"ती"
"ती" - २
"ती" - ३
"ती - ४"
"ती" - ५
रात्री कधी झोप लागली ते कळलेच नाही. जाग आली तेव्हा गाडी गावात पोचली होती आणि लोक खाली उतरुन आपापले सामान खाली उतरवण्याच्या मार्गाला लागले होते. नेहा दीसत नव्हती. अतुल अजून झोपलाच होता. झोपून माझा चेहरा भुतासारखा झाला होता. नेहाने मला या अवतारातच पाहीले असणार. मी सकाळी स्वतःला आरशात बघायचे टाळतो. दीवसभर इनफीरीयारीटी कॉम्प्लेक्स घेउन वावरावे लागते. असो आपल्या चेहर्याची ठेवण आपल्या हातात नसतेच.
सावकाश खाली उतरलो. आइ आधीच खाली उतरुन इकडेतीकडे बघत उभी होती. मी माझे सामान गोळा करुन तीला चल म्ह्णालो तरी प्रतिसाद दीला नाही. अचानक काय झाले काय माहीती. ह्या आया लोकांचे कधी काय होइल सांगता येत नाही. कधी कोणत्या गोष्टीचा राग येइल, कोणत्या गोष्टीमुळे फुरगटून बसतील सांगता येत नाही. कॉलेजमधे असताना एक मुलगी सहज घरी आली होती नोट्स मागायला तर हीने तीची कुंडली काढली होती माझ्याकडून. कोण, नाव काय,आडनाव काय, कुठे रहाते, कीती दीवस ओळखते तुला, तुझ्याकडेच का आली नोट्स मागायला, याआधी कधी का आली नाही, परत येणाराय का, घरी कोण कोण असते....हायला सीआयडीमधे पाहीजे होती ही. उड्त्याचे पंख मोजणे म्हणजे आमच्या आईचा हातचा मळ. हीच्या या स्वभावामुळे मित्र माझ्या घरी यायला नाखूष असत... आता थोडा रागीट चेहरा करुन माझ्या पुढे चालू लागली. कारण काय काही माहीत नाही. जे होइल ते होइल या विचाराने मी आईच्या मागोमाग चालू लागलो.
आजोळच्या घरी पोचताच सर्वांना नमस्कार सोपस्कार झाले. हा कोण, एवढा मोठा झाला? काय करतो? बघा वर्ष कधी पटापट गेली कळलीच नाही अशा अर्थाचे सर्व संवाद झाले. माझी नजर नेहाला शोधत होती. गावात काही म्हणजे काहीच फरक पडला नव्हता गेल्या ९/१० वर्षात. नाही म्हणायला घराच्या मातीच्या भींती जाउन चिर्याच्या भींती आल्या होत्या. काही खोल्यांमधे मातीची जमीन जाउन फरशी आली होती तर काही खोल्यात अजूनही मातीचीच जमीन होती. मी सरळ वीहीरीवर जाउन थंड पाण्याने अंघोळ करुन आलो. कपडे बद्लून ओटीवर येउन बसलो तर नेहा चहा घेउन उभी. मी चपापलो, तीच्या हातातून चहा घेतला. उगाच थँक्स म्हणालो. त्याबरोबर तीचे आइबाबा बाहेर आले. बाबा म्हणाले, "मालतीचा नारे तू?"
मी म्हणालो, "हो"
"मग हे येता जाता थँक्स बँक्स नाय बोलायचे समजले? घरी पण असेच सारखे थॅक्स म्हणतोस का?"
"नाही ते..."
"अरे इकडे एकदम घरच्यासारखे रहायचे"
"ओके"
"परत ओके? अरे काय हाफीसात हायस की काय?"
"नाही ते...."
"असूदे असूदे"
मामा काय बोलण्यात कोणाला हार मानणारे नव्हते. शेवटी कोकणातीलच रक्त. नेहमी तीरसटच बोलणार...
"बर आता रात्रभर प्रवास करुन आला आहेस, आराम कर"
"ठीकै"
"काय करतोस सद्या"
"(हायला आराम पण करायला सांगतायत आणि प्रश्न पण थांबवत नाहीयेत) आता नवीन नोकरी लागलीय"
"बरं, पगार व्यवस्थीत आहे?"
