चला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची)

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
12 May 2015 - 11:33 am

चला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची)

यातील काही बाबी बिनबियांच्या गोष्टी असल्या तरी काही बियांच्या आहेत, त्या त्या बिया कोल्हापूर कट्टेकर्यांना माहीती आहेत

तर मंडळी कसे आहात आप आपल्या जागी पी सी समोर, मजेत आहात ना मजेत रहा ह्सत रहा अधून मधून फसतही रहा. हसताय ना, मी निटेश सांगळे.
नाही नाही इथल्या हितेशशी माझा काहीही संबंध नाही ते कधी मधी हिताची बात करतात मी संहीतेतल्या दुरूस्त्या करतो. आणी त्या वेळीच सांगतो थोडक्यात स्वसंपादन.

तर मंडळी या कट्ट्याला आलेल्या लोकांचा सत्कार करायची लै जुनी फॅशन आहे आम्च्या कल्लापूरात (स्वगतःपरंपरा म्हटल की पुरोगामी असल्याचा शिक्का बसतू नव्ह आम्च्यावर) फॅशन कसा मॉर्डन शब्द वाटतो. हा सत्कार करायला येताहेत तुमचे आमचे लाडके (लाडोबा नाही ला$$$$$$$डके) धरून सत्कारपुरे.

गडबड करू नका, शांत बसा, नमस्कार !!!! मी “धरून सत्कारपुरे” आपल्या कट्ट्याला राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या कट्टेकरी मिपाकरांचा सत्कार करण्यासाठी उभा आहे. हा सत्कार करण्याचे काम कट्ट्याचे आयोजक श्री अन्या दातार यांना दिले होते पण त्यांच म्हणण पडलं की मी सगळ्यांचा सत्कार केला तर माझा सत्कार कोण करील आणि

आज मी जर कांदा-पोहे चुकिवले तर पुन्हा सुट्टी काढावी लागेल तेव्हां तुम्हीच सत्कार करा. माझा सत्कार करण्याचा दांडगा अनुभव अस्ल्याने दुसरा काहीच्च टाइमप्पास नसल्याने मी होय म्हटलं

.तर असो.

तर या ठिकाणी बरीच मिपाकर मंडळी आली आहेतच पण खास थेट पुण्यावरून ज्यांना मिपाकर व्हायचय असे श्री हर्शद शाह असे व्यक्तीमत्व्ही आले आहे. यांचे बद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे भाजपाच्या अमित शहांचे बंधू ....

निटेश सांगळे: अहो काही काय सांगताय ते आर्कीटेक्ट आहेत आणि फकत आडनाव सारखे आहे त्यांचा अमित शाह यांच्याशी काहीही संबध नाही पाहिजे तर श्री गुरुजींना विचारा.

ध.स.: अस्का नाही मला वाटलं शाह सेम सेम आणि ते तिकड भाजपाची सदस्य वाढवतात हे मिपाचे सदस्य वाढीवतात म्हणून. स्वारी बरका आमच्या सारख्या अडाणी मानसांना फार माहीती नसतेना तुम्हाला सांगतो आम्च्या गावी रोजचा पेपर रद्दीत गेल्यावरबी शिळा होत नाही. आम्ही तर आमच्या वाडीतला एक्मेव वाणी पेमाशेठच्या दुकानात रद्दीतला पेपरबी वाचत बसतो.

तर असो ज्यांनी स्वतः दुबईत चांगली अठ्ठावीस वर्से दुबईत काढली आहेत. शाह साहेब येक विचारू का म्हणजे तिकड दुबैत दोन मराठी माणसं भेटली की अरबीत बोलतात की हिंदीत ?

शाह साहेब : नही ऐसा कुछ मुझे दिखा नही लेकिन हा यहा ट्रेन्से बंबै जाते समय जैसेही कर्जत से आगे निकले, हर आदमी दुसरेसे सिर्फ हिंदी मे बात करता है.असल्मे वो मराठी होते है लेकिन फिरभी हिंदीमे बाते करते है अगर कहीं परेशाने हो तो बीचमे मराठींमे बात करते है.

