मनुस्मृति भाग (३)

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
12 Aug 2017 - 3:30 pm

मनुस्मृति भाग ३
पहिल्या दोन भागात आपण १२ अध्यायातील काही श्लोकांचे भाषांतर पाहिले. त्यात एक भाग जाणीवपूर्वक गाळला होता; तो म्हणजे शूद्रासंबंधी मनूचे विचार. आज आपण त्या संबंधातील काही श्लोक पहाणार आहोत. मनूचे विचार वीसाव्या शतकात पटणारे नाहीत. पण मनुस्मृतीवर विश्वास ठेऊन, त्याप्रमाणे वागणारे अनेक लोक भारतात होते. दलितांना मिळणारी वागणुक अमानुष अशीच होती. म्हणून १९२७ साली डॉ. बाबासाहेब अंबेडकरांनी प्रथमच मनुस्मृति जाहीरपणे जाळली. या घटनेची तुलना मुसलमान आक्रमकांनी नालंदा विद्यापीठातील ग्रंथसंपदा जाळली त्याच्याशी केली गेली पण ’ज्याचे जळते, त्यालाच कळते" हेच सत्य. आजही जाळली जाते पण फरक एवढाच की डॉ. साहेबांची कृती राजकारणाचा भाग नव्हता तर आज जे.एन.यु, वा तत्सम ठिकाणी जाळली जाते ती केवळ राजकारणाच्या उद्देशाने केली जात असावी असे वाटते. या तीन लेखांतील उद्देश केवळ माहिती असा असल्याने काही टीकाटिपणी नाही.

