मी आज केलेला व्यायाम...!!

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
2 Nov 2016 - 5:16 pm

.

नमस्कार,

गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.

व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.

व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.

आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.

मग... आज किती व्यायाम केला..?

**************************************************************

काही डिस्क्लेमर्स.

१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.

२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.

३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)

**************************************************************

टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)

क्रीडाविचारअनुभव

प्रतिक्रिया

पाटीलभाऊ's picture

4 Nov 2016 - 4:23 pm | पाटीलभाऊ

चालायचंच हो पद्मावती ताई ...कळफलक मनुष्यप्राणी किंवा भ्रमणध्वनीसारखा चलाख नसतो ना :D
बा द वे ब्लॅक कॉफी घशाखाली उतरते का ? मला तर दूध असलेल्या कॉफीत पण कमीत कमी 2 चमचे साखर लागतेच :)..

पद्मावति's picture

4 Nov 2016 - 4:28 pm | पद्मावति

चव बेकार असते पण औषधासारखी प्यायची. साखर आणि दूध म्हणजे झोप येण्याची हमखास रेसेपी=))

एनर्जी बुस्ट साठी कॅफेन - याचे अवलंबित्व (किंवा शुद्ध मराठीत डिपेंडन्सी) तयार होत नाही का..?

..आणि खराखुरा प्रश्न म्हणजे, अशा एखाद्या गोष्टीचे व्यसन लागले तर काय ..?

पाटीलभाऊ's picture

4 Nov 2016 - 5:15 pm | पाटीलभाऊ

अवलंबित्व असू शकते पण व्यसन नाही म्हणता येणार.
तसे म्हटले तर आपण रोज सकाळ-संध्याकाळ चहा घेतो...पण त्याला व्यसन नाही म्हणत ना :P

मोदक's picture

4 Nov 2016 - 5:26 pm | मोदक

एखाद्या झकास ट्रेकला गेल्यानंतर, दुपारी ४ वाजता चहासाठी तळमळणारे जीव पाहिले आहेत. चहाशिवाय एक दोन महिने राहू शकलात तर ते व्यसन नक्कीच नाही. ट्राय करा एकदा.

..बाकी अवलंबित्व आणि व्यसन यांमध्ये एक धूसर सीमारेषा असते असे माझे मत आहे.

टवाळ कार्टा's picture

4 Nov 2016 - 5:35 pm | टवाळ कार्टा

#मोदक गटणे

पाटीलभाऊ's picture

4 Nov 2016 - 5:41 pm | पाटीलभाऊ

अहो..'आपण' मध्ये मला स्वतःच समावेश नव्हता करायचा :D
मी तर चहा वर्षभर झाले बंद केला होता. सध्या घेतो..पण फक्त विकांताला आणि तोही एकदाच :)

बाकी अवलंबित्व आणि व्यसन यांमध्ये एक धूसर सीमारेषा असते असे माझे मत आहे.

नक्कीच.

मोदक's picture

4 Nov 2016 - 5:47 pm | मोदक

हा हा.. असे होते होय. मग चांगले आहे. :)

कपिलमुनी's picture

7 Nov 2016 - 5:13 pm | कपिलमुनी

मी चहापावडर + दूध पावडर + थोडे आले+ १ वेलची यांचे मिक्श्चर नेतो !
सकाळी ५-६ वाजता गोठवणार्‍या थंडीत वाफाळता चहा :)

मग चहा न पिणारे जीव सुद्धा तळमळतात =)
(अवांतराबद्दल स्वारी)

