आठवणी : गुळमट तिखट कडू

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
14 Sep 2014 - 5:18 pm

आताच लोकसत्ता वाचत होतो. खूप मज्जा येते ते तसले भारी शब्द वाचायला.
व्यामिश्र, जनरेटा, उद्बोधक....
एकदम जुन्या गोष्टी आठवायला लागल्या.
शाळेत असताना असे शब्द वाचले , की मी कुठेही ते शब्द ठोकून देत असे.

उदा:-
"मी आज व्यामिश्र खेळलो."
"मला आज खूपच उद्बोधक वाटतय."
किंवा "भाजीची चव उद्बोधक आहे."
आज "शाळेत जनरेटा पोचला."
.
.
"शी "ला विष्ठा म्हणतात समजेपर्यंत दुसरी तिसरीत कानावर पडलेला " शिष्टाचार " हा शब्द "विष्ठाचार ", "व्यभिचार " असा कसाही वापरायचो.
पेप्रात "विष्ठावंत नाराज " असं छापून यायचं असं मला वाटे.
दप्तर टाकायचो आणि गिळायला मिळेपर्यंत घरभर उंडारत असलं काहीतरी बडबडत सुटायचो.
तोंडात गूळ - शेंगदाणे, चिवडा असा कशाचातरी बकाणा भरलेला असायचा.
कितीही दंगा करुन शाळेतून आलो तरी थकलेलो नसायचो.
तेच शब्द आज पुन्हा लोकसत्तेत सापडले. -- व्यामिश्र, जनरेटा, उद्बोधक. मजा वाटली!
.
.
.

माझी आजी भांड्याला "पातेलं " किंवा "भुगणं/भुगुणं" म्हणे. ते पहिल्यांदा ऐकल्यावर मी स्टीलच्या गंजात तोंड घालून
"भुंग भुंग भुंग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग" असं करत बसलो होतो बराचवेळ.
.
.
.
.

एकदा कधी नव्हे ते आम्ही सहकुटुंब थेट्रात गेलो होतो. मिस्टर इंडिया किंवा तेजाब चित्रपट असावा.
तेव्हा चार पाच वर्षाचा असलेला मी बसल्याजागेवरच उगीच चुळबुळ करत बाइक सुरु करताना आवाज काढतात तसा काढत होतो.
"बुंग बुंग बुंग्ग्ग्ग्ग्ग
स्वींइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइं"
थोडयवेळानं आवाज बराच व्हायला लागल्यावर आईने मला चूप बसायची खूण करत
"शूssss चुप बस बरं बेटा" असं दरडावलं.
मग मी मोठमोठ्यानं ठणाणा करत "चुप बस ब्येट्टा
चुप बस ब्येट्टा . चुप बस ब्येट्टा "
म्हणत नाचायला लागलो.
.
.
.

पत्नी दिवसरात्र घाबरवते मला.
" तुझा मुलगा साक्षात तुझाच अवतार निघाला तर काय करशील ?"
माझी दातखीळ बसते. निदान वयाची पहिली पाच-सात वर्षे तरी त्याने मी होतो तसा असू नये असे वाटते.
आई-बाबांचा लैच वाईट छळ केला राव मी.
.
.
.

