चवदार तळ्याच्या काठी साधारण चार बदके बसली होती. पाण्यात मगरींचा सुळसुळाट होता. त्यातल्या एका बदकाने डुबुक करत पाण्यात सुर मारला. पोहत पोहत तो दुसऱ्या काठावर पोहोचला. तिकडुन त्याने या मागच्यांना खुण केली. मग दुसऱ्या बदकाने डुबुक करत पाण्यात सुर मारला. पोहत पोहत तो पाण्याच्या मध्यभागी आला. एक बेडूक काठावरुनच या गोष्टींकडे बारीक लक्ष ठेऊन होता. मग त्यानेही डुबुक करत पाण्यात सुर मारला. पोहत पोहत त्याने दुसऱ्या बदकाला पाण्याच्या मधोमध गाठले. आणि त्याला म्हणाला, "हे बदकदादा, या पाण्यात भयंकर मोठ्या अशा मगरी आहेत. एकतर तू पाण्यात ऊतरून चुक केली आहेस. किंवा त्या पहिल्या बदकाने तुला संपविण्यासाठी हे षडयंत्र रचले असावे. तु ईथुनच मागे फिर"
आधीच दमलेल्या बदकाने त्याला टुचकन टोची मारली आणि पुढे निघाला. तेवढ्यात एक अगडबंब मगर पाण्याचा फवारा ऊडवत बाहेर आला. आणि बेडकाला तोंडात घेऊन पाण्यात निघुन गेला. दरम्यान त्या बदकाचीही चांगलीच तंतरली. आधीच धपापलेलं ते बदक या धक्क्याने पाण्यात बुडुन मरुन गेलं. काठावरुन ईकडुन दोन आणि तिकडुन एक असे तिन्ही बदक या प्रकाराकडे अवाक होऊन नुसतेच बघत राहीले.
तात्पर्य :
१. आधीच पेटलेल्या रणांगणात जाऊन ऐण आक्रमणाच्या वेळी ऊपदेशाचे डोस पाजू नयेत. खपले जाल.
२. ज्या ठिकाणी ज्या चुकीसाठी ज्या वेळी आपण सल्ला देताय तिथे आपणही अगोदरच काशी केलेली आहे. हे लक्षात असू द्या. तेव्हा पुन:श्च खपले जाल.
३. पाण्याबाहेर येताना शक्यतो फवाऱ्याचा वापर टाळावा. ऊपाशी मराल.
४. क्षुद्रांचे सल्ले बिनडोक वाटत असले तरी खरे ठरु शकतात. तेव्हा दुर्लक्ष करु नका. फुकट मराल.
५. परफेक्ट षडयंत्र असे रचावे की काठावर बसुन आपण नुसते अवाक होऊन पाहत रहावे.
६. तुम्हालाही काही सुचलं तर येऊ द्या. नसता.... (ह.घ्या.)
प्रतिक्रिया
11 Oct 2015 - 5:35 pm | बिपिन कार्यकर्ते
या गोष्टीत तरी असं काही दिसलं नाही ब्वॉ. मगर पाण्याचा फवारा उडवत आली, तरी उपास नाही घडला तिला.
परत तेच... गोष्टीत कोणी रचले षडयंत्र?
आज वेळ होता, म्हणून दखल घेतली. अन्यथा... (ह. च घ्या हं!) ;)
11 Oct 2015 - 5:43 pm | जव्हेरगंज
मगर पाण्याचा फवारा उडवत आली, तरी उपास नाही घडला तिला.>>>>> तिने बदकाऐवजी बेडकाला गटकावले.
गोष्टीत कोणी रचले षडयंत्र?>>>>> बेडुकराव म्हणाले तसं पहिल्या बदकाने.
आज वेळ होता, म्हणून>>>> बास का राव!! _/\_
11 Oct 2015 - 6:03 pm | बिपिन कार्यकर्ते
मेलेले बदक पाण्यातच पडले ना? की मेल्यावर भुर्रकिनी उडून गेले? ;) ... मग मगरीला बदकही मिळाले आणि बेडूकही. डब्बल फायदा. और उडावो पाणी! निष्कर्ष चूकच.
हे त्या बेडकाचे म्हणणे. ते वास्तवात तसेच होते असे कुठेच ध्वनित होत नाहीये. आणि त्यामुळे, गोष्टीतून तसा निष्कर्ष निघत नाहीये.
;)
11 Oct 2015 - 6:18 pm | जव्हेरगंज
मेलेले बदक पाण्यातच पडले ना?>>>>> प्रत्येक वेळी बदक मरेलच असं नाही. तेव्हा पहिल्या डावातच त्याला पकडणे सोईस्कर.
किंवा त्या पहिल्या बदकाने तुला संपविण्यासाठी हे षडयंत्र रचले असावे>>>>>>> जर खरच रचले असेल तर तो निष्कर्ष. :)
11 Oct 2015 - 5:53 pm | dadadarekar
छान
11 Oct 2015 - 6:00 pm | प्यारे१
चान चान बोदो(क)कथा
-प्यारे बंगाली
11 Oct 2015 - 6:05 pm | जेपी
दिसामाजी काहितरी लिहावे हे खर हाय ..
पण
12 Oct 2015 - 11:53 am | जातवेद
खो खो खो
11 Oct 2015 - 6:12 pm | चांदणे संदीप
जव्हेरगंजभौ... या अशा कथा लिहिण्यासाठी तुम्ही पटाईत काकांच्या छोट्या छोट्या कथांचा अभ्यास करावा असे सुचवितो!
कारण:
१) त्यांची छान साधी सोपी लिहिण्याची शैली.
२)कमीत कमी पण परिणामकारक आणि सुयोग्य शब्दांचा वापर.
३) त्यांच्या अशा छोट्या कथा नेहमीच चलू चालू घडामोडींशी निगडीत असतात.
या कसोट्यांवर मी पाहिल्याने ही कथा मला आजिबात आवडली नाही! माफ करा!
पुलेशु!
Sandy
11 Oct 2015 - 6:21 pm | जव्हेरगंज
चालू घडामोडींशी निगडीत ही कथा नाहीये.
सल्ल्याबद्दल आभारी आहे. :)
12 Oct 2015 - 12:05 am | तर्राट जोकर
तुमच्या प्रतिसाद आवडला नाही.
कुनी म्हनुनसे गेले आहे. राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे, म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?
इथे संबंधित कुठलीच पार्टी राजहंस आहे असे आमचे अजिबात मत नाही पण.. मुद्दा समजून घ्या.
12 Oct 2015 - 11:28 pm | सतिश गावडे
अशी ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे.
12 Oct 2015 - 11:39 pm | तर्राट जोकर
गावडेकाका, उपरोध होता हो तो. :-)
11 Oct 2015 - 6:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
लघुकथा प्रसवण्याचा विक्रम चालू आहे की काय ?!
11 Oct 2015 - 6:32 pm | जव्हेरगंज
आवरतं घेतोय मालक! आता दीर्घ विश्रांतीसाठी आम्ही सज्ज आहोत. :)
11 Oct 2015 - 8:02 pm | खटपट्या
खपलो गेलो..
11 Oct 2015 - 8:14 pm | जव्हेरगंज
11 Oct 2015 - 8:13 pm | बाबा योगिराज
काठावर बसुन नुसते अवाक होऊन पाहनारा बाबा.
11 Oct 2015 - 9:05 pm | हेमंत लाटकर
कथा वाचून काहीच बोध होत नाहीये.
विचारात पडलेला लट्टुकाका
11 Oct 2015 - 10:47 pm | द-बाहुबली
श्री़कृष्ण खपला न्हवता.
11 Oct 2015 - 11:05 pm | जव्हेरगंज
बाहुबली _/\_ अभिनंदन. योग्य पॉइंट शोधलात.
तुमच्यासाठी तात्पर्य थोडे बदलतो. असं....
आधीच पेटलेल्या रणांगणात जाऊन ऐण आक्रमणाच्या वेळी सोम्यागोम्यांनी ऊपदेशाचे डोस पाजू नयेत . खपले जाल.
11 Oct 2015 - 11:28 pm | पिशी अबोली
मिपाकरांपैकी कुणीही 'सोमेगोमे' नाहीत.
तस्मात् तो मुद्दा मुळासकट रद्दबातल ठरत आहे.
12 Oct 2015 - 12:15 pm | टवाळ कार्टा
खिक्क
12 Oct 2015 - 12:36 pm | प्यारे१
असा आयडी आहे एक.
सोम्यागोम्या म्हणून. ;)
12 Oct 2015 - 12:56 pm | द-बाहुबली
मुळात जव्हेरभाउ मिपाकरांबाबत बोलत होते का ?
12 Oct 2015 - 12:08 pm | कानडा
युद्धाच्या शेवटी गांधारीने कृष्णाला यदुवंशाचा नाश होईल असा शाप दिला आणि त्यामुळेच कृष्ण खपला की हो ;-)
12 Oct 2015 - 12:55 pm | द-बाहुबली
ओह..! आवो जगातला प्रत्येकजण खपतोच की हो. थोडक्यात काय कधीही जन्माले येउ नका खपले जाल.
