मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
7 Jan 2015 - 11:03 am

कविवर्य "विकु" यांची मापी मागून…आणखी येक जिल्बी :D
पेर्णा - http://www.misalpav.com/node/29907

---------------------------------------------------------------------------------

मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला

मित्रालाच सांगतो, (थोडी) पीत जा... असा मी बेवडा
दांभिकांची छुपी जागा, जातिवंतांस सोहळा

ढेकूण नामे किटक डसतो, बारवाल्याचा वायझेडपणा
"पक्षी" देतो प्राण येथे, आणे वेटर बावळा

भाव न जाणता (जो) सोनेरी रंगा भुले
वर्ण असो गोरटा मग होई काळा सावळा

तारवटलेल्या डोळ्यांनी देशी जो घेतो पिउनी
घास उदरीचा ओकतो तो, होय मोठा सोहळा

मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला
"रम"लेले म्हणती लोक आम्हा, कोण येथे सोवळा?

घाबरत नसें या जगा इतका पिल्यावर तू
सांग त्यांना ढोसूनी, समजू नका मला बेवडा !

फक्त : काल"खंबा"
"चाल"वली : एक पाय पुढे दोन पाय मागे … एक पाय पुढे दोन पाय मागे
(सर्वत्र "स्वयं"प्रकाशित)

ओशाळ

काहीच्या काही कविताभयानकबिभत्सकविताविडंबनविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

7 Jan 2015 - 11:20 am | खटपट्या

चांगलीय !!

विजुभाऊ's picture

7 Jan 2015 - 11:21 am | विजुभाऊ

सुधारणेस वावेय

टवाळ कार्टा's picture

7 Jan 2015 - 11:36 am | टवाळ कार्टा

प्रयत्न सुरुच आहेत

पहिल्या प्रतिक्रियेशी सहमत... ;)
बाकी व्हिस्की,रम, ब्रांडी यात काय फरक असतो ? या प्रत्येकात किती अल्कोहलच प्रमाण असतं ? यातले प्रत्येकातले नामांकित ब्रांड कोणते ? महागडे आणि खिशाला परवडणारे यात नक्की चांगले कुठले ? या प्रश्नावर प्रबोधन करुन हवे आहे....

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)

टवाळ कार्टा's picture

7 Jan 2015 - 12:02 pm | टवाळ कार्टा

कॉल्लिंग सोत्रि :)

सोत्रि's picture

11 Jan 2015 - 2:54 pm | सोत्रि

कॉकटेल लाउंज मधल्या गाथा वाचल्यास सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

- (साकिया) सोकाजी

विवेकपटाईत's picture

7 Jan 2015 - 7:58 pm | विवेकपटाईत

दिल्लीत ३१ तारखेला रात्री जिथे पहा तिथे गंगा वाहत होती, बाकी जील्बीत गोड आणि स्वादिष्ट बारबाला दिसली नाही....

टवाळ कार्टा's picture

7 Jan 2015 - 10:36 pm | टवाळ कार्टा

बाकी जील्बीत गोड आणि स्वादिष्ट बारबाला दिसली नाही

माझ्या मिपा आयडीला हार घालायची वेळ येईल :( (स्वगत - अजून दुसरा ड्वैडी पण नाही घेतलाय ;) )

आमच्याकडे याला सोन्याची माती करणे म्हणतात.

सोन्याची माती होत नै ना,लै झाल सुवर्णभस्म करता येईल.. *wink*

टवाळ कार्टा's picture

8 Jan 2015 - 9:16 am | टवाळ कार्टा

उलट सुवर्णभस्माचेच महत्वाचे उपयोग असतात ;)

त्या जुन्या संताचा फर्निचर पॉलिश + स्टिकफास्ट + कफसिरप असा मिश्र स्वाद लोक्सना का आवडतो हा प्रश्नच आहे.

की केवळ बजेटसमस्या ?! ;)

टवाळ कार्टा's picture

8 Jan 2015 - 12:16 pm | टवाळ कार्टा

जुन्या संताचा फर्निचर पॉलिश + स्टिकफास्ट + कफसिरप असा मिश्र स्वाद

काहिंना टेकऑफ्फ (मैफिलीतून आणि जीवनातून सुध्धा) करायची घाई असते त्यामुळे असे जेट फ्युएल भरत असतील

सहमत...

मोजून २ वेळाच जुन्या संतांची जीभ-भेट झाली.

आता तिसरी भेट तर अजिबात नाही...

+१

(एकाच भेटीत चिडलेला) जेपी