प्राथमिक शाळा. कागदाचे अगदि लहान लहान -- फारफारतर नखभर किम्वा त्याच्याही अर्ध्याच आकाराचे कपटे/तुकडे बेंचवर टाकायचो.
प्लास्टिकची पट्टी डोक्यावर केसाला घासून त्याच्यापासून एखाद दोन इंच जवळ आणली की कसे कुणास ठाउक कागद त्या पट्टीकडे आकर्षित व्हायचे.
लोखंड चुंबकाकडे होतं तसं. एकदा घटकचाचणीत पेपर लवकर लिहून झाल्यानं पहिल्या पानाचा -- विद्यार्थ्याचं नाव वगैरे असतं तो काही भाग हा
उपद्व्याप करण्यासाठी फाडून ठेवला होता!
.
.
.
दहावी बारावीपर्यंत "स्मॉल वंडर " ह्या स्टार प्लस वर लागणार्‍या लहान मुलांसाठीच्या सिरियलचा पंखा होतो. कुणीही भेटलं की त्याला उत्साहानं त्या हॅरिएट सारखा "हाईईईई" करायचो. अरे हां. हॅरिएट कोण? सिरियलमधल्या "जेमी -द बिग जे" आणि विकी ह्या शाळकरी भावाबहिणींची ती क्लासमेट.
जेमीची स्पर्धक व जेमीवर क्रश असणारीसुद्धा. विचित्र्,मूर्ख हावरट आणि ओव्हरएक्स्प्रेसिव्ह व्रात्य मुलगी.
तर असो. ती "हाईईईई" करी. डेंतिस्टला दात दाखवताना जसे "ईईईई" करत सगळे दात दाखवतो तसे.
सिरियल पाहून झाली की आम्ही तिघे -- मी केशा आणि विन्या ; आम्ही केशाच्या असणार्‍या चारमजली बिल्डिंगच्या गच्चीवर क्रिकेट खेळायचो.
फॉरेस्ट डिपार्टमेंटची दाट झाडी शेजारीच होती. रिमझिम भुरभुर पाऊस सुरु होता. आम्ही खेळायला सुरुवात करणार इतक्यात गच्चीवर आलेली वानरांची
टोळी दिसली. वानर....
काळ्या तोंडांची काळ्याकरड्याच रंगाचीच आणि जवळजवळ आमच्याइतकीच उंची असणारी ती वानरं.
ती गच्चीच्या दुसर्‍या टोकाला.आम्ही इकडं. मी लाडानं त्यांना "हाईईईई" असं म्हणालो अन् एकदम एक वान्नर पेटलन् राव!
तावातावानं, आवेशात ते पुढं येउ लागलं.संतापलं असावं. आपण दातओठ खाताना असतो त्याचे उग्र भाव.
ते एकटेच. आम्ही तिघे! तरी ते थांबेना. आम्ही होतो तिथूनच त्याला "ए हाट"..."ए जा"..."फिर्र फिर्र..." केलं.
पण ते कशालाच ऐकेना. तावाताव्नं पुढच येउ लागलं.
आम्हाला काहीही कळेना.केशा आणि विन्या झटकन दाराजवळ असल्याने सटकले.
मागोमाग मीही निघालो अन् दाराजवळच सटकन् आपटलो. कुठूनशी ऑइलची बाटली गच्चीवर आली होती. त्यावर घसरून पडलो.
मागोमाग वान्नर.
पण तेवढ्यात धप्पकन आवाज. बहुदा तेही माझ्या मागेच कुठेतरी घसरून पदले असावे.
मी कसाबसा बाहेर सरपटत बाहेर. थेट दार लावून घेतले घट्ट.
हुश्श.
वान्नर भडकण्याचं कारण मागाहून समजलं ते असं :-
तो हुप्प्या वान्नर - टोळीचा प्रमुख नर असावा. आधीच्या नराला च्यालेंज करुन, हाणामारी-लढाया करुन हाकलून लावतो नवा नर त्यांच्यात.
नवा नर -- च्यालेंजर आधीच्या टोळीप्रमुखाला च्यालेंज कसं करतो? "ईईईई" करत त्याला दात दाखवत, दात ओठ खात तो त्याच्यावर हल्ला करतो.
त्यादिवशी मी "त्या"ला "हाईईईईई" म्हटलेलं होतं !!!
.
.
.
एकदा कोल्हापूर-पुणे अशा प्रवासासाठी आम्ही पणजी-कोल्हापूर-पुणे अशी बस निवडली होती. ती रात्री ९ला निघणार म्हणून रंकाळ्याहून निघून लवकर ष्ट्यांडवर पोचलो
दोनेक तास आधीच.पण ती पणजीहून ९ वाजता निघणार आहे, असं मागाहून समजलं! म्हणजे ती पणजीहून कोल्हापूरला येइपर्यंत आम्ही पुढचे सहा सात तास ष्ट्यांडवरच.
.
.
.
नव्यानेच कोवळी कोवळी बोकड दाढी यायला लागली होती. त्यावेळेला गांधी-विनोबांमुळे "स्वावलंबन" डोक्यात भरलेले/भारलेले.
ट्रिमरने दाढीसोबतच कटिंगही करण्याचा प्रयत्न. डोके अर्धवट भादरले गेले असताना ट्रिमरनं मान टाकली. मग तसच कटिंग सलूनकडे प्रस्थान.
.
.
.
लहानपणी खडीसाखर म्हणून तोंडात तुरटी तोंडात टाकली.
.
.
.
पाच सात वर्षांचा असेन.लहानपणी इतर अनेकांप्रमाणे मीही लाडू चोरुन खात असे. आमच्याकडे एक मोठा स्टूल होता.
त्याच्यावर चढायला शिडीसारख्या पायर्‍या होत्या.(बांधकामवाले "घोडा" म्हणतात अशा स्टूलला.) आई बाबा बाहेर गेलेले.
त्यावर चढून लाडू घ्यायचा प्रयत्न. ते पडलं धपकन् खाली. माझा तोल सावरायला म्हणून कपाटाला/अल्मारीला लटकायचा प्रयत्न .
ठाण्णकन् आवाज. आख्खी अल्मारी घेउन अस्मादिक खाली.
.
.
.
दिवाळीची पहाट. अर्धवट झोपेत असताना अलार्म बंद करायला उठलो. लाइट नसल्याने मेणबत्ती पेटवली. त्या प्रकाशात दिसलं :-
मेणबत्तीऐवजी बुलेट बॉम्ब पेटवलाय मस्त!
=)) =))

