श्रीगणेश लेखमाला २: यंत्रोपवित

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
19 Sep 2015 - 12:37 am

प्रस्तावना

माझे आई-बाबा मिपा वाचत नसले, तरीही सगळ्यात आधी त्यांचे आभार मानतो. कारण माझ्यावर त्यांनी कधीच तू अमुक एकच केलं पाहिजेस अशी सक्ती केली नाही. तुला वाटेल त्या गोष्टीमध्ये तुझं करिअर कर म्हणून त्यांनी मला मोकळीक दिली, त्याबद्दल मी खूप आभारी आहे.

"बाळा/बाळे, तू मोठी झालीस की कोण होणार?" असा प्रश्न साधारण वयाच्या पाचव्या वर्षीपासून न विचारलं गेलेलं बालक शोधून सापडायचं नाही बहुधा. काही जणांच्या नातेवाइकांची, (अ)हितचिंतकांची गाडी ह्यापुढे जाऊन त्या बालकाच्या त्या वेळच्या उपद्व्यापांना गृहीत धरून हे बालक पुढे काय बनेल असे शेकडा ९९.९९% चुकीचे अंदाज वर्तवण्यामध्ये गुंतलेले असतात. अस्मादिकही त्याला अपवाद नव्हते. मी कोण होणार ह्याला लहानपणी माझं उत्तर चुकूनही अभियंता होईन असं आल्याचं आठवत नाही. त्या काळी माझ्या इच्छाआकांक्षांची झेप केळ्याच्या हातगाडीवाला, झुकझुकगाडीच्या मोटरमन वगैरेंपासून थेट झाकिर हुसेन (वाह ताजच्या जाहिरातीचा परिणाम)पर्यंत जात असे. कधीतरी झपाटलेला पाहिल्यानंतर एका नातेवाइकांना मी तात्या विंचू होणार असं सांगून, त्यांच्याच छाताडावर ओम फट स्वाहा: चा प्रयोग करुन थेट ऊर्ध्व लावल्याचंही आठवतं.

लहानपणापासून माझी आवड म्हणजे खेळण्यांमधल्या गाड्यांशी खेळणं. Meccanoच्या (ज्याला मेकॅनो म्हणूनही ओळखलं जातं, त्याच्या) सुट्ट्या भागांपासून गाड्या बनवणं आणि चित्रकलेच्या वह्या दुचाक्यांच्या चित्रांनी भरून टाकणं ह्या माझ्या आवडी होत्या. त्या वेळेला माझ्या आज्जीने (आईची आई) कार्टं मेकॅनिक होणार असं भविष्य वर्तवल्याचं आठवतं.

लहानपणाचे दिवस भरभर सरतात आणि शाळेच्याच एका टप्प्यावर तुम्हाला एक दिशा निश्चित करावीच लागते आणि त्याप्रमाणे पुढे नियोजन करावं लागतं. ह्या टप्प्यापर्यंत (इयत्ता ९वी) माझ्या तीन इच्छा फायनलाईझ झालेल्या होत्या. आता फक्त निवड करायची बाकी होती. एकतर यंत्राभियंता बनायचं, शेफ बनायचं किंवा मग पायलट बनायचं. पायलटचं स्वप्न साधारण दहावीच्या मध्यापर्यंत आल्यानंतर मात्र एकंदर खर्च वगैरे ऐकून डोक्यातून काढून टाकलं. बस्स, एलिमिनेशन राउंडला आता दोनच स्पर्धक राहिलेले.

दहावीची परीक्षा झाली आणि निकालही आला. परीक्षा झाल्यावर ८० टक्के पाडतो की नाही बघा म्हणून मिशीला कोकम लावून तूप तूप म्हणून ओरडणार्‍या मला जोराचा धक्का बसला. ८० टक्क्याच्या जवळपासही नव्हतो. ५६.२१% किंवा ५६.५९% घेऊन अस्मादिक खाली मान घालून गपगुमान घरी आले. बाबा बरोबर आलेलेच होते निकाल आणायला, त्यामुळे आता घरी जाऊन काय प्रसंगाला तोंड द्यावं लागणार ह्याचे आडाखे बांधत मी घरी आलो. एव्हाना शाळेतले (चलकटह) मित्र वगैरे घरी पेढे देऊन गेलेले होते. त्यामुळे अस्मादिकांचा लागलेला निकाल आईलाही समजलेला होताच. घरी पोहोचल्यावर शिव्या खायच्या तयारीने गपगुमान बसलो होतो. बाबांनी फक्त आईला खूण केली आणि आईने माझ्या तोंडामध्ये पेढा भरवलेला होता. काही न बोलता फक्त तिला बिलगलो होतो, एवढंच फक्त मला आता आठवतं. किमान बाबा तरी चिडतील, भडकतील असा अंदाज होता पण तोही खोटा ठरला. आई-बाबा नाराज होते, पण चिडलेले नव्हते.

त्या दिवशी संध्याकाळी काही परिचित (ज्यांना काही लोक्स नातेवाईकही म्हणतात) वगैरेही भेटायला आलेले होते. ५६% हूं!! आता आर्ट्सला घ्या हां अ‍ॅडमिशन ह्याला. सायन्स काय झेपणारे ह्याला.. वगैरे बोलून, अनावश्यक सल्ले देऊन गेले. त्या वे़ळेला सेंट्रलाईझ्ड अ‍ॅडमिशन नव्हती. त्यामुळे दुसर्‍या दिवशीपासून अ‍ॅडमिशनचे अर्ज वगैरे मिळायला लागणार होते. त्यामुळे निर्णय घ्यायला काही तासच होते माझ्याकडे. त्यामधून ह्या परिचितांनी दिलेले सल्लेही डोक्यात घोंघावत होतेच. रात्री दहा वाजता मी आई-बाबांना म्हणालो, "हे सगळे म्हणाले ना मला इंजीनिअरिंग किंवा सायन्स झेपणार नाही म्हणून? आता मला इंजीनिअरच व्हायचंय." त्या दिवशी एका रहायला असणार्‍या एका परिचितांचा "तुला कँय झेपणारे इंजीनिअरिंग? हँ, आपलं आर्ट्स घे आणि बी.ए. एम.ए. कर आणि मास्तरकी कर" असा सल्लाही परत ऐकवला गेला.(मला न कळलेली गोष्टं, बी.ए. एम.ए. ला लोक्स असं तुच्छ का लेखतात? मे बी त्यांच्या नोकर्‍यांमधे पगार वगैरे कमी असतील पण त्यामुळे पदवी, पदव्युत्तर पदवीची मानाची किंमत कशी काय कमी होते म्हणे?) स्वभावाप्रमाणे त्यांचा सल्ला फाट्यावर मारून मी निर्णय घेतला तो म्हणजे यंत्र अभियंता व्हायचचं. आधी डिप्लोमा करायचा आणि नंतर इंजीनिअरिंग पूर्ण करायचा निर्णय घेतला.

दुसर्‍या दिवशी मोठ्ठा प्रश्न उद्भवला, तो म्हणजे ५६% आणि खुल्या प्रवर्गामधे मला अ‍ॅडमिशन मिळणार कुठे ह्याचा. चार कॉलेजांचे उंबरठे झिजवून तिथला नकार ऐकून आणि नं झेपणार्‍या डोनेशनचे आकडे ऐकून शेवटी गेलो तो म्हणजे कात्रजच्या भारती विद्यापीठामध्ये. तिकडेही यंत्र अभियांत्रिकी पदविकेला प्रवेश मिळाला नसताच. शेवटी तिथेच उत्पादन तंत्रज्ञान अर्थात Diploma in Production Technology साठी प्रवेश निश्चित केला. उत्पादन तंत्रज्ञानमधून उत्तम गुण मिळवून पदविका मिळवली तर यंत्र अभियांत्रिकीला प्रवेश मिळतो. त्यामुळे त्यासाठी लागतील तेवढे कष्ट करायचा निश्चय केला. काही दिवसातच कॉलेजच्या वेलकम फंक्शनमधून कॉलेजमध्ये ऑफिशिअली पहिलं पाऊल टाकलं आणि त्याचं दिवशी हातावर आणि हाताच्या रेषांवर हे यंत्रोपवित बांधलं गेलं.

डिप्लोमा अधिक डिग्रीचे कॉलेजमधले शिक्षणाचे अनुभव, आयुष्याचे शिकलेले धडे आणि यंत्र/उत्पादन अभियांत्रिकी हे प्रकरण नक्की काय असतं बॉ?

वेलकम फंक्शननंतर जेमतेम आठवड्याभरात कॉलेज सुरू झालं. इथपर्यंत आख्खं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं होतं, त्यामुळे आता कुस्ती सुरू झाली ती इंग्लिशच्या महादैत्याबरोबर. साध्यासोप्या संकल्पनांना इंग्लिशमधून काय म्हणतात ह्यामध्ये गोंधळ उडायला लागला. गणोबांचा डिनॉमिनेटर (छेद) न्युमरेटरच्या (अंश) डोक्यावर मिर्‍या वाटायला लागला. एक्स्पोनेंशिअल फंक्शनची एक्स्पायरी डेट माझ्या मर्जीप्रमाणे ठरायला लागली. अ‍ॅक्यूट अँगलचा क्यूटनेस अजिबात पसंत पडेनासा झाला. स्केलर क्वांटिटी चुकीच्या दिशा दाखवायला लागल्या. दंडगोलाच्या सिलिंड्रिकल प्रोफाईलवरून गाडी घसरायला लागली. सहा महिने भयानक गोंधळ उडायचा. नंतर मात्र एकूणचं इंग्लिश वाचन वगैरे वाढल्याने इंग्लिश हळूहळू सुधारायला लागलं. तिसर्‍या वर्षापर्यंत मख्खन इंग्लिश झालं. अगदी मस्त इंग्लिश बोलायला लागलो.

थोड्याच दिवसांमध्ये विषय आणि विषयांचा आवाका लक्षात यायला लागला. एकूणच टेक्निकल विषयांचं आकलन पटकन व्हायची क्षमता प्रचंड चांगली असल्याने टेक्निकल विषय (इले(क्ट्रीकल आणि ट्रॉनिक्स) सोडून) फटाफट समजायला लागले. तिथेच उत्पादन तंत्रज्ञान आणि कोअर मेकॅनिकल इंजीनिअरिंग यांच्यामध्ये जो काही फरक आहे तोही समजायला लागला. (फार फरक नाही, सगळे विषय सारखेच असतात, फक्त विषय किती खोलात जाऊन अभ्यासायचा ह्यामध्ये फरक पडतो. मला क्रॉस ब्रँचिंगचा पुढे प्रचंड फायदा झाला. तो कसा ते पुढे येईलच.) पहिल्या वर्षी अ‍ॅप्लाईड फिजिक्स, अ‍ॅप्लाईड केमिस्ट्री, गणोबा-१, इंजीनिअरिंग ड्रॉईंग, वर्कशॉप टेक्नॉलॉजी, अ‍ॅप्लाईड मेकॅनिक्स, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस-१ आणि टेक्निकल रायटिंग वगैरे विषय होते. ह्यापैकी वर्कशॉप टेक्नॉलॉजीची प्रॅक्टिकल्स माझ्या भयानक आवडीची असायची. चार तासाचं प्रॅक्टिकल जेमतेम तासा-दीडतासात उत्तमरितीने संपवून नंतर भारती कँपसमध्ये हुंदडायला किंवा भारतीच्या ग्राउंडवर जाऊन फुटबॉल खेळायला चिक्कार वेळ मिळत असे.

पुढे येणार्‍या कोअर विषयांची पूर्वतयारी करून घेणं हा मेकॅनिकल/प्रॉडक्शनच्या पहिल्या वर्षांचा उद्देश असतो. त्यामध्ये अ‍ॅप्लाईड मेकॅनिक्स, इंजीनिअरिंग ड्रॉईंग, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी हे विषय अत्यंत महत्त्वाचे असतात. अ‍ॅप्लाईड मेकॅनिक्समध्ये फोर्सेस, रिझल्टंट फोर्सेस, इक्विलिब्रियम, फ्रिक्शन वगैरे संकल्पनांची तोंडओळख करून दिलेली असते. हा विषय डिप्लोमा आणि डिग्री दोन्हीकडे कुप्रसिद्ध आहे. कारण हा पेपर सुटला तर पहिल्या फटक्यात, नाहीतर बराच रडवतो. सुदैवाने माझा पहिल्या फटक्यामध्ये सुटला (बाबाजींचं लक्ष, अजून काय..) ). मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या बेसिक यंत्रोत्पादन पद्धतींचा अभ्यास असतो - टर्निंग, मिलिंग, हॉबिंग वगैरे वगैरे.