पद्मावति's picture

4 Nov 2016 - 6:00 pm | पद्मावति

dependency होते खरी. पण कॉफीच्या अवलंबित्वाच्या तोट्यापेक्षा व्यायाम जास्ती एफेक्टिव्ली होणार असेल तर हरकत नाही असे मला वाटते. अवलंबित्वाचं अजुन एक उदाहरण सांगायचं झालं तर बरेच लोकांना लाउड म्यूज़िक असल्याशिवाय व्यायाम करता येत नाही. मला स्वत:ला व्यायाम करतांना समोर टीवी मस्ट आहे. गाणी असली तर उत्तम नाहीतर उत्तम फील गुड तारक मेहेता सारखं धरावाहीक. एखादी भावनिक आणि स्ट्रेस देणारी मालीका अजिबात नको. त्याचेही अवलंबित्व येतंच पण त्याने व्यायाम होणार असेल तर ठीकच आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

4 Nov 2016 - 11:10 pm | अनिरुद्ध.वैद्य

एक्स्प्रेसो ब्लॅक कॉफी घेतल्याशिवाय काही करावसचं वाटत नसायचं. अन तल्लफ लागुन यायची. शेवटी प्रयत्नपुर्वक बंद केले. फक्त दोनेक महिनेच हा प्रकार झाल्याने जास्त आहारी गेलो नाही अस वाटतं.

पाटीलभाऊ's picture

4 Nov 2016 - 5:27 pm | पाटीलभाऊ

कि कार्यालयात सारखे डोळे का लागतात म्हणून :D

अनुप ढेरे's picture

4 Nov 2016 - 5:17 pm | अनुप ढेरे

दोन-चारदा चांगली ब्लॅक कॉफी प्या. चव डेव्हलप होते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Nov 2016 - 6:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

मागची जवळपास 10 ते 12 वर्षे रोज एकतर फक्त लाल चहा (विना दूध, पाणी, साखर) फक्त अर्धे लिंबू पिळून किंवा अतिशय नीट प्रकारे ब्रू केलेला ग्रीन टी घेतो, अक्वायर्ड टेस्ट असते, सुरवातीला, तुरट, कडवट वाटते (लाल चहा) अन ग्रीन टी शक्यतो मातकट लागतो चक्क चवीला, पण सवय झाली की साधा चहा बघावसा सुद्धा वाटणार नाही. ग्रीनटी चे फायदे अफाट आहेत अन ते जाणवून येते :)

पाटीलभाऊ's picture

4 Nov 2016 - 6:31 pm | पाटीलभाऊ

मी देखील वर्षात हिरवा चहा घेत होतो. निलगिरीतून चहाची सुकविलेले पाने आणली होती. ती उकळून मग गाळून त्याचा चहा प्यायचो.
पण सध्या त्यात खंड पडला आहे :(

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Nov 2016 - 6:49 pm | कैलासवासी सोन्याबापु

अर्रर्र पाटीलभाऊ, हिरवा चहा/ग्रीन टी कधीच उकळायाचा नाही/ नसतो. पाणी (कप/मग) गरम करायचे थोडे, बुडबुडे फुटेस्तोवर नाही, पण कडकडीत गरम मग पातेलं/किटलीत पाणी घेऊन त्यात चमचाभर ग्रीन टी टाकायचा अन झाकून 2 मिनिटे ठेवायचे, नंतर गाळून प्राशन करायचे गरमागरम, घरी महिला मंडळाला उरलेला चोथा वापरता येतो चेहऱ्यावर लावायला, त्याने म्हणे चेहरा तुकतुकीत होतो (चहा का पीत नाहीस असे विचारायचे नाही हे लक्षात ठेवा)

पाटीलभाऊ's picture

4 Nov 2016 - 7:03 pm | पाटीलभाऊ

हो...आधी मी उकळून प्यायचो(चुकीच्या पद्धतीने ).
नंतर तुम्ही सांगताय त्या पद्धतीने घ्यायला लागलो(आणि थोड्याच दिवसांत बंद :( ).
बाकी चेहरा तुकतुकीत होण्याचं जाऊ द्या... :P

