कंट्रोल रूम

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
19 Oct 2015 - 2:43 pm

( या लेखातील घटना जरी खरया असल्या तरी पात्रांची नावे बदलली आहेत आणि विनोदनिर्मितीसाठी काही प्रसंगांना तिखटमीठ लावण्यात आलेले आहे!)

०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०

"नमस्कार, कंट्रोल रूम, काय मदत करू शकते आपली?"
"हॅलो, पुलिस, अहो आमच्या हिथे बाहेरच्या नळावर, त्या परजापतीबाई आणि सराटेबाई ह्यांच्यात जोरात भांडण चालूयेत, लवकर पुलिस पाठवा नाहीतर आता त्यांच्यात बादली, हंडं-कळशांनी मारामारी सुरू हुयल, अजून थोड्या वेळाने माहित नाही कशानं मारामारी करतेल!"
"कुठून बोलताय तुम्ही"
"घरात्न... आपलं ते... विशालनगर, राहुलनगर आणि मिलींदनगरच्या मधी हाये ते."
"ठीक आहे, आमचे पेट्रोलिंग ड्यूटीवाले लोक पाठवते, जवळच्याच एरियात आहेत ते, येतील लगेच."
"ऑक्के, थॅंक्यू बरंका म्याडम!"

अशा एका कॉलने कंट्रोल रूमच्या आजच्या दिवसाची सुरूवात झालेली आहे. आज ह्या कॉल ड्युटीवर आलेल्या म्याडम पो.शि. सौं. स्वाती चाबळे ह्या आहेत. त्यांच शिक्षण खूप असल्याने आणि शॉर्टहॅंड वगैरे केलेले असल्याने आणि खात्यात त्यांचे वडीलही असल्याने, जवळपास अशाच प्रकारच्या ड्युट्यांमध्ये त्यांची वारंवार वर्णी लागते. शिवाय कंट्रोल रूम हाही जवळपास कस्टमर केअर सारखाच प्रकार असल्याने इतर कुणी फारसे इथे ड्युटी करायला उत्सुकही नसते.

"हॅलो, कंट्रोल रूम टू ईगल, ओव्हर."
"हा ईगल १२३२ वाघमारे बोल्तो, ओव्हर."
"वाघमारे, विशालनगरात दोन बायकांची भांडणे सुरू असल्याचा कॉल आलेला आहे. लवकरात लवकर घटनास्थळी जाऊन रिपोर्ट करणे, ओव्हर."
"ओके म्याडम, ओव्हर."
ही एक नॉर्मल प्रोजिसर आहे. कुठूनतरी कसल्यातरी तक्रारीचा फोन येणे आणि पोलींसांकडून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे. पण हे असं वाटत एवढ पीस ऑफ केक टाईप नसतं!
हा पुढचा कॉल दर काही आठवडे किंवा महिन्यांनी रिपीट होतच असतो वेगवेगळ्या ठिकाणांहून!

"नमस्कार, कंट्रोल रूम, काय मदत करू शकते आपली?"
"खी:खी:खी:"
"हॅलो, काय पाहिजे?"
"काय नाय हो, ह्यो शांत्या म्हणत होता. फोन लागत नस्तो….लागला का नाय रे शांत्या?"
"मार पाहिजे का रे, ठेव फोन!"

लगेचच पुढचा…
"नमस्कार, कंट्रोल रूम, बोला."
"हॅलो, मी विशालनगरातून बोलतोय, मघाशी कॉल केलेला."
"पोलीस पाठवलेत तिकडं, पोहोचतीलच!"
"अहो म्याड्म, दुसरे पोलीस पाठवा. हिथ त्या बायका आणि पोलीस यांच्यातच जोरदार भांडणं सुरू झालीयेत!"
"- - - - - - - - - -"

