✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

१५०

ज
जव्हेरगंज यांनी
Mon, 12/28/2015 - 21:23  ·  लेख
लेख
रात्रीच्या शांत काळोखात तुम्ही कधी 'धडाम्' असा आवाज ऐकला आहे काय? झोपेत असतानाही हा आवाज कधी कधी ऐकू येतो. मी जिथे राहतो तिथून जवळूनच एक हायवे गेलाय. आणि असे आवाज आम्हाला नेहमी ऐकायला येतात. थरकाप उडतो. तो नक्की ट्रक, टेम्पो, लक्झरी की अजून काही. मी एका झोपड्यात राहतो. झाडी तशी बरीच आहे. आणि हायवे इथून फारसा लांब नाहीये. कधी आवाज आलाच तर मी झोपड्याबाहेर येऊन दुरुनच कानोसा घेतो. आवाज तसा लहानच असतो. पण कधी कधी जमीन हादरते. आणि पुन्हा सगळे चिडीचूप. शांत. भयाण काळोख. आणि मग पुन्हा 'सायरन'चे आवाज. रात्रभर. त्या दिवशी असाच आवाज आला 'धडाम... खळ्ळळ्ळ' . हा तसा बऱ्यापैकी मोठा आवाज. मी झोपड्यातून लगबगीनं बाहेर आलो आणि हायवेकडं नीट निरखून बघितलं. वाहनं जास्त नव्हती. पण कुठे काही मागमूस लागेना. मग माळरानावर एका ऊंच जागेवर चढून जमेल तितका हायवे डोळ्याखालून घातला. कुठेच काही गडबड वाटत नव्हती. हा भास तर नव्हता. मी स्कुटर काढून तडक हायवेवर निघालो. डिव्हायडर ओलाडून स्लो लेन मध्ये घुसलो. रस्त्यावर ना कोठे गर्दी ना कोठे ट्राफीक जाम. सरळ जातच राहीलो. पाच-सहा कि.मी. वर मला एक टेम्पो आढळला. फरफटत गेलेला. झुडपात. बहुतेक रुळ ओलांडत असताना त्याची चाकं अडकली असतील. अरे हो सांगायचे राहिलेच. आमच्या इथुन एक रेल्वेचा ट्रॅकपण जातो. फाटक असणारा. म्हणजे रेल्वेने टेम्पोला धडक मारली असणार. रेल्वेचे डबेही त्या माळरानावर इतस्तत विखुरलेले. मी नंबर डायल केला. 2000 माईल्स हाय, अराऊंड 3 लॅक किमी पर सेकंद, सिग्नल गोज डाऊन अगेन, अॅन्ड रिंग्ज द फोन. "हैलो" "हा" "ईमरजन्सी, कम फास्ट" तातडीचं संभाषण आम्ही इंग्लिशमध्येच करतो. लॉरी घेऊन 'सत्या' आला. लगेच. याला दम निघत नाही. चैन पडत नाही. हातात 'फावडं' घेऊन खाली ऊतरला. याच्या हातात कायम फावडं असतं. त्याचा तो स्टेटस सिंबॉल आहे. रेल्वेच्या डब्यांतून काही ठिकाणी धुर निघत होता. कुठे ठिणग्या, तर कुठे आग पण लागली होती. "किती गेले असतील रे, दिडशे तर नक्कीच" सभोवतालावर नजर फिरवून सत्या म्हणाला. "ते बघ तिकडून दोन पळतायत, धर त्यांना" सत्या पुढं होत फावडं घेऊन त्यांच्या मागं लागला. "वेट अ मिनीट, पण मला काहितरी खटकतयं" चित्रगुप्तानं शेवटी तोंड उघडलं. मघाचपासून समोरच्या खुर्चीवर बसून मी एकटाच बडबडत होतो. " ट्रॅक कसा काय आला?, हायवेवर रेल्वेचा ट्रॅक कसा काय आला. तो ही फाटक असलेला. हे जरा विसंगत वाटतय. संशयाला जागा राहतेय. आय थिंक यू हॅव नॉट प्रिपेयर्ड वेल. प्लॅन कॅन्सल." चित्रगुप्त एखादाच पॉइंट काढतो, पण सॉल्लिड काढतो, त्याच्यामुळं सगळा प्लॅनच फिसकाटतो. " डिलीवरी तर अर्जंट आहे, ती ही दिडशेची, नाऊ व्हाट वुई हॅव टू डू?" "डू युवर बेस्ट, क्लायंट इज ओव्हर माय हेड" साला हा तर वैतागला. बराच वेळ शांततेत गेला. एकदोन ची केस असती तर ठीक. पण एवढी मोठी अॉर्डर पुर्ण करायची म्हणजे प्लॅनिंग फुलप्रुफ पाहीजे. आणि ती क्लायंट समोर प्रेझेंट करताना संशयाला कोणतीही जागा नको. म्हणुन चित्रगुप्त माझ्याकडून अगोदरच सगळं वदवून घ्यायचा. मी पाठीमागच्या काही नोंदी तपासायला घेतल्या. चित्रगुप्तही डोकं खपवत होताच आणि तेवढ्यात, 2000 माईल्स हाय, अराऊंड 3 लॅक किमी पर सेकंद, सिग्नल कमस् अप & अप अॅन्ड रिंग्ज माय फोन. "हा बोल सत्या" "टँकर, फुल अॉफ पेट्रोलियम गॅस, कमिंग ओव्हर हायवे लेन 6, इन आवर एरिया, लॉक द स्टेअरींग, फास्ट" "कॉपी" आता मला तंत्रखातं सांभाळावे लागणार. मी डोळे मिचकावून चित्रगुप्ताकडे पाहीले. "अॅप्रुव्हड" मंद हसत तो म्हणाला. साला आता क्लायंटला लॉक झालेल्या स्टेअरींगची कारणं देत बसावी लागणार.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
13837 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

