बंधन बँक

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
4 Sep 2015 - 11:37 am

परवा एक फार रंजक बातमी वाचली. एकीकडे बँकांच्या विलिनीकरणाच्या गोष्टी कानावर येत असताना एक नवीन बँक म्हणे चालू होते आहे. नाव वाचून अडखळलोच. 'बंधन बँक'. बंधन?? पुन्हा नीट वाचलं. हो, बंधन बँक असंच नाव आहे त्या बँकेचं.

अनेक प्रश्न मनात उपस्थित झाले. मी अनेक तर्क करू लागलो.

- बहुदा या बँकेत एकता कपूर, करण जोहर किंवा अशा हस्तींचा स्टेक असावा. कारण बंधन वगैरे असं नाव बँकेसाठी यांनाच सुचू शकतं.
- इतर बँकेत केवायसी म्हणजेच नो युअर कस्टमर असतं. इथे एलवायसी - लव्ह युअर कस्टमर किंवा बीवायसी - ब्लेस युअर कस्टमर किंवा टीवायसी - ट्रस्ट युअर कस्टमर वगैरे असेल का?
- बँक कर्मचा-यांना महिला असल्यास भरजरी साड्या, पुरुष असल्यास सुरवार-झब्बा असा गणवेश असेल का?
- बँकेत चपला काढून, पाय धुवून जावं लागेल का?
- बँकेत येणा-या प्रत्येकाचं गंध, कुंकू लावून स्वागत होईल का?
- ठेवी कशा असतील?... बंधन ठेव (आजन्म), संस्कार ठेव (बालके व किशोरवयीन मुलांकरिता), विश्वास ठेव (ज्येष्ठ नागरिकांसाठी), सिंदूर ठेव (स्त्रीयांसाठी), मोहब्बत ठेव (जोडप्यांसाठी)
- नवीन खाते उघडल्यावर खातेदाराचं औक्षण वगैरे केलं जाईल का? की बंधन तावीज वगैरे बांधलं जाईल?
- कर्जांवर व्याज आकारलं जाईल का? की 'अपनोंसे थोडी ना ब्याज लेंगे'...' असं बँकेचं भावनिक धोरण असेल? का परतफेडीचीही अट नसेल?
- इथल्या ब्रँच मॅनेजर ला ब्रँच बाबुजी किंवा ब्रँच माताजी किंवा असं काही म्हणतील का?
- 'ये बँक नही, ये एक परिवार है' असं यांचं मिशन स्टेटमेंट / स्लोगन असेल का?

काहीही म्हणा, हे नाव वाचल्यापासून माझं खूप कल्पनारंजन चालू आहे. बंधन बँक.... मस्त आहे. भविष्यात, संस्कृती पतपेढी, परंपरा विमा कंपनी अशा संस्था निर्माण होताना बघण्याच्या तयारीत आहे.

ब्लॉग दुवा हा

विनोदसमाजमौजमजाविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

खाते उघडल्यावर एक सुंदर महीला कर्मचारी आपल्या हातावर राखी बांधेल. (घ्या हेच ते बंधन)

आदूबाळ's picture

4 Sep 2015 - 12:44 pm | आदूबाळ

आणि पार्श्वसंगीत वाजेल

"ये बंधन तोssss, बँक का बंधन हैsss, जन्मों का ये संगम है..."

बंधन बँकची चंदन योजना : अंत्येष्टीसाठी ब्रिज लोन्स

खटपट्या's picture

4 Sep 2015 - 1:09 pm | खटपट्या

लोल

नाव आडनाव's picture

4 Sep 2015 - 1:15 pm | नाव आडनाव

"ये बंधन तोssss, बँक का बंधन हैsss, जन्मों का ये संगम है..."

मस्तं. मलापण वाटलं होतं हेच गाणं असणार 'बंधन' बँकेसाठी. मॅग्जिमम तुपट चेहरे करून बँकेचे कष्टंबर एकमेकाकडे बघून हे गाणं गात आहेत अशी बँकेची जाहिरात एकदम पर्फेक्ट होइल.

