✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भाई वैद्य तुम्ही सुध्दा ?

ग
गॅरी शोमन यांनी
Wed, 03/23/2016 - 11:23  ·  लेख
लेख
"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते "समाज प्रबोधन‘ पुरस्कार रविवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या वेळी वैद्य यांनी भाजप आणि संघावर कडाडून टीका केली. सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी, मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, उपाध्यक्षा प्रा. सायरा मुलाणी, रुबिना पटेल, तमन्ना शेख उपस्थित होत्या. संदर्भ "http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5525909934268008440&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20160321&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF% भाई वैद्य साहेब मी समाजवादी मंडळींना मतभेद असतील तरी विचारवंत मानत होतो. पुण्यात काही मुस्लीम मंडळींनी चौकात येऊन औवैसी यांच्या विचाराचा निषेध केला. सर्वच मुस्लीम काही औवेसी च्या मताला बांधलेले नाहीत. आपल्याला रा स्व संघ जर चुकीचा वाटत असेल तर त्यावर टीका करायला मोकळीक आहे पण अस राष्ट्र्विरोधी कृत्याच समर्थन करुन टीका करु नका. हा पायंडा चांगला नाही. आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. जिथे जिथे मुस्लीम जास्त झाले तेथुन हिंदुंना पळवौन लावले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा इतिहास पुन्हा लिहीण्याची आवश्यकता नाही. आजही पाकिस्थानातुन हिंदु भारतात येत आहेत. काश्मिरमधला हिंदु संपला आहे. का आम्हाला आत्मीयता वाटेल ? तुम्ही घेतला असेल मक्ता आम्ही नाही. भारतात मुस्लीमांना भय वाटेल असे काही घडत नाही. या उलट जे नरसंहार काश्मीरमधे झालेत त्याची आठवण ठेवा. मुस्लीमांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी मुस्लीम सत्यशोधक समाज काम करतो आहे. तुम्ही संघाला शिव्या दिल्याने त्यात फरक पडणार नाही. भाई वैद्य साहेब. १) तुम्ही कधी ज्या मुस्लीम महिलेला तोंडी तलाक मिळालेला आहे त्यावर आवाज उठवलाय ? २) तुम्ही कधी मेहेर की रकम तलाक पिडीत महिलेच्या उपजिवीके इतकी असते का यावर विचार केलाय ? ३) तळपत्या उन्हात काळ्या बुरख्यात वावरणार्‍या महिलांना बुरख्या बद्दल काय वाटत हे जाणलय ? ४) सासर्‍याने केलेल्या बलात्काराला एका मुल्ला ने बलात्कारीत सुनेला तिच्या नवर्‍याने तलाक द्यावा व पुन्हा सासर्‍याने निकाह लावावा ही शिक्षा स्वतंत्र भारतात योग्य वाटते ? ५) या राज्यात मुलींचे प्रार्थ्मीक आणि माध्यमीक शिक्षण मोफत असताना मुस्लीम मुलींना मुळ प्रवाहात न आणणारे शिक्षण मदरश्यातुन दिले जाते यावर आपले काय मत आहे? यामुळे त्या नोकरी करु शकत नाहीत कारण मदरश्यात इंग्रजी भाषा, शास्त्र आणि गणित न शिकवता ( सर्व सामन्य पणे ) फक्त कुराण तालीम वर भर असतो. यामुळे तलाक पिडीत महीला ताठ मानेने जगु शकत नाहीत. त्यांना कोणी अमिर शोधुन त्याची तिसरी किंवा चवथी बिवी म्हणुन रहावे लागते. या पेक्षा जर भारत माता की जय चा आग्रह झालाच तर तो सौम्य असेल. तुम्ही संघद्वेशाने पछाडलेले मानसीक रोगी आहात. विचारवंत जर कोणी तुम्हाला यापुढे म्हणणार असेल तर ती मोठी चुक असेल. राष्ट्र प्रेम हा संस्कार असतो हे सुध्दा तुम्हाला राष्ट्र सेवा दलात शिकता आल नाही. भारत माता की जय म्हणल्याने राष्ट्र विरोधी कृत्य करताना एखादा क्षण विचार करावा इतकाच संस्कार या घोषणेत आहे. आज अनेक मुस्लीम तरुण देषविघातक कृत्ये करत आहेत त्याचा निषेध भाई तुम्ही कधी केलात का ? भाई वैद्य साहेब तुम्ही संघाच्या विचाराच्या लोकांच्या पाठींब्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद कधी काळी उपभोगल आहे त्याची आठवण ठेवा. एकदा ह्याच स्टेजवर येऊन म्ह्णा मी शेण खाल्ल्ल मग द्या शिव्या हव्या तेव्हड्या संघ विचारांना.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
प्रतिक्रिया
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी

प्रतिक्रिया द्या
28877 वाचन

💬 प्रतिसाद (118)

प्रतिक्रिया

साहेब, मनमानी पद्धतीने

तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 12:13 नवीन
साहेब, मनमानी पद्धतीने मांडलेल्या सांख्यकितून काहीच सिद्ध होत नसतं असे म्हणायचे आहे. विदा आणि सांख्यिकी ही सरकारी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतर्फे असेल तर ती मान्य करण्यास हरकत नसावी. तिरपाग्डे लॉजिक लावून स्वतःच सोयिस्कर सांख्यिकी मांडणे ह्याला अर्थ नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

संघस्वयंसेवक हिंदू

DEADPOOL
गुरुवार, 03/24/2016 - 20:22 नवीन
संघस्वयंसेवक हिंदू लोकसंख्येच्या 0.18% आहेत. >>>>>> परंतु संघाचीच विचारधारा असलेल्या भाजपच्या सदस्यांचा आकडा सांगाल का? आणि १२० कोटी जनतेपैकी निम्म्यापेक्षा जास्त जनतेने भाजपाला मतदान केले म्हणजे बघा ३० कोटी अल्पसंख्य सोडले तर ९० कोटीपैकी ६० कोटी हिंदूंची या विचारधारेला समर्थन आहे! शब्दांचे खेळ सोडा आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मनाला येईल ते मान्य करायचे

