चला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची) भाग २

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
16 May 2015 - 10:02 am

आधीची हवा

यातील काही बाबी बिनबियांच्या गोष्टी असल्या तरी काही बियांच्या आहेत, त्या त्या बिया कोल्हापूर कट्टेकर्यांना माहीती आहेत

या नंतरचे व्यक्तीमत्व हे थेट कोकणातील अस्सल लाल मातीतून आणि साक्षात लोकमान्य टिळकांच्या पावनभूमीतून आलेले आहे.म्हणजे बघा आजकाल वेगवेगळ्या टीव्ही मालिकांअमध्ये (विशेषतः १५-२० पे़क्षा कमी माणसं नसलेली कुटुंब काबीला वाल्या) एखाद स्निग्ध हसर्या चेहर्‍याची स्त्री भूमीका असते तशी ही व्यक्ती आहे.

रत्नांग्री चे असूनही सरळ बोलणारे हे व्यक्तीमत्व फार दूरदर्शी आहे यात काहीही सौंशय नाहीये.
तर आणि या..

निटेश सांगळे: अहो काही काय सांगताय ते सदस्य नाव अनन्या आहे असे आहे आणि त्या फक्त निवडक धाग्यावर चांगले चांगले अभिप्राय देतात

ध.स.: मी कुठे काय म्हणालो मी आणी या अनन्या तै असा उल्लेखच करणार होतो. अनन्यातै तुम्हाला सांगतो आमची पण मुस्कट्दाबी करतात हे निटेश अण्णा. जशी मिपावर नवीन कोमल मनाच्या कवींची होते तशी.

निटेश सांगळे: तुम्ही काहीही वाचताय जरा नीट लिहून आणत जा आणि “हे व्यक्तीमत्व फार दूरदर्शी आहे म्हणजे काय” कोकणातल्या आहेत तेव्हा नीट संभाळून वाचा, एखादा बारूकसा फणस फेकून मारतील तुम्हाला !!!!

ध.स.: नाही तुमचा नेहमीसारखा गैरसमज होतोय, धागा न वाचताच प्रतीसाद देणार्या उत्साही मिपाकरासारखा. त्यांनी बरोबर येतानाच खास मिपाकरांसाठी करवंद आणि जांभळं आणली शिवाय फणसाचा चिवडा आणला आहे आता असा रानमेवा मिळल्यावर लोकांची तोंडे काही काळापूरती का होईना बंद राहतील की नाही आणि किमान पुढची पाच दहा मिनिटे तरी त्यांना कुणी काही विचारत बसणार नाही, म्हणून मी दूरदर्शी म्हणलो.

असो, नाही जरा नीट लिहित जारे पोरांनो एक दिवशी माझा आय डी उडवाल मिपावरून, अनन्यातै तुम्हाला सांगतो ही पोरं चुकीचे लिहितात हो आणि मला बोलणी खावी लागतात. स्वारी बरका आमच्या सारख्या अडाणी मानसांना फार माहीती नसतेना म्हणून होते असे आणि त्यात या स्वसंपादकांची मुस्कटदाबी !!

तर एक विचारू का ताई म्हणजे राग नका मानू, तुम्ही मी रानमेवा असा उल्लेख करताना हळूच "माकडमेवा" असं मनातल्या मनात बोल्लात ना, नाही आमच्या मुवींच्या "बाबाम्हाराजांनी" ही मनातलं बोललेलं ओळ्खायची कला शिकवली हाय आम्हाला !!

तर असो १५-१८ सदस्य संख्या असलेल्या घरात राहूनही अत्यंत प्रसन्न चेहर्‍याच्या अश्या ...

निटेश सांगळे: अहो काही काय सांगताय १५-१८ सदस्य आणि प्रसन्न चेहरा काय संबध ?