11 Oct 2015 - 11:22 pm | अत्रुप्त आत्मा
पांडू मोड ऑन \-
छाण लेखण!
पांडू मोड ऑफ /-
(अ)समांतर :- अ'ता खाटुक येइल दांडू घेउन! ;-)
11 Oct 2015 - 11:57 pm | तर्राट जोकर
सॉक्रेटीस, कान्ट, प्लेटो, मार्क्स सारख्या थोर प्रभृतींसमोर हलक्या फुलक्या पंचतंत्र कथा वाचल्यातर काय होतं हे प्रतिसादांवर कळलं....
एक 'म्हातारी आणि भोपळा या कथेवरचं तज्ञ विचारवंतांचे चर्चासत्र' अशा धाटणीची कथाही आठवली...
11 Oct 2015 - 11:59 pm | तर्राट जोकर
काही लोकांनी आजारी घोडा आणि बकरा/कोंबडा/डुक्कर यांची कथा वाचलेली दिसत नाही हेही घ्या जोडून आधीच्या प्रतिसादात....
12 Oct 2015 - 12:12 am | दिवाकर कुलकर्णी
अजाबात कल्लं सुदिक नाही,
लयी नाई पनं वाइच जरी इस्कटून सांगीतलं तरी ब्यास
12 Oct 2015 - 1:40 am | रातराणी
उशीर झाला का मला? कुठे काय तापल होतं?
12 Oct 2015 - 5:34 am | कंजूस
मगरीच्या जबड्यात सुचलेलं शहाणपण-
तुमचं म्हणणं { बरोबर आहे } थोडक्यात सांगा.
12 Oct 2015 - 11:47 am | dadadarekar
पह्ले बदक... सेना
उरलेलीए बदके ... जनता
मगर ...... भाजपा
बेडूक ..... केजरीवाल /आप
12 Oct 2015 - 12:09 pm | ज्ञानोबाचे पैजार
चवदार तळ्याच्या काठी, होती बदके सुरेख
तळ्या मधे लपुनी,होती मगर एक ||धृ||
एका बदकने मारला, पाण्यात डुबुक सुर
बाकी बदकांचा तेव्हा, धपापला रे उर
काठावर पोचताना, पाहि वळुन क्षणेक,
त्याचेच त्या कळाले, घेतली उगाच रिस्क ||१||
दुसर्या बदकास मग,फारच चेव आला,
सारासार विचार, पाण्या मधे बुडला,
वाटेवर अर्ध्या त्याला, दिसता मगर एक,
क्षणात गुल झाला,त्याच्याच हार्टचा चोक ||२||
बाकी बदकांची इकडे, एवढी मोठी फाटली,
पाण्यात जायची त्यांच्यात हिम्मत नाही उरली,
काठावर चालताना, हसती तयांस लोक,
सीर सलामत असे तो, पगड्या मिळती अनेक ||३||
चवदार तळ्याच्या काठी,.....
पैजारबुवा,
12 Oct 2015 - 12:13 pm | जातवेद
वा बुवा सुरेख
12 Oct 2015 - 1:32 pm | जव्हेरगंज
12 Oct 2015 - 6:48 pm | शुचि
वा! फार फार मस्त. =))
12 Oct 2015 - 6:48 pm | शुचि
हाहाहा. आवडली ही कथा.
12 Oct 2015 - 6:50 pm | अभ्या..
चांगलेत खपवायचे धंदे. हितच शिकलायत दिसतं?
जव्हेर्भौ लै हल्के घ्येणार ह्येला हे म्हैते.
12 Oct 2015 - 6:58 pm | जव्हेरगंज
मग अजुन कुठं शिकणार भौ:)
हलकी फुलकी प्रतिक्रिया आवडली. :)
12 Oct 2015 - 8:15 pm | सूड
ओह आय सी!!
12 Oct 2015 - 11:22 pm | प्रभू-प्रसाद
12 Oct 2015 - 11:23 pm | प्रभू-प्रसाद
12 Oct 2015 - 11:23 pm | प्रभू-प्रसाद
13 Oct 2015 - 12:04 am | अभ्या..
झोपु दया हो त्याना, एवढ्या हाका मारू नका. अजून एक कथा टाकतील ते.;-)
13 Oct 2015 - 12:10 am | प्यारे१
च्यायचं हलकट!
13 Oct 2015 - 12:11 am | अभ्या..
खपले जाल ;)
13 Oct 2015 - 12:14 am | प्यारे१
खिक्क्कुशा!