ध.स.: वो क्या है हमारा हिंदी मोडका-तोड्का है इसलीये हम तुम्हारा सत्कार मराठीमें करता है चलेगा ना!!

शाह साहेब : जरूर जरूर, दर असल मै देखना चाहता था मिपा सोशल वेब साईट्के लोग एक दूसरेको मिलनेके लिए इतनी दूरसे कैसे आते है, इअसए मै चला आया अभितक मै वो क्या बोलते है "वाचक" ही हूं लेकिन जल्दही सदस्य बनूंगा!

ध.स.: तर ज्यांचे जावई व मुलगी दुबईतील एअरलाईन मध्ये आहेत आणी कन्या दुबईतील मराठी मंडळात आपली कला सादर करते अश्या शाह साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रीत करतो शतःप्रतीशतःमिपा अभियानाचे पुरस्करते श्री धरून सत्कारपुरे.

या नंतरचे व्यक्तीमत्व म्हणजे साक्षात वेताळ साहेब या ठिकाणी आले आहेत यांच्या बद्दल सांगयचे म्हणजे जरी आय्डी वेताळ असला तरी अजिबात भूतासारखे न दिसणारे एक गोंडस आणि कोल्हापूरी व्य्क्तीमत्व आहे्. फार जुने सदस्य असून काही धाग्यांवर यांच्यावर पाशवी शक्तींचा हल्ला झाल्याने ते सध्या झाडावरून स्वारी जागेवरून्च फक्त वाचन करतात. सर तुम्ही तुम्च्या संगणक दुरूस्तीचे काही अनुभव का लिहित नाही, मागे नाही का परासरांनी कॅफेतले किस्से सांगून लै टीआर्पी मिळिवला तुम्ही पण सांगा काही असे अनुभव. तस असो अश्या वारणेचा ढाण्या वाघ व संगणकाची हाडं खिळ्खिळी करून पुन्हा नव्याने जोडणारे संगणक डॉक वेताळ यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रीत करतो दिसला कळ्फलक की बडव बेधडक संघटनेचे श्री धरून सत्कारपुरे.

या नंतरचे व्यक्तीमत्व हे माणसांपे़क्षा दगडात जास्त रमते असे, नाही नाही त्यांचा डबराचा व्यवसाय नाही का दगडाच्या खाणी नाहीत पण त्यांना जुनी देवळं म्हणून नका, लेणी म्हणून नका, वीर गळ म्हणू नका, गधेगाळ म्हणू नका तिथली शिल्प (का शिल्प्या) जास्ती आवडतात.त्यांनी नाव असं का घेतलं ते कळलं नाही मला "खल्ली" म्हणून, म्हणजे उंच आणि धष्टपुश्ट म्हणून घेतले का काय....

निटेश सांगळे: अहो काही काय सांगताय ते नाव वल्ली असे आहे आणि तुम्ही काहीही वाचताय जरा नीट लिहून आणत जा आणि ते संपादक आहेत तेव्हा नीट वाचा.

ध.स.: अस्का, नाही जरा नीट लिहित जारे पोरांनो एक दिवशी माझा आय डी उडवाल मिपावरून, वल्ली साहेब तुम्हाल सांगतो ही पोरं चुकीचे लिहितात हो आणि मला बोलणी खावी लागतात. स्वारी बरका आमच्या सारख्या अडाणी मानसांना फार माहीती नसतेना

बर एक विचारू का म्हणजे ऐकलेला किस्सा आहे म्हणून राग मानू नका आम्च्या कडे सारखं लोड शेडींग असल्याने आणि सगळ्यांना मोबाईल वर नेट परवडत नसल्याने काहीच अप्डेट घेता येत नाही. तेव्हा तुम्हीच खुलासा करा

