चाहुल

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
3 Sep 2015 - 11:41 am

चाहुल-
डोळ्यांत श्रुंगार भरताना,
सौभाग्याचं लेणं लेताना,
भरजरी शालू
सैरभर नजर
हिरवा चुडा
जरीचा पदर
फुललेला
तिथेच असेल कुठेतरी मी
नि:शब्द आणि गहिवरलेला...
.
.
उत्फुल्लं-
भरत्या सागरास पाहताना,
आहोटिला चंद्र वाहताना,
चमचम मोती
अवखळ किनारा
भरली मासोळी
वादळी वारा
सुटलेला.
तिथेच असेल कुठेतरी मी
तुझ्याच प्रितीत रमलेला...
.
.
भणंग-
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलताना,
मागे वळून पाहताना,
पहाटेचा सडा
बाभळीच झाडं
उजाड माळरान
पाण्याचा माठ
भरलेला.
तिथेच असेन मी कुठेतरी,
तुझ्याचसाठी हरवलेला...

मुक्त कविताकवितामुक्तक

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

5 Sep 2015 - 11:54 pm | एक एकटा एकटाच

छान आहे.

जव्हेरगंज's picture

6 Sep 2015 - 12:19 am | जव्हेरगंज

:-)

पद्मावति's picture

6 Sep 2015 - 1:01 am | पद्मावति

सुरेख! खुप आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2015 - 5:00 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर आहे!

फक्त, 'असेल' च्या ऐवजी 'असेन' हा शब्द हवा होता.

जव्हेरगंज's picture

6 Sep 2015 - 6:51 am | जव्हेरगंज

हो बरोबर..
'असेन' पाहिजे होतं पहिल्या दोन कडव्यांतही. अनवधाने झालं बहुतेक.

प्राची अश्विनी's picture

6 Sep 2015 - 7:07 am | प्राची अश्विनी

वा ! सुंदर!!!!

एस's picture

6 Sep 2015 - 12:19 pm | एस

छान आहे.