मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट.
मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव.
आमच्या वडीलांचे आणि आईचे मात्र देवाशी फार काही पटत नाही.तसे दोघेही फिरायला वगैरे जातात, पण मुद्दाम जेजुरी किंवा आंबिजोगाईला जात नाहीत.
आमचे लग्न झाले आणि लग्नाच्या वेळी समजले की, आमची बायको फार धार्मिक.(तसे लग्ना आधीच थोडी-फार कल्पना आली होती.पण लग्ना नंतर शिक्का-मोर्तब झाले.)
आमचे कुलदैवत म्हणजे जेजूरी.लग्ना आधी एकदा जावून आलो होतो.पण तिथला बाजार बघून मला परत तिथे पावूल ठेवू नये, असेच वाटत होते.
लग्ना नंतर परत एकदा जेजूरीला भेट द्यावी लागणार होती.बायकोचा तसा हट्ट पण होताच.लग्ना नंतर वेळ-काळ बघून मी आणि बायको, जावून आलो.तिला पण माझ्या सारखाच अनुभव (पुजार्यांचे पैसे काढणे) आल्याने, ती म्हणाली, "हे नक्की देवस्थान आहे की, पुजार्यांसाठी टांकसाळ?"
असो,
पुढे नौकरी बदलल्याने, चिपळूणला गेलो.सहज म्हणून गुहागरला गेलो.छान समुद्र-किनारा आणि बाजूलाच मंदिर.का कुणास ठावूक, पण मंदिरात अभिषेक करायची, मनापासून इच्छा झाली.सकाळ असल्याने मंदिरात चौकशी केली.
भटजी म्हणाले,"बसा.करू या अभिषेक.आता ही बॅच संपली, की नंतर तुमचाच नंबर."
मी, " अहो, पण माझ्या कडे पुजेचे सामान किंवा पीतांबर तर सोडाच.जानवे पण नाही."
गुरुजी,"ते होईल हो.तुम्ही बसा तर खरे."
जेजूरीचा अनुभव असल्याने, हा भटजी आता किमान ५०१/- रु. तरी काढणार्,ह्यांत शंका न्हवती.
एक अर्ध्या तासातच आधीच्या मंडळींचा अभिषेक झाला, आणि आमचा नंबर लागला.
गुरुजींनी मस्त पीतांबर नेसवले आणि आत गाभार्यात गेलो.
जानवे घातले आणि मस्त साग्रसंगीत पुजा झाली.
दक्षिणा विचारली.
भटजी,"अभिषेक करून तुम्हाला समाधान वाटले का?"
मी,"हो."
भटजी,"मग तुम्हाला योग्य वाटेल ती दक्षिणा द्या.मला ५/- दिलेत तरी चालतील."
योग्य ती दक्षिणा दिली आणि एकच ठरवले, परत जर कधी अभिषेक करावासा वाटला तर गुहागरलाच जायचे.
डिस्क्लेमर : देव देवालयांत नसून आपल्याच मनांत असतो, ह्यावर माझा ठाम विश्र्वास असल्याने, मी शक्यतो घरच्या कुठल्याच कार्याला भटजी बोलवत नाही.आमच्या घरी सुपारीचाच गणपती असतो आणि आमच्या सत्यनारायणाला भटजीची आवश्यकता नसते."
प्रतिक्रिया
23 Jan 2015 - 1:47 am | hitesh
धर्म हा इश्वरनिर्मित नसुन मानवनिर्मित व्यवसाय आहे
23 Jan 2015 - 12:21 pm | प्रसाद गोडबोले
आजकाल तुमच्या , नेफळे , माई वगैरे लोकांच्या प्रतिसादाचा चांगला अंदाज बांधता यायला लागला आहे मला ;)
23 Jan 2015 - 1:48 am | कंजूस
पटलं. हिंदुधर्मात अशी काही मतं व्यक्त करायचं आणि वेगळं वागण्याचं स्वातंत्र्यतरी आहे हेही नसे थोडके.
23 Jan 2015 - 5:39 am | खटपट्या
१००% सहमत. माझा गोरा बॉस मला विचारत होता की हींदू धर्मात असे काय आहे की तो तुला वेगळा वाटतो. मी सांगीतले की हींदू धर्म म्हणजे स्वातंत्र्य. अमकेच एक पुस्तक वाचले पाहीजे. नमाज पडलाच पाहीजे. पुजा केलीच पाहीजे असे काही नाही. कोणताही धर्मग्रंथ वाचा. कुराण वाचा, बायबल वाचा. मसजीदमधे जाउन नमाज पडा. चर्चमधे जा. काहीही खा. अगदी गोमांससुध्दा !! सर्व धर्म पाळायचे स्वातंत्र्य ज्याला आहे तो हींदू.
23 Jan 2015 - 10:45 am | टवाळ कार्टा
अगदी गोमांससुध्दा >> याबाबत साशंक पण बाकी सग्ळे बरोबर
23 Jan 2015 - 11:09 am | डॉ सुहास म्हात्रे
अगदी गोमांससुध्दा >> याबाबत साशंक पण बाकी सग्ळे बरोबर
इंडोनेशियाच्या बाली प्रांतामध्ये ८०% पेक्षा जास्त जनता हिंदू आहे. तेथिल जनता गोमांस खाते, सणासुदीला तर नक्कीच (भारतात कोंबडी-मटण खाल्ले जाते तसेच). फक्त पुजारी मंडळी (ब्राच्मन) गोमांस खात नाहीत. अनेक संप्रदाय आणि चार वर्ण असले तरी त्या सर्वांत रोटीबेटी व्यवहार सहजपणे होतात.
बालीत हिंदू धर्म भारतातून गेला. मात्र गेल्या काही शे वर्षांच्या इंडोनेशियाच्या मुस्लिमीकरणाच्या प्रक्रियेने ते बेट सर्व बाजूंनी मुस्लिम समाजाने वेढले गेले आणि त्याचा भारतिय हिंदू समाजाशी संपर्क तुटला होता. हा इतिहास पाहता जातीव्यवस्थेची, शाकाहाराची आणि विषेशतः गोमांस न खाण्याची रुढी सुरू होण्यापूर्वी भारतातल्या हिंदू धर्माची काय परिस्थिती असावी याचा ठोकळ अंदाज बालीवरून यावा.
बाकी प्राचीन भारतिय साहित्यात गोमांस खाण्याचेच नव्हे तर यज्ञाच्या कोणत्या प्रकारच्या पुरोहितांना यज्ञात बळी दिलेल्या पशूंचा (यात गायीबैलही होते) कोणता भाग द्यावा याचेही नियम नमूद केलेले आहेत.
अवांतर : अर्थातच, मांस / गोमांस खावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आणि हक्क आहे हे नि:संशय. पण त्याचा अस्मिता वगैरेसाठी उपयोग करणे हास्यास्पद आहे.
23 Jan 2015 - 3:46 pm | हाडक्या
अगदी मान्य..
