ताबडतोब गूगला. नारायण महाजन. #respect #साष्टांग कोटी कोटी नमस्कार
असा संदेश व्हॉट्सॅपवर एका भावाने पाठवला. काहीतरी जबर असणार अशी खात्री होतीच त्यामुळे ताबडतोब गूगललं गेलं. आणि जी माहिती मिळाली ती पराकोटीची प्रेरणादायी होती.
नारायण महाजन. ही व्यक्ती ठाण्यातील वेध च्या व्याख्यानमालेत या वर्षी आली होती. इथे सामान्यांतील असामान्यांना बोलावलं जातं. नारायण महाजन या व्यक्तीने ९१ व्या वर्षी ३५०० फूट रॅपलिंग केले म्हणून लिमका बुकात या नावाचा समावेश झाला आहे. ट्रेकिंगचं वेड अनेकांना असतं. पण त्याचबरोबर फिटनेसचंही वेड असलेले नारायण महाजन म्हणजे तरुणांसाठी; तरूणच काय प्रत्येकासाठी एक आदर्श आहेत.
वयाच्या १० व्या वर्षापासून यांना ट्रेकिंगची आवड लागली. तिचं पुढे वेडात परिवर्तन झालं. तरुणांनी माझ्याकडे बघून फिट रहाण्यासाठीची प्रेरणा मिळवावी या एका उद्दिष्टातून हा छंद पुढे जीवनमार्ग झाला. आजकाल मुलं मैदानावर दिसत नाहीत याची त्यांना प्रचंड खंत वाटते. नारायण महाजन म्हणतात, 'तरूण लोकं आजकाल अपयश बघतच नाहीत. त्यांना अपयशाची सवयच नसते. माझ्यासाठी यश म्हणजे एका अपयशाकडून दुस-या अपयशाकडे जिद्द न सोडता केलेली वाटचाल आहे.'
यांचा दिवस सकाळी ४ वाजता सुरू होतो. ध्यान, मनन करून पुढे १० किमी चालणं. ते आठवड्यातून दोनदा आजही सिंहगड करतात. वर्षातून दोन हिमालयन ट्रेक्स करतात. ओल्डेस्ट पॅरासेलर म्हणून यांच्यानावे ४ विक्रम आहेत. स्काउट शिक्षक म्हणून एरिन नगरवाला शाळेत यांनी काम केलं. स्काउटनेच मला शरीर व मन यांना सशक्त ठेवणं शिकवलं. वेध कार्यक्रमात जेंव्हा काही जण महाजनांना स्टेजवर जाताना हात द्यायला पुढे सरसावले, तेंव्हा 'तुम्ही काय मला नेता? मीच तुम्हाला स्टेजवर नेईन' असा मिश्कील शेरा मारणा-या महाजनांना त्रिवार साष्टांग!
फिटनेस याला म्हणतात! आयला! विशीत तिशीत कुणीही ट्रेक करेल! नव्वदीत करणं या गोष्टीला फिटनेस म्हणतात. मी मनात विचार करत राहिलो. आणि आता 'वेळ नाही' ही सबब तोंडातून काढायची नाही असं माझं मला बजावत राहिलो.
आणखी माहिती गूगलावी. तशी कमी माहिती उपलब्ध आहे यांच्याबद्दल, पण ते पुण्यात राहतात, तेंव्हा भेटणं अशक्य नाही.
आणखी काय लिहावं? प्रेरणा घेतोय फक्त. यांच्याबद्दल जितकं जाणतोय तितका अवाक होत जातोय.
http://www.dnaindia.com/pune/report-youngster-climbs-sinhagad-every-week...
http://www.harmonyindia.org/hportal/VirtualPageView.jsp?page_id=5663
http://dharm0us.blogspot.com/2012/07/narayan-mahajan-pune-mountaineer-91...
प्रतिक्रिया
14 Dec 2015 - 12:58 pm | एस
वाह!
14 Dec 2015 - 3:41 pm | कलंत्री
दिर्घायूष्य असावे हा एक प्रेरणादायक विचार आहे. या विचाराच्या साह्याने नक्कीच कोणीही दिर्घायूष्य मिळवू शकतो. रशीया मध्ये मद्यपान करणारे आणि सतत धुम्रपान करणारे शतकी लोकांची संख्याही भरपूर आहे असे वाचल्याचे मला आठवते.
