सेकंड ओपिनीयन

सतिश गावडे's picture
सतिश गावडे in जनातलं, मनातलं
14 Feb 2016 - 10:50 pm

वाकडेवाडीचा जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरचा भुयारी मार्ग दृष्टीपथात येताच मी गाडी डाव्या मार्गिकेत वळवली. वेग कमी करत करत भुयारी मार्गाच्या तोंडाच्या थोडंसं अलिकडे थांबलो.

"सर, या सबवेतून पलिकडच्या बाजूला निघा. दोनेक मिनिटे चालत राहिलात की चौकात अ‍ॅग्रिक्ल्चरल कॉलेजचं मागचं गेट लागेल. तिथून डावीकडे वळलात की लगेच बस स्टँड आहे", मी प्रा. डॉ. ना शिवाजीनगर बस स्टँडला कसे जायचे ते हातवारे करून सांगितले.
"धन्याशेठ, नक्की खाजगी डॉक्टरला दाखवून घ्या बरं. टाळाटाळ करू नका.", सरांनी गाडीतून उतरत असतानाच पुन्हा एकदा मला कळकळीनं सांगितलं. सरांनी गाडीचा दरवाजा लावताच मी अ‍ॅक्सलरेटरवरचा पाय दाबला आणि संचेतीच्या दिशेने गाडी हाकू लागलो. गाडी चालत असताना दोन अडीच तासांपूर्वी घडलेला प्रसंग नजरेसमोर तरळू लागला.

साहित्य संमेलनातील उत्साह ओसंडून वाहत होता. कुठे कवितावाचन चालू होते, कुठे परीसंवाद चालू होता. प्रवेशिकेच्या दोन्ही हातांना असलेल्या पुस्तक प्रदर्शनांमधून गर्दी वाहत होती. प्रा. डॉ. त्यांच्या मित्राचा सहभाग असलेल्या एका परिसंवादाला गेले होते. मी आणि प्रचेतस भल्या मोठया पुस्तक प्रदर्शनात पुस्तकं चाळत फीरत होतो.

अचानक वारा घोंघावल्याचा आवाज आला. प्रदर्शनाचा मंडप खुपच उंच होता. आणि त्यावर बहुधा पत्रे नुसतेच टाकून ठेवले असावेत. मंडपाच्या प्रवेशद्वारातून वारा आत शिरला. काही भाग खांबांसकट अचानक वर उचलला गेला. लोकांच्या ते लक्षात येताच एकच पळापळ सुरू झाली. वर उचलला गेलेला मंडप खाली आपल्यावर कोसळणार या भीतीने प्रदर्शनाच्या तेव्हढया भागातील लोक सैरावैरा पळू लागले. त्या लोकांमध्ये मी आणि प्रचेतसही होतो. लोक मागे पुढे न पाहता जीव खाऊन पळत होते. ईतक्यात माझ्या उजव्या पायातील फ्लोटर पुढून निघाला. मागच्या पटटा तसाच राहिल्याने मी अडखळून खाली पडलो. लोक जीवाच्या आकांताने पळत होते. मी दुर्दैवाने अशाच लोकांच्या पायाखाली आलो. मला लोक तुडवून जात असल्याने उठताच येईना. माझी पँट गुडघ्यावर कपडयाच्या चिंध्या फाडाव्या तशी फाटली. दोन्ही गुडघे आणि तळहात सोलवटून निघाले. शेवटी कसाबसा जीवाच्या आकांताने उठलो. आणि उजव्या पायातून अर्धवट निघालेल्या चपलेसह पळत सुटलो.

माझ्या पाच सहा फुट पुढे प्रचेतस पळत होता. त्याच्या आणि माझ्या मध्ये अजून एक जण होता. ईतक्यात वरून एक पत्रा दाणकन खाली आदळला. आणि तो पत्रा नेमका मी आणि प्रचेतस यांच्यामध्ये असणार्‍या व्यक्तीच्या डाव्या हातावर कडेने लागला. त्याच्या हाताचे हाड बहूधा मोडले असावे. ती व्यक्ती "आई माझा हात मोडला, आई माझा हात मोडला" असे गुरासारखे ओरडत पळत सुटली. मी थोडक्यात वाचलो. जरा पुढे असतो तर त्या पत्र्याने मलाही प्रसाद दिला असता.

मी सुन्न झालो होतो. तोंडातून शब्द निघत नव्हता. प्रचेतसने मला एका चहाच्या स्टॉलवर नेले. एक कप चहा प्यायलो तेव्हा मला हायसे वाटले. आणि आता पहिल्यांदा माझे माझ्या फाटलेल्या पँटकडे आणि सोलवटलेल्या गुडघ्यांकडे आणि तळहाताकडे गेले. उजवा गुडघा बराचसा रक्ताळला होता. जोरात ठणकाही लागला होता. प्रचेतस आणि मी संमेलनाची वैद्यकीय सेवा कुठे आहे हे शोधू लागलो. थोडी शोधाशोध केल्यानंतर उभी असलेली अँब्युलन्स दिसली. त्यांच्याकडे गेलो. पत्रे उडण्याचा प्रकार त्यांच्या कानावर गेला होताच. त्यांनी मला अँब्युलन्समध्ये बसवून प्रथमोपचार केले आणि बाजूलाच असलेल्या डॉक्टरांना दाखवायला सांगितले.

मी डॉक्टरांकडे जाताच त्यांनी त्या हात मोडलेल्या मुलाला नुकताच हॉस्पिटलमध्ये हलवल्याचे सांगितले. "तू थोडक्यात वाचलास" असं हसत सांगितलं. मी ही कसंनुसं हसलो. डॉक्टरांनी जखमेवर मलमपट्टी केली आणि काही औषधांच्या गोळ्या दिल्या. मी घाबरून डॉक्टरांना पुन्हा पुन्हा हाड सांध्यावरून सरकले नाही ना, गुडघ्याची वाटी ब्रेक झाली नाही ना असे विचारत होतो. आणि डॉक्टर असं काही झालं नसावं म्हणून सांगत होते. जखम फक्त त्वचेवर झाली असावी असं त्यांचं म्हणणं होतं.

प्रा. डॉ. परिसंवाद संपवून येताच प्रचेतसचा निरोप घेऊन मी आणि प्रा. डॉ. शिवाजीनगरला निघालो. इतक्यात प्रचेतसने यशोधरा साहित्य संमेलनाला आली असून तिला प्रा. डॉ. ना भेटायचे आहे असे सांगितले. तिची धावती भेट घेऊन आम्ही निघालो. जरी गुडघे प्रचंड दुखत होते तरी मी गाडी चालवू शकत होतो ही चांगली गोष्ट होती.

.. घरी येताच नेटवरून जवळपास कुणी हाडांचे डॉक्टर आहेत का हे शोधले. दोन डॉक्टरांचे क्लिनिक जवळच होते. मात्र तो दिवस रविवार होता हे माझ्या डोक्यातच नव्हते. मी पाच मिनिटांत एक हाडांच्या डॉक्टरांकडे पोहचलो. डॉक्टर एका पेशंटला तपासून बाहेर पडण्याच्या बेतात होते.
"अहो, आज रविवार आहे. मी पेशंट घेत नाही रविवारी" डॉक्टरांनी मी क्लिनिकच्या आत पाऊल टाकायच्या आधीच मला दाराबाहेर पाहताच सांगितले.
"डॉक्टर प्लिज, मी बाईकवरून पडलोय आणि माझ्या गुडघ्यांना लागलंय" मी डॉक्टरांनी नसत्या चवकशा करू नयेत म्हणून साहित्य संमेलन प्रकरण त्यांना सांगितलेच नाही.
"अहो हे आमचे नेहमीचे पेशंट आहेत म्हणून दवाखाना उघडला होता. बरं या आता आलाच आहात तर." माझा केविलवाणा चेहरा पाहून त्यांना माझी दया आली असावी.
डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली.
"कुठे राहता?" डॉक्टरांनी विचारले.
"इथेच तुमच्या शेजारीच." मी उत्तर दिले.
"ठीक आहे. मी रविवारी पेशंट तपासण्याचे पाचशे रुपये घेतो. मात्र तुम्ही शेजारी असल्यामुळे तुमच्याकडून मी तिनशे रुपयेच घेईन. ती माझी रेग्युलर फी आहे." डॉक्टरांनी असे म्हणताच मी मान डोलावली.
मी त्यांना माझ्या मनातली गुडघ्याच्या वाटीला काही तडा वगैरे गेला नाही ना ही भीती बोलून दाखवली.
"तसं काही झालेलं नाही. तुला एक्सरेचे पैसे वाया घालवायचे असतील तर मी एक्सरे काढून देतो. चालेल का?" डॉक्टरांच्या या प्रश्नावर मी नकारार्थी मान हलवली.
"मात्र लिगामेंटला इन्ज्युरी झालेली असण्याची शक्यता आहे. आणि ते एमाराय केल्याशिवाय कळणार नाही." डॉक्टरांनी माझ्यावर बाँबगोळा टाकला.
"किती खर्च येईल त्याला?"
"साडे पाच सहा हजाराच्या आसपास. किंवा थोडासा जास्त. माझ्या ओळखीचे एक सेंटर आहे स्वारगेटला. त्यांच्याकडे जा. मी त्यांना तुला डिस्काउंट दयायला सांगतो."