तर, दिवस हळूहळू पुढे सरकतो. अजून एक कॉल रांगेत असतो.
"नमस्कार, कंट्रोल रूम, काय मदत करू शकते आपली?"
"हॅलो मॅडम, मी आत्ता ऑफिसला चाललो होतो ना, तर अचानक दचकून थांबलोच आणि रस्त्याच्या कडेच्या एका झाडापाठीमागे लपून फोन करतोय. मी आत्ता इथे काय पाहिलय माहितीये का?"
"- - - - - - - - - -" ('नाही माहिती' असं म्हणायचा मोह म्याडमच्या जोरात चाललेल्या श्वासातून जाणवतोय!)
"हां...मी पाहिल की दिवसाढवळ्या काही तरूण हातात कोयते, सत्तूर आणि आणखी काही लोखंडाची लांबच लांब हत्यारे घेऊन कुठेतरी दंगल करायला बिनधास्तपणे रस्त्यावरून चाललेत."
"कुठून बोलताय तुम्ही, पत्ता सांगा."
"धोका कॉलनी, समर्थनगर."
"ठीक आहे, मार्शल पाठवते लगेच"

"हॅलो, कंट्रोल रूम टू मार्शल, लोकेशन सांगा, ओव्हर."
"मार्शल टू कंट्रोल रूम, आता सोमनाथ नगर, विचार कॉलनीच्या गेटसमोर आहोत, ओव्हर."
"धोका कॉलनी, समर्थनगर मधून कॉल आलेला आहे. काही घातक शस्त्रे घेऊन तरूणांचा एक गट रस्त्यावरून फिरतानाचे समजले आहे. ताबडतोब साईटवर जाऊन रिपोर्ट करणे! ओव्हर."
पंधराएक मिनीटांनी मार्शल्शचा संदेश येतो.
"हॅलो, मार्शल टू कंट्रोल रूम, मार्शल ढवळे रिपोर्टींग, ओव्हर."
"कंट्रोल रूम टू मार्शल, रिपोर्ट, ओव्हर."
"म्याडम, आपण कळवलेल्या साईटवर गेलो होतो. म्याडम, सदर ठिकाणी ते तरूण गवत कापणारे माथाडी कामगार आहेत असे आढळून आले आहे. इथे आजूवाजूच्या सोसायट्यांच्या भवताली वाटलेले गवत काढण्याच्या कामाकरिता सदर कामगार आले आहेत, ओव्हर."
"- - - - - - - - - -"

हा एक अजून नमुनेदार कॉल.
"नमस्कार…." पुढचा म्याडमला पुढे बोलूच देत नाही.
"नमस्ते मैडम! हमे एको गाना सुनना था, राजा हिन्दुस्तानी फिलम का…"
"हॅलो, फोन कहा लगा है पता है क्या?"
"हां…विविधभारती इस्टेशन पे लगाहे ना, क्या रे ज्याधव? ई कहा मिलाईके दिये फोन? हॅलो, मैडम कहा लगा है फोन?"
"पुलीस स्टेशन मे लगा है? और अगर इसके बाद फोन आया ना तो जेलमे डाल देंगे तुमको सीधा!"
पलीकडच्याची जाम टरकलेली असते. तरीही फोन ठेवायच्या जागी तो बोलतच राहतो.
"हमने कुछ नही किया मैडम. हम बहुत गरीब आदमी हू. पान का ठेला है हमारा. उ बाजूका सायकिलवाला ज्याधव बोला की, विविधभारती मे ज्यो है…फोन मिला दिया हू…लो…अपनी पसंद का गाना लगावो! हम सच कह रहा हू मैडम…हमने नाही लगाया इ काल!"
"- - - - - - - - - -"

जसे तक्रारदात्यांचे फोन येतात तसेच ऑफिशियल फोनही येतच असतात कंट्रोल रूमला. अशाच एका कॉलमध्ये म्याडमना एका वरिष्ठ आधिकारयाने एका हवालदाराला रिपोर्ट करण्यासाठी कंट्रोल रूमला कळविले. तो हवालदार अमुक कुठल्यातरी सभेच्या बंदोबस्ताच्या नेमणुकीवर होता. मग तिथल्या ड्युटी इनचार्जला म्याडमने अधिकारयांचा निरोप कळवला.

