रात्रीच्या शांत काळोखात तुम्ही कधी 'धडाम्' असा आवाज ऐकला आहे काय? झोपेत असतानाही हा आवाज कधी कधी ऐकू येतो. मी जिथे राहतो तिथून जवळूनच एक हायवे गेलाय. आणि असे आवाज आम्हाला नेहमी ऐकायला येतात. थरकाप उडतो. तो नक्की ट्रक, टेम्पो, लक्झरी की अजून काही. मी एका झोपड्यात राहतो. झाडी तशी बरीच आहे. आणि हायवे इथून फारसा लांब नाहीये. कधी आवाज आलाच तर मी झोपड्याबाहेर येऊन दुरुनच कानोसा घेतो. आवाज तसा लहानच असतो. पण कधी कधी जमीन हादरते. आणि पुन्हा सगळे चिडीचूप. शांत. भयाण काळोख. आणि मग पुन्हा 'सायरन'चे आवाज. रात्रभर.
त्या दिवशी असाच आवाज आला 'धडाम... खळ्ळळ्ळ' . हा तसा बऱ्यापैकी मोठा आवाज. मी झोपड्यातून लगबगीनं बाहेर आलो आणि हायवेकडं नीट निरखून बघितलं. वाहनं जास्त नव्हती. पण कुठे काही मागमूस लागेना. मग माळरानावर एका ऊंच जागेवर चढून जमेल तितका हायवे डोळ्याखालून घातला. कुठेच काही गडबड वाटत नव्हती. हा भास तर नव्हता. मी स्कुटर काढून तडक हायवेवर निघालो. डिव्हायडर ओलाडून स्लो लेन मध्ये घुसलो. रस्त्यावर ना कोठे गर्दी ना कोठे ट्राफीक जाम. सरळ जातच राहीलो. पाच-सहा कि.मी. वर मला एक टेम्पो आढळला. फरफटत गेलेला. झुडपात. बहुतेक रुळ ओलांडत असताना त्याची चाकं अडकली असतील.
अरे हो सांगायचे राहिलेच. आमच्या इथुन एक रेल्वेचा ट्रॅकपण जातो. फाटक असणारा. म्हणजे रेल्वेने टेम्पोला धडक मारली असणार.
रेल्वेचे डबेही त्या माळरानावर इतस्तत विखुरलेले.
मी नंबर डायल केला. 2000 माईल्स हाय, अराऊंड 3 लॅक किमी पर सेकंद, सिग्नल गोज डाऊन अगेन, अॅन्ड रिंग्ज द फोन.
"हैलो"
"हा"
"ईमरजन्सी, कम फास्ट"
तातडीचं संभाषण आम्ही इंग्लिशमध्येच करतो. लॉरी घेऊन 'सत्या' आला. लगेच. याला दम निघत नाही. चैन पडत नाही. हातात 'फावडं' घेऊन खाली ऊतरला. याच्या हातात कायम फावडं असतं. त्याचा तो स्टेटस सिंबॉल आहे.
रेल्वेच्या डब्यांतून काही ठिकाणी धुर निघत होता. कुठे ठिणग्या, तर कुठे आग पण लागली होती.
"किती गेले असतील रे, दिडशे तर नक्कीच" सभोवतालावर नजर फिरवून सत्या म्हणाला.
"ते बघ तिकडून दोन पळतायत, धर त्यांना" सत्या पुढं होत फावडं घेऊन त्यांच्या मागं लागला.
"वेट अ मिनीट, पण मला काहितरी खटकतयं" चित्रगुप्तानं शेवटी तोंड उघडलं. मघाचपासून समोरच्या खुर्चीवर बसून मी एकटाच बडबडत होतो.
" ट्रॅक कसा काय आला?, हायवेवर रेल्वेचा ट्रॅक कसा काय आला. तो ही फाटक असलेला. हे जरा विसंगत वाटतय. संशयाला जागा राहतेय. आय थिंक यू हॅव नॉट प्रिपेयर्ड वेल. प्लॅन कॅन्सल."
