✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक संध्याकाळ..

द
दिपक लोखंडे यांनी
Wed, 09/06/2017 - 10:22  ·  लेख
लेख
" अहो ऐकताय ना?.." " नाही.. कानात तेल ओतलयं मी.." " काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी.." " अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का?" " ओ.. झोपताय काय?.. आज काय आहे माहीत आहे ना?" " काय आहे?..." " अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे.." " मग?.." " मग काय?.. चला ना जाऊया आपण पण.." " छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण?.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा.." " काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी.." " बरं मग, तू जाऊन ये " " मी एकटी नाही जाणार.." " मग सोड ना, काय बिघडणार आहे.. लग्नाला तर जाणारच आहे ना आपण.." " पण?.." " हे बघ राधा.. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतीस.. हवं तर चल मी तुला सोडून येतो.. पण चार चार तास एकाच जाग्यावर बसून, त्या म्हाताऱ्या बायांची गाणी ऐकण म्हणजे.. छे छे.. मला नाही जमणार.. बोल मग.. येऊ का सोडायला?.." " नको रहुद्या.. लग्णालाच जावू " " आत्ता काय झालं?.." " काय नाही.. " " अगं सांग ना काय झालं.." " अहो खरंच काही नाही, सोडा तो विषय आता.." " बरं बाई सोडला.." " अहो, ऐकाना.." " आता काय?.." " चला ना बाहेर गार्डन मधे बसुया आपण.." " राधा काय आहे गं?.. जरा शांत बसुदेना मला.." " ओ, चला ना खूप मस्त वातावरण आहे बाहेर.." " अगं काय बोलतीयेस.. बाहेर बघ तरी, किती ढग आलेत ते.. पाऊस पडेल एवढ्यात.." " ओ चला, काही येत नाही पाऊस वगैरे.. थोडावेळ बसू आणि येऊ आत.." " बरं चल.. (पाऊस आला अनी जर मी भिजलो.. मग सांगतो तुला)" " ओ थांबा थांबा.." " आता काय माझी आई?.." " मी थोडी कॉफी घेऊन येऊ का?.." " आता कशाला कॉफी.. चल.." " थांबा.. मी आणतेच.. दोन मिनिटे तर लागतील.." " घेतलं सगळं?.. का अजून काय राहिलंय बग..." " काय ओ.. आपल्या दोघासाठीच तर घेतेय ना.." " पण किती उशीर गं?.." " झालं झालं.. चला.." " किती गार वारा येतोय ना?.." " ह्म्म.." " संध्याकाळचं वातावरण किती मस्त वाटतं ना ओ?.." " ह्म्म.." " काय ह्म्म ह्म्म करताय?.. बोलाना काहीतरी.." " तुझी बहीण कुठ असते गं सध्या?.." " छे.. काय ओ, माझ्याबद्दल बोला म्हटलं तुम्हाला.. तुमचं नेहमी भलत्याच विषयाकडे लक्ष.." " जरा कॉफी दे गं.." " हे घ्या.. तुमचं तर माझ्याकडे कधी लक्षच नसतं.. नेहमी आपल तेच, काम काम आणि काम.. विसरलात का?.. लग्नाआधी कसं काम धंदा सोडून माझ्या मागे फिरायचा ते.. माझ्या भावाकडून दोनदा मार सुद्धा खाल्लात.. पण म्हणतात ना, माणसाला एकदा हवी ती वस्तू मिळाली की त्याची किंमतच उरत नाही.. " " चला आत, पाऊस आला बघा.." " थांब राधा.." " काय आहे, हात सोडा माझा आणि चला आत.." " हा हात सोडण्यासाठी नाही धरला राधे.." " आता काय शक्ती कपूर आला काय अंगात तुमच्या?.. चला " " अरे देवा... ही बाई मला रोमँटिक होऊच देत नाही.." " म्हणजे.. काय बोलताय काय तुम्ही?.. तब्बेत ठीक आहे ना.." " तू बस आधी.. खाली बस.." " पण पाऊस?.." " श्शशशश.." " अहो आपण भिजतोय.." " माझ्या डोळ्यात बघ राधे, माझ्या डोळ्यात बघ.." " शिवता कर मी राधेचे.. तरंग उठले लाजेचे नयन तिझे स्थिर होऊनी.. मोजे कंपन ओठांचे स्पर्श होता सरसर कापे.. भिती उराशी लाखाची थेंब दिसे मज दवबिंदू जब.. हसती राधा गालाशी " . . . . . " अहो थांबा.." " काय गं?.." " पाऊस थांबला...." " पण मी नाही... आज तरी नाही.." ...................................................................... – दिपक लोखंडे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
संगीत
कथा
कविता
प्रेमकाव्य
भाषा
प्रतिशब्द
शब्दार्थ
विनोद
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
वाद
भाषांतर