फार काय पण आपल्याच देशात at least केरळमध्ये तरी कित्येक हिंदू कुटुंबे आवडीने गोमांस खातात.
खात्रीने सांगतोय कारण पद्मनाभन मंदीराच्या ब्राह्मण वारसदाराने बनवलेली मस्तपैकी केरला बीफ करी खाल्ली आहे. आणि इतर केरळीयांकडून हे जाणून घेतलंय की तिकडे बीफ खाणे हा मोठ्ठा मुद्दा नाहीये.
याच्याशी बाडिस
23 Jan 2015 - 3:49 pm | बॅटमॅन
बादवे, बीफ म्हणजे गायीचेच असते असे नाही ना?
23 Jan 2015 - 5:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
बीफ : पूर्ण वाढ झालेल्या गाय अथवा बैलाचे मांस.
वील (Veal) : गाईच्या वासराचे मांस.
कॅराबीफ (carabeef) : म्हैस अथवा रेड्याचे मांस.
23 Jan 2015 - 5:13 pm | बॅटमॅन
वील आणि कॅराबीफ या संज्ञा माहिती नव्हत्या. गाय-बैल व म्हैस-रेडा या चारांपैकी कुणाचेही मांस म्हणजे बॉफ असे अगोदर समजत होतो. आता उलगडा झाला. धन्यवाद.
23 Jan 2015 - 5:19 pm | हाडक्या
+१ .. हेच म्हणायला आलो होतो.
बादवे, भारतात बीफ मध्ये गाईपेक्षा बैल जास्त मिळतात असे ऐकून आहे ( प्रत्यक्ष विदा नाही आणि अनुभवही नाही).
गाई उपयोगी असतात म्हणून खाटकाकडे लवकर नाही पोचत. बैल आजकाल ट्रॅक्टर वगैरेमुळे लगेच पोचतात. आता बैलगाड्यांच्या शर्यती बंद झाल्या की तर Veal मध्येही त्यांचा टक्का अजून वाढेल.)
पाश्चिमात्य देशात मात्र या बाबतीत "गाय-बैल समानता" आहे. :)
व्यक्तिशः मी फक्त भारताबाहेर बीफ खाल्लय. भारतात बीफ न खाण्याचे कारण या प्राण्यांची निवड फक्त "अन्य उपयुक्तता संपल्यावर" आणि नकोसे झाल्यावर अशी होत असल्याने आणि बोकड अथवा कोंबडा जसा खाद्य-प्राणी म्हणून (पशु-शेती) वाढवला जातो तशी होत नसल्याने दर्जा बाबत शंकाच आहेत.
बाकी मांसाहाराबाबत एक धागा हवा राव. अजून हरिण वगैरे चघळायला येतील मग.. ;)
23 Jan 2015 - 6:22 pm | प्रसाद गोडबोले
एकदा रानडुकराची शिकार करुन बेत करावा काय हाडुकराव ;) ?
23 Jan 2015 - 6:32 pm | कपिलमुनी
रानडुकराची शिकार करणे बेकायदेशीर आहे !
23 Jan 2015 - 6:53 pm | प्रसाद गोडबोले
शेतात घुसलेल्या रानडुकराची शिकार करणे बेकायदेशीर नाही फक्त शिकार केरायच्या आधी पोलिसांना कळवावे की रानडुक्करे शेतात घुसुन नासाडी करीत आहेत , लोकांच्या जिवाला धोखा आहे .
मग शिकार करावी .
शिकार केली की वनविभागाला व्यवस्थित कळवावे , मग ते येवुन व्यवस्थित पंचनामा वगैरे करतात आणि रानडुकराला खड्डा वगैरे खणुन पुरतात आणि निघुन जातात .
ते निघुन गेले की लगेच त्याला परत बाहेर काढावे आणि वजन करुन वाटण्या बिटण्या करुन पुढील बेत करावा !!
असा विधी आजवर ऐकत आलो आहे , दुर्दैवाने कधी प्रत्यक्ष पहाण्याचा अनुभवण्याचा योग आलेला नाही . हमेरिकेत गेल्यावर एकदा तरी बिग गेम हंटिंग करायचा मानस आहे तिकडे इतके सव्यापसव्य करावे लागत नसावेत , स्टेट परमिट घेतले की झाले !
23 Jan 2015 - 7:19 pm | हाडक्या
एवढा सव्यपसव्य कुणी करायला सांगितलाय.. ? इथे आंग्लदेशात venison (शिकारीचे मटण) मिळते जे की नेहमी हरिण असते, ते आपले घ्यावे आणि खुश रहावे.
बाकी तुम्ही हे आधी कधी केलेत आणि खाल्लेत की आपले नुसतेच शब्द ? ;)
23 Jan 2015 - 7:33 pm | प्रसाद गोडबोले
श्या: 'विकत घेवुन' खाण्यात काय मजा . शिकार ती शिकारच
;)
तुर्तास नुसतेच शब्द आहेत हो ... येतो एकदा आंग्ल देशात.... मग जावुयात मृगयेला !!
23 Jan 2015 - 8:06 pm | हाडक्या
शब्दच काय.. बर्र.. :)
या या .. आमाला पण मृगया करायला आवडेल हो, ती पण मृगाचीच. पण इथे रानटी हरणं मारायला बंदी आहे. पाळीव हरणांचे पदार्थ हाटिलात मिळतात.
बादवे, भारतात रानडुकराच्या शिकारीबद्दल तुम्हास एवढे कसे माहीत असा प्रश्न पडलाय ? ;)
23 Jan 2015 - 11:15 pm | खटपट्या
कोकणात तर रानडुकराची शिकार सर्रास होते. आणि पोलीसही येत नाहीत. (तसे तर बोलावल्यावरही पोलीस येत नाहीत कोकणात :) ) पोलीस येउन मेलेल्या डुकराला गाडतात हे माहीत नव्हते. कोकणातले पोलीस तर वाटा घेउन जातील :)
24 Jan 2015 - 6:42 pm | हाडक्या
पोलिस गाडत नाहीत सहसा.. त्यांना ही लॉजिकल कल्पना अस्ते आता काय बेत असणार ते. मग बर्याचदा ते चिरीमिरी, वाटा किंवा मग पार्टीचा लाभ घेणे प्रेफर कवाटा, ते पण अगदीच त्यांच्यापर्यंत पोचले तर. तुमचे शेत असेल, तुमचे गाव असेल तर पोलीस पण तुमचेच असतात इकडून तिकडून.
23 Jan 2015 - 1:49 am | डॉ सुहास म्हात्रे
खरं आहे... म्हटलं आहेच ना की,
कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी ।
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी ॥
23 Jan 2015 - 1:51 am | रेवती
+१.
कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी ।
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी ॥
किती वर्षांनी वाचले.
23 Jan 2015 - 10:01 am | प्रमोद देर्देकर
आणि हे दुसरे उदाहरण
"देव देर्यात नाही देव नाही देवालयी" या गाण्यातल्या या ओळी
देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे
देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे
गदिमांना अभिवादन.
23 Jan 2015 - 8:20 pm | केदार-मिसळपाव
गदिमांना अभिवादन.
23 Jan 2015 - 8:51 pm | रेवती
होय दर्दूकाका!
23 Jan 2015 - 3:07 am | स्रुजा
आवडला आणि पटला पण . लग्न झाल्यावर आई आम्हाला घेऊन कोल्हापूर ला गेली होती , तिथे जाई पर्यंत गर्दी , उन , रजा असले विचार मनात येत होते. त्यात नवरा पक्का नास्तिक त्याच्या मते हे कर्मकांडांच स्तोम ( पण पन्हाळा बघायला म्हणून साहेब यायला तयार झाले होते ). ते एक डोक्यात नसतं टेन्शन. दुपारी १२ च्या दरम्यान पोहोचलो मंदिरात , पार्किंग ची शोधा शोध करून आत गेलो , लाईन होतीच बऱ्यापैकी . पण आमचा नंबर आला आणि आरती ची वेळ झाली. त्या दिवशी गाभाऱ्यात फक्त बायकांना प्रवेश होता आरतीच्या वेळेला , आई मी आणि बहिण असं तिघींना गुरुजी आत घेऊन गेले , आत सगळ्या बायका होत्या . आत गेलो , आरती सुरु झाली आणि तो माहोल; तो गाभारा; देवीचा मुखवटा बघून अक्षरशः तिघींचे डोळे एका च वेळी भरून आले . का ? ते अजून ही कळलं नाही पण खूप खूप समाधान वाटून गेलं . तेन्व्हापासून कोल्हापूर आवडीचं मंदिर झालं आहे. तुमच्या गुहागरच्या आठवणीने ही आठवण ताजी झाली .
जाता जाता : बिना गूरुजी सत्यनारायण कसा करायचा? इथले गुरुजी पूजा सांगायचे २०० $ घेतात , दक्षिणा आणि सामग्री अलग . एवढ्यात देव अक्खा भेटेल . म्हणून विचारते आहे. शिवाय मराठी गुरुजी नाही कुणी इथे.
23 Jan 2015 - 3:40 am | मंदार कात्रे
२००$ ? काय संगताय काय?
मीही येतो तिकडे. एक मराठी गुरुजी मिळेल तुम्हाला ;)
23 Jan 2015 - 3:42 am | मंदार कात्रे
रच्याकने , कोकणात शक्यतो सर्वत्र चांगलेच अनुभव येतील मुवि जी. मीदेखील इन्जिनीयरिंग पूर्ण होण्याआधी अर्धवेळ पुरोहितच होतो !
23 Jan 2015 - 4:14 am | मुक्त विहारि
एक गणपती-पुळे सोडले तर कोकणात "देवस्थाने आणि भटजी" ह्यांचा अनुभव उत्तम आहे.चिपळूणची विंध्य-वासिनी असो किंवा पावस किंवा मार्लेश्र्वेर किंवा वेळणेश्र्वेर..बहूतेक ठिकाणी भटजींचा अनुभव उत्तम आला आहे.जी दक्षिणा द्याल त्यात समाधान मानतात आणि कुठेही हपापले-पण नाही.
गणपती-पुळ्याला १९७२ पासून दरवर्षी जात असल्याने सध्या तरी गणपती-पुळे इथे न जायचा निर्णय घेतला आहे.
एक पिकनिक स्पॉट म्हणून गणपती-पुळे उत्तम.
चिपळूणला असतांना बर्याच वेळा गेलो आहे.पाहुणे मंदिरात आणि आम्ही समुद्र-किनार्यावर.
त्यांना मंदिरात देव भेटत असेल ही कदाचित, पण मला मात्र सुर्य-देव घरी जाता-जाता सुंदर रंगी-बेरंगी खेळ दाखवायचा.
"गणपती-पुळ्यातील गणपती-दर्शन---> उत्कर्ष की र्हास?" हा पण एक काथ्या-कुट होवू शकतो.
23 Jan 2015 - 5:59 am | स्पंदना
>>"गणपती-पुळ्यातील गणपती-दर्शन---> उत्कर्ष की र्हास?" हा पण एक काथ्या-कुट होवू शकतो. >>
या पेक्षा भारी काथ्या त्र्यबंकेश्वर मंदिर दर्शनाचा होउ शकतो.
आणि कुटायच म्हंटल तर मी त्या त्रंबकेश्वरच्या व्यव्स्थापनाला, चांगल उखळात घालुन कुटेन!! *aggressive*
23 Jan 2015 - 6:12 am | मुक्त विहारि
ह्या मंदिराबाबतीत आम्ही नशीबवान.
एका पुजार्याने एक नवा पैसा न घेता, मागच्या दरवाज्याने प्रवेश दिला.
असो,
देवाची मर्जी.
पण तिथला एकूण रागरंग बघता परत गेलो नाही.
23 Jan 2015 - 6:24 am | स्पंदना
अहो १५ वर्षापूर्वी त्या मंदिराच्या फरसबंदीवर एक कोपरा गाठुन गप्प बसलो होतो.
सारं मंदिर भोवताली फिरुन पाह्यलं होतं. तेथुन दिसणारा मागचा गोदावरीचा उगम असलेला डोंगर डोळेभरुन पाह्यला होता, आणि पायाखालुन झुळ्झुळ वाहणारं पाणी अनुभवलं होतं. या मंदिराच्या छताच्या तर मी खंप्लीट प्रेमात होते.
काय उरलय आता तेथे? भिकार व्यवस्थापन.
23 Jan 2015 - 12:28 pm | पैसा
त्र्यंबकेश्वराला त्या पुजार्यांच्या कैदेतून मुक्ती कधी मिळणार? मी आणि अपर्णा धडपडत तिथे पोचलो. रांगेत उभं राहण्याएवढा वेळ नव्हता. बाहेर देवडीवर बोर्ड लावलेला की पुजार्यांच्या माणसाला २०० रुपये द्या आणि लवकर दर्शन घ्या. फुकट २०० रुपये देण्यापेक्षा म्हटलं देवळाच्या आवारातून देवाचं लांबून दर्शन घेऊ आणि ते शिल्पसमृद्ध देऊळ बाहेरून तरी मनापासून बघू. कसलं नि काय! :( देवळाचा प्रांगणाचा मुख्य दरवाजा आणि मागचा दरवाजा दोन्ही दरवाज्यांवर पुजार्यांचे गुंड उभे होते. आम्ही आवाज चढवला पण त्यांनी प्रांगणात जाऊ दिलं नाही ते नाहीच. अपशब्दही वापरले. फक्त आम्ही बायका असल्याने धक्काबुक्की केली नाही इतकंच. पोलीस कुठेही नव्हते. देवळापासून एक किमि अंतरावर गाडी ठेवावी लागते. तिथे स्वस्तात दर्शन करवून देऊ असे बोर्ड आहेत. गाडी चोरीला जायची भीती आहे असे ही ऐकायला मिळाले. एवढ्या लांब जाऊन त्र्यंबकेश्वर काही भेटला नाही. विठोबाला मुक्ती मिळाली. असे आणखी किती देव पुजार्यांच्या विळख्यात अडकले आहेत तो देवच जाणे!
याच्या उलट अनुभव शिर्डी आणि कोल्हापूरला आला. शिर्डीला व्यवस्था उत्तम आहे आणि व्यवस्थापनाचे लोकही नम्रपणे वागतात. परवा पुण्याहून येताना मी आणि प्रीतमोहर कोल्हापूरला गेलो होतो. अंबाबाईच्या दर्शनाला पुन्हा रांग होती. पण दुसर्या दरवाज्याने आत जाऊन लांबून देवीचे दर्शन घेऊन सहज बाहेर पडता येते. सामान ठेवायला मोठे लॉकर्स तासावारी भाड्याने देवळाच्या व्यवस्थापनाकडून मिळतात. चपला ठेवायचे पैसे अपेक्षित नाहीत. खांद्यावरच्या बॅगा आणि मोबाईल आत न्यायला बंदी नाही. एकूण मनसोक्त देऊळ बाहेरून पाहता येतं, आणि फोटोही काढता येतात.
23 Jan 2015 - 12:43 pm | सविता००१
कोल्हापूर द बेस्ट.
मस्तच आहे.
त्र्यंबकेश्वर बद्द्ल अतीव सहमत.
तिथे आम्ही मैत्रिणी मैत्रिणीच गेलो होतो तरीही धक्कबुक्की होतीच. व्यवस्थित आवाज चढवला आणि नीट वागा म्हणून सांगितलं तेव्हा आमच्यापुरती तरी गुर्मी उतरली होती.
23 Jan 2015 - 12:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कोल्हापुरला दर्शन घ्यायची योग्य वेळ म्हणजे काकड आरती.
23 Jan 2015 - 3:08 pm | सूड
+१
23 Jan 2015 - 2:42 pm | उदय के'सागर
१५ दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वरला जाणं झालं, देव-दर्शनासाठी नाही पण काही नातेवाईंकाकडे जाण्यासाठी. गावात शिरता शिरताच त्या पार्किंगच्या इथला कलकलाट. तुम्हाला गावात गाडी नेता येत नाही, जरी मग देवदर्शनासाठी जात नसून नातेवाईकाकडे जायचं असेल तरीही. मग पार्कींग ची जी जागा होती, बापरे.. अशक्या चिचकुळ्या दगडांचं ते मैदान्, वाटलं गाडीचे टायर फुटतील. कश्याही गाड्या लावलेल्या, पार्कींग करण्यासाठी कूणी मार्गदर्शकही नाही. एवढ्या गर्दीत आणि तिथे फुगेवाले, भुट्टेवाले आणि इतर फेरीवाले - क-ह-र!!!
एवढं करून कशीतरी गाडी पार्क करून, पायी चालायला सुरुवात केली (विनावाहन रस्त्यावर) तर नुसत्या माणसांची ही अशक्य गर्दी, रस्ते छोटे आणि घाण तर... अगं आई गं.... विचारू नका. गाडीतून उतरल्या उतरल्या पहिलंच पाऊल माझं एका कागदी द्रोणावर पडलं त्यात समोस्याची गोड चटणी असावी ती माझ्या पायावर सांडली, फ्लोटर मधून पायात शिरलं ते सगळं आणि तसाच चिकट पाय घेत चालावं लागलं पाणी मिळेपर्यंत, संताप नुसता.
रस्त्यावर जनावरं कुठेही बसलेली, त्यांची घाण इतस्ततः.. खड्डे, त्यात साचलेलं पाणी त्यावर घोंघवाणारे किडे आणि त्याच्याच बाजूला खाण्याचे दुकानं आणि रमत-गमत खाणारे लोक. पर्यटक म्हणून किंवा भक्तगण म्हणून जे जातात ते एक-दोन फार्फार तर आठवडाभरासाठी तिथे जातात पण तिथले स्थानिक लोक कसे रहातात देव जाणे कि ते फक्त पैसा कमावतात त्यामुळे ह्या गोष्टींकडे त्याचं दुर्लक्ष असतं? हे सगळं त्र्यंबकेश्वराचं रुप पाहून वाटलं ईट्स वर्स्ट प्लेस ऑन प्लानेट
अरे ज्या देवाच्या भक्तीने ओढीने तुम्ही जाता, त्याच्या दारात येउन असली घाण करायची लाज नाही का वाटत? ज्याला मानता त्याची तरी कदर करा, ही कसली भक्ती.
23 Jan 2015 - 4:59 pm | स्पंदना
अब समझा? मै इतनी गुस्सा क्युं हुं?
23 Jan 2015 - 5:31 pm | असंका
कोल्हापूर बेश्ट हे तर खरंच...पण फोटो नाही काढता येत. एखाद्या वेळी पोलीस दुर्लक्ष करतात एवढंच.....
24 Jan 2015 - 10:20 am | hitesh
बॅक डोअर बॉय
23 Jan 2015 - 4:43 pm | सूड
अगदी!! आमच्या घरी जो येतो पुजा सांगायला तो मूळ गुहागरचा आहे. गेली जवळजवळ पाच-सहा वर्षे येतोय, पण दक्षिणा अमुक इतकी दे असं कधीही म्हटलेला नाही. भटजी कोब्रा असतील तर सांगितल्या वेळेला आणि तारखेला काहीही करुन हजर होतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे. ;)
23 Jan 2015 - 4:07 am | स्रुजा
तर काय ! आम्हाला वाटलंच होतं की थोडं महाग असेल म्हणजे ५० $ वगैरे. सामग्री वेगळी . त्याची तयारी होती आमची . २०० ऐकून च सर्द झालो. इथे जिथे मानवी हस्तक्षेप किंवा सहकार्य हवंय ते सगळंच महाग आहे पण साधारण ५०-६० $ तासाच्या हिशेबाने तुम्हाला ते सहकार्य मिळतं . आम्ही निघालो मग तिथून कसं बसं थातूर मातुर कारणं देत , आम्ही म्हणजे काय मीच. नवरा तिथे जणू भिंती बघायला आला होता.
तुम्ही येताय ? या न ! ओळख करून देते मराठी मंडळात तुमची . बाकी तुम्ही पण २०० च घेणार असाल तर मधुरा म्हणते ती सीडी आणा हो प्लीज :P
23 Jan 2015 - 7:13 am | रेवती
आमच्या इथले गुर्जी वास्तूशांतीला $१२५ पहिल्या दोन तासासाठी, जर यजमानाने टैमपास केला तर दोन तासापुढील प्रत्येक तासाला $१००. या धाकाने सगळे यजमान जय्यत तयारी ठेवतात, व पटापट आवरतात. ;)
23 Jan 2015 - 8:26 pm | केदार-मिसळपाव
अश्या धाकात केलेल्या पुजेचे थोडे नवल वाटले.
आजकाल हेच चाललेय घरोघरी.
23 Jan 2015 - 11:31 am | प्रभाकर पेठकर
मी नास्तिक नाही. पण कर्मकांडांचा मी तीव्र विरोधक नक्कीच आहे.
सत्यनारायण, गृहशांती, देवस्थान भेटी, वार्या आदी मी कधीच केलं नाही. बायको (अंध)श्रद्धावान आहे. तिच्या आग्रहाखातिर सोलापूर, पंढरपूर, आळंदी, जेजूरी, तुळजापूर, शिर्डी वगैरे ठिकाणी भेटी दिल्या पण देवस्थान परिसराची अस्वच्छ्ता, पुजारी-पुजेच्या सामानाचे विक्रेते, 'दलाल' आदींनी अत्यंत निराशाजनक अनुभव दिला आणि माझी नास्तिकता टोकाला पोहोचली. आस्तिक-श्रद्धावान विचारवंतांनी ह्यावर अनेकदा माझ्याशी वाद घालूनही मी बधत नाही पाहिल्यावर 'तूझी मतं तुझ्याजवळ, आमची मतं आमच्याजवळ' अशा वाक्याने वाद वादाचा समारोप करून माझे मुद्दे पटत असल्याचे स्विकारणे टाळले आहे. असो. हल्ली मी वादही घालत नाही.
सत्यनारायण, गणेश स्थापना, गृहशांती आणि इतर अनेक शुभ कार्यांप्रमाणेच श्राद्ध-पक्ष, अस्थिविसर्जन वगैरे कार्यही मी टाळतो. माझ्या मृत्यूनंतर देहदान करण्याबाबतही मी माझ्या बायको-मुलाजवळ बोललो आहे. माझे स्वतःचेही कुठलेच 'दिवस' कार्य करायची नाहीत असा माझा आग्रह आहे.
जी शुभकार्य करणे सर्वसामान्यपणे लोकांना 'आवडते' त्यातली कुठलीच मी आजतागायत केलेली नाहीत आणि करणार नाही. माझं कांहीही नुकसान झालेलं नाही. होमहवन, सत्यनारायण, भागवतसप्ताह, रोजची पूजाअर्चा वगैरे वगैरे करून आर्थिक स्पर्धेत इतरांवर अन्याय, दैनंदिन खोटारडेपणा, स्वार्थ, गैरव्यवहार करणारी अनेक माणसे फार जवळून मी पाहीली आहेत. (नीट परिक्षण केल्यास आपल्या सर्वांनाच ती दिसतील, कांही दिव्यदृष्टी लागत नाही). माणसांच्या वृत्तीतील हे वैगुण्य, विरोधाभास मला अधिकाधिक नास्तिक (त्यांच्या दृष्टीने) बनवितो. असो.
कर्मकांडं टाळा, सदवर्तनावर भर द्या. तुम्हाला कुठल्याही देवस्थानाची, भडजींची, मोठमोठ्या दक्षिणांची कधी गरजच भासणार नाही.
23 Jan 2015 - 11:48 am | खटपट्या
१००% सहमत काका.
कुलदैवत असल्यामुळे तुळजापूरला थोडा नाखुशीनेच गेलो होतो. पण देवळाच्या बाहेर घाण आणि डुकरे बघून उबग आला. त्यात हातात भेट्वस्तू घेउन फिरणारे फेरीवाले मागे लागत होते. मग त्यांच्यावरच राग काढायचे ठरवले. जो कोणी फेरीवाला येईल त्याला सांगायचो, "यावर तुमचे पोट आहे ना मग इथे जास्तीत जास्त लोक यावेत म्हणून तुम्हाला हा परीसर स्वच्छ ठेवावासा नाही वाटत?" यावर प्रत्येक जण "कुठून आलं हे यडं आमाला शानपना शीकवायला?" या अविर्भावात बघायला लागला.
शेवटी ही माझी इथली शेवटची फेरी असे घरच्याना सांगून तिथून काढता पाय घेतला.
--संपूर्ण नास्तिकतेकडे झूकत चाललेला
23 Jan 2015 - 11:49 am | टवाळ कार्टा
चायला घरातल्या देवघरात देव नसतात का ते सुट्टीवर गेलेले असतात?
23 Jan 2015 - 11:55 am | खटपट्या
घरातलं देवघर माझ्यासाठी नाहीये, मी कधीच मनोभावे हात जोडले नाहीत. उगाच खोटे कशाला सांगा.
23 Jan 2015 - 1:02 pm | प्रभाकर पेठकर
खटपट्या,
अहो, फेरीवाल्यांनाच काय, मी तिथल्या व्यवस्थापक्/विश्वस्तांना लेखी तक्रार दिली होती. त्या काऊंटरवरच्या माणसाकडे पाहिल्यावर तो म्हणाला, 'काय लागेल ते लिहा, साहेब. कोणी वाचत नाही ही तक्रारवही.' त्याच्या चेहर्यावरचा आत्मविश्वास कौतुकास्पद होता. त्यापुढे जाऊन मी तिथल्या जिल्हाधिकार्याकडेही तक्रार पाठविली. आजतागायत कांही उत्तर/कारवाई/कार्यवाही नाही.
23 Jan 2015 - 5:30 pm | हाडक्या
हा हा हा .. हे भारी होतं काका.
हेच आपल्या देशाचं दुखणं आहे. सर्वसामान्यतः लोकच इतके भ्रष्ट आहेत की सरकारला काय नावे ठेवायची ?
पण ही अस्वच्छता लोकांच्या धार्मिक भावना कशा दुखवत नाही हे कोडेच आहे.
शिकले सवरलेले लोक यापासून (म्हणजे तथाकथित धर्म, कर्मकांडे, संस्कृती इ.) दूर का जाताहेत ह्याचा मात्र याच स्वयंघोषित धर्म-रक्षकांना बोध होत नाही आणि मग मॅकालेपासून ते आजकालच्या पिढीपर्यंत सगळ्याचे उद्धार मात्र होत असतात.
23 Jan 2015 - 5:38 pm | बॅटमॅन
आणि हे अख्ख्या देशभरच होतं असंही नाही बरंका...दक्षिणेतली देवळं बरी स्वच्छ टापटीप असतात एकदम? मग बाकीच्यांना काय धाड भरलीये? वायझेड साले.
23 Jan 2015 - 5:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
बहुतेक देवस्थाने धर्मिक स्थाने न राहता "पैसा कमावणार्या धंद्याची स्थाने" झाल्याचे हे लक्षण आहे.
त्यामुळे,
देवस्थानांना भेट देणार्या गिर्हाईकांनी (श्रद्धाळू / पर्यटक) अस्वच्छता पाहून येणे बंद करायला लागल्याशिवाय स्वच्छतेवरचा खर्च हा "अनुत्पादक आणि पर्यायाने अनावश्यक खर्च" समजला जाईल.
: हुकुमावरून
23 Jan 2015 - 1:24 pm | अजया
अगदी पटला आवडला प्रतिसाद पेठकर काका.
23 Jan 2015 - 3:53 am | मुक्त विहारि
बिना गूरुजी सत्यनारायण कसा करायचा?
सत्य नारायणावर आधी पण विचार मांडले आहेत.त्याची लिंक मिळाली तर देतो.
आमच्या सत्यनारायाणाला मेहूण, ब्राह्मण किंवा कथा असे काही नसते.
अत्यंत खेळीमेळीच्या आणि घरच्या ग्रुहिणीला आराम देत शिवाय थोडे-फार व्यावहारिक शिक्षण घेत आमचा सत्य-नारायण होतो.
23 Jan 2015 - 4:27 am | मुक्त विहारि
http://www.misalpav.com/comment/reply/29413/630672
23 Jan 2015 - 3:55 am | मधुरा देशपांडे
सत्यनारायण पुजेची सीडी मिळते. ती आणु शकतेस. पुढच्या भारतभेटीत घेऊन ये किंवा कुणी येणारे असेल तिकडे तर त्यांना सांग.
23 Jan 2015 - 4:51 am | जुइ
कोल्हापुर हे आवड्ते देवस्थान आहे. त्याउलट अनुभव पंढरपुरात येतो ते तेथील पुजार्यांनमुळे. बाकी पुजा कशी करावी याची छोटी पुस्तके भारतात मिळतात.
23 Jan 2015 - 4:56 am | स्रुजा
अगं जर शोधाशोध करून app पण मिळालंय पण त्याचे पैसे दिल्याशिवाय ते कामाचं आहे की नाही कळणार नाही . गणपती बसवतो आम्ही दर वर्षी इथे तो अशाच एका app ची पूजा ऐकून च करतो , छान आहे ते app . हे पण तसं असलं तर बरं .
23 Jan 2015 - 5:16 am | अनन्त अवधुत
$२००? मला द्या, मी इकडेच असतो तुमचा तिकिटाचा पण खर्च वाचेल, शिवाय २०० मध्ये प्रसाद आणि पूजेचे सामान पण आणीन. पूजा online पण सांगू शकतो . सत्य नारायणाच्या पूजेला कशाला भटजी पाहिजे. आंतरजालावर शोधा समग्र पूजा कळेल. मी येथे सांगितलेली पूजा करतो.
23 Jan 2015 - 5:46 am | स्पंदना
सृजा, अग सीडी मिळते सत्यनारायण कथेची.
नाहीतर मी सांगू का? अगदी व्यवस्थीत पूजा मांड आणि घरच्याच भटजीला बसव कथा वाचायला.
पूजीसाठी भटजीच पाहिजे हे भटजींनी काढलेल्म पिल्लू आहे. खेड्यापाड्यातुन कुठे असतात भटजी? आमच सगळ बिन भटजीच चालत, आणि आमच्या देवाला चालत पण!!
23 Jan 2015 - 5:54 am | स्रुजा
अगं मला पण भटजी पाहिजेच असं नाही पण माझ्या नवऱ्याचा आनंद आहे एक नंबर या भानगडीत . मी नैवेद्याचा स्वैपाक करू का याला सांगू का आलेल्या मैत्रिणीला अटेंड करू असं होणार. गणपती बसवताना आम्ही ते app लावतो , तयारी असतेच, नवरा पूजा करतो , माझा स्वैपाक होतो एकिकडे . तसं मिळायला हवं गं . तुम्ही सीडी म्हणताय ती मी बघते बर्न करून मिळते आहे का , नाही तर i पूजा म्हणून app मिळालंय ते घेणार. आणि मला ना खरं तर , ते मंत्र वगैरे छान घरात घुमायला हवे आहेत , डिजिटल पण चालतील .
@ अनंत अवधूत , मी तुमची साईट बघितली आत्ता तरी डावून आहे , थोड्या वेळाने पुन्हा बघते . धन्यवाद.
23 Jan 2015 - 11:03 am | पिलीयन रायडर
पण मुळात सत्यनारायण करायचाच कशाला आहे तुला? तुझा देवावर विश्वास आहे तर मन लावुन पुजा कर, छान नैवेद्य बनव, सत्यनारायणाचा शिरा बनव, इच्छा असल्यास लोकांना घरी खायला बोलाव म्हणजे त्या निमित्त्ताने लोक येतात. पण २००$ खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाच काहीतरी विधायक कर की..
तू म्हणुन बिन्धास्त सांगतेय.. तू आणि तुझा नवरा वेगळा विचार करु शकणार्यातले आहात.. बाकी अनेक हिंदु सण साज्रे करण्याच कारण मी समजु शकते.. पण "सत्यनारायण" मला तरी थोतांडच वाटतं..
(अवांतर - काल वॉट्सअॅपवर एक मेसेज वाचला.. गाडगेबाबांचे सत्यनारायणाविषयीचे प्रवचन.. सुरेख आहे.. म्हणे पहिला सत्यनारायण केला त्या बायकांनी (पोथीतल्या गोष्टीतल्या ) त्यांनी कुठली पोथी वाचली मग?! )
23 Jan 2015 - 11:31 am | मुक्त विहारि
सहमत
23 Jan 2015 - 11:44 am | बॅटमॅन
विषय निघालाच आहे म्हणून सांगायला हरकत नाही. सत्यनारायणाचा उगम बंगालमधील 'सत्यपीर' नामक कन्सेप्टमध्ये आहे.
23 Jan 2015 - 5:04 pm | स्पंदना
नाहीतर काय?
त्यात आणी भर म्हणजे त्यात भटजी किंवा ब्राह्मण बोलावल्याचे किंवा मेहूण जेवल्याचेपण वाचल्याचे आठवत नाही. उलट प्रसाद खावा असा माझ्या आवडीचा भाग आहे ;)
23 Jan 2015 - 11:33 pm | स्रुजा
अगं २०० $ खर्च नाहीच करणार , भटजी नको च असं ते २०० $ ऐकून च ठरवलं . मला सत्यनारायण पूजे वर अति विश्वास नाहीये आणि मला ते थोतांड पण वाटत नाही . नवरा त्याला थोतांड म्हणतो आणि तावातावाने कथेच्या डीटेल्स वर वाद घालतो. मी त्या कथेकडे , खास करून सगळ्या वादग्रस्त मुद्द्यांकडे लक्ष देत नाही म्हणजे साधू वाण्याची कशी पंचाईत केली आणि कसं त्याला लायनीवर आणलं वगैरे.
मला वाटतं की थोतांड हे बऱ्याचदा माणसांमुळे होतं म्हणजे त्या मंदिरातले गुरुजी आम्हाला म्हणे तुम्हाला काय त्रास आहे सांगा आम्ही यज्ञ सांगतो उपाय करतो . म्हणजे सत्यनारायण कदाचित एकदम स्वस्त पूजा असणार , म्हणून हे सगळं . आता या अशा वागण्यामुळे त्या पुजेचे वलय एकदम मानवी पातळीवर येतं . मला हे थोतांड वाटतं .
बाकी असं पाहायला गेलं तर मला पूजा का करायची आहे तर घरात ते प्रसन्न वातावरण हवंय . त्यात संकल्प , उपासना आणि अगदी अथर्वशीर्ष म्हणलं तरी मला चालणार आहे . पण हे सगळं वर्षातून झालं की मला बरं वाटतं , का ते मला पण माहिती नाही. मला काही त्रास , संकटं आहेत का? तर नाही . मी उपास तापास करत नाही , नवरात्री ची सवाष्ण म्हणून पण त्या ९ दिवसांमध्ये जो रविवार असेल तेंवा मैत्रिणी ला बोलावते आणि तिच्या आवडीचा स्वैपाक करते, खास कुळधर्म म्हणून काही नाही . जिथे करायचे तिथे आपण बदल करतोच कालानुरूप पण मला ही नाळ तोडता येत नाहीये आणि मला त्यात जो पर्यंत मी त्याच्या आहारी जात नाही तो पर्यंत त्याच्यात काही चूक वाटत नाही . खरं सांगायचं तर ज्यांचा पर्ण विश्वास असतो आणि कधीच विश्वास नसतो अशांबद्दल मला आदर वाटतो जाम . कारण या एका विषयावर मला अजून माझा ठाम मत बनवता आलेलं नाहीये . मी माझ्यापुरतं एक धोरण ठेवलंय आणि तेवढं मी पाळते , आता काय करणार ?
बाकी तू, आणि पेठकर का म्हन्तायेत तसा माझा नवरा आहे , नास्तिक . कर्मावर , माणसांवर विश्वास ठेवणारा . तो पूजा करणार आहे कारण त्याला तो स्वैपाक येत नाही . इतकं सरळ डिव्हिजन ऑफ लेबर आहे .
23 Jan 2015 - 11:41 pm | स्रुजा
हापिसातून छोट्या विंडो मधून लिहिलाय प्रतिसाद त्यामुळे जरा टायपो आलेत , थोडे सांभाळून घ्या
23 Jan 2015 - 11:41 pm | मुक्त विहारि
आमच्या बायकोचे पण हेच म्हणणे होते.
साधा उपाय केला.
गणपतीच्या दिवसात, १०-१२ मुलांना बोलावले आणि मस्त उदबत्ती लावून, अथर्वशीर्षाची २१ आवर्तने केली.समारोपाला इडली-चटणी.मुलांना थोडी दक्षिणा पण दिली.
बायको पण खूष, अनावश्यक अवडंबर नसल्याने आम्ही पण खूष आणि अन्न्दान झाल्याने सासू पण खूष आणि दक्षिणेसकट खायला मिळाल्याने ती मुले पण खूष.
24 Jan 2015 - 11:35 am | इरसाल
बघा त्याच अस झालं की साधुवाणी जहाज घेवुन किनार्याकडे येत असताना त्याला असे दिसले की पाकिस्तान वाले अमेरिकावाल्यांच्या मदतीने त्याच जहाज(ती पाणबुडी होती ;) ) अपहरण करायला येत आहेत. त्याने मारली पाण्यात बुडी, नेमकी त्याची बायको घाईघाईने त्याला पहायला धावतपळत आली प्रसाद न खाता बघते तर काय जहाज गायब. लोकांना संधी मिळाली बघ बघ प्रसाद नाही खाल्लास ना म्हणुन हे झाले, तिथे बसुन काय करणार म्हणुन गेली परत थोडा नाश्ता करुन येवु या विचारने खाल्ला थोडा शिरा. इकडे भारतीय हद्दीत जास्त वेळ काढु न शकल्याने गेले अमे-पाकी परत मग काय आली पाणबुडी (ते जहाज होते ;) ) वर.
जहाज( ती पाणबुडी होती ;) ) वर साधु वाणी खुश, साधुवाणी परत आला म्हणुन त्याची बायको खुश, शिरा खाल्ला प्रसाद म्हणुन भटजी खुश.
*** मी इतकेच पाहिले होते आगचे-मागचे मला नाय माहित, उगा आचरट प्रश्न विचारु नये.
24 Jan 2015 - 1:14 pm | एस
धन्य!
स्पार्टसालबुवा!
24 Jan 2015 - 3:17 pm | इरसाल
घेतल्याबद्द्ल धन्यवाद स्पार्टाशेट
23 Jan 2015 - 4:54 pm | हाडक्या
आपल्या बुवांची (अतृप्त आत्मा) कॅसेट लावायची.. अधिक माहितीसाठी त्यांनाच संपर्क करा..
(बुवांचा सत्यनारायण पर्त्येक्ष ऐकण्याचे भाग्य लाभलेला)
23 Jan 2015 - 6:20 pm | अत्रुप्त आत्मा
(कथा"पुनर्रचनाकथन-कार:- आत्मूबाबा'सुधारणावाले! ;) )
हि घ्या... मराठी/हिंदी कथा. - डाऊनलोडवा...आणि हवी तेंव्हा ऐका. नायतर एका चौरंगावर नुसता सत्यनारायणाचा फोटू ठिवा,त्येला गंध/अक्षता/हळद/कुकू/गुलाल्/बुक्का..फुलं/हार/तुळस वहा.. उदबत्ती/निरांजन ओवाळा..नंतर आपला शिर्याचा निवद दाखवा..आनी मंग ह्यी कथा ऐकून ,आरती करा...
मंजी पंचोपचारी पूजा,कथा,आरती...असा सुटसुटीत खेळ व्हईल... :HAPPY: णाय का? :)
१) मराठी कथा:- ही कथा सांगताना मोबल्या थोडा लांब होता..त्यामुळे शब्दश्रुती साठी जरा लक्षपूर्वक ऐकावी लागेल..क्षमस्व!
http://mfi.re/listen/ibszayaiki3vm2d/satya_narayan_katha2.mp3
२) हिंदी कथा:- ही कथा एका बँकेत झालेल्या पूजेच्या वेळेची आहे..बँक नॉनमहाराष्ट्रीयन असल्यानी तिकडून आलेले त्यांचे हिंदी भाषिक साहेब्/उपसाहेब..यांच्या आग्रहानी मी ही हिंदित सांगितली आहे..(या रेकॉर्डिंगमधे..सुरवातीला थोडा प्रार्थनेचा भाग आलाय..नंतर लगेच कथा सुरु झालीये..ही कथा जास्त प्रासादिक आणि ठणठणीत शब्दात बद्ध झालेली आहे..मराठी पेक्षा ऐकायला सुरसही वाटेल..)
http://mfi.re/listen/edbym84erbqw3po/hindi_satya_katha.ogg
=====================================
कथा बदलली वग्रे का? अन कशासाटी ? ..अशे प्रश्न कुनाला पडत असतील.. तर शंका णिर्सनासाटी इकडे या!
23 Jan 2015 - 10:43 pm | कंजूस
तुमच्या वरच्या लेखाकडे शीर्षक वाचून उघडला नव्हता पण आता तो लेख वाचला कथा फार मोठी आहे आणि मोबल्यात फ्लैश प्लेअर नाही तेव्हा एक विनंती तुमच्या आवडीचे कोणतेही (सत्यनारायणचेच हवेत असे नाही)पाच दहा श्लोक दोन तीन मिनीटे कालावधिचे साउंड रेकॉर्डीँग करून vocaroo dot com वर अपलोड करा अन लिंक द्या जे ऐकता येतील.एक झलक.
23 Jan 2015 - 3:30 am | स्पा
ओके मुवी काका
23 Jan 2015 - 6:09 am | देशपांडे विनायक
@ मूवी तुम्हाला अभिषेक कसा करतात हे माहित आहे ?
म्हणजे कुठली करण्याची पद्धत धार्मिक द्रिष्ट्या योग्य इत्यादि
धार्मिक मध्येही अनेक प्रकार असणार
गोत्राप्रमाणे इत्यादि
असे असताना तुम्हाला अभिषेक झाल्यावर समाधान वाटले ते कशाचे हे कधी तपासलेत ?
हळू घ्या अशी विनंती
23 Jan 2015 - 7:20 am | मुक्त विहारि
"मूवी तुम्हाला अभिषेक कसा करतात हे माहित आहे?"
अजिबात नाही.भटजी सांगतात त्याप्रमाणे करतो.
===============
"असे असताना तुम्हाला अभिषेक झाल्यावर समाधान वाटले ते कशाचे हे कधी तपासलेत?"
मला बर्याच वेळा मंदिरात गेल्या नंतर कधी उत्तम मानसिक समाधान वाटते.
विशेषतः गुहागर, वेळणेश्र्वर किंवा विंध्यवासिनी (चिपळूण)
एक तर तिथे प्रगाढ शांतता असते आणि कुठलाही भटजी पैसे लुबाडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुहागरला थेट गाभार्यात जावून अभिषेक करता येतो.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्या मंदिरात गेल्या नंतर कुणाला समाधान वाटेल किंवा कुणाला नाही वाटणार.प्रत्येकाचे अनुभव वेगळे.
23 Jan 2015 - 7:04 am | मदनबाण
कस्तूरी कुन्डल बसे, मृग ढूढै बन माहि ।
ऐसे घट-घट राम हैं, दुनिया देखे नाहि ॥
इति:- संत कबिर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }
23 Jan 2015 - 7:25 am | अजया
देवस्थानाचे संस्थान झालेले असलेल्या ठिकाणी फक्त बाहेरुन स्थापत्य,मूर्तीकला बघुन अामची पूजा होते!त्यासाठी पूजारी लागत नाही!गर्दी गजबज बकाली झालेल्या तीर्थक्षेत्रात देव स्वतःच राहात नसणार!मग जाऊन आपला वेळ आणि ऊर्जा फुकट का घालवावी,भटजींची धन करायला!
23 Jan 2015 - 9:08 am | कंजूस
पैसे कमावण्यातही एकेका देवस्थानाचे {आणि वहिवाटदार पुजाऱ्यांचेही}भाग्य असते. बारा ज्योतिर्लिँगांपैकी एक असूनही श्रीक्षेत्रभिमाशंकर फारच बापुडवाणे आहे. श्रावणातला दीड महिना काय ती कमाई होते. (मारवाड्यांचा पंधरा दिवस अगोदर सुरू होतो ) .ट्रेकरांना या भोलेनाथाचा फार आधार आहे .एरवी इतक्या रानात कोण सोयी करेल ?
23 Jan 2015 - 9:48 am | सतिश गावडे
याचा अनुभव आमच्या एका छुप्या सनातनी मित्राने घेतला आहे.
भटकंतीनिमित्त भिमाशंकरला गेलो असता मंदिरातील पुजार्यांनी गाभार्यात शंकराच्या पिंडीच्या जवळ जाण्यास मनाई केली. ती सुविधा फक्त पावती फाडून अभिषेक घालणार्यांसाठीच होती.
आमचा हा मित्र एरव्ही वाद-विवादात कोणालाही सहसा हार न जाणारा. मात्र त्या दिवशी त्याचे काही चालले नाही.
देवाच्या दरबारात कोणाचेच काही चालत नाही.
23 Jan 2015 - 4:56 pm | हाडक्या
ब्राह्मण नसाल तर बहुतेक ठिकाणी (सगळीकडेच नव्हे तरीपण) हा अनुभव लाभतोच. तुमच्या छुप्या सनातनी मित्रास याचा तितकासा अनुभव नसावा. ;)
23 Jan 2015 - 7:09 pm | प्रसाद गोडबोले
तोच तर मुद्दा आहे !!
ब्राह्मण असुनही मंदीरातल्या पुजार्यांनी त्या छुपा सनातनी मित्राला तशी ट्र्रीटमेन्ट दिली , अर्थात त्यांना ब्राह्मण्याशी काही घेणे देणे नाहीये . त्यांचा संबंध फक्त पैशाशी आहे ... पैसा टाकेल तो देव आहे त्यांच्यासाठी अन पैसा टाकेल तो ब्राह्मण !
लाखभर रुपये देणगी टाकतो तेही विदाउट पावती असे म्हणाल तर पिंडी भोवती मिठी मारुन सेल्फीही काढुन देतील ते तुम्हाला यो मॅन पोझ मधे !
:D
23 Jan 2015 - 7:12 pm | स्वामी संकेतानंद
तुमचा मित्र ब्राह्मण आहे हे त्या पुजार्याला कसे कळले? कुतूहल आहे म्हणून विचारले.
23 Jan 2015 - 7:13 pm | बॅटमॅन
हेच कुतूहल मलाही आहे.
23 Jan 2015 - 9:40 am | सतिश गावडे
सत्यनारायणाची पूजा घालताना झालेल्या खर्चाबाबत अशी नापसंती व्यक्त केल्यास त्याचा फलप्राप्तीवर परिणाम होत नाही का?
23 Jan 2015 - 9:47 am | अजया
त्यातला नारायण सत्य असेल तर होतो म्हणे परिणाम ^_~
23 Jan 2015 - 9:56 am | सतिश गावडे
सत्य कंडिशनल असते तर. :)
23 Jan 2015 - 10:08 am | अजया
देव, पूजा याबाबतीत सत्य नक्कीच कंडिशनल असते!!शुध्द व्यवहार आहे तो!तुम्ही अशी पूजा करा हे फळ मिळेल!५०$मध्ये जरा कमी ,२००$मध्ये जास्त मिळेल ^_~
23 Jan 2015 - 10:40 am | मुक्त विहारि
आमच्या सत्यनारायणाला तुम्ही पण आला होतातच की...
पैशांनी देव विकत घेता येत नाही आणि देव जर पैशांमुळे आणि रोज दर्शनाला गेल्यामुळे प्रसन्न होत असेल, तर तो देव नाही, असे माझे मत आहे.
नाही वेचली कवडी-दमडी
नाही वेचीला दाम
बाई, मी विकत घेतला श्याम
23 Jan 2015 - 11:22 am | सस्नेह
भाव तिथे देव.
सू. : 'भाव' याचा अनर्थ घेऊ नये.