डॉक्टर एव्हढे बोलून थांबले नाहीत तर चक्क त्यांनी एमाराय सेंटरच्या प्रिस्क्रिप्शनवर "प्लिज गिव्ह टेन पर्सेंट डिस्काउंट टू माय पेशंट" असं स्पष्टपणे लिहिलं होतं. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. साधारण वर्षभरापूर्वी मी डॉ. अरुण गद्रे लिखित कैफियत नावाच्या वैद्यकिय क्षेत्रातील गैरव्यवहारांवर प्रकाश टाकणार्‍या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला गेलो होतो. तिथे तज्ञ डॉक्टरांची या विषयावरची भाषणे ऐकली होती. अगदी डॉ. प्रकाश आमटेही भरभरून बोलले होते. हे दहा टक्के सवलत प्रकरण मला चांगलंच खटकलं होतं. मात्र तिथे त्या डॉक्टरांना काहीच म्हटलं नाही. डॉक्टरांनी दिलेलं ते एमाराय आणि इतर औषधांचं प्रिस्क्रिप्शन घेऊन मी घरी आलो.

घरी आल्यावर होमिओपाथ असलेल्या लहान भावाला फोन करून सर्व झाला प्रकार अथपासून इतिपर्यंत सांगितला. त्याने "मी घरी येऊन पाहतो. तोपर्यंत तू काहीही औषधं विकत घेऊ नको किंवा एमाराय करायला जाऊही नको." असे सांगितलं. भावाने संध्याकाळी येऊन माझा पाय तपासला.
"गाडी तूच चालवत आला का?"
"हो."
"काही त्रास जाणवला का?"
"तसा त्रास नाही. मात्र उजवा गुडघा ठणकत आहे"
"ठीक आहे. मला वाटत नाही काही प्रॉब्लेम असावा. तरीही आजची रात्र जाऊ दे. जर काही गंभीर असेल तर रात्री पाय सुजेल. काही गंभीर नसेल तर सकाळपर्यंत यू विल बी परफेक्टली फाईन. रात्री पाय सुजलाच तर आपण माझ्या ओळखीतल्या दुसर्‍या हाडांच्या डॉक्टरांकडे जाऊ."

सकाळ झाली. दोन्ही गुडघ्यावरील जखमांनी खपली धरली होती. ठणका पुर्ण थांबला होता. सूज वगैरे अजिबात आली नव्हती. भावाला फोन करून अपडेट्स दिले. त्याने एमाराय करण्याची मुळीच आवश्यकता नाही असे सांगितले. फक्त अ‍ॅलोपथी डॉक्टरकडे जाऊन प्रिकॉशन म्हणून टीटीचे इन्जेक्शन घे असे सांगितले.

या घटनेला आता जवळपास महिना होत आला. मात्र त्या डॉक्टरांनी एमाराय करण्याचे प्रिस्क्रिप्शन खरज गरज म्हणून दिले होते की त्यांनी मला देऊ केलेल्या दहा टक्के सवलतीच्या आडोशाने त्यांना बराच मोठा कट मिळणार असावा म्हणून दिले होते का हा प्रश्न मला अजूनही पडतो.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

14 Feb 2016 - 10:56 pm | टवाळ कार्टा

पॉपकॉर्न घेउन बसायचे का?

राजेश घासकडवी's picture

14 Feb 2016 - 10:57 pm | राजेश घासकडवी

या विषयात मला काही गती नाही. पण चर्चाविषयाची मांडणी अत्यंत आवडली. अत्यंत वैयक्तिक अनुभव, त्यात आलेले धोके यामुळे वाचकांना त्यात गुंतून जायला होतं. घटनाक्रम सांगितल्यामुळे समस्या कळते, आणि प्रश्न काय असणार याचीही कुणकुण लागते.

सर्व चर्चाप्रस्ताव इतके सुंदर लिहिले गेले तर काय बहार येईल!

आदूबाळ's picture

15 Feb 2016 - 3:27 am | आदूबाळ

+१

प्रचेतस's picture

15 Feb 2016 - 9:04 pm | प्रचेतस

+२

फॅमिलीत डॉ. असेल तरी आणि फॅमिली डॉ. असेल तरी. कट प्रॅक्टीसचे स्तोम गावोगावी स्पेशलाइज्ड डॉ. आल्यापासून (साधारण १९७०च्या सुमारास) वाढलेले दिसते. आमच्या डोंबोलीत पण असे बरेच किस्से ऐकले आहेत.

जाताजाता, एक मिपा उदाहरण...

आमच्या घरी पण असाच एक मेडिकल प्रॉब्लेम झाला होता.मिपाकर डॉ. सुबोध खरे ह्यांनी अतिशय उत्तम सल्ला दिला आणि त्याचा फायदा पण झाला.

योगी९००'s picture

15 Feb 2016 - 8:40 am | योगी९००

आमच्या घरी पण असाच एक मेडिकल प्रॉब्लेम झाला होता.मिपाकर डॉ. सुबोध खरे ह्यांनी अतिशय उत्तम सल्ला दिला आणि त्याचा फायदा पण झाला.
मला ही असाच सल्ला माझ्या सासूबाईंच्या संदर्भी हवा होता. डॉ. खरेंनी योग्य सल्ला दिला. त्यांचे मानावे तितके आभार थोडेच आहेत..!!

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 7:23 pm | टवाळ कार्टा

माझ्या घरी पण अगदी अचानक एक मेडिकल प्रॉब्लेम झाला होता. पूर्णपणे द्विधा मनस्थितीत असताना मिपाकर डॉ.सुबोध खरे यांच्यामुळे सगळे व्यवस्थित निभावले.

यशोधरा's picture

14 Feb 2016 - 11:08 pm | यशोधरा

पायाला काही झाले नाही हे उत्तम झाले.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Feb 2016 - 11:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पत्र्याची तब्बेत बरी आहे का रे?

नशिब रे बाबा काही वाढीव प्रकार नाही झाला ते. काळजी घे.

चांदणे संदीप's picture

14 Feb 2016 - 11:25 pm | चांदणे संदीप

गावडे सर.... इतके लागले असूनही इतक्या निवांतपणे तुम्ही भेटलात आणि मस्तपैकी फोटोसाठीही उभे राहिलात... क्या बात!

दिलपे खाये हुए जख्मो की, आहेभी न सुनी किसीने
ये तो फिरभी 'गुडघा'ही है, जो नसीब जैसा फुटा है!

असं काहीस वाटून गेलं लगेच!

बाकी ते.... धाग्याच्या विषयाबद्दल..... मलाही डाऊटची शंका येतेय!

Sandy

सतिश गावडे's picture

15 Feb 2016 - 9:45 am | सतिश गावडे

दिलपे खाये हुए जख्मो की, आहेभी न सुनी किसीने
ये तो फिरभी 'गुडघा'ही है, जो नसीब जैसा फुटा है!

वाह... मस्त !!!

संदिप, त्यावेळी माझ्यासोबत प्रचेतस आणि प्रा. डॉ. होते. शिवाय थोडया वेळाने नाखुकाका त्यांचा मुलगा वरद याला घेऊन पुस्तक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी येणार होते. मला त्यांचा विरस करायचा नव्हता.

बाय द वे, त्यावेळी प्रा. डॉ. नी तुला शोधण्यासाठी चक्क त्या कविसंमेलनाच्या आयोजकांना तुझ्या नावाची घोषणा करायला लावली. =))

खटपट्या's picture

15 Feb 2016 - 1:24 am | खटपट्या

चांगले लीहीलेय. वरवर वाचले. तुम्ही सुखरुप आहात हे सर्वात महत्वाचे.

वाचक's picture

15 Feb 2016 - 3:20 am | वाचक

गुडघ्याची इजा फ्रॅक्चर नसेल तर लगेच कळून येत नाही. ३ वर्षांपूर्वी बॅडमिंटन खेळताना माझा MCL फाटला. हे अर्थातच तेव्हा कळले नाही. गुडघा दुखणे, प्रथमोपचार झाल्यावर असेच एक दोन दिवसात बरे वाटले.
नंतर गेल्या वर्षी परत खेळताना ACL फाटला, तेव्हा प्रकरण गंभिर असल्यामुळे केलेल्या MRI मधे आधी फाटलेल्या MCL चे निदान झाले
लिगामेंट दुखापत फक्त MRI नेच कळू शकते (मी डॉ नाही) तेव्हा कट प्रॅक्टिस ची शंका सयुक्तिक आहे की नाही सांगता येणार नाही.

रुस्तम's picture

17 Feb 2016 - 9:14 pm | रुस्तम

फाटलेल्या MCL ने एक वर्ष काहीच त्रास दिला नाही का?

वर्षभरात काहीच जाणवल नाही का?