bhau umajala nahi kahi!

DEADPOOL
Tue, 12/29/2015 - 07:49 नवीन
bhau umajala nahi kahi!
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा वाचा!

जव्हेरगंज
Tue, 12/29/2015 - 18:39 नवीन
पुन्हा एकदा वाचा! नक्कीच समजेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

Bhau vachalaa!!!!

DEADPOOL
गुरुवार, 12/31/2015 - 10:48 नवीन
Bhau vachala!! baryach vela vachala! data samajal! jabarat!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

Bhau vachalaa!!!!

DEADPOOL
गुरुवार, 12/31/2015 - 10:48 नवीन
Bhau vachala!! baryach vela vachala! ata samajal! jabarat!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

च्यामायला

अर्धवटराव
Tue, 12/29/2015 - 08:04 नवीन
येकदम खत्रा.
  • Log in or register to post comments

अगागागा जव्हेरभौ.

अभ्या..
Tue, 12/29/2015 - 08:38 नवीन
अगागागा जव्हेरभौ. लैच उच्च उड्डाण प्रतिभेचे. नतमस्तक
  • Log in or register to post comments

लैच उच्च उड्डाण प्रतिभेचे.

तुषार काळभोर
Tue, 12/29/2015 - 09:29 नवीन
#येक लंबर!!! #झक्कास #वंटास गोष्ट #दर्जा #धूर #कडक #रापचिक #लई भारी # दंगाच !!!! #राडा #खतरा! #जबरदस्त #हवा #नादखुळा #धुराळा #आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा #मिपावर फक्त #जव्हेरभौंची #हवा!! विषय संपला!! #हाताची घडी तोंडावर बोट #भाऊने गोष्ट सोड्लीये #लाईकच ठोक!! # कडक गोष्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+1

चांदणे संदीप
Tue, 12/29/2015 - 10:01 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

पैलवानाशी बाडिस !

उगा काहितरीच
Tue, 12/29/2015 - 11:30 नवीन
पैलवानाशी बाडिस !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

#साष्टांग दंडवत पैलवानभाऊ! :)

जव्हेरगंज
Tue, 12/29/2015 - 18:37 नवीन
#साष्टांग दंडवत पैलवानभाऊ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

प्रिक्विल पण टाका

विश्वव्यापी
Tue, 12/29/2015 - 09:21 नवीन
या गोष्टी चा प्रिक्विल पण टाका ना! इथ काही कळं ना. इंग्लिश पिच्चर बगितल्या वानी झालंय बघा आंमच. फकस्त Action पाहिली, ईस्टोरी काय बी नाय समजली. पन जेकायबी लिवलय ते बेस आसनार राव. नक्की. परतिक्रिया वाचल्या आमीबी. एकदम बेस
  • Log in or register to post comments

थोडा विचार करा हो विश्वव्यापी

जव्हेरगंज
Tue, 12/29/2015 - 18:42 नवीन
थोडा विचार करा हो विश्वव्यापी, बघा लिंक लागतेय का..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वव्यापी

माझ्यामते अन आकलनानुसार

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 12/29/2015 - 09:47 नवीन
माझ्यामते अन आकलनानुसार जव्हेरगंज भाऊ ह्यांनी यमदूत लोक त्यांची टारगेट्स (!) रिवीजन ऑफ़ टारगेट्स रिसोर्स मैनेजमेंट वगैरे कॉर्पोरेट पद्धतीने चित्रगुप्तासोबत डिस्कस करताना दाखवले आहेत असे दिसते
  • Log in or register to post comments

होय होय..