"मामा, अजून पहीला पगार झाला नाही"
तेवढ्यात आतून मामीने "अहो कीती प्रश्न विचाराल?" असे म्हणून माझी सुटका केली...
आजोळचे घर तसे ऐसपैस. ओटी सोडून सात खोल्या होत्या. पाहूण्यांनी घर भरले होते. माझी नजर या खोलीतून त्या खोलीत नेहाला शोधत फीरत होती. तेवढ्यात अतुल कुठूनसा आला.
"काय रे घरात काय करतोयस? चल बाहेर फीरुन येउया?"
"हो जाउया की! तू कुठे होतास एवढावेळ?"
"अरे मी नेहाबरोबर फुलं काढायला गेलो होतो परसात"
"हम्म, चल बाहेर जाउन येउया"
चालत चालत धरणाच्या दीशेने निघालो. अतुल म्हणाला "अरे धरण पूर्ण झाले आहे आणि आता पाण्याने पुर्ण भरले आहे. मस्त पिकनीक स्पॉट झाला आहे"
तसं पहायला गेलो तर अख्खा गावच एक पिकनीक स्पॉट होता आणि आता त्यात धरणाची भर पडली होती. मी म्हणालो, "काय रे अतूल तुला बरीच माहीती आहे गावच्या घडामोडींबद्दल. गावी नेहमी येतोस का तू?
"वर्षातून एखादी फेरी असतेच रे, तू मात्र येणं टाकलंस आमच्या गावात?"
"अरे यार कधी आलो की तुम्ही लोक पहील्यासारख्या जोड्या लावायला सुरवात करता. मला नाही ते आवडत"
"अरे आता नाही चिडवत कोण कोणाला, सगळे मोठे झालेत. पण काय रे तुला आठवतं का तुझी जोडी कोणाबरोबर लागायची ते?"
"न आठवायला काय झालं?"
"ह्म्म, मग आता पण ती जोडी लागावीशी वाटतेय का?"
"परत तुझं चालू झालं यार! चल मी जातो"
"अरे थांब रे. घरात खूप गर्दी आहे, खूप चावचाव चालू आहे. कुठे जातो त्या गर्दीत..."
अतुल म्हणत होता तेही खोटे नव्हते. पण या अतुलला मनातील सर्व उलगडून सांगणे बरे वाटत नव्हते. कुठे कधी ओकेल काही सांगता येत नव्हते. पण मनातून तीची मुर्ती काही हलता हलेना.
अतुलला विचारले, "कारे अतुल, तुला माहीत आहे का मुंबईला विजय कुठे रहातो ते?"
"विजय? म्हणजे नेहा विचारायचंय तुला?
"हो तेच"
"माहीत आहे. जायचंय का?"
"नाही रे माहीती असलेली बरी"
"हो एकदा दोनदा गेलोय मे त्यांच्याकडे. कधी जायचे असेल तेव्हा सांग."
"ओके, सांगेन मी. चल आता घरी जाउया"
घरी आलो तर माणसांनी भरलेल्या घरात जावेसे वाटेना. म्हणून अंगणातच कट्ट्यावर बसलो. बाहेरुन आल्यामुळे घरातील सर्व काळोखे वाटत होते. थोड्यावेळाने अंगणातून ओटीवरची माणसे दीसू लागली. नेहा ओटीवर बसून गजरा वीणत होती. मीही असा अँगल लावून बसलो की तीच्याकडे बघतोय हे कोणाला समजणार नाही. नेहा गजरा वीणता वीणता माझ्याकडे बघून न बघीतल्यासारखे करत होती. मीही तीच्याकडे नजरानजर होणार नाही या बेताने बघत होतो. विजय ने लग्नाचे वातावरण तयार करण्यासाठी लाउडस्पीकर लावला. आणि गाणे लावले होते.
भोलीसी सुरत, आंखोमे मस्ती दुर खडी शरमाए,
एक झलक दीखलाए कभी, कभी आंचल मे चूप जाए.
आय हाये, मेरी नजर से तुम देखो तो यार नजर वो आए...