अशा घटनांच्यावेळी प्रथम सिविल हॅास्पिटलयमध्ये जावे.
अचानक झालेल्या अपघातासाठीचा विभाग चोविस तास उघडा असतो.
तिथे नोंद होते आणि काही उपचार घेऊनच मग खासगीवाल्यांकडे जावे.( संमेलनात काही व्यवस्था नव्हती का?)

परत एकदा सगळा घटनाक्रम आठवला. :)

नाखु's picture

15 Feb 2016 - 9:14 am | नाखु

झाल्या प्रकारानंतरही धन्या शेठनी दाखवलेला धीरोदात्तपंणा पुन्हा आठवला.

थोडक्यात वाचलात असे म्हणणार्या (प्रथमोपचार) केंद्रांतील डॉ ला मिपाकर सुधारक कुठल्या प्रतवारीत टाकतील याचा विचार करतोय सध्या?

बाकी एम आर आय बद्दल काय बोलणे? एक चाकू दाखवून घाबरवतो दुसरा भीती (जीवाची/आरोग्याची) इतकाच काय तो फरक , लुटणे तर दोन्हीकडे आहेच !!!

तीव्र जहाल अनुभवी नाखु

सतिश गावडे's picture

15 Feb 2016 - 9:48 am | सतिश गावडे

काही वेळेला आपल्याकडे मर्यादित पर्याय असतात आणि त्यातला सर्वोत्तम पर्याय आपल्याला निवडायचा असतो हे अनुभवी नाखुकाकांना मी का सांगायला हवे. :)

बोका-ए-आझम's picture

15 Feb 2016 - 8:15 am | बोका-ए-आझम

आता कशी आहे तब्येत?

मन१'s picture

15 Feb 2016 - 9:00 am | मन१

लवकर ठणठणीत हो रे भावा. काळजी घे.

सतिश गावडे's picture

15 Feb 2016 - 9:41 am | सतिश गावडे

धन्यवाद मंडळी. मी आता व्यवस्थित बरा आहे.
या प्रकारानंतर मी पुन्हा एकदा दुसर्‍या ऑर्थो डॉक्टरांना दाखवून काही प्रॉब्लेम नसल्याची खात्री करून घेतली.

मात्र हा थोडा सौम्य स्वरूपातील चेंगराचेंगरीचा (Stampede) प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर अशा प्रकारच्या गंभीर घटनांमध्ये काय होत असेल याची थोडीफार जाणिव झाली.

बराच मोठा लफडा झाला हा

लवकर बरा हो रे

च्यायला.....धन्याशेठ, काळ्जी घ्या हो.

अद्द्या's picture

15 Feb 2016 - 12:15 pm | अद्द्या

धन्या शेठ .

काळजी घ्या ... त्या डॉक्टर नि २-३ हजार खिशात टाकण्याची व्यवस्था केली होती . पण असोच .

दोन्ही कडे थोडक्यात वाचलात :)

दोन्ही कडे थोडक्यात वाचलात :)

चपखल
काळजी घ्या धन्यासेठ

नीलमोहर's picture

15 Feb 2016 - 12:40 pm | नीलमोहर

थोडक्यावर भागलं ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट..
काळजी घ्या.

च्यामारी खोतानू. पत्रे बित्रे उडवून आलास व्हय. मला वाटले उगी चिल्लर धडपडलास. लैच जंगी किट्टा केलास की. काळजी घेवा जरा. औशधपाणी घ्येत चला टायमावर.

चौकटराजा's picture

15 Feb 2016 - 3:13 pm | चौकटराजा

आपण आपले कुशल लोकानी विचारावे म्हणून हा धागा काढला नसणार कारण त्याचा मथळाच मुळी सद्या स्थितीतील वैद्यकातील एक गंभीर मुद्द्याकडे बोट दाखवणारा आहे. पण एकेक प्रतिसाद पहा. विषयाला धरून कितीसे आहेत. माझ्या मते संपादकानी असे प्रतिसाद निर्दयपणे उडवायला हवेत ज्याचा विषयाशी काही संबंध नाही. त्यासाठी खरड वही फळा ई. आहेतच ना ! सेकंड ओपीनियन हे किती आवश्यक आहे असे सांगणारे काही अनुभव मिपाकरानी लिहिले तर ते एक विषयावरचे उत्तम माहितीप्रद डोक्युमेन्टेशन होईल असो.
आपल्या विषयाला धरून आता लिहितो - माझी थोरली मुलगी लहान असताना तिने नाकात पेन्सील घातली म्हणून जवळच्या लहानशा होस्पीटलमधे नेले. तेथील डो. नी पेन्सील ( पाटीवरची) बाहेर काढली व " तुमचा मुलीचे टॉन्सील वाढले आहेत ते चार पाच दिवसात काढा आपल्या इथे सोय आहे नाहीतर मुलगी गुदमरून मरेल ! " असे समजावले.
मी साधारणपणे एकाच व्यक्तीच्या सांगण्यावरून महत्वाचा निर्णय करीत नाही. सबब मी आमचा फिजिशियन( बालरोग ) ना विचारले तर त्यानी " काही गरज नाही असे सांगितले . ती मुलगी काही गुदमरली वगैरे नाहीच आज २६ वर्षाची मस्त जिवंत आहे. तिच्याच बाबतीत बालदमा सारखी समस्या झाली असता ." ओढ्याच्या पाण्यातून केमिकल्स जातात
त्याची अ‍ॅलार्जी असणार तेंव्हा जागा बदला व प्राधिकरणात रहायला जा " असा सल्ला दॉ नी दिला. तो ही मी मानला नाहीच .थोडा वेळ रोज ओढ्याकाठी नेऊन खात्री करून घेतली. तसा काही प्रकार नव्हता. आज तिचा बालदमाही अस्तित्वात नाही. तेंव्हा एम डी झाला की तो अगदी देवासमान त्याचा शब्द अंतिम असेच काही नाही. प्रचंड फी भरून वैद्यकाचे शिक्षण घेतल्यावर डॉ ची मजबुरी असते. त्यामुळे आपल्या मजबुरीचा फायदा घेतला जातो. सबब ऐकावे बहुतांचे पण ठरवावे स्वत: चे हे खरे !

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Feb 2016 - 3:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

पत्र्याचं प्रकरण म्हणजे जीवावरचं होतं ! पत्रा अंगावर कुठे व कसा पडेल यावरून तो किती धोकादायक होईल ते ठरते. असो. त्या प्रसंगातून माफक जखमा होऊन तरून गेल्याबद्दल समाधान !

एम आर आयचा सल्ला संशयास्पद वाटतो आहे... विशेषतः सुरुवातीला एक्सरे संबंधी केलेल्या टिप्पणीमुळे.

आनंदी गोपाळ's picture

17 Feb 2016 - 1:27 am | आनंदी गोपाळ

हाय हाय आय मीन. ;)

डॉक्टरसाहेब, पुण्यातला एमारायचा करंट कट रेट किती?

घरच्या एक्सरे मशीनवर फोटू काढला तर किती पैसे सुटतात?

दोन्ही केले तर फायदा जास्त, की कमी?

कम ऑन. यू आर अ डॉक्टर ना? प्लीज टेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Feb 2016 - 2:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखातील माहितीवरून मी माझा अंदाज सांगितला. तो खरा आहे किंवा सगळ्यांना पटावा असा आग्रह अजिबात नाही :)

पैसा's picture

15 Feb 2016 - 7:53 pm | पैसा

पत्रा तरी ओके. स्टँपेडमधे काहीही होऊ शकते. नशीबच. डॉक्टरच्या सल्ल्याबाबत शंका येण्यासारखी परिस्थिती आहे खरी. पण डॉक्टर अननुभवी असेल तर तपासण्यांवर अवलंबून रहायचे प्रमाण जास्त असते. कट प्रॅक्टिस वगैरे चालतेच. कुठले क्षेत्र स्वच्छ राहिले आहे? नशीब असेल तो त्यातूनही वाचतो.

आनंदी गोपाळ's picture

16 Feb 2016 - 9:06 pm | आनंदी गोपाळ

मी लिहितोय ते जरा प्लीज शांतपणे वाचा. मग स्वतःच निर्णय घ्या.
खाली लेखातील काही वाक्ये/ प्रतिसाद कॉपीपेस्ट करतो आहे.

१.

घरी आल्यावर होमिओपाथ असलेल्या लहान भावाला फोन करून सर्व झाला प्रकार

२.

"मात्र लिगामेंटला इन्ज्युरी झालेली असण्याची शक्यता आहे. आणि ते एमाराय केल्याशिवाय कळणार नाही." डॉक्टरांनी माझ्यावर बाँबगोळा टाकला.

३.