तर्राट जोकर
Fri, 03/25/2016 - 13:22 नवीन
मनाला येईल ते मान्य करायचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. सत्य पाहायचे असेल तर लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण जालावर उपलब्ध आहे. १. तुमच्या म्हणण्यानुसार अल्पसंख्यांकांनी भाजपाला वोट केले नाही. हे तुम्ही सिद्ध करु शकाल काय? २. १२० कोटी जनता मतदान करत नाही. ८१.४५ कोटी मतदार आहेत. त्यापैकी भाजपाला ३१ टक्के वोट मिळालेत. ३. भाजपाचा निवडणूकीचा जाहिरनामा देशाचा सर्वांगिण विकास ह्यावर आधारित होता. सबका साथ सबका विकास. असे स्लोगन होते. 'सबको लाथ सिर्फ हिंदूका विकास' असे नव्हते. ४. भाजपाला विजय मिळण्याचे कारण काँग्रेसचे भ्रष्टाचारी विश्वरुपदर्शन होते. त्यावर भाजपाने पुढे केलेला विकासाचा, प्रामाणीक सरकार देण्याचा मुद्दा होता. संघाची हिंदूराष्ट्र संकल्पना नाही. बाकी तुम्ही ही सांख्यिकी मांडून जर असे म्हणत असाल का बहुसंख्य हिंदूंनी हिंदूराष्ट्र साठी भाजपाला मतदान केले तर भाजपाचा निवडणूक जाहिरनामा ही धुळफेक होती, खरा अजेंडा हिंदुराष्ट्र हाच आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

:)

विकास
गुरुवार, 03/24/2016 - 20:40 नवीन
रच्याकने तुमच्याच सांख्यिकीचा फॉर्मुला वापरला तर संघस्वयंसेवक हिंदू लोकसंख्येच्या 0.18% आहेत. म्हणजे तथाकथित हिंदूराष्ट्राला सपोर्ट करणारे हिंदूंपैकी फक्त 0.18% आहेत. इतक्या अल्पसंख्य समुदायाच्या लोकांवर स्वतःला सेक्यूलर म्हणणारे लोकं हल्ले करून स्वतःची असहीष्णुता दाखवतात असे वाटते. त्याव्यतिरीक्त संख्या ०.१८% और गरळ (पक्षी: शाब्दीक खोटारडे हल्ले/बदनामी) १८०%* ये बहौत नाइन्साफी है! खरे की नाही? ;) का स्युडोसेक्यूलर आवाज ०.१८% पुढे पण तोकडा पडतोय? * १८०% म्हणजे थोडक्यात ०.१८% च्या कितीतरी पट अधिक इतकेच म्हणण्याच्या दृष्टीने वापरलेला आकडा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मुस्लिम धर्माच्या संदर्भात विचार मंथन करण्या आधी

lakhu risbud
गुरुवार, 03/24/2016 - 10:36 नवीन
तजो, मुस्लिम धर्माच्या संदर्भात विचार मंथन करण्या आधी तारेक फताह यांच्या मुलाखती वाचाव्या अशी नम्र विनंती. http://www.misalpav.com/comment/818966#comment-818966 http://www.misalpav.com/comment/818972#comment-818972
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

दहशतवादाला धर्म नसतो म्हणतात

गरिब चिमणा
गुरुवार, 03/24/2016 - 20:34 नवीन
दहशतवादाला धर्म नसतो म्हणतात पण बहुतांशी सगळे दहशतवादी मुस्लिम का असतात?>>>>>> दहशतवादी पवित्र कुराण ए शरीफला मानत नाहीत, त्यामुळे रे मुस्लिम नाहीत,पवित्र कुराण मानवतावाद शिकवते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

तुम्हाला सांगायला आले होते का

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 03/24/2016 - 20:44 नवीन
तुम्हाला सांगायला आले होते का कि आम्ही कुराण मानीत नाही।बरं नाही तर नाही मग जिहाद हा शब्द कोठून घेतला आहे त्यांनी ।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

दहशतवादी कुराण मानतात हा

गरिब चिमणा
गुरुवार, 03/24/2016 - 20:54 नवीन
दहशतवादी कुराण मानतात हा निष्कर्ष कशावरुन काढलात? जिहाद या शब्दाचा ते गैरवापर करतात,मुस्लिमाण्ना बदनाम करण्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

थोडी माहिती

ट्रेड मार्क
गुरुवार, 03/24/2016 - 21:01 नवीन
एक विकीपेडिया नामक संस्थळ आहे. त्यावर इसिस बद्दल माहिती विचारली तर खालील माहिती मिळते इसिस इस्लामीक फंडालीझम मानते आणि ते म्हणजे कुराण जसे आहे तसे घेऊन त्याप्रमाणे वागावे असे सांगते. म्हणजे काय तर जे इस्लाम आणि कुराण मानत नाहीत त्या सर्वांचा नाश करावा. जरा शोधून बघा नाही मिळालं तर मग मी URL देईन. तुम्ही असे कशाच्या जोरावर म्हणता की हे लोक कुराण मनात नाहीत? दुसरे काय मानतात मग? ही बदनामी कोण करत आहे? तुमच्या मते पवित्र कुराण मानणाऱ्यांनी या लोकांविरुद्ध काय पावले उचलली आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

तुमच्या मते पवित्र कुराण

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 03/24/2016 - 21:12 नवीन
तुमच्या मते पवित्र कुराण मानणाऱ्यांनी या लोकांविरुद्ध काय पावले उचलली आहेत? भारतीय उपखंडातील मुस्लिमांना( हे म्हणे कुराणा नुसार वागत नाही) आपले न म्हणणारे श्रीमंत अरबी मुस्लिम पैसा देतात त्यांना ।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

मग ते नमाजी हि नसतील.

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 03/24/2016 - 21:02 नवीन
मग ते नमाजी हि नसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

मोठा प्रश्न चिमणा,

भंकस बाबा
गुरुवार, 03/24/2016 - 23:08 नवीन
तुमचे तर्क आपण एक वेळ बरोबर मानू, कुरआन दहशतवाद शिकवत नाही. मग या जगभरच्या जिहादी कारवाईमागे कसले खुळ आहे हो? अमेरिका आमच्यात भांडणे लावुन देते म्हणतात. स्वताची अककल नावाची काही वस्तु आहे की नाही? बाकी इसिस वाले थोड़े डोके बाळगुन आहेत हो! आत्तापर्यन्त केलेल्या इन कॅमेरा हत्याकांडात त्यांनी एकाही ज्यूला मारले नाही आहे. यांना काय ज्यू मिळाला नाही? करून बघा म्हणाव, इस्राईली असे हात धुवून मुस्लिमाच्या पाठी लागतील की इसिसच्या पाठीराख्या देशानाच् त्यांचा म्हणजे इसिसचा खात्मा करावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

इसिसला बढावा देऊन

गरिब चिमणा
गुरुवार, 03/24/2016 - 23:22 नवीन
इसिसला बढावा देऊन मध्यपुर्वेतले वातावरण अस्थीर ठेवायचे आहे अमेरीकेला.जसा लादेनचा भस्मासूर अमेरीकेने उभा केला ,नंतर तो त्यांच्यावरच उलटला तसेच आताही होत आहे.मध्यपुर्वेतल्या तेलाचे राजकारन आहे सगळे .यात इस्लामला आणि पवित्र कुराण ए शरीफला दोष द्यायचे काहीच कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा

@यात इस्लामला आणि पवित्र

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/24/2016 - 23:47 नवीन
@यात इस्लामला आणि पवित्र कुराण ए शरीफला दोष द्यायचे काहीच कारण नाही. >> बिगरमुस्लिम म्हणजे काफिर आणि त्याचे मृत्यू पश्चात स्थान - नरकाग्नी. हे कुराणात (अल्लाहने) वारंवार स्पष्ट केले आहे. असे का आहे? हे कळले तरी कळतं दहशतवाद कशात आह?,आणि तो कुणी सांगितला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

कुराण ए शरीफ मध्ये असे लिहले

गरिब चिमणा
Fri, 03/25/2016 - 00:08 नवीन
कुराण ए शरीफ मध्ये असे लिहले आहे याचा सिन्सीअर संदर्भ द्याल का !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

Quran (8:15) - "O ye who

श्रीगुरुजी
Fri, 03/25/2016 - 14:23 नवीन
Quran (8:15) - "O ye who believe! When ye meet those who disbelieve in battle, turn not your backs to them. (16)Whoso on that day turneth his back to them, unless maneuvering for battle or intent to join a company, he truly hath incurred wrath from Allah, and his habitation will be hell, a hapless journey's end." Quran (9:73) - "O Prophet! strive hard against the unbelievers and the hypocrites and be unyielding to them; and their abode is hell, and evil is the destination." Dehumanizing those who reject Islam, by reminding Muslims that unbelievers are merely firewood for Hell, makes it easier to justify slaughter. It also explains why today's devout Muslims have little regard for those outside the faith. Quran (48:17) - "There is no blame for the blind, nor is there blame for the lame, nor is there blame for the sick (that they go not forth to war). And whoso obeyeth Allah and His messenger, He will make him enter Gardens underneath which rivers flow; and whoso turneth back, him will He punish with a painful doom." Contemporary apologists sometimes claim that Jihad means 'spiritual struggle.' Is so, then why are the blind, lame and sick exempted? This verse also says that those who do not fight will suffer torment in hell. word used for 'hard' or 'ruthless' in this verse shares the same root as the word translated as 'painful' or severe' to describe Hell in over 25 other verses including 65:10, 40:46 and 50:26..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

कुठे गेले नानासाहेब नेफळे?

श्रीगुरुजी
Sat, 03/26/2016 - 16:31 नवीन
कुठे गेले नानासाहेब नेफळे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ते काफिर बद्दल आहे ना? मग

तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 16:40 नवीन
ते काफिर बद्दल आहे ना? मग शिंचे हे लोक मुस्लिमांनाही का मारतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मुस्लिमात बरेच पंथ आहेत. शिया

श्रीगुरुजी
Sat, 03/26/2016 - 17:40 नवीन
मुस्लिमात बरेच पंथ आहेत. शिया, सुन्नी, अहमदी, बोहरी, यझदी इ. सुन्नींची संख्या अंदाजे ८०% आहे. यातल्या अहमदींना अमुस्लिम असे जाहीर केले गेले आहे. सुन्नी महंमद हाच शेवटचा प्रेषित मानतात तर शिया भविष्यात अजून एक प्रेषित येईल असे मानतात. महंमदाच्या मृत्युनंतर वारसदार कोण यातून वाद होऊन हे दोन पंथ निर्माण झाले व नंतर कर्बालामध्ये युद्ध होऊन महंमदाच्या मुलीचे पुत्र हसन व हुसेनला मारण्यात आले. त्याचे दु:ख म्हणून शिया मोहर्रम पाळून छाती बडवून शोक व्यक्त करतात. जगभरात ज्या देशात मुस्लिम बहुसंख्य आहेत तिथे सुन्नी शियांचे हत्याकांड करतात (उदा. पाकिस्तान, इराक). अजून एक वेगळा कोन आहे. लादेनच्या हस्तकांनी ९० च्या दशकात टांझेनिया व केनयात बॉम्बस्फोट घडवून २१२ जणांचा मृत्यु घडवून आणला होता. त्यात फक्त १२ अमेरिकन होते व उर्वरीत स्थानिक मुस्लिम होते. लादेनने बॉम्बस्फोटानंतर आनंद व्यक्त केल्यावर त्याच्या मुलाने हे निदर्शनास आणून दिले की त्यातले बहुसंख्य मुस्लिम होते. त्यावर लादेनची ही प्रतिक्रिया होती की ते मरावे अशी अल्लाचीच इच्छा होती. त्यामुळे त्याचे दु:ख नाही. पण १२ अमेरिकन मारले गेल्याचा अत्यांनद झालेला आहे. अशी मानसिकता असणारे इतरांना मारतामारता त्यात मुस्लिम मेले तरी दु:ख करीत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा

तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 17:53 नवीन
म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा नाही हे सिद्ध होतंय. ज्याला कोणाला दुसर्‍याला मारायचे आहे तो कुरानाचा हवाला देउन दुसर्‍याला अमुस्लिम ठरवुन मारतो. ह्यात कुराणाचा नक्की काय दोष? ज्याला दुसर्‍याला मारायचे आहे त्याला कुठलेही कारण पुरते की? मारण्याचे कारण धार्मिक दिले की मारणार्‍याला उदात्त कर्म केले असे वाटते. मुस्लिम म्हणजे अल्लाह ला एकमेव देव मानणारा, पाच नमाज पढणारा, मोहमद पैगंबराला प्रेषित मानणारा, कुराण अल्लाहने सांगितले इतके जुजबी नियम पाळणारा असे आहे. बाकी हजार फाटे प्रत्येक धर्म-संप्रदायात असतात. मारण्याचे कारण कुराण आहे हे नक्की का? मला तसे वाटत नाही. कारण गीतेतही असे श्लोक आहेत ज्याचा आधार घेउन अमर्याद हिंसा करता येणे शक्य आहे. आपण सर्व करुन नामानिराळे राहून, भगवंताची अशीच इच्छा आहे असे बोलले की झाले. पण हिंदू लोक गीतेचा आधार घेऊन कत्लेआम करत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