लोकवृद्धीसाठी ब्रह्माने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची उत्पती अनुकरमे मुख, हात, मांडी व पाय यापासून केली.
नाव ठेवतांना ब्राह्मणाचे पहिले नाव मंगलसूचक, क्षत्रियाचे बलसूचक, वैश्याचे धन-संपतीसूचक व शूद्राचे निंदित (तिरस्करणीय) ठेवावे.
दुसरे नाव ब्राह्मणाचे सुखकारक, क्षत्रियाचे रक्षणकर्ता, वैश्याचे वर्धमान व शूद्राचे सेवाकर्ता असे असावे.
शुद्रांकरिता यज्ञयागादी केल्यास उच्च कुलाचाही नाश होतो.
स्ववर्ण स्त्रीशी विवाह झाल्यावर ब्राह्मणाने दुसरा विवाह शूद्र स्त्रीशी केला तर तो ससंतान शूद्रत्व पावतो.
शूद्र स्त्रीचे अधरपान करणारा आणि तिच्या श्वासाने दुषित झालेला ब्राह्मण व त्याची संतती शुद्ध होत नाही.
ब्राह्मणाकरिता ब्राह्म, दैव, आर्ष आणि प्राजापत्य हे चार विवाह प्रशस्त मानले आहेत. क्षत्रियासाठी राक्षस व वैश्य-शूद्रासाठी आसुर.
पैसे घेऊन शिकवणारा, पैसे देऊन शिकणारा, शूद्राचा शिष्य आणि शूद्राचा गुरू यांना कुण्ड-गौलक म्हटले आहे.
(कुण्ड=जाराचा मुलगा, गौलक=जारापासून विधवेचा मुलगा)
शूद्राचा यज्ञ करणारा ज्या इतर ब्राह्मणांना स्प्रर्श करेल त्या ब्राह्मणांना, केलेल्या हव्य-कव्य दानाचे फळ दानकर्त्याला मिळत नाही.
वेदज्ञाता ब्राह्मण जर लोभाने शूद्राकडून दान घेईल तर तो कच्या घड्यात पाणी ठेवल्यावर घडा नष्ट होतो त्याप्रमाणे नष्ट होतो
डुक्कराने हुंगलेले, कोंबड्याच्या पंखाने, कुत्र्याने पाहिलेले किंवा भोजनकर्त्या ब्राह्मणाने कुत्र्यास पाहिल्याने जसे अन्न अग्राह्य होते तसे शूद्राने पाहिल्याने होते.
श्राद्धामध्ये ब्राह्मणभोजन झाल्यावर उरलेले अन्न शूद्राला दिले तर तो ब्राह्मण नरकात अधोमुख पडतो.
शूद्राचे अन्न ब्रह्मतेज नाहिसे करते.
ब्राह्मणाचे अन्न अमृतासारखे, क्षत्रियाचे दूधासारखे, वैश्याचे अन्नासारखे तर शूद्राचे अन्न रक्तासारखे असते..
पंचमहायज्ञ न करणार्‍या (शूद्राला याची परवानगी नाही) शूद्राचे पक्वान्न ब्राह्मणाने घेऊ नये. दुसरे भोजन उपलब्ध नसेल तर एका रात्रीला पुरेल एवढाच शिधा घ्यावा पण पक्वान्न कधीही घेऊ नये.
मृत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांना अनुक्रमे शहराच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेच्या दरवाज्यातून बाहेत काढावे.
स्वबांधव उपस्थित नसतील तर मृत ब्राह्मणाला शूद्राद्वारे वेशीबाहेर नेऊ नये.
(द्विजसेवा आदि) यथाशास्त्र आचरण करणार्‍याया शूद्राला दर महिन्याला मुण्डण केले पाहिजे. ब्राह्मणाचे उच्छिश्ट खाल्ले पाहिजे.
(ब्राह्मणाचे आचरण करणारा वा धर्मात्मा) शूद्र राजाने न्यायाधीश म्हणून नेमू नये.
ज्या राज्यात शूद्र नायाधीश म्हणून काम करतात ते राज्य चिखलातील गायी प्रमाणे बुडते.
जिथे बहुसंख्येने शूद्र व नास्तिक रहातात ते राज्य दुर्भिक्ष व रोगराईने नष्ट होते.
वारंवार खोटी साक्ष देणार्‍या वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र यांना दंड करून राज्यातून हाकलून द्यावे; ब्राह्मणाला दंड न करता फक्त हाकलून द्यावे.
ब्राह्मणाकडून दोन, क्षत्रियाकडून तीन, वैश्याकडून चार आणि शूद्राकडून पाच टक्के व्याज घ्यावे.
नीच जातीत उत्पन्न झालेल्या शूद्राने ब्राह्मणाला दारुण शब्दांनी संबोधित केल्यास शूद्राची जीभ कापावी.
शूद्राने त्रिवर्णांना जातीवाचक शब्द उच्चारून ( उदा. " अरे यज्ञदत्ता, तू नीच ब्राह्मण आहेस ’) अपमान केला तर त्याच्या तोंडात तापवून लाल केलेली लोखंडाची सळई कोंबावी.
अभिमानाने ब्राह्मणाला धर्मोपदेश करणार्‍या शूद्राच्या कानात व तोंडात गरम तेल ओतावे.
शूद्राने त्रिवर्णांपैकी कोणाला मारहाण केली तर ज्या अवयवाने (उदा. हात) केली तो तोडून टाकावा.
ब्राह्मणाच्या बरोबर एका आसनावर बसणार्‍या शूद्राला तापलेल्या तव्याबर दाबून बसवावे अगर त्याचे ढुंगण कापावे.
शूद्राने अभिमान धरून ब्राह्मणाचे केस पकडले किंवा त्यालाच पकडले तर राजाने त्याचे दोन्ही हात कापावेत.
शूद्र अपमान करण्याकरिता ब्राह्मणावर थुंकला तर त्याचे दोनही ओठ कापावेत. मुतला तर त्याचे लिन्ग कापावे. पादला त्रर ढुंगण कापावे.
मर्जीप्रमाणे वेतन देऊन किंवा न देता ब्राह्मणाने शूद्राकडून सेवा करून घ्यावी कारण ब्राह्मणांची सेवा करण्याकरिताच ब्रह्मदेवाने शूद्रांना निर्माण केले आहे.
मालकाने मुक्त केले तरी शूद्र दास्यत्वापासून मुक्त होऊ शकत नाही कारण ब्रह्मदेवाने त्याला दास्य करण्याकरिताच निर्माण केले आहे.

ब्राह्मण आपल्या दास शूद्राचे धन विनासंकोच घेऊ शकतो कारण शूद्राला स्वत:चे असे काही धन नसतेच. स्वामी त्याच्या धनाचाही स्वामी असतो.
ब्राह्मणाला चारही वर्णाच्या स्त्रीयांपासून संतती झाली असेल तर ब्राह्मणीच्या मुलाला तीन भाग, क्षत्रिय स्त्रीच्या मुलाला दोन भाग, वैश्य स्त्रीपासून झालेल्या मुलाला दीड भाग व शूद्र स्त्रीच्या मुलाला एक भाग असे संपत्तीचे विभाजन करावे.
जाणूनबुजून ब्राह्मणाला आर्थिक किंवा शाररिक त्रास देणार्‍या शूद्राचा वध हात-पाय कापून (हालहाल करून) मग करावा.
ब्राह्मणाची सेवा हेच शूद्राचे मुख्य काम आहे. इतर केलेल्या कर्माची फळे त्याला मिळत नाहीत.
यज्ञ पुरा करण्यात आर्थिक अडचण येत असेल तर शूद्राकडचे धन बलात्काराने किंवा चोरी करून मिळवावे.
परंतु त्याच्या कडून दान घेऊन यज्ञ करू नये इति.

शरद

वाङ्मयमाहिती

प्रतिक्रिया

माहितगार's picture

12 Aug 2017 - 6:59 pm | माहितगार

संपादकांनी धागा लेखक शरद यांचा मागिल प्रिय श्री स्वधर्म धागा लेख याच लेखमालेस जोडावा असे वाटते.

माहितगार's picture

12 Aug 2017 - 8:22 pm | माहितगार

मी पहिल्या भागातील एका प्रतिसादात नोंदवल्या प्रमाणे मूळ संस्कृत श्लोक, -कोणत्या संस्कृत शब्दांच काय अर्थ घेतला आहे या बाबत टिपांचा अभाव- अनुवादात पारदर्शकता पोकळी राहिली आहे. हे या धागा लेखात अधिक प्रकर्षाने जाणवले.

खास करुन जेथे टिकाकारांचा प्रतिवाद हा उद्देश्य आहे किंवा विवाद्य विषयाबाबत लेखन तेथे वस्तुनिष्ठतेचा निकष प्रतिवादीने अधिक कठोरपणे पाळणे श्रेयस्कर असावे. हि लेखमाला सर्वसामान्य वाचका करता आहे म्हणून ते टाळले आहे असे म्हणणे, वाचक सर्वसामान्य आहे म्हणून वस्तुनिष्ठतेशी तडजोड करता येते अथवा सर्वसामान्य वाचकाच्या विवेकावर अविश्वास दाखवणारे म्हणून हा धागा लेखकाचा दृष्टीकोण पटणारा वाटला नव्हता.

सोमनाथ खांदवे's picture

12 Aug 2017 - 8:40 pm | सोमनाथ खांदवे

यकदम तिखाट इशय हाये

माहितगार's picture

12 Aug 2017 - 8:52 pm | माहितगार

लोकवृद्धीसाठी ब्रह्माने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची उत्पती अनुकरमे मुख, हात, मांडी व पाय यापासून केली.

साधारणतः याच अर्थाचे सुक्त ऋवेदातील पुरुष सुक्तातही असावे. ते ऋग्वेदात खूप बरेच उशीरा (कदाचित प्रक्षिप्त) स्वरुपात समाविष्ट करण्यात आले असावे असे काही अभ्यासकांचे मत वाचल्याचे आठवते.

ग्रीक तत्ववेत्ता प्लेटोने लोकांचे गोल्डन, सिल्व्हर, ब्रॉन्झ, आयर्न असे विभाजन करण्या/असण्या बाबत त्याच्या Cratylus ग्रंथातून लेखन केले असल्याचे संदर्भ दिसतात. पण ग्रीस मध्ये प्रत्यक्षात वर्ण व्यवस्था राबवली गेली नाही. भारतातील वर्ण विचार ते ग्रीक विचार यात परस्पर काही देवाण घेवाण झाली का या बाबत आजतरी इतिहास मूक दिसतो.