ACL / MCL
वाचक - Mon, 15/02/2016 - 03:20
नवीन

गुडघ्याची इजा फ्रॅक्चर नसेल तर लगेच कळून येत नाही. ३ वर्षांपूर्वी बॅडमिंटन खेळताना माझा MCL फाटला. हे अर्थातच तेव्हा कळले नाही. गुडघा दुखणे, प्रथमोपचार झाल्यावर असेच एक दोन दिवसात बरे वाटले.
नंतर गेल्या वर्षी परत खेळताना ACL फाटला, तेव्हा प्रकरण गंभिर असल्यामुळे केलेल्या MRI मधे आधी फाटलेल्या MCL चे निदान झाले
लिगामेंट दुखापत फक्त MRI नेच कळू शकते (मी डॉ नाही) तेव्हा कट प्रॅक्टिस ची शंका सयुक्तिक आहे की नाही सांगता येणार नाही.

४.

मात्र त्या डॉक्टरांनी एमाराय करण्याचे प्रिस्क्रिप्शन खरज गरज म्हणून दिले होते की त्यांनी मला देऊ केलेल्या दहा टक्के सवलतीच्या आडोशाने त्यांना बराच मोठा कट मिळणार असावा म्हणून दिले होते का हा प्रश्न मला अजूनही पडतो.

*

होमिओपथी डॉक्टर घरचा नसता, तरीही, हे असे 'उद्या बघू'वाले सल्ले देण्याची रिस्क, आजच्या जगात जीपी (जनरल प्रॅक्टिशनर) घेऊ शकतो, कन्सल्टंट नाही. सल्ला चुकून चुकला, तर त्या जीपी चा गळा कुणी धरत नाही.

मात्र,

उद्या उठून काही प्रॉब्लेम झाला, तर त्या कन्सल्टंटचा गळा धरला जातो, की "ही लिगामेंट टेयरची शक्यता तुम्हाला समजत असूनही तुम्ही पुढील तपासणी का केली नाही? आम्ही खर्च करायला काय नाही म्हणत होतो का? आता टाका नुकसानभरपाईचे अमुक लाख रुपये."

हे अशी केस करणे प्रकरण तुम्ही करालच असे नाही, पण असे करणारे अनेक त्या डॉ.ला पूर्वी भेटलेले असल्याने आजकाल भारतात, अन त्यातल्या त्यात पुण्यात फार जास्त प्रमाणात 'डिफेन्सिव्ह मेडिसिन' प्रॅक्टिस केले जाते.

तुम्ही एम.आर.आय केला की नाही याने त्या डॉ. ला फरक पडणार नाही, पण केला नाही, तर मग जर चुकून नुकसान झाले, तर ती संपूर्णपणे तुमची जबाबदारी होते. त्याने कागदावर लेखी अ‍ॅडव्हाईस केला आहे. त्याची कायदेशीर जबाबदारी संपली.

काहीच प्रॉब्लेम आला नाही, तर तुम्ही त्याच्या कटबद्दल शंका काढायला मोकळे आहातच, पण प्रॉब्लेम आलाच, तर त्या बिचार्‍याची कातडी बचावली जाणार आहे. अहो, मिळणार असलाच, तरी कट मिळून मिळून ५००-८००- हजार रुपडक्या मिळेल. त्याने एक ऑपरेशन केले, तर अर्ध्या तासाच्या कामाचे तो अर्धा लाख रुपये कमवत असतो. पण या असल्या प्रकारात कोर्टात निग्लिजन्सची केस लागली, तर तिथे खेटे मारण्याचा मनस्ताप, बुडालेली प्रॅक्टिस, वकीलाची फी इ. मिळून लाखोंत खर्च होतो. बीपी वाढते ते वेगळे. अगदी त्याने केस जिंकली त री ही.

तेव्हा महोदय,

त्या कन्सल्टंटच्या जागी तुम्ही असतात, व तुमच्यासारखा अनोळखी पेशंट गाडीवरून पडून तुमच्या दारी आला असता, तर तुम्ही काय केले असते?

आनंदी गोपाळ's picture

16 Feb 2016 - 9:14 pm | आनंदी गोपाळ

अरे हो, अन हे राहिलंच.

मी त्यांना माझ्या मनातली गुडघ्याच्या वाटीला काही तडा वगैरे गेला नाही ना ही भीती बोलून दाखवली.
"तसं काही झालेलं नाही. तुला एक्सरेचे पैसे वाया घालवायचे असतील तर मी एक्सरे काढून देतो. चालेल का?" डॉक्टरांच्या या प्रश्नावर मी नकारार्थी मान हलवली.

इथे फ्रॅक्चर नाही, हे तो छातीठोकपणे सांगतोय, हे आपण ध्यानी घेतलेत का? तिथेच मला त्याची इंटेन्शन्स क्लिअर दिसताहेत.

लिगामेंट टियर समजायला खरेच ती तपासणी करावी लागते हो साहेबा. अन वेळीच समजली नाही तर आयुष्यभर अनस्टेबल गुडघा घेऊन, केव्हा पाय मुडपून खाली पडाल ते समजत नाही असं जगावं लागू शकतं :(

लिगामेंट टियर आणि फ्रॅक्चर ह्या २ वेगळ्या गोष्टी आहेत का?

आम्हाला बायोलॉजी अजिबात समजत नाही. दहावीत शास्त्र ह्या विषयात पास झालो ते प्रॅक्टीकल आणि रसायन्+भौतिक शास्त्रामुळे.पुढे कागदोपत्री डिप्लोमा इंजिनियरिंग केल्यामुळे, मुलभूत जीवशास्त्र अजिबात समजलेले नाही.

(अज्ञानी बालक) मुवि

आनंदी गोपाळ's picture

17 Feb 2016 - 1:00 am | आनंदी गोपाळ

लिगामेंट टियर आणि फ्रॅक्चर ह्या २ वेगळ्या गोष्टी आहेत का?

होय. फ्रॅक्चर परवडले, लिगामेंट टियर नको. अशी म्हण आहे.

फ्रॅक्चर म्हणजे हाड मोडणे तर, लिगामेंट टियर म्हणजे नक्की काय?

लिगामेंट टियर झालेले असेल तर. कुठल्या उपकरणाने शोधतात? (जसे फ्रॅक्चर साठी एक्स-रे, किंवा किडनीतील रोगासाठी साठी सोनोग्राफी.)

लिगामेंट टियर कसा बरा करतात?बाह्य औषधाने की सर्जरी करून?

विनय पत्की's picture

17 Feb 2016 - 2:13 pm | विनय पत्की

लिगामेंट टियर:

गुढग्यात वरच्या आणि खालच्या हाडाला जोडून ठेवण्यासाठी दोन फायब्रस टिश्यूज असतात.
ACL - Anterior cruciate ligament
PCL - Posterior cruciate ligament
फोटो: http://www.drugs.com/health-guide/images/204810.jpg

या फायब्रस असल्यामुळे यात कोणतेही हाड त्यामुळे क्ष-किरण यातून आरपार जातात. म्हणून एक्स-रे मधे हे दिसत नाहीत. त्या फक्त एमआरआय (MRI) मधे दिसतात. थोड्या साधारण चाचण्या करून अन्दाज बान्धता येतो, पण पुर्ण निदान एमआरआय (MRI) मुळेच होते.

टियर झाल्यानन्तर गुढगा सुजतो आणि सुज काही दिवस असते. Ligament ला रक्तपुरवठा फ़ारच कमी असतो, त्यामुळे नैसर्गिकपणे ठिक होणे अशक्य असते. Allopathy मधे यासाठी औषध नाही. होमिओपॅथी मधे औषध आहे असं म्हणतात.

जर खुप जास्त फाटलेला (ligament tear) असेल तर शस्त्रक्रिया करावी लागते. शक्यतो शस्त्रक्रिया लगेच करत नाही. सुज पुर्णपणे उतरल्यावरच करतात.

शत्रक्रियेच्या बर्याच पद्धती असतील. प्रचलित आहे त्यात मान्डीतून एक स्नायुचा भाग काढुन तो हाडान्च्या मधे स्क्रुने लावला जातो. तुमचा गुढगा ९५% पुर्ववत होतो.

Source: स्वानुभव (ACL Tear in my right knee), आणि माझे बन्धू फिजीओथेरपिस्ट आहेत. सगळं ज्ञान त्याच्याकडून.

मुक्त विहारि's picture

17 Feb 2016 - 9:36 pm | मुक्त विहारि

अगदी मनापासून.

कपिलमुनी's picture

16 Feb 2016 - 9:51 pm | कपिलमुनी

बॅट-बॉल घेउन ये !
एक ट्प्पा आउट !
१०० ची पार्टनरशीप पायजे

कपिलमुनी's picture

18 Feb 2016 - 2:04 am | कपिलमुनी

७६ झालेत अजून थोडा वेळ

सतिश गावडे's picture

16 Feb 2016 - 10:36 pm | सतिश गावडे

धन्यवाद डॉक्टर. मिपावर तज्ञ डॉक्टर असल्याने याबाबत चर्चा व्हावी या हेतूनेच हा अनुभव मी लिहिला.