थोड्याच वेळाने त्या ड्युटी इनचार्जचा रिप्लाय आला.
"ए.एस.आय. सोनावणे रिपोर्टींग कंट्रोल रूम. म्याडम अहो इथे बारा-तेरा वाघ फिरताहेत… स…त….द…"
सभेच्या गोंगाटात म्याडमना पुढचे काहीच ऐकू आले नाही. पण "बारा-तेरा वाघ फिरताहेत" म्हटल्यावर त्यांना कंट्रोल रूमच्या खुर्चीवर पंख्याखाली बसलेल्या असतानाही घाम फुटला! पटापट त्यांनी नंबर फिरविले…वनविभाग, फायर-ब्रिगेड, प्राणी संग्रहालय, प्राणीमित्र संघटना, तात्काळ मदत देणारी पोलीस यंत्रणा "क्यूआरटी", एक-ना-दोन. सगळीकडे कळवायचा सपाटाच लावला. वीसेक मिनिटांनी ज्या ड्युटी इनचार्जनी हवालदारासंबधीचा कॉल घेतला होता. ते ठणाणा बोंबलतच पोलीस स्टेशन/कंट्रोल रूममध्ये शिरले. म्याडमना कळेना काय झालय!
ड्युटी इनचार्ज : चाबळेबाई! काय चाललंय?? वाघ आडनावाचे बारा-तेरा हवालदार तिथे बंदोबस्तासाठी आहेत असे सांगितलेले, तुम्ही सारी सभाच उधळून लावलीत, वर सारया यंत्रणा कामाला लावल्यात!! मलाही जबाब मागितला आहे कमिशनर साहेबांनी!!!
म्याडम : "- - - - - - - - - -"

अशा काही गमतीशीर तर काही अतिसिरियस फोन कॉल्सने कंट्रोल रूमचा आजचा दिनक्रम उरकतो. पो.शि. सौं. स्वाती चाबळे ड्युटी संपवून घरी जायला निघतात आणि पुढील काही वेळासाठी कंट्रोल रूमचा ताबा पो.शि. श्री लोखंडे घेतात!

०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०

- संदीप चांदणे

कथामौजमजालेखमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

तर्राट जोकर's picture

19 Oct 2015 - 3:04 pm | तर्राट जोकर

च्यामारी.... जालावरचं काही वाचून उभ्या आयुष्यात इतका हसलो नसेल .... सलाम घ्या मालक.!

हसून हसून जेवलेलं बाहेर येतं का काय असं वाटत होतं.... बाप रे बाप! धन्य आहे बुवा....

कधी जमले तर एमकेसीएल चे विद्यार्थी कॉलसेंटरचे अनुभव टंकेन.. तेही असेच खतरा आहेत एक से एक. अजून येऊद्या....

उगा काहितरीच's picture

20 Oct 2015 - 12:13 am | उगा काहितरीच

कधी जमले तर एमकेसीएल चे विद्यार्थी कॉलसेंटरचे अनुभव टंकेन.. तेही असेच खतरा आहेत एक से एक.

वाचायला आवडेल ! रच्याकने मलाही वेळ भेटला तर माझेही कॉल सेंटरचे अनुभव शेअर करीन .

प्रचेतस's picture

19 Oct 2015 - 3:10 pm | प्रचेतस

जबराट.
सरस लेखन.

आनंदराव's picture

19 Oct 2015 - 3:20 pm | आनंदराव

मस्त !

आनंदराव's picture

19 Oct 2015 - 3:22 pm | आनंदराव

"अहो म्याड्म, दुसरे पोलीस पाठवा. हिथ त्या बायका आणि पोलीस यांच्यातच जोरदार भांडणं सुरू झालीयेत!"
"- - - - - - - - - -"

हे म्हण्जे सिक्सर होता

असंका's picture

19 Oct 2015 - 9:26 pm | असंका

+१

लय हसलो!!!

अरे बापरे! काय भयानक परिस्थिती आहे! अमेरिकेत ९११ ला कॉल करून कोणी असा खेळ केला तर कडक शिक्षा होते असे ऐकले आहे.

पण यानिमित्ताने १०० या सेवेचे कौतुक करतो.

आतिवास's picture

19 Oct 2015 - 4:23 pm | आतिवास

<< पण यानिमित्ताने १०० या सेवेचे कौतुक करतो.>>
सहमत.
लेख आवडला.

पण यानिमित्ताने १०० या सेवेचे कौतुक करतो.
हे वाक्य वरच्या प्रतिसादात पेस्ट न झाल्याने पुनश्च.

प्यारे१'s picture

19 Oct 2015 - 4:00 pm | प्यारे१

खतरा.... काय लंबर फिरवू बोल्ले??

प्राची अश्विनी's picture

19 Oct 2015 - 4:15 pm | प्राची अश्विनी

अगदी खुसखुशीत लेख !

कपिलमुनी's picture

19 Oct 2015 - 4:29 pm | कपिलमुनी

हलकाफुलका लेख

अजया's picture

19 Oct 2015 - 4:33 pm | अजया

:)मस्त लेख!

अद्द्या's picture

19 Oct 2015 - 4:35 pm | अद्द्या

hahahahah

mast

टुकुल's picture

19 Oct 2015 - 4:42 pm | टुकुल

मस्त किस्से,

--टुकुल

आदूबाळ's picture

19 Oct 2015 - 5:37 pm | आदूबाळ

लोल! कहर आहे!

अन्या दातार's picture

19 Oct 2015 - 5:55 pm | अन्या दातार

हहपुवा किस्से

नाव आडनाव's picture

19 Oct 2015 - 6:09 pm | नाव आडनाव

एकदा पेपर मधे वाचले होते असे किस्से. त्यात सगळ्यात जास्त वेळा झालेला किस्सा म्हणजे लहान बाळांना त्यांच्या आया फोन लावून द्यायच्या आणि म्हणायच्या - "बोल, मामा / मावशी बरोबर बोल. त्यांना विचार जेवण झालं का?" :) असा फोन का लावला विचारलं तर उत्तर यायचं - "जेवतंच नाही ओ. फोन लावला तर लागतो नादी जरा" :)

चांदणे संदीप's picture

19 Oct 2015 - 6:27 pm | चांदणे संदीप

धन्यवाद लोक्स!

नाव आडनाव यांनी सांगितलेला किस्सा पण ऐकलेला आहे. असे खूप किस्से आहेत.
रच्याकने, याचाही दुसरा पार्ट लिहावा काय?

(खुसखुश्या)
Sandy

नक्की लिहा... आणि फक्त दोन भागांवर थांबू नका?

जोरदार लिहिलंयत..!!
धन्यवाद!

जव्हेरगंज's picture

19 Oct 2015 - 6:55 pm | जव्हेरगंज

" लेख आवडला सर, ओव्हर."

चांदणे संदीप's picture

19 Oct 2015 - 7:56 pm | चांदणे संदीप

हा…हा…ओव्हर!

नमुनेदार अन मजेशीर किस्से !
ऐसाभी होता है ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Oct 2015 - 7:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

नमुनेदार ! खी... खी... खी...

"अहो म्याड्म, दुसरे पोलीस पाठवा. हिथ त्या बायका आणि पोलीस यांच्यातच जोरदार भांडणं सुरू झालीयेत!" हे तर लई भारी =))

अजून लिहा.

रातराणी's picture

19 Oct 2015 - 8:32 pm | रातराणी

मस्त!

चाणक्य's picture

19 Oct 2015 - 8:59 pm | चाणक्य

खुसखुशीत. लिहा अजून एक भाग.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Oct 2015 - 9:12 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरी!

श्रीरंग_जोशी's picture

19 Oct 2015 - 9:15 pm | श्रीरंग_जोशी

भन्नाट आहेत सर्व किस्से. एकदम खुसखुशीत लेखन.