विशुमित's picture

12 Aug 2017 - 9:05 pm | विशुमित

ही मनूच्या टॉयलेटचे दुकान तिकडे नागपूर ला पैसे लावून चालू करा.

माहितगार's picture

12 Aug 2017 - 9:35 pm | माहितगार

जे एन यू , दिल्ली विद्यापीठ जादवपूर विद्यापीठ-पश्चिम बंगाल येथील काही डावी प्राध्यापक मंडळी राष्ट्र विभाजनाच्या विचारांना खतपाणी घालतात ते निषेधार्हच आहे त्याचा स्वतंत्र निषेध केला पाहीजे.

दलितांना आपल्या प्रभावा खाली ओढण्यासाठी मनुस्मृतीतील विषमतावादी श्लोकांचे प्रतिकात्मक दहन राजकारणार्थ ते करत असतील तर मनुस्मृतीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करुन त्यांच्या राजकारणाला शह देता येऊ शकत नाही उलटपक्षी, आपणही मनुस्मृतीतील विषमतेचे समर्थन करत नसल्याचे स्पष्टपणे मांडण्यानेच राजकारणाला शह दिला जाऊ शकतो किंवा कसे.

या धागा लेखाता धागा लेखकाने विषमतेचे समर्थन टाळले आहे, तेवढीच माझी प्रतिवादाची संधी कमी झाली. या बाबत धोंडो केशव कर्वेंच्या पुढील पिढीने एका अस्पृश्य विधवा स्त्रीला आश्रमात न घेतल्या बद्दल चूक स्विकारली तर धोंडो केशव कर्वेंच्या समाज कारणाचा नकारात्मक खीस कमी पडतो. लोकमान्य टिळकांच्या मुलांनी नि:संदिग्ध पणे सुधारणावादाची भूमिका घेतली तर टिकेची धार आपोआपच कमी होते.

मौज प्रकाशन सोबत राम पटवर्धन (मार्च २१, इ.स. १९२८ - मृत्यू : ठाणे, जून ३, इ.स. २०१४) ) नावाचे साहित्यिक विश्वात सुपरिचीत संपादक होते. त्यांचा एक किसा इथे विशेषत्वाने नमुद करण्यासारखा आहे.

राम पटवर्धन यांना आवडलेले लेखनच सत्यकथेच्या माध्यमातून छापले जात असे, असा आरोप करून लघुनियतकालिकांतील लेखकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. सत्यकथा ही सदाशिवपेठी आहे, असे आरोप त्यांच्यावर झाले. वेळप्रसंगी राजा ढाले वगैरे मंडळींनी सत्यकथेच्या अंकाच्या प्रतींचे प्रातिनिधिक दहन केले. [६] पण राम पटवर्धन खुल्या मनाचे संपादक होते, अंकाचे दहन करू इच्छिणारे लोक सत्यकथेच्या प्रती आणण्याचे विसरले तर राम पटवर्धनांनी कार्यालयातील सहकार्‍यांमार्फत नाराज आंदोलक मंडळींना सत्यकथेच्या प्रतीही पाठवल्या.

संदर्भ

डॉ. बाबासाहेब अंबेडकरांनी प्रथमच मनुस्मृति जाहीरपणे जाळली. या घटनेची तुलना मुसलमान आक्रमकांनी नालंदा विद्यापीठातील ग्रंथसंपदा जाळली

या दोन्हीत तत्वतः फरक आहे. बाबासाहेबांचा उद्देश्य विषमतेचा प्रतिकात्मक निषेध होता -त्यांचा भर मुद्दे तार्कीक उणीवेचे मुद्दे तर्कसुसंगतपणे खोडण्यावर होता. सोबतच ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचेही समर्थक होते. 'माझ्या विचारांवर टिका करा पण अनुल्लेखीत ठेऊ नका' असा त्यांचा मोकळा दृष्टीकोण होता.

