माणूस ..... खलील जिब्रान

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
22 Mar 2015 - 10:13 pm

माझ्या भटकंतीत मी एका बेटावर पोहचलो.
तिथे मला एक राक्षस दिसला. त्याचे शरीर अवाढव्य होते. पायाला लोखंडी खूर होते.
परंतु, त्याचे डोके मात्र माणसाचेच होते.
तो, पृथ्वीवरील घनदाट जंगले, उंच उंच पर्वतं, विस्तीर्ण पठारे, समृद्ध खाणी अधाशीपणे खायचा.
त्याचा तो अधाशीपणा मी बराचवेळ पहात राहिलो. शेवटी त्याला विचारले,
‘ इतके सारे खाऊन पिऊनही , तुझी तहानभूक शमतच नाही का?’
त्यावर राक्षस म्हणाला, ‘मित्रा, तसे तर माझे पोट कधीच भरले आहे!
एवढेच नव्हे, तर मला या खाण्यापिण्याचाही अतोनात कंटाळा आलाय .
पण, माझ्या मनात सारखी एकच भीती असते – उद्या खाण्यासाठी पृथ्वी राहणार नाही, आणि पिण्यासाठी समुद्र राहणार नाही. म्हणून मी आपला सारखा खात-पित राहतो!’

खलील जिब्रानच्या 'The Plutocrat' या रूपक कथेचा भावानुवाद.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

तर्री ताई खलील जिब्रानच्या या अनोख्या कविता आम्हाला अनुवादित रुपात उपलब्ध करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद!!

सर्वच भाषांतरे आणि मुळ कल्पना मनात खळबळ माजवुन जातात.

चाणक्य's picture

10 Apr 2016 - 7:59 am | चाणक्य

सहमत. अजून येऊद्यात. वाचतोय.

उत्कृष्ट कविता उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद !

ही कल्पनाच अफाट आहे !

lgodbole's picture

9 Apr 2016 - 4:45 pm | lgodbole

छान

नाना स्कॉच's picture

9 Apr 2016 - 4:47 pm | नाना स्कॉच

एकच नंबर अव्वल!!

आतिवास's picture

10 Apr 2016 - 8:22 am | आतिवास

आवडलं आणि विचारांत पाडून गेलं हे चिंतन.

होबासराव's picture

11 Apr 2016 - 3:02 pm | होबासराव

तो, पृथ्वीवरील घनदाट जंगले, उंच उंच पर्वतं, विस्तीर्ण पठारे,
त्याचा तो अधाशीपणा मी बराचवेळ पहात राहिलो. शेवटी त्याला विचारले,
‘ इतके सारे खाऊन पिऊनही , तुझी तहानभूक शमतच नाही का?’

अतिअवांतरः- विषयानुरुप प्रतिक्रिया नसल्याबद्द्ल पहिलेच क्षमस्व __/\__.
काल आम्हि नांदेड सिटि मध्ये सदनिका बघण्यास गेलो असता मनात हायलाईट केलेले विचार तरळुन गेले.

जव्हेरगंज's picture

12 Apr 2016 - 9:23 pm | जव्हेरगंज

खळबळजनक कथा!

अतिजबराट !!