--मनोबा

अवांतर :-
हापिसातून मिपा उघडत नै :( उरलेल्या वेळात धड मिपा पूर्ण वाचून होत नाही.
तुम्हाला मागील दोन चार महिन्यात अत्युत्कृष्ट असं जे जे काही मिपावर आलय असं वाटतं त्याच्या लिंका मला दिल्यात आभारी असेन.

जीवनमानराहणीरेखाटनस्थिरचित्रलेखबातमीअनुभव

प्रतिक्रिया

काउबॉय's picture

14 Sep 2014 - 6:00 pm | काउबॉय

आत्मचरित्र अवश्य प्रसिध्द करा.

पैसा's picture

14 Sep 2014 - 7:57 pm | पैसा

लै भारी किस्से रे मनोबा! मजा आली. तुझं पोरगं तुझ्या सवाई होऊ दे असा आशीर्वाद देत्यें.
असाच अधून मधून दर्शन देत जा. इतिहासाच्या धाग्यांवर तुझी अनुपस्थिती जाणवते.
बाकी मिपावर काय चांगलं विचारशील तर आम्हाला सगळंच चांगलं वाटतं, लेख चांगला नसेल तरी निदान एखादी प्रतिक्रिया तरी चांगली असते. त्यामुळे काय दिसेल तो धागा उघड आणि कर सुरू!

चिगो's picture

14 Sep 2014 - 8:39 pm | चिगो

भारीच आठवणी, मनोबा..

टवाळ कार्टा's picture

14 Sep 2014 - 8:48 pm | टवाळ कार्टा

लय भारी :)

सुखी's picture

14 Sep 2014 - 9:27 pm | सुखी

लय म्हंजे लय भारी :)))))

माझा निघालाय :) दिवसभर आरडाओरडा आणि तोडफोड सुरु असते...घरी आई बाबांना सांगायला गेलो..तर मी लहानपणी असाच होतो..हे ऐकायला मिळतं :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Sep 2014 - 9:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट कर्तृत्वाबरोबरच स्मरणशक्ती पण त्याच तोलाची आहे ! ;) =))

एस's picture

14 Sep 2014 - 10:33 pm | एस

मस्त लेख...

लहानपणापासूनच आम्हांला वाचायचे भारी वेड. अगदी भेळ खातानाही आमचं लक्ष त्या वर्तमानपत्राच्या तुकड्यावरील मजकुराकडे. मग वाचतावाचता मध्येच भेळीने जागा अडवली की ती खायच्या ऐवजी तशीच थोडीशी बाजूला सरकवायची, पण आधी लग्न वाचनाचे, मग भेळीचे. असंच कुठेतरी वाचलं की तिबेटमध्ये लोक याक नावाच्या बैलासारख्या दिसणार्‍या केसाळ प्राण्याच्या दुधापासून चहा बनवतात. तसेच त्यात याकच्या दुधाचे लोणी टाकून तो जो काही प्रकार बनतो तो आवडीने पितात. झालं, आमच्या डोक्यात याकच्या दुधाचे लोणी टाकून केलेला तो चहा घुसळायला लागला. आता याकच्या दुधाचे लोणी आपल्याकडे कुठले मिळायला? तरीपण नाक्यावरच्या डेअरीवाल्याकडे जाऊन हिम्मत करून तसे विचारूनही आलो. अर्थात अपेक्षित प्रतिसादच मिळाला. पण निदान तो आम्हांला हसला नाही हे पाहून आमला थोडंसं हायसं वाटलं आणि काही झाले तरी लोण्याचा चहा करायचाच असा निश्चय पक्का झाला. चहा करायला नुकताच शिकलो होतो. आई घरी नव्हती. मस्तपैकी बिनदुधाचा चहा टाकला आणि लोणी शोधायला सुरूवात केली. लोणी तर नव्हते, पण तूप सापडले. चांगला चमचा भरून तूप त्या दोन कप चहात टाकले, खंगाळ खंगाळ खंगाळवले. तितक्यात आईसाहेब आल्या. त्यांना आमचा याक ऊर्फ गाईच्या तुपाचा चहा आनंदातिशयाने पेश केला...