पद्मावति's picture

5 Nov 2016 - 2:35 pm | पद्मावति

सहमत बापु, ग्रीन टी उत्तम. असंख्य फायदे आहेत इंक्लूडिंग फॅटलॉस, कोलेस्ट्रॉल साठी चांगले. त्या मधे प्रचंड प्रमाणात anti ऑक्सिडेंट्स असतात त्यामुळे स्किन तुकतुकीत आणि फ्रेश राहते. जपानी लोकं त्यामुळे नेहमीच त्यांच्या वयापेक्षा आठ दहा वर्षांनी लहान दिसतात.
फॅट लॉस साठी ग्रीन टी पेक्षा उलॉंग टी जास्ती उपयोगी आहे. जेवणानंतर उलॉंग टी प्यायल्यास खाल्या जाणार्‍या अन्नामधले फॅट शरीरात खुप कमी प्रमाणात शोषले जातात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Nov 2016 - 6:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

मागची जवळपास 10 ते 12 वर्षे रोज एकतर फक्त लाल चहा (विना दूध, पाणी, साखर) फक्त अर्धे लिंबू पिळून किंवा अतिशय नीट प्रकारे ब्रू केलेला ग्रीन टी घेतो, अक्वायर्ड टेस्ट असते, सुरवातीला, तुरट, कडवट वाटते (लाल चहा) अन ग्रीन टी शक्यतो मातकट लागतो चक्क चवीला, पण सवय झाली की साधा चहा बघावसा सुद्धा वाटणार नाही. ग्रीनटी चे फायदे अफाट आहेत अन ते जाणवून येते :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

4 Nov 2016 - 11:13 pm | अनिरुद्ध.वैद्य

ग्रीन टी लेमन टी आपलंपन फेव्हरीट! लेमन जरा जास्त्च! एक्स्प्रेसोच्या होऊ घातलेल्या सवयीतुन लेमन टी नेच बाहेर येण्यात मदत केली.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Nov 2016 - 6:59 am | कैलासवासी सोन्याबापु

लेमन टी लैच खास हो जावईबुआ! म्हणजे बघा फ्रिज मध्ये चिल केला तर भारी कोल्ड्रिंक होते त्याचे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Nov 2016 - 7:51 am | अनिरुद्ध.वैद्य

आईसड लेमन टी ... आहाहा! आज बनानाही पडताय बापु!

वेल्लाभट's picture

4 Nov 2016 - 5:23 pm | वेल्लाभट

ल ओ ल!

अर्रर्र. लोकांचे अपडेट्स वाचून लयच गिल्ट यायला लागला आहे! :-(

मित्रहो's picture

4 Nov 2016 - 4:52 pm | मित्रहो

सायकल
२० किमी एकदा किंवा दोनदा, ह्लली कठीण होत आहे. फक्त वाीकेंड सायकल.
शनिवार: ३०-५० किमी
रविवार: ७५ ूद ९० किमी.
११५+ महि्यातून एकदा.

चालने
३-५ किमी रोज

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Nov 2016 - 5:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

फुरुष लोक्स करिता, मेन्स फिटनेस मॅगझिनचे ऍप जबराट आहे. एकतर मेन्स फिटनेसचे नाव मोठे, ऍप पण जबराट बनवले आहे. फिल्टर्स असतात त्यात तुम्हाला कसा व्यायामाचा माहोल हवाय ते पहिले भरायचे (ओपन ग्राउंड/ जिम/ होम जिम/ डंबेल-केटलबेल सेट्स/ बॉडी वेट) मग काय टार्गेट आहे ते पण बयाजवार विचारते (अपर बॉडी/ऍब्स-कोर/कार्डिओ/मसलग्रुप वगैरे) हे फिल्टर्स अप्लाय केले की तुम्हाला (तुमच्या परिस्थितीला) साजेसे वर्कआऊट प्रोग्राम्स ऍप सजेस्ट करते,

हे ऍप पेड आहे

पण पैसे जास्त घेत नाही, तसंही चकटफू आहे म्हणून ऍप फाट्यावर मारून फिटनेस मध्ये टंगळमंगळ करण्यापेक्षा थोडे पैसे गेले तर माणुस किमान पैसे वसूल करायला तरी व्यायाम करेल असे वाटते.(भाबडा आशावाद). आठ महिने अगोदर वापरत होतो तेव्हा वर्षाचे १२०० (₹१२००/वर्ष फक्त) शुल्क लागत असे आत्ताचे माहिती नाही.