तुमचे बरेच मुद्दे पटले. मात्र कट प्रॅक्टीस ची शंका येण्यासारखी परिस्थिती त्या डॉक्टरांनीच निर्माण केली. केवळ त्यांचा दवाखाना आणि माझे निवासस्थान एकाच विभागात असल्याने त्यांची फी दोनशे रुपयांनी कमी करणे असो वा एमआरआइ सेंटरला द्यायच्या प्रिस्क्रिप्शनवर "प्लीज गीव्ह टेन परसेंट डिस्काऊंट टू माय पेशंट" असे ढळढळीत लिहिणे असो या दोन गोष्टींनी माझ्या मनात संशय बळावला.

डिस्काउंट द्यायला ते ही मागितले नसताना डॉक्टरांचा दवाखाना म्हणजे अमेझॉन डॉट ईन नव्हे. मला जी काही आवश्यक आहे ती वैद्यकीय सेवा दया आणि त्याचा रास्त मोबदला माझ्याकड़ून घ्या. तिथे सवलतीची भाषा कशाला?

त्यामुळे या प्रकारात डॉक्टर आणि तपासणी केंद्र संगनमताने सवलतीची भाषा करून अनावश्यक तपासणी माझ्या गळ्यात मारत आहेत असा संशय मला असेल तर माझे काय चुकले?

आनंदी गोपाळ's picture

17 Feb 2016 - 12:48 am | आनंदी गोपाळ

मार्केटिंग नावाचा एक प्रकार असतो.

माझ्या हॉस्पिटलात, आजही, जर अमुक गावाहून कधीच पेशंट आलेला नाही, पण हा पहिला आला, असे सापडले, तर त्याला न विचारता कन्सेशन दिले जाते. अगदी ओपनली हे तोंडी सांगून, की तुम्ही या गावचे पहिले पेशंट आहात, म्हणून तुम्हाला कन्सेशन. तुम्हाला गुण आला तर तुम्ही माझी जाहिरात तुमच्या गावात करा. हे मी स्वतः हसत हसत सांगतो. त्याबद्दल मला लाज वाटण्याचा काहीच संबंध नाही. त्याचवेळी त्या पेशंटला माझ्याकडे कोणी पाठवलं? त्या नातेवाईकाचीही चवकशी होते व त्याला पुढच्यावेळी कन्सेशन डिक्लेअर होते.

मी जिपड्यांना कट देत नाही. त्यांना माझ्या केबिनमधे खुर्चीवर बसूही देत नाही. उभे ठेवतो.

(त्याच वेळी, जाहिरातीसाठी मला प्रिंट मेडिया वा इतरत्र जाहिरात अलाऊड नाही. एमसीआय गळा धरते लगेच. पण अशा प्रिंटेड, बॅनर वै. जाहिराती नॉनअ‍ॅलोपॅथ्सना अलाऊड आहेत. मोठ्या कॉर्पोरेट व तथाकथित 'चॅरिटेबल' हॉस्पिटल्सना देखिल अलाऊड आहेत. तेव्हा मी माउथ टू माऊथ पब्लिसिटीचा आश्रय घेणारच. मलाही हप्ते फेडायचे आहेत, अन माझ्या नोकरांना पगार देऊन मग स्वतःचे घर चालवायचे आहे.)

या लेखातलीच गम्मत पहा : तुमच्या गल्लीतला डॉक्टर तुम्हाला नेटवर शोधावा लागतो. माझ्या गल्लीतल्या प्रत्येकाला मी ठाऊक आहे. तसे झाले नाही तर माझा पोटापाण्याचा व्यवसाय कसा चालेल?

अन हो. शेवटी हा व्यवसाय आहे. मला शॉप अ‍ॅक्ट लायसन्स घ्यावं लागतं मुन्शीपाल्टीतून. अन तशीच इतर ढीगभर लायसनं, इन्क्लुडिंग एम्प्लॉयी युनियन, त्यांचे टीडीएस अन प्रॉविडंट फंड्स अन त्या बद्दलची सर्व प्रकरणं.

तेव्हा वन्स अगेन, ज्या समाजाने मला शॉप अ‍ॅक्ट लायसन घ्यायला लावले, व माझ्या दवाखान्याचे दुकान बनवले, त्याने स्वतःला गिर्‍हाईकासारखे वागविले गेल्याबद्दल मला दोषी समजावे काय?

अन सगळ्यात महत्वाचे, तुम्हाला गंडवले गेले, याचा पुरावा काय? तुम्ही एमआरआय केला नाही. डॉ.च्या इमर्जन्सी फी मध्ये देखिल कन्सेशन मिळवले. सो बी हॅपी ;)

सतिश गावडे's picture

17 Feb 2016 - 12:58 am | सतिश गावडे

रोचक माहिती. :)

अन सगळ्यात महत्वाचे, तुम्हाला गंडवले गेले, याचा पुरावा काय?

मी गंडवले असे म्हणालोच नाही. माझा शेवटचा परिच्छेद असा आहे:

या घटनेला आता जवळपास महिना होत आला. मात्र त्या डॉक्टरांनी एमाराय करण्याचे प्रिस्क्रिप्शन खरज गरज म्हणून दिले होते की त्यांनी मला देऊ केलेल्या दहा टक्के सवलतीच्या आडोशाने त्यांना बराच मोठा कट मिळणार असावा म्हणून दिले होते का हा प्रश्न मला अजूनही पडतो.

मी केवळ संशय व्यक्त केला आहे.

डॉ.च्या इमर्जन्सी फी मध्ये देखिल कन्सेशन मिळवले. सो बी हॅपी ;)

देव माणूसच ते डॉक्टर म्हणजे. :)

आनंदी गोपाळ's picture

17 Feb 2016 - 1:02 am | आनंदी गोपाळ

"तुम्ही एकंदरितच डॉक्टर लोकांवरच्या आकसाने, दारू पिऊन हा लेख लिहिला आहे", असा संशय मी व्यक्त केला, तर तुमच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडतील, त्याला काय इलाज करता येईल हे आपण मला सांगणार काय?

सतिश गावडे's picture

17 Feb 2016 - 1:11 am | सतिश गावडे

:)

आनंदी गोपाळ's picture

17 Feb 2016 - 1:18 am | आनंदी गोपाळ

:स्वगतः नुसतंच स्मित? नो दंतपंक्ती? असो.

देव माणूसच ते डॉक्टर म्हणजे. :)

यात, डॉक्टरबद्दल 'देव माणूसच तो!' हे म्हण्यासाठी जिभेला जो जोर लावावा लागला, अन जे हसून दाखवावं लागलं ना साहेब, त्यातच सगळं आलं.

त्या डॉक्टरला तशा प्रकारे देवमाणूस म्हणून वरतून त्याने देवासारखे वागावे अशी अपेक्षा करण्याला दांभिकता म्हणता येईल. नैका? नशीब, नावानिशी बदनामी नाही केली बिचार्‍याची सोशल मेडियावर.

सतिश गावडे's picture

17 Feb 2016 - 9:47 am | सतिश गावडे

मला कट प्रॅक्टीसचा संशय का आला याची कारणमिमांसा मी या प्रतिसादत दिली होती. कुठल्याही सारासार विचार करणार्‍या व्यक्तीला ते पेशंटची बाजू म्हणून पटेलही. मात्र तुम्ही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन

"तुम्ही एकंदरितच डॉक्टर लोकांवरच्या आकसाने, दारू पिऊन हा लेख लिहिला आहे", असा संशय मी व्यक्त केला, तर तुमच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडतील, त्याला काय इलाज करता येईल हे आपण मला सांगणार काय?

असा प्रश्न विचारलात. या प्रश्नाने तुम्ही किती खोल पाण्यात आहात हे दाखवून दिले. मी किती खोल पाण्यात आहे याची मला नेमकी जाणिव असल्याने कुठलाही प्रकारचा प्रतिवाद न करता फक्त स्मायली टाकली.

यात, डॉक्टरबद्दल 'देव माणूसच तो!' हे म्हण्यासाठी जिभेला जो जोर लावावा लागला, अन जे हसून दाखवावं लागलं ना साहेब, त्यातच सगळं आलं.

:)

त्या डॉक्टरला तशा प्रकारे देवमाणूस म्हणून वरतून त्याने देवासारखे वागावे अशी अपेक्षा करण्याला दांभिकता म्हणता येईल. नैका?

हे त्या डॉक्टरसाठी नसून तुम्ही ज्या पद्धतीने डीफेंड करत होतात त्यासाठी होतं.

नशीब, नावानिशी बदनामी नाही केली बिचार्‍याची सोशल मेडियावर.

निदान यावरून तरी तुम्ही काही बोध घेऊन जबाबदारपणे प्रतिसाद द्यायला हवे होते.

असो. मला या विषयावर संवाद साधायचा आहे. तुमच्या पहिल्या प्रतिसादावरून तुम्हालाही चर्चा करायची आहे असे वाटले. त्यामुळे तुमच्या प्रतिसादाला मी उप-प्रतिसाद दिला. मात्र तुमच्या पुढील प्रतिसादांवरून तुम्हाला संवाद साधायचा नसून फक्त वाद घालायचा आहे असे वाटते. वादासाठी माझ्याकडे वेळ नाही. तो वेळ मी चांगली पुस्तके वाचण्यात सत्कारणी लावतो.

