वारंवार पराशराला त्याच्या कुलाची तपस्येची धर्माची आठवण करुन देऊनही, जो स्वत:च्या कामवासनेला आवरु शकत नाही. ज्याचा संयम नाव पलीकडच्या किनार्याला लागेपर्यंतही टिकु शकत नाही, जो सरळ हात धरुन संभोगासाठी आतुर होतो, जो दिवसा ढवळ्या मुलीचे वडील व इतर लोक पाहत आहेत याचेही भान कामाच्या आवेगात विसरतो, जो काहीही करुन एका अनोळख्या मुलीला पाहताक्षणीच संभोगाला इतका जबर आतुर झालेला आहे तो

पराशर हा भोगलोलुप नव्हता असे तुम्ही म्हणता तेव्हा त्या विधानाला काही अर्थ तरी असतो का ?
पराशराने फ़क्त शय्यासोबत केली होती असे तुम्ही म्हणता तेव्हा भोगलोलुप नव्हता तर पराशर काय होता नेमका ?
पराशरा इतका डेस्परेट कामावेगात वाहत जाणारा आपल्या कुल तपस्ये इ. ची आठवण करुन देऊनही न बधणारा धड किनारा येइपर्यंतही संयम न बाळगु शकणारा भोगलोलुप नाही तर काय संयमाचा पुतळा होता असे तुम्हास म्हणावयाचे आहे काय ?

व असे करुन तुमच्याच म्हणण्याप्रमाणे या द्विजाने गवत खाल्ले की नाही ? व मनुच्या म्हणण्याप्रमाणे
मोहामुळे हीन जातीच्या स्त्रीशी विवाह करणारे द्विज संतानासहित आपल्या कुलासच तात्काल शूद्रत्वास पोचवितात ॥१५॥
तसा हा पराशर शुद्रत्वास पोहोचला का ?

संदर्भ तपासुन पाहण्यासाठी

मुळ संस्कृत ग्रंथ इथे मिळु शकतो
https://archive.org/details/SrimadDeviBhagavatamSanskrit
मुळ संस्कृत श्लोकांच्या इंग्रजी भाषांतरासाठी
https://www.wisdomlib.org/hinduism/book/devi-bhagavata-purana/d/doc57122...

आणखी संदर्भ
https://en.wikipedia.org/wiki/Satyavati

गामा पैलवान's picture

25 Oct 2017 - 1:25 am | गामा पैलवान

मारवा,

तुमचा प्रश्न अगदी समर्पक आहे.

पराशराने फ़क्त शय्यासोबत केली होती असे तुम्ही म्हणता तेव्हा भोगलोलुप नव्हता तर पराशर काय होता नेमका ?

मूळ महाभारतात थोडा वेगळा प्रसंग आहे. इतरेजन बघताहेत हे पाहून पराशर ऋषींनी योगसामर्थ्याने धुके व अंधार निर्मिला.

माझ्या आकलनाप्रमाणे पराशर ऋषींचा बीजसंयोग मुहूर्त टळून चालला होता. म्हणून त्यांना घाई झाली होती. ही घाई अन्यांना कामविव्हलता वाटली. पुढे व्यासांचा जन्म झाला यातून पराशर ऋषींचं रेत उच्च योग्यतेचं असल्याचं दिसतं. असा ऋषी वाट्टेल त्या स्त्रीकडे रतिदान मागणार नाही.

आ.न.,
-गा.पै.

आ.न.,
-गा.पै.

मारवा's picture

25 Oct 2017 - 7:23 am | मारवा

माझ्या आकलनाप्रमाणे पराशर ऋषींचा बीजसंयोग मुहूर्त टळून चालला होता. म्हणून त्यांना घाई झाली होती. ही घाई अन्यांना कामविव्हलता वाटली.

गामाजी आपले एक एक प्रतिसाद जस जसे वाचत गेलो मला हा शेर आठवला

सरकती जाये है रुख से नक़ाब आहिस्ता आहिस्ता

मारवा's picture

25 Oct 2017 - 7:25 am | मारवा

असो

गामा पैलवान's picture

25 Oct 2017 - 12:56 pm | गामा पैलवान

मारवा,

जर व्यासांसारख्या विद्वानाची उत्पत्ती होणार असेल तर रुखावरून नकाब सरको वा न सरको. काही फरक पडंत नाही.

आ.न.,
-गा.पै.