शेवटी वाक्य - एकशे पंचवीस वर्षांची परंपरा. कोण जातंय खरं-खोटं करायला. सगळे लिहितात आपण पण लिहा :)

वेल्लाभट's picture

4 Sep 2015 - 2:24 pm | वेल्लाभट

कडक !

गाणं राहिलंच यार !

उगा काहितरीच's picture

5 Sep 2015 - 1:37 am | उगा काहितरीच

मॅग्जिमम तुपट चेहरे

लोल!

हेमंत लाटकर's picture

9 Sep 2015 - 5:11 pm | हेमंत लाटकर

"ये बंधन तोssss, बँक का बंधन हैsss, जन्मों का ये संगम है..."

बहुत खुब

बोका-ए-आझम's picture

4 Sep 2015 - 1:30 pm | बोका-ए-आझम

काढल्यावर कस्टमरची आरती आणि दर करवा चौथला सगळा स्टाफ उपास करणार. दिवसभर. आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर कस्टमरचा चेहरा त्या चाळणीत बघणार - असे काहीच्या काही दिसायला लागले.

माम्लेदारचा पन्खा's picture

4 Sep 2015 - 1:40 pm | माम्लेदारचा पन्खा

तसंच बंधन बँक म्हणजे मालिक जो बोलेंगे वही हम करेंगे.....

अमृत's picture

4 Sep 2015 - 2:17 pm | अमृत

रिजर्व बँकेनी बंधन व अजुन एका समुहाला बँकिंग परवाना बहाल केला. बंधन हे नाव मायक्रो फायनांसिंगमधे सर्वशृत आहे. बाकी नाव म्हणाल तर खरच मनोरंजक आहे.

तटी. - शामराव विठ्हल,रत्नाकर,शिवाजी भोसले इ. इ.बँकांची नावं तुमच्या वाचण्यात आलीत काय? :-)

वेल्लाभट's picture

4 Sep 2015 - 2:23 pm | वेल्लाभट

आलीयत तर !

पण त्यात बंधन ची चमक नाय...

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2015 - 4:00 pm | कैलासवासी सोन्याबापु

रत्नाकर बँक ही भारतातली पहिली प्राइवेट बँक असावी (हे कन्फर्म नाही) स्थापना १९४३ कोल्हापुरात, तसेच मिडसाइज़ सेक्शन मधली भारतातली बेस्ट बँक म्हणुन पारितोषिक प्राप्त बँक आहे तसेच दीड २ वर्षापुर्वी त्यांनी रॉयल बँक ऑफ़ स्कॉटलैंड उर्फ़ आरबीएस ह्या नावाजलेल्या परदेशी बँक चा बिज़नस बँकिंग, क्रेडिट कार्ड्स अन अजुन कुठल्यातरी एका हेड अंडर चा 'इंडिया बिज़नस ऑपरेशन्स' विकत घेतला आहे

तुमची शेवटची माहिती अगदी कमालीच्या बाहेर स्पेसिफिक असल्याने सुरुवातीचं स्टेटमेंट फारच कॉन्ट्रास्टींग झालंय...

सुरुवातीला सगळ्याच बँका प्रायवेट होत्या हो बापूसाहेब. सरकारीकरण झालं स्वातंत्र्यानंतर - मोठ्या बँका त्यात सरकारने आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी आपल्याकडे घेतल्या. अगदी स्टेट बँक जी अगोदर इंपिरीयल बँक ऑफ इंडिया होती तीसुद्धा १९५५ मध्ये सरकारने घेतली. फक्त छोट्या बँका सुटल्या. युनायटेड वेस्टर्न बँक, गणेश बँक ऑफ कुरुंदवाड, आणि रत्नाकर वगैरे म्हणूनच खाजगी राहिल्या.

dadadarekar's picture

7 Sep 2015 - 11:00 pm | dadadarekar

आमची दि गणेश ब्यान्क ऑफ कुरुंदवाड ही फेड्रल ब्यान्केने खाल्ली.

जुन्या शेअर होल्डरना काहीही मिळाले नाही.

काय सांगता? अहो फक्त आर बी आय ने केलेल्या नियमानुसार कमीत कमी आवश्यक तेवढे स्वतःचे भांडवल नसल्यामुळे (माझ्या आठवणीनुसार १०० कोटी) त्या बँकेला विलीन व्हावे लागले असं मला वाटत होतं...ती काय बुडीत जात नव्हती!! तुमचे पैसे बुडाले होय? नक्की का?

आत्ता एक आर्टीकल वाचलं..त्यात मर्जर च्या वेळी असलेल्या निगेटीव नेट वर्थ चा उल्लेख केला आहे. (याचा अर्थ शेअरची किंमत काढायला गेल्यास उणे किंमत आली असती. )

बोर्डाने खूप घोटाळे केले होते कर्ज देतांना. त्या बँकेची मुंबईतली मोक्याची प्रॉपर्टी विकली असती तर सगळा तोटा निघाला असता भरुन. पण रिझर्व्ह बॅंकेने परवानगी नाकारली.

अन्या दातार's picture

8 Sep 2015 - 3:46 pm | अन्या दातार

युनायटेड वेस्टर्न बँक आणि गणेश बॅंक ऑफ कुरुंदवाड या दोन्ही बँका बुडीत निघाल्या नाहीत तर चक्क विकावयास भाग पाडल्या गेल्या. पैकी युनायटेड वेस्टर्नवर मागे लोकसत्तात एक चांगला लेखही आला होता. एका हत्येचा माफीनामा

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Sep 2015 - 4:07 pm | अनिरुद्ध.वैद्य

गणेश बँकेची आयडिया नाही. बाबा युनायटेडमध्ये असल्याने बरीच माहिती होती … आणि सहानुभूती पण :) त्या मखारीयाला कर्ज तर दिलेच आणि स्वतात शेअर्ससुद्धा :(

हा लेख खूपच चांगला आहे. परत एकदा वाचून छान वाटले.

सरकारी पातळीवर पहिल्या खाजगी बँकेस वाचवण्यासाठी काही झाले नाही याचेही वाईट वाटते. आता तीच आयडीबीआय PNBच्या घशात जाणारे ऐकिवात आहे.

अन्या दातार's picture

8 Sep 2015 - 5:01 pm | अन्या दातार

आयडीबीआय पीएनबी घेणार आहे? मला वाटते तुम्ही बँक कन्सोलिडेशनबद्दल गैरसमज करुन घेत आहात.

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Sep 2015 - 5:12 pm | अनिरुद्ध.वैद्य

काय तरी गफलत झाली म्हणायची त्येच ते … कन्सोलीडेशन.
दुरुस्तीसाठी धन्यवाद :)

कोमल's picture

8 Sep 2015 - 7:07 pm | कोमल

+१

बाबा युनायटेडमध्ये असल्याने बरीच माहिती होती … आणि सहानुभूती पण :)

अगदी.
"आपुलकीने वागणारी माणस" ह्या टॅग लाईन ला मी गमतीत "आपुलकीने वागणारी आळशी माणस" अस म्हणायचे.

पण uwb च्या विलिनिकरणाला भावनिकतेची जोड मिळालेली हे १०० टक्के सत्य. आज पण बाबा आणि सगळी जुनी मंडळी भेटली की तासंतास गप्पा रंगलेल्या असतात त्यांच्या..

अनिरुद्ध.वैद्य's picture

9 Sep 2015 - 10:00 am | अनिरुद्ध.वैद्य

आम्हा पोरांना खूप बोर व्हायचं मग! टीव्ही वगैरे काही नी ... शांत बसून ऐकत राहायचं :D

कपिलमुनी's picture

8 Sep 2015 - 5:06 pm | कपिलमुनी

अतिशय चांगली बँक होती.
रीझर्व बँकेच्या चुकीच्या धोरणाचा फटका बसल्यामुळे विलीन करावी लागली.

पगला गजोधर's picture

4 Sep 2015 - 2:45 pm | पगला गजोधर

- बहुदा या बँकेत एकता कपूर, करण जोहर किंवा अशा हस्तींचा स्टेक असावा. कारण बंधन वगैरे असं नाव बँकेसाठी यांनाच सुचू शकतं.

बाकी कोणी असो नसो पण एकता कपूर ची जर ब्यांक नसली पाहिजे. कारण एकता कपूर ची जर ब्यांक असती, तर नाव 'बंधन' नव्हे, तर 'कुंथन' असले असते.
(कारण तिला क लकी आहे म्हणून )

वेल्लाभट's picture

4 Sep 2015 - 3:17 pm | वेल्लाभट

परफेक्ट पकडलायत मुद्दा

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2015 - 4:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

आमचे अन सकल मिपा चे नशीब थोर 'कुंटण' नाही म्हणालात!!!

हेमंत लाटकर's picture

9 Sep 2015 - 5:18 pm | हेमंत लाटकर

आमचे अन सकल मिपा चे नशीब थोर 'कुंटण' नाही म्हणालात!!!

मस्त जोक सोन्याबापू

मास्टरमाईन्ड's picture

4 Sep 2015 - 3:43 pm | मास्टरमाईन्ड

नाव 'बंधन' नव्हे, तर 'कुंथन' असले असते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2015 - 3:58 pm | कैलासवासी सोन्याबापु

इतर बँकेत केवायसी म्हणजेच नो युअर कस्टमर असतं. इथे एलवायसी - लव्ह युअर कस्टमर किंवा बीवायसी - ब्लेस युअर कस्टमर किंवा टीवायसी - ट्रस्ट युअर कस्टमर वगैरे असेल का?

ह्या लिस्ट मदी 'केडीवायसी' अर्थात 'कन्यादान योर कस्टमर' असेही एक प्रकरण जोड़ता आले तर बँक ला साक्षात बाबुजी आलोकनाथ ह्यांचे आशीर्वाद हे आपले अशिर्वादाच्या फिक्स्ड डिपॉज़िट मिळतील, कसे??

असंका's picture

5 Sep 2015 - 8:27 am | असंका

वेल्लाभट यू टू!!!!

अहो कधी नव्हे ते एक अस्स्ल भारतीय नावाची बँक येतीये तर त्याची काय चेष्टा करायची? "युनियन" बँकेची कधी अशी चेष्टा केली असतीत का?

बाकी कल्पनाशक्तीचं वारू मात्र अगदी चौखूर उधळलंयत...फारच जोरदार!!!

काही पोझिशन तर नाही ना घेतलीत या बँकेत? जाहीरात चांगली झाली कारण नवीन बँकेची इथे....

नाखु's picture

5 Sep 2015 - 12:48 pm | नाखु

जर ही बँक "काका-पुतण्यांची असती तर === "कुरण"

आर्म्स्ट्रोग रावांची असती तर "भरण"

थोरली पाती "शिव-वंदन"

आणि फुला-फुलांचा शर्टवाले दाढीधारी हटके शीग्रकवी यांची "झोळण"
(सतत काही तरी मागत असल्याने आपसूक नाव सुचले आणि ही कवीता.

दर इलेक्शन्ला कर्तात माझी बोळवण
लग्नच होइना जरी झाले केळवण
तरी मी बांधीन नव्याने मोळी !
फिरवूद्या तुमच्यापण दारी झोळी !!

अदमास पाठवले

येक दुरुस्ती, पुतण्याची असती तर "धरण" ब्या़ंक आणि केजरिवालची असती तर "धरणा" ब्यांक.

बबन ताम्बे's picture

8 Sep 2015 - 5:01 pm | बबन ताम्बे

सरण ?

नाय, व्यापम ची असती तर सरण हे नाव अधिक योग्य झाले असते. इंद्राणीची ब्यांक असती तर "जॉइंट अकाउंट" हेच नाव असते. =))

बबन ताम्बे's picture

8 Sep 2015 - 6:09 pm | बबन ताम्बे

:-)
एकच जॉइंट अकाउंट का पाच ?

प्यारे१'s picture

8 Sep 2015 - 6:23 pm | प्यारे१

चौकशी सुरु आहे. सध्याच्या 'बदल्यां'मुळं काम मंदावण्याची शक्यता आहे.
- प्यारे पीटर

बबन ताम्बे's picture

8 Sep 2015 - 6:29 pm | बबन ताम्बे

त्यादरम्यान एखादे जॉइंट अकाऊंट बंद नाही झाले म्हणजे मिळवली.

नाखु's picture

9 Sep 2015 - 9:29 am | नाखु

वेगळा एच यु एफ असा मिळाला असता.

माजी पतींच्या सक्रीय सहभागाने वरील संज्ञेचा अर्थ पुढे दिला आहे.

Husbands United Forever

हेमंत लाटकर's picture

9 Sep 2015 - 5:22 pm | हेमंत लाटकर

येक दुरुस्ती, पुतण्याची असती तर "धरण" ब्या़ंक आणि केजरिवालची असती तर "धरणा" ब्यांक.

हाहाहा

पैसे काढल्यावर कैशियर्च्या पाया पडाव्या लागतील. आशिर्वाद आणि सोबत "संभालकर ले जा ना गुडीया/बिटिया/बेहेंजी/माताजी. आजकल जमाना बड़ा खराब है" अशी प्रेमळ सूचना मिळेल. काही कारणाने परत पैसे काढायला लागले तर, "इतनी जल्दी खत्म हुए ? चलिये आपके पिताजिसे बात करते है" म्हणून आपल्या समोर घरी फोन लावून आपले काम तमाम करतील.

अभ्या..'s picture

5 Sep 2015 - 1:14 pm | अभ्या..

नॉर्मल जिलबी.
बापू आणि बोकेशाचे माहीतीपूर्ण तूप व आदूबाळाच्या केशराने मज्जा आली. नाखुकाकांचा आंबूसपणा एक नंबर.

शित्रेउमेश's picture

7 Sep 2015 - 9:49 am | शित्रेउमेश

बंधन बँक
हा हा हा..

मी सगळ्यात आधी गुगलून पाहिल.. खरच अशी बँक आहे का ते?
आडवा झालो.... बाकी, कल्पना भारी आवडली....
"ये बंधन तोssss, बँक का बंधन हैsss, जन्मों का ये संगम है..."

बँकेची खरी टॅज लाईन..."बंधन बँक: आपका भला, सबकी भलाई.."

पैसा's picture

7 Sep 2015 - 4:06 pm | पैसा

आयड्या भारी आहेत.

अभिजित - १'s picture

7 Sep 2015 - 9:46 pm | अभिजित - १

ICICI ची tag line माहित आहे का ? खयाल आप का !! मोठ्ठा जोक !!
आणि बंधन ने खरेच खूप चांगले काम केले आहे. तुमचे ज्ञान तोकडे आहे त्याला ते काय करणार ?

एका आमच्याकडच्या बँकेचे नाव वाचण्याच्या अगोदर दीर्घ श्वास घ्यावा लागतो.चेकचे नाव लिहायचे तर शाई संपेल.

सुबोध खरे's picture

8 Sep 2015 - 6:29 pm | सुबोध खरे

"एन के जी एस बी" का?
पण त्यांची सेवा उत्तम आहे

हेमंत लाटकर's picture

9 Sep 2015 - 5:34 pm | हेमंत लाटकर

हे सर्व प्रतिसाद वाचून मजा आली. मिपावर कोणीतरी (मी सोडून) एक हास्य धागा काढावा.

खटपट्या's picture

9 Sep 2015 - 9:02 pm | खटपट्या

दीव्यश्री तायने काढलाय. त्यावर जाउन या. (कट्ट्याचा नाय हां.(तसा तोही धागा हास्य धागा होउ लागलाय))