राम राम मंडळी,
बघता बघता २०१६ संपायला फक्त ०२ दिवस उरले आहेत. सरत्या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहे ज्या आठवणीत राहतील.
माझ्यसाठी म्हणाल अर्नेस्ट हेमिंग्वेची ट्रेंड मध्ये आलेली ' सिक्स वर्ड्स स्टोरी' हि चांगलीच लक्षात राहिली.त्याची हि स्टोरी होती "For sale: baby shoes, never worn," या सिक्स वर्ड्स स्टोरीच्या ट्रेंडने जगात भरपूर धुमाकूळ घातला. नेमक्या सहा शब्दांत व्यक्त होणं जरा कठीणच काम. पण अनेका जण हि कसरत साधत अगदी सहा शब्दांत व्यक्त झाले.
तर याच सिक्स वर्ड्स स्टोरी आणि सरत्या वर्षाच्या निमित्ताने तुमचं २०१६ कसं गेलं हे सहा शब्दांत सांगा.... अगदीच नाही जमणार सहा शब्दांत व्यक्त होणं, पण प्रयत्न करायला काही हरकत नाही.
प्रतिक्रिया
30 Dec 2016 - 10:57 am | पैसा
२०१५ सारखंच! :)
30 Dec 2016 - 11:53 am | अरुण मनोहर
"मितरों"
30 Dec 2016 - 12:20 pm | महासंग्राम
सायबा तुमची स्टोरी पाहिजे मोदींची नाही :)
30 Dec 2016 - 4:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
ही ष्टोरी मोदींची नाही तर त्यांचे ते शब्द ऐकून किंवा भविष्यात ऐकायला येतील या विचारानेच "काही लोकांच्या झालेल्या मनःस्थितीची" आहे.
यावरून कायप्पावर फिरणारा एक विनोद आठवला...
काही लोकांनी मोदींना एक पत्र पाठवून विनंती केली की, तुमची 'मित्रों..'ने सुरुवात होणारी भाषणे सकाळी, करा दुपारी करा, संध्याकाळी सात पूर्वी करा, पण रात्री आठ-साडेआठला नका करू... सगळी उतरून जाते ना राव !"
30 Dec 2016 - 12:25 pm | नावातकायआहे
मुर्खांच्या संगती पेक्षा एकांतवास बरा होता.
30 Dec 2016 - 1:05 pm | मराठी कथालेखक
मिपाच्या आडमुठ्या संपादकांनी माझा धागा उखडला
30 Dec 2016 - 2:29 pm | महासंग्राम
आशा करतो पुढच्या वर्षात असे काही होणार नाही
30 Dec 2016 - 3:31 pm | मराठी कथालेखक
आता मी मिपावर नवीन धागा उघडणारच नाहीये...
30 Dec 2016 - 3:43 pm | यशोधरा
डु आयडी वगैरे घेऊन पण नाही? भारीच!
30 Dec 2016 - 3:48 pm | मराठी कथालेखक
नाहीच.. आता दुसर्या संकेतस्थळांवर लिहिन.
मुख्य म्हणजे माझा धागा का उखडला याबाबत मिपाच्या संपादकांनी माझ्याशी अजिबात संवाद साधला नाही.
त्यामुळे पुन्हा लिहिण्याचा उत्साह मावळलाय.
30 Dec 2016 - 4:00 pm | यशोधरा
सोडून द्या, नवीन वर्षात काही सुरेखसं लिहा.
30 Dec 2016 - 4:09 pm | मराठी कथालेखक
धन्यवाद.
नक्की लिहीन..दुसर्या संस्थळावर.. तुम्हाला लिंक पाठवेन. :)
30 Dec 2016 - 4:06 pm | मन१
तीन डझन सूक्ष्मकथा : एक लक्षवेधक , रंजक लेखनप्रकार आठवलं.
30 Dec 2016 - 4:31 pm | सतिश गावडे
हो म्हटलं: होऊन गेलं, आता भोगतोय.
30 Dec 2016 - 4:35 pm | पैसा
=))
बयोआजीने राधाला सून म्हणून का स्वीकारले?
=))
30 Dec 2016 - 4:47 pm | यशोधरा
=)) =))
30 Dec 2016 - 5:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे काय आहे ? नुसती कथा की जीवनकथा ? =))
(हघ्या हेवेसांनल)
30 Dec 2016 - 6:59 pm | सतिश गावडे
नुसतीच कथा. सहा शब्दांच्या कथेला योगायोगाचे डिस्क्लेमर देणे नाकापेक्षा मोती जड होईल ;)
30 Dec 2016 - 5:19 pm | सूड
=))
जळ्ळा मेला पुर्शाचा जल्म!! ;) काय काय सोसावं लागतं.
31 Dec 2016 - 2:26 pm | रातराणी
अरे वा अभिनंदन ! आता पेढे कधी?
( गोष्टच आहे ही पण ;))
30 Dec 2016 - 5:00 pm | माझीही शॅम्पेन
.
.
.
अरेरे पुर्वीच मिपा आता राहील नाही !!
30 Dec 2016 - 8:51 pm | लीना कनाटा
मिपा मित्रो, अपने मनकी बात सुनाईये.
अरेरे, पूर्वीचे गांधीजी आता चालत नाहीत.
छान झाले, काळा पैसा बाहेर आला.
30 Dec 2016 - 8:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहा शब्दात गोष्टं? ते काय असतं?
30 Dec 2016 - 10:33 pm | महासंग्राम
हाहाहाहा भारीच कि
31 Dec 2016 - 2:31 pm | रातराणी
भुर्रकन उडून गेलं, पाखरू नाही, वर्ष. :)
31 Dec 2016 - 2:39 pm | पद्मावति
रारा, मस्त!
थोडे आसु, बरेचसे हसू- कॉकटेल 2016
2 Jan 2017 - 11:06 am | चांदणे संदीप
ती गाऊन गेल्यावर मला कविता समजली!
Sandy