आनंदी गोपाळ's picture

17 Feb 2016 - 9:34 pm | आनंदी गोपाळ

निदान यावरून तरी तुम्ही काही बोध घेऊन जबाबदारपणे प्रतिसाद द्यायला हवे होते.

काय भाव दिलं तुमचं बोधामृत? ;)

पुस्तके वाचण्यातच वेळ घालवीत चला. असले धागे पाडत जाऊ नका, असे सुचवतो. पहा त्यातून काही बोध घेता येतोय का?

बोका-ए-आझम's picture

17 Feb 2016 - 11:43 pm | बोका-ए-आझम

वाद माणसांशी घालावेत.

सतिश गावडे's picture

17 Feb 2016 - 11:52 pm | सतिश गावडे

खरं आहे तुमचं :)

कपिलमुनी's picture

17 Feb 2016 - 1:33 am | कपिलमुनी

दारुचे शिंतोडे असतील तर थोडेसे ईकडे पण उडव रे

चिगो's picture

17 Feb 2016 - 4:43 pm | चिगो

उत्तम प्रतिसाद, डॉक्टरसाहेब..

चांदणे संदीप's picture

16 Feb 2016 - 10:27 pm | चांदणे संदीप

अतिशय व्यवस्थितपणे मुद्दा मांडलात. आपण डॉक्टर आहात असे वाटते. माझीही एक शंका तुम्ही शांतपणे वाचून घ्या आणि डॉक्टर असाल तर तुम्हाला स्वत:ला १००% खात्री असेल तरच उत्तर द्या अन्यथा आपण मिपावरच्या इतर डॉक्टरांची मते पाहूया!

तर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्या डॉक्टरची कातडी बचावत असेल म्हणून एमआरआय करण्याचा सल्ला देणं ही मला गंभीर बाब वाटते. कारण, असेच कातडीबचाव कारण काढून इतर अनेक डॉक्टर असेच सल्ले देतील/देतही असतील. यातून त्यांचा निव्वळ फायदाच होईल कारण करायला सांगितलेल्या टेस्टमध्ये काही निघाल तर पेशंटकडून वाहवा मिळेल किंवा पुढची फी चालू आणि सर्वकाही नॉर्मल आहे अस आल की कातडीबचाव धोरण आहेच! म्हणजेच आला पेशंट की हाण सल्ला! कालच एका मित्राला डॉक्टरकडे घेऊन गेलो तर तिथेही असाच एक सल्ला मिळाला. किती सिरीयस इश्श्यू असतो अस विचारलं तर उत्तर आलं ०००१%, पण टेस्ट करून घ्याच!

दुसरा अजून एक प्रश्न मला असा पडतो की अशा पडलेल्या/धडपडलेल्या/अपघातांच्या केसेसमध्ये डॉक्टर्स योग्य ते संशोधन करून माराची/अपघाताची तीव्रता वगैरे आकडेमोडीत मांडून, मोजूनमापून त्यावर अचूक असे भाष्य का करू शकत नाहीत? आजही, इतक्या प्रगत विज्ञानाच्या मदतीनेही? त्यातही कितीतरी सिमिलर केसेस येतच असतील डॉक्टरांच्याकडे!

माझ्या शंका आहेत या....मी डॉक्टरांना लगेच अडाणी, मागास किंवा इतर कसल्याही पारड्यात टाकत नाहिये किंवा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यातही टाकत नाहिये. जे वाटतं ते लिहिल आहे!

योग्य प्रतिसादाच्या प्रतिक्षेत,
Sandy

पण,

म्हणजेच आला पेशंट की हाण सल्ला!

हे एक गमतीदार वाक्य सापडले.

तर त्याबद्दल.

आपण जी फी दवाखान्यात पाय ठेवल्यावर भरता, तिला "कन्सल्टिंग फी" असे म्हणतात. अर्थात, सल्ला देण्याबद्दलची फी. आता आला पेशंट, अन त्याने विकत घेतलेला सल्ला दिला नाही, असे करता येईल का?

चांदणे संदीप's picture

17 Feb 2016 - 10:17 am | चांदणे संदीप

माझ्या शंका आहेत या

असं म्हटलोय की हो डॉक्टरसाहेब! तुम्ही मात्र मला...

अ‍ॅक्चुअली, मी तुम्हाला उत्तर का द्यावे हेच मला समजलेले नाही.

...उडवूनच लावलंत! :(

वर हेही सुरुवातीला लिहिलेलंच...

अतिशय व्यवस्थितपणे मुद्दा मांडलात. आपण डॉक्टर आहात असे वाटते. माझीही एक शंका तुम्ही शांतपणे वाचून घ्या आणि डॉक्टर असाल तर तुम्हाला स्वत:ला १००% खात्री असेल तरच उत्तर द्या अन्यथा आपण मिपावरच्या इतर डॉक्टरांची मते पाहूया!

मिपावर असहिष्णुता वाढलीये हेच्च खर!

सहिष्णु ;)
Sandy

बापरे! बरच काही होऊन गेलं.

बाप रे ! चांगलाच उद्योग झाला म्हणायचा. वर तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे आता बरे आहात तेंव्हा विषयाकडे वळते. वर आनंदी गोपाळ यांनी कुठल्याही अभिनिवेशाशिवाय दिलेली उत्तरं मला पटली, आवडली. याच विषयावर सुहास जोशी, मोहन गोखलेंचं एक " डॉ तुम्हीसुद्धा" हे नाटक आलं होतं. मिळालं तर जरुर बघा. मिपा वर अनेकदा हा काकु झालाय. मिपावरचे अनेक डॉ. पोटतिडिकीने दुसरी बाजू पटवुन देतात. तरी ही हा विषय घेऊन काही सांगायची जेनुइन गरज पुनःपुन्हा निर्माण होते हे ही खरं. असं का होत असावं? वर आ-गो म्हणतात त्या प्रमाणे केस करायची किंवा मधे मला वाटतं पुण्याजवळ एका छोट्या गावात लोकांनी डॉ ला मारहाण केली होती , डॉ नी मग संप केला वगैरे अशी अत्यंत सबळ आणि ठोस कारणं असावी, सेफ सल्ले देण्यामागे. फेलो डॉ नी अशा वेळी किती ही सपोर्ट केला तरी अजुन ही भारतात डॉ- पेशंट ही १०० % विश्वासावर चालणारी संस्था आहे. माझ्या आईला ओळखणारे डॉ मला हक्काने काही गायनॅक सल्ले देतात कारण त्यांना माझी आनुवंशिक हिस्टरी माहिती असते, ते नुसते जी पी असले तरी मी तो सीरियसली घेते कारण मी लहानपणापासून डॉ काकांकडुन फोन वर देखील औषधं घेतलेली असतात. त्यांचा अनुभव, माझ्याबाबतचा अनुभव यावर माझा विश्वास असला की मला निम्मं बरं त्यांना फोन करुन च अनेकदा वाटतं. पण जर वर उल्लेख केलेले केसेस किंवा मारहाणीसारखे प्रकार घडले तर पेशंट च्या विश्वासाला तडा जाईल. अशा वेळी पेशंट कडे आपसुक सहानुभुती जाते कारण त्यांचं काहीतरी भरुन न येण्याजोगं नुकसान झालेलं असतं. बाय द बुक न गेल्याने डॉ कडे कदाचित कन्सल्टन्सी चे व्हिडीओज, पेशंट ने जर सांगितलेल्या टेस्ट्स न करण्याचा निर्णय घेतला तर "अगेन्स्ट मेडिकल अ‍ॅडव्हाईस" जातोय असे साईन केलेले फॉर्म्स नसतात. त्यांना आपली बाजू पटवुन सांगण्यासाठी भयंकर डोकेफोड करावी लागत असणार. पेशंट ने नकळत केलेल्या चुकांची भरपाई त्यांना करावी लागत असावी. ते असे बाय द बुक जात नाहीत म्हणुन आपल्याला हवं तेंव्हा दुसर्‍या डॉ कडे जाऊन सेकंड ओपिनियन घेणं सहज शक्य होतं. सेकंड ओपिनियन चं महत्त्व भारताबाहेर राहणार्‍या भारतीयांना सहज कळेल.

