१९९९ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेविड डनिंग व जस्टीन क्रुगर यांनी केलेल्या एका मानसशास्त्रीय निरक्षण प्रयोगातून पहिल्यांदा 'Dunning Kruger Effect' या नावाचा एक सखोल अभ्यास समोर आला. सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात.
'डनिंग-क्रुगर इफेक्ट' या अवस्थेत तुलनेने अकुशल व्यक्ती स्वतःची क्षमता खरोखर आहे त्यापेक्षा जास्त समजतात व वाजवी पेक्षा जास्त स्वाभिमान, आत्मविश्वास बाळगतात. कुठलीही टीका अथवा नकारात्मक अभिप्राय त्यांना अजिबात सहन होत नाही. डनिंग व क्रुगर यांना या अभ्यासाची प्रेरणा मेकऑर्थर व्हीलर नामक एका व्यक्ती पासून मिळाली होती, ज्याने लिंबाचा रस हा अदृश्य शाई सारखा काम करतो व तो सीसीटीवी केमेऱ्यात रेकोर्ड होत नाही अशा गैरसमजापोटी तोंडाला लिंबाचा रस फासून बॅंक लुटण्याचा प्रयत्न केला होता.
'डनिंग-क्रुगर इफेक्ट' या स्थितीत असणारे लोक:
- त्यांची अकार्यक्षमता ओळखू शकत नाहीत
- त्यांचे अपुरेपण व मर्यादा ओळखू शकत नाहीत.
- इतरांच्या कुशलते बद्दल नेहमी नकारात्मकच असतात.
- त्या कौशल्याचे पूर्ण ज्ञान आल्यानंतर अथवा योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण अगोदर अज्ञानी होतो हे मान्य करतात.
हा झाला विकीबाबांच्या माहितीचा मराठी अनुवाद आता याची काही उदाहरणे. फेसबुकवर गेल्यानंतर स्वतःचाच फोटो टाकून स्वतःच्या दिसण्याबद्दल स्वतःच स्तुती करणारे लोक पाहिलेत? चित्रपट पाहून आल्यानंतर लगेचच 'My review of XYZ' असे टंकून त्या चित्रपटाचे समीक्षण करणारे लोक पाहिलेत? एखाद्या परीक्षेत अथवा स्पर्धेत काहीच येत नसल्यामुळे अयशस्वी झालेले परंतु लगेचच आइनस्टायीन, बील गेट्स व धीरूभाई अंबानी चे उदाहरण देणारे लोक पाहिलेत? काहीच माहिती नसताना देखील स्वतःचे श्रेष्ठत्व सांगणारे लोक पाहिलेत?
'Love me or hate me but never ignore me' असे किंवा 'maah lyf maah rulez' असे व्हाट्सअप स्टेटस असणारे लोक पाहिलेत?
नसतील पहिले तर ही चित्रफीत पहा:
मला 'डनिंग-क्रुगर इफेक्ट' च्या John Cleese यांनी केलेल्या व्याख्या सगळ्यात भारी वाटतात.
'people who are too stupid to know how stupid they are' आणि 'people who don't know that they don't know'
सेक्स, ड्रायविंग, पोहणे,चेस व टेनिस खेळणे, पालकत्व या गोष्टींमध्ये ही स्थिती सर्वाधिक कॉमन आहे. अमेरिकेत तर जवळपास ९३% लोक स्वतःच्या ड्रायविंग विषयी या मानसिक स्थितीत आहेत.
प्रतिक्रिया
30 Mar 2016 - 12:10 am | श्रीरंग_जोशी
रोचक आहे ही संकल्पना. थोडक्यात लिहिलय पण छान लिहिलय.
30 Mar 2016 - 12:11 am | अमृता_जोशी
धन्यवाद :-)
30 Mar 2016 - 12:18 am | श्रीरंग_जोशी
Woman Swims After Cruise Ship: Susan Brown Tries To Chase Down Husband After Argument
ही बातमी नुकतीच नजरेस पडली.
या बातमीतल्या स्त्रीचे वर्तन डनिंग-क्रुगर इफेक्ट मध्ये धरता येईल काय?
30 Mar 2016 - 12:25 am | अमृता_जोशी
नक्की काही सांगता येणार नाही. थोडे खोदकाम करावे लागेल.
30 Mar 2016 - 12:22 am | निशांत_खाडे
"उथळ पाण्याला खळखळाट फार" आणि "निम हकीम खतरे जान"
ते हेच का?
अवांतर: या विषयावर पहिल्यांदा वाचल्यावर मला फारच रोचक विषय वाटला होता हा. पण नंतर कुठेतरी 'Incomplete knowledge of the Dunning-Kruger effect could give you impostor syndrome' असे वाचायला मिळाले म्हणून असल्या मानसिक स्थितीन्विषयी वाचणे व आंतरजालीय संशोधन करणे मी बंद करून टाकले. कशाला नसत्या उचापती!
30 Mar 2016 - 12:27 am | अमृता_जोशी
अगदी अगदी.
कुठे वाचलेत हे? काही दुवा वैगेरे असेल तर देता का?
30 Mar 2016 - 7:05 am | रेवती
सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात.
वरील माहिती आवडली. हसू आले. आपण सगळेच लोक या परिस्थितीतून कायम जात असतो असे वाटले. काही बाबतीत भ्रमाचा भोपळा फुटतो, मग शहाणपण येते. तिथे सुधारणा होईपर्यंत दुसरीकडे मनाच्या कोपर्यात यास्थितीची सुरुवात होते. मग सव्वाशेर कधी ना कधी भेटतो व त्या बाबतीत शहाणपण येते. हे सतत चालू असते असे वाटते. अर्थात याबाबतीत माझेच म्हणणे खरे असे मात्र नाही. ;)
30 Mar 2016 - 8:00 am | अत्रे
विषय आवडला।
पण या दोन उदाहरणाचा संबंध कसा काय ते नाही कळालं।
चित्रपट पाहून आल्यानंतर लगेचच 'My review of XYZ' असे टंकून त्या चित्रपटाचे समीक्षण करणारे लोक पाहिलेत?
यात DK इफेक्ट कसा काय? परीक्षण तर कोणीही करू शकतो।
एखाद्या परीक्षेत अथवा स्पर्धेत काहीच येत नसल्यामुळे अयशस्वी झालेले परंतु लगेचच आइनस्टायीन, बील गेट्स व धीरूभाई अंबानी चे उदाहरण देणारे लोक पाहिलेत?
हे ती लोकं स्वतःला धीर देण्यासाठी करत असतील। कि बाबा असे पण लोक आहेत जे आधी अपयश येऊन मग मोठे झाले।
30 Mar 2016 - 10:26 am | नीलमोहर
याबाबतीत माझं आवडतं वाक्यः
'स्वतःला अतिशहाणे समजण्यात काहीच प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम दुसर्याला मूर्ख समजण्यात आहे'
बाकी अ जो, आपका लिखाण स्टाईल, आपके विचार, आपके अंदाज, कुछ जाने पहचानेसे लगते हैं..
शायद आपको पहले भी यहीं देखा है ;)
30 Mar 2016 - 12:46 pm | पैसा
30 Mar 2016 - 11:18 am | पक्षी
KRK : DK चं उत्तम उदाहरण!!!
30 Mar 2016 - 12:42 pm | अमृता_जोशी
सही!
30 Mar 2016 - 2:02 pm | टवाळ कार्टा
क्र्क इज अबाव्ह आल =))
30 Mar 2016 - 11:25 am | गॅरी ट्रुमन
मस्त विषय आणि लेख.
मानसशास्त्राविषयी फार वाचलेले नाही. जे काही थोडेफार वाचले आहे ते डॅनिएल कॅनेमन या मानसशास्त्रज्ञाचेच लिखाण. अजून वाचायला आवडेल. तोपर्यंत अशा गोष्टींची ओळख करून देणारे असेच लेख येऊ द्या :)
30 Mar 2016 - 1:34 pm | मराठी कथालेखक
म्हणजे नेमका काय गैरसमज आहे या ९३% लोकांचा ?
