"ती"
"ती" - २
"ती" - ३
"ती - ४"
ती - ५
ती - ६
ती - ७
बोरीवलीहून निघालो ते थेट घरी आलो पण येताना डोक्यात असंख्य विचार चालू होते. आपल्या हातून हे झालंच कसं. आपल्याला कळलं कसं नाही की आपण एवढा वेळ तीथे थांबायला नको होतं. बरं मला कळलं नाही तर नेहाने तरी मला तसं सुचवायला हवं होतं की आता आत्या येणार आहे. च्यायला नसती लफडी. आत्या काय विचार करत असेल? तीने विजयला सांगीतले तर? विजयची काय प्रतिक्रीया असेल? आत्याने कींवा विजयने आइला फोन केला तर? आत्याने आणि विजयने नेहाला कसे काय विचारले असेल? नेहाला फोन करावा का? तीथून नीघून दीड तास झाला तरी मी नेहाला फोन केला नव्हता. नेहाने काय विचार केला असेल?
तंद्रीतून जागा झालो जेव्हा माझ्या कानावर शब्द पडले, "ओ साहेब, लास्ट स्टॉप आला उतरा"
गप उतरुन घरच्या वाटेला लागलो. घरी जावसं वाटत नव्हतं. आत्याचा चेहरा आठवत होता. आता नेहाला फोन करावा का? की उद्या करावा?
दुसर्या दीवशी नेहाला फोन केला.
"हेलो नेहा"
"......"
"हेलो?"
"बोल"
"काय झालं, बोलत का नाहीयेस?"
"काय व्हायचंय?"
"आत्या काय बोलली का?"
"बोलली? एक तास लेक्चर दीलं..."
"अरे पण तू सांगायचं ना की तो फक्त मॅच बघायला आला होता"
"तू खरंच मॅच बघायला आला होतास?"
"म्हणजे...ते मॅच होतीच ना"
"तू फक्त मॅच बघायला आला होतास? मला भेटायला आला नव्हतास?"
"हा ते..."
"संदीप, तु असं मूळूमूळू बोलत राहीलास तर काही होणार नाही पुढे" नेहा रडायला लागली.
"नेहा रडू नकोस"
"रडू नको तर काय करु? कीती बोलली आत्या मला माहीती आहे तुला"
"पण असं काही झालं नव्हतं नेहा"
"झालं नव्हतं रे.. पण विचार करणार्यांना काही सीमा नसतात. आणि ज्यांच्या घरात तरणीताठी मुलगी असते त्यांचे विचार तर कसेही उधळत असतात."
"विजयला पण सांगीतले का?"
"सांगीतलं असेल. तो पण काल पासून बोलला नाहीये"
"आत्याने माझ्या घरी फोन केला होता का?"
"ते मला कसं माहीती असणार? तुच विचार"
"बापरे मला आता आत्याशी बोलायची हींमत नाही होणार."
"मग नको करुस. बस असाच. काही होणार नाही तुझ्याकडून"
"नेहा"
"तू आता थोडे दीवस मला फोन करु नकोस. थोडे दीवस जाउदेत मग बघू"
"ओके नेहा..बाय"
हायला पहीले मस्त आझाद पंछी होतो ते बरं होतं. घरी कळलं तर अजून डोक्याला ताप. रोज ऑफीसला जायचो सांगीतलेले काम करायचो आणि परत घरी. एकदम सपक लाइफ चालू होते. कधी कधी नेहाला शाळेत असताना फोन करयचो पण ती तूटक बोलत असे. अतूलला सांगावे का सगळे? नको उगाच गावभर बोभाटा होइल. साला पगार पण वाढत नव्हता...दोन महीने असेच गेले.
एका संध्याकाळी नेहाचा फोन. प्रचंड घाबरलेला आवाज.
"संदीप तु कुठे आहेस?"
"मी घरी आहे नेहा काय झालेय?"
"अरे एक प्रोब्लेम झालाय"
"बोलना काय झाले?"
"अरे आमच्या सोसायटीमधून बाहेर पडल्यावर लगेच एक कीराणामालाचे दुकान आहे. मी कधी कधी जाते काही हवं असेल तर आणायला. खूप जुनं दुकान आहे ते. त्या दुकानावर एक तरुण मुलगा असतो नेहमी. मला त्याच्या मनात काय आहे हे माहीत नव्हते. त्या दीवशी मी शँपू आणायला गेले होतो तर दुकानात कोणी नव्हते तर त्याने पैसे देताना माझा हात धरला. मी हात झटकला आणि तडक घरी आले. विजयला झाला प्रकार सांगीतला. विजय त्याच्याशी जाउन बोलला. तर विजयला त्याने धक्काबुक्की केली. त्यांचं खूप मोठ प्रस्थ आहे रे या एरीयात"
"बापरे"
"तू ये ना लगेच, मला भीती वाटतेय."