दोनचार दीवस अशीच नेत्रपल्लवी चालू होती. कधी चहा हवाय का? काही हवय का? असे जुजबी प्रश्न ती विचारत असे. मला काय करावे कळत नव्हते. अतुलही आमची नेत्रपल्लवी पाहून काय समजायचे ते समजला. पण मला समजेना हे जमणार कसे? काय करावे? अतुल म्हणाला "अरे नेहासाठी पण स्थळ बघतायत"
"मग?"
"सांगतोय रे तुला"
"ऐकुन काय करु? तीच्या समोर उभी रहाण्याची तरी लायकी आहे का माझी?"
"अरे तु नेहमी स्वतःला कमी काय लेखतोस?"
"अरे कमी नाही लेखत. पण अजून कशात नाही काय. आयुष्यातला पहीलाच जॉब. पुढे काय होणार माहीत नाही...त्यात मी असा हा काळा सावळा"
"अरे असे काही नाही. मुली नेहमी रुपच पहातात असे नाही. स्वभाव आणि बाकीचे गुणही पहातात"
"ह्म्म. तीला काय माहीती माझा स्वभाव कसा आहे?"
"एक्झॅटली"
"म्हणजे?"
"अरे तु पुढे झालासच नाही तर कसे जमणार? तीच्याशी बोलत जा. ओळख वाढव"
"ए अतुल, बास हा. उगाच झाडावर चढवू नकोस. काही होणार नाही माहीती आहे मला"
"अरे प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे?"
"प्रयत्न? कोण करणार? मला हे असलं काही फील्मी वगैरे जमणार नाही. आणि काय रे तुला का एवढा इंटरेस्ट या सगळ्यात?"
"तसं नाही रे. ती माझी बहीणच लागते. मला माहीत आहे ती कशी आहे. घरचे म्हणतील त्याच्याबरोबर लग्न करेल. कसाहे असेना का. कोणा अनोळखी मुलाबरोबर लग्न लागण्यापेक्षा तू काय वाइट आहेस?"
"अतुल, तुला समजतेय तू काय बोलतोयस? मस्करी करतोयस? तीचे वडील व्यवस्थीत स्थीरस्थावर झालेला मुलगा शोधतायत. ज्यात मी कुठेच बसत नाही. मी तीला अनुरुप अजीबात नाही. जाउदे विषय सोड."
"तुझ्या मनात काय आहे सांग ना"
"माझ्या मनात ढीग आहे म्हणून का झालंच पाहीजे का?"
"समजा ती हो म्हणाली तर?"
"पण जे होणार नाही त्याचा कशाला विचार करायचा?"
"ते तू माझ्यावर सोड!"
"अतुल? बरा आहेस ना? काय लफडी नकोयत मला. व्यवस्थीत घरी जायचंय, उगाच सर्वांसमोर शोभा नको. खबरदार काही केलेस तर"
"चींता नको करुस. तुझ्यावर काही येणार नाही"
"हे बघ मी कशात नाहीय, मला काही माहीत नाही. आपला काही विषय झाला नाही. तु जा इथुन"
"ठीकै, मी जातो, पण समजा तीचा होकार असेल तर?"
"परत तेच? तीचा होकार असेल तर मी काय वेडा आहे नाही म्हणायला"
"हां, आत्ता कसं......आलंकी नाही मनातलं बाहेर?"
"अरे यार अतुल, प्लीज नकोरे लफडी. आधीच आइ तीकडे रागात आहे."
"ओके, तु बिंधास्त रहा. मी काही करणार नाही. काही पॉझीटीव असेल तर सांगेन"
अतुल गेला. माझ्या पोटात मोठा गोळा आला. हा वेडा मुलगा काही करणार तर नाहीना. झक मारली आणि याच्याबरोबर विषय काढला. मी लवकरात लवकर परत जायचा विचार करु लागलो.