(स्लिप डिस्कची आयमायबापआजा उध्दार करत ढेरी कुरवळणारा) बाप्याव

एक शंका - बॅडमिंटन खेळतानाचा व्यायाम कसा मोजायचा..? रनींग अ‍ॅपने की स्टेप काऊंटरने..?

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Nov 2016 - 6:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

पेडोमीटर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2016 - 8:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोबाइल खिशात ठेवायचा का खेळतांना ?

-दिलीप बिरुटे

शक्य नाही ते.. तोच विचार करतो आहे.

चाणक्य's picture

7 Nov 2016 - 9:49 am | चाणक्य

बघा वापरून. फार अडचण जाणवणार नाही.

श्रीरंग_जोशी's picture

4 Nov 2016 - 7:49 pm | श्रीरंग_जोशी

हार्ट रेट मॉनिटर असणारा अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर अथवा चतुरघड्याळ वापरून.

संदीप डांगे's picture

4 Nov 2016 - 7:52 pm | संदीप डांगे

जास्त काय बोलत नै, उद्याचं उद्या बघू..
आज डान्स केला 15 मिनिटे, हाय इंटेन्सिटी.
5+2+5+2+5

धाग्याने प्रोत्साहित केलं हे विशेषत्वाने नमूद करतो

आजचा व्यायाम
जोर २० * २
फ्रीवेट स्क्वॉट्स २० * २ (पॉवर स्क्वॉट्स. स्लो एक्स्टेन्शन, फास्ट कॉन्ट्रॅक्शन)

मोदक's picture

4 Nov 2016 - 10:51 pm | मोदक

धन्यवाद वेल्लाश्री :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

4 Nov 2016 - 11:16 pm | अनिरुद्ध.वैद्य

थरो वार्माप + जोर + पुल अप

मग पाय लईच दुखत होते तर जीम मध्ये सर्कीट ट्रेनिंग करत बसलो. पहिल्याच राऊंडला घाम निघाला एसी मध्ये :)
९ व्यायाम प्रकारांचे ३ सेट केले. मग अ‍ॅब्सकरता लेग राईझ अन क्रंचेस.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2016 - 8:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज ३.१६ चाललो. नंतर दीड तास चार सेट बॅडमिंटनचे खेळलो. आता मरणाचा थकलोय. आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा जावो.
Screenshot_20161105-071035

-दिलीप बिरुटे

प्रशांत's picture

5 Nov 2016 - 9:38 am | प्रशांत

दंडवत स्विकारा

मोहन's picture

5 Nov 2016 - 9:16 am | मोहन

धाग्यामुळे स्फूर्ती घेवून मी पण आज २ कि.मी. चालणे व दोन मजले चढणे हा व्यायाम केला !
बघू किती दिवस चालतो.

प्रशांत's picture

5 Nov 2016 - 9:42 am | प्रशांत

कुंडमळा

सायकलिंगवाल्यांना एक प्रश्न: वरच्या फोटोतल्या सायकलचे टायर इतके बारीक आहेत म्हणजे ही रोडरेसिंग सायकल आहे का? एमटीबी सायकलचे टायर चांगलेच जाडजूड असतात ना? मग कुठली सायकल चांगली? कुठली फास्ट पळते?