14 Dec 2015 - 3:58 pm | अजया
ग्रेट माणूस
_/\_
14 Dec 2015 - 4:05 pm | वेल्लाभट
हे वाचून मनात आलं की चायला तुम्ही इतका विचार करताय, पण आजकालच्या तरुणांची ती पात्रता आहे का?
14 Dec 2015 - 4:35 pm | सूड
ह्या 'आजकालच्या" तरुणांमध्ये तुम्ही नाही का येत? =))
14 Dec 2015 - 4:59 pm | वेल्लाभट
माझ्यासकट. धाग्यात वाचशील तर सबबी न देण्याचं स्वतःला सांगण्याबद्दल वाक्य आहे. :) सो, मलाही धरलंय मी त्यात.
परंतु हे सरसकटीकरण समजू नये. अनेक व्यक्ती अशा आहेत की ज्या असंच फिटनेसचं व्रत घेऊन पुढे जात आहेत.
14 Dec 2015 - 5:57 pm | जातवेद
प्रणाम _/\_
14 Dec 2015 - 6:10 pm | रेवती
यांच्याबद्दल ऐकलं होतं पण नाव लक्षात नव्हतं. खरे प्रेरणादायी व्यक्तिमत्व.
आजोबांचे म्हणणे अगदी खरे आहे. पटले. नेमका आज व्यायामाचा कंटाळा आला असताना हा लेख वाचला. आता काय हिंमत नाही टाळाटाळ करण्याची!.;)
14 Dec 2015 - 7:33 pm | यशोधरा
वा!
14 Dec 2015 - 7:55 pm | बोका-ए-आझम
_/\_
14 Dec 2015 - 8:25 pm | पैसा
अतिशय प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व आहे!
14 Dec 2015 - 8:27 pm | इडली डोसा
नारायण महाजनांची माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद वेल्लाजी. फौजा सिंग हेही असेच उत्साही तरुण आहेत. त्यांना वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत चालताही येत नव्हते. पण वयाच्या शंभराव्या वर्षी हा माणुस लंडन मॅरथाॅन पळाला. अधिक माहिती विकीच्या लिंकमधे आहेच.
14 Dec 2015 - 8:52 pm | प्रभाकर पेठकर
उद्या पासून पुन्हा चालायला सुरुवात केली पाहिजे, एव्हढेच म्हणेन.
14 Dec 2015 - 9:07 pm | चतुरंग
सलाम __/\__
एक आठवण - अभियांत्रिकीची दोन वर्षे मिरजेत मावशीकडे राहिलो होतो. पहाटे साडेपाचला बेहेरे गुरुजी यायचे पूजेला. ४ मैल सायकल चालवत यायचे त्यावेळी त्यांचं वय असंच ९३-९४ असावं. अत्यंत तेजःपुंज व्यक्तिमत्त्व. मावसभावाने गंमत सांगितली. म्हणाला "ते येतात त्यावेळी अंगणात सायकल लावतात मग पाय धुवून आत येतात तेव्हा मजा बघ."
आम्ही पहाटे अंगणात थांबलो. गुरुजी आले. सायकल लावली अंगावरची शाल काढून ठेवली. बेसिनपाशी गेले. आपण बेसिनमध्ये हात धुतो तशी त्यांनी एकेक करुन त्यांची दोन्ही पावले बेसिनमध्ये धुतली! त्या वयात त्यांची लवचिकता बघून मी थक्क झालो! अजूनही गुरुजी लख्ख आठवतात... :)
14 Dec 2015 - 9:32 pm | एक एकटा एकटाच
जबरदस्त
15 Dec 2015 - 7:41 am | कंजूस
आणखी काय लिहावं? प्रेरणा घेतोय फक्त.>>
घ्या घ्या.
15 Dec 2015 - 8:12 am | सौन्दर्य
फारच प्रेरणादायी व्यक्तिमत्व.
15 Dec 2015 - 9:18 pm | मुक्त विहारि
आता हा लेख बायकोपासून लपवायला हवा.
(लेख हाइड करता येवू शकेल का?)
15 Dec 2015 - 11:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
केवळ __/\__
18 Dec 2015 - 11:57 pm | कुसुमिता१
खरच महान व्यक्तीमत्व!
19 Dec 2015 - 3:38 am | स्पार्टाकस
सलाम!
___/\___