ध.स.: मी कुठे काय म्हणालो चुकीचे,अनन्या तै तुम्ही लक्ष देऊन नका. आमचा पाटलाचा सुन्या मुंबैत असतो कुठेशी,त्याच्या घरी इनमीन चारच माणसं म्हणजे कधी सुन्याचे सासू सासरे तर कधी सुन्याच्या बायकुचे, तरीबी दोघापैकी एकाचा तरी चेहरा हसरा दिसत नाही. म्या प्रत्येक्ष बघीतल नाय पण आमच्या हीच्या मावळनीची जावेची नणंद राहतेना त्यांच्याच सोसायटीत. आता बायका थोडीच मनचं आणि वाढवून सांगणारहेत. अनन्यातै तुम्हाला सांगतो तुम्ही एखाद्या मराठी शिरियल मध्ये ट्राय कराच तेवढाच मिपावरच्या मंडळींना भाव खायला चानस मिळेल.

आणि एक विचारू का तुमचा उल्लेख थेट भगवत गीतेत आहे ते अनन्याचिंत यंतो मा का काय म्हणून
म्हणजे डायरेक कृष्णाशी वळख हाये तुमची,

तर असो अश्या या रत्नांग्रीच्या ताईंचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रीत करतो... लहानपण देगा देवा, मुखी पडो माकड्मेवा संघटनेचे श्री धरून सत्कारपुरे.

या नंतरचे व्यक्तीमत्व हे कोल्हापूच्या अस्सल खासबागेतून..थेट इथे कट्ट्याला आलेले आहे आणी सल्ला देऊन..

निटेश सांगळे: तुम्ही काहीही वाचताय जरा नीट लिहून आणत जा.ते काय तुम्हाला मल्लासारखे दिसतायत का ?

ध.स.: नाही तुमचा नेहमीसारखा गैरसमज होतोय,अहो खासबागेतून म्हणजे खास बागेतून आलेत. त्यांच्या कन्येने सकाळी हट्ट धरला होता खेळायला बागेत जावू म्हणून त्याप्रमाणे ते बागेत गेले आणि खास आपल्या साठी इथे आले. तुम्ही मध्ये मध्ये बोलुन माझे लिंक तोडता हो.

तर अश्या या समोरच्याला सल्ला देऊन "गार" करणारे टाईपचे व्यक्तीमत्व या ठिकाणी आले आहे आणि दोन सिंह एकत्र आल्यावर जसे पहिल्यांदा एक्मेकांचा अंदाज घेतात अगदी तशेच ते शाह साहेबांशी वार्तालाप करीत आहेत. बघा तुम्हीच बघा,.

सर म्हणजे हे फक्त आपल्या-आपल्यात म्हणजे छोटी "आंबु" तुमच्याबरूबर आलीय कारण तीच्या आईनेच पाठिवलं आहेना."सारख मिपा मिपा करतात आणि एकटेच हसतात,जरा बघून ये खरंच असं काही मिपा आहे का? कुणी खरे स्वारी खरोखरचे मिपाकर आहेत का?"

तर अश्या स्वतःला कन्फुजड अकौंटंट म्हववून घेणार्या, तर घरीही पटेल असेच यशस्वी स्पष्टीकरण देणारे,पुण्यात जावूनही वा़कडं (ला) न राहण्यार्या सरळमार्गी साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रीत करीत आहे. "सल्ला छोट्टा व्यनीत भेट्टा " या संघटनेचे श्री धरून सत्कारपुरे.

या नंतरचे व्यक्तीमत्व हे पुण्याच्या अस्सल भागातून शिकलेले आहे. त्यांच नाव जरा खुळा असं वाटतय, का त्ये त्यांनाच विचारू साहेब प्लीज थोडक्यात सांगा मला अजून बाकीच्या हजर मिपाकरांचे पण सत्कार करायचेत आणि येळवारी घरी जायचयं !!

निटेश सांगळे: तुम्ही काहीही वाचताय जरा नीट लिहून आणत जा.

ध.स.: मी कुठे काय म्हणालो ? तुम्हाला माझा मुद्दा कळला नाहीये आहो हे इतकं मोठं आणि सविस्तर उतार देत बसतील की मला बाकीच्यांचा सत्कार करायला टाईम भेट्णार नाही. म्हणून आपलं सांगीतल. नादखुळा तुम्ही लक्ष देऊ नका.

तुमच्या मिपा नावा वरून लोकांना वाटतं तुम्ही कोल्हापूरचे पण परत्येक्ष पाहिल्यावर तुम्ही कोल्हापूरचे वाटत न्हाई.

नाद खुळा : खरं आहे तुम्हच म्हणणं मी हे नाव घेण्याऐवजी "ठणठणपाळ" नाव घेणार होतो आणि नादखुळा हा पासवर्ड ठेवणार होतो पण

काहीतरी गलतीसे मिष्टेक झाली आणि हेच नाव मिपाने स्वीकारले मग काय पुढे "आपल्यासारख्या खुळ्या लोकांचा नाद लागलेला म्हणून नाद खुळा" हेच नाव सार्थ झाले ते झालेच

ध.स.: सरं एक सांगू का तुमच्या ते नाव जोडून संघाचं नाव लिहिण्याचे लै फॅन हायेत आमच्या गावात. म्हणजे राग नका मानू एक विचारू का की तुम्हाला बोर्डावर लिहायला जागा कमी पडती का त्याच बजेट्मधी बसवायचं असतं म्हणून असं एक्मेकांत घुसलेली अक्षरांचा नावांचा फलक तुम्ही बनवता??

नाद खुळा :नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय जिथे आवश्यक तिथेच असे संघाचे (आर एस एस नाही) सत्कार संघाचे फलक आहेत इतर सगळेकडे मोकळे-ढाकळे फलक आहेत.

ध.स.: पण त्याच्या मुळे मागच्या महिन्यात आमच्या गावात भावकी-भावकीत भांडणं झाली ना !!

निटेश सांगळे: अहो काही काय सांगताय हे कशाला तुमच्या गावात भांडण लावायला?
ध.स.: नाही तुमचा नेहमीसारखा गैरसमज होतोय अहो यांच त्ये समासयुक्त का काय म्हणतात तसं (एक्मेकांत घुसलेली अक्षरांची एकच ओळ) पाहून बचन म्हणून आमच्या गावातल्या गोजमगुंडेच्या सरवान्याने ( तसं त्याच नाव श्रावण हाये आणि त्यो एकटाच पुण्यात असतो आई-बा इकडं गावकडचं अस्त्यात्)लग्न्याच्या पत्रिकेत सगळ्या पावन्यांची नावे ल्हीली की याच्या ष्टाईलनी ! आत्ता आम्चे गावकडची पत्रीका म्हणजे एक मतदारयादीच असतेय ना तुम्हाला तर माहीतीच असेल की.

आनि मग ज्यो धुराळा उडालाय !!प्रत्येक जन आप्लं नाव शोधताना एक नवीन नाव तयार करीत होता.आणि सरवान्याला नवीन नवीन शिव्या देत होता. स्वारी बरका आमच्या सारख्या अडाणी मानसांना फार माहीती नसतेना म्हणून होते असे. तुम्ही जरा खाली लिहित जा ही पद्ध्त कुठं वापरू नका म्हणून म्हंजी असा घोटाळा हुणार न्हायी.

तर अश्या अतिषय मितभाषी ,अबोल व्यक्तीमत्व असलेले आणि कुठलाही दंगा न करणारे शांत निरागस (?) नाद खुळा यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रीत करतो... सत्कारच सत्कार चोहीकडे गेला फलक कुणीकडे संघटनेचे श्री धरून सत्कारपुरे

पुढील भागात इतर यशस्वी कल्लाकार.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

16 May 2015 - 10:47 am | प्रचेतस

अतिषय मितभाषी ,अबोल व्यक्तीमत्व असलेले आणि कुठलाही दंगा न करणारे शांत निरागस (?) नाद खुळा

अर्रर्र.....लैच =))

अद्द्या's picture

16 May 2015 - 11:44 am | अद्द्या

अतिषय मितभाषी ,अबोल व्यक्तीमत्व असलेले आणि कुठलाही दंगा न करणारे शांत निरागस

^^^^^^^^^^^^^^

मेलो मेलो . . . =))))

कंजूस's picture

16 May 2015 - 2:16 pm | कंजूस

रस्सा जमलाय.

चौकटराजा's picture

16 May 2015 - 2:17 pm | चौकटराजा

। नाखुदा मि त भाषी ?ए स्क्रीप्ट वाल्या पोरा नो सकाळ सकाली?