MTB सायकल - सर्वात जाड टायर - जास्ती फ्रिक्षन त्यामुळे वेग कमी
हायब्रीड सायकल - MTB पेक्षा अरुंद टायर - वेग बऱ्यापैकी जास्त पण पंक्चरची शक्यता जास्त
रोड बाईक - एकदम अरुंद टायर - कमी फ्रिक्षन मुळे भरपूर वेग

हायब्रीड आणि रोड बाईकला पंक्चर रेझीस्टन्ट टायर मिळतात त्यामुळे शक्यतो पंक्चर होत नाही

(प्रशांत मालकांचे टायर साध्या हायब्रीडपेक्षाही अरुंद आहेत)

अच्छा! पण रस्त्यावर जर खडी, वाळू इ. पसरल्यामुळे रस्ता निसरडा झाला असल्यास अशा रस्त्यावर कुठली सायकल घसरण्याची शक्यता कमी असेल? मला तरी सुरक्षितता आणि दणकटपणा यासाठी एमटीबी बरी वाटते. विशेषतः आपल्याकडील रस्त्यांची अवस्था लक्षात घेऊन.

मोदक's picture

5 Nov 2016 - 10:20 am | मोदक

MTB ला तोड नाही.

कशीही ताबडा, काहीही होत नाही, रस्त्यावर मजबूत ग्रिप असते फक्त जास्ती पळत नाही आणि थोडा जास्त घाम गाळावा लागतो

विंजिनेर's picture

5 Nov 2016 - 9:23 pm | विंजिनेर

कालच मी एक "सुविचार" वाचला
- "माउंटन बाईक ईज लाईक युअर बडी, रोड बाईक इज युवर लव्हर"

डॉ श्रीहास's picture

5 Nov 2016 - 12:42 pm | डॉ श्रीहास

MTB,हायब्रीड आणि रोडबाईक .......

मी तिन्ही वापरल्या आहेत.... हायब्रीड आणि MTB आपल्या रस्त्यांसाठी उत्तम त्याशिवाय स्टॅमिना वाढवण्यास मदत करतात.... पण रोडबाईक(नावाप्रमाणे रोडच) जी एरोडायनॅमिक्स आणि कमी वजन ह्यॅ वैशिष्ठ्यांनी ओळखली जाते ती लांबचे पल्ले गाठण्यासाठी चांगली, तसं बघायला गेलात तर टुरिंग बाईक्स हा एक वेगळाच प्रकार आहे जो हायब्रीड/MTB + रोडबाईक यांच्या काॅम्बिनेशन मधुन उगवलेला आहे जो फारच मोठे पल्ले सामानसुमान बांधुन जाण्यासाठी वापरला जातो.....

सुरवात करणार असाल तर हायब्रीड सर्वोत्तम, पण दिसायला चांगली म्हणून बरेचदा MTB ला प्राधान्य दिलं जातं!

खुप सायकलींग केल्यावर रोडबाईक खुणावायला लागते आणि माझ्यासारखे काहीजण बळी पडतात ;))

एक असतांना दुसरी सायकल कशाला ? असा प्रश्न खंद्या सायकलस्वाराला पडत नाही तो त्याच्या किंवा तिच्या घरच्यांना पडतो.....

धन्यवाद डॉ. आणि मोदकदादा! ;-) म्हणजे व्यायामासाठी एमटीबी बेस्ट.

अजून एक प्रश्न याच अनुषंगाने : लेह-लडाख सायकलवारी करणारे कोणत्या प्रकारची सायकल वापरतात? एमटीबी की अजून दुसरी?

(प्रश्न विचारून भंडावून सोडल्याबद्दल क्षमस्व. :-) )

लेह लदाखवाले बहुतांश MTB च वापरतात. अन्यथा मॉडीफाय केलेली टूरींग बाईक. पण तेथे MTB (आणि बुलेटच) राज्य करतात.

आता विषय निघाला आहे म्हणून हा एक व्हिडीओ बघा.

आणि त्याच ग्रूपचा हा आणखी एक अप्रतीम व्हिडीओ...

(असे काहीतरी करायला कधी वेळ मिळेल देव जाणे....)

झेन's picture

6 Nov 2016 - 9:15 am | झेन

कलीजा खलास व्हीडीओ, मला खात्री आहे तुमचा ही असा व्हीडीओ आम्हाला ईथे पहायला मिळेल. अलिकडे एका दीवसात जास्तीत जास्त ८० की.मी. सायकल चालवलेला ...अनियमित झेन.