"नेहा तू काळजी करु नकोस. मी विजयला फोन करतो."
विजयला फोन केला. विजय पण थोडा घाबरलेला होता. त्याला काय करावे सुचत नव्हते. विजयला धीर दीला आणि संगीतले की काही काळजी करू नकोस मी बघतो काय करायचे ते. ताबडतोब माझा वर्गमीत्र सुशांतला फोन केला. जो नुकताच पोलीस उपनिरीक्षक म्हणून नायगाव पोलीस स्टेशनला भरती झाला होता. पहीलंच वर्ष, काहीतरी करुन दाखवायची इच्छा. असा हा माझा मित्र. मलाही पोलीसच व्हायचं होतं पण राहीलं. सुशांतच्या कानावर सर्व प्रकार घातला. सुशांतने लगेच मला नायगावला बोलावले. मी सुटी काढून नायगावला गेलो. सुशांतची शिफ्ट संपली होती. बरेच दीवसांनी भेटत असल्यामुळे इकडतीकडच्या गफ्फा झाल्या. सुशांत साधे कपडे घालून माझ्याबरोबर निघाला. आम्ही थेट बोरीवली पोलीस स्टेशनात गेलो. सुशांतने तेथील साहेबांना काहीतरी सांगीतले आणि मला म्हणाला चल.
मी म्हणालो,"कुठे?"
"कुठे म्हणजे, दाखव ना कुठे आहे ते दुकान!!"
"अरे मलाही माहीत नाही एक मीनीट विचारतो"
विजयला फोन केला. आणि खाली यायला सांगीतले. थोड्याच वेळात मी आणि सुशांत नेहाच्या एरीयात गेलो. विजय तीथे उभा होताच. विजय आणि सुशांतची ओळख करुन दीली. विजयने लांबूनच दुकान दाखवले आणि त्यात उभा असलेला तो मुलगा दाखवला. आम्ही बाहेर उभे राहीलो आणि सुशांत आत गेला आणि तो त्या मुलाला बाहेर घेउन आला. तो मुलगा अनिच्छेनेच बाहेर आला.सुशांत ने त्याला विचारले, "नाव काय तुझे?"
"माझे नाव प्रकाश, काय काम आहे लवकर बोला मला दुकानात काम आहे"
विजय पुढे झाल्यावर प्रकाशला अंदाज आला. सुशांत प्रकाशला म्हणाला, "हे बघ प्रकाश, आम्हालाही जास्त वेळ नाही. विजयची बहीण नेहा हीचा तू हात धरलास आणि वर त्याला धक्काबुक्की केलीस हे चांगले केले नाहीस. परत असे काही करु नकोस."
प्रकाश उर्मटपणे म्हणाला, "ओ कोण तुम्ही, मला का सांगताय? मी कोणाला घाबरत नाय. तुम्हाला काय करायचं ते करा, चालायला लागा इथून" आणि प्रकाश परत दुकानाकडे चालायला लागला.
सुशांत तसा नावाचा सुशांत होता. शांत तर अजीबातच नव्हता. त्याने प्रकाशला मागून धरले आणि उलटे फीरवून जोरात एक कानाखाली हाणली. प्रकाश प्रतिकार करु लागला पण सुशांतच्या बलदंड शरीरापुढे त्याचे काही चालेना. सुशांतने एकदोन ठोसे लावल्याबरोबर प्रकाशच्या नाकातोंडातून रक्त येउ लागले आणि तो खाली पडला. लगेच गर्दी जमली. प्रकाशचे वडील आले. प्रकाशला उचलून त्यांनी दवाखान्यात नेले.
झाला प्रकार आम्हाला अनपेक्षीत होता. प्रकाशला फक्त समज द्यायची असे ठरले होते. पण सुशांत स्वत:ला आवर घालू शकला नाही. करायला काय गेलो आणि झाले काय. विजय प्रचंड घाबरला. प्रकाशच्या वडीलांनी तडक बोरीवली पोलीसात तक्रार नोंदवली. सुशांत म्हणाला की तुम्ही काही घाबरू नका मी मॅनेज करतो सगळं. आम्ही तीघे बोरीवली पोलीस स्टेशला गेलो तीथे प्रकाश प्राथमिक उपचार घेउन हजर झाला होता. प्रकाशचे वडीलही तीथेच होते. त्यांना काहीच माहीती नव्हती. आम्ही तीथे पोहचताच स्थानिक निरिक्षकांच्या कानावर झाला प्रकार घातला. हे सर्व प्रकाशच्या वडीलांसाठी नवीन होते. त्यांनी सर्वांसमोर हे खरे आहे का हे प्रकाशला विचारले. प्रकाशने हे सर्व खरे आहे हे सांगीतलेच पण पुढे जे काही म्हणाला ते विचीत्र होतं.