साहेब

सुबोध खरे
Sat, 03/26/2016 - 18:40 नवीन
साहेब इस्लाम या शब्दाचा अर्थच "अल्लाच्या इच्छे"ला शरण( कोणताही प्रतिवाद न करता) जाणे. एकदा आपण शरण गेलात कि बुद्धीवादी चर्चा /प्रतिवाद हा अशक्यच आहे. म्हणूनच कुराण शरियत बद्दल न्यायालयीन किंवा इतर वाद संभवत नाहीत. संभवते फक्त त्या शब्दांचा अर्थ लावणे किंवा शाब्दिक कसरत. आणि हीच कसरत मौलवी करून त्यांना पाहिजे तो अर्थ काढत असतात. आणि आपल्याला पाहिजे तसे फतवे जाहीर करतात. मग तो फतवा आधुनिक काळात कितीही हास्यास्पद अन्यायकारी आणि भयानक असेल तरीही कारण तीच "अल्लाची इच्छा" आहे . उदा. सासर्याने सुनेवर बलात्कार केला तर ती स्त्री आता नवर्याची आई होते म्हणून तिने नवर्याला तलाक देऊन सासर्याशी निकाह केला पाहिजे.असा फतवा दारूल उलूम देवबंद या मोठ्या धार्मिक पाठ्शालेने काढला होता आणि संतापाची गोष्ट हि कि त्याला All India Muslim Personal Law Board ने पाठींबा दिला होता आणि मौलवी मुलायम सिंहानि त्याला पाठींबा दिला होता. यापेक्षा मुस्लिम लांगुलचालन काय असू शकते? https://en.wikipedia.org/wiki/Imrana_rape_casehttps://en.wikipedia.org/wiki/Imrana_rape_case हि केस मुळातूनच वाचा म्हणजे तुमच्या शंकांचे निरसन होऊ शकेल. हेच All India Muslim Personal Law Board आता सांगत आहे कि आमच्या वैयक्तिक कायद्यात सर्वोच्च न्यायालय ढवळा ढवळ करू शकत नाही. इतका घोर अन्याय एखाद्या स्त्रीवर होत असेल तर न्यायासन किंवा सरकारने गप्प बसावे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

गल्ली चुकलात का मालक? हा

तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 19:15 नवीन
गल्ली चुकलात का मालक? हा प्रतिसाद दुसर्‍या धाग्यावर द्यायचा होता का? कारण तुमच्या प्रतिसादातले एकही वाक्य माझ्या प्रतिसादाच्या मुद्द्याच्या आसपासही फिरकत नाही. मुद्दा आहे कुराणमधे अमुस्लिमांना मारण्याचे आदेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गल्ली हीच आहे साहेब

सुबोध खरे
Sat, 03/26/2016 - 20:01 नवीन
गल्ली हीच आहे साहेब "कुराण अल्लाहने सांगितले इतके जुजबी नियम पाळणारा" हे आपलेच शब्द आहेत ना? नियम जुजबी नसून सर्व आयुष्य आणि समाजव्यापी आहेत आणि ते ठरवणारे अल्लाचे सेवक मौलवी आहेत त्यांचा शब्द म्हणजे अल्ला चा शब्द इस्लाम मध्ये जे आणि जसे सांगितले आहे तसेच्या तसे वागणे हे सर्व मुसलमानांचे आद्य कर्तव्य आहे आणि कुराण मध्ये काफिरांना देहदंड देणे हे सच्च्या मुसलमानाचे आद्य कर्तव्य आहे असे स्पष्ट लिहिलेले आहे. याची बुद्धीवादि चर्चा होऊ शकत नाही एवढेच मला म्हणायचे आहे. गीतेतील शब्द न पाळणारा हिंदू धर्मातून धर्मबाह्य होत नाही आणि त्याला देहदंडाची शिक्षा नाही भारतीय दंड विधान संहितेत पण तसे शरीया मध्ये आहे हा एक फार मोठा फरक आहे. हे जर तुम्हाला समजून घ्यायचेच नसेल तर वाद थांबवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

गल्ली हिच असेल तर.

तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 20:40 नवीन
गल्ली हिच असेल तर. १. मौलवी जे शब्द (फतवे) काढतात ते शंभर टक्के इम्प्लिमेंट होत नाहीत. २. काफर म्हणजे कोण हे स्पष्ट असतांना मुस्लिम राष्ट्रांमधे अमुस्लिमांना जीवंतच ठेवायला नको. ३. कुराणातले शब्द किंवा मौलवींचे (अडचणीचे) फतवे न मानणारे मुस्लिम बहुसंख्येने आहेत. ते धर्मबाह्य झालेले दिसत नाहीत. ४. 'कुराणात दिले आहे काफरांना देहदंड द्या' असे मानणारे आणि शब्दशः फॉलो करणारे मुस्लिम असते तर हे मनुष्यजात केव्हाच संपली असती. तुम्ही जे म्हणताय ते वस्तुस्थितीशी म्याच होत नाही. ह्या किंवा कुठल्याच धाग्यावर कधीच शरियाचे समर्थन मी केलेले नाही हे लक्षात आणून देतो. भारतीय दंड विधान आणि शरिया यातला फरक मला समजुन सांगण्याची गरज तुम्हाला का पडली ह्याचा विचार करत आहे. समजुन घ्यायचे असेल तर हे समजून घ्या की प्रस्तुत चर्चेची प्रतिसाद-रांग बघता कुराणाचा हवाला देऊन होणार्‍या हत्या हा मुद्दा आहे. शरिया वा भादंवि नाही. तो वेगळा धागा आहे त्यावर माझे मत आधीच दिलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हे घ्या, तजो

भंकस बाबा
Sat, 03/26/2016 - 21:19 नवीन
1 सर्व फतवे इम्प्लीमेंट होत नाहीत, बरोबर गाढ़वासारखे कोणी रेकले तर त्याला कोणी गायन म्हणनार नाही. आता यातील गंमत पहा, एकहि मुस्लिम उठून बोलत नाही की हां फतवा शुद्ध गाढवपणा आहे. काही महिन्यापूर्वी दारुल उल देवबंदने फतवा जारी केला होता की मुस्लिम मुलींनी वा महिलांनी रिसेप्शनिस्टचे काम करु नए ते इस्लामच्या विरुद्ध आहे. किती जणांनी नोकर्या सोडल्या? शेवटी पोट नेहमी धर्माच्या पुढे येते. पण एकाही मुस्लिम महिलेने पुढे येऊन म्हटले नाही की हा निव्वळ गाढ़वपणा आहे. कारण याला म्हणजे फतव्याला जो विरोध करेल त्याला शिक्षा ठरलेली. आता असच काही आपण हिंदू वा इतर धर्माबद्दल घेऊ, बायकानि रान उठवले असते. माझ्यासारख्या लोकांनी या महिलांना पाठिंबा देखिल दिला असता. ते मंगेसराव व् गचि चे सोडून द्या. आणि यासाठी मला हिंदुत्ववादी संघटनाचा धमकिवजा इशारा देखिल आला नसता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हे घ्या, तजो