८० किमी करताय तर १०० अवघड नाही... सेंच्युरी मारा एकदा..!!

त्रिवेणी's picture

5 Nov 2016 - 2:13 pm | त्रिवेणी

आज पणऩो व्यायाम. उद्यापण सुट्टी.

वेल्लाभट's picture

5 Nov 2016 - 2:43 pm | वेल्लाभट

a

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Nov 2016 - 11:23 pm | अनिरुद्ध.वैद्य

वार्मअप अन सर्किट ट्रेनिंग ४० मिनिटे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2016 - 11:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रविवारी ब्याडमिंटनच्या म्याचेस असतात. त्यामुळे नो वॉक. पण जीवापेक्षा जास्त खेळतो. प्रचन्ड थकून जातो.

-दिलीप बिरुटे

मोदक's picture

6 Nov 2016 - 11:44 am | मोदक

डीबी (:D)

इलेक्ट्रॉल किंवा ग्लुकॉन-डी आठवणीने प्या. लै बॅडमिंटन खेळले की प्रचंड घाम येतो आणि डीहायड्रेशन होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2016 - 6:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज लटकून गेलो. दिवसभर लोळत राहीलो. :(

-दिलीप बिरुटे

मोदक's picture

6 Nov 2016 - 11:42 am | मोदक

कालचा व्यायाम..

.

काल पहिल्यांदाच बॅडमिंटन खेळताना पेडोमीटर ट्राय केले, खिशात मोबाईलचे वजन जाणवत होते. नीट खेळता आले नाही. तसेच या अ‍ॅपने सायकलिंगच्या वेळेतला थोडा डेटा ट्रॅक केला.

.

अनिरुद्ध.वैद्य's picture

6 Nov 2016 - 6:08 pm | अनिरुद्ध.वैद्य

अन नंतर 2 तास बॅडमिंटन!!
जबरी

_/\_

आजचे चालणे २.८ कि.मी. रविवार असुन. हे केवळ ह्या धाग्यामुळेच. एरवी रविवारचा बहाना नक्कीच मिळाला असता !

वेल्लाभट's picture

6 Nov 2016 - 1:06 pm | वेल्लाभट

(१० जोर १० स्क्वॅाट) * ४
न थांबता

वॅार्मअप नंतर अर्थात

प्रशांत's picture

6 Nov 2016 - 2:57 pm | प्रशांत

काय काय आणि किती वेळ करता

वेल्लाभट's picture

7 Nov 2016 - 10:14 am | वेल्लाभट

१ मनगटं वर्तुळाकार फिरवणे *१५
२ दोनही हात खांद्यातून एकदा पुढच्या दिशेने व एकदा मागच्या दिशेने वर्तुळाकार फिरवणे *१५
३ टॉर्सो ट्विस्ट - विश्रामावस्थेत उभं राहून कमरेवरचं शरीर एकदा डावीकडे एकदा उजवीकडे फिरवणे * १५
४ लॅट स्ट्रेच - विश्रामावस्थेत उभं राहून कमरेवरचं शरीर एकदा डावीकडे एकदा उजवीकडे झुकवणे * १५
५ दोनही पाय ताठ ठेवून हात अंगठ्यांना टेकवणे * ५ (एक दोन सेकंद ही अवस्था धरून ठेवणे)
६ दोनही पाय ताठ ठेवून कमरेवरील शरीर मागे झुकवणे (कमान टाकण्याची सुरुवात) * ५ (एक दोन सेकंद ही अवस्था धरून ठेवणे)
७ चवड्यावर उभं राहणे * १५
८ मानेला ताण देणे - अ) हनुवटी गळ्याच्या दिशेने आणणे व त्याच्या विरुद्ध नेणे ब) मान डावीकडे व उजवीकडे झुकवणे क) मान डावीकडे व उजवीकडे वळवणे * १५
९ हाताचे तळवे एकदा पाठीमागे नेऊन एकमेकांना टेकवणे व एकदा छातीपुढून परस्पर विरुद्ध खांद्यांना टेकवणे (मिठी मारल्यागत) * १५
१० जंपिंग जॅक्स * ५० a

प्रशांत's picture

7 Nov 2016 - 11:44 am | प्रशांत

धन्स..

