'चुपके चुपके रात दिन' आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली गझल, ती पण तुमच्या आवाजात आणि पाहता पाहता अशी रुतत गेली की बस्स्स.... आता तर ती जगण्याचा अविभाज्य घटक झालीय. हे सर्व झालं ते तुमच्या मुळे. जशी समज वाढायला लागली तसं तसं गुलाम अली काय चिज आहे हे एकेका गझले मधून उलगड़ायला लागलं. कोजागिरी च्या रात्री तिच्या सोबत ऐकलेल्या 'कल चौदहवी की रात थी' ने ती पुन्हा एकदा उलगडली. 'का करू सजनी आये ना बालम' या ठुमरीतुन ति भेटत नसल्याची जी व्याकुळता पेश केलित ती अगदी लाजवाब आहे.
'हंगामा है क्यूँ बरपा' म्हणा, 'हम तेरे शहर में आये है मुसाफिर की तरह' किंवा 'वो जो हम में तुम में करार था' सगळच एक से बढ़ कर एक.....
७५ सालगिराह मुबारक हो 'गुलाम अली साहब'.
प्रतिक्रिया
5 Dec 2015 - 3:07 pm | गॅरी ट्रुमन
गुलाम अलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
गुलाम अलींविषयी माझ्या मनात एक हळवा कोपरा आहे-- विशेषतः चमकते चांद को टुटा हुआ तारा बना डाला या गझलेविषयी. २००७ सालच्या सुमारास मी अपयशी होणार अशी परिस्थिती माझ्या ध्यानीमनी नसताना उभी राहिली होती. चमकते चांद को ही गझल जणू काही मलाच सामोरे ठेऊन लिहिली आहे असे मला वाटू लागले होते--- विशेषतः "मेरे मालिक मेरा दिल क्यू तडपता है सुलगता है, तेरी मर्जी तेरी मर्जी पे किसका जोर चलता है, किसी को गुल किसीको तुने अंगारा बना डाला" या ओळींचा अर्थ आणि तेवढाच महत्वाचा गुलाम अलींचा आवाज अगदीच हृदयस्पर्शी.
मी स्वतः गुलाम अली साहेबांचा अगदी प्रचंड मोठा फॅन आहे आणि त्यांचा मोठा शुक्रगुजारही आहे.
'का करू सजनी आये ना बालम' येशूदासने गायलेले ऐकले आहे. हे गुलाम अली साहेंबांनीही गायले आहे हे माहित नव्हते.
6 Dec 2015 - 12:40 am | रमेश आठवले
बडे गुलाम अली खान यांनी मूळ ठुमरी गायली आहे. स्वामी या सिनेमात येशुदास ने ही गायली आहे.
त्यानंतर सध्याचे लोकप्रिय गायक अरिजित सिंग यांनी पण गायली आहे.
नुकतेच ७५ झालेले गुलाम अली यांनी गायली असल्याचे ऐकिवात नाही .
https://www.youtube.com/watch?v=D7iDE66o_b4
https://www.youtube.com/watch?v=imVKAacgyTU
https://www.youtube.com/watch?v=eylXI1MUcLg
5 Dec 2015 - 9:58 pm | वेल्लाभट
दैवत. अजून काय बोलावं
5 Dec 2015 - 10:18 pm | तिमा
गुलाम अलींचा भारतातला पहिला जाहीर कार्यक्रम झाला त्यांत सर्व दिग्गज ऐकायला आलेले असल्यामुळे त्यांनी स्वतःचे कौशल्य पणाला लावून अप्रतिम कार्यक्रम सादर केला. त्यांतील, जानमें मेरी जान, पारा पारा हुवा, ए हुस्न बेपर्वा तुझे, बिछडके भी मुझे तुझसे, या अप्रतिम गजला सादर केल्या.
त्याशिवाय त्यांच्या, जुज तेरे कोईभी दिनरात, दरिचा बेसदा कोई नही है, दोन चालींमधल्या - बेचैन बहोत फिरना, दोस्त बनकर, फासले ऐसे भी होंगे या रचना, दिल जलानेकी बात करते हो, गम नही जी तनसे निकला, रास्ते याद नही, मुद्दते हो गयी है चुप रहते, चंद्रकौंसावर आधारित कभी कहा न किसीसे, या व अशा अनेक गजलांनी रसिकांना मोहवून टाकले आहे.
6 Dec 2015 - 12:06 am | अनुप ढेरे
एकदाच प्रतेक्ष ऐकलेलं आहे यांना, वसंतोत्सवमध्ये. स्वर्गीय गाणं!
6 Dec 2015 - 8:09 am | वेल्लाभट
२००४ पासून पुढन)२०१४ पर्यंत मुंबईत झालेली प्रत्येक महफिल ऐकली (१ सोडून)
6 Dec 2015 - 11:35 am | बोका-ए-आझम
चुपके चुपके रात दिन, हंगामा, आवारगी या गझलांची गोडी अवीट आहे. गझल फनकार गुलाम अलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
7 Dec 2015 - 5:24 pm | चौकटराजा
गुलाम अली साहेबांचे गायन प्रथम ऐकले ते कृष्ण धवल दूरदर्शन वर 31 डिसेम्बर च्या रात्री बहुदा 1983 साली .पहाडी रागातले 'दिलमे इक लहरसी उठी है अभी कोंई ताज़ा हवा चली है अभी । माझ्या मते ते आवाजापेक्षा स्वराचे खरे तर मालिक आहेत.अनपेक्षित जागा घेत गजल गायन करताना क्लासिकल चा आनंद देतात .संगीत कार म्हणूनहीं ते फार थोर .'यूँ सजा चॉंद .' या गीताची चाल हे एक उदाहरण.