मेकॅनिकल इंजीनिअर कुठल्या भाषेमध्ये बोलतात, माहीत आहे का? इंग्लिश हे चुकीचं उत्तर आहे. इंजीनिअरिंग ड्रॉइंग हे बरोबर उत्तर आहे. इंजीनिअरिंग ड्रॉईंग हा मेकॅनिकल इंजीनिअरिंगमधला सगळ्यात एक्स्प्रेसिव्ह विषय आहे. तुम्ही काढलेलं ड्रॉईंग वर्करला / लेबरला विशेष कष्ट न घेता वाचता आलं पाहिजे. ह्यामध्ये फर्स्ट अँगल / थर्ड अँगलच्या पद्धती (मिठाई की दुकान ;) Only Production/ Mechanical/ Civil people will understand this) शिकवल्या जातात. अगदी रेषाखंड विभागण्यापासून, २-डी ड्रॉईंग आणि आयसोमेट्रीक ड्रॉईंग वगैरे गोष्टी ह्यामध्ये येतात. आयसोमेट्रिकमचं सर्कल अचूकपणे काढता येणं ही नोबेल किंवा गेला बाजार ऑस्कर पुरस्कार मिळवण्याएवढी आनंदाची गोष्ट असायची. आमचे इ.डी.चे गुरुजी भयानक कडक होते. त्यांना नुसतं बघून मिलिमीटर्समधल्या चुका कळायच्या. चुकलेल्या ड्रॉईंगबद्दल खांद्यावर बोटांनी चेपून शिक्षा केली जायची. ड्रॉईंग हॉलमध्ये उठाबशासुद्धा काढायला लागायच्या. कितीतरी काडीपैलवान मुलं ह्या गुरुजींच्या कृपेने पैलवान झाली ;) ;) ). त्यांनी फाडलेल्या शीट्समुळे भारती कँपसमधल्या कित्येक दुकानदारांचे संसार सुखासमाधानाने चालायचे. ह्या सरांचा मला कधीच राग आला नाही. मी एक चांगला इंजीनिअर बनलो असेन, तर त्यामध्ये ह्या सरांचा वाटा अतिशय मोलाचा आहे. काम एकदाच करा पण ते असं करा की त्यामध्ये चुका काढता आल्या नाही पाहिजेत, हा मोलाचा धडा मी त्यांच्याकडून शिकलो.

दिवस अक्षरशः उसेन बोल्टच्या गतीने पळत होते. बघता बघता सबमिशन डेज नावाच्या छळछावणीची मुहूर्तमेढ रोवली गेली. आमच्या ड्रॉईंग गुरुजींच्या शिकवणीमुळे फायली नीट पूर्ण करायची सवय लागलेली होती. त्यामुळे किरकोळ त्रासावर सुटका झाली होती. तो त्रासही फक्त एका विशिष्ट विषयाच्या गुरुजींना मी नित्यनेमाने त्रास दिल्याने झाला होता. मित्रांच्या जी.टी. (अनिंजीनिअरांसाठी : जी.टी.= ग्लास ट्रेसिंग) मारून देऊन पुण्यसंचयाचा कार्यक्रम सुरू झाला. सर्वांसमोर जी.टी.ला विरोध करणारे मास्तर मात्र मी तिसर्‍या वर्षाला गेल्यावर खासगीमध्ये "तुम्हाला जी.टी. मारता आली नाही, तर तुम्ही कसले घंटा इंजीनिअर बनणार.." वगैरे ऐकवत असत. सबमिशन संपून पी.एल. (प्रिपरेशन लिव्ह्ज) चालू झाल्या आणि सगळे येरू लायब्ररीमध्ये आणि भारतीच्या पोडियमवरसुद्धा पुस्तकांमध्ये डोकं घालून बसलेले दिसायला लागले.

प्रॅक्टिकल्स झाली. परीक्षा झाल्या आणि पहिलं वर्ष ऑफिशिअली संपलं. आता ज्युनियरची भूमिका संपून सिनिअरची भूमिका चालू झाली.

पुढची दोन वर्षं म्हणजे कोअर विषयांचं जंगल होतं. मेकॅनिकल/ प्रोडक्शनच्या कोअर विषयांविषयी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे प्रत्येक विषय हा एकमेकांशी कुठल्याना कुठल्या धाग्याने संलग्न असतोचं. त्यामुळे ज्याला चांगला मेकॅनिकल किंवा उत्पादन अभियंता बनायचं असेल, त्याने कुठलाही टॉपिक ऑप्शनला न टाकणं श्रेयस्कर असतं. (हा सल्ला अनुभवाने शहाणा होऊन देतोय. तेव्हा मला सांगणारं कोणी नव्हतं.)

पुढची दोन वर्षं म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मटेरिअल्स (SOM), थिअरी ऑफ मशिन्स (TOM), प्रोडक्शन मेटॅलर्जी (धातुशास्त्र), अ‍ॅप्लाईड थर्मोडायनामिक्स, अ‍ॅड्व्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, फ्लुईड मेकॅनिक्स, मशिन डिझाईन, टूल डिझाईन, मेकॅट्रॉनिक्स (ह्या ह्या डिप्लोमाला टांगारु झालेलो ह्या विषयाच्या बाबतीत, डिग्रीला झक मारत घ्यावाचं लागला परत), प्लांट इंजिनिअरिंग, मेट्रॉलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल, फ्लुइड पॉवर, सी.एन.सी. टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स वगैरे विषयांनी भरगच्च भरलेली होती. वर म्हणल्याप्रमाणे ह्यामधला प्रत्येक विषय एकमेकांशी कसे संलग्न असतात ते आता सांगतो.

कुठल्याही यंत्राची, उपकरणाची जेव्हा संरचना करायचं काम चालू असतं, त्या वेळेला काही गोष्टी आपल्याला गृहीत धरायला लागतात. ते उपकरण कुठे वापरलं जाणार आहे? त्याचा ड्रायव्हिंग सोर्स काय असणार आहे? त्यावर कुठल्या प्रकारचे फोर्सेस येणार आहेत? ते उपकरण कुठल्या प्रकारच्या वातावरणामध्ये वापरलं जाणार आहे? अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. एक उदाहरण देऊन सांगतो.

समजा, मला एखाद्या स्टोनक्रशरसाठीच्या यंत्रासाठीच्या रिडक्शन गिअरबॉक्सची संरचना करायची असेल, तर मला वरच्या यादीमध्ये दिलेल्या प्रत्येक विषयाचं सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे. ते कसं ते आता सांगतो. आधी मला गिअरबॉक्स कुठल्या ड्रायव्हिंग सोर्सने फिरवला जाणार आहे त्याचा विचार करावा लागेल (इंडक्शन मोटर, इंटर्नल/ एक्स्टर्नल कंबशन इंजीन). त्या यंत्राच्या स्पेसिफिकेशन्स विचारात घ्याव्या लागतील - उदा. त्या यंत्राचे आर.पी.एम., ते यंत्र किती टॉर्क उत्पन्न करू शकेल ह्याची माहिती इ.इ. ह्या गोष्टी (इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग, कंबशन इंजिन्स). त्यानंतर मला गिअरबॉक्स एका वेगामध्ये फिरणं अपेक्षित आहे का वाहनांप्रमाणे वेगवेगळ्या वेगामधे फिरणं अपेक्षित आहे, त्याचा विचार करावा लागेल. ह्यामधल्या भागांवर कुठले फोर्सेस, स्ट्रेसेस येतील त्याचा विचार करावा लागेल. त्या गिअरबॉक्समध्ये किती स्टेजेस असतील ह्याचा विचार करावा लागेल. त्यासाठीची काही मार्गदर्शक तत्त्वं असतात ती मला माहीत असायलाच हवीत (डिझाईन हँडबुक्स). त्यानंतर मला गिअरबॉक्समधल्या गिअरसाठी, शाफ्ट्ससाठी, कीजसाठी, स्पेसर्स वगैरेंसाठी लागणारे मटेरिअल निवडावे लागेल (प्रोडक्शन मेटॅलर्जी अर्थात धातुशास्त्र). मल्टिस्पीड गिअरबॉक्स असेल तर काम आणखी किचकट होतं. गिअर चेंजिंग मेकॅनिझमचाही मग विचार करावा लागतो. ह्या मटेरिअल्समध्ये हजारो पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडणं कधी कधी खूप अवघड काम होऊन बसतं. कित्येक वेळा मॅन्युफॅक्चरिंगची सोय लक्षात घेऊन मग हे मटेरिअल निवडावं लागतं (मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, क्वालिटी कंट्रोल). ह्यानंतर सुरू होते ती किचकट गणिती प्रक्रिया (बहुतांश वेळा कंपनीकडे डेटा तयार असतो, त्यामधे गरजेप्रमाणे माफक बदल करुन वेळ वाचवता येऊ शकतो.). ह्या गणिती प्रक्रियांमधून गिअरबॉक्ससाठी लागणार्‍या प्रत्येक भागाची सुरक्षित मोजमापं आणि हीट ट्रिटमेंट्साठी लागणारी माहिती मला मिळेल. ही माहिती मी अ‍ॅनालिसिस सॉफ्टवेअर्समधे फीड करून ते केलेलं डिझाईन सुरक्षित आहे की नाही ह्याचं व्हर्चुअल टेस्टिंग करू शकेन. डिझाईनमध्ये योग्य ते बदल करून नंतर माझ्याकडे रेडी टु मेक डिझाईन ज्या वेळेला असेल, त्या वेळेला मी ते डिझाईन व्हॅलिडेट करून मॅन्युफॅक्चरिंग विभागाला देऊ शकेन. ह्यामध्ये अजून त्या गिअरबॉक्सला लागणारं ल्युब्रिकेशन, ते ल्युब्रिकंट गिअर्समध्ये पुरवायच्या पद्धती, ते ल्युब्रिकंट थंड राहावं म्हणून लागणारी रेडिएशन सिस्टीम वगैरे अजून कित्येक बाबी असतात. एका चांगल्या इंजीनिअरला त्याच्या क्षेत्राशी निगडित सगळ्या विषयांचं सखोल ज्ञान असणं का आवश्यक असतं, ह्याची साधारण कल्पना ह्यावरून यावी.

ह्या सगळ्या विषयांच्या जंजाळामध्ये दुसरं वर्षं आणि तिसरं वर्षं उलटून जात होतं. (कोण म्हणतयं रे दिवस कसे उलटून गेले ते समजलं पण नै म्हणून..? येणारा आणि जाणारा प्रत्येक दिवस नीssSssट लक्षात आहे.)

अशा सगळ्या विषयांशी दोन हात करायला खरंच मजा यायची. शिवाय ह्या वर्षीपासून एक इयत्ता सिनियर झाल्यामुळे कॉलेजच्या टेक्निकल वार्षिकाच्या प्रकाशनामध्येसुद्धा (टेक्नो-इनोव्हामध्ये) मी सहभागी व्हायला सुरुवात केली. हौस म्हणून दुसर्‍या कॉलेजमध्ये टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन्स वगैरे गोष्टींमध्येसुद्धा सहभागी होत गेलो. भालचंद्र नेमाड्यांच्या भाषेमध्ये 'चमको'गिरी करायची हौससुद्धा त्यामुळे पूर्ण झाली. ह्या अदर दॅन एज्युकेशन अ‍ॅक्टिव्हिटीमुळे कॉलेजचे ज्युनिअर्स, सिनिअर्स, आधी सिनिअर्स मग ज्युनिअर्स :P ते थेट प्रिन्सिपल अशा चहूबाजूंनी ओळखी वाढत गेल्या. शाळेमध्ये असताना मी तुफान लाजाळू होतो. चारचौघात बोलायचं म्हणजे माझी पार बोबडी वळायची. कॉलेजच्या ह्या तीन वर्षांनी माझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये अक्षरशः १८० अंशामध्ये बदल घडवला (It's kind of funny, how life can change... can flip 180 in matter of dayz :) ). अस्सल मराठी माध्यमाधून शिकलेला असल्याने शाळेमध्ये असेपर्यंत मुलींशी बोलणं म्हणजे शिक्षा वाटायची. तेही बदललं. आमच्या वार्षिक नियतकालिकाची कृपा आणि त्याही दुष्टचक्रामधून बाहेर पडलो. मेकॅनिकल आणि प्रोडक्शन दोन्हीमध्ये नेत्रसुखदच काय, पण अगदी औषधालाही हिरवळ नसायची. ती कमतरता ह्या सगळ्या ब्रँचमधून ह्या नियतकालिकासाठी एकत्र आलेल्या ग्रूपमधून पूर्ण झाली. ;) मोठ्ठा ग्रूप बनलाय आणि अजूनही सगळे एकमेकांच्या संपर्कात असतात.

दुसरं वर्षही असचं संपलं. परिक्षा झाल्यावर इलेक्ट्रॉनिक्सला खात्रीशीर पंख लागणार अशी खात्री झालेली होती. पण बोर्डकृपेने ४१ मार्क्सवर सुटला. =)) आणि तिसर्‍या वर्षाची सुरुवात झाली.

फायनल इयर - कसला भारदस्त शब्द वाटतो नाही? हे वर्ष म्हणजे डिप्लोमाच्या पहिल्या दिवसापासून केलेल्या मेहनतीवर कळस चढवायचं वर्ष असतं. ह्या वर्षी प्रॉडक्शन इंजीनिअरिंगमध्ये इंडस्ट्रियल फ्लुइड पॉवर, प्रॉडक्शन टूल डिझाईन, अ‍ॅडव्हान्स्ड मशीनिंग प्रोसेसेस-२, सी.एन.सी. टेक्नॉलॉजी/मेकॅट्रॉनिक्स असे विषय असतात. डिप्लोमाला असताना मेकॅट्रॉनिक्सला टांग हाणलेली - इलेक्टिव्ह होता म्हणून. इंजीनिअरिंगला मात्र झक मारत घ्यावा लागलेला तो :(. ह्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोजेक्ट. प्रोजेक्ट ग्रूपमध्येचं करायचा असतो, त्यामुळे तशी काही चिंता नव्हती.

चार जणांच्या माझ्या ग्रूपने एका मिडियम स्केल कंपनीसाठी एक हायड्रॉलिक फिक्स्चर बनवायचं ठरवलेलं होतं. इंडस्ट्रियल फ्लुइड पॉवर, टूल डिझाईन आणि मशीन डिझाईन या विषयांमध्ये शिकलेल्या गोष्टी वापरून आम्ही ट्रायसिक्वेंसिंग फिक्स्चर डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर केलेली (मॅन्युफॅक्चरिंगमधले काही भाग बनवून आणायला लागलेले.) ती फिक्स्चर अजूनही वापरामध्ये आहे. आमच्याच दोन बॅचनंतरच्या मुलांनी त्या फिक्स्चरमध्ये सेन्सर आणि ट्रान्सड्युसर्स वगैरे बसवून क्लँपिंग व्हेरिफिकेशनचं प्रोजेक्ट केलं. :)

तिसर्‍या वर्षाची परीक्षा संपून रिझल्टचा दिवस आलेला. आज मी केलेल्या आजवरच्या कष्टांचं काय होणार, मला इंजीनिअरिंगला जाता येणार की नाही, ह्याचा निकाल लागणार होता. कॉलेजमध्ये गेलो. एच.ओ.डीं.च्या केबिनमधून माझी मार्कशीट हातामध्ये घेतली आणि टक्केवारी लिहिलेल्या बॉक्सकडे एक नजर टाकली.

७२.९७% - फर्स्ट क्लास!!

दहावीमधले मार्क्स ५६% आणि डिप्लोमामध्ये ७२.९७% अपेक्षित यश असूनही माझा विश्वास बसत नव्हता. इंजीनिअरिंगच्या डिग्रीच्या ट्रायाथलॉनचा टप्पा यशस्वीपणे पार पडलेला होता. ट्रायाथलॉन म्हणजे तीन टप्प्यांमधली शर्यत. साधारणपणे सगळे बारावी अधिक इंजीनिअरिंग किंवा डिप्लोमा अधिक इंजीनिअरिंग अशा दोन टप्प्यांमधे इंजीनिअर होतात. पण सगळं ठरवल्याप्रमाणे घडलं असतं, तर आपण त्याला आयुष्य का म्हणालो असतो?

इंजीनिअरिंग: स्टेक जस्ट गॉट बिगरः

माझा निकाल लागायला आणि काही खासगी कारणाने घरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचण उभी राहायला एकच गाठ पडलेली (पिताश्रींना त्या वर्षी सत्पात्री दान काय असतं ह्याचा धडा मिळाला). त्याचं सुमारास बहीण दहावी झालेली आणि तिलापण हॉटेल मॅनेजमेंटसाठी अ‍ॅडमिशन अशा अनेक अडचणी आ वासून उभ्या होत्या किंवा उभ्या राहणार ह्याचा अंदाज आलेला होता. मी इंजीनिअरिंगचा विचार सोडून नोकरी शोधायला लागलो. वडिलांना ही गोष्ट कळली, तेव्हा मला भयानक शिव्या घातलेल्या त्यांनी. (अ)हितचिंतकांनी दहावीच्या निकालावर केलेली एकंदर शेरेबाजी ते आणि मी दोघंही विसरलेलो नव्हतो. तू इंजीनिअरिंगला अ‍ॅडमिशन घे. आपण पैशाचं काय करायचं ते पाहू. अगदी ते कितीही काही म्हणाले तरी मला परिस्थिती समोर दिसत होती. त्यामुळे मी नोकरीचा शोध चालू ठेवलेलाच होता. किमान पार्ट टाईम नोकरी मिळाली असती तरी प्रश्न बर्‍यापैकी कमी झाले असते. वडिलांनी एका बाजूने इंजीनिअरिंगचा धोशा मागे चालू ठेवलेलाच होता. शेवटी वैतागून मी होकार दिला. व्ही.जे.टी.आय.ची इंडस्ट्रिअल इंजीनिअरिंगची जागा अगदी ३-५ मार्क्सनी हुकली होती :/. शेवटी पुण्यामधल्याच एका ख्यातनाम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये (सध्या नाव जाहीर करायचं नाही मला. कधी करावंसं वाटलं तर नक्की करेन. त्याचं कारण देईनचं मी पुढे.) मला यंत्राभियंता शाखेला थेट दुसर्‍या वर्षाला प्रवेश मिळाला होता. ही अडचण पुढे जवळजवळ एक वर्षभर टिकली. एवढंच सांगेन की ह्या अडचणीमुळे मी कोसळून पडायच्याऐवजी अजून खंबीरपणे उभा राहिलो. कुठल्याही परिस्थितीमधे आपण कष्टांच्या जोरावर उभा राहू शकतो असा विश्वास निर्माण झाला. सरळ सरळ शैक्षणिक कर्ज काढलं आणि होईल त्या परिस्थितीला सरळ शिंगावर घ्यायचं ह्या एका उद्देशानं मी उभा राहिलो होतो.

हेही कॉलेज सुरू झालं. थेट दुसर्‍या वर्षाची अ‍ॅडमिशन बर्‍याच उशिरा होते. त्यामुळे कॉलेजमध्ये गेलो तोच थेट सबमिशन्समध्ये गुरफटलो गेलो. एके दिवशी एकूणच घरचा ताणतणाव असह्य झाला आणि थेट एच.ओ.डीं.ना जाऊन भेटलो. त्यांना सगळी परिस्थिती पूर्णपणे सांगीतली आणि कॉलेज चालू असतानाचं नोकरी करायची परवानगी मागितली. शेवटचा एक तास मला सूट मिळावी अशी विनंती केली. आमच्या कॉलेजमध्ये रोज शेवटचे दोन तास प्रॅक्टिकल्स असायची. त्या भल्या माणसानेही माझ्या आणि आणखी एका मित्रासाठी थेट प्राचार्यांकडे शब्द टाकला. प्राचार्यांनी नाही हो करता करता सबमिशन, अभ्यास आणि हजेरीवर कुठलाही परिणाम होऊ देणार नाही ह्या एका अटीवर आम्हाला शेवटचा अर्धा-पाऊण तास लवकर जायची परवानगी दिली. त्या सेमिस्टरमध्ये तर नोकरीचं काही मार्गी लागलं नाही. पण त्या सेमिस्टरनंतरच्या परीक्षेनंतर मात्र एका मिडियम स्केल इंडस्ट्रीमध्ये सेकंड शिफ्ट कायम अशा बेसिसवर ६ महिने काँट्रॅक्टची नोकरी मिळाली. रोज कॉलेजमधून २.१५-२.३०ला निघायचं ३.३०ला कंपनीमध्ये जायचं, ते रात्री थेट ११.४५ला घरी असा पुढे अडीच वर्षांचा दिनक्रम होता. जी काय आर्थिक अडचण आलेली होती, ती पुढे वर्ष-दीड वर्षानंतर दूर झाली. जो काय फटका बसलेला होता तोसुद्धा भरून निघाला, पण नोकरी काही सोडवली नाही. कॉलेजपेक्षा कंपनीमध्ये जास्तं बरं वाटायचं. स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर आपण काहीतरी करतोय ह्याचा अभिमान वाटायचा. पगार एवढा जास्त होता की एज्युकेशन लोनचं महिन्याचं व्याज गेल्यानंतर जे काही पैसे उरायचे, त्यापेक्षा काही पटीने जास्त माझ्या मित्रांचे पॉकेटमनी होते.

डिप्लोमामध्ये एक मेकॅट्रॉनिक्स आणि ऑपरेशन रिसर्च हे विषय सोडले तर बहुतांश विषय अभ्यासलेले होतेच, त्यामुळे टेक्निकल विषयांमध्ये अजिबात काही अडचण यायची नाही. त्यातून थेट कोअरमध्येचं नोकरी करत असल्याने हे सगळे विषय मला सोपे जायचे (अंडु अ‍ॅड्वांटेज). पण एम-३ रूपी शनीमहाराज मात्र गुणपत्रिकेच्या प्रत्येक स्थानावर वक्री झालेले होते. पहिल्या सेमिस्टरला एम-३ सोडून दिलेला, चु़कून पुस्तकं उघडलं नव्हतं कधी. अगदी परीक्षेमध्येपण पहिल्या अटेंम्प्टला कोरा पेपर देऊन शून्य आणलेला. ही चूक मात्र मला नंतर भयानक महागात पडली. पहिल्या मार्कशीटवर ० आणि नंतर ओळीने ५ मार्कशीट्सवर एम-३ मध्ये २७ मार्क्स आणून एक वर्ष धारातीर्थी पडलेलो. साला, बहुतेक थ्रुआउट डिस्टिंक्शन आणि इयर डाउन अशी केस असणारा मी एकमेव नमुना असणार पुणे युनिव्हर्सिटीमधला. इंजीनिअरिंगच्या सुरुवातीलाचं एका विशिष्ट विषयाच्या गुरुजींशी पंगा घेतलेला होता. त्यांनी भर वर्गात कॅप्टन जॅक स्पॅरो तु मला ५०% पाडुन बी.ई. होऊन दाखव असा अपमान केलेला. त्यांच ते वाक्य आणि एकूणचं आता वर्षभर कॉलेजची घाईगडबड नसणार होती, त्यामुळे त्या काळात मी जेवढा चिडचिडा झालेलो होतो तेवढी मी आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये कधीचं चिडचिड केली नव्हती. (रिकामं डोकं सैतानाचं घरं म्हणतात ते खोटं नव्हे). गणोबाच्या ७व्या अटेंप्टला मात्र चक्क ६४ किंवा ७२ असे काहीतरी मार्क्स पडले एम-३ मध्ये आणि हे दुष्टचक्र सुटलं मागचं (क्रेडिट गोज टु माय फ्रेंड्झ). युनिव्हर्सिटीच्या गेटवर जाऊन नारळ फोडायची इच्छा मोठ्या प्रयासाने आवरलेली मी.

तीन वर्षांचं इंजीनिअरिंग वाढत्या वश्याने चार वर्षांच झालं, पण एकदाचं संपत आलेलं. इयर डाउन असल्याने कँपस प्लेसमेंट वगैरेंचा विचार करणंसुद्धा मूर्खपणाचं होतं (Again, No one cares how much one knows or respects the experience. All they want is Paper with degree certificate.). आता पुढे काय?चा प्रश्न परत डोकं वर काढायला लागलेला होता. शैक्षणिक कर्जाचे हप्ते सुरू झालेले होते. त्यामुळे किमान समाधानकारक पगाराची नोकरी मिळणं फार महत्त्वाचं झालेलं होतं. त्याचं सुमाराला मी ज्या कंपनीच्या सर्टिफिकेटखाली मी माझा बी.ई.चा प्रोजेक्ट पूर्ण केला होता, त्यांच्याकडे मिडियम पोझिशनची एक जागा रिकामी झालेली होती. आजपर्यंत मिळालेला अनुभव आता कामाला येणार होता. एक छोटीशी अडचण होती ती म्हणजे माझं ग्रॅज्युएशन पुर्ण झालेलं नव्हतं. शेवटची परीक्षा महिन्याभरानंतर असणार होती. आजपर्यंतचं माझं प्रोजेक्टचं रेकॉर्ड बघता मला ६ महिन्यांच्या बाँडवर ती जागा मिळाली. जरा समाधानकारक पैसे मिळायला लागले. एक डोकेदुखी जरा कमी झालेली होती.

इंजीनिअरिंगच्या शेवटच्या परीक्षेचे, प्रोजेक्ट रिपोर्टचे, वायवा वगैरेंचे सोपस्कार पडून रिझल्ट लागला.

७९.२१% फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन अँड थर्ड रँक इन युनिव्हर्सिटी ऑफ पुणे. :) :)!!

चायला किमान २०० वेळा खालचे टक्के आणि वरचं माझं नावं जुळवून पाहिलं. देर आये दुरुस्त आये म्हणतात ते खोटं नाही. असंख्य नाही पण बर्‍यापैकी अडचणींना तोंड देऊन माझ्या नावापुढे Er.ची पदवी लागलेली होती. ज्या ज्या लोकांनी दहावीच्या निकालापासून "हा काय आयुष्यात पुढे जाणार?" असं तोंडावर बोलून दाखवलं होतं, त्या सगळ्यांची तोंडं मी बंद केलेली होती.

माझ्या मते एक उत्तम यंत्र/ उत्पादन अभियंता बनण्यासाठी काय करायला हवं? किंवा आत्ता जे कॉलेजमध्ये आहेत त्यांना माझा सल्ला काय असेल?

ही मतं माझ्या आजपर्यंतच्या अनुभवांवर आधारलेली आहेत. प्रत्येकाची मतं त्यांना आलेल्या अनुभवांप्रमाणे वेगवेगळी असू शकतात.

१. Keep yourself updated. हे क्षेत्र अतिशय खळबळीचं आहे. प्रत्येक दिवशी तुमच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीचं काम असतं. त्यामुळे तुम्ही स्वत:चं ज्ञान अद्ययावत ठेवणं प्रचंड महत्त्वाचं आहे.

२. उत्पादन/ यंत्र अभियंता हा बहुगुणी (Versatile) असायलाचं हवा. तुम्हाला तुमचं क्षेत्रं सोडून अजून बाकीच्या पूरक क्षेत्रामधली सखोल माहिती असायलाचं हवी. सध्याचा काळ क्रॉस ब्रँच टेक्नॉलॉजीचा आहे.

३. हात काळे करायला अजिबात लाजायचं नाही. ते पु.लं.चे काल्पनिक पेस्तनजी काका म्हणतात त्याप्रमाणे, "हल्लीचा सोकरा लोगं हात काला करायला घाबरते." किंवा "हे कसले सुभ्रमण्यम किंवा टाट्या कुळकर्णी इंजीनिअर" असं लोकांनी तुमच्याविषयी म्हणायची संधी तुम्ही निर्माण होऊ देऊ नका. तुम्ही जेवढं तुमच्या क्षेत्रामध्ये स्वत: घासाल, तेवढी तुमची अनुभवांची शिदोरी मोठी होत जाईल.

४. तुम्ही आज जे पुस्तकात शिकत आहात, तेचं मी ५ वर्षांपूर्वी शिकलोय. तेचं माझ्याहून किमान १० वर्षं जास्त अनुभवी असणारे लोक शिकलेत. युनिव्हर्सिटी/ बोर्डाचा अभ्यासक्रम आणि इंडस्ट्रीच्या गरजा ह्यामध्ये कमालीची तफावत आहे. परिक्षाकेंद्री म्हणून पुस्तकातलं लिहा, पेपरात काही हरकत नाही. पण तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये टिकायचं असेल, तर मुद्दा क्रमांक एक रोजच्या रोज आचरणात आणायलाचं हवा. माझी इ-मेलमधली जी सिग्नेचर आहे ना त्यामध्ये मी असं लिहिलेलं आहे.
"Better than yesterday is one step closer to the excellence".
मी स्वतः ते वाक्यं नित्यनेमाने पाळायचा प्रयत्न करतो.

I am engineer at the moment. A time will come when people will recognize me as one of the Elites I hope.

लैचं बोरं केलं का काय? जाव चाय पानी पिके आवं :)

ह्यानिमित्ताने मिपावर बाकीचे यंत्राभियंते आहेत त्यांनीही त्यांचे अनुभव इथे प्रतिक्रियांमध्ये मांडावेत अशी मी आग्रहाची मागणी करतो. @बॅटमॅन, @खेडुत, @क्लिंटन @मंद्या

समाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

शैक्षणिक प्रवास छान लिहिलाय. लेखन आवडले.
श्री गणेशमालेतील दुसरे पुष्पही सुगंधी आहे.

ओघवत्या शब्दांतला प्रवास. "आर्थर कॉनन डायलच्या “The Adventure of the Red Circle” मधलं “Education never ends, Watson. It is a series of lessons, with the greatest for the last” या वचनाची आठवण झाली. (या लेखातील अनुभवांशी सुसंगत असं आणखी एक वचन आठवतंय, कुणाचं ते माहीत नाही: "Don’t forget to remain humble; there’s always more to learn.")

पद्मावति's picture

19 Sep 2015 - 2:09 am | पद्मावति

श्री गणेशमालेतील दुसरे पुष्पही सुगंधी आहे.

....सहमत.
खरंच खूप छान लेख.

रातराणी's picture

19 Sep 2015 - 2:19 am | रातराणी

मस्त! टेक्निकल गोष्टी नाही कळल्या पण भावना तंतोतंत पोचल्या.

स्वाती२'s picture

19 Sep 2015 - 2:49 am | स्वाती२

लेखन फार आवडले!

प्रभाकर पेठकर's picture

19 Sep 2015 - 4:06 am | प्रभाकर पेठकर

पुस्तकी अभ्यासक्रमातील सुमार टक्केवारी आणि आवडत्या विषयातील दैदिप्यमान यश ह्या दोहोतील तफावत पाहता आपली प्राथमिक शिक्षणव्यवस्था सक्षम अभियंते घडविण्यासाठी पुरक आहे का असा प्रश्न पडतो. कित्येक विद्यार्थी प्राथमिक शिक्षणातील टक्केवारी पाहून अभियांत्रिकी किंवा तत्सम अभ्यासक्रमांपासून दूर इतरत्र वळत असतील.
कष्टप्रद धडपडीतून खेचून आणलेले यश प्रखर आत्मविश्वास वाढविण्यास कारणीभूत होतं. अभिनंदन.

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Sep 2015 - 4:58 am | कैलासवासी सोन्याबापु

तूफ़ान प्रवास आहे कॅजॅस्पैरो!!! प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला!! तुमच्या जिद्दी ला सलाम! माझ्यासोबत देखील (अ)हितचिंतक नामे लोकांची खड़ाजंगी झालेली होती, अर्थात मला अभियांत्रिकी करायचे नाही कारण खुल्या प्रवर्गातून शासकीय अभियांत्रिकी मिळवयची बौद्धिक कुवत माझ्या जवळ नव्हती अन मास्तर बापसास कर्जात टाकून खासगी महाविद्यालयात जायची इच्छा/आत्मविश्वास/अक्कल सुद्धा नव्हती.

ध्यास एकच होता टिपिकल काहीही करायचे नाही करियर म्हणुन काहीतरी वेगळे करायचे बस!!

(अ)हितचिंतकांचे सोडा एकेकाळी टंगड़ीत टंगड़ी घालुन ज्या मित्रांसोबत पड़िक असे त्यांना सुद्धा खासगीत का होइना पुण्यात अभियांत्रिकी ला प्रवेश मिळाल्यावर त्यांनी संबंध तोडले माझ्याशी (बरेच झाले) वरतुन 'तू इंजीनियरिंग केले नाहीस तुला कदाचित मेहनत कळणार नाही' हे ही जाता जाता ऐकवले!. त्या दिवशी ठरवले की ओपन केटेगरी असलो तरी क्लास वन गवर्नमेंट जॉब घेणारच. मित्र बरोबर म्हणाले होते तुला 'मेहनत कळणार नाही' कारण मी ती कळून न घेता थेट 'अघोरी मेहनत' सुरु केली होती पैसे कमी पडले की अपराधी वाटत असे आपण बापाच्या पेंशन मधुन आपला स्पर्धा परीक्षा जुगार खेळतो आहे ही फीलिंग वाईट असे फार मग पैसे वाचवायला खाण्यापिण्यावर बंधने घातली. तेव्हा एक कळले "विद्यार्थी म्हणुन पुणे २ चेहरे तुमच्या पुढे ठेवेल पहिला म्हणजे छंदीफंदी एफसी रोड सैटरडे इवनिंग जॅम मजा तारुण्याचे क्षण पकड़णे अन स्वताबडण" मी दुसरा निवडला अपाचे टुन्ज केपी वगैरे मला उच्चवर्गीय वाटत असे. preperation कोर मधे असताना मेस वाल्याने दार वाजवलेले ही डिस्टर्ब करीत असे अभ्यासाला अश्यवेळी खिड़की मधुन (दूसरा मजला) खाली ग्राउंड फ्लोर वर दोरी सोडलेली असे मेस वाला त्याला डबा बांधून जाई व मी एका हातात पुस्तक घेऊन डबा वर ओढ़ीत असे तसाच जेवत असे असा ३ महीने फ्लॅट बाहेर पडलो नव्हतो. मग ज्या दिवशी सेलेक्ट झालो त्या दिवशी अंग पिसासारखे हलके झाले होते रडु येत होते ते आनंदश्रु म्हणुन नाही तर सतत ३ वर्षे अनिश्चिततेत जगल्यावर आता करायला चैलेंजिंग अजुन काही मिळेल का नाही ह्या विचाराने, त्या नंतर झाले ते अकादमी पर्व अन आज पोस्टिंग.

आजही काही (अ)हितचिंतक वडिलांस "किती ला पडली हो बाळाची नोकरी" विचारतात चालायचेच! आपण काय कोणच्या बोलीने झिजत नाही आपण मस्त मेस ला बसावे अन स्कॉच प्यावी म्हणे आजकाल मी!!

बाकी

मला न कळलेली गोष्टं, बी.ए. एम.ए. ला लोक्स असं तुच्छ का लेखतात? मे बी त्यांच्या नोकर्‍यांमधे पगार वगैरे कमी असतील पण त्यामुळे पदवी, पदव्युत्तर पदवीची मानाची किंमत कशी काय कमी होते म्हणे?

म्हणूनच "मागता येत नाही भिक तर मास्तरकी शिक" असे म्हणत असावेत काय?

बोका-ए-आझम's picture

19 Sep 2015 - 7:35 am | बोका-ए-आझम

माझी परिस्थिती उलटी होती. मी दहावीला ८६.१७% मिळवूनही आर्ट्सला गेलो म्हणून मला शिव्या पडल्या होत्या. पण आता उलट तो निर्णय बरोबर होता असं माझे त्यावेळी मला शिव्या घालणारे नातेवाईक आणि हितचिंतक म्हणतात. शेवटी डिग्री कुठली का असेना, तुम्ही त्या ज्ञानाचा काय उपयोग करत आहात ही महत्त्वाची गोष्ट आहे. कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना!

मितान's picture

20 Sep 2015 - 9:10 am | मितान

सेम टू सेम !!

अजया's picture

21 Sep 2015 - 8:23 pm | अजया

संस्कृतातले मार्कही लिहायचे होते बोकेराव! मला तर तेच तुमचे टक्के वाटत होते!!

अन्या दातार's picture

19 Sep 2015 - 5:24 am | अन्या दातार

शैक्षणिक प्रवास मस्त उलगडला आहेस रे. मीही एकेकाळी साॅम व टाॅम (राहिलेले) एकाच टर्मला सोडवले होते त्याची आठवण झाली.

चांदणे संदीप's picture

19 Sep 2015 - 6:50 am | चांदणे संदीप

श्री गणेश लेखमालेतील दुसरा हाही लेख भन्नाट.
अतिशय माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी लेख. कदाचित १०-१२ वीच्या उंबरठ्यावर असणा-या मुलांसाठी मार्गदर्शकही ठरू शकेल. त्यांना अभियांत्रीकीच्या या शाखेकडे आकर्षितही करू शकेल.

"कॅप्टन जॅक स्पॅरो" तुम्हाला पुढील लेखनासाठी आणि एकूणच आयुष्यातील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!

आधी 'शिक्षणक्षेत्र' आणि आता 'यंत्रोपवित'.
लेखमाला बहरत जाणार यात कसलीही शंका नाही.

चांदणे संदीप's picture

19 Sep 2015 - 7:01 am | चांदणे संदीप

खर म्हणजे अजून सविस्तर प्रतिसाद लिहायचा आहे. पण आता मोबल्यावरून टंकताना खूपच मर्यादा येतात.

दुपारी ऑफिसात गेल्यावर सविस्तरपणे लिहिन.

बोका-ए-आझम's picture

19 Sep 2015 - 7:30 am | बोका-ए-आझम

जबरी प्रवास केलेला आहे. अगदी एखाद्या दर्यावर्दी कॅप्टनप्रमाणेच अाणि अनेक खवळलेल्या समुद्रांमधून जहाज सहीसलामत बाहेर काढलेलं आहे.
मला सर्वाधिक आवडलेला भाग हा -

Keep yourself updated. हे क्षेत्र अतिशय खळबळीचं आहे. प्रत्येक दिवशी तुमच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीचं काम असतं. त्यामुळे तुम्ही स्वत:चं ज्ञान अद्ययावत ठेवणं प्रचंड महत्त्वाचं आहे.

हे तर सर्वसमावेशक आहे. सगळ्याच क्षेत्रांना लागू आहे!

अप्रतिम लेख!

मुक्त विहारि's picture

19 Sep 2015 - 7:46 am | मुक्त विहारि

ह्या लेखमालेतील दुसरे पुष्प पण जोरदार.

मुवि

मस्त ! या लेखामुळे मला जुने दिवस आठवले !
चक्क जालावर शोध घेउन इथे जाउन आलो :- http://vbdpublications.com/publication.html

{कोणे एके काळी सॉम-टॉम ची पुस्तके घेउन हिंडणारा }

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ganpati Aarti :- रमा माधव

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Sep 2015 - 8:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सर्व प्रतिसादकर्त्यांचा आभारी आहे :).

प्रचेतस's picture

19 Sep 2015 - 8:56 am | प्रचेतस

एकदम डिट्टेलवार लेख.
इंजिनियर नसल्याने हे विश्व माझ्यासाठी तसे अल्पपरिचितच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Sep 2015 - 9:14 am | ज्ञानोबाचे पैजार

दुसरा मोदकही स्वादिष्ट निघाला. हा लेखही प्रचंड आवडला गेला आहे.

दहावीच्या अशा निकाला नंतर मी काय केले असते याची कल्पनाचा करवत नाही. पण त्या वयातही तुम्ही ज्या प्रकारे त्याला सामोरे गेलात त्या साठी तुम्हाला सादर दंडवत.

माणुस घडत जातो तो अशाच अनुभवांमधुन.

हा लेख मी माझ्या घराच्या सगळ्यांना वाचायला लावणार आहे.

पैजारबुवा,

फारच छान लेख! यामुळे प्रत्येकाला त्याचे संघर्षाचे दिवस आठवले असणार यात शंका नाही.

लेखही सुरेख आणि तुमची जिद्दही. __/\__

किसन शिंदे's picture

19 Sep 2015 - 10:23 am | किसन शिंदे

लेख आवडला कॅप्टन.

आता इंजिनियरींग करू पाहणार्‍या, करणार्‍या ओळखीतल्या मुलांना आवर्जून वाचायला देईन हा लेख.

अजया's picture

19 Sep 2015 - 10:46 am | अजया

लेख आवडलाच.

मोहन's picture

19 Sep 2015 - 10:54 am | मोहन

चिमणराव तुझ्या लेखाने कॉलेज मधे काय काय करायचे राहील्याने एक साधारण यांत्रीकी अभियंताच राहीलो याची प्रकर्षाने जाणीव झाली. तुझ्या जीद्दीला प्रणाम !

अभ्या..'s picture

19 Sep 2015 - 11:06 am | अभ्या..

छान लेख.
मला १० वी नंतर त्यातल्या त्यात मेकॅनिकल ईंजिनिअर व्हावेसे वाटे. गाड्यांची अन मशीनींची आवड. अजून काय.
पण एवढे जमले नसते आपल्याला. हे बुध्दीच्या आवाक्यापलिकडचे आहे माझ्या.
.
अभ्या..
(ईंजिनिअरिंग कॉलेजचे फक्त मॅगझीन्स डीझाईन केलेला, त्यात पण बक्षीस मिळवलेला)

मांत्रिक's picture

19 Sep 2015 - 11:08 am | मांत्रिक

सीजेएस, लेख आवडला! आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीला व मेहनतीला सलाम!
रोज कॉलेजमधून २.१५-२.३०ला निघायचं ३.३०ला कंपनीमध्ये जायचं, ते रात्री थेट ११.४५ला घरी असा पुढे अडीच वर्षांचा दिनक्रम होता. बाप रे! कसं सहन केलंस रे? सलाम तुझ्या मेहनतीला, चिकाटीला!
तांत्रिक टर्मिनाॅलाॅजी कळली नाही फारशी, पण हे सगळं किती कष्टाचं, डोकेफोडीचं काम आहे याची जाणीव नक्कीच झाली. असो, भावी आयुष्याकरिता खूप खूप शुभेच्छा!

सुबोध खरे's picture

19 Sep 2015 - 11:09 am | सुबोध खरे

चिमणराव
इतके कष्ट घेऊन जिद्दीने शिक्षण केल्याबद्दल आमचा साष्टांग दंडवत.आपले प्रांजळ कथन आवडले.
आपल्यासारख्या लोकांचे कष्ट पाहून आम्हाला स्वतःच्या आळशी पणाची लाज वाटते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Sep 2015 - 1:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

डॉक लाजवताय का आता? तुम्ही, सोन्याबापु, रणजित चितळे आणि इकडे जेवढे लष्करी पेशामधे असतील तेवढे सगळे. तुम्ही जेवढी मेहेनत आर्मी मधे असताना केली असाल, जे काय अघोरी कष्ट सोसले असतील किंवा जेवढा अनुभव घेतला असेल त्याच्यासमोर हे १% सुद्धा नाही. प्लीज दंडवत वगैरे नको. :/

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Sep 2015 - 3:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

.

कैप्टेन जैक स्पैरो,

मी अकादमी च्या एका कमेंट मधे सुद्धा म्हणलो होतो, माणसाने सेल्फ डेप्रिसिएशन करायचे नसते. अन तुमच्या सारख्या झुंजलेल्या माणसाने तर अजिबात नाही वरील फोटो खुप बोलका असल्या कारणे अजुन बोलणे टाळतो मी

*फ़क्त हा सन्देश तुमच्यापर्यंट पोचवायला म्हणुन मी मोबाइल वर फ्लिकर ला रगड़ा परेड लावलाय

(फोटो जालावरून साभार)

लाल टोपी's picture

19 Sep 2015 - 11:13 am | लाल टोपी

शैक्षणीक प्रवास अगदी ओघवत्या शब्दात व्यक्त झाला आहे. लेख आवडला

विशाल कुलकर्णी's picture

19 Sep 2015 - 11:22 am | विशाल कुलकर्णी

अप्रतिम झालाय लेख. You really deserve your ID which has a "Captain" in it. Hats off sir.

पुण्याचं एक आहे , घेतलं तर डोक्यावर घेतं नाहीतर पार कचरा करतं. मी या अनुभवातून गेलोय. बारावीला कमी गुण मिळाल्यावर नाइलाजाने पदविका अभ्यासक्रमाला घ्यावा लागलेला प्रवेश.येताजाता तुला जमणार आहे का? म्हणून हिणवणारे तथाकथीत नातेवाईक आणि जमेल रे भोxxx,उगाच रडू नकोस म्हणून पाठीशी उभे राहणारे व नंतर पदविका संपवून सीओईपीला प्रवेश घेतल्यावर तीन वर्षे मला कल्पनाही न देता कॉलेजच्या कैंटीनची माझी बिले गुपचुप भरून टाकणारे, डिस्टिंक्शन मिळाल्यावर लोनावळ्याला नेवुन बीअर नामक अमृताची ;) दीक्षा देणारे मित्र डोळ्यासमोर उभे राहीले.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Sep 2015 - 1:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सी.ओ.ई.पी. _/\_

प्यारे१'s picture

19 Sep 2015 - 11:28 am | प्यारे१

जियो कॅप्टन. सुंदर लेख! भारी आहेस.

मित्रहो's picture

19 Sep 2015 - 11:59 am | मित्रहो

छान लिहीला आहे. कॉलेज आठवले. खूप दिवसांनी हे सारे शब्द ऐकले.
आमचे ड्रॉइंगशी नेहमीच वाकडे होते त्याचमुळे मला यंत्र अभियांत्रिकी आवडत नव्हते. मार्कांची समस्या नव्हती पण रस नव्हता. भुवनेश्वरला टूल रुमला असताना विषयाची व्याप्ती कळली. ऑटोमेशन म्हणजे नक्की काय असते ते जवळून पाहीले. तेंव्हा तिथल्या सरांनी किस्सा सांगितला होता. सर राजस्थानतले आदरयुक्त हिंदी बोलनारे. त्यांचा पहीला जॉब होता गुरगावजवळ. नोकरीच्या तिसऱ्याच दिवशी त्यांना ऐकवले होते तू उधर बैठ चुपचाप साले तेरी जितनी उमर नही उतने सालोसे .....पुढे हरयाणवीमधे बोलला. माझ्या एका मित्राचा वेल्डर युनियन लीडर होता त्यामुळे त्याचे सारे काम मित्रच करीत होता. एकंदरीत यंत्र अभियांत्रिकी शिकण्यापेक्षाही त्यात यशस्वीपणे टिकून राहणे अवघड आहे. तुम्ही त्यात यशस्वीपणे पाय रोवलेत तुम्हाला सलाम.

पैसा's picture

19 Sep 2015 - 12:19 pm | पैसा

मूर्तीमंत संघर्ष! लिखाण आवडले. पुढच्या संघर्षासाठी शुभेच्छा!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Sep 2015 - 1:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सगळ्यांचे परत एकदा आभार. पुढे जे काय करायचं आहे त्यासाठी तुमच्या सर्वांचे शब्द नक्कीचं ताकद देतील.

नि३सोलपुरकर's picture

19 Sep 2015 - 1:29 pm | नि३सोलपुरकर

कॅप्टन.
लेख आणि तुमच्या जिद्दीला __/\__,
लेख आवडला

आणी खरे साहेबांशी १०००% सहमत

स्वाती दिनेश's picture

19 Sep 2015 - 2:49 pm | स्वाती दिनेश

आवडला. छान लिहिता आहात.
स्वाती

चांदणे संदीप's picture

19 Sep 2015 - 3:34 pm | चांदणे संदीप

मेकॅनिकल इंजीनिअर कुठल्या भाषेमध्ये बोलतात, माहीत आहे का? इंग्लिश हे चुकीचं उत्तर आहे. इंजीनिअरिंग ड्रॉइंग हे बरोबर उत्तर आहे. इंजीनिअरिंग ड्रॉईंग हा मेकॅनिकल इंजीनिअरिंगमधला सगळ्यात एक्स्प्रेसिव्ह विषय आहे.

ही अगदी खरी गोष्ट आहे. (मी ARCHITECTUARAL/ELECTRICAL/CIVIL/STRUCTURAL च्या स्वानुभवातून सांगतो आहे) ही गोष्ट इतर शाखांनाही लागू पडते पण, दुर्दैवाने फार कमी लोकांच्या लक्षात येत.
बरीच इंजिनियर मंडळी मी अशी पाहिली आहेत ज्यांना DRAWING चा गंधही नसतो आणि मग या अशाच कारणांमुळे ती मागे पडत राहतात!

समजा, मला एखाद्या स्टोनक्रशरसाठीच्या यंत्रासाठीच्या रिडक्शन गिअरबॉक्सची संरचना करायची असेल, तर मला वरच्या यादीमध्ये दिलेल्या प्रत्येक विषयाचं सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे. ते कसं ते आता सांगतो. आधी मला गिअरबॉक्स कुठल्या ड्रायव्हिंग सोर्सने फिरवला जाणार आहे त्याचा विचार करावा लागेल (इंडक्शन मोटर, इंटर्नल/ एक्स्टर्नल कंबशन इंजीन). त्या यंत्राच्या स्पेसिफिकेशन्स विचारात घ्याव्या लागतील .........
...... ह्यामध्ये अजून त्या गिअरबॉक्सला लागणारं ल्युब्रिकेशन, ते ल्युब्रिकंट गिअर्समध्ये पुरवायच्या पद्धती, ते ल्युब्रिकंट थंड राहावं म्हणून लागणारी रेडिएशन सिस्टीम वगैरे अजून कित्येक बाबी असतात. एका चांगल्या इंजीनिअरला त्याच्या क्षेत्राशी निगडित सगळ्या विषयांचं सखोल ज्ञान असणं का आवश्यक असतं, ह्याची साधारण कल्पना ह्यावरून यावी.

या गोष्टी माझ्या मते Project Conceptualization/Study/Planning वगैरे प्रकारात येतील. आणि जोपर्यंत या गोष्टींना महत्व दिले जात नाही, रोजच्या Practice मध्ये आणले जात नाही तोपर्यंत आपल्या Field मध्ये आपण शिखर सर करायचा विचार सोडून द्यावा असे माझे प्रामाणिक मत आहे!

१. Keep yourself updated. हे क्षेत्र अतिशय खळबळीचं आहे. प्रत्येक दिवशी तुमच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीचं काम असतं. त्यामुळे तुम्ही स्वत:चं ज्ञान अद्ययावत ठेवणं प्रचंड महत्त्वाचं आहे.

ह्याला प्रचंड अनुमोदन! तुमच्या ईमेल सिग्नेचर प्रमाणे माझ्याही डोक्यात यासंबंधीच्याच दोन ओळी कोरल्या गेल्यात, त्या शेअर करतो.
१) You cannot demand tomorrows salary with today's knowledge!
२) To earn more you have to learn more.
या ओळी माझ्या पहिल्या जॉबच्या कार्यालयातील दोन वेगवेगळ्या विंगाकडे घेऊन जाणा-या दोन काचेच्या दरवाजात चिकटवल्या होत्या. आजपर्यंत या ओळी डोळयासमोर ठेऊन चालण्याचा प्रयत्न करतो आहे.

२. उत्पादन/ यंत्र अभियंता हा बहुगुणी (Versatile) असायलाचं हवा. तुम्हाला तुमचं क्षेत्रं सोडून अजून बाकीच्या पूरक क्षेत्रामधली सखोल माहिती असायलाचं हवी. सध्याचा काळ क्रॉस ब्रँच टेक्नॉलॉजीचा आहे.

आपला विषय सोडून दुसरीकडे पाहण्याचे बरेचजण टाळतात. परंतु असं न करता मिळेल त्या विषयाची म्हणजे अगदी १% जरी काम पडत असले तरी त्याच्या संबंधीत माहिती आपल्या पेटा-यात टाकून द्यावी म्हणजे इतरांपेक्षा 'Stand Out' होण्याची योग्यता प्राप्त होते.

ह्या सा-या आणि इतरही कष्ट, जिद्द याबद्दलच्या चांगल्या गोष्टी या लेखात आल्यात की हा एक सच्चा मार्गदर्शक लेख म्हणून सर्वांनी जवळ ठेवायला काहीच हरकत नाही!

लैचं बोरं केलं का काय? जाव चाय पानी पिके आवं :)

असंच माझी प्रतिक्रिया वाचून वाटेल! कमी-जास्त (जास्तच) काहीबाही बोललो असेन तर माफ करा.
जयहिंद! (हे काय मध्येच? ;) )

साधा मुलगा's picture

19 Sep 2015 - 4:44 pm | साधा मुलगा

कॅप, मागे एकदा तुमच्या एका संगणक संबंधी धाग्यावर तुमचे ज्ञान बघून, आपण सर्वसाधारण अभियंते नाही हे समजले होते, आपण माझ्या एका लापतोप्च्या समस्येचेही समाधान सांगितले आहे.
आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!

सिरुसेरि's picture

19 Sep 2015 - 5:18 pm | सिरुसेरि

छान लेख ! कॉलेजचे नाव सुरुवातीला न सांगण्याचे कारण समजले नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Sep 2015 - 7:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

काही खाजगी कारणांमुळे जाहिर करु शकत नाही. बाकी मुविंचे धन्यवाद. एका लेखात सगळे लेख ओवल्याबद्दल !! :)

पिशी अबोली's picture

19 Sep 2015 - 5:32 pm | पिशी अबोली

काल प्रसिद्ध झाल्यावर वाचला, आता पुन्हा वाचला.
एवढी जिद्द आणि एवढी मेहनत एका वाचनात पचवता येत नाही हो आमच्यासारख्याना.. आणि त्यातल्या तांत्रिक गोष्टींचंपण इतकं सर्वसामान्यांना समजेल असं वर्णन.. खूप चांगला लेख वाचल्याचा आनंद मिळाला.. :)

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Sep 2015 - 5:40 pm | लॉरी टांगटूंगकर

एक नंबर चिमाजीअप्पा!
आपला प्रवास इतक्या खळबळलेल्या समुद्रातून झालेला आहे याची कल्पना नव्हती.
लेख फारच छान. लेखानंतरची मते आवडली, पटली. अस्पष्टशी लिहीलेली एक गोष्ट म्हणजे आपल्या आत्मविश्वासाला धक्का लागू न देता (अ)हितचिंतकांना फाट्यावर मारत रहावे. दहावीत माझ्यापण गणिताचे वाईट मार्क बघून असलेच सेम सल्ले मिळाले होते.

A ship in harbor is safe, but that is not what ships are built for.

कॅप्टन तुमच्या मेहनतीला आणि प्रश्नांना जिद्दीनं सामोरं जाण्याला सलाम. जेव्हा लोक विरोधी बोलतात त्याच वेळी जिद्द पेटून उठते!!
इंजिनिअरिंग हा माइंडसेट असतो त्याचा मार्कांशी संबंध जोडणं तितकसं खरं नसतं. विषय समजणं हे तुमच्या बुद्धिमत्तेवरती जितकं असतं त्यापेक्षाही जास्त तुमच्या मेहेनतीवर असतं. माझे काही मित्र हे परीक्षा पद्धतीत बसू शकणारे नाहीत त्यामुळे मार्क यथातथाच मिळवून पास झाले परंतु आज ते अतिशय उच्च दर्जाचे इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन अभियंते आहेत. गोष्टी प्रत्यक्ष हाताळून प्रॅक्टिकल शिकणे फार महत्त्वाचे. सातत्याने शिकत राहणे या गोष्टीला पर्याय नाही.
कुठ्च्याही क्षेत्रासाठी माझा मूलमंत्र आहे 'No pain, no gain!'

सुधीर's picture

19 Sep 2015 - 7:08 pm | सुधीर

ओघवत्या शैलीतला शैक्षणिक प्रवास आवडला. कदाचित ठेच लागल्याशिवाय प्रखर लढा द्यायची जिद्द निर्माण होत नसावी. तुमच्या बाबतीत दहावीच्या निकालेने ती लागली असावी. दुर्दैवाने सगळेच त्यानंतर तुमच्या सारखी जिद्द दाखवत नसावेत.

इंजिनिअरींग ड्रॉइंगवरून एक किस्सा आठवला. आमचा एक शाळू सोबती होता, पठ्ठ्या गणितात हुशार होता पण ड्रॉइंगचं काय वाकडं होतं माहीत नाही. ड्रॉइंगमध्ये काठावर पास झाला होता पहिल्या वर्षी (नशीब त्याचे, फक्त सेम वन आणि सेम टूलाच ड्रॉईंग होतं). एका (कदाचित पहिल्याच) असाइनमेंट मध्ये त्याने टॉप व्हू एका पानावर आणि फ्रंट व्हू मागल्या पानावर काढलं होतं. मास्तराने ड्रॉइंग शीटवर भला मोठा भोपळा काढला होता. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Sep 2015 - 7:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

श्रीगणेशमालेचे दुसरे पुष्पही एकदम आकर्षक आहे.

"खर्‍या यशस्वी माणसाचे लक्षण त्याच्या जीवनातल्या अपयशाच्या अभावात नसून, दर अपयशानंतर तो किती लवकर आणि किती धीराने अंग झटकून उभा राहून परत त्याच्या ध्येयाच्या दिशेने धावू लागला यात आहे" हे सार्वकालीक सत्य अधोरेखीत करणारे हे आत्मकथन आहे. अशी मानसीकता असणार्‍याला भविष्यात उत्तरोत्तर उत्कर्ष साधण्यासाठी इतरांच्या शुभेच्छांची गरज पडत नाही... ना त्या उत्कर्षात इतरांच्या कुत्सित शेर्‍यांनी काही कमी येत !

लेख आवडला. पुढील व्यावसायिक यशासाठी शुभेच्छा !

अशा प्रकारे अनेकजण यशस्वी झाल्याचे पाहिले आहेत, नोकरी करून शिकण्याचा स्वानुभव आहेच- त्यामुळे प्रातिनिधिक वाटला. अभियांत्रिकीची मुळात आवड असेल तर पहिल्या वर्गात पास होणे सोपे आहे. मात्र पुणे विद्यापीठात विशेष गुणवत्ता (डिस्टिंक्शन) मिळवणे खरेच कठीण होते - हल्ली माहीत नाही. यशाचा मार्ग खडतर आहे पण प्रत्येकाला आपली पद्धत सापडते आणि नुसते बोलणाऱ्याना फाट्यावर मारायला आपण शिकतो.

मीही अतिशय लहान खेडेगावातून आल्याने मार्गदर्शन नव्हते. त्यामुळे बारावीला कमी मार्क्स आणि मग डिप्लोमामार्गे डिग्री, मग पदव्युत्तर असा प्रवास झाला. सर्व काही नोकरी करतच. पीहेचडी ला मात्र चांगले मार्गदर्शक नसल्याने स्वतःच मिळालेला प्रवेश नाकारला. हे मार्गदर्शक चांगले नाहीत हे युरोपात काम करून स्वानुभवाने समजले.

यंत्र अभियंता नसलो तरी सर्वकाळ त्याच क्षेत्रात काम करायची वेळ आली आणि आवडू लागले. करीयरच्या अगदी सुरुवातीला जर्मनीत काम करायची संधी मिळाली. त्यांनी आधी प्रोग्रामिंग न शिकवता, आधी तीन महिने स्वतः मशीन चालवणे, मग त्याची यांत्रिक जुळणी शिकणे अनिवार्य केले! जर्मन अभियंत्यासोबत कामाची संधी मिळाल्यास कोणीही सोडू नये. खूप शिकायला मिळते!

पूर्वी सीओईपीत प्राध्यापक म्हणून काम करताना समोर महाराष्ट्रातील सर्वात गुणवान मुले समोर असत. पण प्रत्यक्ष काही वर्षे काम करून नंतर शिक्षकीत पडल्याने हुशार मुलांसमोर आपले बारावीचे गुण आठवून न्यूनगंड वाटला नाही. उपयोजनावर आधारित अध्यापन आणि अभ्यासक्रमापलीकडे जाउन शिकविण्यामुळे मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आजही जगभरातून ते विद्यार्थी संपर्क ठेवून आहेत त्यामुळे आनंद वाटतो.

***

६४ किंवा ७२ असे काहीतरी मार्क्स पडले एम-३ मध्ये आणि हे दुष्टचक्र सुटलं मागचं (क्रेडिट गोज टु माय फ्रेंड्झ)

यावरून एका वर्गमित्राची आठवण झाली. माझ्यानंतर सहा वर्षांनी तो पास झाला. कारण -एम-३. विद्यापीठाच्या कॅरी-ओव्हर नियमामुळे बी ई पास होऊनही दुसऱ्या वर्षाचं गणित न सुटल्याने त्याला प्रमाणपत्र मिळत नव्हते. त्याला मदत केली आणि पास झाला. त्यापूर्वी पुण्यातले सर्व क्लासेस दोनदा लावून झाले होते. आता अमेरिकेत मजेत आहे बेटा! इथे आला तरी फोनवत पण नाही. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Sep 2015 - 11:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

व्यनि करतोय :)

नया है वह's picture

19 Sep 2015 - 7:45 pm | नया है वह

+

मी आपला लेख वाचला ,मला तो खूपच आवडला . मला माझ्या कॉलेज जीवनातील आठवणी जाग्या झाल्या . सॉम ( २० मार्कस मोहर सर्कलचा प्रश्न), टॉम ,मॅथस-३ ,ह्या सापळ्यातून सुटताना मित्रच खरोखरी उपयोगी येत असत.कॉलेज मध्ये शिकलेल्या बर्‍याच गोष्टिचा उपयोग उर्वरीत आयुष्यात होत नाही . कांही काळ नोकरी केल्या नंतर मी माझा व्यवसाय सुरु केला.प्रत्येक तांत्रिक गोष्ट हि कशी केली असेल ,हि जाणून घेण्याची जिज्ञासा,ती आपल्याला करायला कशी मिळेल या साठी केलेला पाठ्पुरावा व ती यशस्वी पणे केल्यावर मिळणारा आनंद हा कांही पैशात मोजता येणार नाही. कधी कधी सकाळी आठ वाजता कामावर गेल्या नंतर घरी येताना मॉर्निग वॉक साठी येणारी माणसे दिसत असत . इतका वेळ कामात कसा गेला हे देखील कळत नसे.सुदैवाने मी ज्या ठिकाणी जन्मलो,व ज्या ज्या तज्ञ व्यक्तिंचा तांत्रिक अथवा व्यावसाईक सल्ला मी घेतला, त्यांनीही मला कोणताही आडपडदा न ठेवता जे मार्गदर्शन केले, मदतही केली व सोबत काम करणारे सहकारी त्या मुळे देखील माझे आयुष्य सुखकारक झाले . मी मिपावर नवीन सदस्य आहे .बर्‍याच वेळेस अवधानाने कांही चुकाही होतात त्या बद्दल सविनय क्षमस्व. तुमच्या पु्ढील लेखास शुभ इच्छा.

भुमी's picture

20 Sep 2015 - 8:38 am | भुमी

आवडला.

मितान's picture

20 Sep 2015 - 9:11 am | मितान

खूप छान ओघवतं लिहिलंस !!!

मितान's picture

20 Sep 2015 - 9:11 am | मितान

खूप छान ओघवतं लिहिलंस !!!

एक एकटा एकटाच's picture

20 Sep 2015 - 9:33 am | एक एकटा एकटाच

अप्रतिम लेख

स्वत: इंजिनिअर असल्याने

तुमच्या कॉलेज जीवनाचा अत्यंत आदर आहे.

पण त्याहीपेक्षा तुमच्या आई वडिलां बद्दल ज़रा जास्तच वाटतो.
त्यांनी तुम्हाला दिलेले वैचारिक स्वातंत्र्य खरच कौतुकास्पद आहे.

पिंगू's picture

20 Sep 2015 - 11:18 am | पिंगू

कॅप्टन, कडक सॅल्यूट..

भो.चे हे हितचिंतक नको तिथे चोच मारायला येतातच, हा माझा सुद्धा अनुभव. आणि माझ्या शैक्षणिक करियरची राखरांगोळी हा त्याचा अनुभवलेला दुष्परिणाम.

पियुशा's picture

20 Sep 2015 - 1:43 pm | पियुशा

कॅप्टन, मस्त अनुभव कथन
१२ चा निकाल छान लागला म्हणुन आइ न मी पेढे द्यायला गेलेलो तर एका मैत्रिणीचा थोरला भाउ माझ्या आइला म्हणाला होता " कायको इतना खर्चा करनेका ?, शादी बना
डालनेकी, लड्की शादी करके चली जाती तुम को क्या फायदा उसको इतना पढालिखाके
स्वताच्या बहिनिच १२ वि नतर लग्न लरुन टाकल . धन्य धन्य लोक्स भेट्लेत
बरेच (बिन कामाचे) काळ्जी वाहु लोक असतात आपल्या आजुबाजुला आपल्याला मार्क कमी पड्ले तर
१०० - ६० सल्ले असतात फुकटचे अशानच्या नाकावर टिच्चुन सान्गायला छान वाटत की नै आता :)
१० ला एखादाच असतो ज्याला खरेच मनापसुन वाट्त असते याच / हिच कैतरी छान व्हाव:)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Sep 2015 - 2:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ठांकु ठांकु जिल्बुशा.

अच्छा म्हणजे वरसंशोधन तेव्हापासुन चालु आहे तल!!!! ;)

बादवे, या प्रतिसादावरून मला नेहमी पडणारा प्रश्न : मेहनत विद्यार्थ्याने करायची, अभ्यास त्याने करायचा, परीक्षा त्याने द्यायची, सगळे कष्ट त्याने घ्यायचे आणि चांगला निकाल लागल्यानंतर पेढेही त्यानेच वाटायचे! हा कुठला न्याय? पेढे त्याला दुसर्‍यांनी द्यायला पाहिजेत की नको? :-)

प्यारे१'s picture

20 Sep 2015 - 3:23 pm | प्यारे१

या पेढ्यांवरुन आठवलं. मागे जवळपास २० वर्षापूर्वी बजाजची एलिमिनेटर आली होती नवी नवी, महाग होती तुलनेनं.
एका परिचितानं घेतली होती. किती रे ? पेढ्यांसकट ९२,०००/- असं काही उत्तर मिळायचं. पेढे च जवळपास दोन तीन हजाराचे झाले म्हणे.

स्पॅरो , तुला भारी चवकश्या !

इतका छान धागा काढलायेस प्रति पण कीती चान चान आल्यात स्वताच्या हाताने काडी नको टाकुस :प :प
नै तर धाग्याचे कश्मिर वैगेरे वैगेरे :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Sep 2015 - 6:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

घ्याssSsssSSsss!!!!!!!! काश्मिर =))!!!!!!!

नमकिन's picture

20 Sep 2015 - 5:07 pm | नमकिन

नेमके उलटे घडलेय , ९४ साली मिसरुड फुटायच्या वयात दहावीचा (तंत्र शिक्षणसहित) टप्पा ७३% गाठला पण यंत्र-अभियांत्रिकी शाखेतुन (खाजगी तंत्रनिकेतन) कळी (कंडो) सोबत ५२% पास झालो, इथे कमी गुण असण्याचे कारण इंटर्नल गुण नगण्य. कारण प्राध्यापक मंडळींचा आशीर्वाद कधी मिळवू शकलो नाहीं ( शेवटच्या बाकांवर बसल्यामुळे असेल बहुधा) आणि घाबरुन कुणाचे आपल्याला न पटलेले ऐकणे स्वभाव नाहीं.
मित्रगटात ८ पैकी ३ नापास, जे पास ते पदवी मिळवणेस लायक नव्हते (६०% अर्हता) मग तिघांनी पुन:श्च प्रयत्न करायचा म्हणून सर्व विषयांची खाजगी शिकवणी लावली (फी अर्थात् भरमसाठ-तेव्हाच्या हिशोबाने), पण मला या पर्यायाने जायचे म्हटले तर प्रत्येक विषयात ६३ गुण मिळविणे (६०% अर्हता साठी) लेखी परिक्षेत अनिवार्य झाले. घरुन देखील शिकवणी खर्च, वाढीव वर्ष गुंतवणूक, परिणामांची अशाश्वती, पुढे जाऊन जरी अर्हताप्राप्ती झाली तरी फ्री सीट (४००० रु/वर्ष फी) मिळेल की पेड सीट (५६०००/वर्ष फी) असे प्रश्न उपस्थित होते, डबल डिप्लोमा हा पण १ पर्याय समोर आला पण नेमका आमची शेवटची बॅच होती अभ्यासक्रम बदलला, आणि पुन्हा पदविकाच घ्यायची कागद घासुन म्हणून ठरवले की AMIE करायचे, घेतला महालक्ष्मीच्या कार्यालयात जाऊन प्रवेश. ब-याच लोकांनी सल्ला दिला की AMIE धरणी ठाय करुन सोडते पण (अती) आत्मविश्वास बुलंद असल्याने २ विषयांची शिकवणी VJTI येथे लावुन जोडीला अभ्यासिकेत अभ्यास करुन परीक्षा दिली -(VBD शिवायची पहिली परीक्षा) निकाल नापास (बहुतेक तिन्ही विषयात); एकदम ४४० voltage चा झटका, उभ्या १८ वर्षात कधी आपल्याला कुणी नापास करु शकलेले नाहीं (एखादी केटी चालते हो) मग पुनः जोमाने अभ्यास, पण एप्रिल मधल्या परिक्षेत निकाल तोच सर्व (३/६) विषयात नापास. कळुन चुकले की हा उत्तरेतल्या लोकांचा महाराष्ट्रातील मुलांना मागे ठेवण्याचा डाव आहे आणि १ वर्ष व काही हजार रुपये वाया गेले, तोवर धोपट मार्गाने गेलेले ३ पोचले पदवी द्वितीय वर्षात.
आता बरेच सगे सोयरे विचारित पिताश्रीना "तुमचा मुलगा करतो काय? घेऊन या त्याला हाताखाली" मग काय परिणाम रोज घरी दुपारची फोनच्या रिंगने भयप्रद झोपमोड (वर्षभर - अहो किती अभ्यास करायचो मी शिणायचा हो मेंदू) त्यातुन सकाळी उशीरापर्यंत 'पसरायची' मनाई. ऐदी (आयतोबा) विशेषण ऐकूण ऐकूण ठरवले घराबाहेर पडायचे आणि त्वरित देवाने मी नेमका घरी असताना १ फोन वाजला- १ MNC त सर्विस इंजीनियर हवेत , स्वतः या, विचारले माझे नाव कुठे सापडले तर आमच्या विद्यालयातुन असे उत्तर आले. किती जागा आहेत? तर भौत म्हटल्यावर मित्रांना पण बोलवु का असा यडपट प्रश्न केला (सच्चा मित्र) तर तो हो म्हणाला व बायो डेटा घेऊन येणे अशी सुचना केली. तेव्हा संगणकाचे प्रस्थ फार नसल्याने अभ्यासाच्या लांबड्या वहीतुन फाडलेल्ला कागदावर सुवाच्य अक्षरात मित्रांच्या साक्षीने, सहकार्याने ३ जण फोर्टला रवाना. पहातो तर मुलाखतीच्या रांगेत आपले काॅलेजचेच सवंगडी, नोकरी फिरतीची असल्याने आमचा ३ चा नकार, बाकी सवंगड्यांपैकी ४ जण रुजु झाले.
पुन्हा महिन्याभराने (रुजु झालेल्या मित्रांच्या अनुभव ऐकुन तिथेच गेलो २ जण अन् ताबडतोब दुस-या दिवशी केरळला रवानगी. घरी पिता माताजी आश्चर्यात, पण दोघे मित्र सोबत असल्याने अडवले नाहीं.
४ वर्ष २-३-४ महिने कामानिमित्त सलग घराबाहेर राहुन काढली, भारतभ्रमण व अनयासे प्रेक्षणीय स्थळे पहायला मिळाली.
तरीही मनात वाटायचे (मित्र पदवीधारक- यंत्र अभियांत्रिकी) व "प्रेमी" सल्ला व पुढाकाराने IGNOU BCA ला प्रवेश घेतला, कारण प्रियतमाला तमा होती की तिचा पदवी प्रवेश निश्चित झालेला आणि पुढे या शैक्षणिक पात्रतेचा आक्षेप नको होता; ती नोकरी सोडून काम स्थानिक कंपनीत सुरु केले. प्रियतमा पदवीधर (BE-IT) व मी BCA झालो तर परत काय BCA ला कोण भाव देतंय आजकाल तू MBA कर हा सल्लावजा इशारा मिळाला, MH-CET दिली (CAT च्या गळ्यात घंटा बांधायची वेळ तोवर निघुन गेली होती - साधुनही फार काही फरक पडला असता अशातला भाग नाहीं) पूर्व तयारीसाठी शिकवणी, मुलाखतीचा सराव, वेळ लावुन प्रश्न पत्रिका सोडवणे असा सराव (१०वी नंतर प्रथमच) असे करुन नौकरी सोडुन प्रवेश परिक्षेत ४८ हजारांत ५हजाराच्या संख्येत गिनती मिळवली, खुल्या प्रवर्गातुन ६० पैकी ९ जागेत १ महाविद्यालय अशा क्रमाने महाराष्ट्रातल्या कुठल्या कोप-यातलं कॅालेज मिळेल व तिथुन काय शिकणार? तरीही फक्त मुंबई/ठाणे/पनवेल असे मर्यादित पर्याय भरुन पूर्णवेळ MMS ला नेमका ठाणे येथे घराजवळ प्रवेश निश्चित झाला, व मी ९ वर्षा नंतर पुनः शैक्षणिक जीवनात प्रवेश केला.
गंमत अशी की इतर ९०% मुले मला काका म्हणू लागली पण प्रथम सहामाही परिक्षेत ८ पैकी ४ विषयात प्रथम येऊन "काका" चा स्वर आदरात बदलला. त्यातच १ आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत कुठल्याही पूर्व तयारी विना तिथल्या तिथे अजुन २ सवंगडी तयार करुन Marketing Games मध्ये द्वितीय क्रमांक बक्षीस पटकावले•
अशातच पुढील सहामाही आधी १ प्राध्यापकाला भर वर्गात सूचित केले की तुम्हीं शिकवलेले मला समजत नाहीं, त्याने चिडुन विचारले की धडा वाचून आला असतास तर समजले असते, धडा वाचुनही तुम्ही नेमके काय म्हणताय तेच समजत नसल्याने काहीच कळत नाहीं या प्रत्युत्तराने ( त्याची वाईट इंग्लिश बोलण्याची वाईट ढब असल्याने माझा ७-८ महिन्यांचा संयम संपुष्टात आला होता) त्याने पूर्ण वर्गाला विचारले की असे किती विद्यार्थींना समजत नाहीं? २ सोडुन (ते B.com होते) संपूर्ण वर्गाने हात वर केला. झाला ना अपमान, मग काय पुढिल सहामाहीत ३ विषयात् प्रथम येऊन त्या प्राध्यापकाच्या विषयात नापास. साला पुन्हा उत्तर भारतीय xमराठी असा संघर्ष प्रसंग, पुनर्परिक्षाच देणार नव्हतो पण स्वकष्टार्जित पैशाने शिकत असल्याने व मित्रांच्या सबुरीच्या सल्लयाने प्रकरण पुढे न वाढवता दिली परिक्षा कारण हे सर्व महाविद्यालय अंतर्गत असते व विद्यापीठ चा संबंध द्वितीय /अंतिम वर्षात असतो. तर अंतिम वर्षीय परिक्षांतही (मार्केटिंग) निर्भेळ यश संपादन करुन २ विषयांत प्रथम आलो.
आज ७ साल बाद कॅप्टनने आठवणी उजळल्या, धन्यवाद कॅप्टन:
यातून कुणाचे काही। मार्गदर्शन /लाभ झालांच तर आनंद.

पैसा's picture

20 Sep 2015 - 8:09 pm | पैसा

जिद्दीला सलाम!

गॅरी ट्रुमन's picture

20 Sep 2015 - 7:52 pm | गॅरी ट्रुमन

लेख प्रचंड आवडला गेलेला आहे.तुमच्या जिद्दीला सलाम.

ह्यानिमित्ताने मिपावर बाकीचे यंत्राभियंते आहेत त्यांनीही त्यांचे अनुभव इथे प्रतिक्रियांमध्ये मांडावेत अशी मी आग्रहाची मागणी करतो.

यात माझे नावही लिहिले आहेत. माझ्याकडे लिहिण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण मी पडलो एक अत्यंत बत्थड इंजिनिअर. त्यामुळे या लेखात मी काही लिहिणे म्हणजे आकाशगंगेतील ग्रहगोलांपुढे एखाद्या ४० वॉटच्या पिवळट बल्बने हजेरी लावण्याप्रमाणे होईल :)

तरीही या निमित्ताने एक गोष्ट नक्कीच लिहावीशी वाटते. थ्री इडियट्समध्ये म्हटल्याप्रमाणे-- "Follow your passion आणि मग यश झक मारत तुमच्यामागे येईल" तेव्हा इंजिनिअरींगची (किंवा इतर कुठल्याही गोष्टीची) सक्ती करणे counterproductive होईल हे भारतातील घराघरांमध्ये समजून येईल तो दिवस अगदी प्लॅटिनमच्या अक्षरात लिहून ठेवण्याच्या योग्यतेचा असेल.

हा अत्यंत प्रेरणादायी लेख लिहिल्याबद्दल शतश: आभार.

वेल्लाभट's picture

21 Sep 2015 - 3:05 pm | वेल्लाभट

इंजिनिअरींगची (किंवा इतर कुठल्याही गोष्टीची) सक्ती करणे counterproductive होईल हे भारतातील घराघरांमध्ये समजून येईल तो दिवस अगदी प्लॅटिनमच्या अक्षरात लिहून ठेवण्याच्या योग्यतेचा असेल.

कसलं बोललायत !
येक्क नंबर !

नाखु's picture

21 Sep 2015 - 9:14 am | नाखु

कष्टप्रद धडपडीतून खेचून आणलेले यश प्रखर आत्मविश्वास वाढविण्यास कारणीभूत होतं. अभिनंदन.
पेठकर काकांचे शब्द उधारी घेऊन.

अत्यंत प्रेरणादायी लेख लिहिल्याबद्दल शतश: आभार.

"चिमण हटेला" हे नाव सार्थ केल्याबद्दल आप्ल्याकडून "मस्तानी" लागू.

स्वगतः या चिमण्याला भेटल्यावर हा लेख टाकल्याबद्दल पार्टी मागावी का द्यावी लागेल या विचारानेच लोच्या झालेला.
नाखुस

बाळ सप्रे's picture

21 Sep 2015 - 11:44 am | बाळ सप्रे

छान लेख !! शैक्षणिक वर्षे डोळ्यासमोर उभी केलीत. कष्टातून मिळालेले यश नेहेमीच जास्त आत्मविश्वास वाढवते. अभिनंदन.

नीलमोहर's picture

21 Sep 2015 - 12:17 pm | नीलमोहर

प्रेरणादायी लेख..

विजुभाऊ's picture

21 Sep 2015 - 2:35 pm | विजुभाऊ

कॅप्टन भौ. सॅल्यूट.
मस्त ल्हिलेयेस.
आम्ही आवड वगैरे नस्ताना आईबापाच्या आग्रवावरुन डिप्लोमा केला. पहिल्या वर्षापासूनच मास्तर लोकांचं आणि आमचं वावडं. कोलेजात असण्यापेक्षा इतर कॉलेजातील पोरांची नाटके बसव यूथ फेस्टिव्हल कर असले धंदेच जास्त्.परिणाम दुसर्‍या वर्षात प्रॅक्टीकल्स मधे फेल. बोर्डाचा नियम बदलला म्हणून केटी लागली आणि वर्ष वाचले. मी तिसर्‍या वर्षात गेल्यावर एच ओ डी तोंडावर म्हणाले आम्ही खूप प्रयत्न केले तुला मागे ठेवायचा पण आमचे नशीब तितके चांगले दिसत नाही.

सानिकास्वप्निल's picture

21 Sep 2015 - 2:39 pm | सानिकास्वप्निल

लेख खूपचं आवडला आहे, तुमच्या जिद्दीला हॅट्स ऑफ!!

वेल्लाभट's picture

21 Sep 2015 - 3:00 pm | वेल्लाभट

एक टेक्निकली एक्सलंट प्रवास वाचायला मिळाला...
कमाल आहे तुमची ! सहीये राव....

अवांतरः
ब्लू च्या वन लव ची ओळ चटकन भुवई उंचावून गेली.
अ लेख इन मिपा गणेश लेखमाला इज वन स्टेप क्लोजर टू बींग एलीट

शंतनु _०३१'s picture

21 Sep 2015 - 3:43 pm | शंतनु _०३१

परिक्षेत (मार्कात कमी पडलेल्यांना) अथवा शिक्षणासंबंधी पुढील निर्णय घेऊ न शकणा-यांना हे प्रेरणादायक सुगंधी लेखपुष्प नक्कीच वाचायला देणार आहे.

खरोखर खुपच कष्ट घेतले आहेत. पुढील योजनांसाठी हार्दीक शुभेच्छा !

थर्ड रँक इन युनिव्हर्सिटी ऑफ पुणे

_/\__/\__/\_
प्रेरणादायी लेख
कॉलेजचे नाव काय? (व्यनि केले तरी चालेल)

बॅटमॅन's picture

21 Sep 2015 - 5:15 pm | बॅटमॅन

कॅप्टनसाहेबांना एक कडक सॅल्यूट.

बाकी आम्ही डिग्रीपुर्ते इंजिनिअर आहोत. ते झेपत नै हे लक्षात आल्यावर लाईनच बदलली, डोक्याला ताप नगो उगी.

समीरसूर's picture

21 Sep 2015 - 5:44 pm | समीरसूर

मस्त! अनुभवकथन आवडले. अजून येऊ द्या. :-)

मास्तरकीच्या नोकरीला हिणवणार्या लोकांच्या बुद्धिमत्तेची कीव करावी तितकी कमी. अतिशय जबाबदारीचे आणि महत्वाचे असे ते क्षेत्र आहे. जिथे शिक्षकांना मान मिळत नाही तिथे शिक्षणक्षेत्रात आनंदीआनंदच असणार.

नाखु's picture

22 Sep 2015 - 9:13 am | नाखु

दोन्ही बाबत तंतोतंत.

मागे करीयर मार्गदर्शन सारख्या लेखमालेची गरज होती तशी तुझ्याकडून ही काय करावे आणि काय करू नये हे या लेखातून कळले.

आणि अनुभव सिद्ध असल्याने जास्त भिडले.

पुन्हा कडक सलाम

नाखु

सूड's picture

21 Sep 2015 - 6:24 pm | सूड

सुंदर लिहीलंय !! लेखमालेशिवायदेखील लिहीत राहा.

अप्रतिम.. लैच भारी प्रवास.

या सगळ्या जंजाळातून गेल्याने खुप जवळचा वाटला लेख. आयटी ची असुनही कायम मेक च्या पोरांसोबत कँटीन मध्ये पडीक असायचे. त्यामुळे हे सगळं पाहिलंय.

डिप्लोमा करुन डिग्रीला आलेल्यांचा यम३ खरंच अंत पाहतो.
मी डिग्रीच्या सेकंड इयर फर्स्ट सेम ला एक प्रॅक्टिकल राहिलं म्हणून ढसाढसा रडलेले. लगेच सेकंड सेम ला यम३ राहिल्यावर खदाखदा हसत सुटलेले. मग माझ्या मेक च्या दोस्त लोकांच्या कृपेने निघाला यम३ तेव्हा सरोवर ला पहिलीच मोठी पार्टी केलेली ३५० रुपयांत. जाम खुश झालेले.

पण काही म्हणा, मेक ची पोरं असतात लै टॅलेंटेड.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Sep 2015 - 12:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

काही म्हणा, मेक ची पोरं असतात लै टॅलेंटेड.

लाजुन लाल झाल्याची स्मायली कल्पावी =))

वर्साटाईल :)

अन्या दातार's picture

22 Sep 2015 - 2:23 pm | अन्या दातार

आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या पोरी लैच नखरेबाज असतात ;)

पिंगू's picture

22 Sep 2015 - 3:09 pm | पिंगू

+१ लईच सहमत..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Sep 2015 - 3:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अण्भव णाही. आपला असल्यास व्यनि मधे शेअरणे =))

कोमल's picture

22 Sep 2015 - 3:25 pm | कोमल

ही ही ही.
+१००१

पण यांनाच लै भाव मिळतो कालिजात राव..

मधुरा देशपांडे's picture

22 Sep 2015 - 2:16 pm | मधुरा देशपांडे

काय अफाट प्रवास आहे हा. फार आवडला लेख.

खूप प्रेरणादायक आहे.

मीही एकदा असेच कंपनीतल्या एकाच्या कुत्सित कॉमेंटने पेटून वयाच्या ४५ व्या वर्षी मेकॅनिकलचा डीप्लोमा केला.

एस's picture

22 Sep 2015 - 4:28 pm | एस

वा! क्या बात है!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Sep 2015 - 12:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लेख येउंद्या. :) आणि चित्रही :)!
!

जबरदस्त अनुभव-कथन, चिमणराव....