डॉ श्रीहास's picture

7 Nov 2016 - 3:35 pm | डॉ श्रीहास

अगदी योग्य आणि फारच जरूरी माहीती..... अनेक धन्स :))

स्थितप्रज्ञ's picture

6 Nov 2016 - 3:28 pm | स्थितप्रज्ञ

धाग्याला मिळणारा उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन मोदकरावांच्याच मार्गदर्शनाखाली Strava नामक मोबाईल अॅपवर खालील रनिंग क्लब सुरु करण्यात आला आहे.

https://www.strava.com/clubs/miparunners

जास्तीत जास्त सदस्य यातून प्रेरणा घेऊन पळणे चालू करतील या उद्देशाने हा क्लब बनवण्यात आलेला आहे तरी याचा अवश्य लाभ घ्या.

ग्रुपचे नाव "MiPa Runners"

मन१'s picture

6 Nov 2016 - 4:15 pm | मन१

ह्या प्रकाराला व्यायाम म्हणता यावं का, ह्याबद्दल साशंक आहे.
मात्र सात मजले नियमित चढतो. घर नि हापिस दोन्ही लैच वरच्या मजल्यावर आहेत. शक्यतो लिफ्ट वापरत नाही. हल्ली पायर्‍या चढण्याचं एक तंत्र सवयीनं जमतय असं मला वाटतय. सतत , शांतपणे पायर्‍या चढायच्या; न बोलता. श्वास घेताना साधारणतः पूर्ण छाती भरुन घ्यायचा, साधारणपणे भस्त्रिका करताना करतो तसा. न थांबता सात मजले मी सध्या चढू शकतोय दीडेक मिनिटात आणि वरती गेल्यावर फार काही धाप लागलेली नसते. वरती पोचल्यावर श्वास किंचितच जोरात घ्यावा लागतो; तेही फक्त मिनिटभर. नंतर अगदि नॉर्मल.
अर्थात अशा पद्धतीनं श्वास घेणं बरोबर की चूक हे मात्र माहित नाही; मला शरीर शास्त्राबद्दल शून्य माहिती आहे. निव्वळ अनुभव, प्रयोग शेयर करत आहे. जाणकारांकडून खात्री करुन घ्यावी. दिवसभरात ऑल्मोस्ट लिफ्ट वापरायचीच नाही, असा प्रयत्न असतो. बहुतांशी यशस्वी होतो.
कधी कधी प्रयोग म्हणून बॅक-टू-बॅक दोनदा सात मजले चढतो. म्हणजे तळमजल्यापासून वर यायचं; श्वास नॉर्मल होइ पर्यंत मिनिटभर थांबायचं; मग पुन्हा तळमजला; आणी लगेच पुन्हा वरती यायचं.
हे करुन पाहिलं. दोनदा चढउतार करुनही ऑल्मोस्ट काहीच दम लागला नाही. ( मिनिटभरात श्वास नॉर्मल होतो)
धावणे , जिम , पोहणे , सायकलिंग ह्या गोष्टींसाठी मात्र वेगळा वेळ काढणे अजून जमत नाहिये :(

एस's picture

7 Nov 2016 - 8:12 am | एस

आज वॉर्मअप आणि दोन सूर्यनमस्कार घातले.

डॉ श्रीहास's picture

7 Nov 2016 - 8:32 am | डॉ श्रीहास

४२.४५ किमी, १:३८ तास, वेग २५.८ ते२६ किमी/तास......

एक दिवस आराम आणि एक दिवस प्रवास असे दोन दिवस आॅफ होते...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Nov 2016 - 8:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल थकल्यामुळे आज पिव्वर आराम केला. पण उद्या वॉक ५ किमी झालाच पाहिजे.