भंकस बाबा
Sat, 03/26/2016 - 21:36 नवीन
2 मुस्लिम राष्ट्र हे आता उघड करु शकत नाही कारण दुसऱ्या देशातील मुस्लिमाना हे फार भारी पडेल. तालिबानने बुद्धाच्या मूर्ति तोफा लावुन पाडल्या त्याचे पडसाद मियांमारसारख्या बौद्धिस्ट बहुसंख्य देशात कशा उमटत आहेत ते जग पहातच आहे. अहिंसा परमो धर्म मानणारा बौद्ध रोहिंग्याना ठोकताना आपली धर्माची मुळ शिकवण विसरत आहे. त्यामुळे संधि मिळताच हे मुस्लिम धर्मांध हत्याकांड घडवणार. पाकिस्तानात शियाना जसे मारले जाते याला काय जबाबदार पश्चिमी देश आहेत? शिवाय जो मुस्लिमातला एक मोठा वर्ग जो या हत्येचा विरोधी आहे तो देखिल इस्लामविरोधी बनेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हे घ्या, तजो

भंकस बाबा
Sat, 03/26/2016 - 21:45 नवीन
3 मुळातच हां प्रश्न चुकीचा आहे कारण मुस्लिमात धर्मबाह्य ही संकल्पनाच् नाही आहे. प्रश्न आहे फतव्याला विरोध करण्याचा तो कोणी करत नाही. इस्लामच्या शिकवणीनुसार मुस्लिम स्त्रियानी अंगप्रदर्शन करता कामा नये. फ़िल्म इंडस्ट्रीत तर मुस्लिम मुलींची भरमार आहे मग का नाही मौलवी बोम्बा ठोकत की ह्या नट्या आता इस्लामच्या बाहेर आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

रिझल्ट महत्वाचा

ट्रेड मार्क
Mon, 03/28/2016 - 20:55 नवीन
कुराण मध्ये लिहीलं असू दे वा नसू दे शेवटी मृत्युचं तांडव होतच आहे, बलात्कार, स्त्रियांना गुलाम म्हणून वागवणे होतच आहे. प्रश्न हा आहे की मुस्लिम समाज सुधारणा स्वीकारायला आणि करायला तयार आहे का? सर्व मुसलमान वाईट नसतात किंवा सर्व मुसलमानांना उगाच वाईट समजले जाते हे नुसते ओरडून काय उपयोग? ही (कु)प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते स्वतःच कारणीभूत आहेत. बाकीच्या लोकांच्या मनातून ही भीती वा समाज घालवण्यासाठी समस्त मुस्लिम समाजाने काय केलं? या पुढे ही काय करणार आहेत? विमानात, बस वा ट्रेन मध्ये २-४ दाढी आणि टोपीवाले दिसले तर नकळत मनात शंकेची पाल चुकचुकतेच आणि हा प्रवास नीट पार पडू दे म्हणून देवाचा धावा सुद्धा होतो. हा लेख वाचण्यासारखा आहे मराठीत टायपायला वेळ नसल्याने काही भाग जसाच्या तसा देत आहे Is Islam a violent religion? The history of Islam is brutal. Prophet Mohammed was a religious leader but also a warlord who imposed his beliefs through military actions. As the military leader of Medina, he was fighting the leader of Mecca for ten years. The Quran contains at least 109 verses that call Muslims to war with nonbelievers for the sake of Islamic rule. “Fighting is prescribed to you” — Quran 2-216
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

विमानात, बस वा ट्रेन मध्ये २

तर्राट जोकर
Mon, 03/28/2016 - 23:25 नवीन
विमानात, बस वा ट्रेन मध्ये २-४ दाढी आणि टोपीवाले दिसले तर नकळत मनात शंकेची पाल चुकचुकतेच आणि हा प्रवास नीट पार पडू दे म्हणून देवाचा धावा सुद्धा होतो. ह्यालाच इस्लामोफोबिया म्हणतात. बाकी, ब्रुसेल्स, पॅरिस, जर्मनी इत्यादी ठिकाणी हल्ले झाले की अशा लेखांचा पूर येतो. खाली लिन्कवर मागच्या वर्षीच्या आतंकवादी हल्ल्यांची लिस्ट आहे. प्रत्येक महिन्यात अल्मोस्ट प्रत्येक दिवशी आतंकवादी हल्ले झालेले आहेत. ह्यातले बहुसंख्य हल्ले हे मुस्लिमबहुल प्रांतांत, मुस्लिम जनतेवरच झाले आहेत. जर कुराण नॉन-बिलीवर्सना ठार करा असे म्हणत असेल तर बहुसंख्य हल्ल्यांमधे मरणारे बहुसंख्य मुस्लिमच का आहेत हे प्रश्न अशा लेखांमधे कधी दिसलेत का? https://en.wikipedia.org/wiki/List_of_terrorist_incidents,_2015 कुराण फक्त मारामारी करण्याचा आधार बनवला आहे. दादरी प्रकरणात व्यक्तिगत खुन्नस काढण्यासाठी जसं अखलाकच्या घरात गोमांस खाल्लं जातंय असा मंदिराच्या भोंग्यावरुन जाहिर करुन पद्धतशीरपणे गोमातेचा हवाला देऊन हत्या झाली. तसेच हे आहे. असे जीव घेणारे धर्मांध हे धर्मामुळे होतात की त्यांची मानसिकता मुळात तशी असते व फक्त ते त्याला नैतिक अधिष्ठान देण्यासाठी धर्माचा आधार घेतात हा खरा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

कशाची तुलना कशाशी करताय?

ट्रेड मार्क
Tue, 03/29/2016 - 02:01 नवीन
दहशतवादी हल्ल्याची तुलना दादरी बरोबर? दादरी आणि मूद्बिद्री ची तुलना करा. बाकी मुसलमान एकमेकांना मारोत नाहीतर काही पण करोत. पण त्याची झळ बाकीच्यांना कशाला? त्यांच्यात वेगवेगळे पंथ आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत पण त्यासाठी हे लोक एकमेकांच्या जीवावर उठलेत. आता हिंदू धर्मामध्ये पण वेगवेगळे पंथ आहेत, वेगवेगळे देव आहेत, पूजन करायची वेगवेगळी पद्धत आहे. पण हिंदू एकमेकांचा या गोष्टी वरून जीव घेताना दिसत नाही. हिंदूंमध्ये एकमेकांना विरोध असेल, भांडणं असतील पण म्हणून दुसर्याच्या वस्तीवर बॉम्ब टाकून भ्याडासारखे हल्ले करत नाहीत. नेहमीप्रमाणे तुम्ही मूळ मुद्दा मिस केलातच. इस्लामोफोबिया होण्यासाठी कारणीभूत मुस्लिमच आहेत. ही भावना काही आपोआप आलेली नाही. मुस्लिमांनी केलेल्या कृती म्हणजे इतर धर्मियांवर, पंथीयांवर केलेले अत्याचार, क्रूरपणा त्याला कारणीभूत आहे. लगेच विदा मागू नका, कारण तुम्हीच तो वर दिलेला आहे. उलट आता मीच तुमच्याकडे विदा मागतो. या सारखी हिंदू लोकांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यांची यादी द्या. त्याची तुलना करा किती हल्ले झाले त्यात एकूण किती लोक मारले गेले याचा आलेख मांडा. हिंदू Vs मुस्लिम दहशतवादी हल्ल्यांची तुलना करा. मग आपण बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