अतुल आता नेहाबरोबर जास्त दीसत असे. दोघे तासनतास काहीतरी बोलत असत. ते दोघे बोलत असताना मी समोर आलो की नेहा कावरीबावरी होत असे तर अतुलच्या चेहर्यावर छद्मीपणाचे भाव असत. दोन दीवस तीने चहा हवा का, कींवा काही हवे का हेही विचारले नव्हते. नेहा तशी धीट होती कोणाला घाबरणारी तर अजिबात नव्हती. सर्वांबरोबर व्यवस्थीत बोलत असे. शिक्षणक्षेत्राबाबत तीला विषेश जाण होती हे तीच्या बोलण्यातून जाणवत असे. पण व्यवस्थीत गप्पा रंगल्या असताना मी आलो की एकदम गप्प आणि तोलून मापून बोलत असे. मला घाबरत होती की काय? का त्या अतूलने माझा विषय हीच्याकडे काढला होता?
क्रमश:
प्रतिक्रिया
11 Jul 2016 - 12:17 pm | रातराणी
=))
पुभाप्र.
11 Jul 2016 - 12:43 pm | लालगरूड
नेहा ♥
11 Jul 2016 - 1:44 pm | पैसा
लिहा पटापट पुढचा भाग!
11 Jul 2016 - 5:30 pm | जगप्रवासी
लवकर येऊ दे पुढचा भाग
11 Jul 2016 - 6:32 pm | शि बि आय
लवकर येऊ द्या तुमच्या लव्हष्टुरी पुढचा भाग...
11 Jul 2016 - 6:54 pm | पद्मावति
देर आयें दुरुस्त आयें!!
सुंदर झालाय हा भाग पण. आता पूढचे भाग प्लीज़ लवकर टाका.
11 Jul 2016 - 8:19 pm | खटपट्या
सर्वांचे आभार.
ही कथा अती काल्पनिक आहे याची क्रुपया नोंद घेणे
11 Jul 2016 - 8:24 pm | नीलमोहर
छान लिहिताय,
पुभाप्र.
11 Jul 2016 - 10:47 pm | चाणक्य
सगळे भाग वाचून काढले. चांगली चाललीये कथा.
12 Jul 2016 - 12:13 pm | नाखु
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
मिपावर वाचनीय ही आहे यावर विश्वास असलेला नाखु
12 Jul 2016 - 7:35 pm | खटपट्या
माझ्या लेखनामुळे तुम्हाला मिपा वाचनीय वाटतेय हे ऐकून भरून पावलो.
12 Jul 2016 - 1:03 am | धनंजय माने
एवढ्या गॅप नंतर देखील कंटुनीटि (;)) चांगली मेंटेन केली आहे. सो प्लीज ती ब्रेक न करता नेक्स्ट पार्ट्स स्पीड ने पोस्ट करा.
12 Jul 2016 - 1:06 am | धनंजय माने
आणि हो, तुमची स्वत:ची लव्हस्टोरी नसताना इतकं कंव्हीन्सिन्गली कॅरक्टर डेवलोप केलंत ते ऑसम आहे.
12 Jul 2016 - 2:12 am | खटपट्या
धन्यवाद. मला आधी सगळे भाग वाचावे लागले आणि मग पुढे लीहीत गेलो.
माझी स्टोरी नाही हे समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.
12 Jul 2016 - 12:20 pm | संजय पाटिल
चांगली चालू आहे कथा..
बाय्दवे काल्पनिक आहे, माझी नाही आहे असे सारखे का सांगताय? ;)
12 Jul 2016 - 7:36 pm | खटपट्या
अहो काही मित्र मंडळी हायेत ते लगेच चालू करतात.....
12 Jul 2016 - 2:17 pm | कैलासवासी
"ती" च्या लग्ना आधी पुढचा भाग येऊ द्या.. बाकी एकच नंबर +१११
12 Jul 2016 - 4:22 pm | Jayanti
त्या अतुल चा अन 'ती' चा काही सीन तर नाही ना?
12 Jul 2016 - 7:34 pm | खटपट्या
अतुल तीचा चुलत भाउ आहे, त्यामुळे काही भीती नाही.
13 Jul 2016 - 1:42 am | अभिजीत अवलिया
थोडे फिल्मी होतेय तरी पण आवडतेय कथा. आणी जरा लवकर लवकर टाका पुढचे भाग.