सुरज (हिंदी-उर्दू रचना आणि तिचा अनुवाद)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
28 Jun 2016 - 3:25 pm

न जाने क्या है वहाँ
जो सुरज रोज
सुबह उठकर बिना थके
दिन के चारो पहर की
सारी सीढीया चढ के
ऊपर चला जाता है
---
फिर कुछ देर
दुनिया की जानिब
घूरता रहता है
मानो कोई जंग जित ली हो
---
कभी कभी लगता है
अपने परछाई को हराने का
जूनून सवार है उसपे
---
ओ सुरज, तुम बडे कब होगे?

|-मिसळलेला काव्यप्रेमी-|
(२७/०६/२०१६)

जानिब = दिशा

----------------------------------------------------------------------
(अनुवाद)

असं काय ठेवलंय त्या तिथं,
की हा सूर्य
रोज म्हणजे अगदी रोज
सकाळीसकाळी उठून
जराही न थांबता,
दिवसाच्या चारी प्रहरांचे जिने चढून
हा असा जाऊन बसतो वरती.
---
आणि मग थोडा वेळ
बघत बसतो एकटक
दुनियेच्या पसार्‍याकडे
एखादी मोठ्ठी लढाई जिंकून आल्याच्या थाटात
---
झपाटून गेलाय जणू
स्वतःच्याच सावलीला
हरवायच्या नादात
---
ए सूर्या,
कधी रे होणारेस तू मोठा?

-- एस
(२८/०६/२०१६)

ता. क. : एस भाऊंना मनापासून धन्यवाद.

मुक्त कविताकवितामुक्तक

प्रतिक्रिया

धनंजय माने's picture

28 Jun 2016 - 3:34 pm | धनंजय माने

मिका, तुला ज्या भाषेत चांगलं सुचतंय त्याच भाषेत व्यक्त हो!

अप्रतिम जमलिय. नेहमीप्रमाणेच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2016 - 3:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनुवाद छान झालाय, पण मूळ रचनाच भिडली नाही. म्हणून अशी खास मजा घेता आली नाही.

मिकासेठ, इतकं चांगलं वातावरण आहे, जरा आपल्या पोतडीतून वरीजनल काही येऊ दे...!

-दिलीप बिरुटे

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Jun 2016 - 4:41 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

वरिजिनलच हाये वो....

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2016 - 8:47 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाहव्वा!

चाणक्य's picture

28 Jun 2016 - 9:29 pm | चाणक्य

मूळ रचना आणि अनुवाद दोन्ही मस्त. शेवटची ओळ खलास.

अभ्या..'s picture

28 Jun 2016 - 10:18 pm | अभ्या..

मस्त रे मिका, मला आवडली.
चॅलेंजिंग आहे कविता.
.
"ए सुऱ्या, लका शाना बन कि आता" असं गावठी व्हर्जन टाकूसं वाटतंय. ;)

मिका साहेब....मस्त कविता

बोका-ए-आझम's picture

28 Jun 2016 - 11:09 pm | बोका-ए-आझम

सुंदर!

कवितानागेश's picture

29 Jun 2016 - 12:57 am | कवितानागेश

दोन्हीही रचना छान झाल्या आहेत.
कधी मोठा होणार हा फार थेट प्रश्न होतोय. आणि तो देखील कुणालातरी उद्देशून.
आणि आधीची रचना कथन केल्यासारखी आहे.
शेवटच्या ओळीत स्वगत ही चालले असते.
क्या जाने कब समझेगा, यूं कोई बडा नही होता....

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Jun 2016 - 7:51 am | मिसळलेला काव्यप्रेमी

खरं तर तो प्रश्न सुर्याला उद्देशून नाहीच आहे. असो.

सिरुसेरि's picture

29 Jun 2016 - 2:29 pm | सिरुसेरि

मस्त कविता ... कुठे तरी "विक्रम वेताळ"शी साधर्म्य जाणवले .

नाखु's picture

2 Jul 2016 - 9:27 am | नाखु

अपने परछाई को हराने का
जूनून सवार है उसपे

हे जास्त अस्सल वाटतयं अनुवादात इथेच (आणि फक्त इथेच) काहीतरी निसटले आहे. नक्की शब्दात सांगता येत नाही.

कविता सुरेख.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jul 2016 - 12:20 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त रे मिका.
छानच लिहिली आहे.. अगदी मनापासुन....
पैजारबुवा,