@उलट आता मीच तुमच्याकडे विदा

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/29/2016 - 07:46 नवीन
@उलट आता मीच तुमच्याकडे विदा मागतो. या सारखी हिंदू लोकांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यांची यादी द्या. त्याची तुलना करा किती हल्ले झाले त्यात एकूण किती लोक मारले गेले याचा आलेख मांडा. हिंदू Vs मुस्लिम दहशतवादी हल्ल्यांची तुलना करा. मग आपण बोलू. >> +++१११ . शिवाय मुस्लिमदेशातच हल्ले होत असतील(मुस्लिम मारले जात असतील)तर त्याला बव्हँशी कारणीभूत इस्लामच आहे. मारणारेही मुस्लिम,मारणारेहि मुस्लिम..हि परिस्थितीही कुराणानी करून ठेवलेली आहे. मारणाय्रानच हे नेहमी म्हणणं असतं कि मरणारे हे काफ़िरांसारखे वागतात..ते वर्तनांनी बिगर मुस्लिम झालेले होते..आम्ही मात्र ख्ररेखूर्रे मुस्लिम होतो..म्हणून आम्ही त्यांना मारलं. मग मागे राजकारण काहीही असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

नेहमीप्रमाणे तुम्ही मूळ

श्रीगुरुजी
Tue, 03/29/2016 - 12:40 नवीन
नेहमीप्रमाणे तुम्ही मूळ मुद्दा मिस केलातच. इस्लामोफोबिया होण्यासाठी कारणीभूत मुस्लिमच आहेत. ही भावना काही आपोआप आलेली नाही. मुस्लिमांनी केलेल्या कृती म्हणजे इतर धर्मियांवर, पंथीयांवर केलेले अत्याचार, क्रूरपणा त्याला कारणीभूत आहे.
संपूर्ण परिच्छेदाला +९९९९९९९.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

इतरांवर केला जाणारा अत्याचार,

तर्राट जोकर
Tue, 03/29/2016 - 14:59 नवीन
इतरांवर केला जाणारा अत्याचार, क्रूरपणा हा पोथ्यांतून येतो की मुळात मानसिकताच तशी असते हा माझा नेहमीचा प्रश्न. ह्याला उत्तर असेल तर बोला. बाकी तो इस्लामोफोबिया तुमचा तुम्हाला लखलाभ. तुमच्या दुर्बिणी मुस्लिमांवरच फोकस असल्याने इतरत्र काय जळतं ह्याच्याशी कर्तव्य असण्याचं तुम्हाला काय पडलंय. मुस्लिमद्वेष्ट्यांचा आवडता मुद्दा तो एवढाच की मुस्लिमांनी इतर धर्मावर हल्ले केले, हिंदूंनी असे इतर धर्मांवर हल्ले केले नाहीत. हा मुद्दा मी कधीच अमान्य केला नाही, करत नाही किंवा करणार नाही. पण हा एकच एवढा मुद्दा. पुढे काय? हिंदूंच्याही क्रूरपणाच्या अनेक कृती आहेत. पण त्या धर्मातल्या धर्मात आहेत, जातीतल्या जातीत आहेत, वैयक्तिक आहेत. म्हणून क्वालिफाय केल्या जात नाहीत. खालील दुव्यावर गाजलेल्या घटना आहेत. अशाच प्रकारच्या घटना नेहमीच देशाच्या कानाकोपर्‍यात होत आहेत. प्रत्येक घटना देशपातळीवर गाजत नाही कारण प्रत्येक घटनेत राजकिय लाभ उठवण्याचे पोटेन्शियल नसते, अनेक घटना राजकिय ताकतीखाली दाबल्या जातात. https://en.wikipedia.org/wiki/Caste-related_violence_in_India मुळात हिंदूंच्या आणि मुस्लिमांच्या दहशतवादी हल्ल्यांच्या तुलनाच होणार नाही हे तुम्हीही जाणता आणि मीही. म्हणून तुम्ही तो मुद्दा पुढे करताय. अहो पण तो माझा मुद्दा नाहीच. बरेच लोक इथे माझा मुळ मुद्दा मिस करुन हिंदु-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. इतरांवर केला जाणारा अत्याचार, क्रूरपणा हा पोथ्यांतून येतो की मुळात मानसिकताच तशी असते हाच माझा मुद्दा. तो जगातल्या कोणत्याही राजवटी च्या, धर्माच्या, देशाच्या, इझमच्या प्रभावाशी लावा. प्रश्न तोच राहिल. मुस्लिमांवर ठेवलेलं बोट उचला म्हणजे सावलीखाली लपलेली इतर हत्याकांडं आणि क्रुरपणा, अत्याचारही दिसतील. जरा सवडीनं शांतपणे वाचावेत. खालच्या दुव्यात अत्याचारांच्या बाबतीत सर्वधर्मसमभाव आहे. https://en.wikipedia.org/wiki/List_of_genocides_by_death_toll https://en.wikipedia.org/wiki/List_of_events_named_massacres आणि हो, मी इतरांकडे बोट दाखवतोय म्हणजे मुस्लिम किती निरागस,बिच्चारे आहेत असा ठरवण्याचा हेतु नसतो. घोड्यासारखी झापडं लावून फक्त मुस्लिमच अत्याचार करतात हा सोयिस्कर पवित्रा लोकांनी सोडावा हा हेतु आहे. इथे तुम्ही चूक मी बरोबर असा खेळ खेळत बसण्यात मला रुची नाही. दृष्टीकोन संकुचित नको व्यापक असावा इतकीच माफक अपेक्षा आहे. संकुचित दृष्टिकोनाने घृणा वाढते. मग आपल्याच लोकांनी केलेले अत्याचार अजिबात चुकीचे वाटत नाहीत. आपणही क्रूर होतो पण आपल्याला कळत नाही. दादरीचे उदाहरण दिले की मुदबिंद्रीने काउंटर अटॅक करायचा ह्या विचारसरणीतून ते स्पष्ट होतं. माझ्यासाठी दादरीही सेम, मुद्बिंद्रीही सेम, मालदाही सेम, गोध्राही सेम आणि गुजरातही. मला अत्याचार आणि क्रुरपना करणारे यांच्यात धर्म, जातीच्या आधारावर फरक करता येत नाही. पण असे करणारे बघितले की चिंता वाटते. मुस्लिम तेवढे क्रूर आणि इतर सगळे शांततेचे भोक्ते, अगदी गांधीजींचे चेले असे जे वातावरण बनवले जाते ते चूक आहे एवढेच म्हणणे आहे. क्रूरता प्रत्येकाच्या ठायी असते, काही लोक शस्त्रांचा आधार घेतात, काही शब्दांचा, काहीजण योग्य वेळ येण्याची वाट बघत क्रुरपणा पाळत बसतात. प्रत्येकाचे दान त्याच्या त्याच्या झोळीत टाकले गेले पाहिजे. मला मुस्लिमप्रेमी समजणारांना माझी भुमिका समजली असेल अशी आशा आहे. अन्यथा असो. लेबलींग अदर्स इज न्यु फॅशन इन टाउन. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