म्हणजे तुम्ही एका कांदा पोह्याच्या कारेक्रमात डायरेक विचारले की तुमच्या मुलीची हनुवटी अगदी गुप्तकाळातील दर्पण सुंदरी सारखी आहे म्हणून तुमचा गुप्तांशी काही संबध आहे का (तुम्हाल शालिवाहन-मौर्य सार्खे गुप्त घराण्याबद्दल बोलायचे होते) पन ते लोक रागाने निघून गेले.
तुमच्या धायरीकर मित्राला कळाल्याबरूबर त्यांनी याचा पत्ता लावला.हे त्या मुलीकड्च्या लोकांचे घरी गेले आणि चौकशीसाठी शेजारी विचारले तेव्हा कळाले तर ते घर सोडून गावाला गेले गेले आहेत. धायरीकरांनी पाटी पाहिली शेजार्यांची तर ती होती "गुप्ता"

वल्ली: नाही ह्या अफवा आहेत माझ्या नावावर, माझेच काही मित्र खपवतात तुम्ही लक्ष देवू नका.

ध.स.: अस्का स्वारी बरका आमच्या सारख्या अडाणी मानसांना फार माहीती नसतेना मला वाटलं इतके तुमचे कंपूतले मित्र आहेत आहेत तेव्हा खरं सांगतील तर असो. असे दगडात कला सौदर्य शोधणारे "अगोबा-वल्लेश गड चढवी” नावाने प्रसीद्ध आणि शीग्र्काव्याचे खंदे समर्थक यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रीत करतो माझ्या मना दगड बन दिसेल त्याला रगड म्हण संघटनेचे श्री धरून सत्कारपुरे.

या नंतरचे व्यक्तीमत्व हे साक्षात पोप असून ते चर्चेमधून चर्चेमध्ये आलेत म्हणजे चर्चमधून येथे चर्चेत आले आहेत...

निटेश सांगळे: अहो काही काय सांगताय ते सदस्य नाव प्रगो असे आहे आणि एका धाग्यासाठी त्यांनी पोपशास्त्री असे नाव घेतले होते त्याचा शॉर्टफॉर्म म्हणजे पोप आहे आणि तुम्ही काहीही वाचताय जरा नीट लिहून आणत जा आणि ते विद्रोही-ज्वालाग्राही लेखक आहेत तेव्हा नीट संभाळून वाचा, एखादा प्रक्षीप्त धर्मग्रंथ फेकून मारतील तुम्हाला !!!!

ध.स.: अस्का नाही जरा नीट लिहित जारे पोरांनो एक दिवशी माझा आय डी उडवाल मिपावरून, प्रगो साहेब तुम्हाल सांगतो ही पोरं चुकीचे लिहितात हो .
स्वारी बरका आमच्या सारख्या अडाणी मानसांना फार माहीती नसतेना.बर तुम्ही तो पोरगी पटाव शास्त्रावर एक लेख लिहिला होता त्याचा पुढचा भाग कधी येणार आहे ते सांगा
.
तुम्हाला सांगतो आम्च्या गावाची पोरं लै वाट पाहून राहीली आणि जरा ग्रामीण भागाचाबी विचार करा तुम्ही फकस्त पुण्या-मुबैंचा सल्ला देताय !!! आवो गावाकडंबी ह्या सल्ल्याची जास्ती जरूरी हाये. गावातल्या सम्द्यां धर्मेंद्राना हेमामालीनी थोडीच मिळती एखादी नमी-कमीच त्यांची ड्रीमगर्ल. काय ?

सर तुमच्या एकूण दाढी आणि राजस्-गोंडस व्यक्तीमत्वा वरून एक सल्ला देऊ काय, म्हणजे राग नका मानू बरकां!!! म्हणजे काय तुम्ही भगवी कफनी-क्मंडलू असा पेहराव केला ना की तुम्ही नक्कीच साधूबाबा बनून जाल

डोक्याला शॉट लिखाण करताच तेच फक्त प्रवचनात करायचे. आणि तशेबी तुम्ही आम्च्या गावात पोरा-पोरींअम्ध्ये लै फेमस आहातच. तेव्हा जरूर विचार करा एकदम बिन्-भांडवली धंदा हाये ह्यो. मी आम्ची रानातली पांढ्री मळ्याजवळची जागा देतो तुम्हाला.गुलाल बुक्क्याचं आणि पेढे हाराच दुकान फक्त माझं राहील तेव्ह्ढं बघा.

