नेहमीप्रमाणेच टीपी करण्याकरता भगवान शंकर आणि पार्वती त्यांच्या स्पेशल चार्टर्ड विमानातून चालले होते. पार्वती आपली नेहमीप्रमाणेच निरागसतेने विचारती झाली- "भगवान, या कलियुगात स्त्रियांना चार घटका आनंदी, सुखी ठेवणारं असं काही व्रत आहे का?" भगवान ताबडतोब उत्तरले- "हो देवी. हल्लीच्या संगणक युगात या मिसळपाव नामे संस्थळाला फार महत्त्व आलय. आणि त्यात अनाहिता नामक एक अध्याय फक्त स्त्रियांसाठीच राखून ठेवलाय. तिथं त्या अगदी मनसोक्त गप्पा मारतात, नवीन मैत्रिणी करतात, त्यायोगे स्वतःचं ज्ञान वाढवतात आणि मनोरंजनही करून घेतात."
पार्वती देवी म्हणाल्या - "भगवान, म्हणजे आताही स्त्री ने फक्त घरातूनच हे सारं करायचं का? तिने नाही बाहेर पडायचं?"
भगवान गूढ हसले. - नेहमीप्रमाणेच. आपल्याला काय करायचंय? त्यांची ईस्टाईल. आणि म्हणाले- "खाली पहा देवी. हा मुंबईचा बहुचर्चित सरस प्रदर्शनाचा विभाग. इथे या अनाहितांपैकी मोक्षदा, सानिका, आरोही आणि सविता या चारच जणी आल्यात. पण कशा धुमाकूळ घालत आहेत ते बघ. आता या कलीयुगात त्याही चांगल्या चपळ झाल्यात. ही जी सविता दिसतेय ना, ती आणि तिची शेजारीण सानिका दोघींना वाटलं की त्यांची अजया ही मैत्रीण येत नाहीये तर आपण पण रहित करूया का आजचा बेत? तर नाही. आरोही नावाची मैत्रीण येतेय म्हटल्यावर या भल्या पहाटे मुलुंड नामक स्थानकावर फक्त १५ दिवसांच्या अंतराने भेटल्या असल्या तरी अशा काही भेटल्यात की जणू मागच्या जन्मानंतर आजच भेटतायत. बसल्या गाडीत, पुढे रिक्षा आणि सगळे स्टॉल उघडण्यासाठी या दोघी हजर. नंतर आरोहीला फोन करून कुठेशी आलीस, लौकर ये वगैरे सांगून त्या बिचार्या मोक्षदाताईंना कॅन्सल झाला असं वाटलेला बेत - या हो, आम्ही आहोत असं या दोघींनी सांगून त्यांनाही कामाला लावलं. बरं देवी... आता तुला मोक्षदाताईंची दया येतेय का? तर तसं काही नाही. सविताने फोन केल्याकेल्या - अगबाई- भेटतोय का आपण? ही आलेच मी अर्ध्या तासात म्हणून याच तिघींसाठी ताज्या चकल्यांचा घाणा तळायला घेतला.घरातल्यांसाठी दोन भाज्या दणादण फोडणीला टाकून या तिघींसाठी चकल्या घेऊन बाई हजर आहे बघ कट्ट्याला."
पार्वतीदेवी: "भगवान, पण कट्टा?? तुम्हीतर प्रदर्शन आहे म्हणालात ना?"
शंकर भगवानः "हो देवी. पण या साळकाया माळकाया जिथे भेटतात त्या ठिकाणाला त्या कट्टा असे संबोधतात."
पार्वतीदेवी- "ओह, आय सी.. "(आता हे दोघे आधुनिक झालेत.उगीच काय च्या काय शंका काढू नयेत्,इंग्लीश कसे बोलतात वगैरे.. उत्तरे मिळणार नाहीत. Wink )
शंकर भगवान: "मी ऑटो गिरकी मोडवर ठेवलंय विमान. तू पहा आता खाली. मी निवांत बसतो आता." (लोगों- ये देखो टिपिकल नवरा- शॉपिंग सहन ही नहीं कर सकता!!!)
पार्वतीदेवी: "बापरे-या सानिका, सविता तर बांगड्या, गळ्यातलं असं काही दिसलं तर जरा सोडत नाहीयेत. काय बाई तरी हा सोस..आमच्यावेळी नव्हतं बाई असं काही प्रदर्शन वगैरे..
अरेच्च्या- ही आरोही पण आली. झालं साड्या, ड्रेसेस, दागिने, मातीची भांडी, शोभेच्या वस्तू, मसाले, चटण्या, लोणची.. किती किती पहातायत.. घेणार आहेत की नाही कोण जाणे.. हं मोक्षदाताईंची वाट पहात होत्या होय? आल्या आल्या त्या. बाई बाई, किती ही लगबग? बरोबरच आहे पण. सख्यांना भेटायचंय ना..
हुश्श! भेटल्या चौघी जणी. अरे- हे काय? आधी पोटोबा. खमंग चकलीच फडशा पाडला आधी यांनी. आणि आता- ही खरेदीची धूमशान चालू झालीये. किती सुंदर बांगड्या, कानातली घेतायत या कारट्या!!! मस्तच. शिवाय कोकणी, कोल्हापुरी, मालवणी, खानदेशी मसाले, चटण्या, रोस्टेड ज्वारी, बाजरी, मँगो शेवया.. झाला वाटतं कट्टा!
नाही नाही- या चौघी निघाल्या सोलकढी आणि ताक प्यायला. शिवाय हुरड्याचं थालीपीठ. एवढी खरेदी केल्यावरती लागणारच ना तहान?
आता चालल्या या सगळे फूड स्टॉल धुंडाळत. कुठे काय मिळतं म्हणून. म्हणजे मेजवानी वाटतं आता..
अगबाई-या निघाल्या की परत खरेदीला. कित्ती एन्जॉय करतायत.. आणि टकळी चालू चौघींची. कमाल आहे. पाय दमलेत पण तोंड चालू गप्पांसाठी.
आहा- आता ती सानिका साडी घेतेय, शो पीसेस घेतेय, पर्सेस घेतेय आणि जिला ढिम्म काटकसर करता येत नाही ती सविता तिला भाव कसे कमी कर याच्या टिप्स देतेय.वा रे वा- हे म्हणजे अजबच आहे आणि सानिकाला त्या भावात वस्तू मिळ्तायत पण. झकास.
इकडे ही आरोही आणि मोक्षदाताईंच मातीच्या भांड्यांबद्द्ल मौकिल निरिक्षण चालू आहे. बाई बाई- सगळे लोक अलिकडे ते नॉन स्टीक घेतायत आणि या चालल्या अश्मयुगाकडे. पण सुधारताहेत हो माझ्या पोरी. आय अॅम फीलींग सो नाईस.
आता चालल्या खादाडी प्रोग्रॅमला. वा वा- अगदी देशी मेनू घेताहेत. भाकरी, ठेचा, मासवडी - रस्सा, मटकी उसळ, मेथीची भाजी आणि नंतर चक्क वाफाळते उकडीचे मोदक. अगदी मस्त आनंदात चालू आहे प्रोग्रॅम. आणि सततचं वाक्य काय चौघींच? चला बाई- हात अगदी भरून आलेत. पोटात आणि पोतडीत अज्जिबात जागा नाही. आणि तरीही परत या खरेदीकडे.. आता मातीची भांडी घेतली.
आता काही झालं तरी घरची आठवण ठेवतात हो माझ्या पोरी.. अगदी खमंग, गरमागरम खानदेशी मांडे घेतलेत पार्सल करून. कशा गुणाच्या आहेत.
अरे- सकाळी १० ते संध्याकाळी ५ असा वेळ या चौघींनी किती सुंदर घालवयाय!! आय जस्ट एन्वी देम!
गेल्या सगळ्या आपापल्या दिशेने..
भगवान, मी काय म्हणते, ऐकलं का??????? (टिपिकल बायको वाक्य)"
शंकर भगवानः हं???????????? (टिपिकल नवरा वाक्य)
पार्वती देवी: मी की नाही गडे, स्वर्गात गेल्यागेल्या एक कट्टा करावाच म्हणते आमच्या सगळ्या देवी ग्रूपचा.
व्हॉट से???????
शंकर भगवान: ओह माय मॅन.........
प्रतिक्रिया
6 Jan 2015 - 12:31 pm | मुक्त विहारि
आवडला...
7 Jan 2015 - 5:27 pm | दिपक.कुवेत
सहिच्च आहे लिखाणाची ईस्टाईल....
6 Jan 2015 - 12:32 pm | कविता१९७८
काही कारणास्त्व मी मिसला कट्टा पण छानच झालेला दिसतोय.
6 Jan 2015 - 12:33 pm | स्पंदना
आई ग्ग!! जळजळ झाली आहे.
कधी मिळणार अस खायला आणी हुंदडायला?
6 Jan 2015 - 2:38 pm | पियुशा
लय भारी आवडेश
6 Jan 2015 - 4:37 pm | इरसाल
फोटो नाय काय नाय. कसली जळ्जळ झाली. तुमचं आपलं काय तरीच ब्वॉ !
6 Jan 2015 - 1:01 pm | आतिवास
वृत्तांत आवडला; शैली मस्त आहे!
6 Jan 2015 - 1:07 pm | सस्नेह
सव्या ss कस्सला भारी वृ पाडलायस *smile*
6 Jan 2015 - 1:13 pm | कंजूस
आता कट्टाप्रेमी बाजीराव डोळ्यात जीवदया नेत्रप्रभा अथवा जाई काजळ घालून भोलेनाथास तीर्थाभिषेक करवणार. आम्हाला पाव.
6 Jan 2015 - 1:30 pm | त्रिवेणी
सवि भीमथडीला खाऊन झाले बरेच. सो कमी जळजळ झाली.
6 Jan 2015 - 1:31 pm | इशा१२३
मस्त वॄत्तांत सविता.मस्त खादाडि,मज्जा केलीत.
6 Jan 2015 - 1:33 pm | आरोही
सवि मस्त लिहिलयेस ग वृत्तांत ..जेवढी मज्जा कट्ट्याला आली त्यापेक्षा जास्त वृत्तांत वाचताना आली ........जबरदस्त !!
6 Jan 2015 - 1:37 pm | पैसा
मस्त लिहिलंय! हे सगळे कट्टे बहुगुणींच्या जिओ मिपावर पण अपडेट करा!
6 Jan 2015 - 1:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
चकलीसारखा खुसखुशित आणि खमंग वृत्तांत ! :)
6 Jan 2015 - 1:56 pm | चौकटराजा
त्यायोगे स्वतःचं ज्ञान वाढवतात
ओ, शंकरराव हे काय बोलताय म्हणे ज्ञान वाढवतात ?
बाकी आमच्या सौ ला सुद्धा अशा कट्ट्याला पाठविले पाहिजे म्हणजे ज्या बांगड्या, पिना, लिपस्टीका,,,,,,अन पाच पन्नास
आणखी काही काही प्रकार ! तिची किंवा माझी " तुला" करायला मस्त मटीरियल ! ,
6 Jan 2015 - 1:59 pm | मदनबाण
छान !
टिपीकल अनाहिती लेखन ! *LOL*
तरी अशा काही भेटल्यात की जणू मागच्या जन्मानंतर आजच भेटतायत. बरं एव्हढं घट्ट प्रेम आहे की काही वाक्यातल आपापसातल प्रेम दिसुन येतच.... { प्रेम अस लिहुन ठेवतो बरं का त्या प्रत्येक वाक्या समोर} *LOL*
अगबाई कॉमण फ्रेज विथ आउट थीस दे कॅन नॉट स्टार्ट एणी कम्युणिकेशन यू नो ! *LOL*
बांगड्या, गळ्यातलं असं काही दिसलं तर जरा सोडत नाहीयेत { प्रेम }
काय बाई तरी हा सोस { प्रेम }
किती किती पहातायत एव्हरी वर्ड ट्वाइस दॅट इज स्पेश्यल खासियत बरं का मंडळी ! *LOL*
सुंदर बांगड्या, कानातली घेतायत या कारट्या!!! { प्रेम }
टकळी चालू चौघींची. कमाल आहे. { प्रेम }
पाय दमलेत पण तोंड चालू गप्पांसाठी. { प्रेम }
जिला ढिम्म काटकसर करता येत नाही ती सविता तिला भाव कसे कमी कर याच्या टिप्स देतेय { प्रेम }
सानिकाला त्या भावात वस्तू मिळ्तायत पण. { प्रेम }
आय अॅम फीलींग सो नाईस इंग्रजीचा वापर केल्या शिवाय कम्युणिकेशनला हुच्च्भ्रू टच नाही देता येत हे यावरुन सिद्ध होत ! *LOL*
पॉइंट टु नोट :- "ए मुलींनो इज रिप्लेस्ड बाय "हो माझ्या पोरी"
चला आता कलटी मारावी... :P
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy
6 Jan 2015 - 2:23 pm | पिलीयन रायडर
अरे भाई कहना क्या चाहते हो???
6 Jan 2015 - 2:29 pm | मदनबाण
माई अपको सच्च्ची-मुच्ची समझ्या नयं ? की समझ के भी नयं समझ्या ऐसा दिखाने का हयं ? :P
यह एक लिखावट की टेंप्लेट हय.. इस में थोडा-फार इधर उधर शब्द बदल्या की नया लेखन हो सकता हयं...
अरे मुलांनो... वाचतायना तुम्ही ! *LOL*
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy
7 Jan 2015 - 11:27 am | पिलीयन रायडर
सगळ्याचंच टेम्प्लेट असतय हो...
जसं की...
१.
ब्लाह ब्लाह ब्लाह....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- असंच काय बाय
२.
फोटो टाकले असते तर काही हरकत नव्हती... ख्या ख्या ख्या....
बाकी छान झालाय कट्टा... ख्या ख्या ख्या...
३.
फोटो नाहीत? मग खयाली पुलावच म्हणायचा की काय हा...
वगैरे वगैरे टेम्प्लेट प्रतिक्रिया नै का देत लोक अनाहितांच्या धाग्यावर?!!
7 Jan 2015 - 11:40 am | टवाळ कार्टा
हि तुमची "टिपीकल" प्रतिक्रिया म्हणायची का :P
7 Jan 2015 - 12:16 pm | पिलीयन रायडर
जीभ बाहेर काढणारी स्मायली ही जशी "टिपीकल" प्रतिक्रिया तुमची.... तशीच आमची....!!
7 Jan 2015 - 10:30 am | टवाळ कार्टा
अनाहितामध्ये अस्से सगळ्ळे गोग्गोड बघून ड्वाळे पाणावळे...म्हैला जर इतक्या गोडीगुलाबीने वागतात तर हा कट्टा म्हणजे नक्कीच "मनाचे श्लोक" आहे :P
7 Jan 2015 - 11:06 am | सविता००१
कुणाच्या मनाचे????
तुम्हाला लग्गेच कळलं हो अगदी ;)
7 Jan 2015 - 12:51 pm | कविता१९७८
*lol*
7 Jan 2015 - 2:53 pm | सस्नेह
'चोराच्या मनात चांदणे' ही म्हण आठवली.
6 Jan 2015 - 2:00 pm | एस
ओह माय वूमन असं म्हणायचं का मग आम्ही? :-)
काय मस्त लिहिलंय. वा!
6 Jan 2015 - 2:01 pm | अजया
भारी लिहिलाय वृत्तांत!मजा आली वाचायला.सव्या भाई जोमात शंकर भगवान कोमात =))
रच्याकने:पूणे कट्टा मिसलात त्याची जळजळ अशी मजा करुन कमी करताय काय!!इनो घेऊन घरी गप पडुन राहायचं ते नाही.गेल्या लगेच मला जळवायला *beee*
6 Jan 2015 - 2:09 pm | यशोधरा
मस्त लिहिला आहे वृ! काही जणांची भलतीच जळजळ झालेली दिसते! बिना टारगेट बाण मारत सुटलेत ते! =))
6 Jan 2015 - 2:22 pm | अजया
यशो बाडिस =))
6 Jan 2015 - 2:23 pm | मदनबाण
बाण अचूक लागले की मगच त्याचा उल्लेख करावासा वाटतो... असो चालु ध्या हाय हॅल्लो ! :P
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy
6 Jan 2015 - 2:29 pm | यशोधरा
बलं, बलं. आपण सव्यातैचं घर बांधू हं सरसच्या उन्हात. जाते ती जाते आणि वर वृ लिहिते म्हंजे काय?
वाऽऽ गं सव्या!
6 Jan 2015 - 2:30 pm | मदनबाण
उगी ! उगी ! अशं हट्टी पणा नै करायच,,, *LOL*
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy
6 Jan 2015 - 2:32 pm | यशोधरा
तेच तर सांगतेय तुला. =))
6 Jan 2015 - 2:34 pm | मदनबाण
आरशात पाहुन स्वतःशी बोलायची सवय गेलेली दिसत नयं वाट्ट ! *LOL* :P
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy
6 Jan 2015 - 2:37 pm | यशोधरा
स्वतःवरुन जगाची परीक्षा करु नकोस रे बाणा. तुला असणार्या सवयी इतरांना नसतात आरशात बघून बोलायच्या. :P
6 Jan 2015 - 2:39 pm | मदनबाण
स्वतःवरुन जगाची परीक्षा करु नकोस रे बाणा. तुला असणार्या सवयी इतरांना नसतात आरशात बघून बोलायच्या.
जरा नविन विनोद सांगा हो काकू... हा जुना झाला बरं का ! *LOL*
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy
6 Jan 2015 - 2:40 pm | यशोधरा
विनोद नव्हताच. तुला विनोद वाटला म्हंजे.. =))
6 Jan 2015 - 2:43 pm | मदनबाण
बरं बॉ... तुमचच खरं... बास्स्स्स... :P उगा शब्दाला शब्द वाढवत नाय म्या... जराशी टिंगली केली एव्हढच ! :P
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy
6 Jan 2015 - 2:46 pm | यशोधरा
चालायचंच की बाण्या. तुला काय आज ओळखते काय? :) तुला जे जमतं तेच तू करणार की नै... :P
(पळाऽऽऽ)
6 Jan 2015 - 2:57 pm | विशाखा राऊत
इथे उगाच कशाला बोलत आहात समजत नाहि. चांगले बोलायला जड जाते का???
7 Jan 2015 - 10:31 am | टवाळ कार्टा
म्हैलांची क्यॅसेट एकाच जागी अडकलेली असते
8 Jan 2015 - 4:08 am | विशाखा राऊत
तुमची क्येसट्च अडकत आहे हल्ली सगळीकडे त्याचे जरा बघा नीट.. मग उपदेश चालु करा... बाकी विनोद आवडला ना???
8 Jan 2015 - 9:36 am | टवाळ कार्टा
इस्कटून सांगा की जरा...माझी क्यॅसेट कशी आणि कुठे अडकली आहे ते
9 Jan 2015 - 4:06 am | विशाखा राऊत
म्हैला म्हणता तेव्हाच अडते तुमची क्यॅसेट
6 Jan 2015 - 2:55 pm | त्रिवेणी
इथे पण विनोद.
अरे देवा.
6 Jan 2015 - 5:47 pm | पैसा
विनोदचा सख्खा मित्र फिरकला नाय अजून इकडे!
6 Jan 2015 - 5:57 pm | त्रिवेणी
कोण ग तायडे?
6 Jan 2015 - 2:23 pm | सविता००१
येउदेत गं हव्वे तेवढे बाण!!!!
त्यात काय एवढं?????
:)
6 Jan 2015 - 2:52 pm | कविता१९७८
येउच देत गं , असे खोचक प्रतिसाद आल्याने तुझे लेखन कीती उत्कृष्ट झालंय याला सहमती मिळतीये.
6 Jan 2015 - 2:49 pm | सूड
रोचक चर्चा!!
7 Jan 2015 - 12:47 am | खटपट्या
कचकून सहमत !!
6 Jan 2015 - 3:00 pm | Maharani
सविता छान लिहीले आहेस .. मजा आली वाचताना..
6 Jan 2015 - 3:14 pm | विशाखा राऊत
मस्त झाला कट्टा
6 Jan 2015 - 3:43 pm | मनिमौ
माझा मिसलयाने भारी जळजळ होते आहे. इनो पण नाही घरात.
9 Jan 2015 - 12:33 pm | आरोही
मने ११ तारखेपर्यंत आहे सरस अजून ...येतेस काय ??
9 Jan 2015 - 5:47 pm | कविता१९७८
आरोही तु जाणारेस का? माझा विचार आहे जायचा
9 Jan 2015 - 5:44 pm | कविता१९७८
अगं १२ तारखेपर्यंत आहे ना , जाउन ये की
6 Jan 2015 - 4:07 pm | मधुरा देशपांडे
मस्त लिहिले आहेस. झक्कास.
6 Jan 2015 - 5:18 pm | अनन्न्या
सरसहून सरस झालाय वृत्तांत!
7 Jan 2015 - 6:01 am | कौशी
मज्जा,धम्माल अशीच सुरु असु द्या...
7 Jan 2015 - 8:04 am | स्पंदना
सविता००१, लिखाणाची स्टाईल आवडली. कट्टा व्रूतांत तर बरेच वाचतो आम्ही, पण ही जी शिव-पार्वती कथा आम्ही लहाणपणी कोणत्याही पोथ्या पुस्तकात वाचायचो त्याचा अतिशय चपखल वापर केला आहे येथे. अर्थात त्या शैलीला मनमोकळी दाद देण्याऐवजी, मुळातच झाड वाढु नये की काय अशी वृत्ती दिसली. कोणीही लिहो, जे शैलीदार, कल्पनात्मक असे येइल त्याचे कौतुकच आहे.
9 Jan 2015 - 12:31 pm | आरोही
+ १ अपर्णा ताई
7 Jan 2015 - 10:33 am | मोक्षदा
शब्दच नाही वृतांत उत्तमच झाला आहे
चांगल्या च झाला आहे
तुमच्या बरोबर खूपच मज्ज्जा आली
परत नक्की दुसर्कात्त्याचा मी विचार केला आहे
मार्च मधेय
7 Jan 2015 - 11:05 am | टवाळ कार्टा
मज्ज्जा आली >> हि कोण मज्ज्जा
दुसर्कात्त्याचा >> दुश्कृत्याचा??? =))
7 Jan 2015 - 11:39 am | अजया
फारच आवडलेला दिसतोय विनोद.लोळुन हसतांय ते!!
7 Jan 2015 - 11:40 am | सविता००१
अजून शंका आहे की काय विनोद बद्दल?
7 Jan 2015 - 11:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फक्त वृत्तांत फोटो टाका प्लीज. नै तर आम्हाला पुन्हा कथा लिहावी लागेल.
मिसळपाव जनहिताय कथा.
श्री गणेशाय नमः ! भारतदेशीय परमपवित्र ! मिसळपाव नामे एक नगर ! तेथे जनहिताय स्त्रीयांचं माहेर महाथोर ! जे का अपूर्व त्रिभूवनी !!१!! तेथे कोणे एके वेळी ! शिवपार्वती एक स्थळे ! चर्चा करितसे मिसळपावी. ! उभयता येऊनी चक्कर मारुनी स्थळी ! शिव कपाळावर हात मारुनी ! वृत्तांतात फोटो कुठे दिसेनाशी ! तव पार्वती म्हणे -----
असो.
-दिलीप बिरुटे
7 Jan 2015 - 11:34 am | सविता००१
हा पण फॉर्मॅट मस्त आहे.
आवडेश एकदम.
फोटो नाही हो.. शॉपिंग आणि खादाडी. वेळच नाही. काय करणार??????? :(
7 Jan 2015 - 3:19 pm | सूड
मिसळपाव नाम संस्थळी। कलियुगी अधुनकाळी। गोष्ट कैसि वर्तली। ऐकावी सज्जनहो॥१॥ पंचाननाचि अंबिका। सारीपाट खेळूनि फुका। म्हणे 'वाज आयलो माका'। बैसलिसे विमानि ॥२॥ तेणे भांबावे शिवाचि मति। देव असला तरी शेवटी पति। पिशव्या-ब्यागा घेउनि हाति। मागुति चालला॥३॥ विमान आणिले अधांतरी। उमा पाहे पृथ्वीवरी। वस्तु दिसति नानापरि। सेल जणू लागलासे॥ ४॥ तव दिसल्या साळका-माळकाया। अनाहिता म्हणवति आपणा या। ना ना ष्टॉलांवरि जावूनिया। धुडगुस असे मांडला॥५॥ शिवासि पडलि चिंता। म्हणे कैसे करावे आता। भार्याही खरेदी करु जाता। खिसा कैसा सांभाळू॥६॥ तत्क्षणी भोळा पशुपति। धावा म्हणे श्रीपति। वाचवाया मम हरि पत्ति। उपाय काही सांगावा॥७॥ श्रीहरि म्हणे सदाशिवा। मजतरि उपाय कैसा ठावा। शिवरात्र जणू आली एकादशीचे गावा। ऐसि गत झालीसे॥८॥ .....तूर्तास येवढंच !! ;)
7 Jan 2015 - 3:24 pm | सस्नेह
__/\__
7 Jan 2015 - 3:29 pm | टवाळ कार्टा
जब्ब्राट
7 Jan 2015 - 3:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारी !
7 Jan 2015 - 4:17 pm | सविता००१
सूड.........
केवळ भारी
दंडवत
____/\____
7 Jan 2015 - 4:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडले. *good*
-दिलीप बिरुटे
7 Jan 2015 - 7:04 pm | चौकटराजा
याचं पारायण ओला पंचा नेसून करायचं काय सुड्राव ?
7 Jan 2015 - 7:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
किती त्या पंचायती ! :)
7 Jan 2015 - 7:38 pm | सूड
आमचेकडे गिरगाव पंचे डेपोतून आणलेला कद आहे, आम्ही तो वापरतो.
इतरांनी आपापल्या आवडनिवड, वकुबानुसार ठरवावे. ज्यांना ओला पंचाच वापरायचा आहे पण तो मिळणार नाही असं असेल त्यांनी 'आमचे येथे पंचा ओला करुन मिळेल' अशी पाटी पुण्यात कोठे दिसते का शोधावे, कसें? ;)
7 Jan 2015 - 7:43 pm | बॅटमॅन
काय एकेक हस्तकला तरी =))
9 Jan 2015 - 9:14 am | नाखु
इथेच नीट तपासून पहावा नंतर तो कोरडा होता असा ओरडा चालणार नाही. ;-) ;) ^_~
सूचना संपली..
=============
आम्चे येथे "धागे" उसवून मिळतील घाऊक मागणीला आकर्षक पॅकेज आहे.
9 Jan 2015 - 9:17 am | अत्रुप्त आत्मा
=)))))
7 Jan 2015 - 11:12 pm | खटपट्या
जबराट सूड
9 Jan 2015 - 10:40 am | असंका
_/\_
9 Jan 2015 - 5:53 pm | आदूबाळ
ब्याक्कार! :)) :))
7 Jan 2015 - 3:24 pm | पिशी अबोली
भारी लिहिलाय..
फलश्रुती: या कथेचे भक्तिभावाने जो श्रवण करील त्याला भरपूर कट्टे करता येतील. जो अवमान करेल त्याला सगळे ठरवलेले कट्टे ऐनवेळी चुकतील...
7 Jan 2015 - 3:38 pm | मदनबाण
सूड
ज ब रा ट.... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)
7 Jan 2015 - 4:11 pm | हाहा
छान मजा केलीये की सगळ्यांनी.
7 Jan 2015 - 5:25 pm | स्पंदना
ये हुई न बात !!
बिरुटे सर आणि सुड बहोत खूब!!
9 Jan 2015 - 12:29 pm | आरोही
असेच म्हणते ...
7 Jan 2015 - 5:35 pm | भाग्यश्री कुलकर्णी
सवी,सर,सुड मस्तच.
7 Jan 2015 - 6:04 pm | सखी
हेच म्हणते.