नेहमीप्रमाणेच टीपी करण्याकरता भगवान शंकर आणि पार्वती त्यांच्या स्पेशल चार्टर्ड विमानातून चालले होते. पार्वती आपली नेहमीप्रमाणेच निरागसतेने विचारती झाली- "भगवान, या कलियुगात स्त्रियांना चार घटका आनंदी, सुखी ठेवणारं असं काही व्रत आहे का?" भगवान ताबडतोब उत्तरले- "हो देवी. हल्लीच्या संगणक युगात या मिसळपाव नामे संस्थळाला फार महत्त्व आलय. आणि त्यात अनाहिता नामक एक अध्याय फक्त स्त्रियांसाठीच राखून ठेवलाय. तिथं त्या अगदी मनसोक्त गप्पा मारतात, नवीन मैत्रिणी करतात, त्यायोगे स्वतःचं ज्ञान वाढवतात आणि मनोरंजनही करून घेतात."
पार्वती देवी म्हणाल्या - "भगवान, म्हणजे आताही स्त्री ने फक्त घरातूनच हे सारं करायचं का? तिने नाही बाहेर पडायचं?"
भगवान गूढ हसले. - नेहमीप्रमाणेच. आपल्याला काय करायचंय? त्यांची ईस्टाईल. आणि म्हणाले- "खाली पहा देवी. हा मुंबईचा बहुचर्चित सरस प्रदर्शनाचा विभाग. इथे या अनाहितांपैकी मोक्षदा, सानिका, आरोही आणि सविता या चारच जणी आल्यात. पण कशा धुमाकूळ घालत आहेत ते बघ. आता या कलीयुगात त्याही चांगल्या चपळ झाल्यात. ही जी सविता दिसतेय ना, ती आणि तिची शेजारीण सानिका दोघींना वाटलं की त्यांची अजया ही मैत्रीण येत नाहीये तर आपण पण रहित करूया का आजचा बेत? तर नाही. आरोही नावाची मैत्रीण येतेय म्हटल्यावर या भल्या पहाटे मुलुंड नामक स्थानकावर फक्त १५ दिवसांच्या अंतराने भेटल्या असल्या तरी अशा काही भेटल्यात की जणू मागच्या जन्मानंतर आजच भेटतायत. बसल्या गाडीत, पुढे रिक्षा आणि सगळे स्टॉल उघडण्यासाठी या दोघी हजर. नंतर आरोहीला फोन करून कुठेशी आलीस, लौकर ये वगैरे सांगून त्या बिचार्या मोक्षदाताईंना कॅन्सल झाला असं वाटलेला बेत - या हो, आम्ही आहोत असं या दोघींनी सांगून त्यांनाही कामाला लावलं. बरं देवी... आता तुला मोक्षदाताईंची दया येतेय का? तर तसं काही नाही. सविताने फोन केल्याकेल्या - अगबाई- भेटतोय का आपण? ही आलेच मी अर्ध्या तासात म्हणून याच तिघींसाठी ताज्या चकल्यांचा घाणा तळायला घेतला.घरातल्यांसाठी दोन भाज्या दणादण फोडणीला टाकून या तिघींसाठी चकल्या घेऊन बाई हजर आहे बघ कट्ट्याला."
पार्वतीदेवी: "भगवान, पण कट्टा?? तुम्हीतर प्रदर्शन आहे म्हणालात ना?"
शंकर भगवानः "हो देवी. पण या साळकाया माळकाया जिथे भेटतात त्या ठिकाणाला त्या कट्टा असे संबोधतात."
पार्वतीदेवी- "ओह, आय सी.. "(आता हे दोघे आधुनिक झालेत.उगीच काय च्या काय शंका काढू नयेत्,इंग्लीश कसे बोलतात वगैरे.. उत्तरे मिळणार नाहीत. Wink )
शंकर भगवान: "मी ऑटो गिरकी मोडवर ठेवलंय विमान. तू पहा आता खाली. मी निवांत बसतो आता." (लोगों- ये देखो टिपिकल नवरा- शॉपिंग सहन ही नहीं कर सकता!!!)
पार्वतीदेवी: "बापरे-या सानिका, सविता तर बांगड्या, गळ्यातलं असं काही दिसलं तर जरा सोडत नाहीयेत. काय बाई तरी हा सोस..आमच्यावेळी नव्हतं बाई असं काही प्रदर्शन वगैरे..
अरेच्च्या- ही आरोही पण आली. झालं साड्या, ड्रेसेस, दागिने, मातीची भांडी, शोभेच्या वस्तू, मसाले, चटण्या, लोणची.. किती किती पहातायत.. घेणार आहेत की नाही कोण जाणे.. हं मोक्षदाताईंची वाट पहात होत्या होय? आल्या आल्या त्या. बाई बाई, किती ही लगबग? बरोबरच आहे पण. सख्यांना भेटायचंय ना..
हुश्श! भेटल्या चौघी जणी. अरे- हे काय? आधी पोटोबा. खमंग चकलीच फडशा पाडला आधी यांनी. आणि आता- ही खरेदीची धूमशान चालू झालीये. किती सुंदर बांगड्या, कानातली घेतायत या कारट्या!!! मस्तच. शिवाय कोकणी, कोल्हापुरी, मालवणी, खानदेशी मसाले, चटण्या, रोस्टेड ज्वारी, बाजरी, मँगो शेवया.. झाला वाटतं कट्टा!
नाही नाही- या चौघी निघाल्या सोलकढी आणि ताक प्यायला. शिवाय हुरड्याचं थालीपीठ. एवढी खरेदी केल्यावरती लागणारच ना तहान?
आता चालल्या या सगळे फूड स्टॉल धुंडाळत. कुठे काय मिळतं म्हणून. म्हणजे मेजवानी वाटतं आता..
अगबाई-या निघाल्या की परत खरेदीला. कित्ती एन्जॉय करतायत.. आणि टकळी चालू चौघींची. कमाल आहे. पाय दमलेत पण तोंड चालू गप्पांसाठी.
आहा- आता ती सानिका साडी घेतेय, शो पीसेस घेतेय, पर्सेस घेतेय आणि जिला ढिम्म काटकसर करता येत नाही ती सविता तिला भाव कसे कमी कर याच्या टिप्स देतेय.वा रे वा- हे म्हणजे अजबच आहे आणि सानिकाला त्या भावात वस्तू मिळ्तायत पण. झकास.
इकडे ही आरोही आणि मोक्षदाताईंच मातीच्या भांड्यांबद्द्ल मौकिल निरिक्षण चालू आहे. बाई बाई- सगळे लोक अलिकडे ते नॉन स्टीक घेतायत आणि या चालल्या अश्मयुगाकडे. पण सुधारताहेत हो माझ्या पोरी. आय अॅम फीलींग सो नाईस.
आता चालल्या खादाडी प्रोग्रॅमला. वा वा- अगदी देशी मेनू घेताहेत. भाकरी, ठेचा, मासवडी - रस्सा, मटकी उसळ, मेथीची भाजी आणि नंतर चक्क वाफाळते उकडीचे मोदक. अगदी मस्त आनंदात चालू आहे प्रोग्रॅम. आणि सततचं वाक्य काय चौघींच? चला बाई- हात अगदी भरून आलेत. पोटात आणि पोतडीत अज्जिबात जागा नाही. आणि तरीही परत या खरेदीकडे.. आता मातीची भांडी घेतली.
आता काही झालं तरी घरची आठवण ठेवतात हो माझ्या पोरी.. अगदी खमंग, गरमागरम खानदेशी मांडे घेतलेत पार्सल करून. कशा गुणाच्या आहेत.
अरे- सकाळी १० ते संध्याकाळी ५ असा वेळ या चौघींनी किती सुंदर घालवयाय!! आय जस्ट एन्वी देम!
गेल्या सगळ्या आपापल्या दिशेने..
भगवान, मी काय म्हणते, ऐकलं का??????? (टिपिकल बायको वाक्य)"
शंकर भगवानः हं???????????? (टिपिकल नवरा वाक्य)
पार्वती देवी: मी की नाही गडे, स्वर्गात गेल्यागेल्या एक कट्टा करावाच म्हणते आमच्या सगळ्या देवी ग्रूपचा.
व्हॉट से???????
शंकर भगवान: ओह माय मॅन.........
प्रतिक्रिया
7 Jan 2015 - 5:51 pm | सुप्रिया
सरस झालाय वृत्तांत!
9 Jan 2015 - 5:48 pm | कविता१९७८
खरंच सरस झालाय
7 Jan 2015 - 6:08 pm | विटेकर
दन्डवत स्वीकारा !
कट्टा झाला असेल बरा असे म्हणायला भरपूर वाव आहे.
वृत्तांत मस्तच !
7 Jan 2015 - 6:59 pm | पदम
नुकतच लोगिन केलय मलाहि आवडेल तूमच्या दालनात यायला
पदम
7 Jan 2015 - 7:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपलं नुकतंच लगीन झालंय तेव्हा आपलं मनःपूर्वक स्वागत.
कंच्या पार्टीत सामील व्हायचंय तुम्हाला ?
ह.घ्या. हं. मिपावर नवीन सदस्याला अशीच सलामी द्यायची असते. :)
लेखनासाठी काय मदत हवी सांगा मदत तयार आहे.
-दिलीप बिरुटे
7 Jan 2015 - 11:07 pm | त्रिवेणी
पण सदस्य काळ तर १ वर्श ३ महिने असा दिसतोय.
8 Jan 2015 - 5:55 pm | पदम
आभारि आहे आपलि. मला स्त्रियान्साथि जो धागा आहे म्हन्जे दालनात जायला आवडेल. मे गेल्या चार वर्षापासुन मिपा वाच्तेय. पण लिह्न्यासाठि पहिल्यान्दाच प्रयत्न करतेय. भिति वाटायचि पण शेवटि जो होगा सो देखा जायेगा अस्स ठरवुन लिहायला सुरवात कर्तेय. लिह्ताना चुका झाल्यास माफि अस्सावि.
पदम
9 Jan 2015 - 5:29 pm | अजया
अनाहिताला सदस्यत्वासाठी विनंती पाठवा.लिहायचा प्रयत्न करताय, छान वाटलं.
9 Jan 2015 - 5:46 pm | कविता१९७८
ऑल द बेस्ट
9 Jan 2015 - 4:30 am | रेवती
कट्ट्याची कल्पना व वृ लेखनाची ष्टाईल आवडली.
9 Jan 2015 - 5:45 pm | कविता१९७८
भारीये न इष्टाईल ..