टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवा - अगदी सोप्या पद्तीने (फोटोसहीत)
- १) आपल्या घरातील रिकाम्या झालेल्या ५ किलोच्या तेलाच्या डब्या पासून "केरकचरा सुपली (dust Pan" बनवता येईल. ती कशी बनवायची ते तुम्हाला खालील फोटोवरून कळेल.
- २) आपल्या गच्ची मधील किवा जवळच्या बागेतील झाडाच्या कुंड्या फुटल्या असतील तर त्या फेकून न देता त्याचा कल्पना शक्ती चा वापर करून आपल्या बागेची किवा गच्ची ची शोभा वाढवू शकतो. अशीच एक कल्पना खालील चित्रात दाखवली आहे.
- ३) उन्हाळा आला कि आपलं शीतकपाट पूर्ण पणे शीतपेयाच्या आणि पाण्याच्या बाटल्याणी भरून जातो. पण उन्हाळा संपला कि रिकाम्या झालेल्या ह्या प्लास्टिक च्या बाटल्यानचे काय?
त्याचा पण उपयोग घर-शेती करण्यासाठी होऊ शकतो. त्या फेकून न देता मधोमध कापून त्या मध्ये माती भरून कोथांबीर, मेथी च्या बिया टाकून त्या वाढवू शकता. ह्याला जागा पण कमी लागते. अधिक स्पष्टीकरणा साठी खालील चित्र पहा.
- ४) तुटलेल्या छत्री चा उपयोग पण खालील प्रमाणे वस्त्रे लटकवण्या साठी होऊ शकतो.
- ५) रिकाम्या झालेल्या शाम्पूच्या बाटल्याचा उपयोग भ्रमणध्वनी अडकवण्यासाठी होऊ शकतो. त्यासाठी फक्त थोडेसे कापून आकार द्यावा लागेल. त्याला तुम्ही मनाप्रमाणे सजवू पण शकता. खालील चित्र पहा.
- ६) तुमच्या कडे खाली झालेल्या शाम्पूच्या बाटल्या नसेल तर त्यासाठी फाटलेल्या जीन्सच्या खिशाचा उपयोग करू शकता. खालील चित्र पहा.
- ७) तुम्हाला जर ५ रुपयात बायकोला किवा प्रेयसीला उपहार देऊन खुष करायचे असेल. तर खालील प्रमाणे
अंड्याचा बनवलेला बदाम देऊ शकता. एक गंमत म्हणून घरी बनवायला काय हरकत आहे.
- ८) गेलेल्या विजेच्या बल्ब चा असापण चांगला उपयोग होऊ शकतो.
- ९) घरी आम्लेट करून तुम्ही खाल्लेच असेल. मग ते फुल फ्राय किवा हाफ फ्राय असेल पण कधीतरी गोल फ्राय करून पण खात जावा. त्यासाठी फक्त एक अंडे आणि मोठा कांदा लागेल. पूर्ण कांदा पण नाही फक्त कांद्याची निघणारी गोल चकती लागेल. खालील चित्र पहा.
- वरील सर्व कल्पना किवा कला आंतरजालावरून गोळा केल्या आहेत.
हा धागा काढण्यामागे कारण कि अश्याच अनेक कल्पना तुमच्या मनात किवा तुम्ही कुठे तरी पाहिलेल्या असतील तर त्या इतर जणांना पण कळल्या पाहिजेत.
म्हणून तुमच्याकडे पण अश्या काही कल्पना असतील तर या धाग्याच्या प्रतिक्रियेच्या रुपाने येऊ द्या. मग त्या लेखणीच्या , फोटोच्या रूपाने असू द्या किवा चलचित्र च्या रूपाने असू द्या त्याचा सर्वाना त्याचा लाभ होऊ द्या.धन्यवाद !!
प्रतिक्रिया
10 Aug 2015 - 9:44 pm | जडभरत
+१
छत्री तर लै भारी!!!
10 Aug 2015 - 9:45 pm | जडभरत
अईला मी पईला?
10 Aug 2015 - 9:50 pm | राजकुमार१२३४५६
जडभरत तुम्हि पहिलेच. :)
10 Aug 2015 - 10:26 pm | एस
छान माहितीपूर्ण धागा.
10 Aug 2015 - 10:38 pm | राजकुमार१२३४५६
तुमच्याकडे पण अश्या काही कल्पना किव महिति असतील तर येथे देउ शकता. धन्यवाद!!
10 Aug 2015 - 11:04 pm | पैसा
सगळ्या कल्पना आवडल्या. करून बघण्यासारख्या आहेत खरेच!
11 Aug 2015 - 4:38 am | संदीप डांगे
मी सुद्धा आताच एक टाकाऊतून टिकावू वस्तु बनवत आहे. पूर्ण झाली की धागा टाकेन फोटोंसकट.
11 Aug 2015 - 7:32 am | स्पंदना
कुंडी अतिशय सुंदर झाली आहे.
आता घरातली धडधाकट फोडावी म्हणते.
11 Aug 2015 - 12:58 pm | उगा काहितरीच
आजच पाच लिटर तेलाचा डबा, १ शांपूची मोठी बाटली, एक स्वस्ताताली जीन्स घेऊन येणार आहे .
11 Aug 2015 - 2:21 pm | राजकुमार१२३४५६
तुमचे तर सगळे उलटे आहे राव !!
11 Aug 2015 - 7:43 pm | एस
+१.
11 Aug 2015 - 7:45 pm | एस
हा प्रतिसाद राजकुमार ह्यांच्या मार्मिक ह्यांच्या फोटोंच्या खालील प्रतिसादाला होता. चुकून इथे पडला.
11 Aug 2015 - 10:38 am | मार्मिक गोडसे
छान माहितीपूर्ण धागा. आजच तेलाचा डबा रिकामा झाला. केराच्या सुपलीची कल्पना आवडली. आजच करुन बघनार.
11 Aug 2015 - 11:48 am | वेल्लाभट
क्लास ! जबरदस्त आवडलं !
काही माहिती होत्या तरीही तुम्ही स्वतळ्त्र धागा काढलात हे मस्त केलंत. खूप छान ! यात अजून भर पडावी अशी आशा.
11 Aug 2015 - 12:29 pm | दिपक.कुवेत
मोबाईल लटकवायची कल्पना जास्त आवडली गेल्या आहे.
11 Aug 2015 - 12:32 pm | कविता१९७८
मस्तच , इनोवेटीव्ज आयडीयाज आहेत सगळ्या.
11 Aug 2015 - 2:45 pm | खटपट्या
फोटो दिसत नायत. घरी गेल्यावर बघतो.
11 Aug 2015 - 6:30 pm | मार्मिक गोडसे
कापलेल्या डब्याचा वापर आगोदर तयार केलेल्या मिरचीची रोपे ठेवण्यासाठी केला.
11 Aug 2015 - 7:37 pm | राजकुमार१२३४५६
तुम्ही तर फोटो पेक्षा झक्कास केले आहे
11 Aug 2015 - 7:46 pm | एस
+१.
(प्रतिसादाची जागा सुधारली आहे).
12 Aug 2015 - 10:26 am | मार्मिक गोडसे
धन्यवाद.
13 Aug 2015 - 11:47 am | ऋतुराज चित्रे
लेख आवडला. सुपले छानच जमलेय मार्मिक.
जीन्सच्या खिशाचे मोबाईल होल्डर मी बनवले होते, फोटोत कितीही चांगले वाटले तरी प्रत्यक्षात तितके चांगले वाटत नाही. धुळ बसुन खराब होते, धुवायला लागते. मोबाईलच्या रिंगचा आवाज दाबला जातो बर्याचदा रूमच्या बाहेर असल्यास रिंग ऐकायला येत नाही. नुसत्या व्हायब्रेटर मोडवर असेल तर कळतच नाही, टेबलवर निदान घरघर तरी ऐकायला येते. शेवटी टाकुन दिले.
11 Aug 2015 - 7:26 pm | टवाळ कार्टा
जीन्सचा खिसा आवडल्या गेल्या आहे (मिपाचं व्याकरण असच आहे ना?)
11 Aug 2015 - 9:20 pm | जडभरत
असं का आहे व्याकरण? मला पण प्रश्न पडतो अनेक वेला! व्यनि करा की टकाराजे!!!
11 Aug 2015 - 10:06 pm | टवाळ कार्टा
कोणाला? कशाला? गरज असेल तर मला व्यनी करतील...त्यासाठी मी माझ्या इंटरनेटच्या बायटी का वाया घालवू?
11 Aug 2015 - 7:59 pm | राजकुमार१२३४५६
11 Aug 2015 - 8:48 pm | अत्रुप्त आत्मा
णविण!
टेनिसबॉलची वर्किंग स्मायली
=================
ढण्यावाड! मी घरात करुण लावनार आता..
11 Aug 2015 - 9:18 pm | जडभरत
तुम्ही दोघेही अवलिया! नमस्कार!
11 Aug 2015 - 8:21 pm | खटपट्या
अर्रर्र !! कालच एक शांपूचा डबा फेकून दीला..
11 Aug 2015 - 9:29 pm | बहुगुणी
या आणि अशा बर्याच ट्रिक्स 'जिनियस लाईफ हॅक्स' आणि Distractify या दुव्यांवर उपलब्ध आहेत. टेनिस बॉल्स पासून करता येणार्या कित्येक गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत. पिंटरेस्ट वरही अशा अनेक गंमतीदार कल्पना मिळतात.
मला आवडलेल्या काही करामती:
शर्टची घडी अशी सहज घाला:
आईस क्रीम सँडविच
कॅसेट कव्हर पासून फोन स्टँड
मायक्रोवेव्ह मध्ये दोन मोठे बाउल्स असे ठेवा:
आंब्याच्या फोडींची सालं अशी काढा:
पाण्यात बुडवलेला स्पंज प्लास्टिक पिशवीत ठेवून तयार करा न वितळणारा आईसपॅक:
वस्तू अडकवण्यासाठी भिंतीत अचूक ठिकाणी छिद्रे पाडण्यासाठी त्या वस्तूच्या मागील भागाची फोटोकॉपी करून घ्या आणि तो कागद 'गाईड' म्हणून वापरा:
11 Aug 2015 - 9:48 pm | राघवेंद्र
खुप उपयोगी :)
11 Aug 2015 - 11:48 pm | एस
आंब्याचा गर वेगळा करण्याची कल्पना आवडली!
11 Aug 2015 - 10:42 pm | द-बाहुबली
वाखुसा.
11 Aug 2015 - 11:15 pm | प्यारे१
आयडीयेच्या कल्पना मस्त आहेत.
वा खा सा आ
11 Aug 2015 - 11:45 pm | मास्टरमाईन्ड
छानच.
जीन्सची आयड्या येकदम जब्बर.
13 Aug 2015 - 12:19 pm | पाटील हो
मस्तच
26 Aug 2015 - 4:26 pm | भिंगरी
राजकुमार यांचे फोटो दिसत नाहीत.
26 Aug 2015 - 4:26 pm | भिंगरी
दिसले दिसले