नमस्कार मिपाकर,
बर्याच दिवसाने मिसळ्पाव वर लिहितोय.. आणि सांगायची गोष्टही तशीच आहे..
साधारण ६ वर्षापुर्वी हा प्रवास सुरु झाला, आधी कोल्हापुरी दादा या टोपणनावाने आणि मग स्वतःच्या नावाने इथे लिहु लागलो. अनेकदा बालिश आणि क्वचित बरे असे त्या लिखाणाचे स्वरुप होते. पण या कालावधीत बर्याच मिपाकरांनी मला मोलाची मदत आणि मार्गदर्शन केले. कित्येकदा चेष्टाही केली, पण या सार्यातुन खुप काही शिकायला मिळाले. महत्वाचे म्हणजे लिखाणाची उर्मी कायम राहिली.
हे सगळे सांगायचे कारण म्हणजे आता हा माझ्या लिहिण्याचा प्रवास एका महत्वाच्या टप्प्यावर आलेला आहे . आधी मिपा, नंतर कृषीवल , सकाळ, लोकमत आणि महाराष्ट्र टाईम्स अशा वृत्तपत्रात स्तंभलेखन असे टप्पे पार करत काही महिन्यांपुर्वी "कन्फ्यूजन/कम्युनिकेशन्/कन्व्हिक्शन" हे माझे पहिले पुस्तक प्रकाशित झाले आहे. ज्यावेळी हे पुस्तक प्रकाशित झाले त्यावेळी मी मिपावर आणि एकुणातच महाजालावर फारसा अॅक्टिव्ह नव्हतो ,त्यानंतर पुण्याला शिफ्ट झालो आणि या सार्या धांदलीत इथे ही आनंदाची गोष्ट तुम्हा सार्यांना सांगायची राहिलीच. पण, आता पुण्यात बर्यापैकी सेटल झालो आहे ,गेल्याच आठवड्यात लोकमत ने पुस्तकाला बरीच प्रसिद्धी दिली , त्यानिमिताने मिपाकरांना हे सांगावे असे पुन्हा प्रकर्षाने वाटले. कारण लिखाणाचे हे रोपटे इथे मिपावरच लावले गेलेले होते. "मिसळपाव" चा मी अत्यंत मनापासुन आभारी आहे आणि इथल्या माझ्या सर्व मित्रांचा सदैव रुणी आहे.
सदरच्या पुस्तकात विविध विषयावरचे ३० लेख असुन गेल्या ५-६ वर्षात वेडेवाकडे अनुभव घेताना जे काही दिसले, शिकायला मिळाले त्या सार्याचे चित्रण यामध्ये करायचा प्रयत्न केला आहे. सकाळ समुहाचे रोव्हिंग एडिटर संजय आवटे आणि प्रख्यात लेखक संजय भास्कर जोशी यांच्या प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेल्या आहेत.
शब्दांजली प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असुन ते खालील ठिकाणी ऑनलाईन उपलब्ध आहे.
http://www.pustakjatra.com/index.php?route=product/product&product_id=1446
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4827980479876514916?BookNa...
पुस्तकाचा ब्लर्ब-
खुलेपणाच्या सोबतीनं जन्माला आलेला तो एक तरुण.
वय वर्षे २१.
जगण्याला रोज भिडणारा. भिडताना व्यक्त होणारा.
त्यातून काही मतापर्यंत आलेला
आणि, तरीही भंजाळलेला!
त्याच्या भोवताली रसरशीत जग
आणि तोही त्या जगाचा भाग.
त्याच्या डोक्यात प्रश्नांचा कोलाहल ...
नाटक-सिनेमा-टीव्ही-रेडिओ-मोबाइल-नेट अशा सगळ्यांतून
इतस्ततः संवाद साधताना
आणि त्याचवेळी इंजिनिअरिंगच्या एक्झाममध्ये स्कोअर करणारा
हा शहाणा इडियट.
त्याला टेकफेस्ट खुणावते, स्टुडंट्स पार्लमेंट अस्वस्थ करते आणि
शास्त्रीय संगीतातील जागाही आवाहन करतात.
मध्येच त्याला पडतात प्रश्न...
जात काय असते आणि काय असते राजकारण?
कॉलेजात गेल्यावर पोरींशी डिल कसं करायचं?
नक्की काय करायचंय आयुष्यात?
खरंच मजा आहे दारु पिण्यात ?
नाटक का बघायचं? भाषण का ऐकायचं नि वाचायचं कशासाठी?
चेतन भगत त्याला इम्प्रेस करतो काही काळ, पण मग त्याची मर्यादाही जणवू लागते.
असं बरंच...!
रेडिओ, टीव्हीत काम करताना ...
हजारोंचा इव्हेंट मॅनेज करताना आणि एकटेपणासोबत जगताना ...
फेसबुकवर कनेक्ट होताना ... आणि मौनाचा अर्थ लावताना...
तो अधिकच गोंधळत जातो आणि तेवढाच ठामही होत जातो..
What's on your Mind
असं हे स्टेटस की आणखी काही...?
माहीत नाही...!
पुस्तक वाचा ही विनंती आहेच, पण ते वाचुन खर्याखुर्या प्रतिक्रिया आणि सजेशन्स द्या ,कुठे चुकले आहे आणि कुठे अजुन बरेच शिकणे बाकी आहे ते नक्की सांगा .कारण मिपा हे कायमच मला बरेच काही शिकवत आलेले आहे आणि इथे जे शिकतो ते पुढे नक्की उपयोगाला येते याचा दांडगा अनुभव पाठिशी आहे. सो वेटींग फ्रेंड्स...
जुन्या मिपाकरांना आणि मधल्या कालावधीत नव्याने आलेल्या सर्व मिपाकरांना माझा नमस्कार !!!! जमेल तसे बोलत राहुच....
तुमचाच,
विनायक पाचलग
प्रतिक्रिया
18 Nov 2014 - 12:47 pm | योगी९००
विनायका,
अभिनंदन...!!!
योगेश (पुर्वीचा खादाडमाऊ)
18 Nov 2014 - 12:59 pm | प्रसाद१९७१
अभिनंदन
18 Nov 2014 - 1:11 pm | मदनबाण
अभिनंदन ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }
18 Nov 2014 - 1:22 pm | सतिश गावडे
अभिनंदन कोदा.
इंजिनीयरींगचं शिक्षण पुर्ण झालं का रे?
18 Nov 2014 - 1:40 pm | प्रभाकर पेठकर
पुस्तक प्रकाशनाबद्दल अभिनंदन.
उघड्या डोळ्यांनी आणि तितक्याच उघड्या मनाने जगाचे अनुभव घेताना कणाकणाने व्यक्तिमत्त्व घडत जाते. तुमचा अभ्यासू आणि मुक्त प्रवास तुम्हाला आयुष्यात अत्यंत उपयुक्त ठरेल. शुभेच्छा..!
18 Nov 2014 - 1:49 pm | समयांत
अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा..
18 Nov 2014 - 2:00 pm | कंजूस
वा !
18 Nov 2014 - 2:15 pm | खेडूत
अभिनंदन अन शुभेच्छा.
18 Nov 2014 - 2:15 pm | सुनील
हबिणंडण, कोदा अभिनंदन, विपा!!
19 Nov 2014 - 12:10 am | डॉ सुहास म्हात्रे
अभिनंदन !
19 Nov 2014 - 12:32 am | विकास
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
19 Nov 2014 - 1:57 am | एस
अभिनंदन! मिपावरही लिहीत रहा!
19 Nov 2014 - 1:58 am | मुक्त विहारि
सर्व प्रथम तुमचे आणि दुसरे आमच्या "मिपाचे"
सामान्य माणसा पासून, ते एका पुस्तकाच्या लेखकापर्यंतचा तुमचा प्रवास, "मिपा" पासूनच सुरु झाला म्हणून "मिपा"चे.
हे मिपा आम्हाला अजून किती सुखद धक्के देणार आहे कुणास ठावूक?
19 Nov 2014 - 2:37 am | श्रीरंग_जोशी
पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल हार्दिक अभिनंदन.
बुकगंगावर इ-आवृत्ती उपलब्ध झाल्यास नक्कीच विकत घेईन.
पुढील वाटचालीस शुभेच्छा!!
19 Nov 2014 - 8:38 pm | विनायक पाचलग
सर्वांचे मनापासुन आभार..
माझे इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण झाले असुन सध्या मी के पी आय टी टेक्नॉलॉजीज पुणे येथे काम करतो.
धन्यवाद
विनायक पाचलग