-दिलीप बिरुटे

दाते प्रसाद's picture

7 Nov 2016 - 10:07 am | दाते प्रसाद

आज ८. ८ किमी चाललो , १ तास १९ मिनिटे लागली , ८. ५९ मिनीट /किमी , ८५० कॅलरिज जळाल्या

मोहन's picture

7 Nov 2016 - 10:32 am | मोहन

२.० कि.मी चालणे व २ मजले चढणे.

बाळ सप्रे's picture

7 Nov 2016 - 10:47 am | बाळ सप्रे

काल बेटर-हाफ ला हाफ मॅरॅथॉन धावताना पेसिंग केले. तिला वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवता आली आणि चक्क ३ रे बक्षीसही मिळाले..

वेल्लाभट's picture

7 Nov 2016 - 10:52 am | वेल्लाभट

अप्रतिम ! क्या बात है ! जबरदस्त.

प्रशांत's picture

7 Nov 2016 - 11:45 am | प्रशांत

अभिनंदन..

अप्पा जोगळेकर's picture

7 Nov 2016 - 12:04 pm | अप्पा जोगळेकर

अभिनंदन.

मोदक's picture

7 Nov 2016 - 12:42 pm | मोदक

अभिनंदन..!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Nov 2016 - 6:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वाह ! अभिनंदन सेठ.

-दिलीप बिरुटे

सही रे सई's picture

7 Nov 2016 - 8:08 pm | सही रे सई

अभिनन्दन

धवताना पेसिंग म्हणजे काय?

अप्पा जोगळेकर's picture

7 Nov 2016 - 12:02 pm | अप्पा जोगळेकर

४ डिसेंबरच्या पुणे हाफ मॅरेथॉन ला रजिस्ट्रेशन करायचे आहे. काय करावे लागेल. क्रूपया ऑनलाईन पर्याय सुचवावेत.

अप्पा जोगळेकर's picture

7 Nov 2016 - 12:03 pm | अप्पा जोगळेकर

वर्तमानपत्रात काय सापडले नाही आणि गुगलबाबा वर सुद्धा नुसतीच इव्हेन्टची माहिती आहे. नोंदणीचे कळत नाही काय करायचे.

बाळ सप्रे's picture

7 Nov 2016 - 12:19 pm | बाळ सप्रे
अप्पा जोगळेकर's picture

7 Nov 2016 - 12:28 pm | अप्पा जोगळेकर

धन्यवाद. मी वेगळ्या लिंकवरुन केली नोंदणी.

अप्पा जोगळेकर's picture

7 Nov 2016 - 12:27 pm | अप्पा जोगळेकर

सापडले. इथे करता येते नोंदणी. http://www.marathonpune.com/

अनुप ढेरे's picture

7 Nov 2016 - 12:05 pm | अनुप ढेरे

पाठोपाठ दोनदा पर्वती चढ उतार केलं. चार वेळा जमायला हवं.

वेल्लाभट's picture

7 Nov 2016 - 12:15 pm | वेल्लाभट

नक्की जमेल. कीप गोइंग

शनवारी दीड तास आणि आज अर्धा तास पवलो.

मी काल (रविवारी) सकाळी ६.५ किमी चाललो आणि संध्याकाळी १४ किमी सायकल ४५ मिनिटांत चालवली.
आज सकाळी परत ६.५ किमी चालणे झाले. संध्याकाळी पुन्हा सायकलींग करणार आहे.
दररोज ओफिस मध्ये तीन मजले चढणे आणि उतरणे (अंदाजे ५-६ वेळा) चालू असतेच.

डॉ श्रीहास's picture

7 Nov 2016 - 4:41 pm | डॉ श्रीहास

बादवे तुमचं वय नेमकं किती ?
हा व्यायाम समतोल वाटतो आहे.... सुरू ठेवाच

संदीप डांगे's picture

7 Nov 2016 - 4:10 pm | संदीप डांगे

पोहणे शिकायला वयाची-वजनाची मर्यादा नसेल ना?