वृत्तसंस्थाही बर्‍याचदा पूर्ण बातमी देत नाहीत मनुस्मृतीचे दहन करणार्‍यांनी बर्‍याचदा मोजक्या विषमता वादी श्लोकांचे दहन केले असते आणि वृत्तमाध्यमे त्याचे मनुस्मृतीचे दहन केले अशी अल्प दिशाभूल करणारी बातमी देतात असेही काही वेळा पहाण्यात येते.

नालंदा विद्यापिठातील जुन्याकाळातील असो अथवा अलिकडे सिरीया आणि इराक विद्यापिठातील ग्रंथ जाळण्याचे मुलतत्ववाद्यांचे प्रताप असोत त्यांच्या ग्रंथ दहनाचा उद्देश अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दमन करण्याचा आहे. त्या मुळे या दोन्ही घटना एक समान आहेत असे म्हणता येत नाही.

एखाद वेळेस प्रतिकात्मक दहन ठिक पण तिच ती गोष्ट पुन्हा पुन्हा केली की त्याचा सत्याग्रहाचे अस्त्र म्हणून प्रभाव कमी होतो हे ग्रंथ दहन करणार्‍यांनी लक्षात घ्यावयास हवे. दुसरे भर विचारांचा प्रतिवाद विचारांनी करण्यावर असावयास हवा -कारण त्याचाच परिणाम दिर्घगामी असू शकतो.

मी ग्रंथातील विषमतेच्या समर्थनावर मनमोकळी टिका विचारांचा प्रतिवाद विचारांनी करण्याचा प्रयत्न लेखमालेच्या आधीच्या भागातून केला आहेच त्यामुळे त्याची पुनरावृत्ती टाळत आहे.

माहितगार's picture

12 Aug 2017 - 9:45 pm | माहितगार

डॉ. आंबेडकर तर आहेतच पण सावरकर ते कुरुंदकर आणि इतर अनेक अभ्यासकांनी मनुस्मृतीतील विसंगतींचा आणि विषमतेचा तर्कपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आढावा घेतलेला आहे. त्याचा आढावा या लेखमालेतून आलेला दिसत नाही अथवा त्यांचा अप्रत्यक्ष प्रभावही फारसा कुठे जाणवला नाही. आतापर्यंतच्या जाणकार अभ्यासकांच्या मांडणीचा तर्कसुसंगत आढावा घेणार्‍या एखाद्या लेखमालिकेस मराठी आंतरजालावर अद्याप वाव असावा असे वाटून गेले.

विशुमित's picture

13 Aug 2017 - 12:10 am | विशुमित

मनुस्मृती धागा काढण्यामागचा तुमचा नक्की हेतू काय आहे? हे अजून अनुत्तरीतच आहे.

उद्देश अगदी साधा होता.
माझी समजुत :
(१) मनुस्मृति हा बहुचर्चित, वादग्रस्त ग्रंथ आहे.
(२) येथील बहुसंख्य सभासदांनी हा ग्रंथ वाचलेला नाही.
(३) जर थोड्क्यात ( याचा माझ्या मते अर्थ १५-२० मिनटात वाचून होणारा) जर कोणी परिचय करून दिला तर तो बर्‍याच जणाना आवडेल.
(४) कोठल्याही ग्रंथाबाबत/विचाराबाबत/कायद्या बाबत/शोधाबाबत/ इत्यादी इत्यादीबाबत आपले मत ठरवावयाच्या आधी त्याची निदान तोंडओळख असावी असे बहुसंख्य सुजाण सभासदांना वाटत असावे.

माहिती करून देणे हा एकमेव उद्देश. यात कोठेही माझे मत देण्याचा संबंध नाही असे मला वाटते. त्यामुळे लेख "माहिती",म्हणून "जनातले, मनातले" यात टाकला. काथ्याकूटमध्ये नाही. मी कै.कुरुंदक्रर किंवा कै.विष्णुशास्त्री बापट नाही. मी काय मत देणार वा वाद घालत बसणार ?
तरीही लेखांत तसे वाटले म्हणून श्री. स्वधर्म यांनी लिहले की "याचे नियम असणे गरजेचे असते, नव्हे समाज त्याशिवाय राहू शकत नाही " हे मनुस्मृतीत नाही; हे माझे मत आहे..यावरून मला वर्ण व्यवस्था मान्य आहे." वर्ण याचा अर्थ समाजाचा एक गट त्याला ब्राह्मण. क्षत्रिय,,काही म्हणा असेच गट म्हणजे पति-पत्नी, राजा- प्रजा.लक्षात घ्या इथे विषय आहे स्मृति म्हणजे काय ? स्मृति म्हणजे घटना. मनु अजुन आलेलाच नाही .तर हा एक गैरसमज. याचा मनुस्मृतीच्या "माहिती" शी काहीही संबंध नव्हता म्हणून मी एक नवीन धागा काढला.
इथे मी थोडे स्वातंत्र्य घेतले. डॉ. अंबेडक्रर यांनी घटना लिहली. पण घटना अपरिवर्तनीय नाही व घटना काही असली तरी समाज त्याप्रमाणे वागतोच असे नाही एवढे सांगण्यापुरते "दलितांवरील अन्याय." अजुन आहेतच हे लिहले.
या इथेच श्री.माहीतगार यांच्या प्रतिसादांबद्दल. संस्कृत श्लोकांबद्दल माझे मत मी दिलेच आहे. आता माझे भाषातर "बरोबर" आहे की नाही ? आपण ज्या श्लोकांच्या भाषांतराबद्दल साशंक आहात वा आपल्याला पारदर्शकतेची पोकळी दिसते ते संस्कृत श्लोक व त्याचे आपणास अभिप्रेत असलेले भाषांतर द्या. मी आधीच येथे ते मान्य करतो. " माझी यत्ता कंची ? " हे तर मी केव्हाच सांगून मोकळा झालो आहे.
हे लेख विकीकरता नाहीत. इथल्या मित्रमंडळींकरता आहेत. पाचशेंपैकी चारशे नव्वद वाचून पुढे जात असतील तर मी "समाधानी " आहे.
शरद

पिलीयन रायडर's picture

13 Aug 2017 - 5:38 am | पिलीयन रायडर

मी पहिल्यांदाच मनुस्मृतीतले श्लोक वाचतेय. हे खरंच वाईट आहे.

बादवे.. मनु ब्राह्मण होता का?

होय पि. रा. जी.!
शिवाय प्रचलित व्यवस्थेनुसार ब्राह्मण सोडून इतर कुणालाही वाचण्या-लिहिण्याचा अधिकार नव्हता!

माहितगार's picture

22 Oct 2017 - 8:54 pm | माहितगार

मनु ब्राह्मण होता का ? या प्रश्ना मागची सुप्त भुमीका नजरेतून निसटते. या प्रश्न विचारण्या मागे जे हेतु आहेत त्यात पहिला हा असावा कि पौराणिक उल्लेखानुसार पहिला मनु - स्वयंभुव मनु ह्याची ब्रह्माने निर्मिती केली वर्णांची निर्मिती त्याच्या पुढील पिढ्यांपासून झाली म्हणजे टेक्नीकली तो निर-वर्णीय होतो. किंवा काही जणांना या प्रश्ना मागे श्रद्धदेव मनुचा -सध्याच्या युगाचा मनुचा- उल्लेख करावयाचा असतो. जो राजा म्हणजे टेकनीकली क्षत्रीय होता. म्हणजे एकुण मनुस्मृतीत काही चुक लिहिले असेल तर त्याचे खापर ब्राह्मणांवर फोडू नये -किमान सध्याच्या पिढीवर फोडू नये हा उद्देश या प्रश्ना मागे असू शकतो. चुभूदेघे.

आपण लिहिण्या वाचण्याचा अधिकार नव्हता हे पुर्णतः बरोबर ठरत नाही. संस्कृत वेदाध्यायना तेही प्रत्यक्ष केवळ शुद्रांना नाकारले गेले होते. (परसुरामाचे नाव जोडून क्षत्रिय आणि वैश्यांनाही त्याच मापाने मोजण्याचा उद्योग नंतर केला गेला त्यांनाही अंशतः अंशतः यासाठी की हा दृष्टीकोण प्रबळ असलेल्या ठिकाणी अधिकार नाकारला गेला- विस्तार भयास्तव इथेच ब्रेक) पण प्रॅक्टीकली तत्कालीन अध्यापनाचा मुख्य विषय नाकारला गेला म्हणजे अप्रत्यक्षपणे लेखन-वाचन नाकारले गेले असे अप्रत्यक्षपणे होतेच.

म्हणजे एकुण त्यांना अपेक्षीत दिशेने अर्ग्युमेंट गेली आणि कुणि लिहिलेय हा विषय तुम्ही चिवडत बसला की, मनुस्मृतीवरील मुख्य आक्षेप चर्चे आड होतात. त्यामुळे प्रत्यक्षात कुणि लिहिल , लिहिल त्यानेच सुरवात केली की तकालीन समाजातल्या चालू रितींच केवळ समर्थन केल या वादात न पडता नेमक्या मजकुरातील नेमक्या विषमता, आणि त्या विषमता कशा स्पृहणीय नाहीत हा फोकस न ढळणे अधिक बरे किंवा कसे.

मनुच्या पुरातनते बाबत (अनै)तिहासीक बाजू ज्या अशा सर्व साधारण चर्चातून सुटतात त्यात, मन-मानव हे उल्लेख केवळ ऋग्वेदात नाहीत तर इतर इंडो-युरोपीयन भाषातूनही मॅन सदृष्य शब्दांचा वापरही तेवढाच जुना असावा म्हणजे निश्चित नाही पण बहुतेक करून मनुस हा शब्द ऋग्वेद पुर्व प्रोटोइंडोयुरोपीयनही असू शकतो. इंटरेस्टींगली मनु बाबतच्या कथा बहुधा पुराणकाळापासून येतात ऋग्वेदात मानव शब्द दिसत असला तरी त्याचे महत्व तेवढे नसावे म्हणजे एकुणच पुराणातील मनु कथा ही प्रक्षिप्त किंवा काल्पनिक असू शकेल का? आणि पात्र काल्पनिक असेल तर कोणत्या वर्णाचे असेल त्याने काय फरक पडतो ? असो.

बापरे, असले काही त्यात असेल असे वाटले नव्हते. धागा काढून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

जेम्स वांड's picture

13 Aug 2017 - 8:00 am | जेम्स वांड

लेखकांनी लेखनाचा पुरेपूर आनंद लुटलेला दिसतोय :)

मी या लेखमालेच्या पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे, मनुस्मृतीत नक्की काय मह्टले आहे हे जाणून घेण्यासाठी याचा उपयोग निश्चितच आहे. मनुने लिहिलेले हे नियम समाजात मान्य आणि प्रचलित होते ही भारतिय समाजासाठी लज्जास्पदच बाब आहे. हे सगळे नियम आज अस्तित्वात असण्याच्या लायकीचे नाहीत. हिंदू समाजाने मनुस्मृती पूर्णपणे नाकारायला हवी. मनुस्मृती इतकी अन्याय्य आणि घृणास्पद गोष्ट आहे हे लोकांना कळले तरी ते मनुस्मृती जाळण्यासारखेच आहे असे मला वाटते.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2017 - 11:46 pm | अत्रुप्त आत्मा

जी लोकं हा ग्रंथ त्या काळाशी सुसंगत होता किंवा तेंव्हा योग्य होता , असं मत देतात ते वरिल लेख वाचून तेच मत परत देण्यास धजावतील काय?

एकदा सर्व जुन्यांचे एकमत च होते की किमान काही जुन्यांचे ( जरी अलीकडील जुने असले तरी आजच्या काळाच्या तुलनेने फारच जुने असे काही )
मत विरोधात होते हे तरी पडताळुन पाहायला हवे.

उदाहरणार्थ मनुचे हे रजस्वला मासिक पा ळीत असलेल्या स्त्री संबंधीचे यातुन मनुचा मासिक पाळी संदर्भातला दृष्टीकोन काय होता स्पष्ट आहे.