एक बाजू पेशंट ची पण आहे यात. आपण आपल्या बॉडी पॅटर्न बद्दल पुरेसं जागरुक नसणं, पुरेसं निरिक्षण न करणं, पुरेसे महत्त्वाचे प्रश्न न विचारणे ही आपली उदासीनता ! अमुक एक टेस्ट सांगितल्यावर का, काही पर्याय आहेत का, कधी पर्यंत केलेली चालेल वगैरे कळीचे मुद्दे अनेकदा पेशंटस देखील विचारत नसावेत. मेडिकल कौन्सिलिंग ही देखील पुरेशी महत्व न दिले गेलेली बाब आहे. खुप कमी डॉ. पेशंट ला सल्ल्यामागचं कारण समजावुन सांगतात. त्या कारणा अभावी पेशंट च्या मनात अविश्वास निर्माण होऊ शकतो. कधी काही ज्येष्ठ डॉ खुप कडक असतात. एखाद्या समान सुत्र असलेल्या ट्रीटमेंट मधुन गेलेल्या व मित्र- मैत्रिणीला जर त्यातले तपशील आणि कारणं विचारले तर त्यांना नीट सांगता येत नाही. त्यांच्या ट्रिटमेंट ला यश आलं यावर ते खुश अस्तात. कारण हे सगळं करताना कधी कधी त्यांना नीट विश्वासात घेऊन कारण मीमांसा केलेली नसते. त्यांनी ही काही विचारलेलं नसतं. एक च प्रश्नः "डॉ मी बरा / बरी होईन ना? हा खुप मोठा इशु नाही ना?" हा माझ्या मते बाय द बुक न जाण्याचा तोटा. हे न केल्याने पेशंट ची कल्पना भरारी घेते, आधीच आजारी मनात धसका बसायला कारण लागत नाही. सगळेच डॉ असे नसतात पण असे असणारे डॉ कमी नाहीत. मी पुण्यात ज्या डॉ कडे जायचे त्या मला अनेकदा पेन पेपर घेऊन साध्या साध्या गोष्टी देखील समजावुन सांगायच्या.पुढच्या वेळी माझा अवेअरनेस जास्त असायचा. त्यामुळे हे सरसकटीकरण किंवा मला आलेल्या मर्यादित अनुभवातुन बनवलेलं मत वगैरे नाही. फक्त एक निरीक्षण आहे.

सतिश गावडे's picture

17 Feb 2016 - 10:10 am | सतिश गावडे

विचार करण्याजोगा आणि पटण्याजोगा प्रतिसाद. लहान भाऊ होमिओपाथ असल्याने डॉक्टरांच्या बाजूची थोडी फार जाणिव आहे.

आनंदी गोपाळ यांचा पहिला प्रतिसाद माहितीपुर्ण होता. मात्र मला कट प्रॅक्टीसचा संशय का आला याची कारणमिमांसा देऊनही पुढील प्रतिसाद देताना त्यांचा तोल ढळला असे खेदाने म्हणावेसे वाटते.

बोका-ए-आझम's picture

17 Feb 2016 - 8:53 am | बोका-ए-आझम

वरच्या प्रतिक्रिया वाचून कदाचित तुम्ही आनंदी गोपाळ यांचेच (कट प्रॅक्टिसमधून मिळणारे) पैसे बुडवले की काय असं वाटायला लागलं. तुम्हीपण कोणाशी वाद घातलात ? जसे ग्रेटथिंकर, फुलथ्राॅटल जिनियस, दादा दरेकर, नाना नेफळे, काकासाहेब केंजळे तसेच हे आनंदी गोपाळ! दुर्लक्ष करायला हवं होतंत. असो.

प्रचेतस's picture

17 Feb 2016 - 9:57 am | प्रचेतस

तीव्र असहमती.

उलट कुठल्याश्या ठिकाणच्या एका मा. डॉक्टरांच्या कट प्र्याक्टिसविषयी एक लहानशी शंका व्यक्त आख्ख्या व्होल इंडियातल्या समस्त डॉक्टर जमातीचा अपमान करून त्यांच्या भावना दुखावून त्यांच्याविरुद्ध आख्ख्या व्होल मिपाकरांचे मत कलुषित करण्याचा कट करणाऱ्या गावडे सरांचाच मी येथे तीव्र निषेध करतो.

आनंदी गोपाळ साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है.

सतिश गावडे's picture

17 Feb 2016 - 10:15 am | सतिश गावडे

पुढच्या वेळी माझ्या घरी याल तेव्हा निषेधाचे काळे झेंडे घेऊन या.
तसंही मला बाईक आणि गाडी पुसायला दरवेळी फडकं शोधावं लागतं. तुमच्या झेंडयांनी काही दिवसांची सोय होईल.

प्रचेतस's picture

17 Feb 2016 - 10:17 am | प्रचेतस

हो. अगदी नक्की.

नाखु's picture

17 Feb 2016 - 11:02 am | नाखु

वडगाव धायरी परिसरात टाकू नै त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.

गाडी पुसण्याइतके मोठे कापड असावे.

गाडी पुसुन झाल्यावर झेंडा परत मागू नये.

झेंडा काळाच का? त्या वर आगलावी घोषणा का नको याचा काथ्याकुट इथे करू नै . त्यासाठी वेगळा धागा ऊसवावा.

आगलावी घोषणा साठी गेलाबाजार एखादी स्पर्धा ठेवायली हरकत नाही.

हुश्श इशारावजा सुचना संपल्या (चिमण कुठे गेलाय उरलेले कागद घेऊन तेच कळेना !!!)

सचिव
मिपा धुराळी धाग्याची धग आणि आग निस्तारण निवारण ,निराकारण (निष्कारण) समीती

सतिश गावडे's picture

17 Feb 2016 - 10:13 am | सतिश गावडे

त्यांचा पहिला प्रतिसाद अतिशय माहितीपुर्ण होता म्हणूनच मी उप-प्रतिसाद दिला. पुढे मात्र त्यांची गाडी रुळावरून घसरली. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा थांबवणे हेच उत्तम.

मागे हि बर्याच वेळा त्यांना प्यानिक होताना पाहिलेले आहे ,, सो काही नवीन नाही

गावडे तुम्हारा चुक्याच

अत्रन्गि पाउस's picture

17 Feb 2016 - 9:45 pm | अत्रन्गि पाउस

हसतोय !! बोक्या भाऊ

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 11:13 am | पिलीयन रायडर

मला आनंदी गोपाळ ह्यांचा पहिला प्रतिसाद पटला. तुम्हाला लिगामेंट टियर असण्याची दाट शक्यता असेल तर एमआरआय काढायला सांगण्यात काय चुकले? तुम्हाला त्यांच्यावर कट प्रॅक्टिस बद्दल शंका असेल तर तुम्ही दुसर्‍या ठिकाणी हीच टेस्ट करुन घेतली तरी चालले असतेच. पण टेस्टची गरज नव्हतीच असे मात्र मला वाटत नाही. अनेकदा भारंभार टेस्ट करुन घेण्याचा आग्रह अनेक डॉक्टर करतात. त्याची कल्पना आहे. पण तुम्हाला जरी आत्ता बरं वाटत असलं तरीही ही टेस्ट आवश्यक असु शकते हे वर प्रतिसादातुन कळले आहेच.

आता मुद्दा सवलत देण्याचा. तर हे क्षेत्रही व्यवसाय म्हणुनच निवडलेले असल्याने डॉक्टरांनी सवलती वगैरे दिल्या तर वावगे काय? मलाही ह्या बाबतीत आनंदी गोपाळ ह्यांच्याशी सहमत व्हावे वाटते. शॉप अ‍ॅक्ट, युनियन, पीएफ वगैरे असताना हा व्यवसाय सेवाभाव ठेवुन का करावा? मग अशी सवलत दिली म्हणुन संशय आला किंवा तुम्हाला ते पटले नाही तरी त्यांच्याकडे त्याची गणिते आहेत. तुम्हाला तसंही ती सवलत न घेण्याचा आणि तरीही दुसरीकडे ही टेस्ट करण्याचा किंवा अगदी डॉक्टरच बदलण्याचा पर्याय आहेच.

मला वाटतं तुम्हा दोघांचा संवाद "गंडवणे" ह्या एका शब्दाने गडबडला. तुम्ही संशय व्यकत केलात, त्यांना तो ही मान्य नाही आणि त्यांनी सुद्धा उत्साहाच्या भरात तुमच्या वर "संशय" व्यक्त केला. शब्द / उपमा जहाल असल्याने मुद्दा बाजुला राहुन त्यावर तुम्ही हर्ट झालात. पण तेवढे सोडुन तुम्ही दोघेही व्यवस्थित चर्चा करु शकता. लहानसा मुद्दा सोडुन द्यायला हरकत नाही.

बाकी इथे लोक आनंदी गोपाळ ह्यांच्या विरोधात एकत्र येऊन सारकास्टिक प्रतिसाद टाकत आहेत हे कुणाला वावगे वाटत नाही का आता? की मिपावरचे प्रॉब्लेम्स पण सिलेक्टिव्ह आयडी बोलत असले की मगच दिसतात?

बोका-ए-आझम's picture

17 Feb 2016 - 12:05 pm | बोका-ए-आझम

बाकी इथे लोक आनंदी गोपाळ ह्यांच्या विरोधात एकत्र येऊन सारकास्टिक प्रतिसाद टाकत आहेत हे कुणाला वावगे वाटत नाही का आता? की मिपावरचे प्रॉब्लेम्स पण सिलेक्टिव्ह आयडी बोलत असले की मगच दिसतात?

अनुक्रमे नाही आणि हो. यालाच गि-हाईक बघून पुडी बांधणे असं म्हणतात. प्रश्न प्रतिसादात वापरलेल्या भाषेचा आणि त्यातून दिसणाऱ्या वृत्तीचा आहे.