त्याच काय आहे मिपावर संधीसाधू लै हायेत पण तुम्ही खरे साधू आणि तुमचे विचारबी काळाच्या लै पुढ्चे हायेत असं आम्हाला कळलय.

पोपशास्त्री : तुम्हाला माझा मुद्दा कळला नाहीये खर तर मी पोपशात्रावर एक सटीप आणि सखोल ग्रंथ लिहिणार आहे पण ततपूर्वी काही आभ्यासासाठी परदेश गमन करावे लागेल (परदेशातही काही ठिकाणी भेटी देणे अनिवार्य असेल) त्यानंतर मि मिपावर राहिलो तर नक्की विचार करू.

तर अश्या काळाच्या पुढ्चे विचार असलेल्या आणि गोडबोले व्यक्तीमत्वाचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रीत करतो आली लहर केला कहर संघटनेचे श्री धरून सत्कारपुरे.

क्रमशः

पुढील भागातील सत्कारर्थींनी व्यनीत भेटा.

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 May 2015 - 11:39 am | मुक्त विहारि

हे वाचून बरे वाटले.

भिंगरी's picture

12 May 2015 - 11:41 am | भिंगरी

मस्तच प्रकार कट्टा वृत्तांताचा.
आवडल्या गेला आहे.

पैसा's picture

12 May 2015 - 11:41 am | पैसा

हहपुवा! कांदेपोह्यांचा किस्सा घडण्याची ९९% शक्यता आहे!

=)) =)) =))

अवांतरः ९ तारखेला सकाळी आमचे डायवर साहेब आणि संध्याकाळी अस्मादिक तापाने स्थानबद्ध झाल्याने पुढचे सगळे पोग्राम्स फिस्कटले आणि आणि आम्ची टांगारू लोकांत शिरगणती झाली त्याबद्दल क्षमस्व. कट्टेकर्‍यांसाठीचे काजू आणि मानकुराद आंबे डायनिंग टेबलावर ठेवले आहेत. आपापले घेऊन जाणे.

=)) =)) =))

बॅटमॅन's picture

12 May 2015 - 12:15 pm | बॅटमॅन

टांगारू शब्द बाकी भयंकर आवडल्या गेला आहे.

यशोधरा's picture

12 May 2015 - 12:28 pm | यशोधरा

टांगारु शब्दाची रॉयल्टी पाठवणे. काजू आणि मानकुराद आंबे रॉयल्टी म्हणून चालतील.

पैसा's picture

12 May 2015 - 12:30 pm | पैसा

नक्की देते म्हटलं तर आता पुढार्‍यात जमा होईन! त्यामुळे बोलत नाही.

बॅट्या, टांगारू शब्दाचा उगम कळला ना आता? =))

बॅटमॅन's picture

12 May 2015 - 2:15 pm | बॅटमॅन

ळॉळ कळाला. =))

आहाहा...अडाणी अडाणी म्हणुनशान चांगला "सत्कार" समारंभ सुरु झाला हाय की... ;)

{को.क.क्र ले वाचण्यास आतुर} ;)
{प्रेमळ बाणमारे } ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामत

प्रमोद देर्देकर's picture

12 May 2015 - 12:15 pm | प्रमोद देर्देकर

ळोळ !
नाखुकाका तुम्ही झी टिव्हीवर मस्त स्क्रिप्ट लिहु शकाल.

अत्रुप्त आत्मा's picture

12 May 2015 - 12:38 pm | अत्रुप्त आत्मा

@सर तुमच्या एकूण दाढी आणि राजस्-गोंडस व्यक्तीमत्वा वरून एक सल्ला देऊ काय, म्हणजे राग नका मानू बरकां!!! म्हणजे काय तुम्ही भगवी कफनी-क्मंडलू असा पेहराव केला ना की तुम्ही नक्कीच साधूबाबा बनून जाल>> =))))))) +++++++११११११११ =))

प्रसाद गोडबोले's picture

12 May 2015 - 4:15 pm | प्रसाद गोडबोले

दुत्त दुत्त :-\

ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ

अवांतर : आमच्या जगप्रसिध्द दाढीमुळे आनेवाडी टोल नाक्यावर एक बॉबी विक्रेता आम्हास म्हणाला "शिवाजी महाराज , बॉबी (ज्युल्या) घेणार का ;) ? "

अत्रुप्त आत्मा's picture

12 May 2015 - 4:53 pm | अत्रुप्त आत्मा

@एक बॉबी विक्रेता आम्हास म्हणाला "शिवाजी महाराज , बॉबी (ज्युल्या) घेणार का ;) ? ">> ख्या................क्क! बिच्चारा! त्यास हिंन्दू औरंगजेब शिवाजी सारखा वाटला! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

वेल्लाभट's picture

12 May 2015 - 12:50 pm | वेल्लाभट

खलास ओळख परेड ! क्या बात है वाह !

अन्या दातार's picture

12 May 2015 - 1:00 pm | अन्या दातार

आयला!! वृत्तांतही क्रमशः?? झक्कास. नादखुळाच एकदम!

प्यारे१'s picture

12 May 2015 - 1:06 pm | प्यारे१

खासच!

मधुरा देशपांडे's picture

12 May 2015 - 1:35 pm | मधुरा देशपांडे

जबरदस्त लिहिलंय.

सस्नेह's picture

12 May 2015 - 1:49 pm | सस्नेह

नाखु राॅक्स !
त्यांचा सत्कार कोण करणार बोला !!

प्रचेतस's picture

12 May 2015 - 2:06 pm | प्रचेतस

खुसखुशित सुरुवात.

ठळक वैशिष्ट्ये...(फक्त प्रवासादरम्यानची)

गंडवणारे जीपीस
जोशी भोजनालय
हिरवागार प्रदेश
दिक्पाल, सुरसुंदर्‍या आणि विषकन्या
मिसळीसाठी काहिही
गोटीसोडा आणि निर्व्याज हसू
समज, स्वमतांधता, मुद्दा आणि पोथी

मोहन's picture

12 May 2015 - 2:11 pm | मोहन

मस्तच जमलय ! पु.भा.वा.पा.

कट्ट्याची खास नाखुस्टाईल ओळख. एकच नंबर आवडल्या गेली आहे!

अनन्न्या's picture

12 May 2015 - 3:51 pm | अनन्न्या

क्रमशः?

कविता१९७८'s picture

12 May 2015 - 3:59 pm | कविता१९७८

छान लिहीलय

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2015 - 7:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

झॅक हाय !

यूंद्या बिगीबिगी फुडचे ५-१० भाग :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2015 - 7:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

आनि फटू कुटं ग्येलं म्हनावं ?

खेडूत's picture

12 May 2015 - 7:31 pm | खेडूत

नुसती धमाल!
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत !
हा कट्टा सुरु असताना कोल्लापुराच्या कडेकडेने बंगळुरास यावे लागले याचा खेद आहे.
असो. फुडल्या खेपेला जमवुया...

स्रुजा's picture

12 May 2015 - 8:37 pm | स्रुजा

हाहा झकास !

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 8:57 pm | टवाळ कार्टा

हायला...कस्ला वृत्तांत लिहिला आहे....भारी म्हणजे भारीच

"ओळख करून हवी असेल तर व्यनि करा"-मार्केटिंग ?

संदीप डांगे's picture

13 May 2015 - 1:15 am | संदीप डांगे

येथे कर माझे जुळती.... _/\_

इशा१२३'s picture

13 May 2015 - 11:57 pm | इशा१२३

मस्त लिहिलय...

प्रीत-मोहर's picture

14 May 2015 - 8:15 am | प्रीत-मोहर

सॉलीड कट्टा वृत्तांत

अजया's picture

14 May 2015 - 8:26 am | अजया

मस्त ओळखपरेड !पुभाप्र.

श्रीरंग_जोशी's picture

14 May 2015 - 8:32 am | श्रीरंग_जोशी

मजा आली वाचताना.

नूतन सावंत's picture

14 May 2015 - 9:26 am | नूतन सावंत

लाय भारी गजाल.मस्त मजा येतेय.पु.भा.प्र.