प्रकाश म्हणाला की, "नेहाचं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही लग्न करणार आहोत."
(क्रमश:)
प्रतिक्रिया
2 Aug 2016 - 5:00 am | रषातु
मी पहिला.
अतिशय सुंदर. आणि धक्कादायक वळण घेतले आहे कथेने.
2 Aug 2016 - 5:27 am | अगोचर
मज्जा येतिये वाचायला ! येउद्या लवकर लवकर !!
2 Aug 2016 - 6:22 am | यशोधरा
अरर्र, हे काय!
2 Aug 2016 - 7:18 am | असंका
अरे..? आता काय?
सुरेख लिहिताय...धन्यवाद!
पुभाप्र..!
2 Aug 2016 - 7:32 am | स्रुजा
आँ!!!
2 Aug 2016 - 8:23 am | एस
अर्रर्र! ह्या काय?
2 Aug 2016 - 8:33 am | नीलमोहर
ट्विस्ट,
2 Aug 2016 - 9:00 am | नाखु
तेच कळेना !!!
अनपेक्षीत वळण का काही नवेच प्रकरण?
पुभाप्र
2 Aug 2016 - 9:29 am | श्रीरंग_जोशी
कथानायकाविषयी दया वाटली...
लेखनशैली नेहमीप्रमाणे खिळवून ठेवणारी. पुभाप्र.
2 Aug 2016 - 10:01 am | प्रीत-मोहर
हायला!!!! हा प्रकाश कुठुन उपटला मधेच?
2 Aug 2016 - 1:54 pm | जगप्रवासी
कथेची गाडी इतक्या वेगात जात असताना अचानक असा टर्न??? भारी. वाचायला मजा येतेय.
2 Aug 2016 - 2:05 pm | सुंड्या
या भागाचा शेवट त्या इंडीयन मुर्ख डब्ब्यावर येणा-या सिरीयल सारखा केला.
2 Aug 2016 - 2:06 pm | पद्मावति
वाह, मस्तं ट्विस्ट कथेत. वाचतेय.
2 Aug 2016 - 2:18 pm | ज्योति अळवणी
मस्त.... उत्सुकता वाढली आहे. लवकर लिहा पुढचा भाग
2 Aug 2016 - 2:20 pm | उडन खटोला
प्रकाश म्ह्णतो तसं एक्मेकांचं प्रेम आहे तर पोरीनं कथानायकाला (खटपट्या नव्हे, ते फ्क्त लेखक राव आहेत) फोन का केलाय?
जान्नेकेलियेवाचतर्हा ती- भाग ८
(ते झालं, ती सुरु आहे, तो कधि येणार?)
2 Aug 2016 - 7:28 pm | खटपट्या
रताषु, अगोचर, यशोधरा, असंका, स्रुजा, एस, नील्मोहर, नाखू, श्रीरंग, प्रीतमोहर, जगप्रवासी, सुंड्या, पद्मावती, ज्योती अलवनी, उडन खटोला सर्वांचे आभार
2 Aug 2016 - 10:58 pm | पैसा
हे काय आता नवीन!
4 Aug 2016 - 6:55 am | अभिजीत अवलिया
विचारात पडलेली स्मायली ...
4 Aug 2016 - 9:02 am | नावातकायआहे
मुंड्क्या वर पडलेली स्मायली ...
4 Aug 2016 - 10:30 am | रातराणी
ज ब रा! भारी ट्विस्ट.
17 Aug 2016 - 3:05 pm | गिरिजा देशपांडे
पुढचा भाग कधी???????????????
17 Aug 2016 - 6:42 pm | एकनाथ जाधव
+१००
17 Aug 2016 - 8:20 pm | खटपट्या
सॉरी, सॉरी. लीहीतो लगेचच.
17 Aug 2016 - 6:41 pm | एकनाथ जाधव
+१००
21 Sep 2016 - 5:35 am | हेमन्त वाघे
पुढचा भाग कधी???????????????
पुढचा भाग कधी???????????????
पुढचा भाग कधी???????????????
पुढचा भाग कधी???????????????