कुराण ए शरीफ आणि शरीयाबद्दल

गरिब चिमणा
Sat, 03/26/2016 - 20:51 नवीन
कुराण ए शरीफ आणि शरीयाबद्दल काडीचीही माहीती नसणारे इस्लाम व्याख्या करत बसले आहेत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सदर विषयाची पोहोच आणि पातळीच

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/28/2016 - 21:55 नवीन
सदर विषयाची पोहोच आणि पातळीच तशी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा

श्रीगुरुजी
Sat, 03/26/2016 - 20:15 नवीन
म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा नाही हे सिद्ध होतंय. ज्याला कोणाला दुसर्‍याला मारायचे आहे तो कुरानाचा हवाला देउन दुसर्‍याला अमुस्लिम ठरवुन मारतो. ह्यात कुराणाचा नक्की काय दोष? ज्याला दुसर्‍याला मारायचे आहे त्याला कुठलेही कारण पुरते की? मारण्याचे कारण धार्मिक दिले की मारणार्‍याला उदात्त कर्म केले असे वाटते.
नाही सिद्ध होत. वर मी कुराणातील या संदर्भातील ३ श्लोक दिले आहेत. तसे अजून बरेच श्लोक आहेत.
मुस्लिम म्हणजे अल्लाह ला एकमेव देव मानणारा, पाच नमाज पढणारा, मोहमद पैगंबराला प्रेषित मानणारा, कुराण अल्लाहने सांगितले इतके जुजबी नियम पाळणारा असे आहे. बाकी हजार फाटे प्रत्येक धर्म-संप्रदायात असतात.
इथे थोडासा फरक आहे. सुन्नी मोहम्मद पैगंबराला अखेरचा प्रेषित मानतात व शिया अजून प्रेषित येतील असे मानतात. हा मुख्य फरक आहे. सुन्नी बहुसंख्य असल्याने ते शियांची हत्या करीत आहेत. पाकिस्तानात तर शियांना अमुस्लिम जाहीर करा अशीही मागणी होत असते.
मारण्याचे कारण कुराण आहे हे नक्की का? मला तसे वाटत नाही. कारण गीतेतही असे श्लोक आहेत ज्याचा आधार घेउन अमर्याद हिंसा करता येणे शक्य आहे. आपण सर्व करुन नामानिराळे राहून, भगवंताची अशीच इच्छा आहे असे बोलले की झाले. पण हिंदू लोक गीतेचा आधार घेऊन कत्लेआम करत नाहीत.
मुळात कुराणात इतरांना मारा असे म्हटले नसेलही किंवा ते श्लोक पूर्णपणे वेगळ्या संदर्भात लिहिले असतील. परंतु आपल्याला हवा तसा अर्थ लावून हत्या होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मुळात कुराणात इतरांना मारा

तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 20:29 नवीन
मुळात कुराणात इतरांना मारा असे म्हटले नसेलही किंवा ते श्लोक पूर्णपणे वेगळ्या संदर्भात लिहिले असतील. परंतु आपल्याला हवा तसा अर्थ लावून हत्या होतात. >> हेच म्हणायचे आहे. त्यामुळे 'त्यांच्या कुराणातच तसे लिहिले आहे' असा प्रचार करणे चुकीचे आहे. कारण ते अर्धसत्य आहे. कुराण ज्या काळात लिहिले गेले तेव्हा त्यांना हिंदू, क्रिस्चन असे काही म्हणायचे नसेल. जो पैगंबराच्या विरुद्द जाईल , त्यांचे म्हणणे (जे अल्लाहचे म्हणने मानले जाते) मानणार नाही त्याविरुद्ध युद्ध करा, त्यांना मारा कारण ते तुम्हाला मारणारच असा काही अर्थ असेल. तत्कालिन संस्कृती बघता तेव्हाचे संदर्भ तेव्हाच बघितलेले बरे. आताचे मुस्लिम हवा तसा अर्थ लावून हत्या करतात त्यात कुराणाचा संबंध नाही. ते फक्त त्याचा नैतिक ढाल म्हणून वापर करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नथुराम गोडसे या माथेफीरुने

गरिब चिमणा
Sat, 03/26/2016 - 20:53 नवीन
नथुराम गोडसे या माथेफीरुने गीतेचा व वेदांतल्या तत्वज्ञानातचा आधार घेऊन गांधिजींचा खून केला असा आमचा आरोप आहे,करा प्रतीवाद चला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

यावर जास्ती वाद घालत नाही,

आनन्दा
Mon, 04/04/2016 - 16:44 नवीन
यावर जास्ती वाद घालत नाही, उगाच उदात्तीकरणाचा आरोप माथ्यावर येईल.. पण एकच नमूद करतो - त्याने गांधींना मारले, पण पिस्तुलात अजून गोळ्या असताना देखील अंदाधुंद गोळीबार करत सुटला नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

तजो, मुस्लिम धर्माच्या संदर्भात विचार मंथन

lakhu risbud
Mon, 03/28/2016 - 13:37 नवीन
तजो, मुस्लिम धर्माच्या संदर्भात विचार मंथन करण्या आधी तारेक फताह यांच्या मुलाखती वाचाव्या अशी नम्र विनंती. http://www.misalpav.com/comment/818966#comment-818966 http://www.misalpav.com/comment/818972#comment-818972
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

