आयोजक :
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, महाराष्ट्र ज्ञान मंडळ (MKCL), द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नॉलेज (CIS-A2K) यांच्या संयुक्त विद्यमाने कृतीतून प्रत्यक्ष अनुभव देत प्रशिक्षण देणारी कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. उल्लेखित कार्यशाळेचे नियोजन सुरु आहे. सहभाग जागा/संधी बहुधा मर्यादीत आहेत संपर्क subodhkiran@gmail.com
उद्दिष्टे :
दि.१७/२/१७
जुन्या ग्रंथ संपदेचे संवर्धन करण्यासाठी डीजीटायझेशन करणे
प्रताधिकार , मुक्त परवाना इ.
सदर ग्रंथ संदर्भासाठी इंटरनेटवर उपलब्ध करणे
दि १८/२/१७
PDF मजकुराचे ओसिआर टूल वापरून टेक्स्ट मध्ये रुपांतर करणे
साहित्य प्रथम अर्काईव्हज या संकेत स्थळावर चढविणे
विकिस्रोत वर आणण्यासाठीची प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करणे
अंतिमत: हे ग्रंथ अधिकृतरीत्या इन्टरनेटवर प्रकाशित करणे
कालावधी :
दि. १७ व १८ फेब्रुवारी २०१७
स्थान :
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था,ज्ञान प्रबोधिनी - सदाशिव पेठ,पुणे व महाराष्ट्र ज्ञान मंडळ (MKCL),सेनापती बापट रोड,पुणे
प्रतिक्रिया
30 Jan 2017 - 1:40 pm | सामान्यनागरिक
या बद्दल अधिक माहिती कुठे मिळेल ?
30 Jan 2017 - 3:01 pm | माहितगार
संपर्क subodhkiran@gmail.com
30 Jan 2017 - 3:57 pm | आदूबाळ
हे कुठे उपलब्ध आहेत (डीएलाय, उस्मानिया वगैरे वगळता) याची यादी मिळू शकेल काय?
30 Jan 2017 - 6:09 pm | माहितगार
https://mr.wikisource.org/wiki/विशेष:IndexPages या यादीत जोडली जातील.
30 Jan 2017 - 4:28 pm | पैसा
शक्य असेल त्यानी लाभ घ्या.
12 Feb 2017 - 9:26 am | माहितगार
कार्यक्रमास स्वतः सुबोध कुलकर्णीं आणि उदय पंचपोर यांच्या व्यतरीक्त खालील माननीयांचे मार्गदर्शन लाभण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाली आहे. प्रा.सदानंद मोरे, प्रा.माधव गाडगीळ, प्रा.सपना देव, प्रा.अविनाश चाफेकर.
इच्छूकांनी सुबोध कुलकर्णींशी त्यांच्या इमेलवर संपर्क करावा.