प्रतिक्रिया द्या
13062 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

अरे वा! छान रोमँटिक संध्याकाळ

एस
Wed, 09/06/2017 - 11:33 नवीन
अरे वा! छान रोमँटिक संध्याकाळ झाली की! :-)
  • Log in or register to post comments

धन्यवाद..!!

दिपक लोखंडे
Wed, 09/06/2017 - 16:49 नवीन
धन्यवाद..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

छान

बाजीप्रभू
Wed, 09/06/2017 - 13:16 नवीन
आवडलं..
  • Log in or register to post comments

धन्यवाद बाजीप्रभू..

दिपक लोखंडे
Wed, 09/06/2017 - 16:50 नवीन
धन्यवाद बाजीप्रभू..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू

छान संवादी कथा

सस्नेह
Wed, 09/06/2017 - 13:31 नवीन
'रिमझिम पाऊस पडे सारखा..' हे गीत आठवले.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद..

दिपक लोखंडे
Wed, 09/06/2017 - 16:51 नवीन
प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

मस्त दिपक

कऊ
Wed, 09/06/2017 - 21:48 नवीन
मस्त दिपक
  • Log in or register to post comments

धन्यवाद..!! कऊ..

दिपक लोखंडे
गुरुवार, 09/07/2017 - 08:01 नवीन
धन्यवाद..!! कऊ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कऊ

अरे वा!

पैसा
Wed, 09/06/2017 - 22:30 नवीन
छान रोमँटिक लिहिलंय!
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर...

दिपक लोखंडे
गुरुवार, 09/07/2017 - 08:02 नवीन
धन्यवाद सर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

त्या मॅडम आहेत, सर नाहीत.....

रेवती
Fri, 09/08/2017 - 07:02 नवीन
त्या मॅडम आहेत, सर नाहीत...............पण पावसाची सर आल्यावर तुम्ही तरी काय करणार म्हणा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक लोखंडे

"गलती से मिस्टेक"झाली रेवती

दिपक लोखंडे
Fri, 09/08/2017 - 09:53 नवीन
"गलती से मिस्टेक"झाली रेवती ताई :) प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

छान :)

रुपी
Fri, 09/08/2017 - 04:36 नवीन
छान :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद..!! रुपी जी..

दिपक लोखंडे
Fri, 09/08/2017 - 09:54 नवीन
धन्यवाद..!! रुपी जी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

मस्तच!

पद्मावति
Fri, 09/08/2017 - 17:39 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

धन्यवाद! पद्मावति जी..

दिपक लोखंडे
Fri, 09/08/2017 - 17:45 नवीन
धन्यवाद! पद्मावति जी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

छान जमलय...

टर्मीनेटर
Sat, 09/09/2017 - 17:38 नवीन
छान जमलय...भावना पोचल्या. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद!. टर्मिनेटर जी..

दिपक लोखंडे
Sat, 09/09/2017 - 17:44 नवीन
धन्यवाद!. टर्मिनेटर जी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

हे भारी आहे!!!!

जव्हेरगंज
Sun, 09/10/2017 - 10:35 नवीन
हे भारी आहे!!!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

दिपक लोखंडे
Sun, 09/10/2017 - 12:34 नवीन
धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा