1

तत्त्वभान

Primary tabs

निरन्जनदास's picture
निरन्जनदास in जनातलं, मनातलं
18 Jun 2015 - 9:12 pm

मित्रहो, मी गेल्या वर्षी म्हणजे २०१४ साली ‘लोकसत्ता’मध्ये 'तत्त्वभान' हे सदर लेखन करीत होतो. तत्त्वज्ञान या विषयाची ओळख करून देणारं. मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक आहे. तत्त्वज्ञान हा जरी उच्च दर्जाचा प्रतिष्ठित विषय असला तरी त्याच्या नादी कुणी फारसं लागत नाही. एका विशिष्ट पातळीच्या खाली येऊन त्यावर लेखन करता येत नाही, अशीही भानगड आहेच. पण वृत्तपत्राचा वाचक सर्व स्तरावरचा असतो. सामान्य माणसापासून प्रतिभावंत तत्त्ववेत्त्यापर्यंत एक मोठा पट या वाचकात असतो. त्यामुळे या सर्वाना सुलभ वाटेल, असे तत्त्वज्ञानविषयक लेखन करण्याचा माझा हा प्रयत्न होता. दर गुरुवारी हे सदर प्रसिद्ध होत असे. एकूण ५० लेख प्रसिद्ध झाले. उदंड प्रतिसाद लाभला. ‘मिसळपाव’ च्या रसिक वाचकांसाठी हे लेखन मी पुन्हा उपलब्ध करून देत आहे. हा उपक्रम पुढील आठवड्यात सुरु करू यात. तुमच्या काटेकोर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

आपला
श्रीनिवास हेमाडे

हे ठिकाणविचारमाध्यमवेधलेख

प्रतिक्रिया

राही's picture

18 Jun 2015 - 11:17 pm | राही

ते सर्व लिखाण आवडले होते. पुन्हा वाचायलाही आवडेल. पण अशा लेखनाची एक 'नीश' असते. सर्वांना आवडेल असे नाही.
स्वागत आणि शुभेच्छा.

द-बाहुबली's picture

18 Jun 2015 - 11:36 pm | द-बाहुबली

तत्त्वज्ञान हा जरी उच्च दर्जाचा प्रतिष्ठित विषय असला तरी त्याच्या नादी कुणी फारसं लागत नाही.

हम्म्म... आमचं मत जरा वेगळं आहे. लिखाण सुरु कराच.

श्रीरंग_जोशी's picture

18 Jun 2015 - 11:43 pm | श्रीरंग_जोशी

तत्वज्ञान हा माझ्याही आवडीचा विषय आहे (त्यातलं फारसं काही कळत नसलं तरीही).

तुमच्या लेखमालिकेच्या प्रतिक्षेत.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jun 2015 - 11:50 pm | अत्रुप्त आत्मा

लेखानाची वाट पहात आहे.

स्रुजा's picture

18 Jun 2015 - 11:51 pm | स्रुजा

अरे वा ! मिपावर स्वागत. तुमच्या लेखमालेला शुभेच्छा :)

विशाखा पाटील's picture

19 Jun 2015 - 12:02 am | विशाखा पाटील

लेखमाला आवडली होती. आता पुन्हा वाचायला मिळेल, याचा आनंद आहे. विशेष म्हणजे, लेखकाशी इथे चर्चा करता येईल.

गवि's picture

19 Jun 2015 - 12:14 am | गवि

..उत्कृष्ट.
.ती मालिका नेहमी वाचायचो..इथे लिहिताय म्हणून खूप आनंद झाला.

बॅटमॅन's picture

19 Jun 2015 - 12:21 am | बॅटमॅन

प्रतीक्षेत. लेखमाला वाचली नाही, काय असेल याची उत्सुकता आहे.

वॉल्टर व्हाईट's picture

19 Jun 2015 - 12:22 am | वॉल्टर व्हाईट

नविन काही शिकायला मिळेल. तुमच्या लेखांच्या प्रतिक्षेत आहे.

स्पंदना's picture

19 Jun 2015 - 4:13 am | स्पंदना

येउद्या!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2015 - 7:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुभेच्छा. लेखनाची वाट पाहतोय.

-दिलीप बिरुटे

अर्धवटराव's picture

19 Jun 2015 - 7:20 am | अर्धवटराव

तुम्ही अस्सल मराठी दिसता. मिपावर या विषयावर लेखमाला प्रसवण्याचं टैमिंग चुकलं तुमचं. मिपावर एक सर्वाधिकारी तत्ववेत्ता वावरायचा पुर्वी. कुणा दुष्टाने/दुष्ट कंपूने त्या आयडीला बळेच जीवंत समाधी दिली. त्या महात्म्याच्या प्रतिसादांशिवाय कुठलंही तत्वज्ञान अगदीच हे वाटतं आम्हाला... च्यायला.. करमणुक नावाची चिझ गायबच झाली मिपावरुन.

लेखकाला अन्य आजीमाजी संदर्भ माहीत नसल्याने उगीच संभ्रम होऊ शकतो किंवा त्यांचं स्वतःचं लेखन चुकीच्या वेळी येतंय असं काहीतरी वाटू शकतं. यास्तव..

श्री. हेमाडेसाहेब, तुम्ही अवश्य इथे तुमचं लिखाण प्रकाशित करा. कोणतीही मदत लागल्यास अथवा अडचण आल्यास खालील लिंकला भेट द्या आणि त्यावर उल्लेखिलेल्या साहित्य संपादक मंडळापैकी कोणाच्याही नावावर क्लिक करुन त्यांना व्यक्तिगत निरोप पाठवा. ते नक्कीच मदत करतील. "संपादक मंडळ" या आयडीला व्यक्तिगत निरोप केला तरी चालेल.

इथे धमासान चर्चा होत असतात. तसं झालं तरी विशेष व्यक्तिगत असं त्यात काही घेऊ नका असंच सर्वजण वेगवेगळ्या मार्गाने सांगताहेत.

अर्धवटराव's picture

19 Jun 2015 - 10:28 pm | अर्धवटराव

इथे धमासान चर्चा होत असतात. तसं झालं तरी विशेष व्यक्तिगत असं त्यात काही घेऊ नका असंच सर्वजण वेगवेगळ्या मार्गाने सांगताहेत.

+१

मुक्त विहारि's picture

19 Jun 2015 - 7:33 am | मुक्त विहारि

झक्कास...

सतिश गावडे's picture

19 Jun 2015 - 8:53 am | सतिश गावडे

ती लेखमाला आवर्जून वाचत असे. इथेही जरूर लिहा.

मात्र एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते ती ही की वृत्तपत्रांमधील लेखनावर थेट चर्चा करता येत नाही, जशी मिसळपाव किंवा इतर कुठल्याही संस्थळावर करता येते. वृत्तपत्रांमधील लेखनावर चर्चा करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वाचकांचा पत्रव्यवहार, जो खूप मर्यादित असतो.

इथे तुम्हाला मतमतांतरे वाचायला मिळतील. हबकून जाऊ नका. :)

- एपिक्टेटसच्या स्टोईसिझम तत्वज्ञानाचा पंखा.

विशाल कुलकर्णी's picture

19 Jun 2015 - 11:13 am | विशाल कुलकर्णी

इथे तुम्हाला मतमतांतरे वाचायला मिळतील. हबकून जाऊ नका. :)

सहमत आहे. बाकी लेखमालेच्या प्रतीक्षेत. आमच्या आवडीचा विषय आहे.

नाखु's picture

19 Jun 2015 - 11:26 am | नाखु

प्रभूतींशी सहमत. अश्या सुसंवादाने पुढे लेखकालाही फायदा होईल का हे माहीत नाही, किमान आम्हा वाचकांची "जळमटे" दूर झाली तरी चांगले .

अगदी बाळबोध नाखु

प्यारे१'s picture

21 Jun 2015 - 11:01 pm | प्यारे१

प्रभृती असा शब्द असावा. भाषापंडितांनी लक्ष द्यावे.

आपले आणि तत्वज्ञान विषयाचे स्वागत !

सुचेता's picture

19 Jun 2015 - 11:03 am | सुचेता

प्रति़षेत.

तुषार काळभोर's picture

19 Jun 2015 - 11:16 am | तुषार काळभोर

प्रतिक्षा करतोय.
उत्सुकता आहेच.

मूकवाचक's picture

19 Jun 2015 - 3:07 pm | मूकवाचक

+१

संदीप डांगे's picture

19 Jun 2015 - 12:10 pm | संदीप डांगे

अरेवा छान... मालिका वाचली नाही. इथे वाचायला आणि चर्चा करायला आनंद वाटेल.

अनाहूत सल्ला: (वादळाच्या आधीची शांतता फील होत आहे) रोलर कोस्टरसाठी तयार राहावे...

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jun 2015 - 12:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वागत !

छापील नियतकालिकांमधे जे शक्य नसते असे प्रतिक्रियांव्दारे वाचकांशी प्रत्यक्ष संवाद साधता येणे हे मिपासारख्या संस्थळांचे बलस्थान आहे. तत्वज्ञान हा विषय बर्‍याच जणांच्या डोक्यावरून जात असला तरी काही मोजक्या लोकांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा आहे. मिपा खुले संस्थळ असल्याने मिपाचे सभासद सामान्य जनतेच्या प्रमाणातच असणार. अभ्यासू प्रतिक्रिया येतील तश्या काही टवाळही येतील. प्रथम प्रकारांशी तुमच्या प्रतिक्रियांव्दारे चर्चा करून लेखावरच्या माहितीचे मुल्य आणि आकलन अजून वाढवता येईल. दुसर्‍या प्रकाराला प्रत्येक प्रतिक्रियेच्या मगदूराप्रमाणे आणि तुमच्या मानसिकतेप्रमाणे, थोडी गम्मत समजून खेळीमेळीत (शाब्दीक) ढुश्या द्या किंवा अगदी सरळ दुर्लक्ष करा (मिपाच्या भाषेत, फाट्यावर मारा) !

लेखमालेच्या प्रतिक्षेत.

अजया's picture

19 Jun 2015 - 1:27 pm | अजया

लेखनाच्या प्रतिक्षेत.

निरन्जनदास's picture

19 Jun 2015 - 6:54 pm | निरन्जनदास

मित्रहो,
केवळ घोषणेवर इतका दणदणीत प्रतिसाद वाचून मी पोटापासून गदगदून, गहिवरून,दहीवरू.... आलो आहे !
काय बाई सांगू ! कित्ती कित्ती ग अॉब्लिक अरे सांगू !!
रोलर कोस्टर, ढुश्या, ढिशांव, हम्म्म...हम्म्म...,'नीश' साठी ' मैं भी रेडी हाव तैय्यार '
सोमवारी शिवशंभो अन् भुडूश करून हर हर महादेव करू !
कसें ! ?
श्रीनिवास हेमाडे

श्रीरंग_जोशी's picture

19 Jun 2015 - 6:58 pm | श्रीरंग_जोशी

खेळकर प्रतिसाद आवडला :-) .

अशा खेळीमेळीच्या वातावरणात तत्वज्ञानाचे धडे मिळणे ही माझ्यासारख्यांसाठी पर्वणीच असेल.

गवि's picture

19 Jun 2015 - 6:58 pm | गवि

..दॅट्स द स्पिरिट..(!!!) ;)

पैसा's picture

19 Jun 2015 - 6:57 pm | पैसा

मिपावर स्वागत! येऊ द्या मालिका!

कपिलमुनी's picture

19 Jun 2015 - 7:31 pm | कपिलमुनी

लेखमालेच्या प्रतीक्षेत :)

रेवती's picture

19 Jun 2015 - 10:58 pm | रेवती

शक्य तेवढे वाचीन.

स्वागत आहे आपले मिपावर!