डॉ नी पुढाकार घेतला आणि मिपाकरांचे पाय रविवारी घराला लागले. सुरुवातीला बाणाने आणि डॉ नी कॅमेरे सरसावले व थोडे फोटो काढले, पण मग नकळ गप्पांचा फड रंगला आणि सगळे आसनस्थ झाली, आखाड्यात आले. खरेतर आधी घरातून दिसणारे पक्षी पाहायचे, मग खाली उतरुन मागच्या पिंपळावरचे, पलिकडच्या झाडीतले व बागेतल्या दाट झाडांमधले पक्षी पाहायचे असा बेत होता. पण मैफल अशी जमली की लोकांची निघायची वेळ झाली. पुढचा कट्टा कधी जमतोय ते पाहु. तोपर्यंत मी घरुन टिपलेली पक्षांची ही काही चित्रे
बी ईटर - मराठी नाव शोधले पण प्रचलित मराठी नाव समजले नाही, माहितगारांनी सांगावे. हा पक्षी तारेवर आला तो नेमका प्रकाश विरुद्ध बाजुने येत असताना. मळभ आले होते, थेट सूर्य नव्हता पण प्रकाश लक्ष्याच्या पलिकडुन असल्याने मनासारखा टिपता आला नाही. दुसर्यांदा आला तेव्हा कॅमेरा सरसावेपर्यंत महाशय गायब. सबब फोटो केवळ पक्षी ओळखण्या इअतपतच आले आहेत.
मात्र पक्षी भक्ष्य खाताना टिपायला मिळाला, मजा आली. गेल्या चार पाच महिन्यात याचे दर्शन नाही.
प्रतिक्रिया
26 May 2015 - 9:28 pm | प्रचेतस
बी ईटर म्हणजे वेडा राघू.
फोटो छान आलेत.
26 May 2015 - 10:38 pm | मैत्र
+१
वेडा राघू
26 May 2015 - 9:39 pm | सानिकास्वप्निल
छान आहेत फोटोज :)
26 May 2015 - 10:11 pm | पैसा
असले एक मूठभर महाशय हल्ली आमच्या घरासमोर बसलेले असतात. परवा एकदा बरेच दिवस बंद असलेल्या कपाटात सापडलेल्या डब्यातली बारीक झुरळे बाल्कनीत नेऊन ओतली, तेव्हा हा येऊन एकेक झुरळ घेऊन जात होता! मात्र एकच दिसतो नेहमी. त्याचं घर किंवा जोडीदार कुठे आहे काही कळलं नाही.
26 May 2015 - 10:22 pm | श्रीरंग_जोशी
तुम्ही म्हणताय तो पक्षी कदाचित घटस्फोटित असू शकतो.
मूळ धाग्यातले पक्षी आवडले.
27 May 2015 - 9:41 am | पैसा
आज त्याचा जरा डार्क जोडीदार पण आला होता. मधेच मातीत जाऊन बसले होते जमिनीवर!
27 May 2015 - 11:21 am | टवाळ कार्टा
तुम्ही झुरळे बाटलीत जमा करून ठेवता? =))
27 May 2015 - 11:33 am | पैसा
काही खास मिपाकर घरी आले तर पूस्प्गूचाऐवजी त्यांना द्यायला ठेवली आहेत!
27 May 2015 - 3:19 pm | टवाळ कार्टा
खिक्क...नक्की का? नैतर काजूच्या पाकिटात बांधून पाठवाल ;)
27 May 2015 - 12:29 am | सौन्दर्य
फोटो मस्तच आहेत.
27 May 2015 - 1:56 am | चैत्रबन
आणि डोळ्यांवरुन असलेला काळा पट्टा फार आवडला...
27 May 2015 - 5:53 am | कंजूस
खूप छान आलेत फोटो. यांची घरे मुंब्राच्या खाडीपरिसरात चिखलात आहेत .मधमाशांचे कर्दनकाळ.बिचाय्रा मध गोळा करायला जातात परत येण्याची ग्यारंटी पसते.
तुंगारेश्वर जाण्याचं काही ठरलं का?
27 May 2015 - 6:43 am | खटपट्या
मी जाउन आलोय तुंगारेश्वरला. खूप छान जागा आहे पण चालावे खूप लागते.
27 May 2015 - 6:39 am | मदनबाण
छान फोटो... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ Aqeel
27 May 2015 - 9:20 am | यशोधरा
ह्याचे मराठी नाव वेडा राघू अहे बहुतेक
27 May 2015 - 9:33 am | पाटील हो
फोटो मस्तच आहेत.
27 May 2015 - 11:35 am | अनुप कुलकर्णी
blue tailed bee eater
27 May 2015 - 3:50 pm | श्रीगुरुजी
हा वेडा राघू आहे. याच्या शेपटीला तारेसारखी १ किंवा २ टोके असतात.
28 May 2015 - 10:51 am | नूतन सावंत
सुरेख फोटो.