अमेरिकेत बातम्यांमध्ये असे किस्से अधून मधून ऐकायला मिळतात.

इडली डोसा's picture

19 Oct 2015 - 9:22 pm | इडली डोसा

लेख आवडला. दुसरा भाग पण लवकर येउ द्या.

चांदणे संदीप's picture

19 Oct 2015 - 10:06 pm | चांदणे संदीप

सर्वांचे आभार! ____/\____
असे सगळे हसरे प्रतिसाद पाहिले की कसे सगळे हसरे चेहरेच समोर येतात आणि लिहिण्याच समाधान देऊन जातात.

सगळ्यांनी हसत खेळत राहाव याच एका उद्देशाने लिहायला लागलोय. असे प्रतिसाद आले की दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटतो. प्रत्येक प्रतिक्रियेसोबत मीही हसून घेतो... त्यामुळे मलाही स्वत:ला हसण्याचा बहाणा मिळाल्यासारखे होते!

अशीच कृपादृष्टी राहू द्या!
(लां....ब....ल....च....क स्पीचसाठी स्वारी बर्का! काय कर्णार... ते नवे कांबीकर म्हण्तात तसा मोहच आवरत नाही ;-) )
Sandy

टवाळ कार्टा's picture

20 Oct 2015 - 1:04 am | टवाळ कार्टा

खि खि खि

मिनेश's picture

20 Oct 2015 - 10:24 am | मिनेश

मस्तच..

-सायकिलवाला ज्याधव

नाखु's picture

20 Oct 2015 - 10:45 am | नाखु

विविध भारतीलाही असेच विचित्र आणि लांबट लावणारे फोन येतात त्याचेही किस्से वाचले आहेत.
अजून येऊ द्या

आस्वादक नाखु

चांदणे संदीप's picture

20 Oct 2015 - 11:10 am | चांदणे संदीप

मीसुद्धा विविधभारतीचा फ्यानच आहे आणी विशेषकरून त्यातल्या सर्व 'फोन-इन' या कार्यक्रमांचा!
खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसे ऐकायला मिळतात. त्यात खासकरून आपल्या मित्र-नातलग-गाववाले यांची नावं सांगायची त्यांची धडपड मजा आणते.

हे विविधभारती एक सेप्रेट प्रकर्ण होईल लिहायला घेतलं तर! ;-)

सर्व वाचकांचे आणि प्रतिसाददात्यांचे पुन्हा एकदा आभार!

Sandy

निनाद's picture

20 Oct 2015 - 10:53 am | निनाद

झकास आहे हे लिखाण, दुसरा भागच नाही,
मालिकाच येऊ द्या अशा अनुभवांची.

अभ्या..'s picture

20 Oct 2015 - 11:33 am | अभ्या..

खतरनाक सॅन्डीबाबा.
च्यामारी हे वाकीटाकी घेऊन आमचे बरेचशे खाकी दोस्त ग्राऊंडनंतर सकाळच्या नाष्ट्याला भेटायचे. कुणी कंबरेला लावलेला, कुणाचा खांद्यावरच्या पट्टीत, कुणाचा गाडीच्या हँडलवरच्या बॉक्सात. त्या सब्बल मोटरोलाची फुल्ल मज्जा असते राव. एकाची बायको कंट्रोलरुम ला होती अन हा मार्शल. बिगर खाकी दोस्त त्याच्यावरुन मिस्कॉल पण देता येत नाही म्हणून मापे काढत. दिवसभर त्यावरची बडबड एकून कावत नाही का जीव. बहुतेक घरच्यासारखे फिल येत असेल.

चांदणे संदीप's picture

20 Oct 2015 - 11:39 am | चांदणे संदीप

मिसड यू लॉट! :)

(बाकी, आपले वाकी-टाकी म्हणजे येडताङ्ग चीज आहे!)

मस्त विनोदी लेखन व त्याला साजेल असा किस्सा, हसुन हसुन पोट दुखले. विवीध भारतिचा पण किस्सा लिहा.मजा येइल