चिमणा भाऊ,

भंकस बाबा
Fri, 03/25/2016 - 00:35 नवीन
कुराणाचा अर्थ लावायला गेले तर अनेक भयानक प्रश्न निर्माण होतील. एक उदाहरण देतो. इस्लामच्या शिकवणीनुसार मुस्लिमानी केवळ हजची यात्राच नव्हे तर आपले आयुष्य देखिल मेहनत करून कंठावे असे म्हटले आहे. त्यामुळे धार्मिक कारण सोडून इतर गोष्टीसाठी भिक मागणे इस्लाममधे हराम आहे. आता हेच आमचे इस्लामी बंधू जेव्हा भारतीय सरकारने दिलेली सबसीडी रेशन दुकानामार्फत वा गॅस सब्सिडी घेतात तेव्हा एखादा मौलवी त्यांना सांगत नाही की 'लाहोलबिलाकुवत ये इस्लाममें हराम हैं' कसे सांगेल पोटाची आग ही सर्व धर्माच्या वर असते. मुंबईच्या 92 दंग्याविषयी थोडेसे, मुस्लिम समाज हां सरकारी आस्थापन, मोठ्या कंपन्या , स्थिर नोकरी अशा ठिकाणी फार कमी दिसतो, पण गैरेज लाइन , छोटे उद्योग अशा ठिकाणी तो भरपूर असतो. नेमकी हीच बाब दंग्याबाबत मुस्लिम समाजाबरोबर झाली. पहिल्यांदा यांना मजा वाटली पण नंतर कळले की काम नाही तर अन्न नाही, तोपर्यंत उशीर झाला होता. एकजुट झालेला हिंदू पहिल्या खालेल्या माराचा बदला घेऊ लागला, तेव्हा मुस्लिमाना दुहेरी फटका बसला. एकतर काम नाही म्हणुन पैसा नाही आणि चवताळलेले हिंदू फटके मारताहेत. त्यामुळे दंगा नको ही संकल्पना पुढे आली. आणि ज्याला स्लीपर सेल म्हणतात तो प्रकार उदयाला आला. आता आमचे सेक्युलर नेते दहशतवादाला धर्म नसतो हे बोलायला मोकळे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

@दहशतवादी पवित्र कुराण ए

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/24/2016 - 23:52 नवीन
@दहशतवादी पवित्र कुराण ए शरीफला मानत नाहीत, त्यामुळे रे मुस्लिम नाहीत,पवित्र कुराण मानवतावाद शिकवते .>>> अह्हाह्हा ! आले सांगायला. एका तरी इस्लामिक देश/सँघटनेनी "इसिस गैर इस्लामिक वागते,म्हणून तिला इस्लाम मधून हाकलून देत आहोत!" अशी घोषणा अगर फतवा काढलाय का? निषेधाचे मोर्चे काढलेत का इसिस/लादेन वगैरेन विरुद्ध. कायच्या काय बोलताय उगाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

तजो येतील लगेच पुरावा द्यायला

ट्रेड मार्क
Fri, 03/25/2016 - 00:26 नवीन
वर त्यांनीच दिलाय तोच परत. पण मी तुमच्याशी सहमत आहे.
एका तरी इस्लामिक देश/सँघटनेनी "इसिस गैर इस्लामिक वागते,म्हणून तिला इस्लाम मधून हाकलून देत आहोत!" अशी घोषणा अगर फतवा काढलाय का? निषेधाचे मोर्चे काढलेत का इसिस/लादेन वगैरेन विरुद्ध.
हे आतापर्यंत कोणीही केलं नाही आणि करणारही नाही. तेवढी हिम्मत नाही या लोकांमध्ये. भ्याडाप्रमाणे लपून हल्ले/ बॉम्बस्फोट करणार. इतर धर्मीय जास्त असतील तिथे नुसते तोंड देखले विरोधाचे नाटक करणार आणि मग जेव्हा संधी मिळेल तेव्हा जिहाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तीव्र असहमत

अर्धवटराव
Fri, 03/25/2016 - 01:09 नवीन
कुठल्या मुसलमानाने कधी दहशतवादाचा विरोध केलाय ते सांगा
निदान भारतीय मुसलमान तरी कधि दहशतवादाचे समर्थन करत नाहि... तीव्र विरोधच करतो. जगभरात मुस्लीम वि. इतर अशी काहिशी संघर्ष स्थिती दिसते (किंवा ति तशीच आहे म्हणुन जाहिरात केली जाते) त्यात अनेकांना (इंक्लुडींग मुस्लीम्स) तथ्य वाटते. मुस्लीमांना धर्मबांधवांकरता काहि कणव वाटणं देखील स्वाभावीक आहे. पण एकुणच दहशतवादातला फोलपणा, त्यातुन होणारं नुकसान सर्वच भोगत असतात.... मुस्लीम्स सुद्धा. तेंव्हा प्रॅक्टीकली त्यातला कुणी दहशतवादाचं समर्थन करत असेल असं वाटत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

गरीब चिमणा जी इसिस हे इस्राईल

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 03/24/2016 - 07:05 नवीन
गरीब चिमणा जी इसिस हे इस्राईल किंवा अमेरिकेचे पाप नसून तुर्की आणि सौदी अरेबियाचे पाप आहे,जेव्हा तुर्कीने रशियन विमान हद्दीचे कारण दाखवून पाडले तेव्हा ते विमान 17 सेकंदासाठी तुर्की हद्दीत होते, आणि इतक्याश्या कारणावरून जर जेट पाडायला लागले तर तुर्कस्थान चे किती विमान पडायला हवे होते इथे बघा।त्याचे कारण तुर्की ला आपण इसिस चे आश्रय दाते आहोत हे उघड होऊ द्यायचे नव्हते म्हणून त्यांनी रशियाचे टेहळणी विमान पाडले।। आता हि बातमी बघा।https://m.facebook.com/story.php?story_fbid=982115515156894&id=108734602494994
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

इसिस हे ईस्त्राईल आणि

DEADPOOL
गुरुवार, 03/24/2016 - 15:54 नवीन
इसिस हे ईस्त्राईल आणि अमेरीकेचे पाप आहे >>>>> अरेरे! विवाहाआधी असं नव्हत करायला पाहिजे =)) असो आई कोण आणि बाप कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

मुस्लिम व्हा,आणि सू-रक्षित

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/24/2016 - 18:37 नवीन
मुस्लिम व्हा,आणि सू-रक्षित बना! .. हा कुरणीय संदेशच दहशतवादी सन्देश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

ग. चि. जी भारताला इजराइल च

Ram ram
Wed, 03/23/2016 - 21:03 नवीन
ग. चि. जी भारताला इजराइल च बनावे लागेल, इथेच आपल्यात किती एकी आहे हे दिसतय
  • Log in or register to post comments

लेख पटला. पण हे जे कोणी भाइ

धनंजय माने
गुरुवार, 03/24/2016 - 01:18 नवीन
लेख पटला. पण हे जे कोणी भाइ वैद्य आहेत त्यांच्याकडे हा पोचणार कसा? की भाई वैद्य हे मिपा सदस्य आहेत ? (स्पा यांनी विचारलेला प्रश्न)
  • Log in or register to post comments

http://www.muslimsatyashodhak

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 03/24/2016 - 12:14 नवीन
http://www.muslimsatyashodhak.org/ इथे भेट द्या
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा