शिक्षक दिन

इनोबा म्हणे's picture
इनोबा म्हणे in जे न देखे रवी...
2 Jan 2008 - 9:27 pm

हि कविता मी संकलीत केलेली आहे.मुळ कवीची माहिती कवितेखाली दिली आहे.

पाच सप्टेंबर दिन उजाडला
जाऊ सत्काराला शिक्षकांच्या
शाळा रंगवली हार मागविले
गळ्यात घातले पुढार्‍यांच्या.
करूनिया स्मित स्वारी पुढे आली
भाषणास केली सुरुवात
तास सव्वातास भाषण सुंदर
दारुबंदीवर त्यांनी केले.
त्यांच्या पाठोपाठ दुजा उठे कोणी
गरिबीचा त्यांनी नारा दिला.
गरिबांच्या पाठी म्हणे कोण आहे
शल्य बोचते हे अंतरात
तसेच दाबून धरून हृदय
संपवी वक्तव्य दीनांसाठी.
शेवटी म्हणाले अध्यक्ष सन्मान्य
केले उपकृत बोलावून.
आम्हावरी लोभ ठेवावा असाच
पुढल्या खेपेस येऊ खास.
शिक्षक दिनाचा ऐसा सोहळा
भ्रमाचा भोपळा नित्य हाती!

कविता संग्रहः शब्द मनातले
कवी: अतुल व्यं.देशमुख
प्रकाशकः ग्रंथविशेष प्रतिष्ठान
© सौ.स्मिता देशमुख

कविताराजकारणशिक्षणविचार

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

3 Jan 2008 - 5:07 am | विसोबा खेचर

कविता ठीक वाटली...

तात्या.