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 12:08 pm | पिलीयन रायडर

जौ द्या..

मुळ लेखाशी जे संबंधित आहे तेवढाच प्रतिसाद ग्रुहीत धरा.. उरलेल्या वाक्यावर ह्या जन्मात नीट चर्चा होऊ शकत नाही. एक प्रयत्न झालाय माझा नुकताच. तेव्हा असोच...

:)

मराठी_माणूस's picture

17 Feb 2016 - 1:24 pm | मराठी_माणूस

मी जिपड्यांना कट देत नाही. .........

स्वत:च्याच व्यवसाय बंधुं बद्दल ही भाषा ? मग इतरानी नुसती शंका व्यक्त केली तर एव्हढा राग का यावा.

चिन्मना's picture

17 Feb 2016 - 3:35 pm | चिन्मना

+१. हेच लिहिणार होतो. कट देत नाही म्हणणे सोडुन द्या पण "त्यांना माझ्या केबिनमधे बसूही देत नाही, उभे ठेवतो" या वाक्यावरुन त्यांची मनोवृत्ती कळते. GP हा MBBS असतो. त्यांचा असा उल्लेख करणे पटले नाही.

आनंदी गोपाळ's picture

17 Feb 2016 - 9:27 pm | आनंदी गोपाळ

GP हा MBBS असतो.

नक्की का? मग आयुर्वेदाचार्य, अन होमिओपदी युनानी इलेक्ट्रोपथी सिद्ध वगैरे काय असतात?

*

कट मागणारा/घेणारा कोणताही "डाक्टर" जिपडा असतो. अ‍ॅब्सोल्यूट थर्डक्लास मेंट्यालिटी. त्याची डिग्री काय, याच्याशी काहीच संबंध नाही. मग तो अगदी डीएम न्यूरो असला अन एमडी रेडिओवाल्याकडे एमारायसाठी कट मागत असला, तर तो नीच- व जिपडाच.

तेव्हा, व्यवसायबंधू असला, अन मालप्रॅक्टिस करीत असला, तर मी त्याच्या विरोधीच बोलतो. त्या दृष्टीने या वरील दोन प्रतिसादांचा अर्थ सूज्ञांनी समजून घ्यावा.

अन हो, (चांगल्या) व्यवसायबंधूंची बाजू घेण्यासाठीच वर धागाकर्त्यांना थोडं तुसडेपणे बोललो आहे.

*

लेखातला ऑर्थोपेडिशियन मला सेन्सिबल वाटला. त्याच्यावर संशय घेणे मला पटले नाही. त्यामुळे धागाकर्त्यांवरही एक गमतीत संशय घेऊन दाखवला, तर धागाकर्ते १५ ठिकाणी माझा तोल ढळल्याचा प्रतिसाद लिवायलेत. ज्या डॉक्टरचे संशयावरून (मुद्दाम्/चुकून) चारित्र्यहनन केले गेले, त्याचं काय? की रामाच्या सीतेसारखे गुपचुप सहन करायचे डॉक्टरांनी? किस खुशी मे?

*
कटचा संशय घेऊन या लेखात डॉक्टर (जमाती)वर शिंतोडे उडवले गेलेत की नाहीत याबद्दल खुलासा कुणी करेल काय?

*

एक पॉप्युलरिटी काँटेस्टमधे उतरल्यासारखा प्रतिसाद आमच्या डॉक्टर मित्राचाही आहे वर. त्यांनीही सरळ प्रश्नांना पोलिटिकली करेक्ट बगल दिलेली आहे.

*
असो.

मी काय व का बोलतो आहे हे समजून माझ्या बाजूनेही लिहिणारे अनेक आहेत, यातच मला आनंद आहे.

तेव्हा, चूकभूल देणे-घेणे. अधिक उणे माफ करणे.

आज वाचला हा धागा.सगाजी तुम्ही महाण निघालात.डायरेक पत्रे उडवून आलात संमेलनाचे! थोडक्यात निभावले.बरे झाले.
आनंदीगोपाळांच्या पहिल्या प्रतिसादाशी सहमत.
त्यांच्या जिपडे वगैरे म्हणण्यामागे कदाचित आलेले कटु अनुभव असू शकतात.
- अनेक पॅथींच्या, चोर, कट घेणार्याच,अनेथिकल प्रॅक्टिस करणाऱ्या जिपींच्या गावातली- अजया

पुर्वी या घटनेबद्दल थोडक्यात वाचले होते..
आता काळजी घ्या..
बाकी,सेंकड ऑपनियनचा काही अनुभव नाही..

अत्रन्गि पाउस's picture

17 Feb 2016 - 9:50 pm | अत्रन्गि पाउस
स्वाती दिनेश's picture

17 Feb 2016 - 9:58 pm | स्वाती दिनेश

एवढं सगळं घडलं?
काळजी घ्या,
स्वाती

गावडे बुवा प्रकॄतीचे काळजी घ्या.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

सनईचौघडा's picture

18 Feb 2016 - 11:43 am | सनईचौघडा

अरे तुझ्या शरिराला झालेल्या जखमा बर्या झाल्या असतीलही. पण स्पांड्डूब्बा म्हणतो त्याप्रमाणे गावडे तुम्हारा चुक्याच तु इथे धागा कायाकु डाला, गेली ना ती शांती (मनाची) निघुन.

सतिश गावडे's picture

18 Feb 2016 - 12:03 pm | सतिश गावडे

आमचे गुरु महाराज म्हणतात, "शांती गेली तर जाऊ दे, पण संयम सोडू नको".

बाकीचेहो, आपण जी आस्थेने चौकशी करत आहात त्याने खुप बरे वाटले.

डॉ. आनंदी गोपाळ यांनी माझी बाजू ही "पेशंटची बाजू" म्हनून विचारात घेतली नसली तरी त्यांच्या "तुसडया" प्रतिसादांमधून आपल्याला डॉक्टरांची बाजू कळते आहे. त्यामुळे एका अर्थाने ते धाग्याचा हेतू सफल करण्यात हातभार लावत आहेत त्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक आभार.

अत्रन्गि पाउस's picture

18 Feb 2016 - 7:33 pm | अत्रन्गि पाउस

तरी अजून मी किती हुशार, कुठेही अडमिशन कशी मिळू शकत होती, मी कसा पंचतारांकित, पेशंट कसे मूर्ख वगैरे वगैरे बाकी आहे ...
वर बोकोबा म्हणालेत ते बरोबर आहे ...
....असो पण तुम्ही तब्ब्येतीची काळजी घ्या ... आणि लवकर बरे व्हा !!

धागा आज वाचला. दोन्ही बाजूंची चर्चा मननीय आहे. सतीशभाऊ, काळजी घ्या. लिगामेंट टिअर हे काही वर्षांनी पुन्हा उद्भवू शकते व तेव्हा शक्यतो योग्य चाचण्या व उपचार करवून घेणे उत्तम.

गौरी लेले's picture

18 Feb 2016 - 8:14 pm | गौरी लेले

बापरे ! लिगामेन्ट टियर एकुनच काळजात धस्स झाले .

कसा आहेस आता सतिश ? काळजी घे हां ! आणि हो अ‍ॅलोपॅठेपेक्षा केव्हाही होमिऑपॅठीच बेस्ट हां !

काळजी घे :)

अहो आता इथे पुन्हा सुरु होईल .... पॅथीत पॅथी अलोची ....

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Feb 2016 - 9:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपाकर काड्या ओळखण्यात तरबेज आहेत, त्यामुळे अश्या काड्या फारसा पेट घेत नाहीत असा सद्याचा अनुभव आहे ;) =))

अत्रन्गि पाउस's picture

18 Feb 2016 - 11:20 pm | अत्रन्गि पाउस

इथे आपण किंवा डॉक्टर खर्यांना मिळत असेलेला आदर जास्त खरा ....
बाकी सुज्ञास अधिक काय सांगावे ...

सुबोध खरे's picture

19 Feb 2016 - 9:31 am | सुबोध खरे

The best pathy is sympathy
The worst pathy is apathy
बाकी चालू द्या

गौरी लेले's picture

19 Feb 2016 - 12:59 pm | गौरी लेले

अगदी खरे आहे खरे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Feb 2016 - 10:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सालं धन्याची लैच काळजी वाटत होती. इतकं लागूनही चेहरा नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न, गप्पांचा तोच मुड, पुन्हा मला सोडायला येणं, धन्या दोन दिवस माझ्या सोबतच होता. मी परिसंवादाला काय गेलो हा उपद्याप झाला. बाकी, आता बरा आहेस ही चांगली गोष्ट. बाकी डॉक्टर ती बनवेगीरी काय बोलायचं सालं सर्वच क्षेत्रात काही लोक चांगले तर काही बोगस आहेतच तो काही वाद नाही.

-दिलीप बिरुटे
(धन्याचा मित्र)

माझ्या पाहण्यातला एक डॉक्टर डीस्टील वाटर चे इंजेक्शन गरीब लाेकांना द्यायचा कँन्सर हाेऊन मेला डाेळ्यादेखत