... असो. चहाचे पातेले, गाळणी, कपबशा वगैरे सर्व तुपटतुपट भांडी घासल्यानंतरच आमची सुटका झाली.

मग पुढच्या आठवड्यात नेहमी चहात साखरच का घालतात, मीठ का घालून पाहू नये, असा जेन्युइन प्रश्न स्वतःला विचारत मिठाचा चहा केला. आणि...
.
.
.
माझ्या हातचा चहाच कुणी पीत नाही राव! छ्याः ;-)

प्यारे१'s picture

14 Sep 2014 - 11:41 pm | प्यारे१

http://misalpav.com/node/28690

ह्ये कुनी केलं मग? खरं सांगायचं बाप्पू!

तो मीच. (तो मी नव्हेच च्या धर्तीवर उलटं वाचावं.)

तो धागा आता लेखकाचा राहिला नसून प्रतिसादकांचा झाला आहे. म्हणून अधिक काही बोलण्याला अर्थ नाही.

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2014 - 1:10 am | प्रभाकर पेठकर

>>>> तिबेटमध्ये लोक याक नावाच्या बैलासारख्या दिसणार्‍या केसाळ प्राण्याच्या दुधापासून चहा बनवतात.

खरं की काय?

एस's picture

15 Sep 2014 - 2:32 pm | एस

तो आमचा बालपणीचा होरा होता. (आमच्याच बालपणीचा असेही कंसात वाचावे.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2014 - 4:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

असंच कुठेतरी वाचलं की तिबेटमध्ये लोक याक नावाच्या बैलासारख्या दिसणार्‍या केसाळ प्राण्याच्या दुधापासून चहा बनवतात. तसेच त्यात याकच्या दुधाचे लोणी टाकून तो जो काही प्रकार बनतो तो आवडीने पितात. तिबेटी चहा चहापत्ती, याकचे लोणी, पाणी आणि मीठ एकत्र घुसळून बनवतात. त्यात साखर टाकत नाही. त्याला बोज्जा, चा सृमा, जा सृब्मा (घुसळलेला चहा) असे म्हणतात.

अच्छा! म्हणजे मी एकदम राईट ट्रॅकवर होतो तर!

मुक्त विहारि's picture

14 Sep 2014 - 10:44 pm | मुक्त विहारि

झक्कास...

एकापेक्षा एक जोरदार किस्से.

"व्यासपिठ" शब्द कुठेही वाचला किंवा कोणी उच्चारला कि मला लगेच "थालीपिठ" आठवायचं. :)

दिपक.कुवेत's picture

15 Sep 2014 - 1:36 pm | दिपक.कुवेत

मस्त किस्से. त्या स्मॉल वंडरचा मी सुद्धा जबरदस्त फॅन होतो...आजहि आहे. एकहि एपीसोड कधीहि चुकवला नाहि. मला वाटतं तेव्हा ती स्टार प्लस वर संध्याकाळि ०५३० ला लागायची. त्या सीरीयलची मोहिनी एवढि होती कि आईने काहि काम सांगीतलं कि विकिच्या आवाजात ते काम डबल बोलून दाखवायचो कराय्चो मात्र नाहि :D

विवेक्पूजा's picture

15 Sep 2014 - 3:56 pm | विवेक्पूजा

बरोबर. ५.३० लागायची स्मॉल वंडर... माझी शाळाही ५.३० सुटायची, मग पळत घरी येउन पहिला टिव्ही चालू करणे आलेच.

रम्य त्या आठवणी ! मै तो बचपन सेही लय व्रात्य कार्ट्या रहा हुं ;) सुट्टीत दुपारच्या वेळी लोकांच्या घरच्या कड्या वाजवुन पळुन जाणे हा माझा आवडता उध्योग होता. ;) स्मॉल वंडर तर फारच आवडायचे त्यातला एक एपिसोड अजुनही आठवतोय ज्यात विकीच्या सारखाच एक रशियन मुलगा { बहुतेक त्याच नाव व्लादिमिर असं होत}रॉबर्ट तिच्या बहुतेक शाळेत आणला जातो. तसेच जेमीची मैत्रिण सुद्धा लयं आवडली व्हती, जीव आला होता आपला तिच्यावर ! ;) कोणती ? अर्थात Jessica