30 Mar 2016 - 2:10 pm | lgodbole
सध्या आपला देश असाच आहे ना ?
31 Mar 2016 - 12:51 pm | राजेंद्र मेहेंदळे
नक्की किती "गोडबोले" आहेत? म्हणजे आडनावाने गोडबोले म्हणतोय मी.
30 Mar 2016 - 2:13 pm | श्रीगुरुजी
चांगली माहिती आहे. पण खूपच त्रोटक वाटली. स्वतःबद्दल असे गैरसमज असलेले अनेकजण पाहण्यात आहेत. कदाचित मी स्वतःसुद्धा या अवस्थेतून गेलो असणार.
अशा लोकांना स्वतःची कार्यक्षमता माहिती नसेल असे वाटत नाही. किंबहुना आपली मर्यादीत कार्यक्षमता ओळखूनच स्वतःची कमतरता लपविण्यासाठीच ही मंडळी स्वतः सर्वज्ञ असल्याचा आव आणून इतरांना कमी लेखून स्वतःचे महत्त्व वाढविण्याच्या प्रयत्नात असतात.
30 Mar 2016 - 2:14 pm | भाऊंचे भाऊ
की तो जबरदस्त रोग वाटू लागतो नाही ?
30 Mar 2016 - 2:19 pm | पिलीयन रायडर
परीक्षण लिहीणे ह्या इफेक्ट मध्ये कसं आलं ते कळालं नाही.
फारशी माहिती नसताना उगाच शो ऑफ करणारे किंवा अगदी मनापासुन स्वतःला महान समजणारे लोक पाहिले आहेत.
रेवाक्का म्हणते तसं सगळेच थोड्याबहुत प्रमाणात असे वागत असतातच. टप्पे टोणपे खाऊन लाईन वर येतात सगळेच.
स्वतःला कमी लेखणार्या किंवा आपल्या क्षमतेवर विश्वास नसणार्या मानसिकतेला काय म्हणतात?
30 Mar 2016 - 10:32 pm | अमृता_जोशी
अरेरे.. हे विसरलेच टंकायचे.
हाही DK चा प्रकार आहे. येथे वाचा: https://en.wikipedia.org/wiki/Dunning–Kruger_effect
30 Mar 2016 - 10:44 pm | सतिश गावडे
कमी आत्मसन्मान (low self esteem) असलेली मानसिकता.
30 Mar 2016 - 2:27 pm | वेल्लाभट
रोचक. सविस्तर लिहा की.
30 Mar 2016 - 2:32 pm | मन१
ह्या लिंक मध्ये एकेक दोन दोन ओळींत डनिंग क्रुगर सारख्या संज्ञा दिल्यात
लिंक रंजक वाटली --
http://www.psyfitec.com/p/the-big-list-of-behavioral-biases.html
30 Mar 2016 - 2:33 pm | टवाळ कार्टा
म्हाग्रू कोणत्या लेव्हलला येतात यात :)
30 Mar 2016 - 2:38 pm | वेल्लाभट
हहा.....हाहाहहाहाहाहा !
भनाट असेल त्यांची लेव्हल रे... ९३% लोकांची एकत्रित पण नसेल इतकी.
30 Mar 2016 - 3:48 pm | टवाळ कार्टा
खिक्क...म्हाग्रू आणि केआरके यांची एकदा जुगलबंदी बघायची इच्छा आहे ;)
30 Mar 2016 - 7:57 pm | बॅटमॅन
माझी अजूनेक इच्छा म्हणजे वागळे विरुद्ध अर्णब यांची जुगलबंदी पाहणे.
30 Mar 2016 - 4:36 pm | अजया
:)
मानसशास्त्रावर चांगले लिहिणाऱ्या एका आय डिची आठवण आली वाचताना!
30 Mar 2016 - 7:28 pm | स्वधर्म
नार्सिसिस्ट: स्वत:विषयी अत्यंत अवास्तव कल्पना बाळगणारे व स्वत:च्या प्रेमात पूर्ण बुडून गेलेले I Specialist
Narcissistic Personality Disorder (NPD) गुगलून पहा. मजेदार!