चांदणे संदीप
Tue, 12/29/2015 - 10:01 नवीन
अगदी तेच्च! जव्हेरभाऊ.....___/\___ Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

करेक्ट बापू!

जव्हेरगंज
Tue, 12/29/2015 - 18:38 नवीन
करेक्ट बापू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

..

मोगा
Tue, 12/29/2015 - 10:16 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

सही!!!

प्राची अश्विनी
Tue, 12/29/2015 - 10:26 नवीन
सही!!!
  • Log in or register to post comments

लिहा हो तुम्ही,

नीलमोहर
Tue, 12/29/2015 - 10:33 नवीन
लेख लिहा ! कविता लिहा ! कथा लिहा ! कादंबर्‍या लिहा ! पुस्तकं छापा ! प्रकाशन संस्था काढा !!
  • Log in or register to post comments

सगळं करा पण कव्हरपेज डिझाईन

अभ्या..
Tue, 12/29/2015 - 17:21 नवीन
सगळं करा पण कव्हरपेज डिझाईन अन डीटीपी आमच्याकडेच द्या. (बिल सुध्दा वेळेत द्या) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

हा...हा…हा

चांदणे संदीप
Tue, 12/29/2015 - 17:43 नवीन
बिल सुध्दा वेळेत द्या
भारीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सँपल तरी दाखवा ना राव!

जव्हेरगंज
Tue, 12/29/2015 - 18:46 नवीन
सँपल तरी दाखवा ना राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पाहीजे

नाखु
गुरुवार, 12/31/2015 - 09:20 नवीन
ते करा पण पिंचि वितरण माझ्याकडेच राहील हे ल़क्ष्यात ठेवणे.. अभा पिंची बुवांचे भावविश्व चाहता संघ आणि जव्हेरभाऊ,कांबीकर्,बोकाशेठ वाचक संघातर्फे वाचनमात्र नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

खा लेको!!

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 12/31/2015 - 13:07 नवीन
"मटार उसळ खा, केळ्याची शिकरण खा" याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

प्रतिसाद नीलमोहर यांन्ना होता :)

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 12/31/2015 - 13:08 नवीन
प्रतिसाद नीलमोहर यांन्ना होता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

!

जव्हेरगंज
Tue, 12/29/2015 - 17:38 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

च्यायला

गम्पत पाटील
Wed, 12/30/2015 - 23:11 नवीन
ती फुटुतलं झाड हाल्ल्ल्या वानी वाटतय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

गम्मतच हाय!

जव्हेरगंज
गुरुवार, 12/31/2015 - 19:49 नवीन
गम्मतच हाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गम्पत पाटील

1नंबर!

आनंद कांबीकर
Tue, 12/29/2015 - 20:04 नवीन
लिव्हा अजुन
  • Log in or register to post comments

खतरनाक!

पद्मावति
Wed, 12/30/2015 - 16:04 नवीन
खतरनाक!
  • Log in or register to post comments

जमलय जमलय! :)

शब्दबम्बाळ
Wed, 12/30/2015 - 22:04 नवीन
जमलय जमलय! :)
  • Log in or register to post comments

मस्त कथा...

मुक्त विहारि
गुरुवार, 12/31/2015 - 07:54 नवीन
एकदम भारी....
  • Log in or register to post comments

.

मयुरMK
गुरुवार, 12/31/2015 - 11:45 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आईच्या गावात आणि बाराच्या भावात!

बोका-ए-आझम
गुरुवार, 12/31/2015 - 14:01 नवीन
जव्हेरभौ, हे काय आहे? लई म्हणजे लई भारी! जबराट!
  • Log in or register to post comments

+१००००

संदीप डांगे
Mon, 01/04/2016 - 23:26 नवीन
+१००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

धन्यवाद मंडळी!

जव्हेरगंज
Mon, 01/04/2016 - 20:00 नवीन
धन्यवाद मंडळी!
  • Log in or register to post comments

झक्कास

भंकस बाबा
Tue, 01/05/2016 - 21:38 नवीन
लय भारी
  • Log in or register to post comments

बापरे!

पैसा
Tue, 01/05/2016 - 21:52 नवीन
बापरे!
  • Log in or register to post comments

भन्नाट!

रातराणी
Tue, 01/05/2016 - 23:56 नवीन
भन्नाट!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

जव्हेरगंज
गुरुवार, 01/07/2016 - 14:45 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा