कास्टीझम

कोमल's picture
कोमल in जनातलं, मनातलं
6 Sep 2015 - 3:07 pm

त्यादिवशी कॅफेटेरिया मधल्या सगळ्यांचे डोळे टीवी कडे होते.
पटेल रॅली मुळे पेटलेला गुजरात सगळे भेदरलेल्या नजरेने पाहत होते.

"का चालू झालंय हे सगळ पण?" तिने त्यांच्या टेबल वर विषय सुरु केला.

"अरे पटेल कास्ट साठी आरक्षण पाहिजे म्हणे. तो म्हणतोय कि त्यांना द्या किंवा कोणालाच नको" त्याने माहिती पुरवली.

"आणि त्याच्या साठी संपूर्ण गुजरातेत जाळपोळ सुरु झालीये" QA वाला म्हणाला.

"कोणाचं काय जातंय तोडफोड केली आणि जाळपोळ केली तरी. भुर्दंड सरकारी तिजोरीला पडणारे आणि पर्यायाने आमच्या खिशाला. बर आठवलं टॅक्स रिटर्न फाईल करायचा आहे. आत्ता जाऊन करतो." TL उठला पाठोपाठ टीम पण उठली.

डस्ट बिन मध्ये रिकामा कॉफी मग टाकता टाकता ती म्हणाली, "डेमोलीशिंग कास्टीझम"

"धिस इज शिट मॅन" टीम मधल्या डिझायनर चा hangout वर पिंग आला.
लगेचच एक लिंक पण पाठवली.
"Another honor killing in Bihar."

पिंकी आणि मनोजला किती अमानुष पद्धतीने त्यांच्याच घरातल्यांनी मारून टाकलं याच इत्यंभूत वर्णन होत त्यात.

वाचून सुन्न झालेल्या तिने एक सुस्कारा सोडला आणि hangout वर टाकलं, "ब्लडी कास्टीझम"

"हे आपलं शेवटचं हम्म"

"म्हणजे?" तिने चमकून विचारलं

"म्हणजे आताच लास्ट टाइम. याच्यानंतर हे बंद."

"अरे पण का?"

"हे जर असंच चालू राहिलं ना तर मी तरी इन्व्हॉल्व होईन तुझ्यात किंवा तू तरी होशील."

"पण आपलं ठरलेलं न रे कि इमोशनली अटॅच नाही व्हायचं म्हणून."

"हो गं, म्हणूनच मी म्हणतोय की आता आपण थांबवूया नाहीतर मी सिरियस होईन तुझ्यात."

लोडाला रेलून बसलेल्या त्याला ती बिलगली आणि हसून म्हणाली,
"सो यु थिंक आय एम दॅट मच इम्प्रेसिव ह्म्न?"

"हम्म तसं नाही काही पण आता हे नकोच."

"ओके. म्हणजे आता फ्रेंड्स विथ बेनिफिट्स मधून बेनिफिट्स काढून टाकायचं तर… कि फ्रेंड्स पण काढायचं?"

"अजिबात नाही, आपण फ्रेंड्स होतो, आहोत आणि कायम राहू. म्हणजे माझ्याकडून तरी असं आहे आता तू सांग तुला काय वाटत?"

"यु नो ना, आय एम अफ्रेड ऑफ लूसिंग पिपल. आपण जर तसेच फ्रेंड्स राहणार असू कायम, तसाच दंगा करणार असू, टीम मिटींग्स मध्ये एकमेकांवर लाईन मारणार असू, आणि माझ्यासोबत रडायला आणि सिगरेट शेयर करायला तू असशील तर आय एम फाईन विथ दॅट"

"खरं सांगू का गं, मला ना तुझी सवय झाली आहे. दर विकेंड ला तुझ्या हातचं मस्त जेवण करायचं, जिभेचे चोचले पुरवायचे, तुझ्याकडून 'लाड' करून घ्यायचे " बोलतांना पण हाताचे कोट्स करून तो म्हणाला, "पण आता रिलेशनशिप वगैरे च्या भानगडीत नाही पडायचं. लग्न करून सेटल व्हायचं."

"मग आपण करूया की लग्न. काय जाणारे? प्रेम-बिम नाही, रिलेशनशिप नाही, डायरेक्ट लग्न. what say?"

"तू काय प्रेमात बिमात पडलीयेस कि काय माझ्या?" तिला कुरवाळत त्याने विचारले.

"प्रेमात आणि तुझ्या? हट.." एका क्षणिक पॉज नंतर ती म्हणली, "हा म्हणजे तुझ्या चॉकलेटस् ची सवय मला पण झालीये, बट नो प्रेम यार कमॉन."

"मग?"

"मग काय, we are compatible, independent, mature. वी कुड बी अ गुड कपल यु नो."

तिला आणखी जवळ ओढत तो म्हणाला, "मला तुझ्यासोबत आत्ता ट्वेंटी क्वेशन खेळायचे नाहीयेत. लेट मी डू द लास्ट सपर", त्याने तिच्या टि शर्ट मध्ये हात घालून ब्रा चा हुक काढला.

तासाभराच्या शांततेनंतर तो म्हणाला, "मी कोणीतरी माझ्या कास्ट मधली पाहीन, तू तुझ्या कास्ट मधला शोध."

"धिस फकिंग कास्टीझम" ती पुटपुटली.

मुक्तकसमाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

6 Sep 2015 - 3:31 pm | प्यारे१

लेख आवडला.
(दोन वेळा लेखकाचं नाव वर जाऊन बघितलं म्हणा!)
माणसाची मस्ती करायची, भांडायची, नडायची, राडा करायची वृत्ती हे मूळ कारण या सगळ्यामागं आहे. अन्यथा एका घरातल्या दोघांनी एकमेकांची समान वाटणी नि समान सत्ता असता भांडणाची वेळ आली नसती.
काहीतरी कुरापत काढायची नि एकमेकांशी झटत बसायचं ही आदिम वृत्ती आहे.

कास्टीझम नसतं तर दुसरं काही असतं.

कास्टीजम तर ओब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम्मिन्ग मधेही असते :( आयुष्यातुन हद्दप्पार केंव्हा होणार ? समान शिलमं व्यसनेशु सख्यम हे कास्टीजमच आहे... कंपुबाजी कस्स्टीजम आहे.. अन देशाभिमानही. कॉनाचाच कास्टीजमचा फार विरोध नसतो कारण माणुस हा समुह्प्रिय प्राणीच आहे विरोध अनादीकाळापासुन क्ल्पांता पर्यंत असेल तो कास्टाधारीत भौतिक, अलौकिक बेनीफिट्सना...धिस फकिन कास्टीजम...

द-बाहुबली's picture

6 Sep 2015 - 4:16 pm | द-बाहुबली

पण माणसाच्या सुखासिनतेच्या कक्षा जशा रुंदावत आहेत तसे हे कास्टीजम कात मात्र नक्किच टाकेल पण कधी नष्ट होइल काय हे सांगणे अवघड.

खटपट्या's picture

6 Sep 2015 - 4:22 pm | खटपट्या

आवडला...

जव्हेरगंज's picture

6 Sep 2015 - 4:38 pm | जव्हेरगंज

ज्वलंत लेख आवडला.

हम्म. आहे ज्वलंत लेखन खरे.
बाकी 'द लास्ट सपर' चा उल्लेख भिडला. हात मॅग्दालेनकडेच निर्देश करतोय वाटले.
धिस फकिन कास्टिझम.

प्यारे१'s picture

6 Sep 2015 - 5:27 pm | प्यारे१

>>> मॅग्दालेन

काय रे हे? समजलं नाही खरंच.

प्रचेतस's picture

6 Sep 2015 - 5:36 pm | प्रचेतस

दा विंची कोड

प्यारे१'s picture

6 Sep 2015 - 5:38 pm | प्यारे१

आभार्स.
एकदम आकाशातल्या बापाच्या उंचीवर गेला अभ्या.
ये खाली आता.

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Sep 2015 - 5:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

भैयाजी , उ मैरी मॅगडेलन का बारे में बोलत बा,
डैनवा ब्राउन कहताऔ के मेरिया ईसा की पत्नी बा.

प्यारे१'s picture

6 Sep 2015 - 5:42 pm | प्यारे१

बहुत धन्नबाद बापुसाब.
हमार दिल कहत रहा ससुरा को लटकाना पडईल. लडका लोग को बुला लै का? ;)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Sep 2015 - 8:39 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

छान लेख हो कोमले.तुमचे ते QA,TL काय असते कळले नाही.तुमच्या त्या जावा,लिस्प प्रोग्रॅमिंगमध्ये अतिशय पारंगत झाल्यावर TL बनता येते असे ऐकले आहे.

काळा पहाड's picture

6 Sep 2015 - 10:38 pm | काळा पहाड

माई, सध्या कुणालाही TL सोडाच, PL सुद्धा बनायचं नसतं. एकदम PM व्हायचं असतं. बाकी DM आणि DPE बनायचं तर तिथेही स्पर्धा आहेच आणि मुख्य म्हणजे PS आणि PMO ची मंजुरी पाहिजे. EA, BA, IA साठी बराच अभ्यास करावा लागतो. शिवाय तुमचं कामही KPA बरहुकुम झालं पाहिजे. COE, COC साठीही मारामारी असतेच. तेव्हा या सगळ्या भानगडीत न पडता ADM किंवा AMS मध्ये SC, LC, EC किंवा PC बनून राहिलेलं काय वाईट? काय म्हणतेस?

कोमल's picture

7 Sep 2015 - 8:11 am | कोमल

लोल्स... अगदी अगदी
माई, तुम्ही कोणत्या हाणामारी उतरताय मग आता?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Sep 2015 - 12:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तेव्हा या सगळ्या भानगडीत न पडता ADM किंवा AMS मध्ये SC, LC, EC किंवा PC बनून राहिलेलं काय वाईट?

हे काय रे बाबा पहाडा? केर्निंगन्,रिची,गॉस्लिंगसारखे येथेही कुलकर्णी,राणे,गोखले विविध संगणकीय प्रणाली शोधून काढतील अशी आमची अपेक्षा होती.तुमच्या त्या संगणकीय भाषांमध्ये कास्टिंग नावाचा एक प्रकार आहे असे वाचले होते.सुरुवातीला त्यावरच चर्चा आहे की काय असे वाटले होते हो.

Hrushikesh Marathe's picture

7 Sep 2015 - 12:24 am | Hrushikesh Marathe

I saw these kind of things happened due to Castes! Bullshit..

पद्मावति's picture

7 Sep 2015 - 11:08 am | पद्मावति

मस्तं.
तुमची लेखनशैली आवडली.

कोमल's picture

7 Sep 2015 - 11:35 am | कोमल

सगळ्यांचे धन्यवाद _/\_

एस's picture

7 Sep 2015 - 12:33 pm | एस

"धिस फकिंग कास्टिझम..!"

याउपर काय म्हणणार? कथा किमान शब्दांत बरंच मोठं भाष्य करून गेली.

मोजक्या शब्दात बरंच काही!!

नाव आडनाव's picture

7 Sep 2015 - 2:51 pm | नाव आडनाव

+१

प्रसाद गोडबोले's picture

7 Sep 2015 - 3:06 pm | प्रसाद गोडबोले

अप्रतिम कथा !

खुपच छान !!

--
कास्टीझमचा वाईट अनुभव असलेला
प्रगो

पैसा's picture

7 Sep 2015 - 3:55 pm | पैसा

विषय आवडला. पण आताचे आयटीत काम करणारे फक्त क्रियापदे मराठी वापरतात का असा एक अवांतर विचार डोक्यात आला.

कास्टीझम ओ. दुसरं काही नाही. ;)

पैसा's picture

7 Sep 2015 - 4:20 pm | पैसा

आयटीवाले आणि इतर असंय का ते!

अभ्या..'s picture

7 Sep 2015 - 4:26 pm | अभ्या..

मक्कायतर.
नुसत्या जाती अन पोटजातीवर थोडेच थांबतोय आपण.

कोमल's picture

7 Sep 2015 - 4:50 pm | कोमल

:))
मलाही आताच "क्लिक" झालं हे!

प्यारे१'s picture

7 Sep 2015 - 4:52 pm | प्यारे१

बहुतांश 'क्रिया' भाषांच्या पलिकडं असल्यानं तशीच 'पदं' वळत असतील.

gogglya's picture

7 Sep 2015 - 4:00 pm | gogglya

निदान २ -३ पिढ्या तरी जाव्या लागतील 'कास्टीझम'चे पुर्णपणे निर्मुलन व्हायला. कदाचीत जास्तच!

गेल्या जवळपास चारपाच हजार वर्षांपासून जातपात अस्तित्त्वात आहे. अजून दोनेक हजार वर्षेतरी जातिप्रथेचे समूळ उच्चाटन होणार नाही.

जाती आणि वर्णांची नावं बदलतील. उच्चाटन होणार नाही, अनैसर्गिक आहे ते.

जातिभेदाचे उच्चाटन होण्यात सर्वात मोठा अडथळा हा जातींची उतरंड आहे. इथे कुठल्याच दोन जाती एकमेकांच्या बरोबरीच्या नाहीत. त्यामुळे आंतरजातीय विवाह जरी मोठ्या प्रमाणावर झाले तरी जाती संपुष्टात येण्यास बराच कालखंड जावा लागेल.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

7 Sep 2015 - 4:41 pm | फुलथ्रॉटल जिनियस

सरकारने एका जातीत विवाह करण्याला बंदी घालावी ,तरच जातव्यवस्था मोडेल ,भारतीय समाज स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणू शकत नाही.
उच्चवर्णिय व मागास असा विवाह करणार्यांना प्रचंड सुविधा द्याव्यात .आडनाव लावण्याला बंदी करावी ,त्याएवजी वडिलांचे व आइचे नाव एकत्र लावावे

नाखु's picture

7 Sep 2015 - 4:53 pm | नाखु

कारण जन्मदाखल्यापासून ते मृत्युदाखल्यापर्यंत (व्हाया शाळा-महाविद्यालय ई) वर जात असतेच सरकारी नोंदच ती जाणार थोडीच. राहिला प्रश्न आई-वडीलांच्या नावाचा त्याचेबान्बत आप्ला पास.

ब्दुल
नारायण
डिसूझा.
नाखु (मग धर्मावर आरक्षण मागीतले जाईल त्याचे काय?)

त्या संकरांच्या नवीन जाती बनतील. नवे ट्रेन्ड निर्माण होतील.

उदाहरणार्थः एका जातीत नाही ना लग्न करायचं मग ही एक जात घ्या आणि दुसरी एक जात घ्या. त्याच दोन जाती एकमेकात लग्न करतील. आडनाव बंदी ना? घ्या एक दोन आकडे. वडलांचं नाव आईचं नाव असं ठेवा कि त्यातून काही संदेश जाईल.

किडा माणसाच्या डोक्यात असतो. नावात नाही.

काळा पहाड's picture

7 Sep 2015 - 7:01 pm | काळा पहाड

बंदी घालावी? मोगलाई आहे का? आणि आहे माझं मत की मला दुसर्‍या जातीवाल्यांशी संबंध नाही ठेवायचे. मग? सरकार जशी जातीमध्येच लग्न करा म्हणून सक्ती करू शकत नाही तसंच जातीबाहेरच लग्न करा म्हणून सुद्धा सक्ती करू शकत नाही.

बाय द वे, मग आरक्षण पाहिजे त्याचं काय करणार? आडनाव लावल्याशिवाय कळणार कसं?

(संपादित)

इतका विखारी प्रतिसाद?

फुल्थ्रॉटल साहेबांचा प्रतिसाद पाहिला की असंच लिहावंसं वाटतं. जात ही एक फॅक्ट आहे आणि ती मी निर्माण केलेली नाहीये. मला त्याचा फायदा नाहीच, पण दरवाजे आरक्षणामुळेच बंद झालेले असल्यामुळे आणि प्रत्येक संधीसाठी झगडावं लागल्यामुळे जात सोडण्याचा सुद्धा मला काहीच फायदा नाहीये. माझ्या अनुभवानुसार प्रत्येक जात दुसर्‍या जातीवर कुरघोडी आणि द्वेष करत असल्यामुळे आणि प्रत्येक (तथाकथित) खालच्या जातींचं लक्ष्य (तथाकथित) वरच्या जाती असल्यामुळे मी तो द्वेष सुद्धा सहन केलेला आहे. तेव्हा आता मला गरज नसताना मी जात का सोडावी? मला या (तथाकथित) जातनिर्मूलन वाल्यांची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या लोभी प्रवृत्तीची पूर्ण जाणीव आहे. तेव्हा जातनिर्मूलन प्रकारात जर कोणाला आदर्शवाद दिसत असेल तर माझ्या मते तो मूर्ख आणि पायावर कुर्‍हाड मारून घेणारा प्रकार आहे. आंतरजातीय प्रकारात (तथाकथित) वरिष्ठ जातीच्या स्त्रीला (तथाकथित) कनिष्ठ जातीच्या सासरचे जातीवरून कसे त्रास देतात याची उदाहरणे मी पाहिलेली आहेत. मला बाकीच्या जातींशी देणं घेणं नाही आणि त्यांच्या जागी त्या सुखी असाव्यात असं मला वाटतं. जेव्हा जातनिर्मूलन होईल ते होईल पण उगीच बळजबरीने कुणी बाकीच्या जातींवर हल्ला करत असेल तर प्रतिकार तितकाच विखारी असेल.

चैतन्यमय's picture

7 Sep 2015 - 7:25 pm | चैतन्यमय

बाकी लेख उत्तम पण तो "ब्रा" चा उल्लेख अनावश्यक वाटला.

प्यारे१'s picture

7 Sep 2015 - 7:28 pm | प्यारे१

काढून टाका ओ..... डोक्यातून हा विषय.

म्हण पाहिजे होती का एखादी?

प्यारे१'s picture

7 Sep 2015 - 8:01 pm | प्यारे१

काय म्हणून म्हणाला?

ब्राम्हण म्हणायचे आहे त्याला. कास्टिझम न

प्यारे१'s picture

7 Sep 2015 - 8:42 pm | प्यारे१

शिट धिस फ*न कास्टीझम.

आता हा 'फ' शब्द आलाच आहे तर एक विनोद. नको तिथं हा शब्द वापरल्यास काय घडतं ते.
अर्थातच फॉरवर्ड (आम्ही नाही, विनोद)
एका गुडघ्याला प्लास्टर लावलेल्या पोराला त्याचा मित्र मदत करायला जातो.
त्याची चप्पल आणायला वर जातो.
वर प्लास्टरवाल्याच्या दोन बहिणींना बघून हा येडा. याला आयडिया सुचते आणि म्हणतो मी तुमच्या भावाला विचारलंय त्यानं तुम्हा दोघींनाही घोळात घेण्याची परवानगी दिली आहे. पोरी आश्चर्यचकीत. कन्फर्म करायला म्हणून तो मित्राला ओरडून विचारतो, काय रे दोन्ही ना?
खालून मित्र वैतागून .... हो रे बाबा, whats the use of f***ing one????

कदाचित ब्राह्मण म्हणायचं असावं!! सो मच कास्टिझम यु नो!!

समीरसूर's picture

8 Sep 2015 - 11:53 am | समीरसूर

आवडलं!

वेल्लाभट's picture

8 Sep 2015 - 12:11 pm | वेल्लाभट

वन ऑफ माय फेवरेट हॉलिवूड मूव्हीज - क्रॅश
कुणी बघितलाय का?

द-बाहुबली's picture

8 Sep 2015 - 12:23 pm | द-बाहुबली

य्स. मि पाहिला आहे.

वेल्लाभट's picture

8 Sep 2015 - 2:19 pm | वेल्लाभट

एक्सलंट मूव्ही दॅट स्पीक्स अबाउट रेशिअल प्रेजुडिस अँड प्रीकन्सीव्ह्ड नोशन्स

वॉच लिस्ट मध्ये अ‍ॅडवला आहे. विकांताला बघेन

वेल्लाभट's picture

8 Sep 2015 - 2:33 pm | वेल्लाभट

व्हेरी गुड. ऑस्कर विनर आहे.