;)
पण याहुन सगळ्यात जास्त मालिका मला आवडली होती ती नव्याने सुरु झालेल्या सोनी टिव्ही वरची आय ड्रीम ऑफ जिनी ! ती जिनी "जी मालिक" इतक सुरेख म्हणायची, साला आपल्या नशिबात अशी जिनी कधी येणार असं लयं वाटायच त्यावेळेला! ;)
1

बाकी डीडीज कॉमेडी शो कोणाला आठवतोय का ? कोणी पाहिला आहे का ?
http://www.youtube.com/watch?v=NBLJ47GtUpw

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

पियू परी's picture

30 Jan 2016 - 4:15 pm | पियू परी

मदनबाण.. मोठ्ठा सेम पिंच..
या दोन मालिकांनी वेड लावलं होतं तेव्हा..
आता युट्युबवर या मालिकांचे इंग्रजी व्हर्जन आहेत बहुतेक..
पण मला हिंदीच हवे आहेत. :(

जीनीचा तो हिन्दी आवाज " हेलन " ने दिलेला होता.

मदनबाण's picture

15 Sep 2014 - 5:15 pm | मदनबाण
आदूबाळ's picture

15 Sep 2014 - 5:29 pm | आदूबाळ

काय सांगता! भारीच!

जीनीचे हिंदी डब्ड एपिसोडस कुठे मिळतात का?

केल.ते स्मॉल वंडर,डकटेल वाला अंकल स्क्रुज,टेलस्पीन वाला बल्लु,ती जीनी आणी कुणाला आठवत असल्यास SILVER SPOON नावाची बापलेकाची मालीका माझी आवडती मालीका.
जाम आठवले.

आदूबाळ's picture

15 Sep 2014 - 9:24 pm | आदूबाळ

सिल्वर स्पून म्हणजे टकले किडकिडीत श्रीमंत गोरे गृहस्थ आणि त्यांनी दत्तक घेतलेली दोन कृष्णवर्णीय मुलं हीच सीरियल ना? त्यातला धाकटा लय व्रात्य होता असं आठवतंय.

सखी's picture

16 Sep 2014 - 10:24 pm | सखी

तुम्ही म्हणताय ती डिफरंट स्ट्रोक्स असावी, मस्त सिरीयल होती विशेष म्हणजे त्यांच्या वडीलांचा रोलही चांगला होता. - दुवा.

आदूबाळ's picture

16 Sep 2014 - 10:35 pm | आदूबाळ

हो हो डिफ्रंट स्ट्रोक्स! सिल्वर स्पून्सची काय थीम होती मग?

मस्त आठवणी ...माझ्या लहाणपणी घरात टिव्ही ला आरामच असायचा ,,,( बंधुराज परीक्षांच्या काळात टिव्ही थेट माळावर टाकुन देत असत, आणि त्यांना टिटोरियल, सहामाही, वार्षिक अश्या परीक्षा होत्या..असो )

पण सुट्टीच्या काळात सोनी वरची " जस्ट मोहोब्बत " ने मस्त मजा आणली होती, एक हॉस्टेल वरुन परत आलेला मुलगा , त्याचा व्हिजन मध्ये येणारा त्याचा मित्र ..साधंच पण वातावरण निर्मीती मात्र मस्त होती

सहा जणांच्या घरात मी एकटाच महाभयानक व्रात्य कार्ट होतो..हे ही मला ठासुन आठवतय ...पण तेव्हढा मार ही खाल्ला आहे , डॅड ला चुकुन त्यांच्या तोंडावर " रुस्तम-ए- हिंद " म्हणणारा मी एकटाच बालक असावा ;)

मस्त आठवणी आहेत, पत्नीची धमकीही भारीच - मलातर या आठवणी गोड, तिखट, (तुरटही :)) वाटल्या.

>>" तुझा मुलगा साक्षात तुझाच अवतार निघाला तर काय करशील ?"

अच्छा, मुलगा झाला तर !! ;)

हे वाचता वाचता आमचेही काही उपद्व्याप आठवले. =))))

टवाळ कार्टा's picture

29 Jan 2016 - 6:15 pm | टवाळ कार्टा

ल्हि की मग

मन१'s picture

17 Sep 2014 - 8:34 pm | मन१

सर्व वाचक-प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार!

हेमंत लाटकर's picture

30 Jan 2016 - 6:48 pm | हेमंत लाटकर

मनोबा,फारच द्वाड होतास बालपणी. तुझा मुलगा "बाप नंबरी बेटा दस नंबरी" असा असेल.