चौकटराजा's picture

16 May 2015 - 2:17 pm | चौकटराजा

। नाखुदा मि त भाषी ?ए स्क्रीप्ट वाल्या पोरा नो सकाळ सकाली?

धन्यवाद! पुढच्या कट्ट्याला रत्नांग्रीची खरी चुणूक दाखवण्यात येईल. पहिल्याच भेटीत मिपाकरांना त्रास दिला तर परत बोलावणार नाहीत!
ते शिरेलीचे म्हणाल, तर एक डाव अनुभव घेतलाय, पण उगाच मिपाकराना नविन धाग्याची संधी नको म्हणून थांबले.

अद्द्या's picture

16 May 2015 - 4:50 pm | अद्द्या

तो चिवडा मात्र विसरू नका पुढच्या वेळीही :D

अनन्न्या's picture

16 May 2015 - 7:52 pm | अनन्न्या

चिवडा नाही.सिझनल वेफर्स!

सदस्यनाम's picture

16 May 2015 - 4:45 pm | सदस्यनाम

सरळ भाषेत सांगायचं सोडून हा कुठला फॉर्म्याट उचललाय?
एकतर कुणाबद्दल काय ते नीट काही कळत नाही. त्यात त्या वागळ्यांचा डोकं उठवणारा फॉर्म्याट.
सुवाच्य स्पष्ट अन रसाळ कायतरी सांगा की.
राग मानू नका पण दोनदा वाचून पण कळले नाही.

अद्द्या's picture

16 May 2015 - 4:49 pm | अद्द्या

राग मानू नका पण त्यात दोनदा वाचून न कळण्यासारखं काहीच नाहीये . .
एकदा नीट वाचा दोन्ही भाग . . सुरुवातीला प्रत्येकाची नावे / आयडीचं नाव "सुवाच्य आणि स्पष्ट" सांगितली आहेत . . वाचा बघू

टवाळ कार्टा's picture

16 May 2015 - 5:31 pm | टवाळ कार्टा

नया हय वह ;)

अद्द्या's picture

16 May 2015 - 5:34 pm | अद्द्या

३ वर्ष होत आलीत कि राव

सदस्यनाम's picture

16 May 2015 - 5:39 pm | सदस्यनाम

आ तिज्यायला. स्कोर सेटलिंग???
कशात नया रे लाडोबा?

अत्रुप्त आत्मा's picture

16 May 2015 - 6:28 pm | अत्रुप्त आत्मा

नाख़ून काका, टुमच्या या परि सं वादात, एक हत्ती घुसला होता ना होssssssss!!! ? :-D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 May 2015 - 7:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पुढचा मोठा भाग त्यांच्यासाठीचं हावं बुवा.

अत्रुप्त आत्मा's picture

16 May 2015 - 8:14 pm | अत्रुप्त आत्मा

@पुढचा मोठा भाग त्यांच्यासाठीचं हावं बुवा.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing009.gif अगदी अगदी!

हवा मस्त हाये कोल्लापुराची!!!

अन्या दातार's picture

16 May 2015 - 8:01 pm | अन्या दातार

स्क्रिप्ट रायटर, जाता जाता उडवता किती लोकांची टर??

अत्रुप्त आत्मा's picture

16 May 2015 - 8:16 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing005.gif अन्या-दा-टर! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt002.gif

gogglya's picture

17 May 2015 - 11:35 am | gogglya

+१

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 May 2015 - 1:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नावाडणाव बंधुंच्या नावाची टर उडवल्याबद्दल णीषेध. योग्य धाग्यावर सूड घेण्यात येईल ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी ;) ;) :P

श्रीरंग_जोशी's picture

17 May 2015 - 8:57 am | श्रीरंग_जोशी

पहिल्या भागाने वातावरणनिर्मिती केली अन हा भाग फारच छान रंगलाय.
पुभाप्र.

वा वा!! आमचा नंबर दुसर्‍याच हप्त्यात लागला!!

धन्यवाद!!

सस्नेह's picture

17 May 2015 - 2:01 pm | सस्नेह

जोरात आहे की हवा !
प्रवासातून परत आल्यावर मी हवेचा झोका घेणार +)