30 Mar 2016 - 9:47 pm | सतिश गावडे
>>Narcissistic Personality Disorder (NPD) गुगलून पहा. मजेदार!
नार्सिसिझम हा मजेदार विषय नाही. टोकाचे नार्सिसिझम असलेली व्यक्ती आई किंवा वडील किंवा आयुष्याचा जोडीदार असेल तर आयुष्याचा नरक होऊ शकतो.
31 Mar 2016 - 11:37 am | स्वधर्म
मजेदार नसतेच. त्याला नार्सिसिझमही अपवाद नाही. माणूस स्वत:विषयी एवढ्या अवास्तव कल्पना कशा बाळगू शकतो, या अर्थाने मजेदार म्हटले होते. DMS classification काही कारणाने पहावे लागले होते, तेव्हा अगदी कोडे सुटल्यासारखे वाटले होते.
30 Mar 2016 - 10:45 pm | अमृता_जोशी
फरक भरपूर आहेत, पण थोडक्यात सांगायचे झाले तर Narcissism हा एक मानसिक आजार आहे, DK ही एक नॉर्मल मानसिक स्थिती आहे, एका ठराविक काळानंतर व्यक्ती थाऱ्यावर येते, उपराचाराची गरज पडत नाही (बहुतेक वेळा).
Narcissism मध्ये ती व्यक्ती धोकाधायक प्रमाणात स्वतःच्या प्रेमात पडलेली असते, DK मध्ये ती व्यक्ती फक्त स्वतःच्या क्षमतेला आहे त्या पेक्षा जास्त दाखवते.
31 Mar 2016 - 1:33 pm | टवाळ कार्टा
म्हणजे पुणेकर म्हणा की =))
31 Mar 2016 - 2:11 pm | अमृता_जोशी
ख्याख्याख्या :-D
31 Mar 2016 - 2:30 pm | नीलमोहर
बेअरिंग सुटतंय.
31 Mar 2016 - 2:34 pm | अमृता_जोशी
सुटू द्या हो..
30 Mar 2016 - 7:50 pm | होबासराव
वाचल्या बरोबर जो आय डी डोळ्यासमोर आला ते फक्त मानसशास्त्रावर चांगले लिहित नाहित तर अध्यात्मा वर हि त्यांचि प्रचंड पकड आहे. :)
31 Mar 2016 - 10:58 am | अजया
:)
30 Mar 2016 - 7:57 pm | बॅटमॅन
मराठी आंजावर याबद्दल लिहिलेले प्रथमच पाहिले. छान.
30 Mar 2016 - 10:27 pm | अमृता_जोशी
Is this a complement?
30 Mar 2016 - 10:45 pm | सतिश गावडे
तुम्हाला काय वाटते?
30 Mar 2016 - 10:51 pm | अमृता_जोशी
"मराठी आंजावर याबद्दल लिहिलेले प्रथमच पाहिले" यात माझी कामगिरी नेमकी काय ते कळले नाही.. =))
30 Mar 2016 - 11:48 pm | स्रुजा
काँप्लीमेंट च आहे हो, कुणाच्या मनात नाही आले ते तुम्हाला लिहावेसे वाटले ही चांगलीच गोष्ट आहे की :)
ते जोशांच्या क्लास ला जातात त्यामुळे प्रश्नाला प्रतिप्रश्न करतात :प
लेख छान लिहीलाय तुम्ही पण अजुन सविस्तर वाचायला आवडेल. अनेकांसारखाच मला ही सिने परिक्षण लिहीण्यात ही मानसिकता कशी दिसते ते अजुन कळलेलं नाहीये.
31 Mar 2016 - 12:23 am | बॅटमॅन
वेल्ल ओफ चोउर्से इत इस. व्ह्य वोउल्द योउ थिन्क ओथेर्विसे?