चाण्डालश्च वराहश्च कुक्कुटः श्वा तथैव च । रजस्वला च षण्ढश्च नैक्षेरन्नश्नतो द्विजान् ॥२३९॥
होमे प्रदाने भोज्ये च यदेभिरभिवीक्ष्यते । दैवे हविषि पित्र्ये वा तद् गच्छत्ययथातथम् ॥२४०॥

भोजन करणार्‍या ब्राह्मणांस चांडाल, वराह, कोंबडे, कुत्रे, रजस्वला व षंढ यांनी पाहू नये. ॥२३९॥
कारण अग्निहोत्रादि होमामध्ये, गाय, सुवर्ण इत्यादि दानामध्ये, आपल्या अभ्युदयार्थ केलेल्या ब्राह्मणभोजनामध्ये, दर्शपौर्णमासादि देवसंबंधी हवीमध्ये व श्राद्धादिकामध्ये जे केले जाणारे कर्म हे पाहतात ते सर्व व्यर्थ होते. ॥२४०॥

डुक्कर कुत्र्या सोबत रजस्वला स्त्रीची गणना करत तिच्या केवळ पाहण्यानेच श्राद्धादि केलेले कर्म व्यर्थ होते असे मनु एकीकडे म्हणतो.
आता मनु इतके जुने नाही पण तरीही ८००-९०० वर्ष जुने चक्रधर स्वामी मासिक पाळे संदर्भात काय म्हणतात ?

‘सर्वज्ञे म्हणीतले : वाइ : ये नवद्वारें : जैसी नाकी सेंबूड ए : डोळ्यों चिपूड : काना मळ : तोंडा थुंका ए : गुदिद्वारा मळ एति : ऐसी हे एकि धातु स्रवे : मग नीवतें : याचा विटाळ धरूं नए : जरि धरिजे प्रेतदेह होए :’

आता चक्रधरांचा मासिक पाळी संदर्भातील किमान ८०० वर्षे दृष्टीकोण कालसुसंगत होता का ?

गामा पैलवान's picture

25 Oct 2017 - 2:40 am | गामा पैलवान

मारवा,

भोजन करणार्‍या ब्राह्मणांस चांडाल, वराह, कोंबडे, कुत्रे, रजस्वला व षंढ यांनी पाहू नये. ॥२३९॥
कारण अग्निहोत्रादि होमामध्ये, गाय, सुवर्ण इत्यादि दानामध्ये, आपल्या अभ्युदयार्थ केलेल्या ब्राह्मणभोजनामध्ये, दर्शपौर्णमासादि देवसंबंधी हवीमध्ये व श्राद्धादिकामध्ये जे केले जाणारे कर्म हे पाहतात ते सर्व व्यर्थ होते. ॥२४०॥

हे निर्बंध श्राद्धविधीचं फळ नासू नये म्हणून सांगितले आहेत. यांचा ब्राह्मणांशी थेट संबंध नाही. श्राद्धाच्या वेळेस ब्राह्मण जेवत असतांना निषिद्ध कृत्य घडलं तर पितर अन्न नाकारतात. त्यामुळे यजमानास श्राद्धफल मिळंत नाही. यांत ब्राह्मणाचा दोष आहेच कुठे?

आ.न.,
-गा.पै.

सप्तरंगी's picture

24 Oct 2017 - 5:50 pm | सप्तरंगी

केवढे भयानक आहे हे, हे सगळे खरे असेल तर मनुस्मुतीचे एवढे नाव का? खरोखरच जाळून टाकण्यासारखेच तर आहे हे !
मी कुठेतरी असेही वाचले आहे इंग्रज आले तेंव्हा भारतीयांना कंट्रोल आणि त्यांच्यात भेद करण्यासाठी त्यांनी मनुस्मृतीचा वापर केला. मुस्लिम लोकांसाठी शारीया होता तसा हिंदूंसाठी काही नव्हते तेंव्हा त्यांनी हे वापरले. मनू ने मनुस्मुती लोकांनी ते follow करावे म्हणून लिहिले नव्हते तर त्या काळातले लोक जे फोल्लो करत होते ते मांडले होते. पण यातील खरे-खोटे नक्की माहिती नाही. अर्थात काहीही असेल तरी वाईटच
हे share केल्याबद्दल धन्यवाद. यामुळे काय follow करायचे नाहीये हे कळते आहे.