चित्रगुप्त एखादाच पॉइंट काढतो, पण सॉल्लिड काढतो, त्याच्यामुळं सगळा प्लॅनच फिसकाटतो.
" डिलीवरी तर अर्जंट आहे, ती ही दिडशेची, नाऊ व्हाट वुई हॅव टू डू?"
"डू युवर बेस्ट, क्लायंट इज ओव्हर माय हेड" साला हा तर वैतागला.
बराच वेळ शांततेत गेला. एकदोन ची केस असती तर ठीक. पण एवढी मोठी अॉर्डर पुर्ण करायची म्हणजे प्लॅनिंग फुलप्रुफ पाहीजे. आणि ती क्लायंट समोर प्रेझेंट करताना संशयाला कोणतीही जागा नको. म्हणुन चित्रगुप्त माझ्याकडून अगोदरच सगळं वदवून घ्यायचा.
मी पाठीमागच्या काही नोंदी तपासायला घेतल्या. चित्रगुप्तही डोकं खपवत होताच आणि तेवढ्यात,
2000 माईल्स हाय, अराऊंड 3 लॅक किमी पर सेकंद, सिग्नल कमस् अप & अप अॅन्ड रिंग्ज माय फोन.
"हा बोल सत्या"
"टँकर, फुल अॉफ पेट्रोलियम गॅस, कमिंग ओव्हर हायवे लेन 6, इन आवर एरिया, लॉक द स्टेअरींग, फास्ट"
"कॉपी" आता मला तंत्रखातं सांभाळावे लागणार. मी डोळे मिचकावून चित्रगुप्ताकडे पाहीले.
"अॅप्रुव्हड" मंद हसत तो म्हणाला.
साला आता क्लायंटला लॉक झालेल्या स्टेअरींगची कारणं देत बसावी लागणार.
प्रतिक्रिया
29 Dec 2015 - 7:49 am | DEADPOOL
bhau umajala nahi kahi!
29 Dec 2015 - 6:39 pm | जव्हेरगंज
पुन्हा एकदा वाचा!
नक्कीच समजेल!
31 Dec 2015 - 10:48 am | DEADPOOL
Bhau vachala!!
baryach vela vachala!
data samajal!
jabarat!
31 Dec 2015 - 10:48 am | DEADPOOL
Bhau vachala!!
baryach vela vachala!
ata samajal!
jabarat!
29 Dec 2015 - 8:04 am | अर्धवटराव
येकदम खत्रा.
29 Dec 2015 - 8:38 am | अभ्या..
अगागागा जव्हेरभौ.
लैच उच्च उड्डाण प्रतिभेचे.
नतमस्तक
29 Dec 2015 - 9:29 am | तुषार काळभोर
#येक लंबर!!!
#झक्कास
#वंटास गोष्ट
#दर्जा
#धूर
#कडक
#रापचिक
#लई भारी
# दंगाच !!!!
#राडा
#खतरा!
#जबरदस्त
#हवा
#नादखुळा
#धुराळा
#आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा #मिपावर फक्त #जव्हेरभौंची #हवा!! विषय संपला!!
#हाताची घडी तोंडावर बोट #भाऊने गोष्ट सोड्लीये #लाईकच ठोक!!
# कडक गोष्ट!
29 Dec 2015 - 10:01 am | चांदणे संदीप
+1
29 Dec 2015 - 11:30 am | उगा काहितरीच
पैलवानाशी बाडिस !
29 Dec 2015 - 6:37 pm | जव्हेरगंज
#साष्टांग दंडवत पैलवानभाऊ! :)
29 Dec 2015 - 9:21 am | विश्वव्यापी
या गोष्टी चा प्रिक्विल पण टाका ना!
इथ काही कळं ना. इंग्लिश पिच्चर बगितल्या वानी झालंय बघा आंमच. फकस्त Action पाहिली, ईस्टोरी काय बी नाय समजली. पन जेकायबी लिवलय ते बेस आसनार राव. नक्की.
