हमारा स्टेशन हमारी शान

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
5 Oct 2016 - 6:26 pm

'बोरीवली स्टेशनचा कायापालट'

अशा शीर्षकाची बातमी वाचली तेंव्हाच ठरवलं होतं की आपण अशा कामात भाग घ्यायचा. त्यानुसार लगेच माहिती काढली आणि एम ए डी (मॅड) म्हणजेच मेक अ डिफरन्स फाउंडेशनबद्दल कळलं. मग काही दिवसानंतर डोंबिवली स्टेशनच्या रंगरंगोटीचे फोटो बघितले. आतुरता अजूनच वाढली. हे सगळं होऊन गेल्यावरच का कळतंय, आगोदर का नाही असं वाटायला लागलं. दरम्यान द अगली इंडियन, हरितस्पर्श, हरियाली इत्यादी अनेक संस्थांशी संपर्क करून काही उपक्रम आहेत का याची माहिती घेत राहिलो.

मग मेक अ डिफरन्स आणि मुंबई फर्स्ट या दोन संस्था संयुक्तपणे मुंबईच्या अनेक स्टेशनांचं सुशोभिकरण करणार असल्याची बातमी वाचली आणि मुंबई फर्स्ट च्या साईटवर जाऊन मी माझा स्वयंसेवा करण्याचा मानस नोंदवला. आता संधी मिळेल हे जवळजवळ नक्की होतं. मेल आली, पुढे कस्कायच्या ग्रूपमधे अ‍ॅड झालो आणि 'टीम' चा भाग झालो.

हमारा स्टेशन हमारी शान. या उपक्रमाबाबत बर्‍याच जणांनी वाचलं असेल एव्हाना. पेपर, रेडियो, सोशल मिडियाच्या माध्यमातून भरपूर प्रचार होतो आहे आणि भरपूर स्वयंसेवकांचा प्रतिसादही मिळतो आहे. अनेक कलाकार, अनेक संस्था आपापल्या परीने याला हातभार लावत आहेत.

२ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर चालणार्‍या या उपक्रमात फूल न फुलाची पाकळी म्हणून थोडं काम करायची संधी मला काल मिळाली. माझ्यासोबत दोन आणखी जणांना घेऊन मी दादर स्टेशनच्या सुशोभिकरणाच्या कामात खारीचा वाटा उचलला. अनुभवकथन करायला बराच वेळ लागेल, परंतु अनुभव अतिशय आनंद देणारा, समाधान देणारा होता. कित्येक लोक, मोठेमोठे कलाकार आपापली कामं, जबाबदार्‍या सांभाळून यात भाग घेतायत, अनेक जण सहपरिवार इथे येऊन स्वयंसेवा करतायत. आपलं शहर सुंदर दिसावं हा उद्देश फक्त महत्वाचा आहे आणि त्यासाठीच हा प्रयत्न आहे. रात्रीच्या एक वाजता जेंव्हा आमचा २०-२५ जणांचा एक गट आपापलं सामान आवरून आज झालेलं सगळ्यांचं काम बघतो, तेंव्हा काहीतरी चांगलं केल्याचा, एकत्र आल्याचा आनंद मिळतो आणि तो काल मी अनुभवला.

यात मी काहीच्च खरं तर केलेलं नाही पण हा धागा इथे टाकण्याचं कारण इतकंच की अजून तीन दिवस आहेत आणि स्वयंसेवकांची गरज आहेच. तेंव्हा मुंबई-ठाण्यात राहणार्‍या मिपाकरांना यात सहभागी व्हायचं असेल तर जरूर व्हा असं सुचवेन. चित्रकला चांगली असणं, इत्यादी अटी नाहीत फक्त इच्छा आणि उत्साह हवा आहे. तेंव्हा इच्छुकांनी http://mumbaifirst.org/participate-in-hamara-station-hamari-shaan-initia... या लिंकवर आपला सहभागी होण्याचा मानस नोंदवा, म्हणजे पुढील उपक्रमांच्या आधी ते तुमच्याशी संपर्क साधतील.

काही छायाचित्रः
1

2

3
अस्मादिक

4
आम्ही ज्यावर काम केलं तो फलक (काम अपूर्ण आहे)

राहती जागाविचारसद्भावनाबातमीअनुभवशिफारस

प्रतिक्रिया

फार स्पृहणीय काम. फारच छान! वाचून आनंद आणि अभिमान वाटला.

अजया's picture

6 Oct 2016 - 8:45 am | अजया

असेच म्हणते.

रातराणी's picture

5 Oct 2016 - 11:18 pm | रातराणी

मस्त उपक्रम!

पद्मावति's picture

5 Oct 2016 - 11:38 pm | पद्मावति

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Oct 2016 - 11:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक नंबरचे काम आहे हे ! अभिनंदन !!