31 Mar 2016 - 1:33 pm | टवाळ कार्टा
बेचौसे ओफ फेमले नतुरे? ;)
31 Mar 2016 - 2:18 pm | नीलमोहर
आह्यु सुरे इतस अ फेमले,
आह थिनक ओथरविस
31 Mar 2016 - 2:29 pm | टवाळ कार्टा
नो वोर्रिएस, इत्स ओक
31 Mar 2016 - 2:35 pm | नीलमोहर
यु दिदंत अंदर्सतांद
31 Mar 2016 - 2:52 pm | अमृता_जोशी
व्ह्य दोन्त यु एक्ष्प्लेन? अन्द अल्सो तेल व्ह्य दोएस इत बोथेर यु?
31 Mar 2016 - 3:19 pm | तर्राट जोकर
बुल्ल'स एये
31 Mar 2016 - 3:44 pm | अमृता_जोशी
वाट दु यु मेअन सर?
31 Mar 2016 - 4:10 pm | तर्राट जोकर
योर क्वेश्चन इज टु द वेरी प्वाइण्ट. उन्देर्स्तन्द?
31 Mar 2016 - 4:17 pm | अमृता_जोशी
एस एस.. थंक यौ!
31 Mar 2016 - 3:20 pm | नीलमोहर
'बाकी अ जो, आपका लिखाण स्टाईल, आपके विचार, आपके अंदाज, कुछ जाने पहचानेसे लगते हैं..
शायद आपको पहले भी यहीं देखा है.'
- आह रिपीत मा अबव रिप्लाय, आंद इत दजंत बोथर मी ईन एनिवेय राद आहम अम्युसद
31 Mar 2016 - 3:37 pm | अमृता_जोशी
दोन्त यु थिंक इट्स योर ओव्न थोउत? व्ह्य दो यु वंत तो साय इत अगैन अन्द अगैन? अन्द वात मेड यु अमाझेद?
सोर्र्य फोर बेईन्ग रुद... प्लीस फोल्लोव द फोल्लोविंग लिंक :
संपादित
सर्व सदस्यांनी व्यक्तिगत पातळीवरची टिप्पणी / ताशेरे / हल्ले टाळावेत.
31 Mar 2016 - 4:27 pm | नीलमोहर
इतस ओके इफ यु कांत हेल्प बेईन्ग रुद...
बत आह दोंत वांत तु फुरथर वेस्त माह देता ऑन सिलि थिनग्स, सो पलीज किप वोडेवर इत इस फो युरसइल्फ,
आंद व्हा आ यु गेतिंग दिस्तरबड इफ इतस नौत्त तुरू, लिव इत,
बेब्झ देट्स ओल फ्रोम माह सायद, नाओ एक्सकुसे मी.
.
31 Mar 2016 - 11:53 pm | बॅटमॅन
नो बुत एवेन इफ योउ दिद सी हेर बेफोरे इन सोमे फोर्म ओर थे ओथेर ओन मिप, व्हत दिफ्फेरेन्चे थत मके? थेसे जुद्गेमेन्तल औन्त्य मेन्तलित्य इस सो स्त्रोन्ग ओन मिप उन्फोर्तुनतेल्य.
1 Apr 2016 - 12:06 am | तर्राट जोकर
औन्त्य ====== ))))))))
1 Apr 2016 - 11:08 am | नीलमोहर
ओफ्चोउर्से इत दोएस्न्त मके अन्य दिफ्फेरेन्चे, एनिवन चन तके अन्य व्हिच नुम्बेर ओफ इद्स नो प्रोब्लेम, बुत इफ योउ अरे प्लयिन्ग अ पर्त अत्लेअस्त दो इत चोन्विन्चिन्ग्ल्य, नो पोइन्त इन पुत्तिन्ग ओन अ मस्क इफ पेओप्ले चन सी योउर रेअल फचे बेहिन्द इत, थेय विल्ल त्र्य तो लूक बेहिन्द ओर पुल्ल ओफ्फ थे मस्क, हुमन नतुरे योउ सी. (ओफ चोउर्से नोत सयिन्ग शेस पुत ओन अ मस्क फोर सुरे, जुस्त इफ इत इस सो)
फोर एक्षम्प्ले इन अ मोविए थे अच्तोर प्लय्स थे चरच्तेर हे इस ओन स्च्रीन, नो उसे इफ हे इस प्लयिन्ग हिम्सेल्फ थेरे तू. तके प्रियन्क चोप्र, एवेन इफ शे इस प्लयिन्ग झिल्मिल, कलि, आभा, वे सी ओन्ल्य प्रियन्का थेरे.
व्हिले विथ विद्य बलन, वे सी क्रिश्ना, ललिता, विद्या बग्चि, सिल्क, वे दोन्त सी विद्य थेरे, गोतित..
इ सी योउ लिके थिस 'औन्त्य' वोर्द अ लोत ;)
बुत व्हत इस थिस औन्त्य मेन्तलित्य, अरेन'त योउ बेइन्ग जुद्गेमेन्तल हेरे, योउ हते गेनेरलिझतिओन व्ह्य दो इत योउर्सेल्फ्फ, एवेन उन्च्लेस इन्दुल्गे इन थेसे थिन्ग्स. इ अम नोत थे ओन्ल्य ओने व्हो सिअद थत तो हेर ओथेर्स हवे अल्सो सैद इत.
अन्य्वय्स, हेरेओन विल्ल जुस्त लेत थे गिर्ल बे. इ रेस्पेच्त योउ अन्द दोन्त वन्त तो अर्गुए फुर्थेर अन्द चन्गे थिस ए॑उअतिओन ओवेर ओथेर्स सो लेत्स जुस्त स्तोप हेरे :)
1 Apr 2016 - 11:38 am | अमृता_जोशी
यौ अरे आगिन फोर्चिंग यौर ओपिनिओन... व्हय द हेल दो यौ एक्ष्पेच्त मी टो दो सोमेथिङ्ग?
संपादित
सर्व सदस्यांनी व्यक्तिगत पातळीवरची टिप्पणी टाळावी. सदस्यांना उद्देशून अपशब्द वापरल्यास सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते.
1 Apr 2016 - 12:48 pm | तर्राट जोकर
आरं काय टिर टिर चाल्लिया हिथंसा. भांडायचं तर जरा मर्हाटीत भांडाना च्यामाडी तुम्ही सगळे लोक ;).
1 Apr 2016 - 3:10 am | अगम्य
I think it is a compliment.
30 Mar 2016 - 11:41 pm | जुइ
रोचक संशोधन आहे.
31 Mar 2016 - 12:23 am | Shridhar Laxman...
रोचक माहिती. मला लहानपणी वाटायचे की मी विष्णुचा दहावा अवतार आहे.. आणि मी मनात येईल ते करु शकेन मोठेपणी.. पण आयुष्यात बरेच धक्के खाल्ल्यानंतर आता तसं नाही वाटत..;-)
31 Mar 2016 - 12:42 am | बोका-ए-आझम
लेख छानच आहे. एक प्रश्न.
याचा अर्थ ही स्थिती normal समजली जाते आहे असा घ्यायचा का? आणि अजून एक प्रश्न - याचा अर्थ स्वतःच्या क्षमतेची व्यवस्थित जाणीव असणारे लोक हे abnormal आहेत का?
31 Mar 2016 - 1:30 am | तर्राट जोकर
चांगले प्रश्न. आवडले. उत्तराच्या प्रतिक्षेत.
31 Mar 2016 - 4:41 am | अर्धवटराव
पण त्या स्थितीचं सातत्य किंवा वारंवार तशी स्थिती येणे म्ह्णजे प्रॉब्लेम असावा.
31 Mar 2016 - 1:00 pm | अमृता_जोशी
यहीच बोलणे को आई थी... थांकू!
31 Mar 2016 - 12:39 pm | विजुभाऊ
प्रत्येकजणच अशा अवस्थेतून कधीना कधी गेलेला असतोच
( हे खंडन करणारे असू शकतील ;))
31 Mar 2016 - 12:51 pm | तर्राट जोकर
खंडन नाही हजार टक्के समर्थन. आपण मुर्ख आहोत हे आपल्याला कळणे शक्य नाही अशा अवस्थेतून आपण गेलो हे कसं कळणार आणि कुणी मान्य तरी का करणार?
1 Apr 2016 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
१९९९ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेविड डनिंग व जस्टीन क्रुगर यांनी केलेल्या एका मानसशास्त्रीय निरक्षण प्रयोगातून पहिल्यांदा 'Dunning Kruger Effect' या नावाचा एक सखोल अभ्यास समोर आला. सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात.
विरोधाभास असा आहे की...
या लोकांना नावे ठेवताना आपण विसरतो की, आपल्या क्षमतेची पराकाष्ठा करावी (स्ट्रेच द लिमिट्स ऑफ युवर अॅबिलिटिज्) अशी मन:स्थिती तयार करण्यासाठी "मोटीवेशन प्रोग्रॅम्स"वर कंपन्या (आणि खाजगीत बर्याच व्यक्तीही) जगभर अनेक करोडोंनी पैसे दरवर्षी खर्च करतात.
किंबहुना, वास्तवातले सत्य असे आहे की... जोपर्यंत आपण आपल्या कुवतीचा पराभव होईपर्यंत तिला ताणत नाही, तोपर्यंत तिच्या पूर्ण क्षमतेचा नक्की अंदाज आपल्याला येणे शक्य नसते.
उदा :
१. नऊ वेळा अयशस्वी होऊन दहाव्या प्रयत्नात यशस्वी झालेल्या उद्योजकाने/विद्यार्थ्याने/संशोधकाने आपल्या क्षमतेवर संशय घेऊन आपले प्रयत्न आठव्या/नवव्या प्रयत्नात सोडून दिले तर त्याला व जगाला त्याचे यश दिसले असते का ?
२. बिल गेट्सने आपल्या कंपनीची दरवर्षी १०-२०% टक्के वाढ बघण्यात धन्यता मानली असती तर मायक्रोसॉफ्ट आणि स्वतः बिल कुठे असते ?!
Dunning Kruger Effect मनःस्थिती असलेल्या माणसांनीच इतरांना अशक्य किंवा अतर्क्य वाटणारी कामे करून या जगात क्रांतीकारी बदल घडवून आणले आहेत. ते लोक तसेच असतात; फरक फक्त इतरांनी त्यांना समजून घेण्यात आहे...
अ) असे लोक अयशस्वी झाले की बहुतांश इतर लोक त्यांची खिल्ली उडवतात, त्यांच्यापासून स्वतःला दूर करतात आणि कालांतराने त्यांना विसरून जातात.
आ) मात्र, ते यशस्वी झाले की लोक त्यांच्याशी आपण कसे संबंधीत आहोत हे चढाओढीने सांगतात; त्यांचे कौतूक करताना जीभा थकत नाहीत; त्यांच्या कृती आणि कार्यशैलीवर पुस्तके/डॉक्युमेंटरीज/लेख/भाषणे/इ चे उद्योगधंदे बनवले जातात !
1 Apr 2016 - 12:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
हा विषय पुढे आणल्याबद्दल लेखिकेला धन्यवाद !
1 Apr 2016 - 12:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
अजून एक मुद्दा राहिलाच की...
या लोकांमध्ये भरपूर उर्जा असते आणि बहुतेकांत ती वापरण्याची तयारी असते. मात्र बर्याचदा ती उर्जा चुकीच्या दिशेने आणि/किंवा अनुत्पादक पद्धतीने वापरली जाते. अश्या माणसांना जर उत्तम गुरू (मेंटॉर) अथवा समुपदेशक मिळाला व तो त्यांच्या उर्जेला योग्य दिशेने प्रवाहीत करू शकला तर निदान काही जणांच्या बाबतीत बरेच काही अशक्य/अतर्क्य घडू शकते !
1 Apr 2016 - 12:55 pm | तर्राट जोकर
आपल्यासर्व प्रतिसादांसाठी स्टॅण्डींग ओवेशन. मान गये. सुंदर मांडलंत.