परतिक्रिया वाचल्या आमीबी. एकदम बेस
29 Dec 2015 - 6:42 pm | जव्हेरगंज
थोडा विचार करा हो विश्वव्यापी,
बघा लिंक लागतेय का..
29 Dec 2015 - 9:47 am | कैलासवासी सोन्याबापु
माझ्यामते अन आकलनानुसार जव्हेरगंज भाऊ ह्यांनी यमदूत लोक त्यांची टारगेट्स (!) रिवीजन ऑफ़ टारगेट्स रिसोर्स मैनेजमेंट वगैरे कॉर्पोरेट पद्धतीने चित्रगुप्तासोबत डिस्कस करताना दाखवले आहेत असे दिसते
29 Dec 2015 - 10:01 am | चांदणे संदीप
अगदी तेच्च!
जव्हेरभाऊ.....___/\___
Sandy
29 Dec 2015 - 6:38 pm | जव्हेरगंज
करेक्ट बापू!
29 Dec 2015 - 10:16 am | मोगा
मस्त
29 Dec 2015 - 10:26 am | प्राची अश्विनी
सही!!!
29 Dec 2015 - 10:33 am | नीलमोहर
लेख लिहा !
कविता लिहा !
कथा लिहा !
कादंबर्या लिहा !
पुस्तकं छापा !
प्रकाशन संस्था काढा !!
29 Dec 2015 - 5:21 pm | अभ्या..
सगळं करा पण कव्हरपेज डिझाईन अन डीटीपी आमच्याकडेच द्या.
(बिल सुध्दा वेळेत द्या) ;)
29 Dec 2015 - 5:43 pm | चांदणे संदीप
भारीच!
29 Dec 2015 - 6:46 pm | जव्हेरगंज
सँपल तरी दाखवा ना राव!
31 Dec 2015 - 9:20 am | नाखु
ते करा पण पिंचि वितरण माझ्याकडेच राहील हे ल़क्ष्यात ठेवणे..
अभा पिंची बुवांचे भावविश्व चाहता संघ आणि जव्हेरभाऊ,कांबीकर्,बोकाशेठ वाचक संघातर्फे वाचनमात्र नाखु
31 Dec 2015 - 1:07 pm | राजेंद्र मेहेंदळे
"मटार उसळ खा, केळ्याची शिकरण खा" याची आठवण झाली.
31 Dec 2015 - 1:08 pm | राजेंद्र मेहेंदळे
प्रतिसाद नीलमोहर यांन्ना होता :)
29 Dec 2015 - 5:38 pm | जव्हेरगंज
30 Dec 2015 - 11:11 pm | गम्पत पाटील
ती फुटुतलं झाड हाल्ल्ल्या वानी वाटतय
31 Dec 2015 - 7:49 pm | जव्हेरगंज
गम्मतच हाय!
29 Dec 2015 - 8:04 pm | आनंद कांबीकर
लिव्हा अजुन
30 Dec 2015 - 4:04 pm | पद्मावति
खतरनाक!
30 Dec 2015 - 10:04 pm | शब्दबम्बाळ
जमलय जमलय! :)
31 Dec 2015 - 7:54 am | मुक्त विहारि
एकदम भारी....
31 Dec 2015 - 11:45 am | मयुरMK
31 Dec 2015 - 2:01 pm | बोका-ए-आझम
जव्हेरभौ, हे काय आहे? लई म्हणजे लई भारी! जबराट!
4 Jan 2016 - 11:26 pm | संदीप डांगे
+१००००
4 Jan 2016 - 8:00 pm | जव्हेरगंज
धन्यवाद मंडळी!
5 Jan 2016 - 9:38 pm | भंकस बाबा
लय भारी
5 Jan 2016 - 9:52 pm | पैसा
बापरे!
5 Jan 2016 - 11:56 pm | रातराणी
भन्नाट!
7 Jan 2016 - 2:45 pm | जव्हेरगंज
धन्यवाद!