चांगले काम आहे. लगे रहो.......

खटपट्या's picture

6 Oct 2016 - 12:16 am | खटपट्या

खूप छान काम...मी उपलब्ध असल्यास आपणास कळवेन

खतरनाक !! नुसतंच सरकारच्या नावाने खडे न फोडता, स्वतः पुढाकार घेऊन काही तरी बदल आणण्याची कृती खुप आवडली. परवाच पार्ले स्टेशन चे फोटो पाहिले. ते ही काम जबरदस्त झालंय ! तुम्हाला खुप शुभेच्छा आणि कौतुक..

पिलीयन रायडर's picture

6 Oct 2016 - 4:19 am | पिलीयन रायडर

+११

असंच म्हणते! पुढाकार घेऊन काम केलंत हे फार आवडलं!

उपक्रम एकदम आवडला आणि तुम्ही त्यात स्वतः प्रयत्न करून सहभागी झालेला आहात त्या बद्दल तुमचं अभिनंदन.

खाइके पान बनारसवालाछाप गाणी ब्यान करा.सगळ्या स्काइवॅाकची परिस्थिती काय आहे? किती धुणार?

वरुण मोहिते's picture

6 Oct 2016 - 10:22 am | वरुण मोहिते

मस्त उपक्रम

नाखु's picture

6 Oct 2016 - 3:17 pm | नाखु

खारीचा वाटा सुद्धा उचलला तरी मस्तच आहे.

कविता१९७८'s picture

6 Oct 2016 - 3:20 pm | कविता१९७८

मस्त उपक्रम

वेल्लाभट's picture

6 Oct 2016 - 11:44 pm | वेल्लाभट

सगळ्यांचे अनेक आभार. उपक्रमाबद्दल जरूर वाचा असं सुचवेन. नुसतं बसून शिव्या देतोच आपण इतर वेळी. इथे अनेक जण एकत्र तर येतायत हे काय कमी आहे? आणि विधायक कार्य होतंय. त्यामुळे यातच पहिलं यश आहे. पुढे बघू काय होतं. काय कंजूसभाऊ! स्कायवॉक जिथे खराब झालेत तिथून जाताना कुणी कचरा टाकताना दिसलं, थुकताना दिसलं तर अडवता, समजवता येतं का बघा पुढच्या वेळी. ओघाने आलं म्हणून सांगतो मी हे सतत करतो जिथेजिथे म्हणून शक्य होईल तिथे तिथे थांबून, थांबवून सांगतो. काही ऐकतात, काही उलट बोलतात; चालायचंच. आपण करावं, आपलं समाधान.

छान! लेख आणि हा प्रतिसादही फार आवडला.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Oct 2016 - 6:05 am | अत्रुप्त आत्मा

टाळ्या...

चौकटराजा's picture

7 Oct 2016 - 7:57 am | चौकटराजा

आपल्याकडे ऐहिक उपक्रमापेक्षा भावनिक उपक्रमांकडे लोकांचा ओढा अधिक आहे विशेशतः स्त्री वर्गाचा. सद्या एक रंगाच्या साड्या नेसून तात्पुरते ग्रूपला एक नाव द्यायचे व फोटो छापून आणायचा यापेक्षाही आपल्या या तथाकथित ग्रूपने वर्षात काय भरीव कार्य केले याचे उत्तर बहुधा शून्य असे असते. सोसायटीत घाण पडलेली असते पण स्त्री वर्गाने एक्त्र येऊन सफाई केल्याचे मी तरी पाहिलेले नाही पण भोंडला मात्र न चुकता करायचा असा प्रकार असतो. वरील उपक्रम पाहून सर्वच सरकारने करायचे असते या खास " भारतीय " कल्पनेला छेद जात आहे याचे मनापासून कवतिक.

आपल्याकडे ऐहिक उपक्रमापेक्षा भावनिक उपक्रमांकडे लोकांचा ओढा अधिक आहे

स्पॉट ऑन

ज्योति अळवणी's picture

8 Oct 2016 - 4:24 pm | ज्योति अळवणी

माझा देखील खारीचा वाटा होता. खरच स्पृहणीय उपक्रम आहे हा. शक्य असेल त्याने शक्य असेल तसे काही ना काही करावं अस मला वाटत.

माम्लेदारचा पन्खा's picture

8 Oct 2016 - 6:55 pm | माम्लेदारचा पन्खा

काम उत्तम आहे.....

परंतु जितका जीव लावून स्वयंसेवक काम करीत होते तितक्याच किंबहुना दुप्पट वेगाने आपलं "बंबईया पब्लिक" त्याची वाट लावेल हा विचार करुन मन खिन्न झालं....

प्रसाद_१९८२'s picture

9 Oct 2016 - 11:05 am | प्रसाद_१९८२

मस्त उपक्रम!